श्रावणाच्या पहिल्या रविवारी भुलेश्वर ते शेवटच्या रविवारी पाटेश्वर असा शाक्तपंथीय शिवालयांचा प्रवास घडला, भुलेश्वराचे फोटो आधीच टाकलेत म्हणुन हे पाटेश्वराचे.
जवळुन पाहिल्यावर हे फुलांचे ताटवे दिसले,
हि दोन फुलं तर घ्यावीच वाटली
अजुन किती लांब अन उंच असा विचार करतानाच अचानक समोर काही बांधीव पाय-या आल्या बहुधा आपल्याला इथंच जायचंय जवळच, आता सामानाचं ओझं जरा हलकं वाटायला लागलं, पाय-या संपता संपताच समोर आली ती त्या बाजुच्या डोम्गरातच खोदुन काढलेली गणपतीची प्रतिमा अगदी रिद्धी सिद्धि सहित.
मुर्तीच्या पायावर डोकं ठेवलं पण पायवाट पुढं पुढं जातच होती.
आता बराच वेळ चालल्यावर पुन्हा एक बांधकाम असावं असं काही दिसु लागलं, वाटेतच एक मोठं झाड, वडाचं का पिंपळाचं, समजुन घ्याय्ला वर नजर फिरवली तर छे विश्वासच बसेना त्याचा, चाफ्याचं झाड एवढं मोठं, पण विचार करायला वेळ नव्हता, सहज मागं पाहिलं,
कळकबेट
किती छान कुंड आहे, आणि चक्क कमळं आहेत त्यात,
थांबुन चालणार नव्हतं,
त्या दगडी पाय-या पार करुन पुढं आलो आणि थबकले, देवळाच्या बाहेर देव आणि तो ही असा
पुढं नेणा-या या पाय-या अन त्यांच्या भिंतीतले हे दिव्यांचे कोनाडे,
एका मोठ्या कोनाड्यातलं हे शिवलिंग
ही अजुन एक सुरक्षादेवता
पाय-यांचा वर असलेलं हे देउळ
आणि हा नंदि
आणि त्याच्या पायाला वेटो़ळा घातलेला हा सर्प,
आणि त्या नंदिच्या पायात असलेलं हे शिवपुजेचं शिल्प
देवळाच्या बाहेरच्या भिंतीत असलेला हा महामहादेव,
पुर्वी अतिशय रागीट पण आता या मर्त्य मानवाला काही करत नाहीये,
याच देवळाच्या प्रांगणातली अजुन काही मंदिरं जी पाहुन सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल ,
का हेच पहा, हा शेषशायी विष्णु अगदी लक्ष्मी सह चक्क महादेवाच्या देवळात
आणि हा चार मुखी ब्रम्हा चक्क शस्त्रासह
आणि महादेवाच्या सर्पांबरोबर जन्मोजन्मिचं वैर असणारा विष्णु वाहन गरुड पण,.
खरंतर देउळ हे याचं महादेवाचं
ही चार हात असलेली शिव प्रतिमा
बाहेरची ही अष्टभुजा
आणि हा स्त्रि गणेश
ही शिव पार्वती प्रतिमा
आणि ही इतर मंदिरं, सगळी शिवाचीच पण भव्य अन गुहेत कोरुन काढलेली.
इथं पिंडीवर पिंडी आहेत, वेगळाच प्रकार
पिंडिवरच काय पण गुहेतल्या खांबावर अन भिंतीवर पण पिंडीच आहेत. आणि बाकी आहेत त्या पिंडी तरी किती वेगळ्या आहेत..
ह्या पिंडी आहेत का उखळं आहेत ?
हा दुसरा नंदी आणि त्याच्या पाठीवरची वेग़ळीच नक्षी.
हे नंदिच्या वर असलेले छत
हे मंदिराचे गवाक्ष, दगड कोरुन काढलेले ,
जेवढ्या या पिंडी अनाकलनिय तेवढ्याच या खुणा सुद्धा.
अरे भगवंता शंभो हे काय रे हा प्रकार तुलाच माहिति याची महती अन कार्यकारणभाव
]
काही धार्मिक अथवा ऐतिहासिक माहिती चुकीची असण्याची शक्यता आहे तरी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांनी मार्गदर्शन केल्यास बदल करेन.
प्रतिक्रिया
31 Aug 2011 - 1:10 am | केशवराव
खरच सुंदर ! पण हे ठिकाण आहे कुठे ?
