मिपाला चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

क्लिंटन's picture
क्लिंटन in जनातलं, मनातलं
1 Sep 2011 - 9:09 am

नमस्कार मंडळी,

आज गणेश चतुर्थी! आज आपलं लाडकं मिपा (तिथीने) चार वर्षाचं झालं. गेल्या चार वर्षात मिपावर अनेकविध विषयांवर दर्जेदार चर्चा वाचता आल्या, त्यात भागही घेता आला. तसेच मिपामुळे अनेक नव्या ओळखी झाल्या, मित्रपरिवार वाढला. आता तर मिपाशिवाय पूर्वी कसे राहत होतो असाच प्रश्न पडू लागला आहे.

असे हे उत्तम, दर्जेदार आणि सुंदर संकेतस्थळ चालू करून माझ्यासारख्या अनेकांना मायमराठीतून इतरांबरोबर संवाद साधायची संधी दिल्याबद्दल तात्या आणि नीलकांतचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. तसेच स्वतःचा नोकरीव्यवसाय सांभाळून मिपासाठी संपादनाचे काम करत असलेल्या संपादकांचे आणि दर्जेदार विषय मिपावर आणून सगळ्यांना त्याचा आस्वाद घ्यायची संधी दिल्याबद्दल सर्वच मिपाकरांचे आभार.

मिपाला आणि मिपाकरांना चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

(मिपाचा पहिल्या दिवसापासूनचा सभासद) क्लिंटन

हे ठिकाणसद्भावनाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

सहज's picture

1 Sep 2011 - 9:13 am | सहज

लेखातील शब्दान शब्दाशी व भावनेशी सहमत आहे! :-)

हॅपी बर्थ डे टु मिपा!!

राजेश घासकडवी's picture

1 Sep 2011 - 9:21 am | राजेश घासकडवी

आता तर मिपाशिवाय पूर्वी कसे राहत होतो असाच प्रश्न पडू लागला आहे.

१०१% सहमत. मला मिपावर येऊन फक्त दीड वर्षच झालंय हे अजूनही खरं वाटत नाही.

मिपाला, म्हणजे सर्व मिपाकरांना व व्यवस्थापनाला, वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा.

धमाल मुलगा's picture

1 Sep 2011 - 9:42 am | धमाल मुलगा

मनिष's picture

1 Sep 2011 - 7:40 pm | मनिष

हेच म्हणतो!! अभिनंदन!!!

धम्याशी (नेहमीच) सहमत!!

स्वगत-मालक काल रात्री धागा टाकुन गेले. पण ते स्वत: विसरले असावेत असे वाटते.

(पळतो आता. मालक हजर आहेत)

नीलकांत's picture

1 Sep 2011 - 10:14 am | नीलकांत

रात्री बाराला तारीख बदलते ;) तिथी नाही. ! म्हणून सकाळी लिहूया असं ठरवलं होतं.

- नीलकांत

प्राची's picture

1 Sep 2011 - 10:26 am | प्राची

हॅपी बड्डे मिपा. :)
आणि सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. :)

मदनबाण's picture

1 Sep 2011 - 5:00 pm | मदनबाण

क्लिंटनरावांच्या शब्दा शब्दाशी सहमत... :)
मलाही या संकेत स्थळावर राहुन 3 वर्षे 27 आठवडे पूर्ण झाले आहेत याचे नवल वाटायला लागले आहे,कारण हा सर्व काळ कसा गेला ते कळलेच नाही. :)
हे संकेतस्थळ असेच अजुन बहारदार होवो... आणि नवनविन सदस्यांची त्यात भर पडो हीच इच्छा व्यक्त करतो.

गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया !

प्रकाश घाटपांडे's picture

1 Sep 2011 - 10:35 am | प्रकाश घाटपांडे

या नीमित्त आम्हाला आनंद घारे यांचा मिसळपाववरील पहिले वर्ष हा लेख आठवतो. तसेच राजेश घासकडवींचा वर्धापन दिना नीमित्त मिपाला शुभेच्छा हा ही लेख ही आठवतो.

