मित्रांनो,
नाडीग्रंथांवर अनेकांनी बरेच लिखाण दोन्ही बाजूनी केले आहे. या धाग्याने नाडीग्रंथांचे प्रात्याक्षिकाचा अनुभव घेणाऱ्यांसाठी माहिती....
....आज दि, १ जुलै ला इतिहास संशोधन मंडळाच्या पोतदार सभागृहात सायंकाळी ६ वाजता भाषण आहे. त्यात हैयोहैयैयो नाडी ग्रंथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. इच्छुकांनी नोंद घ्यावी.
मिपाच्या धोरणांत अशी माहिती देणे बसणारे नसेल तर धागा काढून टाकावा.
प्रतिक्रिया
1 Jul 2011 - 1:03 pm | चिरोटा
चित्रफित बनवून यु ट्युबवर टाकता येईल का?
धन्यवाद
1 Jul 2011 - 1:08 pm | बिपिन कार्यकर्ते
आता तरी श्री. हैयो हे कोण याची माहिती मिळेल का? :)
1 Jul 2011 - 1:10 pm | सहज
....आज दि, १ जुलै ला बिनडोकपणाचा कळस ! असा उत्तम लेख श्री प्रभाकर नानावटी यांनी उपक्रम डोट ऑर्ग संस्थळावर लिहला आहे, त्याचा वाचकांनी जरुर लुत्फ लुटावा.इच्छुकांनी नोंद घ्यावी.
मिपाच्या धोरणांत अशी माहिती देणे बसणारे नसेल तर प्रतिसाद काढून टाकावा.
1 Jul 2011 - 3:03 pm | आनंद
पोतदार सभागृह नेमक कुठे आहे ?
1 Jul 2011 - 10:27 pm | शशिकांत ओक
मित्रांनो,
इतिहास संशोधन मंडळाच्या स्व. म. म. द.वा.पोतदार सभागृहातील नाडी ग्रंथांवरील सभा संपन्न झाली. त्यात ओकांनी नाडी ग्रंथांची नॉस्ट्रॅडेमसच्या कथनांशी तुलनी करून केली व महर्षींचे कथन किती सरस व अदभूत आहे याचे दाखले दिले. त्यांच्या भाषणाशिवाय हैयोहैयैयोंनी नाडी ग्रंथातील कूट लिपीवर प्रकाश टाकला. काही व्यक्तींच्या नाडी ग्रंथ ताडपट्यातील मजकुरातून व्यक्तीचे व त्याच्या आई, वडील व पत्नीचे नाव कसे कोरून लिहिलेले असते याचे प्रात्यक्षिक एल सी डी प्रोजेक्टरवर दाखवले. त्याशिवाय ७५ सेंमी किंवा ३० इंचाच्या एका लांब लचक नाडी ताडपट्टीची झलक दाखवली.
2 Jul 2011 - 4:18 am | आत्मशून्य
वेरी इंटरेस्टींग.
बाकी हयोहययो येणार म्हणजे कार्यक्रम बराच आधी ठरला असणार ? मग ज्या संध्याकाळी कार्यक्रम संपन्न होणार आहे नेमकं त्याच दिवशी लोक कामात असतानाच्या वेळी अत्यंत कमी वेळ देऊन ही माहीती का जाहीर करताय ? इतक्या चर्चा तूम्हासोबत होत असताना कीमान ३६ तास आधी हे कळवता आले नसते काय... ? चला राहूदे तेव्हडे तास पण आपण या कार्यक्रमाची कल्पना केवळ ५ तास १८ मीनीटे आगोदर दीली आहे हे निकोपतेच्या दृश्टीने फारच अक्षम्य आणी बेगडी भासत नाही काय ? कि कार्यक्रमाला यायचे असून येऊ न शकलेल्यांची नंतर हेटाळणी करायचा मनसूबा होता ? बाकी (किमान ) या प्रश्नांचे समर्पक उत्तर दीले तर आज सूर्य पश्चीमेला उगवला असं म्हणेन म्हणतो....
2 Jul 2011 - 1:16 pm | शशिकांत ओक
मित्रा,
त्या दिवसाच्या पुण्याच्या पेपरमधे भाषण होणार असे प्रकाशित झाले होते. मिपाकरांनी ते वाचले असेल.
