कॉकटेल लाउंज : बी52 (B52)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
22 Aug 2011 - 5:32 pm

मोहितो...व्हिस्की गाथा...लिक्युर गाथा... व्हाइट रशिअन... झणझणीत मरीआइ... अनारीटा...

'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे B52 (बी52)

पार्श्वभूमी:

कॉकटेल बनवण्याचे प्रकार अनेक असतात. त्यातला एक प्रकार म्हणजे “लेयर्ड” कॉकटेल्स.
वेगवेगळ्या लिकर्स आणि लिक्युर्स त्यांच्या घनतेप्रमाणॆ एकमेकांवर ओतुन त्यांचे थर बनवायचे, मग तयार होतं लेयर्ड कॉकटेल.

विमानं बनवणारी कंपनी, बोइंगने एक जेट बॉम्बर विमान अमेरिकन लष्करासाठी बनवले होते त्याचे नाव होते B-52.
ह्या विमानाने व्हिएतनाम युद्धात फार धुमाकुळ घातला होता.

हे कॉकटेल ह्या बी 52 बॉम्बरच्या रंगांच्या कॉम्बीनेशन चे असते म्हणुन त्याला बी 52 हे नाव पडले आहे.
म्हणजे ह्या कॉकटेलच्या नावाच्या उगमाची ही एक स्टोरी आहे, अनेक स्टोरीजपैकी जी मला आवडते कारण तिसरा शुटर खरोखरीच जेट विमानाप्रमाणे आकाशात घेउन जातो :)

कल्हुआ: ही क़ॉफी फ्लेवर असलेली मेक्सीकन लिक्युर आहे.
बेलीज आयरीश क्रीम: ही आयरीश व्हिस्की आणि क्रीम (साय) बेस्ड लिक्युर आहे.
कॉइंत्रु: ही एक ऑरेंज लिक्युर आहे, उच्च दर्जाची ट्रिपल सेक.

प्रकार: लेयर्ड शुटर (Layered Shooter)

साहित्य:

कल्हुआ – 20 मिली
आयरिश क्रीम – 20 मिली
कॉइंत्रु – 20 मिली (ओरिजिनल दुसरा पर्याय ग्रॅंड मार्निअर – ऑरेन्ज कोन्यॅक)
डार्क रम - 5 मिली (ऑप्शनल)

ग्लास: – शॉट

सर्वप्रथम कल्हुआ शॉट ग्लास मधे ओतुन घ्या. कल्हुआची घनता सर्वात जास्त असते. हा आपला पहिला थर.

आत एक चमचा उपडा करुन तो ग्लासच्या आतल्या कडेवर चिकटवुन त्यावरुन आयरीश क्रीम काळजीपुर्वक आणि हळुवारपणे कल्हुआवर सोडा. हा झाला दुसरा थर.

आता रहिले कॉइत्रु, ते वरच्या प्रक्रियेप्रमाणॆ काळजीपुर्वक आणि हळुवारपणे दुसर्याे थरावर सोडा. हा झाला शेवटचा थर.

लेयर्ड शुटर बी52 तयार आहे :)

फ्लेमिंग बी52 किंवा बी52 ऑन मिशन (Flaming B52 or B52 on Mission)

हे एक बी52 चे वेरिएशन आहे. ह्यात वरच्या शुटर वर 5 मिली डार्क रम ओतुन त्याला काडी लावा ;) शक्यतो बकार्डी151 घ्या, कारण तिचे हाय अल्कोहोल कंटेंट रूम टेम्परचरला पेट घेते
मी कॅप्टन मॉर्गन डार्क रम वापरली होती, ती चमच्यात घेउन गॅसवर गरम केली होती कारण रुम टेम्परचरला ती पेट घेत नाही.


अक्चुअली माझ्याकडचा शॉट ग्लास जरा मोठा (उंच) होता त्यामुळे फ्लेम जास्त नीट नाही आली :( पण फ्लेमसाठी बकार्डी 151 मस्ट हा धडा शिकलो आज :)

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

22 Aug 2011 - 5:37 pm | विजुभाऊ

झकास.

