सायको-रहस्यपटांचा मुकुटमणी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आल्फ्रेड हिचकॉकचा बहुचर्चित सायको पूर्वीपण खूप वेळा बघितला होता, नुकतीच त्याची डीव्हीडी पण हाती लागल्याने परत एकदा पाहण्याचा आनंद घेता आला.
प्रियकर सॅम लुईसशी(जॉन गेविन) लग्न करण्यासाठी पैशाची आत्यंतिक जरूरी असलेली मरियन क्रेन (जेनेट लाय) तिच्या ऑफिसमधून चाळीस हजार डॉलर्सचा अपहार करून स्वतःच्या कारने पसार होते, वाटेत एका पोलीस डिटेक्टीव्ह द्वारे पाठलाग होत असल्याचे लक्षात आल्यावर जुनी कार विकून ती दुसरी कार विकत घेते.
अंधार्या रात्री तूफान पावसात कार चालवण्याऐवजी ती एका आडबाजूला असलेल्या बेट्स मॉटेलमध्ये उतरायचे ठरवते. बेट्स मॉटेलचा मालक नॉर्मन बेट्स (अँथनी पर्किन्स) आणि त्याची म्हातारी आई मॉटेलशेजारच्या घरात राहात असतात. गिर्हाईक आल्याचे बघून आनंदित नॉर्मन मरियनचे स्वागत करतो व स्वागतकक्षाजवळीलच रूम तिला राहण्यासाठी देतो आणि तिच्या जेवण आणण्यासाठी घरात जातो.
नॉर्मन आणि त्याच्या आईचे बोलणे मरियनच्या कानावर पडते व त्याची आई ही एक विकृत स्त्री असल्याचे तिला समजते.
इकडे मरियनचा फरार होण्याचा विचार बदलतो, नोटा मोजून ती आंघोळीसाठी जाते,आंघोळ करता करता एका म्हातारी पडद्याआडून अचानक अवतीर्ण होवून चाकूच्या सपासप वारांनी तिचा निर्घृणपणे खून करते. हा सीन आजवरच्या सर्व रहस्यपटांमधला एक सर्वोत्कृष्ट सीन ठरावा. कुठेही अश्लिल,ओंगळ, बीभत्स न होता अंगावर शहारे आणणारा, सत्याहत्तर कॅमेर्यांनी चित्रीत केलेला हा तीन मिनिटांचा सीन म्हणजे हिचकॉकचा मास्टरपीसच.
इकडे नॉर्मनला कळते की आपल्याच आईने हा खून केलाय. कार, कपडे आदी सर्व पुरावे तो नष्ट करून टाकतो.

प्रतिक्रिया
मस्त रसग्रहण
व्वा:
आयडेंटीटी
नाय रे.
एक छोटीशी सुधारणा. त्या
कधी पाहिलेलाच नाही, पण आता
असेच म्हणतो...
आपण एकत्रच बघूया का? चित्रपट
+१
ठरले की मलाही कळवा! - (एकत्र
+१
+१
पाहायला हवा...
परिक्षण अप्रतिम जमले आहे
रहस्यपट असल्याने शेवट उघड
आवडले
आमचे आजोबा सांगायचे त्यांचा
उम्म्म्म्म
अरे म्हणून मी प्रेरणा
ह्यात बाथरूम मधील खुनाचा सीन
सहमत. क्लिप पाहिल्यावर माझीही
तुम्हाला आता काही वाटले नाही
सायको चे सर्वच पार्ट्स [पार्ट
काकाश्री,
साधारण कॅटेगरी ?
झकास परीक्षण रे वल्ली
जबरा..!!
मस्त परीक्षण...सिनेमा
यात काही गोंधळ झालाय
त्यातला तो शॉवरचा सिन इतका मस्त घेतला होता की