ज्यांना यायचे होते ते आले. न आलेल्यांची हेटळणी कशाला करायला हवी...
2 Jul 2011 - 1:23 pm | आत्मशून्य
ज्याना आधीच योग्यवेळी कळले नाही त्यांचे काय हा खरा प्रश्न आहे...
2 Jul 2011 - 2:24 pm | मृगनयनी
आत्मशून्य'जी..... आपण एकदा शन्कानिरसनासाठी शशिकान्त'जींना फोन करा... किन्वा प्रत्यक्ष भेटा.....
कारण तुमची नाडीपट्टी पाहायची तळमळ खरंच तीव्र असेल..... तर तुमची पट्टी नक्की मिळेल...
इतरांसारखे केवळ "नाडी जोतिषा"ची थट्टा करण्याच्या उद्देशाने जर तुम्ही काही विधाने करत असाल.. तर मग कशालाच काहीच अर्थ उरत नाही....
तुम्हाला खरंच तुमची पट्टी पाहायची असेल.. तर ओक'सरांना अवश्य भेटा....
कारण नुसते शब्दांचे खेळ करून किन्वा जर-तर ची भाषा बोलून प्रत्यक्षात मात्र मूळ मुद्दा बाजूलाच राहतो!!!
त्यामुळे पोहायला शिकायचे असेल.. तर पाण्यात उडी घ्यायलाच हवी!!!....
अर्थात तुम्ही बुडणार नाही... याची खात्री आम्ही तुम्हाला देतो!!! :)
2 Jul 2011 - 2:26 pm | आत्मशून्य
शन्कानिरसनासाठी त्यांचाशी मी व्यनीतही थोडफार बोललो आहे.
धन्यवाद.
3 Jul 2011 - 5:21 pm | ऋषिकेश
मृगनयनी आणि देतो!!! हा टायपोच असावा ना? :P
2 Jul 2011 - 3:50 pm | अजातशत्रु
म्हणजे आमंत्रण पुण्याच्या लोकांनाच होते ?
बरे वर एक असाच प्रश्न विचारला होता ते सभागृह कुठे आहे ते?
त्याचे उत्तरही इथे दिलेले नाही यास्तव आमचीही लाभ घेण्याची संधी हुकली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
(पट्टि चे पोहणारे ;) )
2 Jul 2011 - 6:23 pm | JAGOMOHANPYARE
पोस्टाद्वारे म्हणजे प्रत्यक्ष्य न येता नाडीभविष्य जाणता येते का? किती फी आणि काय माहिती पाठवावी लागते? ( फीची माहिती खरडवहीत लिहिली तरी चालेल.)
2 Jul 2011 - 6:33 pm | शशिकांत ओक
मित्रा,
नाही,
पण आपल्याजवळच्या नातेवाईकाने आपला अंगठ्याचा ठसा नेऊन ते मिळवता येणे शक्य आहे.
3 Jul 2011 - 11:41 am | JAGOMOHANPYARE
अंगठा शाईने उठवून पोस्ताने पाठवला तर? त्यात इतर पर्सनल बेसिक माहितीही देइन....
अशी एखादी सिस्टिम सुरु झाल्यास बरे होईल.
3 Jul 2011 - 3:24 pm | शशिकांत ओक
मित्रा,
सध्या तशी सोय नाही
3 Jul 2011 - 3:21 pm | शशिकांत ओक
मित्रांनो,
१ जुलैला पुण्यात इ.सं.मं.मधे झालेल्या नाडीग्रंथांच्या ताडपट्टीतील लेखन व व्यक्तीची नावे कशी कोरून येतात याचे प्रात्यक्षिक पहायची संधी हुकली असे वाचत असेल तर इच्छुक व्यक्तींसाठी एकत्र येऊन आपल्याला असा कार्यक्रम ठरवता येऊ शकेल. मात्र सध्या ते पुण्यात शक्य आहे. नंतर अन्य ठिकाणी विशेषतः ठाण्यात देखील असा कार्यक्रम करता येईल.
यासाठी कोणी पुढाकार घेत असेल तर फार छान...
10 Sep 2018 - 10:20 am | शशिकांत ओक
नमस्कार मित्रांनो, वरील प्रात्यक्षिकाला दर्शवून ७ वर्षांचा कालावधी गेला आहे.