धमाल मुलगा's picture

22 Aug 2011 - 5:50 pm | धमाल मुलगा

"बी52 ऑन मिशन" चाखण्यास अतिउत्सुक. :)

अक्चुअली माझ्याकडचा शॉट ग्लास जरा मोठा (उंच) होता

एकातच काम भागल असेल नै. ;)

आता इथे कल्हुआ, कॉइंत्रु कुठे मिळते ते शोधणे आले.
ए पर्‍या येतोस काय? एकास दोन भले.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Aug 2011 - 6:31 pm | परिकथेतील राजकुमार

अर्रेच्या धावपळीत पाकीट पडले वाटते माझे ;)

@ सोत्रे :-

कातील आहे हो हे जे काय आहे ते.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Aug 2011 - 5:54 pm | बिपिन कार्यकर्ते

चाखणोत्सुक!

आत्मशून्य's picture

22 Aug 2011 - 6:02 pm | आत्मशून्य

.

प्रभो's picture

22 Aug 2011 - 7:00 pm | प्रभो

झ का स!!

तुमच्या सगळ्या कॉकटेल्स अगदी मनापासुन वाचते, पण त्या पंथी गेलो नसल्यामुळे कधी taste केले नाही. ;)
अवांतरः तुम्ही मॉकटेल्स कधी सुरु करताय??

सोत्रि's picture

22 Aug 2011 - 8:11 pm | सोत्रि

मृणालिनीतै,

धन्यवाद, मॉकटेलच्या बर्‍याच रिक्वेस्ट आल्या आहेत. पुढच्या कॉकटेलच्या आधि एक मॉकटेल नक्की.

- (मॉकटेलप्रेमी मुलांचा बाबा) सोकाजी

अर्धवट's picture

23 Aug 2011 - 2:26 pm | अर्धवट

अगदी असेच म्हणतो..

(आणि मॉकटेलची वाट पाहातो)

सविता००१'s picture

22 Aug 2011 - 9:49 pm | सविता००१

मॉकटेलच मंगता हय!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Aug 2011 - 10:41 pm | अत्रुप्त आत्मा

काय अभ्यास आहे हो तुमचा या सर्व विषयावर....खरच मद्याचार्य आहात....आमची बी थोडी सोय करा ना...:wink: मॉकटेल्स टाकून....:wink:

नि३सोलपुरकर's picture

23 Aug 2011 - 12:26 pm | नि३सोलपुरकर

सोकाजी राव.. एकदम कट टु कट... मस्त !

अवातर : बघा जमेल तर ए़कादा कट्टा होउन जाउ द्या.( श्रावण सपल्यानतर)...

(चाखण्यास उत्सुक)

विकाल's picture

23 Aug 2011 - 2:17 pm | विकाल

मद्याचार्य सो त्रि...............

वं द न...........

बसू एकदा.....!!!!!

सोकाजी एक शंका आहे
हे कॉकटेल पिताना सगळे मिक्स करून प्यायचे की मिक्स न होऊ देता प्रत्येक लेयर स्वतन्त्र प्यायचा?
:अज्ञानी बालक विजुभाऊ

सोत्रि's picture

23 Aug 2011 - 4:59 pm | सोत्रि

हे कॉकटेल दोन पद्धतीने प्यायले जाते.

1. स्टरर ने सर्व थर व्यवस्थित मिक्स करुन, घटकन गिळुन टाकायचे (शुटर असल्यामुळे)
2. मिक्स न करता तसेच घटकन गिळुन टाकायचे, असे केल्यास प्रत्येक थराचा 'अरोमा' तुम्ही वेगवेगळा फील करु शकता.

क्र. 2 माझी आवडती पद्धत आहे.

- (थरावर थर रिचवणारा) सोकाजी

माझीही शॅम्पेन's picture

23 Aug 2011 - 6:29 pm | माझीही शॅम्पेन

सोकजी राव , एक भाबडा प्रश्न ती कॉकटेल ला लावलेली आग फक्त शो साठी आहे कि ती पण रीच्वयाची ?

