गणेश उत्सव २०११ भाग २

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
3 Sep 2011 - 7:25 pm


अ‍ॅनिमेटेड बाप्पा... :)

कॅमेरा :--- निकॉन पी-१००
***फोटो फक्त रिसाईझ केले आहेत,सॉफ्टवेअर वापरुन इतर कुठलाही बदल केलेला नाही.

(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....

=====================================================================

माझे मनोगतः--- बाप्पाची वेगवेगळी आरास पहायला मिळणे हा एक वेगळाच आनंद आहे,तसेच विविध प्रकार केलेली प्रकाश योजना देखील बघायला मिळते.या वेळी एका मंडळात केलेली सजावट आणि प्रकाश योजना मला आवडली...म्हणुन मी एकाच मूर्तीचे विविध २८ फोटो काढले,जेणे करुन मला ती प्रकाश योजना टिपता येईल.पण इथे २८ फोटो देणे कठीण वाटले (त्यातलेच काही निवडक फोटो वर दिले आहेत.), मग त्याचा एकादा स्लाईड शो करावा का असा प्रश्न माझ्या डोक्यात आला... मी हा प्रश्न सहजरावांना तसेच बझ वर मित्रांना विचारला.त्यांनी ही स्लाईड शो करुन बघ असे सांगितले.जालावर शोधा शोध करुन काही सॉफ्टवेयर पाहिले, काही इनस्टॉल देखील करुन पाहिले पण काही जमेना,त्यात इतके वेळा वीज गेली की विचारु नका ! शेवटी GIMP वापरुन अ‍ॅनिमेशन (GIF) फाईल बनवली.हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.तुम्हाला अशी कुठली सॉफ्टवेयर माहित असतील तर नक्की सांगा.
बाकीच्या बाप्पाचं दर्शन पुढील धाग्यात... :)

संस्कृतीकलाधर्मछायाचित्रण

प्रतिक्रिया

जातीवंत भटका's picture

3 Sep 2011 - 8:08 pm | जातीवंत भटका

बाप्पांची मुर्ती सुं द र आहे !!
स्लाईड-शो झक्कास जमला आहे.

जाई.'s picture

3 Sep 2011 - 9:39 pm | जाई.

+१

गणपा's picture

3 Sep 2011 - 10:36 pm | गणपा

_/|\_

सुहास झेले's picture

3 Sep 2011 - 10:38 pm | सुहास झेले

बाणा सही आले आहेत फोटो....

स्लाईड-शो झक्कास जमला आहे.... +१

अ‍ॅनिमेटेड बाप्पा मस्त आहे.

कौशी's picture

5 Sep 2011 - 12:12 am | कौशी

सर्व फोटो छान आणि सजावट
तर खुप मस्त केली आहे.
आणि येवु द्या....

पाषाणभेद's picture

5 Sep 2011 - 12:31 am | पाषाणभेद

प्रसन्न वाटले

हितु's picture

6 Sep 2011 - 1:38 pm | हितु

मस्त फोतो आहेत.

software :- खूप software आहेत , यादि खलिल प्रमाने
1) NERO Vision (comes with Nero ultimate edition 7 onwards) yaat DVD format pan banavu sakato. direct tv var bagha. with background music.

2) Paint shop pro animator (very easy software) GIF / AVI file maker
3) easy GIF maker (cnet.com)
4) Smart GIF maker
5) Sony Vegas pro studio (pro software)
6) pinnacle a/v studio (pro software)

aajun bharpur softwares aahet, varil software chya link pahije astil tar kalavane

tip:- mazya marathi la hasu naye ! koop varshyani lihit aahe.

मदनबाण's picture

6 Sep 2011 - 8:08 pm | मदनबाण

थांकु बरं का मित्रा... :)

दुर्वांचा हार मस्तच!
किती वर्षं झाली दुर्वा बघूनही!