मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज) : ग्रीन डिलाइट (Green Delight)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
29 Aug 2011 - 11:18 am

'मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज)' मालिकेतील आजचे पहिले मॉकटेल आहे ग्रीन डिलाइट

पार्श्वभूमी:

खास लोकाग्रहास्तव ही मालिका चालु करतो आहे. खुप जणांनी व्यनीतुन, खरडीतुन मॉकटेल्स टाकण्याविषयी सुचवले.
मला अशीही माझ्या कॉकटेल्स बरोबर माझ्या मुलांसाठी काहीतरी रंगीत मॉकटेल्स करावीच लागतात (लाच म्हणुन, पण आता अण्णांच्या उपोषणामुळॆ.....)

तर काल रविवार, मुलांसाठी एक मस्त मॉकटेल बनवले. खुप दिवसांनी बनवल्यामुळे मुले खुष तर धाग्याला विषय मिळाल्यामुळे मी खुष, 'एक तीर मे दो शिकार'. (तसा मी फार हुषार आहे बर का, लहानपणापासुनच,  दिसण्यावर जाउ नका ;))

तर हे मॉकटेल ही पुर्णपणे माझी रेसिपी आहे, नावासहीत. आता असे मॉकटेल असुन कोणी ते ट्राय केले असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

साहित्य:

मिंट (पुदीना) सिरप - 1 औस (30 मिली)
लेमन आणि/किंवा आले कॉर्डिअल - 10 मिली
ताज्या मोसंबीचा रस - 10 मिली
ताज्या मोसंबीची एक चकती सजावटीसाठी
सोडा
बर्फ

ग्लास - मॉकटेल ग्लास

कृती:

शेकर मधे 3/4 बर्फ भरून घ्या. त्यात मिन्ट सिरप ओतुन घ्या. आता एकास चार ह्या प्रमाणात पाणी टाकुन घ्या. (30मिली * 4)
आता बाकीचे सर्व साहित्य शेकर मधे ओतुन घ्या. हे सर्व मिश्र ण शेकरमधे 4-5 मिनिटे मस्त शेक करुन घ्या. मॉकटेल तयार होण्याची खुण म्हणजे शेकरवर बाहेरुन जमा झालेले बाष्प. आता मॉकटेल ग्लासमधे मिश्रण गाळुन घ्या. सोडा टाकुन ग्लास टॉप अप करा. (सोडा ह्या मॉकटेलसाठी मस्ट आहे बरं का, तो वगळल्यास चव बदलु शकते मग ती माझी जबाबदारी नाही)

चला तर मग  ग्रीन डिलाइट तयार आहे. :)

अश्या प्रकारेही सजावट करू शकता :)

नोट:
'चला आता अमुक/तमुक शोधणे आले' अश्या प्रतिसादकर्त्यांसाठी: ;)
हे सर्व साहित्य पुण्यात हक्काने मिळण्याचे ठिकाण दोराबजी, कॅम्प. आता सर्वच मॉल्स्मधे सर्व सिरप अगदी आरामात मिळतात.

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

29 Aug 2011 - 11:30 am | प्रीत-मोहर

मस्त!!! आता सामान चेन्नैत शोधणे आले ;)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Aug 2011 - 2:52 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त!!! आता सामान चेन्नैत शोधणे आले

अत्यंत वाह्यात व अश्लिल प्रतिसाद.

असो..

खत्तरनाक दिसतेय हो ते मॉकटेल. पण मॉकटेलपेक्षा आमचा कॉकटटेलवर जास्ती जिव.

लवकरच पेश्शल स्क्रू ड्रायव्हर काकटेल यु द्या ;)

सोत्रि's picture

29 Aug 2011 - 6:54 pm | सोत्रि

विनंतीची नोंद घेतल्या गेली आहे.

