एकदा शंकर देवळात
कान उघडुन बसला
भक्तांच्या ललकाय्रा ऐकुन
खुदकन मनात हसला
भं...भोले..ही अरोळी
खरोखरच छप्परतोड
कुणाच्या मनाची जखम
तर कुणाचा नुसताच फोड
माझ्याकडे येणारे असेच
कुणी शांत,कुणी भेदरलेले
आयुष्याच्या कलहात
कुणी मिटलेले,कुणी विटलेले
होते काहो ती अरोळी..
जीवनरोगाचे औषध?
का थोड्या वेळाचं मलम
नी शेवटी नुसतीच खदखद
तुंम्ही म्हणाल या खेरीज
दुसरा जालीम उपाय काय?
का तुंम्हीही अमच्यासारखेच..?
समस्या आली...की बाय बाय
मी तुम्हाला सांगेन...की
मीही तुमच्यातलाच आहे
फार पूर्वी माणुस होतो
अता मात्र 'देव' आहे
मोडुन टाका ते देऊळ
अणी मुक्त करा मला
माझा आधार..कशाला?
एकमेकांचा घेऊ...चला..!
पुरे झालं माझं नाव
अणी माझ्या नावाची सत्ता
हज्जारो वर्ष हेच चाल्लय
तुंम्ही शेंगदाणे...नी...मी खलबत्ता !
या कूट समस्येवर
येकच जालीम उपाय
जे माझं देवपण गातात
त्यांच अजाबात ऐकायचं नाय
नायतर रहा मनःशांती मिळवत
ती मार्क्स ची अफुची गोळी
मंजे तुमी व्हाल सरपण
अणी भाजाल त्यांचीच पोळी
जात आहे...धर्म आहे..
त्यांना कुटायला कमी काय ?
बघा कधी समजलं तर...
पुन्हा भेटूच...सध्या.. बाय बाय...
प्रतिक्रिया
18 Sep 2011 - 7:00 pm | अर्धवट
मस्त रे.. सुंदर..
18 Sep 2011 - 8:04 pm | पैसा
कविता आवडली. याच्या पुढची पायरी म्हणजे देवाला रिटायर करा...
18 Sep 2011 - 10:47 pm | अत्रुप्त आत्मा
@- याच्या पुढची पायरी म्हणजे देवाला रिटायर करा... ---आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोंय...अमचा हा जो देव आहे,त्या कवितेतल्या विवेकशील देवाला रिटायर करण्याची अजिबात गरज नाही कारण तो खरं काम करणारा देव आहे,परंपरागत दैवत्वाच बंधन त्यानी त्या देवळाप्रमाणेच मोडलय,त्यामुळे असा काम करणारा देव रिटायर होणारही नाही आणी केला जाणारही नाही,...देव अनंत काळ या ना त्या रुपात रहाणार आहे याची आंम्हाला नम्र जाणीव आहे... हां...पण ज्यांचे देव मानवतेचाच गळा घोटायला निघतात...त्यांना नुसतं रिटायरच करुन भागणार नाही,वेळप्रसंगी जायबंदीही कराव लागेल त्या लढाईची ही पूर्वतयारी नक्कीच आहे... कारण सज्जन माणसांप्रमाणे सज्जन देवांनाही लढाइत उतरवावच लागतं ...हा त्याचाच भाग आहे... हो..अणी कविता आपल्याला अवडली,,,त्याचे धन्यवाद आहेतच...
18 Sep 2011 - 11:50 pm | पाषाणभेद
पहिलेकडवे वाचून कविता कोणत्या अंगाने जाईल याचा अंदाज आला पण नंतरच्या कवितेने तो फोल ठरविला. एक वेगळाच विचार असणारे काव्य. इंगजी शब्दांनी आताच्या काळातल्या तरूणाईच्या तोंडातली भाषा दिली.
18 Sep 2011 - 10:00 pm | अभिजीत राजवाडे
मस्तच!!! नवीन विचार!!!
माझ्यासाठी हि कवीता म्हणजे "एका देवाचे आत्मवृत्त आहे.
कविता आवडली.
18 Sep 2011 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा
अर्धवट राव,जाई,अणी अभिजीत सर्वांना धन्यवाद...
@- माझ्यासाठी हि कवीता म्हणजे "एका देवाचे आत्मवृत्त आहे.''--अभिजीत या बद्दल विशेष धन्यवाद...हे आत्मव्रुत्तच आपल्या मनावर जितकं जास्त बिंबेल ,तितका आपल्या मनातला देव अधिक शहाणा समंजस होत जाइल,अणी मग आपण अनैतिकतावाद्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही,,,मग ते धर्मातले असोत वा अधर्मातले....
18 Sep 2011 - 10:31 pm | जाई.
चांगली कविता
19 Sep 2011 - 9:46 am | प्रचेतस
मस्त हो पराग भटजी.
