सायको-रहस्यपटांचा मुकुटमणी

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
10 Nov 2011 - 2:47 pm

आल्फ्रेड हिचकॉकचा बहुचर्चित सायको पूर्वीपण खूप वेळा बघितला होता, नुकतीच त्याची डीव्हीडी पण हाती लागल्याने परत एकदा पाहण्याचा आनंद घेता आला.

प्रियकर सॅम लुईसशी(जॉन गेविन) लग्न करण्यासाठी पैशाची आत्यंतिक जरूरी असलेली मरियन क्रेन (जेनेट लाय) तिच्या ऑफिसमधून चाळीस हजार डॉलर्सचा अपहार करून स्वतःच्या कारने पसार होते, वाटेत एका पोलीस डिटेक्टीव्ह द्वारे पाठलाग होत असल्याचे लक्षात आल्यावर जुनी कार विकून ती दुसरी कार विकत घेते.

अंधार्‍या रात्री तूफान पावसात कार चालवण्याऐवजी ती एका आडबाजूला असलेल्या बेट्स मॉटेलमध्ये उतरायचे ठरवते. बेट्स मॉटेलचा मालक नॉर्मन बेट्स (अँथनी पर्किन्स) आणि त्याची म्हातारी आई मॉटेलशेजारच्या घरात राहात असतात. गिर्‍हाईक आल्याचे बघून आनंदित नॉर्मन मरियनचे स्वागत करतो व स्वागतकक्षाजवळीलच रूम तिला राहण्यासाठी देतो आणि तिच्या जेवण आणण्यासाठी घरात जातो.
नॉर्मन आणि त्याच्या आईचे बोलणे मरियनच्या कानावर पडते व त्याची आई ही एक विकृत स्त्री असल्याचे तिला समजते.

इकडे मरियनचा फरार होण्याचा विचार बदलतो, नोटा मोजून ती आंघोळीसाठी जाते,आंघोळ करता करता एका म्हातारी पडद्याआडून अचानक अवतीर्ण होवून चाकूच्या सपासप वारांनी तिचा निर्घृणपणे खून करते. हा सीन आजवरच्या सर्व रहस्यपटांमधला एक सर्वोत्कृष्ट सीन ठरावा. कुठेही अश्लिल,ओंगळ, बीभत्स न होता अंगावर शहारे आणणारा, सत्याहत्तर कॅमेर्‍यांनी चित्रीत केलेला हा तीन मिनिटांचा सीन म्हणजे हिचकॉकचा मास्टरपीसच.
इकडे नॉर्मनला कळते की आपल्याच आईने हा खून केलाय. कार, कपडे आदी सर्व पुरावे तो नष्ट करून टाकतो.

मरियनचा पत्ता कुठेही न लागल्याने चिंताक्रांत झालेली मरियनची बहिण लीला(वेरा माईल्स) सॅम आणि खाजगी डिटेक्टीव्ह मिल्टन अर्बोगास्ट(मार्टिन बाल्सम) या दोघांच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरवते. अर्बोगास्ट बेट्स मॉटेलपर्यंत पोहोचतो. तिथे नॉर्मनकडून त्याला समजते की मरियन मॉटेल सोडून गेलीय व याउप्पर नॉर्मन कुठलेही सहकार्य करण्याचे नाकारतो. नॉर्मनचा आईबद्दल संशय बळावलेला अर्बोगास्ट नॉर्मनच्या घरात शिरलेला असतानाच ती वृद्ध महिला परत त्याच्यावर चाकूहल्ला करून त्याचा जीव घेते,
अर्बोगास्टचाही पत्ता लागत नसल्याचे पाहून सॅम आणि लिला स्थानिक पोलिसांशी संपर्क साधतात, तिथे त्यांना कळते की नॉर्मनची आईचा दहा वर्षांपूर्वीच मृत्यु झालेला आहे. हे पाहून सॅम आणि लिला दोघेही बेट्स मॉटेलमध्ये जायचा निर्णय घेतात.


पुढे काय होते? ती वृद्ध महिला कोण असते? नॉर्मनच्या गूढ वागण्यामागचे रहस्य काय?सॅम आणि लिलाचे पुढे काय होते? अजून कुणाचा खून पडलेला असतो? हे सर्व जाणून घेण्यासाठी चित्रपट अवश्य पाहिलाच पाहिजे.

हिचकॉकचे दिग्दर्शन असलेल्या ह्या कृष्णधवल चित्रपटाचे बर्नार्ड हरमन यांनी तयार केलेले पार्श्वसंगीत तर अत्यंत प्रभावी. सायकोची कॉपी पुढे कित्येक चित्रपटांत असंख्यवेळा होत गेली व अजूनही होतच आहे. पण या सम हाच.