- (साकिया) सोकाजी

सुहास झेले's picture

29 Aug 2011 - 11:51 am | सुहास झेले

जबरदस्त... मिंट सिरप मागवले आहे :) :)

चेतन सुभाष गुगळे's picture

29 Aug 2011 - 12:20 pm | चेतन सुभाष गुगळे

<< जबरदस्त... मिंट सिरप मागवले आहे >>

असं काही मागवू नका. हे प्याल तर अडचणीत याल.

सुहास झेले's picture

29 Aug 2011 - 12:35 pm | सुहास झेले

म्या मिंट असेच लिहिलेले आहे... जर मिट सिरप मिळत असल्यास तेही ट्राय करायला हरकत नाय ;-)

बोल्ड केल्यावर शब्द स्पष्ट दिसतोय

सोत्रि's picture

29 Aug 2011 - 12:42 pm | सोत्रि

मला जर गुगळ्यांचा रोख नीट समजला असेल तर त्यांना वेगळेच काहीतरी सांगायचे आहे.
त्यांची 'मीट' किंवा 'मिंट' मधे गल्लत नाही झालेली, माझ्या मते ते मिंटच्या 'तथाकथित परिणामा'बद्दल बोलत असावेत.

गुगळॆ बरोबर का ?

- (अंदाज बांधणारा) सोकाजी

सुहास झेले's picture

29 Aug 2011 - 1:01 pm | सुहास झेले

(उत्तराच्या प्रतिक्षेत) सुझे ;-)

चेतन सुभाष गुगळे's picture

29 Aug 2011 - 1:04 pm | चेतन सुभाष गुगळे

माझे मत जबरदस्त या शब्दाबद्दल होते.

सुहास झेले's picture

29 Aug 2011 - 1:07 pm | सुहास झेले

जबरदस्तीने मिंट सिरप मागवले आहे... हे बरोबर हाय काय? :D

चेतन सुभाष गुगळे's picture

29 Aug 2011 - 1:10 pm | चेतन सुभाष गुगळे

तर ते पेय पिल्यावर नेमकी जी क्रिया होईल त्यामुळे पिणारा अडचणीत येऊ शकेल.

जबर - जोरदार / तीव्र
दस्त - शौच

सुहास झेले's picture

29 Aug 2011 - 1:16 pm | सुहास झेले

कैच्याकै !!

गरज असेल तर ओआरएस ठेवत जा... मला ग्रीन डिलाइट पुरेसे आहे ;-)

ठेवतही असतील ओआरएस, ते गुगळे ना !!

सोत्रि's picture

29 Aug 2011 - 6:57 pm | सोत्रि

गुग़ळे भ्रमनिरास केलात आपण.
:(

- (अपेक्षभंगाचे दुख: पदरी पडलेला) सोकाजी

सोत्रि's picture

29 Aug 2011 - 12:37 pm | सोत्रि

;)

- (अडचणीत येण्याच्या 'पार' पोहोचलेला) सोकाजी

नगरीनिरंजन's picture

29 Aug 2011 - 12:04 pm | नगरीनिरंजन

जहबहर्‍या दिसतंय!

लवकरच करून पिण्यात येईल.

ढ's picture

29 Aug 2011 - 12:17 pm |

मॉकटेल मस्तच दिसतंय.

और भी आने दो....

सहज's picture

29 Aug 2011 - 12:32 pm | सहज

पुणे तिथे काय उणे म्हणण्याचा मोह होतोय!!

माझीही शॅम्पेन's picture

29 Aug 2011 - 12:33 pm | माझीही शॅम्पेन

असे रंगेबिरंगी मोक्तेल पाहून बर्बेक़ु-नेशन ला सध्याच्या काळात भयंकर मिस करतोय. :)

सोकाजी राव - प्रत्येक धाग्यावर छान सोलिड म्हणून आता कंटाळा आला , तुमच्या साठी आता एक वेगळा कप्पा ठेव्नाची वेळ आली आहे. (जसा क्रिकेट - फुटबॉल इत्यादी साठी होता)

गवि's picture

29 Aug 2011 - 1:03 pm | गवि

मॉकटेल....

यात काय मजा ? सरबतच शेवटी कितीही नजाकतीने केले तरी.. कॉकटेल नव्हेच ते.