31 Aug 2011 - 4:05 pm | विजुभाऊ
हे सातार्याजवळ देगाव या गावात आहे.
या इथे कदाचित थोड्या नंतरच्या वेळेस पाउस संपल्या नंतर गेलात तर काही मंदीरे भुयारात(कुंडात) आहेत.
तेथे विष्णूच्या बारा अवतारांच्या प्रतिमा आहेत ( हो बारा अवतार)
या शिवाय गणेशी ,रामाणी , इंद्राणी , ब्रम्हाणी ( स्त्री स्वरुपातेले देव) यांच्या मूर्ती आहेत.
तुम्ही मरगळम्हैसा ( रेड्याच्या पठीवरील पिंड) काढायला विसरलात. अनगळ सावकारांचा पुतळ्याचे फोटो विसरलात
4 Sep 2011 - 8:54 am | ५० फक्त
नमस्कार विजुभाउ,
एकदा तुमच्याबरोबर जाण्याचा योग येईल काय इथे ? आणि हो त्या दिवशी प्रचंड पाउस होता आणि बरोबर कुटंब असल्याने फार इकडे तिकडे फिरता आले नाही, आणि तिथे फारसे कुणी माहिती देणारे भेटले नाही. आता पावसानंतर पुन्हा एकदा जायचे आहे, त्यावेळी तुम्हाला जमले तर फार बरे होईल. असा हि आपला हडपसर फ्लाईंग क्लबचा प्लॅन चालला आहे, ते आणि हे दोन्ही एका दिवसात पण जमवता येईल, जरा घ्याच मनावर.
31 Aug 2011 - 1:35 am | प्रियाली
मस्त फोटो आहेत, सविस्तर प्रतिसाद नंतर.
31 Aug 2011 - 3:47 am | शुचि
फोटो खूप आवडले.
31 Aug 2011 - 6:28 am | चित्रा
कुतुहल चाळवणारे फोटो आहेत.
इथे कसे जायचे याची माहिती देता येईल का?
31 Aug 2011 - 6:48 am | सहज
हेच म्हणतो.
नंदीची मुर्ती तुलनेत नवी दिसते. ह्या जागेचा इतिहास सांगणारे फलक, छोटे संग्रहालय इ. काही आहे का तिथे किंवा जवळपास.
31 Aug 2011 - 9:49 am | नंदन
असेच म्हणतो, फोटो आवडले.
31 Aug 2011 - 6:39 am | स्पंदना
अतिशय पुरातन देउळ दिसतय.
फार डिटेल मध्ये फोटो आहेत हर्षद भाय , धन्यु.
31 Aug 2011 - 10:09 am | प्रचेतस
अत्यंत अद्भूत देवस्थान. तरी जनांपासून अस्पर्श असे.
खूपच सुरेख वर्णन आणि फोटो. यातील स्त्रीगणेश आणि नंदीचे भुलेश्वराशी बरेसचे साध्यर्म्य वाटतेय. तर लक्ष्मीसह शेषशायी भगवान विष्णू हा भुलेश्वराबरोबरच रतनवाडीतल्या अमृतेश्वर मंदिरात पण पाहिला होता. पण इथल्या शिवपिंडी मात्र अत्यंत वेगळ्याच आहेत. अश्या पिंडी कुठेही पाहिल्या नाहीत आतापर्यंत.
वर ५० फक्त यांनी म्हटल्याप्रमाणे हे शाक्तपंथीयांचेच देवस्थान असू शकेल. कदाचित यादवकालीन.
आता पाटेश्वराला जाउन यावेच लागेल हे सांगणे न लगे.
31 Aug 2011 - 10:11 am | ईश आपटे
मस्त फोटो................
मी नुकतच इथे जायच प्लॅनिंग करत होतो. फोटो बघून उत्सुकता अजुनच वाढली आहे... बहुधा येत्या काही दिवसातच जाईन.........
आणि जी छोट्या ५ लिंगांची पिंड आहे, तशीच पिंड त्र्यंबकेश्वराला आहे.............
1 Sep 2011 - 9:31 pm | बिपिन कार्यकर्ते
पिंड की पिंडी? मला वाटते सगळा अर्थच बदलतो, नाही का? :)
31 Aug 2011 - 10:12 am | ईश आपटे
मस्त फोटो................
मी नुकतच इथे जायच प्लॅनिंग करत होतो. फोटो बघून उत्सुकता अजुनच वाढली आहे... बहुधा येत्या काही दिवसातच जाईन.........
आणि जी छोट्या ५ लिंगांची पिंड आहे, तशीच पिंड त्र्यंबकेश्वराला आहे.............
31 Aug 2011 - 10:41 am | ५० फक्त
चला सगळे जण मिळुन जाउया, पुण्याहुन वन डे आहे, सकाळी सातला निघालो तर साताराच्या अलीकडे आराम मध्ये नाष्टा करुन डोंगराच्या पायथ्याशी पोहोचायला एक तास लागेल, म्हणजे पुणे ते पाटेश्वर देउळ साडेतीन तास.
आता जाण्याबद्दल
पुण्याहुन साता-याला जाताना, सातारा शहरात न जाता अलीकडेच सर्विस रोडवर महिंद्राच्या शोरुम नंतर डाविकडे रहिमतपुरला जाणारा फाटा आहे, तिकडे वळुन सरळ जाताना जो चौक लागतो तिथे उजवीकडे वळायचं, हा एमआयडिसी एरिया आहे, रस्ता प्रचंड भयंकर आणि वाईट खराब आहे.कोणत्याही गाड्या चालवताना अगदि काळजीपुर्वकच जाणे, रस्त्यावरच्या खड्यात पाणि जमा असेल तर अजुन धोकादायक आहे.
इथुन पुढे सरळ देगाव गावात जायचे, इथं एक रिक्षा कमान आहे, त्या कमानीनंतर लगेच उजवीकडे वळायचे, पुढे जरा बरा रस्ता आहे पण पुर्ण सिंगल. हा रस्ता जिथेपर्यंत जातो तिथे थोडी जागा केलेली आहे चारचाकी वळवण्यासाठी, तिथं पर्यंतच कोणतीही गाडी जाउ शकते, इथुन पुढं चालु होते ती अतिशय सुंदर पायवाट, वर माझ्या आई आणि लेकाचा फोटोत आहे ती. साधारण १ ते दिड किमि पायि चालल्यानंतर पहिले देउळ लागते, तिथंच एक मठ आहे त्याच्या मागच्या बाजुला दुसरं देउळ आहे.
अतिशय एकांत असं ठिकाण असल्यानं गाडीत इंधन, मोबाईल बॅटरी चार्ज (सगळ्या मोबाईल्च्या रेंज येतात), पाण्याची बाटली, खाण्याचे सामान घेउन जाणे. शक्यतो अंधाराच्या आधीच परत उतरुन हायवे पर्यंत पोहोचावे. वर मठात सकाळी अकरा ते बारा प्रसादाचे जेवण असते आणि मग नंतर १२ ते ३ मठ बंद असतो, त्यावेळी मठात विनंती करुन विश्रांती करता थांबणं शक्य आहे, पण ३ वाजता आरती झाल्याशिवाय बाहेर पडता येत नाही.
दोन चाकी घेउन जाणा-यांनी पायवाटॅच्या रस्त्यानं गाड्या नेण्याचा अविचार करु नये, ही नम्र विनंती.
31 Aug 2011 - 10:44 am | मृत्युन्जय
बोला कधी जायचे? मी तयार आहे. मंदिर एकदम निवांत दिसते आहे. सुंदरच. चाफळच्या राम मंदिरात गेला आहात का कधी? खुप सुंदर आणि प्रसन्न मंदिर. जाउन या
31 Aug 2011 - 10:47 am | अमोल केळकर
असेच म्हणतो. चाफळ चे राम मंदीर ही शांत आहे
अमोल
31 Aug 2011 - 10:52 am | ५० फक्त
गणपतीनंतरचा रविवार. चला नावं टाका यादीत खाली म्हणजे वाहतुक व्यवस्था करता येईल, रात्री कैलास गार्डनला कट्टा पण करु हातासरशी.
31 Aug 2011 - 3:36 pm | आत्मशून्य
कास पठार सूंदर आहेच, पण तिथे एक शिवपेटेश्वर नावाचं खूप चांगलं मंदीर आहे. जे फारसं कोणालाच माहीत नाही. हे मंदीर गूहेमधेच आहे. जर कोणाला मूचकूंदराजाची गोश्ट माहीत असेल तर ती याच ठीकाणी घडली होती, हे नमूद करतो. अत्यंत शांत व जागृत ठीकाण आहे. फ्लाइंग विसीट साठी मस्त.