आगीतून फुफाट्यात गेलेली शाम्पेन :)

ऍक्चुअली आग शो साठी असते.

हे शुटर पिताना आधी तोंडाने ग्लास झाकुन ऑक्सीजनची कमतरता तयार करायची म्हणजे आग विझते आणि मग शुटर रिचवायचे. सोपे आहे, वाचताना जेवढे अवघड वाटते आहे तितके अवघड नाहीयेय.

अजुन एक पद्धत आहे हे शुटर (फ्लेमिंग बी 52) प्यायची :
आग लावलेल्या शुटर ग्लास मधे स्ट्रॉ टाकुन एका दमात सर्व थर ओढुन गट्ट्म करायचे :)

- ("आग ही आग" मधिल मिथुनप्रेमी) सोकाजी

धमाल मुलगा's picture

23 Aug 2011 - 6:55 pm | धमाल मुलगा

मला वाटलं व्हॅनिला आईस्क्रिमवर ब्रॅन्डी टाकून पेटवतात आणि ते पेटतं आईस्क्रिम चमच्यानं खातात तसं काहीतरी असेल. :)

सोत्रि's picture

24 Aug 2011 - 4:22 am | सोत्रि

च्यायला धम्या,

चमच्याने प्यायला हे शुटर काय द्राक्षासव आहे का रे ? :party:

- (चमचा फक्त खरवडण्यासाठी वापरणारा) सोकाजी

माझीही शॅम्पेन's picture

23 Aug 2011 - 6:56 pm | माझीही शॅम्पेन

हे शुटर पिताना आधी तोंडाने ग्लास झाकुन ऑक्सीजनची कमतरता तयार करायची म्हणजे आग विझते

बोंबला ! दारूचा ज्वलंत प्रश्न अश्या प्रकारे सोडवता येईल अस वाटला नव्हत !

एक video / फोटो पहिल्या shivay किवा स्वत: केल्या शिवाय विश्वास बसने कठीण आहे.

ठाणे / मुंबई इथे कुठे मिळेल का हे कॉकटेल ?

गणपा's picture

23 Aug 2011 - 7:18 pm | गणपा

ओ नवशिक्या हवश्या-गवश्यांनो
कै च्या कै भानगडीत पडु नका . :)

http://www.youtube.com/watch?v=5Tk-UpdeuFM

http://www.youtube.com/watch?v=fTNaN5xPQuQ

विजुभाऊ's picture

23 Aug 2011 - 7:28 pm | विजुभाऊ

बरे झाले रे गण्पा तु मार्गदर्शन केलेस

सोत्रि's picture

24 Aug 2011 - 2:06 am | सोत्रि

लै भारी गणपाभौ !!! :evil:

- ( आगीशी खेळणारा ) सोकाजी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Aug 2011 - 8:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या कॉकटेलात आमची लाडकी "साय", बेली'ज आल्यामुळे हे कॉकटेल आवडण्यात आल्या गेले आहे. धन्यवाद सोकाजी.

मयुरा गुप्ते's picture

24 Aug 2011 - 4:46 am | मयुरा गुप्ते

एकदम नजाकतदार दिसतंय!!

आणि हळुवारपणे...अलगद थर रचण्याची कलाही देखणी.

एक प्रश्न...रम ला पेटवल्यावर रमची चव ती काय लागणार.नाही का? अल्कॉहोल एका विशिष्ठ तापमानानंतर उडुन जाते नं?

( मला आपला फारच मुलभूत प्रश्न पडलेला आहे....)

--मयुरा.

पंगा's picture

24 Aug 2011 - 4:59 am | पंगा

एक प्रश्न...रम ला पेटवल्यावर रमची चव ती काय लागणार.नाही का? अल्कॉहोल एका विशिष्ठ तापमानानंतर उडुन जाते नं?

रमची (किंवा कुठल्याही मद्यार्कयुक्त पेयाची) स्वतःची अशी जी एक विशिष्ट चव असते, ती त्यातील मद्यार्कामुळे असते, की मद्यार्काव्यतिरिक्त इतर द्रव्यांमुळे असते?