मिपाला तिथीनुसारच्या चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
तात्या निलकांत आणि संपादकां सोबतच मिपावर लिहिणार्‍या (मग ते प्रतिसाद का असेनात) समस्त लेखक /लेखिकांचे ही आभार. :)

जुग जुग जियो मिपा. :)

इरसाल's picture

1 Sep 2011 - 11:07 am | इरसाल

ह्याप्पी बर्थ डे.

खेडूत's picture

1 Sep 2011 - 11:21 am | खेडूत

सर्वांना खूप शुभेच्छा !!

खेडूत.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Sep 2011 - 11:45 am | बिपिन कार्यकर्ते

उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी मनःपूर्वक इच्छा! ऑल द बेस्ट!

छोटा डॉन's picture

1 Sep 2011 - 12:38 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो.

मिपाला शुभेच्छा आणि सहकार्याचे आश्वासन

- छोटा डॉन

नावातकायआहे's picture

1 Sep 2011 - 1:51 pm | नावातकायआहे

मिपाला शुभेच्छा!!

ऋषिकेश's picture

3 Sep 2011 - 10:57 am | ऋषिकेश

मिपाला ह्याप्पी वाल्या बड्डेच्या बिलेटेड शुभेच्छा! :)

प्रीत-मोहर's picture

3 Sep 2011 - 1:27 pm | प्रीत-मोहर

+१ बिलेटेड हॅप्पी बड्डे मिपा

प्रियाली's picture

1 Sep 2011 - 2:47 pm | प्रियाली

हेच म्हणते.

प्रदीप's picture

1 Sep 2011 - 8:55 pm | प्रदीप

हेच म्हणतो. मिपास पुढील वाटचालीनिमीत्त शुभेच्छा!

ढ's picture

1 Sep 2011 - 11:47 am |

चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

"जियो" मिपा....

केशवसुमार's picture

1 Sep 2011 - 12:49 pm | केशवसुमार

क्लिंटनशेठशी १००१% सहमत...
सर्व मिपाकरांना मिपा वर्धापनदिनाच्या हर्दिक शुभेच्छा!!
केशवसुमार

सविता००१'s picture

1 Sep 2011 - 12:53 pm | सविता००१

चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! जुग जुग जियो मिपा........

स्मिता.'s picture

1 Sep 2011 - 1:10 pm | स्मिता.

समस्त मिपाकरांना मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

विशाखा राऊत's picture

1 Sep 2011 - 1:31 pm | विशाखा राऊत

हॅप्पी बर्थ डे मिपा :)

गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा :)

गंगाधर मुटे's picture

1 Sep 2011 - 2:04 pm | गंगाधर मुटे

समस्त मिपाकरांना मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! :)

सुहास झेले's picture

1 Sep 2011 - 2:06 pm | सुहास झेले

मिपाकरांना चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..

मिपाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि माझ्यातर्फे जमेल तितके सहकार्य करण्याचे वचन :) :)

ऑल द बेश्ट :)

सोत्रि's picture

1 Sep 2011 - 3:19 pm | सोत्रि

अगदी शेम टु शेम हीच भावना !

- (भावना 'झेल'णारा) सोकाजी

मिसळपाव ची अशीच भरभराट आणि प्रगती होत राहो हि ईश्वरचरणी प्रार्थना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Sep 2011 - 2:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नीलकांत सोबत मिपाच्या तांत्रिक गोष्टी सांभाळणार्‍या टीमचेही अभिनंदन.

-दिलीप बिरुटे

सर्व मिपाकरांना मिपा वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हर्दिक शुभेच्छा!!

विकास's picture

1 Sep 2011 - 3:59 pm | विकास

क्लिंटन यांच्याशी सहमत! चार वर्षात अनेक मित्र-मैत्रिणी झाले, अनेक नवीन गोष्टी कळल्या-समजल्या ज्या मुद्दामून वाचायला गेलो नसतो. त्यामुळे या निमित्ताने अशा सर्वच लेखक-कवी-आणि खरडकांना देखील शुभेच्छा! आणि तुमच्या मुळे माझ्यासारख्याच्या माहितीत-ज्ञानात भर पडत राहोत ही विनंती!