19 Sep 2011 - 12:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आवडली कविता.
19 Sep 2011 - 3:19 pm | अत्रुप्त आत्मा
वल्ली...मि.का..दोघांनाही धन्यवाद... :-)
19 Sep 2011 - 3:25 pm | वपाडाव
भटजी तुमचा धंदा बंद पडंन न हो अशा कविता ल्हिल्यानं...
मंग त्ये परवडंन का?
19 Sep 2011 - 5:51 pm | अत्रुप्त आत्मा
@---भटजी तुमचा धंदा बंद पडंन न हो अशा कविता ल्हिल्यानं...
मंग त्ये परवडंन का?---मि.वपाडाव आपुन म्हन्ता त्ये अर्दसत्य हाय, जे दलाली करनारे भटजी हायत,त्येंचा धंदा नक्कीच मार खाहील...म्हनुनच आमी खाली दिल्यालं कडव जानीव पूर्वक वापरलया..आनी आमच वागन बी अस हाय की आमी कंदीच द्येवाचं द्येवपन दुसय्राला उगाळुन पाजीत नाय,त्यामुळच आमचे बहुत सारे कश्टमर आमास्नी पुरोगामी भटजी म्हनत्यात,त्येंच्या प्रेरनेनं तर आमी असल्या कविता लिवतो...आनी खरच धंदा बंद पडला त साय्रांचाच पडल,येकट्याचा कंशाला? मंग तवा बगू की काय करायचं त्ये,आपल्याला काय?आपुन फाश्टफुडची गाडी बी लाऊ,आपल्याला पावाभाजी बी जमती,डोसा बी जमतो,आनी 'वडापाव' खान्यात जितकी आपली माश्टरी ,तितकीच करन्यात बी ;-)
शेवटी आपुन मानुसपनाच्ये उपासक :-) द्येवपनाचे न्हाय...तुमीच सांगा बर,अश्या शुद इचाराच्या भटजीला तुमी नाकारान काय?
या कूट समस्येवर
येकच जालीम उपाय
जे माझं देवपण गातात
त्यांच अजाबात ऐकायचं नाय
19 Sep 2011 - 5:55 pm | प्रचेतस
__/\__
19 Sep 2011 - 6:25 pm | वपाडाव
चुकलो ओ साहेब....
जीव देउ का आता?
19 Sep 2011 - 6:40 pm | प्रचेतस
जीव नका देवू, पटकन् शाजीतले चार पराठं खाऊन या आणि म्हणा जीवाला खा! जीवाला खा!! जीवाला खा!!!
19 Sep 2011 - 10:28 pm | अत्रुप्त आत्मा
@--- जीव देउ का आता?--- नका ना इतक्यात देऊ ;-) वपाडाव मेला तर वडापावनी काय करायच? :-)
19 Sep 2011 - 7:16 pm | परिकथेतील राजकुमार
मिपासारख्या प्रगल्भ , विज्ञानवादी आणि हुच्चभ्रु संस्थळावर देव वैग्रे सारख्या फालतू संकल्पनेवर आधारीत कविता बघून आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली.
स्वयंभू
परा
19 Sep 2011 - 10:32 pm | अत्रुप्त आत्मा
@--- मिपासारख्या प्रगल्भ , विज्ञानवादी आणि हुच्चभ्रु संस्थळावर देव वैग्रे सारख्या फालतू संकल्पनेवर आधारीत कविता बघून आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली. :puzzled:
एक अंदाजः- हा 'प रा' चा प-राग वरील उप-हास तर नसावा ;-) ?
19 Sep 2011 - 8:27 pm | धन्या
सहीच हो भटजी...
आयला पण हा दुटप्पीपणा झाला बरं का. एकीकडे देवांच्या पुजा सांगायच्या आणि दुसरीकडे त्यांचं देवांचं नाव घेणं पुरे झालं म्हणायचं.
एखादे दिवशी एखादा देव खोपच्यात घेईल आणि घापघूप देईल तेव्हा कळेल ;)
19 Sep 2011 - 10:23 pm | अत्रुप्त आत्मा
@--- एखादे दिवशी एखादा देव खोपच्यात घेईल आणि घापघूप देईल तेव्हा कळेल --- अशे लै द्येव पाहु ह्रायलो ना आमी... त्येंन्ना त्येंचा नीवद टाकला की गप पडतात गुमान... ;-) आनी आमचा दुटप्पीपना न्हाइ बर का?आमी हीत जे बोल्तो त्येच कामात बी करतो.... :-) येकदा अनुभवाल तर फिरुन फिरुन याल... ;-) आनी नाव घेन पुरे झाल,अस आमी कुट म्हन्तो ,त्यो तर आमच्यातला द्येव म्हनतो... त्येला अस म्हनुन मानसात येउ द्ये राव...येक डाव कीरपा करा त्याच्यावर... :innocent: