काल पासुन ज.कुं.च्या धाग्यावर ती'ची हवा फार पसरली आहे... तिकडं एक कविता टाकलीये,,,हिला पण तिकडेच टाकावी अश्या विचारात होतो,पण हिचं आमच्या मनाशी जुळलेलं चित्र पहाता,हे त्या चित्राशी जरा विसंगत होइल हे भय वाटल्यानी हिला अता इकडे सोडतोय,,,आणी असाही हिचा छंद तिच्या छंदाशी जुळणारा नाहीच... मग म्हटलं मिटर गेजची गाडी ब्रॉड गेजवर कशाला सोडा...म्हनुनच हीला या ठेसनात आनलीये...बगा जमलीये का ते जरा...
हो..येक ह्रायलच ... ही जिच्या चालीवरनं सुचली ते ह्रायलच की--- ''नसतेस घरी तु जेंव्हा''
ती आहे ऐशी धुंद,अन चाल किती स्वच्छंद,
किती नितळ तिची ही काया,नि:श्वास कसे ते मंद।
त्या वेळी ती हळुवार,केश ही मुक्त संभार,
ती ल्याली खोचुन शालू,जणु यौवना वरी वार।
कांतीचा स्पर्श असा की,अंगात फुले रोमांच,
कायाही अशी सुडौल,शालुही हिरवा कंच।
स्पर्शानी मनात माझ्या,किती उठल्या मोहक लाटा,
कोंदटल्या भाव फुलांच्या,त्या मुक्त मोकळ्या वाटा।
मज सुटका नकोच यातुन, राहु दे असा स्वच्छंद,
राहू दे नशाच सारी,का घालु तिथे मी बांध।
तुम्ही म्हणाल गेला वाया,किती जाउन बसला लांब,
परतीची आस नसे रे,आहेस तिथे तु थांब।
मग मी ही म्हणेन तुंम्हा,ती अप्सरा अशी आहे,
सहवास तिचा तो...हाय!उरलो तरी तिचाच आहे।
तरि पुन्न्हा मी येइन,टाकण्यास पुढचे पत्र,
तोवरी रंगवुनी ठेवा,त्या पुढले मानस चित्र।
प्रतिक्रिया
13 Oct 2011 - 3:59 pm | प्यारे१
जल्ला ह्या भटाचो खय खरा लक्षाण दिसत नाय.... ;)
(धेडगुजरी लिहिल्याबद्दल त्या त्या भाषेच्या वाचकांनी अंगावर येऊ नये ही नम्र धमकी :P )
13 Oct 2011 - 4:25 pm | अत्रुप्त आत्मा
@-जल्ला ह्या भटाचो खय खरा लक्षाण दिसत नाय.... >>> मांजा लक्षन खराच असा,तो मी कवितेतनं मांडता,,, पन तुला जल्ला काय झाला हो,तो असा मांज्याशी भांडता... ;-)
@-धेडगुजरी लिहिल्याबद्दल त्या त्या भाषेच्या वाचकांनी अंगावर येऊ नये ही नम्र धमकी नाय हो येनार तुमच्या कुनी अंगाव... ;-)
13 Oct 2011 - 4:41 pm | गणेशा
अतृप्त आत्म्याने पार तृप्त करुन टाकले आहे.
एक ओळ न ओळ पुन्हा पुन्हा वाचली..
अप्रतिम .. मस्त ... काय काय बोलावे तेच कळेना ..
सुंदर
13 Oct 2011 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा...
मनापासुनच्या कॉमेंटचा दंडवत घ्यावा...