31 Aug 2011 - 4:01 pm | परिकथेतील राजकुमार
पण आपण मुचूकूंद ॠषीं विषयी बोलत आहात का ? अर्थात 'कालयवन' कथेबद्दल ?
तसे असेल तर ती गुहा उत्तरप्रदेशात पाली मध्ये आहे असे वाटते.
31 Aug 2011 - 4:18 pm | आत्मशून्य
मी सदरील माहीती ही तेथे उपलब्ध असलेल्या स्त्रोतावरून दीली आहे, कृपया हा फोटो(झूम)बघावा, तेथेच काढला आहे यावरून अंदाज येइल.
यामधे मूचकूंद राजा, श्रीकृष्ण व काल्यवण दैत्याचा उल्लेख आहे. उर्वरीत कथा दूसर्या खांबावर होती जीचा फोटो नाहीये पण ओडीओ रेकॉर्डींग केलं आहे. जी 'कालयवन' कथेशी संपूर्ण साधर्म्य दर्शवते.
31 Aug 2011 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार
इथे अधिक माहिती तसेच नकाशा मिळेल जो माझ्या म्हणण्याला पुष्टीच देतो.
आणि तसेही मथुरेहून पळून श्रीकृष्ण तुम्ही म्हणताय त्या स्थानापर्यंत येवढ्या लांब येणे थोडे अवघड वाटत नाही का ? तसेच पुढे ही गुहा सोडून मुचूकूंद ऋषी पुढे गंधमादन पर्वतावर तपश्चर्येला गेल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो.
31 Aug 2011 - 5:32 pm | धमाल मुलगा
स्थानिक कथांमध्ये पायपोस नसतो. पुर्वापार चालत आलेल्या कथा नंतर खर्या वाटू लागतात.
उदा.:अमृतेश्वराचं देऊळ हे पांडवांनी बांधलं असं गावकर्यांकडून ठासून सांगितलं जातं. वस्तुतः ते मंदीर साधारणत: ९व्या शतकातलं असावं. पांडवांच्या काळी हेमाडपंथी वास्तुकला होती का हा प्रश्न होऊ शकतो कदाचित, पण पांडवकालीन लेण्यांची अवस्था आणि ह्या मंदीरातील कोरीवकामाचे तपशील शिल्लक असणं हा फरक मात्र नक्कीच जाणवतो. तद्वत, सातार्याजवळची ती एखादी अख्यायिका असू शकते. (आहेच असं नव्हे, पण नसेलच असंही नाही.)
31 Aug 2011 - 5:46 pm | आत्मशून्य
मला स्वत:लाही मूचकूंदाची गूहा इथं आहे हे वाचून (प्रमाणाबाहेर)आश्चर्यच वाटलं होतं, श्रीकृष्णही येवढ्या लांब येणे थोडे अवघड वाटते (तो देव नाही हे गृहीत धरून). तरीही सर्वात मोठे आश्चर्य हे आहे की जर इतकी महत्वाची घटना या ठीकाणी घडली होती तर याची माहीती कूणालाच कशी नाही ? खरतर कासला येण्या-जाण्याच्या प्रमूख डांबरी रस्त्याला लागून हे (शिवपेटेश्वर) स्थान/टेकडी व गूहा आहे (कास फक्त १० कीमी लांब आहे तिथून) जिथे मोठ्या संखेने लोक सातत्याने भेट देत असतात. पण हे ठीकाण फारसे(?) ज्ञात नाही.
@धमालमुलगा:: शक्य आहे, केवळ अख्याइका असणं शक्य आहे पण ती अशी कमानीवर संगमरवरात कोरणे योग्य न्हवे. बाकी इथे फक्त नैसर्गीक गूहा आहे व पिंड. मंदीर, मूर्त्या, कलाकूसर वगैरे वगैरे काही नाही. पण ठीकाण अप्रतीम आहे.
31 Aug 2011 - 6:00 pm | धमाल मुलगा
मित्रा, फोटो खूपच छोटा, तसेच त्या फोटोची मूळ लिंक न दिल्यामुळे मोठा फोटो पाहता येत नाही आणि आमचे डोळे अंमळ ढाप्पण लागून खराब झाल्याने नीटसं दिसत नाही.
पण, आपल्या गावातल्या एखाद्या चांगल्या वाटणार्या/असणार्या ठिकाणाची पुर्वापार विश्वासाने माहिती आल्याने महती वाटल्यास तसे ग्रामस्थांनी करणे गैर नाही. शेवटी तो त्यांच्या श्रध्देचा एक भाग आहे. ते असो.
ती संगमरवरी पाटी ग्रामस्थांनी लावली आहे, पुरातत्व खात्याने लावली आहे की कोणा मंडळाने ते कळत नसल्याने अधिक काय सांगणार?
31 Aug 2011 - 6:49 pm | आत्मशून्य
अग्निकोल्हा असेल तर फटूवर राइट क्लिक करून विऊ इमेज म्हणा. किव्हां इमेजवर राइट क्लिक करून ती हर्डीस्कवर सेव कल्यासही पाहता येइल. मूळ चित्र मोठ आहे, पण प्रतीसाद मोठा वाटू नये म्हणून इमेज साइज छोटी डिस्प्ले केलीय.
पाटी कोणी लावलीय याची शहानीशा केली नाही हे खरयं.
31 Aug 2011 - 7:43 pm | धमाल मुलगा
फोटू मोठा करुन पाहिला.
त्या संगमरवरावरही कोणी पाटी लावली आहे ते दिलेलं नाही त्यामुळं कन्फर्मेशनची गोचीच झाली की. :)
असो! आपण असं म्हणू फार तर की, 'तिथल्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार.....' आणि पुढचं सगळं! :)
31 Aug 2011 - 10:59 am | हुप्प्या
ह्या शिल्पांमधे दिसणार्या सौंदर्याबरोबरच एक समृद्ध, प्राचीन इतिहास दडलेला आहे. कधीतरी तो समजो अशी इच्छा. आणि तोवर हे स्थान असेच टिकून राहो.
ह्या स्थानाची सफर निदान फोटोतून का होईना घडवून आल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
31 Aug 2011 - 12:16 pm | प्रास
हर्षदराव,
छान सफर घडवून आणलीत पाटेश्वराची! हे स्थान काही ठावून नव्हतं. धन्यवाद!
फोटो एकदम मस्त आणि डिटेलवार वर्णन यामुळे धाग्याला चार चाँद लागले आहेत.
भेट द्यायच्या स्थानांच्या यादीत भर पडली आहे....
31 Aug 2011 - 1:30 pm | सूड
ठिकाण आणि फोटो दोन्ही आवडल्या गेले आहे.
31 Aug 2011 - 1:34 pm | स्पा
सर्व फोटू अद्भुत
स्थान पण खूपच शांत आणि पवित्र वाटतंय....
जायलाच हव एकदा
५० प्लानिंग कर ले लवकर
31 Aug 2011 - 1:53 pm | परिकथेतील राजकुमार
मस्तच आले आहेत फटू. (पण लोड व्हायला खूप वेळ का घेत असावेत?)
शाक्तपंथीय देवस्थानाजवळ रिद्धी सिद्धी सह गणपती आणि तो देखील डाव्या सोंडेचा बघून आश्चर्य वाटले. देवस्थान व परिसराची माहिती आवडली. माहिती नवोदितांसाठी मार्गदर्शक करण्याचा प्रयत्न छानच.
अवांतर :- ह्या धाग्याच्या निमित्ताने आमचा अवलिया शाक्तपंथावर लेखमाला लिहीणार होता त्याची आठवण झाली. शक्य झाल्यास गणपतीचे मूळ रुप, गणपती हे कोणाचे दैवत म्हणून उदयाला आले, वाममार्गीयांच्या उपासनेतील गणेशाचे मूळ रुप व स्थान इत्यादीची अतिशय सुंदर माहिती योगप्रभूंकडे आहे, ती त्यांनी द्यावी अशी विनंती.
31 Aug 2011 - 2:00 pm | स्पा
वाममार्गीयांच्या उपासनेतील गणेशाचे मूळ रुप व स्थान इत्यादीची अतिशय सुंदर माहिती योगप्रभूंकडे आहे, ती त्यांनी द्यावी अशी विनंती
वा योगप्रभू.. लवकरात लवकर लेखमाला सुरु करा :)
31 Aug 2011 - 11:28 pm | योगप्रभू
<<वाममार्गीयांच्या उपासनेतील गणेशाचे मूळ रुप व स्थान इत्यादीची अतिशय सुंदर माहिती योगप्रभूंकडे आहे, ती त्यांनी द्यावी अशी विनंती.>>
पर्या हे कुणी सांगितलं बाबा तुला?
उद्या योगप्रभूला अघोर साधनेची इत्यंभूत माहिती आहे, असे म्हणशील.
