मंत्री तुपाशी
बळीराजा उपाशी
घोडे कागदी -
पाऊस धारा
वर्दळ सैरावैरा
छत्र्या उत्साही !
घास हातात
बाळ परदेशात
पाणी डोळ्यात ..
रात्र काळोखी
अंधार अनोळखी
दिवे चोरांचे !
अबोल पती
भांडकुदळ पत्नी
हैराण भांडी ..
प्रतिक्रिया
2 Aug 2011 - 7:30 pm | गणेशा
छान
2 Aug 2011 - 7:44 pm | गणपा
घरो घरी स्टिलची भांडी... ;)
2 Aug 2011 - 8:41 pm | शुचि
>> पाऊस धारा
वर्दळ सैरावैरा
छत्र्या उत्साही ! >>
आवडले
2 Aug 2011 - 8:50 pm | नगरीनिरंजन
हायकू आवडले, पण वेगवेगळ्या मूडचे सगळे एकत्र टाकायला नको होते असे वाटले.
3 Aug 2011 - 1:47 pm | पाषाणभेद
छान लिखाण
3 Aug 2011 - 2:45 pm | परिकथेतील राजकुमार
हे छोटे छोटे हायकू वाचायला मज्जा आली.
*शक्य झाल्यास एखादा धागा काढून 'हायकू' म्हणजे नक्की काय आणि त्याविषयी अजुन काही सोप्या शब्दात माहिती देता येईल काय ? गुगलल्यास माहिती नक्की मिळेल, पण मिपावरच्या मराठीत ती ज्या प्रकारे समजेल ते जास्ती आवडेल.
3 Aug 2011 - 2:48 pm | शानबा५१२
बुड वर्गात,
लक्ष बाहेर,
गालावर चमाट.
3 Aug 2011 - 2:55 pm | जागु
छान.