13 Oct 2011 - 7:54 pm | ५० फक्त
पहिल्या ओळितल्या ऐशी ला ऐंशी - ८० असं केलं ना तर हे फोटो फिट बसतात या वर्णंनाला, फक्त दुसरं कडवं बसणार नाय फिट
ही जस्ट मतदानाचा हक्क मिळालेली
![](http://www.indiancarsbikes.in/wp-content/uploads/2010/02/2010-Tata-Nano-Car-Photo-India.png)
ही जरा खंगरीच आहे
![](http://fancytuning.com/wp-content/uploads/2009/05/geiger-cars-corvette-z06-3.jpg)
ही थोडी थोराड आहे खरी पण कुटंबी चालेल
![](http://1.bp.blogspot.com/_7GZ1tO98idc/TA5xU9J5-OI/AAAAAAAAAZg/i-MyHZIKijU/s320/Hummer+green+hot+wallpapper.jpg)
ही मात्र एकदम फिट सापडली बगा, कसं शालुची न्क्षी बिक्षी एकदम झकास हाय
जरा शालुचा रंग लाल केला ना तर लईच बहार होईल कविआत्मा, मग काय श्री व सौ. फेरारी यांच्या लेकी अन आमच्या मिंटीच्या चुलत चुलत भैनी निसतं पारणं फेडतील हे असं
ही ५००, यांचीच चुलत बहिण पन लई नखरेल
आन ह्यो पाठराखणींच्या बरुबरचे एक दोन फोटो शेवट गोड व्हावा म्हनुन
13 Oct 2011 - 8:16 pm | अत्रुप्त आत्मा
कडव्या गणिक टाकलीत कार
कल्पनेला माझ्या दिलात मार ;-)
कवितेची केलीत ऐशी तैशी म्हणुन
वरच्यातल्या एकीचं उघडतो दार :-p .... ब $$$ ये दार उघड :love:
अवांतरः- आमच्या तिच्या शालूचा रंग तर हिरवा आहे,,,तुंम्ही तर पोपटी दिलात...पोपट फार अवडतात वाट्टं ;-)
13 Oct 2011 - 8:47 pm | मी-सौरभ
प्रतिसाद पण अन् उपप्रतिसाद पण
13 Oct 2011 - 8:50 pm | धन्या
कसे दार उघडशील भटा आता तू
तुझी चावी अडकली की रे आत
सुटका नाही सकाळशिवाय तुझी
बस शेजारणीकडे तू अंगाई गात
13 Oct 2011 - 10:46 pm | अत्रुप्त आत्मा
@-कसे दार उघडशील भटा आता तू
--तुझी चावी अडकली की रे आत.... :-D
--सुटका नाही सकाळशिवाय तुझी
--बस शेजारणीकडे तू अंगाई गात... :-D
धन्या सैल हा सुटला आणी
मला कचकुनी दात लावी
तुझे कुलुप तय्यार ठेव ;-)
सकाळी घेउन येतो चावी.... :-p
13 Oct 2011 - 10:51 pm | प्रचेतस
__/\__
15 Oct 2011 - 1:38 pm | सुहास झेले
जबराट !!
13 Oct 2011 - 8:56 pm | धन्या
आम्हाला शेवटची गाडी विशेष आवडली. शेवटून दुसरी गाडी जरा थोराड वाटते. ;)
13 Oct 2011 - 9:00 pm | मी-सौरभ
सहमत...
आधीच्या कश्या वाटल्या त्याबद्दल काही विवेचन करा की ;)
13 Oct 2011 - 9:14 pm | धन्या
शेवटच्या दोन गाडया वगळता बाकीच्या गाडया ठीकठाक आहेत. शेवटच्या दोन गाडयांची मात्र टेस्ट ड्राईव्ह घ्यावीशी वाटते. मला वाटतं आमच्या या मताशी तुम्हीही सहमत असाल. ;)
13 Oct 2011 - 9:48 pm | प्रचेतस
मी बी सहमत आहे.
तशाही तुम्हाला काही अमेरीकन बनावटीच्या गाड्या चालवायचा अणुभव हाय म्हणे. ;)
13 Oct 2011 - 11:16 pm | धन्या
आहे तर. निसानने मायक्रा नावाची गाडी आता आता भारतात आणली. आम्ही अमेरिकेत निसान मॅक्झिमा चालवलीय. फक्त सॅन फ्रान्सिस्कोच्या रुंद रस्त्यांवरुन किती वेळा सिग्नल जम्प केले तेव्हढं मात्र विचारू नका. ;)
14 Oct 2011 - 7:01 am | प्रचेतस
तिकुडच्या पोलीसांनी रट्टे नाय मारले मग? ;)
13 Oct 2011 - 9:04 pm | धन्या
येम ऐंशी...
आज बी गावी घरी गेलो की न चुकता एक चक्कर मारतो हिच्यावर....
