Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by क्लिंटन on गुरुवार, 09/01/2011 - 09:09
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
नमस्कार मंडळी, आज गणेश चतुर्थी! आज आपलं लाडकं मिपा (तिथीने) चार वर्षाचं झालं. गेल्या चार वर्षात मिपावर अनेकविध विषयांवर दर्जेदार चर्चा वाचता आल्या, त्यात भागही घेता आला. तसेच मिपामुळे अनेक नव्या ओळखी झाल्या, मित्रपरिवार वाढला. आता तर मिपाशिवाय पूर्वी कसे राहत होतो असाच प्रश्न पडू लागला आहे. असे हे उत्तम, दर्जेदार आणि सुंदर संकेतस्थळ चालू करून माझ्यासारख्या अनेकांना मायमराठीतून इतरांबरोबर संवाद साधायची संधी दिल्याबद्दल तात्या आणि नीलकांतचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. तसेच स्वतःचा नोकरीव्यवसाय सांभाळून मिपासाठी संपादनाचे काम करत असलेल्या संपादकांचे आणि दर्जेदार विषय मिपावर आणून सगळ्यांना त्याचा आस्वाद घ्यायची संधी दिल्याबद्दल सर्वच मिपाकरांचे आभार. मिपाला आणि मिपाकरांना चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. (मिपाचा पहिल्या दिवसापासूनचा सभासद) क्लिंटन
  • Log in or register to post comments
  • 9586 views

प्रतिक्रिया

Submitted by सहज on गुरुवार, 09/01/2011 - 09:13

Permalink

:-)

लेखातील शब्दान शब्दाशी व भावनेशी सहमत आहे! :-) हॅपी बर्थ डे टु मिपा!!
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 09/01/2011 - 09:21

Permalink

शुभेच्छा

आता तर मिपाशिवाय पूर्वी कसे राहत होतो असाच प्रश्न पडू लागला आहे.
१०१% सहमत. मला मिपावर येऊन फक्त दीड वर्षच झालंय हे अजूनही खरं वाटत नाही. मिपाला, म्हणजे सर्व मिपाकरांना व व्यवस्थापनाला, वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 09/01/2011 - 09:42

Permalink

चिअर्स मिपा!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on गुरुवार, 09/01/2011 - 19:40

In reply to चिअर्स मिपा! by धमाल मुलगा

Permalink

हेच म्हणतो!! अभिनंदन!!!

हेच म्हणतो!! अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

Submitted by नरेश_ on Fri, 09/02/2011 - 11:28

In reply to चिअर्स मिपा! by धमाल मुलगा

Permalink

वर्धापनदिनाच्या शुभेच्छा!!

धम्याशी (नेहमीच) सहमत!!
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 09/01/2011 - 09:54

Permalink

मिपाला चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

स्वगत-मालक काल रात्री धागा टाकुन गेले. पण ते स्वत: विसरले असावेत असे वाटते. (पळतो आता. मालक हजर आहेत)
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on गुरुवार, 09/01/2011 - 10:14

Permalink

तिथीनुसार आहे हो...

रात्री बाराला तारीख बदलते ;) तिथी नाही. ! म्हणून सकाळी लिहूया असं ठरवलं होतं. - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची on गुरुवार, 09/01/2011 - 10:26

Permalink

हॅपी बड्डे मिपा. आणि सर्व

हॅपी बड्डे मिपा. :) आणि सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 09/01/2011 - 17:00

Permalink

क्लिंटनरावांच्या शब्दा

क्लिंटनरावांच्या शब्दा शब्दाशी सहमत... :) मलाही या संकेत स्थळावर राहुन 3 वर्षे 27 आठवडे पूर्ण झाले आहेत याचे नवल वाटायला लागले आहे,कारण हा सर्व काळ कसा गेला ते कळलेच नाही. :) हे संकेतस्थळ असेच अजुन बहारदार होवो... आणि नवनविन सदस्यांची त्यात भर पडो हीच इच्छा व्यक्त करतो. गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 09/01/2011 - 10:35

Permalink

या नीमित्त आम्हाला आनंद घारे

या नीमित्त आम्हाला आनंद घारे यांचा मिसळपाववरील पहिले वर्ष हा लेख आठवतो. तसेच राजेश घासकडवींचा वर्धापन दिना नीमित्त मिपाला शुभेच्छा हा ही लेख ही आठवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 09/01/2011 - 13:08

Permalink

मिपाला तिथीनुसारच्या चौथ्या

मिपाला तिथीनुसारच्या चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! तात्या निलकांत आणि संपादकां सोबतच मिपावर लिहिणार्‍या (मग ते प्रतिसाद का असेनात) समस्त लेखक /लेखिकांचे ही आभार. :) जुग जुग जियो मिपा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 09/01/2011 - 11:07

Permalink

ह्याप्पी बर्थ डे.