(कुकिंग वाइनमधील मद्यार्कसुद्धा त्यात पदार्थ शिजवल्यावर उडून जात असावा.)

( मला आपला फारच मुलभूत प्रश्न पडलेला आहे....)

मला त्याहूनही मूलभूत प्रश्न पडलेला आहे.

सोत्रि's picture

24 Aug 2011 - 5:42 am | सोत्रि

कुठलीही दारु किंवा वाइन करण्यासाठी वापरलेल्या धान्यातल्या किंवा फळातल्या साखरेचे रुपांतर मद्यार्कात (अल्कोहोल) होते आणि मादकता प्राप्त होते.त्यामुळॆ जी चव असते ती पुर्णपणॆ मद्यार्कामुळे नसते, ती मद्यार्काव्यतिरिक्त इतर द्रव्यांमुळे असते.

कुकिंग वाइन आणि रम मधे गल्लत करु नका. वाइन फर्मैट केलेली असते आणि दारु डिस्तील केलेली असते.

कुकिंग वाइन पिण्यासाठी वापरत नाहीत. ही वाइन स्वत प्रकारची वाइन असते आणि त्यात मिठ टाकलेले असते, फर्मेंटेशन करणारे जिवाणु तयार होउ नयेत म्हणुन. त्यामुळॆ जेव्हा ह्या वाइनची बाटली उघडली जाते त्यावेळी हवेतल्या ऑक्सिजनशी तिचा संपर्क होउन फर्मेंटेशन होउन ऍसेटिक ऍसीड तयार होते जे व्हिनेगर सारखे काम करते आणि पाककृतीला एक आग़ळीच चव बहाल करते.

- (डिस्टील्ड) सोकाजी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2011 - 6:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओह्ह, हे कुकिंग वाईनचं 'रहस्य' माहित नव्हतं मला. पुन्हा एकदा धन्यवाद हो सोकाजीराव.

सोत्रि's picture

24 Aug 2011 - 11:00 am | सोत्रि

धन्यु, धन्यु! :)

- (रहस्यमय) सोकाजी

पंगा's picture

24 Aug 2011 - 4:07 pm | पंगा

कुठलीही दारु किंवा वाइन करण्यासाठी वापरलेल्या धान्यातल्या किंवा फळातल्या साखरेचे रुपांतर मद्यार्कात (अल्कोहोल) होते आणि मादकता प्राप्त होते.त्यामुळॆ जी चव असते ती पुर्णपणॆ मद्यार्कामुळे नसते, ती मद्यार्काव्यतिरिक्त इतर द्रव्यांमुळे असते.

अशीच काहीशी धारणा होती. पुष्टीबद्दल आभारी आहे.

कुकिंग वाइन आणि रम मधे गल्लत करु नका.

कोणतीही गल्लत केलेली नाही. (दोन्हींचा वापर यथायोग्य कारणांसाठी केलेला आहे. अर्थात, कुकिंग वाइनचा कुकिंगसाठी आणि रमचा पिण्यासाठी.)

फक्त, मद्यार्काअभावी स्वादात काहीही फरक पडू नये, एवढाच मुद्दा मांडण्यासाठी कुकिंग वाइनचे पर्यायी उदाहरण दिले होते.

(नॉन-अल्कोहोलिक बियरचेही उदाहरण देता आले असते. अनेक नॉन-अल्कोहोलिक बियरांमध्येसुद्धा तर प्रथम फर्मेंटेशनने नेहमीची बियर - मद्यार्काचा पूर्ण अंश असलेली - बनवून, नंतर त्यातून विविध प्रक्रियांद्वारा मद्यार्काचे प्रमाण नगण्य म्हणण्याइतके - अमेरिकन प्रमाणानुसार ०.५%पेक्षा कमी इतके - होईपर्यंत मद्यार्क काढून टाकण्यात येतो. परिणामी बनणारी मद्यार्करहित बियर ही चवीला बियरसारखीच तर लागते.)

वाइन फर्मैट केलेली असते आणि दारु डिस्तील केलेली असते.

कल्पना आहे.