13 Oct 2011 - 10:54 pm | अत्रुप्त आत्मा
आज बी गावी घरी गेलो की न चुकता एक चक्कर मारतो हिच्यावर.... काय वो धनाजीराव...हीतली येक तुमच्या बरबर नेहमी दिसती... अता ही गावची पन कळ्ळी,,, आनी तिच्या वर बी येक चक्कर न चुकता मारता,,,मंजे उरलेल्यांवर चुकन कित्ती मारत असाल...;-) ? चकरा ... जपा हो जपा तुमच्या ह्याला ....मंजी त्ये त्ये अपलं तब्बेतीला ...बिघडन की ती...मंजी तुमची तब्बेत हो ..;-)
13 Oct 2011 - 11:21 pm | धन्या
आम्हाला बैलगाडी, सायकल, एम एटी, हीरो होन्डा पॅशन प्लस/प्रो, आय टेन या गाडया चालवण्याचा अनुभव आहे. :)
गरज पडल्यास शेजार्यांच्या डिस्कव्हर, अल्टो वगैरे गाडया चालवू शकू असा आत्मविश्वासही आम्हाला आहे. ;)
13 Oct 2011 - 11:38 pm | अत्रुप्त आत्मा
या गाडया चालवण्याचा अनुभव आहे. बराच दांडगा दिसतोय... तुमचा... हा... तो अपला अनुभव... ;-)
ठीक आहे आमची माघार... काळजी सोडली :-)
13 Oct 2011 - 9:51 pm | प्रचेतस
कविता एक लंबर.
14 Oct 2011 - 9:15 am | प्यारे१
वरील 'अनुभवी' पण 'विनापरवाना' 'वाहन''चालकांचे हृद्य संवाद वाचून ड्वाळे पाणावले....
14 Oct 2011 - 9:20 am | किसन शिंदे
:D प्यारे मस्तच चौका हाणलाय.
15 Oct 2011 - 11:03 pm | अत्रुप्त आत्मा
@वरील 'अनुभवी' पण 'विनापरवाना' 'वाहन''चालकांचे हृद्य संवाद वाचून ड्वाळे पाणावले....
आंम्ही परवाना धारक 'वाहन''चालकांचे हृद्य गद्य पद्य असे सर्व संवाद ऐकुन कित्येकदा ओक्सा-बोक्शी रडलेलो आहे... ;-)
14 Oct 2011 - 10:06 am | ५० फक्त
@ प्यारे धन्यवाद
@ कअआ - हे काही हिरवे सँपल आता खुश का ?
![](http://farm3.static.flickr.com/2100/1863589019_15bed3d17a.jpg)
14 Oct 2011 - 10:16 pm | अत्रुप्त आत्मा
@-कअआ - हे काही हिरवे सँपल आता खुश का ? हाहाहाहा आता कसं थंडगार वाटलं बगा काळजाला... :-)
तिघींना बी पसंती कळवा ब्वा आपली,,, पयली फॉरेनची पाटलीण ;-) दुसरी आय टी तली गोजीरी :-) अनी तिसरी कोनच्या तरी जुन्या खालसा संस्थानची राजकन्या :love: असच पायजेल हुत बगा आमास्नी पण्णासराव ... ठेंक्यु अगेन ;-)
14 Oct 2011 - 11:57 pm | धन्या
आयटीवाल्यांना चांगलंच ओळखायला लागलात तुम्ही. ;)
15 Oct 2011 - 1:10 pm | अत्रुप्त आत्मा
@आयटीवाल्यांना चांगलंच ओळखायला लागलात तुम्ही
आय टी वाल्यांना चांगलेच ओळखुन आहोत आंम्ही.... ;-)
24 Jul 2014 - 12:33 pm | प्रचेतस
एकदम धुंद फुंद करणारी कविता.
24 Jul 2014 - 12:42 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआअ.......... हल्लीच दणकून पडणार्या पावसानी..आणि हिरवाईनी हे असलच काहितरी मनात गुंजत असतं..नित्यगीता प्रमाणे! त्यात आगोबानी हीला वर आणली. *i-m_so_happy*
बहुत खुषी हुवी! धण्णेवाद्स! *ok*
24 Jul 2014 - 1:09 pm | धन्या
सुंदर !!!
वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.