ह्याप्पी बर्थ डे.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on गुरुवार, 09/01/2011 - 11:21

Permalink

शुभेच्छा !!

सर्वांना खूप शुभेच्छा !! खेडूत.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 09/01/2011 - 11:45

Permalink

उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी

उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी मनःपूर्वक इच्छा! ऑल द बेस्ट!
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 09/01/2011 - 12:38

In reply to उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी by बिपिन कार्यकर्ते

Permalink

+१

हेच म्हणतो. मिपाला शुभेच्छा आणि सहकार्याचे आश्वासन - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on गुरुवार, 09/01/2011 - 13:51

In reply to +१ by छोटा डॉन

Permalink

+२

मिपाला शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sat, 09/03/2011 - 10:57

In reply to +२ by नावातकायआहे

Permalink

+३

मिपाला ह्याप्पी वाल्या बड्डेच्या बिलेटेड शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Sat, 09/03/2011 - 13:27

In reply to +३ by ऋषिकेश

Permalink

+१ बिलेटेड हॅप्पी बड्डे मिपा

+१ बिलेटेड हॅप्पी बड्डे मिपा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 09/01/2011 - 14:47

In reply to उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी by बिपिन कार्यकर्ते

Permalink

+१

हेच म्हणते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 09/01/2011 - 20:55

In reply to उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी by बिपिन कार्यकर्ते

Permalink

अगदी

हेच म्हणतो. मिपास पुढील वाटचालीनिमीत्त शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on गुरुवार, 09/01/2011 - 11:47

Permalink

मिसळपावला

चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! "जियो" मिपा....
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on गुरुवार, 09/01/2011 - 12:49

Permalink

सहमत आहे..

क्लिंटनशेठशी १००१% सहमत... सर्व मिपाकरांना मिपा वर्धापनदिनाच्या हर्दिक शुभेच्छा!! केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on गुरुवार, 09/01/2011 - 12:53

Permalink

हार्दिक शुभेच्छा

चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! जुग जुग जियो मिपा........
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on गुरुवार, 09/01/2011 - 13:10

Permalink

हार्दिक शुभेच्छा

समस्त मिपाकरांना मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा राऊत on गुरुवार, 09/01/2011 - 13:31

Permalink

हार्दिक शुभेच्छा

हॅप्पी बर्थ डे मिपा :) गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

Submitted by गंगाधर मुटे on गुरुवार, 09/01/2011 - 14:04

Permalink

समस्त मिपाकरांना मिपाच्या

समस्त मिपाकरांना मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on गुरुवार, 09/01/2011 - 14:06

Permalink

मिपाकरांना चौथ्या

मिपाकरांना चौथ्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .. मिपाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि माझ्यातर्फे जमेल तितके सहकार्य करण्याचे वचन :) :) ऑल द बेश्ट :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on गुरुवार, 09/01/2011 - 15:19

In reply to मिपाकरांना चौथ्या by सुहास झेले

Permalink

+१

अगदी शेम टु शेम हीच भावना ! - (भावना 'झेल'णारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 09/01/2011 - 14:17

Permalink

मिसळपाव ची अशीच भरभराट आणि

मिसळपाव ची अशीच भरभराट आणि प्रगती होत राहो हि ईश्वरचरणी प्रार्थना
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 09/01/2011 - 14:23

Permalink

शुभेच्छा.

मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नीलकांत सोबत मिपाच्या तांत्रिक गोष्टी सांभाळणार्‍या टीमचेही अभिनंदन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by dev on गुरुवार, 09/01/2011 - 15:25

Permalink

सर्व मिपाकरांना मिपा वर्धापनदिनाच्या हर्दिक शुभेच्छा!!