C2H5OH वगळणे म्हणजे संघातून सचिन वगळणे.

असो.

गणपा's picture

29 Aug 2011 - 1:27 pm | गणपा

चला आता एक शेकर शोधणे आले.
बाकी सगळ साहित्य आहे.
:)

गणपाशेठ,
ह्यावेळी पराला बोलवायला का विसरलास ? :D

- (विसरभोळेपणा न आवडणारा) सोकाजी

वा... एकदम मस्त... आता हे करुन बघायलाच पाहिजे. :)

धमाल मुलगा's picture

29 Aug 2011 - 2:27 pm | धमाल मुलगा

जल्लां तो गल्लास बघुनच मन हिरवं झालं! :D

एक शंका: कॉक/मॉकटेल्ससाठी वापरण्याचा बर्फ घरच्या फ्रीजमधला चालतो का? हा प्रश्न पडण्याचं कारण की, घरी जेव्हा ऑन द रॉक्स घेतो, तेव्हा पाच मिनिटातच सगळा बर्फ विरघळून गेलेला असतो. आणि कॉकटेल्स/मॉकटेल्समध्ये शेकरमधला बर्फ पुरता पाणी होऊन त्यात मिसळण्यासाठी नसून कंटेट्स थंड आणि 'वॉश'(व्होडका/ड्राय जीन/व्हेस्पर मार्टिनीमध्ये लिक्युअर वॉश केलं जातं तसं) करण्यासाठी असावा असा माझा समज आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Aug 2011 - 2:54 pm | परिकथेतील राजकुमार

हा प्रश्न पडण्याचं कारण की, घरी जेव्हा ऑन द रॉक्स घेतो, तेव्हा पाच मिनिटातच सगळा बर्फ विरघळून गेलेला असतो.

रुम टेंपरेचर पंत.
तुमच्या सारख्या झंटलमनला....

असो...

वाईन टेंपरेचरकर्ते

धमाल मुलगा's picture

29 Aug 2011 - 3:57 pm | धमाल मुलगा

एकुणच बायको भडकल्यामुळं होम टेंपरेचरचा तो इफेक्ट असावा काय अशी शंका होतीच मनात. पण म्हणलं, जरा अनुभवी लोकांकडून खात्री करुन घ्यावी. ;)

>>> पण म्हणलं, जरा अनुभवी लोकांकडून खात्री करुन घ्यावी.
--- 'खडा टाकून पाहणे' हा वाक्प्रचार आठवला :)

धमाल मुलगा's picture

29 Aug 2011 - 4:28 pm | धमाल मुलगा

साक्षात आपण?

प्रदिर्घ विश्रांतीनंतर श्री.कोटीकेसरी ह्यांची एक नितांत सुंदर कोटी!

नंदनसायबा, जियो
ह्यानिमित्त सांगावसं वाटतं, येत्या भारतभेटीत आपण समर्थमध्ये जेवायला जाऊ. ;)

चतुरंग's picture

29 Aug 2011 - 4:43 pm | चतुरंग

बर्फ विरघळत नाही रे वितळतो, साखर/मीठ इ. विरघळते! (पण असो ऑन द रॉक्स नंतर असं होणारच ;)

धमाल मुलगा's picture

29 Aug 2011 - 5:41 pm | धमाल मुलगा

हां हां! मल्लाऽऽ...तेच्च म्ह्नाय्च होतं ना लाऽव! जाउंद्या..आपली च्च्...चल्चा पुढे चालवूया...

आयला! हा माँटू कुठं गेला? पेग कोन भर्नार आता?

-(ऑन द रॉक्स) ध.

नरेश_'s picture

29 Aug 2011 - 2:50 pm | नरेश_

मॉकटेल आहे हो सोत्रिभाऊ.
एक भाबडी शंका : ही पाकृ तुम्ही कॉकटेलचं विडंबन म्हणून तर टाकलीत नाही?
'चला आता अमुक/तमुक शोधणे आले' अश्या प्रतिसादकर्त्यांसाठी:
हे सर्व साहित्य पुण्यात हक्काने मिळण्याचे ठिकाण दोराबजी, कॅम्प. आता सर्वच मॉल्स्मधे सर्व सिरप अगदी आरामात मिळतात.

घ्या - याला म्हणतात अवसानघात.
घालवलेत ना हक्काचे चारपाच प्रतिसाद? ;)

धमाल मुलगा's picture

29 Aug 2011 - 4:01 pm | धमाल मुलगा

इश्श्य...

-धुचि.

विजुभाऊ's picture

29 Aug 2011 - 2:51 pm | विजुभाऊ

जल्लां तो गल्लास बघुनच मन हिरवं झालं! Laughing out loud
काणेकरांचे "पांढरे केस हिरवी मने" आठवले

आणी तूम्ही बनवली आहे म्हंजे चवीची चिंताच नको..... बघूनच मन हीरवं झालं ;)

नंदन's picture

29 Aug 2011 - 3:24 pm | नंदन

हीच पाककृती अल्कोहोल घालून कशी करता येईल? ;)

सहज's picture

29 Aug 2011 - 3:28 pm | सहज

थोडी मालीबू रम, थोडी लेमन लिक्युअर घालून!!

परिकथेतील राजकुमार's picture

29 Aug 2011 - 3:31 pm | परिकथेतील राजकुमार

हीच पाककृती अल्कोहोल घालून कशी करता येईल?

मग तिला पापकृती असे म्हणावे काय ?

नंदन,
ह्याचे समांतर कोकटेल म्हणजे मोहितो

ह्या मॉकटेल मधे 2 औस (60 मिली) व्हाइट रम टाकायची आणि मिंट सिरपचे प्रमाण 10 मिली करायचे.
पण ते खरे मोहितो होणार नाही :(

- (साकिया) सोकाजी

अनुरोध's picture

29 Aug 2011 - 3:35 pm | अनुरोध

(साक्षात दंडवत घालुन....)

सोत्रि महराज हे २ रहस्य उलगडा राव.....

१.घरी जेव्हा ऑन द रॉक्स घेतो, तेव्हा पाच मिनिटातच सगळा बर्फ विरघळून गेलेला असतो.

२. 'वॉश'(व्होडका/ड्राय जीन/व्हेस्पर मार्टिनीमध्ये लिक्युअर वॉश केलं जातं..

सोत्रि's picture

29 Aug 2011 - 7:40 pm | सोत्रि

1. घरच्या फ्रीझचा कॉप्रेसर आणि बारच्या प्रोफेशनल फ्रीझचा कॉप्रेसर ह्यांत फरक असतो, शक्तीचा. त्यामुळे बारमधला बर्फ हा
फर्म आणि लॉन्ग लस्टिंग असतो, घरचा नसतो.

2. पण जेव्हा कॉकटेलसाठी शेकर मधे बर्फ वापरला जातो तो फक्त कंटेंट थंड आणि थंड करण्यासाठीच. त्याचे पाणी होउन ते
कॉकटेल मधे मिक्स झाल्यास कॉकटेलचा मझा आणि नशा ह्यावर "पाणी" फिरलेच म्हणुन समजा :) त्यामुळे घरचा बर्फ
कॉकटेलसाठी योग्य असतो.

लिक्युअर वॉश केलं जातं...

हा प्रकार डोक्यावरून गेला! काही म्हणुन कळलं नाही.

- (पदर उलगडणारा) सोकाजी

गणपा's picture

29 Aug 2011 - 7:44 pm | गणपा

पण जेव्हा कॉकटेलसाठी शेकर मधे बर्फ वापरला जातो तो फक्त कंटेंट थंड आणि थंड करण्यासाठीच.

म्हणजे नंतर बर्फ काढुन टाकायचा?
मग त्या पेक्षा तो शेकर १०-१५ मिनिटं फ्रिजर मध्येच ठेवला तर?

सोत्रि's picture

29 Aug 2011 - 8:14 pm | सोत्रि

शेकर मधला बर्फ जरी कंटेट थंड करण्यासाठी असला तरीही 'शेकर'चा उपयोग त्याच्या नावाप्रमाणेच 'शेक' करण्यासाठी असतो.

सर्व साहित्य एककीव होउन, सर्वांच्या चवी ब्लेन्ड होण्यासाठी कॉकटेल किंवा मॉकटेल त्या 'शेकर' मधे शेक होणे आवश्यक असते जे शेकर १०-१५ मिनिटं फ्रिजर मध्येच ठेउन साध्य होणार नाही.

प्रामाणिक शंकेचे निरसन झाले असावे अशी आशा करतो :)

- (शेकर) सोकाजी

अरे शेकर हलवण्याचं टाळा अस म्हणत नाही. द्रवा सोबत शेकर थंड करायचा आणि मग शेक करायचा.
नाही म्हटलं तरी वितळलेल्या बर्फाच पाणी मिक्स होत असेलच ना?
(एकवेळ मॉलटेलमध्ये हे चालेल पण कॉकटेल मध्ये पाण्याची भेसळ....ये बात हजम नही होती.) ;)

असो. खवत उत्तर दिलेस तरी चालेल. उगा माझ्या बिंडोक प्रश्नांनी तुझा धागा उसवायला नको. :)

अनुरोध's picture

30 Aug 2011 - 12:02 am | अनुरोध

" नाही म्हटलं तरी वितळलेल्या बर्फाच पाणी मिक्स होत असेलच ना? "

येकदम करेक्ट.... मला देखिल हे बर्फाच पाणि न मिसळ्न्याच गणित नाहि कळ्त ब्बॉ....

सोत्रि's picture

30 Aug 2011 - 12:28 am | सोत्रि

कॉकटेल हलवण्याचे 2 प्रकार असतात

1. स्टर्ड (Stirred) :
जेव्हा कॉकटेल मधे फक्त स्पिरीट्स असतात तेव्हा ते स्टर केले जाते. त्याची एक पद्धत आहे, ऍक्चुली कला आहे ती.
ह्यात बर्फ ब्रेक न करता स्टर केल्यामुळे पाणी स्पिरीट्मधे मिक्स होत नाही आणि स्पिरिट bruise होत नाही

उदाहरणार्थ : मार्टीनी

2. शेकन (Shaken) :
जेव्हा कॉकटेल मधे स्पिरीट्स बरोबर फळांचे रस, सिरप्स, बिटर्स, क्रिम लिक्युर्स, अंड्याचा पांढरा भाग असे मिक्स करायचे असते तेव्हा शेक करावे लागते मिश्रण एकजीव होण्यासाठी त्यावेळी बर्फ ब्रेक होउन किंचीत पाणी मिक्स होते,पण अशी कॉकटेल्स स्पिरिट्च्या मुळ चवीशी बांधिल नसल्यामुळे तेवढे पाणी चालुन जाते.

उदाहरणार्थ : अनारीटा

हुश्श.... :)

- (मिक्सोलॉजिस्ट) सोकाजी

आत्मशून्य's picture

4 Sep 2011 - 3:10 am | आत्मशून्य

आपलं उगाचच जेम्संबाँड त्येचं फेवरीट व्हॉडका मार्टीनी मागताना शेकन नॉट स्टर्ड असं जे म्हणतोच म्हणतो ते फक्त त्याचा स्टाइल मारायचाच एक प्रकार आहे असं समजत होतो. आपल्यामूळे याची पाळेमूळे कळाली ज्ञानात भर पडली. :)

अवांतर :- मात्र क्रेगच्या बाँडन मार्टीनी मागीतल्यावर वेटर शेकन ओर स्टर्ड असं नम्रपणे विचारल्यावर "कैसे भी दो क्या फर्क पडता है" असं खेकसत म्हटल्यावर एव्हडी जूनी स्टाइल (सॉरी ट्रॅडीशन) प्रथमच मोडली म्हणून हसलो मात्र होतो.

धमाल मुलगा's picture

29 Aug 2011 - 8:25 pm | धमाल मुलगा

बरेचसे लिक्युअर्स हे काहीसे ओशट असतात. आपापल्या आवडीनुसार तो ओशटपणा ठेवणे/घालवणे हे आहेच.
पण, उदाहरणार्थ मार्टिनीबद्दल बोलायचं झालं, तर स्टर्डपेक्षा शेकन मार्टिनी जास्त चांगली लागते असं बर्‍याचजणांचं मत आहे. शिवाय, लिक्युअर्सचा कडवटपणा स्टर्ड कॉकटेलपेक्षा शेकनमध्ये चांगला उतरतो.

ह्या सगळ्या भानगडीला लिक्युअर वॉशिंग असं म्हणतात असं ऑर्हिओ लाऊंजचा आमचा बंड्या सांगायचा.

-(मूव्हर) ध.

अनुरोध's picture

29 Aug 2011 - 11:57 pm | अनुरोध

नाही कळालं ब्बॉ....

प्रभो's picture

29 Aug 2011 - 7:03 pm | प्रभो

मस्त!!

फोटू मस्तच आलेत.
दुसर्‍या प्रकारची सजावट जास्त आवडली.

निमिष ध.'s picture

29 Aug 2011 - 7:52 pm | निमिष ध.

दिल गार्डन गार्डन हो गया !!

सोकाजी मस्तच की एकदम

नितिन थत्ते's picture

29 Aug 2011 - 10:31 pm | नितिन थत्ते

मस्त !!!!

शंका: मिंट सिरप ऐवजी पुदीनहरा चालेल का?

तुम्ही ट्राय करा आणि कळवा मला. पुदीनहरा मी अजुनपर्य़ंत चाखलेले नाही.

- (पु दीन हर । लेला) सोकाजी

सानिकास्वप्निल's picture

29 Aug 2011 - 10:33 pm | सानिकास्वप्निल

मस्तचं नक्की करुन बघण्यात येईल
फोटो तर छानचं :)

साती's picture

29 Aug 2011 - 11:19 pm | साती

मस्त थंडगार झालं मन!

पैसा's picture

29 Aug 2011 - 11:37 pm | पैसा

पण "हिरव्या" रंगापासूनच का सुरुवात केली आहे?

सोत्रि's picture

30 Aug 2011 - 12:02 am | सोत्रि

गणपाशेठ एकदा मला "काका" म्हणाला होता :angry:
म्हणुन मग ह्या पिकल्या पानाचा देठ अजुनही हिरवा आहे हे त्याला दाखवण्यासाठी हिरव्या रंगाचे मॉकटेल टाकले ;)

- (हिरवा) सोकाजी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2011 - 12:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मॉकटेल ... त्यापेक्षा आमची आजी द्यायची तो कडूनिंबाचा रस काय वाईट होता? ;-)

असो. ही पाकृही आवडली आहे.
पण एक प्रश्न आहे. तुम्ही अमेरिकेत असल्यासारखे औंसात का मापं देता? काही अमेरिकन गावंढळ लोकंतर एककं वापरतही नाहीत त्यापेक्षा बरं, पण आपल्याकडे साधारणतः लिटर, मिली. अशी इंटरनॅशनल स्टँडर्ड एककं वापरतात.

५० फक्त's picture

30 Aug 2011 - 1:14 am | ५० फक्त

धन्यवाद सोकाजि

स्मिता.'s picture

30 Aug 2011 - 1:37 am | स्मिता.

हे हिरवं हिरवं मॉकटेलही मस्तच!

जातीवंत भटका's picture

3 Sep 2011 - 11:49 pm | जातीवंत भटका

क ड क !

सोकाजि रावांचा लेख नेहमी प्रमाणे उत्तम झाला आहेच पण गणपा आणि धमाल मुलगा अनुरोध या च्या प्रतिसादा मुळे हा भाग अतिस्शय रान्जक आणि आभ्यासु झाला आहे