मोहितो... । व्हिस्की गाथा... । लिक्युर गाथा...
कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे व्हाइट रशिअन
पार्श्वभूमी:
नावाने जरी रशिअन असले तरीही हे कॉकटेल रशियातुन आलेले नाहीयेय. वोड्का हा ह्या कॉकटेलचा बेस असल्यामुळॆ 'रशिअन' असे नाव आहे. हे कॉकटेल कॉफी लिक्युर पासुन बनवलेले असल्यामुळे ‘आफ्टर डीनर’ कॉकटेल आहे. थोडक्यात भरपेट जेवण झाल्यावर घ्यायचा हा उतारा आहे ;)
कल्हुआ: ही क़ॉफी फ्लेवर असलेली मेक्सीकन लिक्युर आहे.
बेलीज आयरीश क्रीम: ही आयरीश व्हिस्की आणि क्रीम (साय) बेस्ड लिक्युर आहे.
ह्या दोन्ही लिक्युर ‘ऑन दि रॉक्स’ सुद्धा घेउ शकता. फारच भारी चाव असते.
प्रकार: वोडका बेस्ड, क्लासिक कॉकटेल
साहित्य:
वोडका - 1 औस
कल्हुआ - 1 औस
बेलीज आयरीश क्रीम - 0.5 औस
बर्फ
क़ॉफी बीन्स - 2-3 (सजावटी करीता)
ग्लास - ओल्ड फॅशन
कृती:
ग्लासमधे ¾ भरेल असे बर्फाचे खडे घ्या. त्यावर अनुक्रमे वोडका आणि कल्हुआ ओतुन घ्या. कॉकटेल स्पूनने व्यवस्थित स्टर करून घ्या. आता कॉकटेल स्पूनच्या एका टोकावरून बेलीज आयरीश क्रीम ओघळून ग्लासात आतल्या बाजूला अगदी चिकटून सोडा. बेलीज आयरीश क्रीमचे ढग वोडका आणि कल्हुआ च्या मिश्रणावर जमा व्हायला हवेत. (आयरीश क्रीम कल्हुआ पेक्षा हलके असल्यामुळॆ वर तरंगते). आता कॉफी बीन्स सजावटी साठी टाका. व्हाइट रशिअन तयार :)
टीप:
ह्या कॉकटेल मधे बेलीज आयरीश क्रीम वगळले तर त्या कॉकटेलला ब्लॅक रशिअन कॉकटेल म्हणतात. तेही एक क्लासिक ह्या प्रकारात मोडणारे कॉकटेल आहे. पण मला बेलीज आयरीश क्रीम भयंकर आवडते त्यामुळे व्हाइट रशिअन माझे आवडते कॉकटेल आहे.
प्रतिक्रिया
27 Jul 2011 - 5:19 am | सहज
करुन प्यायल्या जाईल!
धन्यु.
27 Jul 2011 - 2:08 pm | गणपा
बनवुन प्यायला बोलावल्यास अधीक आनंद झाला असे डिक्लेर केल्या जाईल. ;)
27 Jul 2011 - 2:27 pm | सहज
डिक्लेर करायची संधी दिल्या गेली आहे.
27 Jul 2011 - 10:54 am | शाहिर
मादक !
कल्हुआ
बेलीज आयरीश क्रीम : पुण्या मधे कुठे मिळेल ?
27 Jul 2011 - 11:14 am | सोत्रि
दोरबजी : कॅम्प
मुकेश वाइन्स : बंड गार्ड्न
- (वाटाड्या) सोकाजी
28 Jul 2011 - 6:38 pm | विवेक मोडक
पण च्यायला हे औंस काही डोक्यात जात नाही.
त्याला चहाचा चमचा असं आमच्या मेंदुला झेपेल असं काही माप आहे का??
28 Jul 2011 - 10:21 pm | सोत्रि
http://www.misalpav.com/node/18412#comment-320735