तारे. ५/५

चित्रपटप्रतिक्रियासमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रास's picture

10 Nov 2011 - 2:54 pm | प्रास

वल्लीशेठ,

आधी असंख्य वेळा बघूनही पुन्हा सायको बघताना अनेक गोष्टींचा नव्याने साक्षात्कार होताना दिसतो. दर पहाण्यागणिक हिचकॉकला नव्याने दण्डवत घालावा लागतो.

छान आठवण करून दिलीत. बघा, आता पुन्हा बघणे आले ना..... बघतोच.

धन्यवाद!

:-)

परिकथेतील राजकुमार's picture

10 Nov 2011 - 2:58 pm | परिकथेतील राजकुमार

अप्रतिम आणि थोडक्यात परिक्षण हो वल्ली शेठ :)

हिचकॉक हा आपला आवडता दिग्दर्शक आहेच. ह्या चित्रपटासाठी त्याने त्या काळात गाजत असलेल्या जेनेट लाय ह्या अभिनेत्रीची मरियनच्या रोलसाठी निवड केली तेंव्हा अनेक जण आश्चर्यचकीत झाले होते. बॉक्स ऑफिसवर जीच्या नावाने चित्रपट चालतात तिला पहिल्या १५ मिनिटातच मेलेली दाखवून हिचकॉकने निर्मात्यांचा आणि वितरकांचा देखील रोष ओढवून घेतला होता. हा चित्रपट अजुन चर्चेत आला म्हणजे जवळ जवळ पहिल्यांदाच आणि ते ही चित्रपटाच्या सुरुवातीलाच आलेले लांबलचक प्रणयदृश्य. हिचकॉकच्या चित्रपटात कायम अभावानेच आढळणारे.

ह्या चित्रपटात देखील हिचकॉकने ब्लाँड आणि निरागस चेहर्‍याची नायीका आणि देखणा, गोड दिसणारा खलनायक हे त्याचे आवडते मिश्रण कायम ठेवले आहेच.

वपाडाव's picture

10 Nov 2011 - 3:41 pm | वपाडाव

हा याच मुव्हीचा कॉपी आहे का रे पर्‍या?
Identity

परिकथेतील राजकुमार's picture

10 Nov 2011 - 5:26 pm | परिकथेतील राजकुमार

Identity हा अगांथाच्या And Then There Were None वर बेतलेला होता आणि Identity वरून आपल्याकडे ढापलेला शिणिमा म्हणजे 'खामोश खौफ की रात'.

अमेरिकन त्रिशंकू's picture

11 Nov 2011 - 9:05 pm | अमेरिकन त्रिशंकू

एक छोटीशी सुधारणा. त्या अभिनेत्रीच्या नावाचा उच्चार जॅनेट ली असा आहे. जॅनेट ली ही सध्याच्या हॉलीवूड्मधल्या जेमी ली कर्टीसची आई.

५० फक्त's picture

10 Nov 2011 - 3:03 pm | ५० फक्त

कधी पाहिलेलाच नाही, पण आता बघावा म्हणतो, वल्लीकडुनच डिव्हिडि आणुन.

धन्या's picture

10 Nov 2011 - 3:12 pm | धन्या

स्वीट अँड शॉर्ट परीक्षण...आवडले.

पन्नासराव, तुमच्यानंतर आमचा नंबर बरं का डीव्हीडीसाठी ;)

आपण एकत्रच बघूया का?

चित्रपट कट्टा.
वल्ली इन हिचकॉक कॉश्च्युम. वरच्या फटुमध्ये आहे तसं. ;)

बघा मुलांनो....
( वरील चित्रपट पाहून अंथरुण ओले न करणारी मुलेच पात्र ठरतील ;) )

वपाडाव's picture

10 Nov 2011 - 3:43 pm | वपाडाव

आपण एकत्रच बघूया का?

चला कधी 'बसा'यचे?

ठरले की मलाही कळवा!

- (एकत्र बसुन हॉरर सिनेमा बघण्यास आवडणारा) सोकाजी

मी-सौरभ's picture

13 Nov 2011 - 11:11 pm | मी-सौरभ

मी पण येईन रे!!

गणपा's picture

10 Nov 2011 - 3:07 pm | गणपा

थोडक्यात पण प्रभावी चित्रपट ओळख.

बरच ऐकुन होतो या चित्रपटाबद्दल.
अजुन पहाण्याचा योग आला नाही. पण आता लवकरच पहावे म्हणतो.

मदनबाण's picture

10 Nov 2011 - 3:12 pm | मदनबाण

पाहायला हवा...

परिक्षण अप्रतिम जमले आहे वल्लीशेठ,

एकदम वाचताना कथेत गुंतुन राहतो आहे असे वाटले..
शेवट लिहिला असता तर मज्जा आली असती असे वाटले कारण कधी सिनेमा बघु तेंव्हा बघु पुढे काय होयील हे आत्ता माहित पाहिजे होते असे वाटले...
पण म्हंटले चला dvd आहे तुझ्याकडे म्हंटल्यावर काय ती काळजी

प्रचेतस's picture

10 Nov 2011 - 4:59 pm | प्रचेतस

रहस्यपट असल्याने शेवट उघड करण्यात काहीच गंमत नाही. तो थरार चित्रपटात पाहणेच जास्त योग्य.

बाकी माझ्याकडेच जमा रे सगळे पिक्चर पाहायला. :)

स्मिता.'s picture

10 Nov 2011 - 3:51 pm | स्मिता.

थोडक्यात परिक्षण आवडले. कुतुहल वाढले आहे. डाऊनलोडला लावता येईल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Nov 2011 - 6:31 pm | निनाद मुक्काम प...

आमचे आजोबा सांगायचे त्यांचा कॉलेज जीवनात हीचकोक चे सिनेमे इरोस व स्टर्लिंग ला पहाणे ही वेगळीच मौज होती.

ह्यात बाथरूम मधील खुनाचा सीन त्या काळात जबर गाजला होता. ह्या सिनेमावर बेतलेले मराठी नाटक
´
त्याला ऑस्कर न मिळणे हा मोठा विनोद आहे.
राजेश खन्ना आणी पूनमच्या च्या रेड रोज ची मूळ प्रेरणा सायको आहे.

अनेक मनोरंजच्या थीम पार्क मध्ये हॉरर थीम वर आधारीत दालन असते.

जर्मनीच्या अश्याच एका दालनातील हीचकोक चा पुतळा

परिकथेतील राजकुमार's picture

10 Nov 2011 - 6:43 pm | परिकथेतील राजकुमार

राजेश खन्ना आणी पूनमच्या च्या रेड रोज ची मूळ प्रेरणा सायको आहे.

थोडी शंका येते आहे मालक ह्याबदल.

कारण रेड रोज हा मूळात कमल हसन आणि श्रीदेवीच्या Sigappu Rojakkal (उच्चार माहित नसल्याने इंग्रजी) चा रिमेक होता. आणि कुठल्याच वर्तमानपत्राने, मासिकाने अथवा परिक्षकाने त्याची सायकोशी नाळ जोडल्याचे मला तरी आठवत नाही. अर्थात तुम्ही म्हणता ते खरे असल्यास अजून माहिती वाचायला आवडेल, आणि माझ्या इन्स्पायर्ड मूव्हीजच्या लिस्ट मध्ये अजून २ चित्रपट अ‍ॅड होतील ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Nov 2011 - 6:58 pm | निनाद मुक्काम प...

अरे म्हणून मी प्रेरणा म्हणालो रिमेक नाही.

राजेश खन्ना हा स्त्री द्वेष्टा का बनतो ह्याचा तपशीलवार उल्लेख कथेत आहे. आणी मग त्यांचे ´खून करणे ....

म्हणून मला असे वाटले. कमल हसन चा सिनेमा अजून पाहण्यात आला नाही आहे´.

ह्यात बाथरूम मधील खुनाचा सीन त्या काळात जबर गाजला होता.

खरच त्या काळात असावा! कारण आता वल्लींनी डकवलेली व्हिडीओ क्लिप पाहीली आणि काही विषेश वाटले नाही.

- (तरीही हिचकॉकप्रेमी) सोकाजी

मराठी_माणूस's picture

10 Nov 2011 - 8:58 pm | मराठी_माणूस

सहमत. क्लिप पाहिल्यावर माझीही प्रतिक्रिया अशीच होती.

तुम्हाला आता काही वाटले नाही कारण याच्या लाखभर कॉप्या तुम्ही हजार पिच्चरमध्ये पहिल्या असतील. अशा प्रकारच्या सीनचा हा पिच्चर बाप आहे जसा की (श्रीमंत मुलगी गरीब आहे असं दाखवुन गरीब हीरोकडे राहते अन त्याला शेवटी ती श्रीमंत आहे हे समजतं) रोमन हॉलीडे.

अविनाशकुलकर्णी's picture

10 Nov 2011 - 7:39 pm | अविनाशकुलकर्णी

सायको चे सर्वच पार्ट्स [पार्ट १-२ ई]उत्कंठा वर्धक आहेत...
अंथनी पर्किन्स भुमीका जगला आहे..त्याच्या शिवाय दुसरा कोणी कल्पना हि करवत नाहि.
पण हिचकोक चे बाकि सिनेमे साधारण आहेत.

प्रास's picture

11 Nov 2011 - 8:16 pm | प्रास

पण हिचकोक चे बाकि सिनेमे साधारण आहेत.

यात काही गोंधळ झालाय का?

वानगीदाखल खालील 'बाकी' अशा काही हिचकॉक चित्रपटांपैकी कोणता तुमच्या मते साधारण कॅटेगरीत टाकता येतो?

नॉटोरिअस (१९४६)
रोप (१९४८)
स्ट्रेंजर ऑन अ ट्रेन (१९५१)
आय कन्फेस (१९५३)
डायल एम फॉर मर्डर (१९५४)
रीअर विंडो (१९५४)
कॅच अ थीफ (१९५५)
द मॅन हू न्यू टू मच (१९५६)

हजारो लोकांना या चित्रपटांमुळे (रीमेक किंवा ढापण्याच्या प्रक्रियेने) पोटाला काही मिळालेय हो.....

:-)

आत्मशून्य's picture

15 Nov 2011 - 3:53 am | आत्मशून्य

अर्थातच नाही त्याचे प्रत्येक सिनेमे हे क्लासीकच आहेत. आज बनणार्‍या कोणत्याही सस्पेन्स वा सायको-थ्रिल्लर चित्रपटाचा आत्मा अथवा काही प्रसंग हे हिचकॉकच्या कथां/प्रसंगावरूनच घेतलेले असतात अथवा आपोआप समानता दर्शवतात. उदाहरणार्थ वॅकेन्सीची पार्श्वभूमी सायकोशी सहज रीलेट होते अथवा ब्रॅडपिट्च्या "फाइटक्लब" चित्रपटाचे (फक्त) रह्स्य आणी सायकोचे रहस्य फार वेगळे नाही, अनेक मर्डरमिस्ट्री कथांचा तर हे रहस्य हा आजही प्रमूख गाभाच असतो. डीस्टर्बीया चित्रपट तर ९०% रीअर विंडोच आहे. बरीच उदाहरण देता येतील. एकदा सगळा हिचकॉक (डोळे उघडे ठेऊन) वाचा व पहा तूम्हाला या जगात यानंतर कोणतीही कथा/चित्रपटातील रहस्य हे शेवट्पर्यंत खिळवून ठेवणार नाही , तूम्हाला आधीच ९०% अचूक अंदाज करता येइल याची गँरंटी देतो. :)

थोडासा अपवाद फक्त ख्रिस्तोफर नोलानचा. त्याचे मोमेंटो, द प्रेस्टीज, इन्सेप्शन म्हणजे रहस्याचे एक एक माइल्स्टोन आहेत. हा आजच्या काळातला आमचा हिचकॉक आहे. पण त्याचाही रह्स्याचा पॅटर्न थोडा लक्षात येत आहे, त्याच्या कथेच प्रमूख पात्र(हिरो) अथवा नॅरॅटर जो असतो त्यानंच बहूतांशावेळी काशी केलेली असते ;) पण तरीही तो ज्याप्रकारे कथा सादर करतो.. मती गूंगच राहते शेवट्पर्यंत.

स्पा's picture

11 Nov 2011 - 10:12 am | स्पा

झकास परीक्षण रे वल्ली

किसन शिंदे's picture

11 Nov 2011 - 11:53 am | किसन शिंदे

वल्ली तुझ्या परिक्षणावरून हा चित्रपट पहायची फार उत्सूकता लागलीय.

हिंदीमध्ये डब केलेली डिव्हीडी मिळेल का?

डावखुरा's picture

11 Nov 2011 - 12:49 pm | डावखुरा

मस्त परीक्षण...सिनेमा पाहण्याची उत्कंठा वर्धक..

अविनाशकुलकर्णी's picture

13 Nov 2011 - 10:21 pm | अविनाशकुलकर्णी

यात काही गोंधळ झालाय का?

सायकोच्या तुलनेत असे समजा ..
सायको पाहिल्यावर जेव्हढ्या अपेक्षा वाढल्या होत्या त्या इतर चित्रपट पाहुन पुर्ण नाहि झाल्या ..

चित्रपट बघीतल्यापासून अंघोळीला जाताना जेव्हां जेव्हां शॉवरकडे बघत पाण्याचा नळ सोडायचो, चेहर्‍यावर येणार्‍या पाण्याच्या धारा अंगावर उगीचच काटा आणायच्या. ( हे कदाचीत पाणी डोळ्यात जाण्यामूळेही घडत असेल) पण जर एकदा हा चित्रपट बघितला असेल तर या प्रसंगातील थरार आपण प्रत्यक्षातही बरेचदा अनूभवतो हे मात्र खरयं.