सर्व मिपाकरांना मिपा वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हर्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 09/01/2011 - 15:59

Permalink

शुभेच्छा!

क्लिंटन यांच्याशी सहमत! चार वर्षात अनेक मित्र-मैत्रिणी झाले, अनेक नवीन गोष्टी कळल्या-समजल्या ज्या मुद्दामून वाचायला गेलो नसतो. त्यामुळे या निमित्ताने अशा सर्वच लेखक-कवी-आणि खरडकांना देखील शुभेच्छा! आणि तुमच्या मुळे माझ्यासारख्याच्या माहितीत-ज्ञानात भर पडत राहोत ही विनंती!
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on गुरुवार, 09/01/2011 - 16:32

Permalink

शुभेच्छा

चौथ्या वर्धापनदिनानिमित्त सर्व मिपाकरांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 09/01/2011 - 16:43

Permalink

हार्दिक शुभेच्छा!

मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त मिपाला आणि समस्त मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन! मिपाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, ही गणरायाच्या चरणी प्रार्थना. :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 09/01/2011 - 16:50

Permalink

शुभेच्छा

उत्तरोत्तर प्रगतीच व्हावी अशी मनःपूर्वक इच्छा! ऑल द बेस्ट!
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 09/01/2011 - 17:53

Permalink

मिपाच्या चौथ्या

मिपाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त मिपाला आणि समस्त मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन! मिपाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, ही गणरायाच्या चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 09/01/2011 - 19:05

Permalink

मिपाला चौथ्या वाढदिवसाच्या

मिपाला चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! सर्व सदस्यांचं अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 09/01/2011 - 19:25

In reply to मिपाला चौथ्या वाढदिवसाच्या by रेवती

Permalink

+१

मिपाला चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! सर्व सदस्यांचं अभिनंदन! हेच म्हणतो. अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by कलंत्री on गुरुवार, 09/01/2011 - 19:09

Permalink

एक चांगला अनूभव.

मिपाशी सलंग्न राहणे हा एक चांगला अनूभव होता आणि आहे. पूर्वी दिवस उजाडयाचा तो मिपावर येण्यासाठीच. सध्या पूर्वीसारखे जमत नाही याची खंत वाटते. तात्याचे मिपासाठी असलेले योगदान हे मराठीच्या मार्गातील एक महत्त्वाचे असे स्थान आहे आणि मला त्याचे ॠण मानण्यातच आनंद असेल. नीलकांत हे या टप्प्यावरचे मिळालेले एअक महत्त्वाचे मित्र म्हणून संचित आहे. त्याचबरोबर अनेक मित्र मिळाले, बरेच प्रेम मिळाले हे कसे विसरता येईल? अश्या काळाच्या टप्प्यावर हे सर्व आठवता येते याच साठी ही वर्धापनदिने असतात हेच खरे!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 09/01/2011 - 19:19

In reply to एक चांगला अनूभव. by कलंत्री

Permalink

विनंती

मिपाशी सलंग्न राहणे हा एक चांगला अनूभव होता यातील "होता" हा शब्द खटकला. :( सध्या पूर्वीसारखे जमत नाही याची खंत वाटते. आशा करतो, सर्व व्यवस्थित चालू आहे. आपण सारखे नाही पण मधून मधून येऊन का होईना पण लेखन चालू ठेवावेत ही विनंती. अश्या काळाच्या टप्प्यावर हे सर्व आठवता येते याच साठी ही वर्धापनदिने असतात हेच खरे!!! सहमत! सिंहावलोकनासाठीच वर्धापनदिन साजरे करण्याची प्रथा पडली असावी.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 09/01/2011 - 19:17

Permalink

क्लिंटन यांच्याशी १००% सहमत.

क्लिंटन यांच्याशी १००% सहमत. गेली साडेतीन वर्षे मिपाच्या सान्निध्यात कशी सरली ते खरंच समजलं नाही. इतके प्रेम करणारे जिव्हाळ्याचे लोक मिपाने दिलेत की मी स्वतःला भाग्यवान समजतो. हे सगळे सुहृद मिळवून देणार्‍या मिसळपावला चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा! मिपाच्या सर्व सदस्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा आणि पुढील वाटचाल अशीच समृद्ध करणारी असूदे अशी श्रीगजाननाचरणी प्रार्थना! :) (आनंदित) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 09/01/2011 - 19:26

Permalink

मिसळपावला ४थ्या

मिसळपावला ४थ्या वर्धापनदिनाच्या आणी मिपाकरांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...! येणार्‍या पुढील वर्षात मिपाची अशीच प्रगती होत राहो हि गणरायाचरणी प्रार्थना. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 09/01/2011 - 19:45

In reply to मिसळपावला ४थ्या by किसन शिंदे

Permalink

मिसळपावला ४थ्या

मिसळपावला ४थ्या वर्धापनदिनाच्या आणी मिपाकरांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...! हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अतुल पाटील on गुरुवार, 09/01/2011 - 19:32

Permalink

चतुर्थ वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

चतुर्थ वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अंतु बर्वा on गुरुवार, 09/01/2011 - 19:52

Permalink

मिपाचं व्यसन लागलं आहे आता...

मिपाचं व्यसन लागलं आहे आता... आणी हे व्यसन असच चालू राहो.... चौथ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा... मिपाच्या यशाचा आलेख असाच उत्तरोत्तर वाढत राहो... गणपती बाप्पा मोरया..!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 09/01/2011 - 19:54

Permalink

शुभेच्छा

मिपाला चौथ्या वर्धापनादिनाच्या अनेकानेक शुभेच्छा. मिपानेच अनेक मिपाकर मैत्र म्हणून दिलेत त्याबद्दल मिपा, मिपाकर आणि मिपाव्यवस्थापनाचे अनेक आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on गुरुवार, 09/01/2011 - 20:11

Permalink

हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार, आज गणरायाचे मंगल आगमन झाले. श्री गणेश आपल्या आगमनासोबतच सुख, समृद्धी, समाधान, मांगल्य, आणि पावित्र्य घेऊन येवो ही सदिच्छा! सगळ्यांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! आणि चौथ्या वर्धापनदिनानिमित्त समस्त मिपापरिवाराला हार्दिक शुभेच्छा!! मिपा म्हणजे माझा एक सच्चा मित्र आहे; मिपा म्हणजे माझ्यापासून काही क्षण विलग होत मलाच सार्थपणे व्यक्त करणारं माझंच एक निराळं, अनोखं, अस्तित्व आहे; मिपा माझा तो हक्काचा कट्टा आहे जो कॉलेजनंतर हळू-हळू आयुष्यातून संपत जातो आणि लग्नानंतर ज्याचा मागमूसही आयुष्यात राहत नाही. मिपा म्हणजे चार क्षणांची मनाची खरी विश्रांती आहे; मिपा म्हणजे आजच्या गतिमान जीवनातली कधीकाळी वाट्याला येणारी घनदाट जंगलातली मनसोक्त भटकंती आहे. सगळे मिपाकर या मनसोक्त भटकंतीतले सवंगडी आहेत, हात धरून फेर धरायला लावणारे, दिलखुलास दाद देणारे मित्र आहेत. सगळ्या मिपाकरांना मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त अनेकोत्तम शुभेच्छा. मिपा असे शेकडो वर्धापनदिन साजरे साजरे करेल यात शंकाच नाही. गणरायाने मिपावर आपली कृपादृष्टी सतत असू द्यावी ही त्यास नम्र प्रार्थना! समीर
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 09/01/2011 - 20:26

Permalink

मिपा ला खूप खूप शुभेच्छा.

मिपा ला खूप खूप शुभेच्छा. विविध प्रकृतीच्या, आवडी-निवडीच्या सदस्यांना सामावून घेऊन, मिपा असेच फुलत, बहरत रहावो ही त्या सुमुखाच्या, विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 09/01/2011 - 20:37

Permalink

मिपाला आणि सगळ्यांनाच

मिपाला आणि सगळ्यांनाच शुभेच्छा. हा केक आपण जगात भारी आहोत म्हणुन Image removed. हा श्री,.निलकांत साठी Image removed. हा केक, असो त्या नाहित आता इथं, आर या म्हणलं तरी येणार नाही. Image removed. आणि हा शेवटचा मिपा हे हक्काचं कुरण आहे दंगा करायचं म्हणुन. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 09/01/2011 - 20:58

Permalink

ह्यानिमीत्ताने

प्रकाश घाटपांडे व कलंत्री हेही इथे पुन्हा दिसले, ह्याचाही आनंद आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com