चित्रा's picture

1 Sep 2011 - 4:32 pm | चित्रा

चौथ्या वर्धापनदिनानिमित्त सर्व मिपाकरांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!

क्रान्ति's picture

1 Sep 2011 - 4:43 pm | क्रान्ति

मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त मिपाला आणि समस्त मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!
मिपाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, ही गणरायाच्या चरणी प्रार्थना. :)

श्रावण मोडक's picture

1 Sep 2011 - 4:50 pm | श्रावण मोडक

उत्तरोत्तर प्रगतीच व्हावी अशी मनःपूर्वक इच्छा! ऑल द बेस्ट!

मृत्युन्जय's picture

1 Sep 2011 - 5:53 pm | मृत्युन्जय

मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त मिपाला आणि समस्त मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!
मिपाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, ही गणरायाच्या चरणी प्रार्थना.

मिपाला चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सर्व सदस्यांचं अभिनंदन!

मुक्तसुनीत's picture

1 Sep 2011 - 7:25 pm | मुक्तसुनीत

मिपाला चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सर्व सदस्यांचं अभिनंदन!

हेच म्हणतो. अनेक शुभेच्छा.

कलंत्री's picture

1 Sep 2011 - 7:09 pm | कलंत्री

मिपाशी सलंग्न राहणे हा एक चांगला अनूभव होता आणि आहे. पूर्वी दिवस उजाडयाचा तो मिपावर येण्यासाठीच. सध्या पूर्वीसारखे जमत नाही याची खंत वाटते.

तात्याचे मिपासाठी असलेले योगदान हे मराठीच्या मार्गातील एक महत्त्वाचे असे स्थान आहे आणि मला त्याचे ॠण मानण्यातच आनंद असेल.

नीलकांत हे या टप्प्यावरचे मिळालेले एअक महत्त्वाचे मित्र म्हणून संचित आहे.

त्याचबरोबर अनेक मित्र मिळाले, बरेच प्रेम मिळाले हे कसे विसरता येईल?

अश्या काळाच्या टप्प्यावर हे सर्व आठवता येते याच साठी ही वर्धापनदिने असतात हेच खरे!!!

विकास's picture

1 Sep 2011 - 7:19 pm | विकास

मिपाशी सलंग्न राहणे हा एक चांगला अनूभव होता

यातील "होता" हा शब्द खटकला. :(

सध्या पूर्वीसारखे जमत नाही याची खंत वाटते.

आशा करतो, सर्व व्यवस्थित चालू आहे. आपण सारखे नाही पण मधून मधून येऊन का होईना पण लेखन चालू ठेवावेत ही विनंती.

अश्या काळाच्या टप्प्यावर हे सर्व आठवता येते याच साठी ही वर्धापनदिने असतात हेच खरे!!!

सहमत! सिंहावलोकनासाठीच वर्धापनदिन साजरे करण्याची प्रथा पडली असावी.

क्लिंटन यांच्याशी १००% सहमत. गेली साडेतीन वर्षे मिपाच्या सान्निध्यात कशी सरली ते खरंच समजलं नाही. इतके प्रेम करणारे जिव्हाळ्याचे लोक मिपाने दिलेत की मी स्वतःला भाग्यवान समजतो. हे सगळे सुहृद मिळवून देणार्‍या मिसळपावला चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा! मिपाच्या सर्व सदस्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुढील वाटचाल अशीच समृद्ध करणारी असूदे अशी श्रीगजाननाचरणी प्रार्थना! :)

(आनंदित) चतुरंग

किसन शिंदे's picture

1 Sep 2011 - 7:26 pm | किसन शिंदे

मिसळपावला ४थ्या वर्धापनदिनाच्या आणी मिपाकरांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!

येणार्‍या पुढील वर्षात मिपाची अशीच प्रगती होत राहो हि गणरायाचरणी प्रार्थना. :)

प्रभो's picture

1 Sep 2011 - 7:45 pm | प्रभो

मिसळपावला ४थ्या वर्धापनदिनाच्या आणी मिपाकरांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!

हेच म्हणतो.

चतुर्थ वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

अंतु बर्वा's picture

1 Sep 2011 - 7:52 pm | अंतु बर्वा

मिपाचं व्यसन लागलं आहे आता... आणी हे व्यसन असच चालू राहो....

चौथ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा... मिपाच्या यशाचा आलेख असाच उत्तरोत्तर वाढत राहो...

गणपती बाप्पा मोरया..!!!

प्रचेतस's picture

1 Sep 2011 - 7:54 pm | प्रचेतस

मिपाला चौथ्या वर्धापनादिनाच्या अनेकानेक शुभेच्छा.
मिपानेच अनेक मिपाकर मैत्र म्हणून दिलेत त्याबद्दल मिपा, मिपाकर आणि मिपाव्यवस्थापनाचे अनेक आभार.

समीरसूर's picture

1 Sep 2011 - 8:11 pm | समीरसूर

नमस्कार,

आज गणरायाचे मंगल आगमन झाले. श्री गणेश आपल्या आगमनासोबतच सुख, समृद्धी, समाधान, मांगल्य, आणि पावित्र्य घेऊन येवो ही सदिच्छा! सगळ्यांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आणि चौथ्या वर्धापनदिनानिमित्त समस्त मिपापरिवाराला हार्दिक शुभेच्छा!!

मिपा म्हणजे माझा एक सच्चा मित्र आहे; मिपा म्हणजे माझ्यापासून काही क्षण विलग होत मलाच सार्थपणे व्यक्त करणारं माझंच एक निराळं, अनोखं, अस्तित्व आहे; मिपा माझा तो हक्काचा कट्टा आहे जो कॉलेजनंतर हळू-हळू आयुष्यातून संपत जातो आणि लग्नानंतर ज्याचा मागमूसही आयुष्यात राहत नाही.

मिपा म्हणजे चार क्षणांची मनाची खरी विश्रांती आहे; मिपा म्हणजे आजच्या गतिमान जीवनातली कधीकाळी वाट्याला येणारी घनदाट जंगलातली मनसोक्त भटकंती आहे.

सगळे मिपाकर या मनसोक्त भटकंतीतले सवंगडी आहेत, हात धरून फेर धरायला लावणारे, दिलखुलास दाद देणारे मित्र आहेत.

सगळ्या मिपाकरांना मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त अनेकोत्तम शुभेच्छा.

मिपा असे शेकडो वर्धापनदिन साजरे साजरे करेल यात शंकाच नाही. गणरायाने मिपावर आपली कृपादृष्टी सतत असू द्यावी ही त्यास नम्र प्रार्थना!

समीर

मिपा ला खूप खूप शुभेच्छा.

विविध प्रकृतीच्या, आवडी-निवडीच्या सदस्यांना सामावून घेऊन, मिपा असेच फुलत, बहरत रहावो ही त्या सुमुखाच्या, विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना.

५० फक्त's picture

1 Sep 2011 - 8:37 pm | ५० फक्त

मिपाला आणि सगळ्यांनाच शुभेच्छा.

हा केक आपण जगात भारी आहोत म्हणुन

हा श्री,.निलकांत साठी

हा केक, असो त्या नाहित आता इथं, आर या म्हणलं तरी येणार नाही.

आणि हा शेवटचा मिपा हे हक्काचं कुरण आहे दंगा करायचं म्हणुन.

प्रदीप's picture

1 Sep 2011 - 8:58 pm | प्रदीप

प्रकाश घाटपांडे व कलंत्री हेही इथे पुन्हा दिसले, ह्याचाही आनंद आहे.

विकास's picture

2 Sep 2011 - 2:12 am | विकास

प्रकाश घाटपांडे व कलंत्री हेही इथे पुन्हा दिसले, ह्याचाही आनंद आहे.

सहमत. आता त्यांचे लेखनही दिसुंदेत ही विनंती!

मिपाला चौथ्या वर्धापनादिनाच्या हार्दीक शुभेच्छा. आणी सर्व व्यवस्थापकांचे विषेश आभार व अभिनंदन. विविध गूण, प्रकृती व प्रवॄत्तिच्या लोकांना मिपाकर म्हणून एकत्र नांदताना बघताना खरच आनंद वाट्तो....

पिंगू's picture

1 Sep 2011 - 10:16 pm | पिंगू

वा. दि. हा. हा. शु. मिपा.. बाकी वाढदिवसाची पार्टी झालीच पाहिजे.

कट्टा कधी करायचा ते ठरवा..

- (कट्टर मिपाकर) पिंगू

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2011 - 11:05 pm | अत्रुप्त आत्मा

मिपा असेच चालत राहो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..... :-)

मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती,या पुण्यनगरी मधे।
कसबा,गुपचुप,मोदी,माती,चिमण्या..च्या दर्शना जाऊ दे॥
सारसबाग तळ्यातला गणपती,त्याच्यापुढे दशभुजा।
आठवा उंबरजा असे गणपती,कार्यासी बोलवीत जा॥....मंगलमूर्ती मोरया,गणपतीबाप्पा मोरया....

मिपाच्या वर्धापनादिनानिमित्त मिपाला तसेच सर्व मिपाकराना शुभेच्छा

मिपाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना

साती's picture

2 Sep 2011 - 12:03 am | साती

मिपाला शुभेच्छा

कोदरकर's picture

2 Sep 2011 - 1:03 am | कोदरकर

मि पा परिवारास ४ थ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा

नाखु's picture

2 Sep 2011 - 8:58 am | नाखु

सर्व मि.पा.परिवारचे अभिनंदन आणि उत्तरोत्तर प्रगतिसाठी शुभेच्छा..
यानिमित्ताने सर्व ज्ञात अज्ञात संपादक, सिद्धहत लेखकांचे आभार (त्यापेक्शा ऋणी आहे कसे वाटते)

अभिनंदन आणि शुभेच्छा

प्यारे१'s picture

2 Sep 2011 - 9:13 am | प्यारे१

हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!!

व्यक्तिगत कसोटीच्या कालखंडांमध्ये (मिपाशी ओळख झाल्यापासून आतापर्यंत दोन वेळा) मिपामुळे अनुक्रमे तणाव आणि दु:ख किमान मागे टाकू शकलो त्याबद्दल मिपाच्या सगळ्या लेखक, वाचक, प्रतिसादकर्ते, संपादक, सरपंच, व्यवस्थापक, मालक आणि सगळ्यांचे हार्दिक आभार....

- प्यारे

मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मिपाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि समस्त मिपाकरांची लेखणी कायम बहरत राहो हीच गणरायाचरणी प्रार्थना!!! :-)

--असुर

मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

विसोबा खेचर's picture

2 Sep 2011 - 10:01 am | विसोबा खेचर

सारे श्रेय नीलकांताचे, त्याच्या संपादकांचे आणि केवळ अन् केवळ मिपाकरंचे आहे.

सर्वांचेच अभिनंदन.. :)

(संस्थापक) तात्या.

मिपाच्या वर्धापनादिनानिमित्त मिपाचे तसेच सर्व मिपाकराचे हार्दिक अभिनंदन.

आणि हो , समयोचित धाग्या बद्दल क्लिंटन साहेबांचे आभार.

विसुनाना's picture

2 Sep 2011 - 1:05 pm | विसुनाना

सर्व मिसळपाव परिवाराचे हार्दिक अभिनंदन!
मोरया!

माझ्या आयुष्याच्या अतिशय कठीण कालखंडात जगण्याची उर्मी देणार्‍या संजीवक मिपाची मी शतशः आभारी आहे ! मिपाच्या मालक, व्यवस्थापक,संपादक मंडळ, आणि सर्व लेखकांचे हार्दिक आभार..........

मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मिपाने असे हजारो वर्धापनदिन साजरे करावे ही गणरायाचरणी प्रार्थना !!!!!!!!!!!!!!!!!