गणेश हे सात्विक दैवत आहे. पण पेशवाईत राघोबादादाने माधवरावाचे वाईट घडून पेशवेपद स्वतःला मिळावे म्हणून काही साधना केल्या होत्या, असे वाचनात आले होते. शनिवारवाड्यात असताना रघुनाथराव सूर्यत्राटक (माध्यान्हीच्या सूर्याकडे एकटक पाहाणे) करायचा. त्याची अघोरी साधना नाशिकला आनंदवल्लीच्या वाड्यात चालत असे. मी इतकेच वाचले आहे, की राघोबादादाने उच्छिष्ट गणपती नावाची एक अघोर साधना तेथे केली होती. ज्यात उग्र गणेश जागवल्याने माधवराव पेशवा कोणतेही औषध लागू न होता मृत्युमुखी पडल्याची बोलवा होती. अर्थात या सार्या साहित्यिक कल्पनाविलासाच्या गोष्टी आहेत. इतिहास म्हणून त्यांचे महत्त्व नाही.
वामपंथाच्या उपासनेबाबत मला माहिती नाही. कुणीतरी तुला भलतंच काहीतरी सांगितलेलं दिसतंय. :)
1 Sep 2011 - 8:24 pm | ईश आपटे
ऐकीव माहिती नुसार, राघोबादादाने ज्या काळ्यारंगाच्या गणपतीच्या मूर्तिची उपासना केली होती, माधवराव वर प्रयोग करण्याकरिता, तो गणपति त्याने नंतर एका विहीरीत टाकला..
तो गणपती नंतर विहीरीतुन काढून तिथे सध्या मंदिर बांधले आहे. ते मंदिर म्हणजे पौड फाट्याजवळचे दशभुजा गणपति मंदिर होय...............
6 Sep 2011 - 9:00 am | llपुण्याचे पेशवेll
असहमत. उपक्रमावरील ही माहीती पहा.
31 Aug 2011 - 1:53 pm | किसन शिंदे
शेषशायी विष्णू आणी ब्रम्हाच्या मुर्ती महादेवाच्या मंदिरात असणंच खूप आश्चर्यकारक आहे.
हि ट्रिप ठरवाच तुम्ही..
31 Aug 2011 - 3:39 pm | आत्मशून्य
मंदीराला भेट देणे विचारात आहे.
31 Aug 2011 - 4:00 pm | धमाल मुलगा
आजुबाजूचा निसर्ग, मंदीर, स्थापत्यशास्त्र...आणि त्याचे घेतलेले फोटू! नक्की कशाचं कवतिक करावं माणसानं? :)
@पर्या:
रिध्दी सिध्दीसह गणपती असण्याचे आश्चर्य नको. ती मुर्ती नंतर आलेली असू शकते. नीट पहा, गणपती आणि रिध्दी-सिध्दी ह्यांचे चेहरे, मुकुट ह्यांची ठेवण टिपिकल दैवतांसारखी नाही. डोळे काहीसे आडवे पसरट आणि मुकुट बौध्दशिल्पांशी साधर्म्य साधणारे दिसताहेत. शिवाय दोघींची कटीवस्त्रंही!
तसंच विष्णू-लक्ष्मी, ब्रम्हदेव आणि गरुडही नंतरच्या काळात आलेले दिसतायत.
न चुकता स्त्री-गणेशाची प्रतिमा इथेही आहेच.
@ हर्षदः
देवळाच्या आजूबाजूचे, भिंती, खांब ह्यांच्यावर काही नक्षी/चिन्हं असं होतं का? त्यांचे फोटो असतील तर तेही बघायला मिळतील का?
मठामध्ये काही माहिती मिळाली का? शाक्तपंथाचा काही विशेष उल्लेख केला का त्यांनी?
सर्वसाधारणतः शाक्तपंथी हे शक्तीचे उपासक. शक्ती => शाक्त. आणि शक्ती=देवाचे स्त्रीरुप (आठवा:महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं, शिव आणि शक्ती इ.इ.)
शिवाला सृष्टीचा पिता मानले जात असले, तरी शाक्तपंथीयांमध्ये जननक्षमता असलेल्या शक्तीची उपासना होते/व्हायची. ह्या देवळामध्ये शिवाला सर्वोच्च महत्व असावं असं वरील फोटोंवरुन वाटतंय. (सगळे फोटो चढवले नसतील हे मान्य, आणि त्यामध्ये शक्ती/पार्वती/दुर्गा/काली/सती ह्यांचे फोटो असू शकतीलही ) पण जर शिवाला सर्वोच्च महत्व असेल तर ते देऊळ शाक्तपंथी नसावं.
हां! एक गोष्ट मान्य, सर्वमान्य धार्मिक प्रकारच्या उपासनेसाठी हे देउळ उभारले नाही हे नक्की.
सदर देऊळ हे १००% तांत्रिक उपासनेचे केंद्र असावे असं दिसतंय.
अघोरपंथामध्ये शिवाला नरबळी देण्याची पध्दत आहे. त्यामध्ये पिंडीवरचं लिंग बाजूला सरकवून्/खाली खेचून पिंडीवर दिलेल्या बळीचे मस्तक आतमध्ये खेचून घेण्याची सोय केली असायची ती वर फोटोमध्ये दिसते आहे.
परत गोंधळ उडतोय तो शेवटच्या फोटोमुळं. त्या पिंडीवरचे दोन कुंभ/घट हे साठवणीसाठी असल्याप्रमाणे दिसताहेत.
हा शेवटचा फोटो काढलाय ती पिंड एखाद्या चारीबाजूंनी बंदिस्त असलेल्या एखाद्या चौकात/खोलीत आहे का? कारण असे बंदिस्त चौक असायचे जिथे शाक्तपंथीयांचे पंच-मकार घडायचे. तसे असेल तर त्या घटांमध्ये मद्य आणि/किंवा मांस साठवण्याची सोय असावी. (अर्थात, ती पिंड अशा ठिकाणी नसेल तर हा मुद्दा बहुतेक बादच समजावा.)
ह्या विषयाचा माझा काही अभ्यास नाही. अभ्यासूंची मते वाचायला जरूर आवडेल.
मित्रा,
आणखी डिट्टेल फोटो असतील तर शेअर करावे. उत्सुकता वाढलीए.
आणि ह्याविषयावर अधिक माहिती द्यावी अशी प्रियाली, वल्ली आणि पुण्याचे पेशवे ह्यांना मी विनंती करतो.
31 Aug 2011 - 10:29 pm | ५० फक्त
देवळाच्या आजूबाजूचे, भिंती, खांब ह्यांच्यावर काही नक्षी/चिन्हं असं होतं का? त्यांचे फोटो असतील तर तेही बघायला मिळतील का? -
नाही रे देवळाच्या आजुबाजुच्या भिंती ह्या दगडाच्या आहेत, किल्यासारखे बांधकाम आहे, आणि वर एका फोटोत दिसत असल्या सारखे व्यवस्थित कोनाडे आहेत दिवे लावण्यासाठी, जे पाय-यांच्या बाजुला आहेत तसेच. जे मोठं देउळ आहे पहिल्यांदा लागणारं ते एखाद्या डोंगराला बॉक्स कटिंग करुन केल्यासारखं आहे. प्रवेश करतानाची ओवरी अगदी भुलेश्वरासारखीच आहे.
मठामध्ये काही माहिती मिळाली का? शाक्तपंथाचा काही विशेष उल्लेख केला का त्यांनी? - नाहि, तो मठ ही कुणा महाराजांची समाधी आहे, तिथं फार कुणी बोलणारं नव्हतं पण तिथल्या मावशी मात्र थोड्या भितीदायक वाटत होत्या.
शक्ती/पार्वती/दुर्गा/काली/सती ह्यांच्या मुर्ती नाहीत, पंण वर दिलेली एक अष्टभुजेची मुर्ती मात्र आहे.
सदर देऊळ हे १००% तांत्रिक उपासनेचे केंद्र असावे असं दिसतंय. - १०० % सहमत, तिथे जायचे सगळे रस्ते अजुनही अवघड आहेत, मध्ये फक्त १०-१२ पाय-या आहेत, वर जर एवढं पुर्ण देउळ आहे तर जायचा रस्ता पण तेवढाच चांगला असायला हवा होता.
बरं झालं ही चर्चा आधी वाचली नव्हती, च्यायला त्या देवळात अन गुहेत एकटाच गेलो होतो आत फोटो काढायला, एक तर त्या अख्या देवळात आम्ही ४ जण होतो, बाकी कुणी नाही, त्या मठात १०-१२ वेळा हाका मारल्यावर त्या मावशी बाहेर आल्या होत्या, अगदी पळायचि वेळ आलि तरी शक्य नव्हतं तिथुन.
ति शेवटची कुंभ असलेली पिंड सध्या देवळाच्या गाभा-याच्या बाहेर पण संकुलाच्या आत आहे, हे विविध पिंडी असलेले देउळ अजुन आत आहे, एका बाजुला मुख्य देवुळ एका बाजुला आहे, सहसा माहित नसेल तर या मागच्या देवळाकडं जायचा प्रश्न येणार नाही,. आणि ते कुंभ हे पुर्ण कुंभ नाहीत साधारण वरचा वाटीएवढा खोल भाग आहे आणि खाली बंद आहे.
आणि सगळेच फोटो टाकलेत रे, अबे फोटो लपवुन काय करणार आहे मी, का शाक्तपंथीय आहे असं वाट्लं का काय तुला ? आणि मंदिर डोंगर माथ्यावर आहे जवळ्पास नदी नाही कुठेही. अजुन एक दोन फोटो टाकतो, एक चुकुन पिकासालाच राहिला
अन एक दुसरा हिरव्या डोहाचा, रत्नाकर मतकरींच्या कथेत असतो ना तसा. इथं मात्र फोटो काढेपर्यंतच तंतर्ली होती. सुं वारं, पाउस अन एका बाजुनं यात पडंणा-या पाण्याचा आवाज.
31 Aug 2011 - 4:31 pm | विजुभाऊ
ही मंदीरे शाक्त पंथियांची नसून अघोर पंथीयांची असावी असा एक कयास आहे.
सुरुवातीला दाखवलेली गणेश मूर्ती ही डोंगरावर जाताना वाटेवर आहे. ती पूर्णपणे घडीव नाही. तीचा आणि डोंगरावरील शिल्पांचा कालावधी भिन्न आहे.
मुख्य मंदीराबाहेरील नंदी हा त्याच्या पाठीवरील डिझाईनवरून वाकाटक राजवटीच्या वेळेचा असावा .
31 Aug 2011 - 4:56 pm | धमाल मुलगा
मलाही अघोरपंथीयच वाटलं होतं. पण त्या २ घट असलेल्या पिंडीमुळं गंडतोय मी.
शिवाय, ह्या मंदीराच्या जवळपास एखादी नदी आहे का? पुर्वी त्या नदीमध्ये प्रेतं सोडली जायची का? कारण अशी प्रेतं अघोरसाधनेसाठी आवश्यक असतात. त्या प्रेतांवर बसून तंत्रसाधना करतात आणि शेवटी प्रसाद म्हणून तीच प्रेतं कच्ची खाल्ली जातात.
31 Aug 2011 - 5:57 pm | गणेशा
अप्रतिम बाकी काय बोलु ?
31 Aug 2011 - 6:35 pm | जाई.
फोटो आणि वृत्तांत आवडला
31 Aug 2011 - 7:24 pm | कॉमन मॅन
फारच छान. 'केल्याने देशाटन..' चा अनुभव आवडला.
कॉमॅ.
31 Aug 2011 - 9:19 pm | चित्रगुप्त
खूपच छान लेख आणि फोटो आहेत.
यातील दोन फोटो थोडेसे अस्पष्ट दिसत असल्याने बारकावे कळत नव्हते, ते जरा स्पष्ट करून इथे डकवत आहे:
1 Sep 2011 - 9:30 pm | बिपिन कार्यकर्ते
सुंदर आणि धन्यवाद! :)
2 Sep 2011 - 12:29 am | पुष्करिणी
मस्त फोटो आणि वर्णन..
6 Sep 2011 - 7:04 am | मदनबाण
सुरेख फोटज आणि उत्तम माहिती, हल्लीच वाचलेला हा लेख देखील उपयुक्त्त ठरेल !
कातळकला : पाटेश्वरचे ‘शिव’लेणे
http://alturl.com/q4p6b
बाकी दोन वर्षा पूर्वी मी जालावर angkor-thom विषयी शोध घेत होतो...तेव्हा मला शिवलिंगा विषयी काही अजुन वेगळी माहिती दिसली होती. त्या जागेचं नाव आहे... Kbal Spean (http://en.wikipedia.org/wiki/Kbal_Spean)
मुख्य म्हणजे तिथली शिवलिंग आणि पाटेश्वर मधील शिवलिंग यात मला बरेच साम्य वाटते.
Kbal Spean जागेचे काही फोटोज ( जालावरील):---