- (रक्तवारुणीभोक्ता) पंडित गागाभट्ट.

कुकिंग वाइन पिण्यासाठी वापरत नाहीत. ही वाइन स्वत प्रकारची वाइन असते आणि त्यात मिठ टाकलेले असते

कल्पना आहे, वापरलेली आहे. पिण्यासाठी 'वापरत नाहीत' म्हणण्यापेक्षा पिण्यासाठी 'वापरता येणे अशक्य आहे' म्हणणे अधिक सयुक्तिक ठरावे. वाइनमध्ये 'बचकभर' म्हणता यावे इतके मीठ टाकल्यावर निर्माण होणारा हा प्रकार फक्त स्वयंपाकासाठीच वापरण्यास पात्र असतो, असे म्हटल्यास बहुधा अतिशयोक्ती ठरू नये.

फर्मेंटेशन करणारे जिवाणु तयार होउ नयेत म्हणुन. त्यामुळॆ जेव्हा ह्या वाइनची बाटली उघडली जाते त्यावेळी हवेतल्या ऑक्सिजनशी तिचा संपर्क होउन फर्मेंटेशन होउन ऍसेटिक ऍसीड तयार होते जे व्हिनेगर सारखे काम करते आणि पाककृतीला एक आग़ळीच चव बहाल करते.

माहितीच्या सविस्तर मांडणीबद्दल धन्यवाद.

शुटर मधे ती रम चवीसाठी नसतेच मुळी, फक्त पेटण्यापुरतीच असते :)
म्हणुन तर तिची क़्वांटिटी फक्त 5 मिली आहे.

- (कुठल्याही तापमानाला उडुन न जाणारा) सोकाजी

मयुरा गुप्ते's picture

24 Aug 2011 - 5:14 am | मयुरा गुप्ते

मी आतापर्यंत खाल्लेल्या पदार्थांमध्ये जेव्हां कुकिंग व्हाइन घातलेला पदार्थ खाल्ला आहे, तेव्हां चवीमध्ये खूप काही फरक जाणवला नाही.

कुकींग वाइन किंवा रम मुळे कडवट पदार्थात कडवट्पणा विशेष लागत नाही.

म्हणुनच मला हा प्रश्न पडला.

असो.

--मयुरा.

Nile's picture

24 Aug 2011 - 6:13 am | Nile

कॉकटेल दिसतंय भारी!

बाकी कलुआ भारतात मिळते का हो? (सोकाजीपंत भारतात राहतात का? असा प्रश्न नाहीए हा. उगीच नाक वरुन करून "चौकशा कशाला" असे इतरांनी विचारु नये.)

बाकी थोडा छिद्रान्वेषीपणा करतो, ते चित्र लावलंय ते बी ५२ बॉम्बरचं वाटत नाहीए.

सोत्रि's picture

24 Aug 2011 - 10:56 am | सोत्रि

नायल्या, भारतातच रहातो हो मी :lol:

कलुआ पुण्यात

1. दोराबजी वाइन्स (कॅम्प)
2. घुले वाइन्स (कॅम्प, बाबाजान चौकाजवळ)
3. मुकेश वाइन्स (बंड गार्डन)

ह्या ठिकाणी नक्की मिळते. अजुनही बर्‍याच ठिकाणी मिळत असेल.

बी ५२ बॉम्बरचं चित्र गुगलुच्या चित्र विभागात शोधले (सर्च टर्म : b52 fighter planes) आणि हे चित्र त्या लिस्ट मधे होते.
ह्या उप्पर खरे खोटे अंकल सॅमच जाणे ;)

- (चांभारचौकश्या आणि बोटे घालण्यात पटाइत असलेला ) सोकाजी

Nile's picture

24 Aug 2011 - 12:19 pm | Nile

ह्या ठिकाणी नक्की मिळते

थांकू! :-)

बी ५२ ही बोईंग कंपनीची मोठी विमाने असतात. आठ टर्बोजेट इंजिनवाले थोराड विमान असते. बॉम्बिंगसाठी वापरले जाणारे.

फोटोत दाखवलेले विमान ते नव्हे.

हे पहा: