गणेश उत्सव २०११ भाग १

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
1 Sep 2011 - 3:09 pm


छोटु बाप्पाच्या रंगकामात मग्न झालेला आहे. :)


पॄथ्वीवर विराजमान झालेला गणपती.


रंगकाम पूर्ण झालेल्या गणेश मूर्ती.


बाप्पाची विविध रुपे.

निवडक अश्या नाजुक अलंकाराने नटलेला गणराज.

वासरा सोबतचा गजानन.

बाल गणेश १ या वेळी बाल गणेशाच्या मूर्तींना जास्त मागणी असावी असे वाटते. :)

बाल गणेश २

सिंहासनावर विराजमान झालेला गणराज.

लोडाला रेलुन बसलेला गणपती

बाप्पा १

बाप्पा २

एका अनोख्या मुद्रेत बसलेला बाप्पा. :)

सिद्धी,बुद्धी सह विनायक.

विठ्ठलाच्या स्वरुपात उभा असलेला गणपती.

पिवळा पितांबर नेसलेला गणपती.

कॅमेरा :--- निकॉन पी-१००

(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....

=============================================================================
माझे मनोगतः---
दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी बाप्पाच्या विविध रुपातील तसेच मुद्रेतील फोटो टिपावे अशी इच्छा मनात होती. मागच्या वर्षी असे फोटो काढुन इथे टाकले होते,या वर्षीही हा प्रयत्न सुरु ठेवला आहे.
जर मला विविध मांडवातले गणपती टिपता आले तर पुढचा भाग टाकावा असा विचार सध्या मनात आहे.
माझा हा बाप्पाला टिपण्याचा प्रयत्न गोड मानुन घ्यावा.

संस्कृतीकलाधर्मछायाचित्रण

प्रतिक्रिया

मीनल's picture

1 Sep 2011 - 3:15 pm | मीनल

निळा कद घातलेली वासरासोबतची मूर्ती आवडली.

खूपच छान...
टॅग लावलेले बाप्पा बुक झले आसवे...
गणपती बाप्पा मोरया...

गणपा's picture

1 Sep 2011 - 3:24 pm | गणपा

_/\_

सुहास झेले's picture

1 Sep 2011 - 3:47 pm | सुहास झेले

आधी वंदू तुज मोरया... __/\__

अन्या दातार's picture

1 Sep 2011 - 3:55 pm | अन्या दातार

महाराष्ट्र मंडळ, आय.आय.टी खडगपूर आयोजित गणेशोत्सवात सुद्धा अनोख्या मुद्रेत बसलेला बाप्पाचीच मुर्ती आहे यंदा! :)

पिवळा पितांबर नेसलेला गणपती??
द्विरुक्ती होतेय असं वाटत नाही का?

मदनबाण's picture

1 Sep 2011 - 5:02 pm | मदनबाण

पिवळा पितांबर नेसलेला गणपती??
द्विरुक्ती होतेय असं वाटत नाही का?

ह्म्म्म... होय. खरं हाय तुमचं म्हणण.
स्वारी. ;)

विशाखा राऊत's picture

1 Sep 2011 - 4:22 pm | विशाखा राऊत

_/\_

स्मिता.'s picture

1 Sep 2011 - 4:33 pm | स्मिता.

सुंदर फोटो... बघून मन प्रसन्न झालं :)

नगरीनिरंजन's picture

1 Sep 2011 - 4:37 pm | नगरीनिरंजन

__/\__.

एकदम त्या वातावरणातच नेलं भौ!

शाहिर's picture

1 Sep 2011 - 6:26 pm | शाहिर

__/\__.

ढ's picture

1 Sep 2011 - 6:56 pm |

मस्तच.

गणपती बाप्पा मोरया!!!!

रेवती's picture

1 Sep 2011 - 7:13 pm | रेवती

वा!!
मस्त रे बाणा!
सगळ्या गणपतींचे इतके नाजूक दागिने मूर्तीवरच कसे तयार करत असतील असा प्रश्न पडलाय.
गणपतीच्या कदाचे वेगळाले रंग पहायला मिळाले.
गर्द निळा रंग आवडल्या गेला आहे.
यावर्षी चकचकीत रंगाच्या कदाची फ्याशन देवादिकांमध्येही दिसतिये.;)
दरवर्षीच तू अगदी न चुकता फोटूरुपाने गणपतीची सेवा करत असतोस.

शुचि's picture

1 Sep 2011 - 7:14 pm | शुचि

सुरेख. धन्यवाद मबा.

प्रभो's picture

1 Sep 2011 - 7:47 pm | प्रभो

मोरया!!

खादाड_बोका's picture

1 Sep 2011 - 10:02 pm | खादाड_बोका

_/\_

पिंगू's picture

1 Sep 2011 - 11:00 pm | पिंगू

मस्त रे बाणा.. बाकी फोटू कुठल्या रंगशाळेत काढले रे...

- पिंगू

बाकी फोटू कुठल्या रंगशाळेत काढले रे...

घरा जवळ असलेल्या, दोन रगशाळेत जाउन आलो.पण या वेळी पावसामुळे हवे तसे गणपती टिपता आले नाहीयेत.
कालच काही गणेश मंडळात आणि काही घरगुती गणपतींचे दर्शन घेउन आलो आहे... लवकरच भाग २ टाकीन म्हणतो. :)

पाषाणभेद's picture

2 Sep 2011 - 5:43 am | पाषाणभेद

गणेशाची विविध रुपे सुखदायक आहेत.
गणपती बाप्पा मोरया!!

सहज's picture

2 Sep 2011 - 10:00 am | सहज

वेगवेगळ्या रुपातला बाप्पा बघायला मजा आली.

आता थोडी गंमत कोणती मुर्ती कोणत्या मिपाकराकडे असेल एक अंदाज. ह.घ्या.

१) पहीली मस्त विराजमान मुर्ती रामदासकाकांकडे
२) दुसरी तंबोरावाली अर्थात तात्या महाराज एकमेव बाकीचे तुलनेत बरेच छोटे आहेत बघा.
३) या चार मुर्त्यांपैकी कोणती घ्यावी, चारी घेतल्या तर काही अमंगल तर नाही ना अश्या संभ्रमात शुचिताई पडल्या असाव्यात.
४) कमळातही पोझीशन एडजस्ट केलेली मुर्ती यावर्षी १००% बिकाकाकांकडे
५) ही मुर्ती योगप्रभुंकडे
६) वासरासोबत कलरफूल गजानन - बाणाकडे
७) व ८) बाल गणेश इंट्या व स्पाकडे
९) सिंहासनावर विराजमान झालेला गणराज - गुगळेसाहेबांकडे
१०) लोडाला रेलुन बसलेला गणपती - गवि यांच्याकडे
११) बाप्पा १ - परा
१२) बाप्पा २ - धमु
१३) एका अनोख्या मुद्रेत बसलेला बाप्पा. - ही मूर्ती एखाद्या १० दिवसाच्या मिपाकट्टा मंडळ बसवेल
१४) सिद्धी,बुद्धी सह विनायक. - वन एन्ड ओन्ली प्रभू मास्तर
१५) विठ्ठलाच्या स्वरुपात उभा असलेला गणपती. - डोन्राव
१६) पितांबर नेसलेला गणपती. - पिडाकाका

गणपती बाप्पा मोरया!!!

छोटा डॉन's picture

2 Sep 2011 - 4:44 pm | छोटा डॉन

मजेशीर विभागणी :)

सहजकाकांकडे काय कसला गणपती असेल ह्याचा आमचा एक अंदाज

( कर्टसी : पराची खव )

अवांतर :
बाणाच्या पुढच्या लेखांची वाट पहात आहे :)

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2011 - 12:26 pm | परिकथेतील राजकुमार

लै भारी वाटप केंद्र हो सहजमाम.

@डान्या :- आम्ही सहजमामांसाठी एक लै भारी बाप्पा शोधलाय.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Sep 2011 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा

ते एका ओळीत असलेले ४बाल गणेश :-) पाहून मनापासुन ह्सू आलं,सकाळी सकाळी शाळेला निघलेली बालसेनाही अशीच दिसते... :-) बाकी तुमचं कलेक्शन निहमी प्रमाणेच १नंबर

जाई.'s picture

2 Sep 2011 - 11:27 pm | जाई.

_/\_
उत्तम फोटो

जय गणेश

सूड's picture

3 Sep 2011 - 9:54 am | सूड

हा आवडला !!

मदनबाण's picture

3 Sep 2011 - 10:16 am | मदनबाण

धन्यवाद मंडळी...:)
आजच दुसरा भाग टाकायचा प्रयत्न करतो.

गवि's picture

3 Sep 2011 - 1:16 pm | गवि

उत्तम वाटप..

आवडले..

पल्लवी's picture

3 Sep 2011 - 1:39 pm | पल्लवी

सुंदर !