जुने धागे सहज चाळताना हा धागा नजरेस पडला. मध्यंतरीच्या काळात नवीन मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकांच्या आवृत्तींचे प्रकाशन झाले.
नाडीग्रंथ भविष्य विषयावर ७,८ अॅप्स प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध करून देण्यात आली.. वगैरे वगैरे...
त्यामधून खालील लिंक दिली आहे.
सध्या हैयो दिल्लीत व्यवसायानिमित्त स्थलांतरित झाले आहेत.
https://docs.google.com/presentation/d/1mXaIacPzvsSucZ-1iIiwCjiAvyTfqjnO...
4 Jul 2011 - 10:15 am | रामदास
भेटू या ठाण्यात जुलैच्या अखेरीस. एक नाडी पट्टी कट्टा करू या .कितीजणांनी येणे आवश्यक आहे ? (मिनीमम कोरम)
4 Jul 2011 - 2:05 pm | शशिकांत ओक
प्रिय रामदासजी,
मी सोडून ६ जणं तरी असावेत. आधिक आले तर छान.
त्यात नाडीग्रंथ दर्शन ही थिम असली तरी फक्त तीच असे नसावे. गप्पांचा बाजार पण वेळेच्या बंधनात.
4 Jul 2011 - 2:10 pm | गवि
मी, रामदासकाका..
दोन झाले..
कॉलिंग किसन शिंदे.. स्पावड्या...
4 Jul 2011 - 2:16 pm | सूड
याची कृपया नोंद घेतल्या जावी.
4 Jul 2011 - 3:43 pm | विश्वनाथ मेहेंदळे
असेच म्हणतो.
11 Jul 2011 - 2:58 pm | सुनील
तारीख-वेळ सोयीची असल्यास, माझीही उपस्थिती.
8 Aug 2011 - 9:49 pm | शशिकांत ओक
रामदासजी,
नाडीकट्ट्यावर पुढे काय ठरले ते कळवावे.
4 Jul 2011 - 2:18 pm | गणपा
ह्या पट्ट्या फक्त भुतकाल आणि वतमानच वर्तवतात का? (असं असेल तर काय उपेग?)
4 Jul 2011 - 2:23 pm | शशिकांत ओक
मित्रा,
हे म्हणजे रामाची सीता कोण असे झाले.
4 Jul 2011 - 2:48 pm | गणपा
वरील प्रतिसादातल उद्गृत केलेलं वाक्य तुमचच होतं हो काका.
त्यात कुठेही त्या मनुष्याच्या भविष्य वर्तवल्याचा उल्लेख नाही.
आता त्या वाक्या वरुन मज अजाणाला जो बोध झाला त्या अन्वये ही शंका उपस्थित झाली.
यात कसलाही/ कुणाचीही हेटाळणी करण्याचा वा खिल्ली उडवण्याचा मुळीच उद्देश नव्हता.
असो. एक प्रामाणिक शंकेला पुणेरी उत्तर मिळालं.
आता अधिक जाणुन घायची इच्छा मेली.
धन्यवाद.
4 Jul 2011 - 3:34 pm | नितिन थत्ते
कोणतं पुणेरी उत्तर मिळालं तुम्हाला?
म्हणजे "भविष्यपण सांगितलेलं असतं" असं उत्तर मिळालं असं समजत आहात का?
परंतु भविष्य सांगितलेले असते असा कुठलाही दावा केलेला नाही असे हैयो हैयैयो यांनी आम्हाला ठणकावून सांगितले होते. (किंबहुना मग दावा कसला आहे हेच त्याम्नी सांगितले नाही).
4 Jul 2011 - 3:50 pm | गणपा
हॅ हॅ हॅ चाचा, ओक काकांचा खालील प्रतिसाद आधीच आला असल्याने हा विषय अजुण ताणुन धरु इच्छीत नाही.
4 Jul 2011 - 3:20 pm | शशिकांत ओक
मित्रा,
नाडीग्रंथ हे भविष्यकथन आहे.
त्या ग्रंथांची महती कळायला सोपे जावे म्हणून त्यातील कथन ज्या विशिष्ठ व्यक्तिला उद्देशून केले गेले आहे हे नक्की करायला जे साक्षी म्हणून लिहिले जाते त्यावर लोकांचा विश्वास बसणे शक्य होत नाही. चर्चा तेथे घोटाळत राहाते.
5 Jul 2011 - 4:47 pm | नितिन थत्ते
जुलै अखेर शक्य होणार नाही. पण ६+ लोक आधीच जमले आहेत.
>>नाडीग्रंथ हे भविष्यकथन आहे.
हा दावा तुम्ही (हैयो हैयैयो यांच्या संबंधी धाग्यावर) करत आहात हे नक्की का?
हैयोंनी मला खालीलप्रमाणे उत्तर दिले होते.
श्री. थत्ते, आपण तीन विविध गटांच्या विधानांची निष्कारण मिसळ करताहांत. नाडिग्रंथप्रेमी, नाडिग्रंथविरोधक आणि तटस्थाभ्यासक ह्यांत कोणाचे काय दावे आहेत, दावे आहेत की नाहीत किंवा कसे, हे आधी आपण जाणून घ्यावे.
माझ्या माहितीमध्ये, "नाडीग्रंथात हजारो वर्षांपूर्वीच कोणा ऋषींनी कल्पांतापर्यंत (मानवजात अस्तित्वात असेपर्यंत) जन्माला येणार्या प्रत्येक व्यक्तीचे भविष्य लिहून ठेवलेले आहे" असा अभ्यासांती दावा ह्यापैकी कोठल्याही पक्षाकडून झालेला नाही. किंबहुना, मी आठवण करून देवू इच्छितो, "असे कसेकाय होते बुवा" ह्या स्वरूपांत मुळांत नाडिग्रंथविरोधकांनी स्वत:च स्वत:स पाडून घेतलेला हा एक अनुभवशून्य आणि त्यामुळेच कौतुकास्पद असा प्रश्न होय. हे मी ह्यापूर्वीही निदर्शनास आणून दिलेले आहे. अभ्यासामध्ये अशा दाव्यांचा विचार करण्याने मूळ अभ्यासास बाधा पोहोंचते. श्री. थत्ते, आपणही अशा विधानांवर (अभ्यासाशिवायच) विश्वास ठेवाल असे वाटले नव्हते,
5 Jul 2011 - 2:59 pm | शशिकांत ओक
रामदासजी व अन्य मित्रांनो.
ठाण्यासाठी किती हात वर झाले?
त्याप्रमाणे मला माझे इतर कार्यक्रम आखायला बरं पडेल.
5 Jul 2011 - 4:36 pm | स्पा
आम्ही बी येऊ
आत्तापर्यंत
गवि
रामदास काका
वि मे
सूड
मी
मिका
किसन शिंदे
लीमाऊजेट
5 Jul 2011 - 4:42 pm | गवि
सहाची अपेक्षा, आठ झाले. कोरम फुल्ल.
चला.. तारीख वेळ ठिकाण राहिले फक्त.
समजा ठाण्यानजीकच्या (असल्यास) नाडीकेंद्रात भेटले तर? तिथून अनुभव घेऊन मग अन्यत्र जाऊ आणि चर्चा करु.
11 Jul 2011 - 12:46 pm | कवितानागेश
मला न विचारताच माझे नाव टाकल्याबद्दल णिशेध!
अवांतरः मी येइन की. :)
11 Jul 2011 - 1:18 pm | सूड
>>मला न विचारताच माझे नाव टाकल्याबद्दल णिशेध!
माऊ...अगं हे नवीन का आहे ??
आता स्पा नक्की खवळणार आहे, पळ्ळा ऽऽऽ !!
;)
5 Jul 2011 - 4:50 pm | विजुभाऊ
मी देखील येईन.
10 Jul 2011 - 6:10 pm | शशिकांत ओक
मित्र हो,
ठाणेकरांनी नाडीकट्टा करायला पुढाकार घेऊन आघाडी मिळवली...
कदाचित पुणेकर नाडी ग्रंथ प्रेमींचा उत्साह दमट हवामानाने मावळला....
11 Jul 2011 - 11:19 am | ५० फक्त
छे छे सगळे कट्टॅ आधी ठाण्याला आणि मग पुण्याला अशी प्रंपराच आहे मिपाची, आणि घाबाउ स्पा या कट्टा करण्याकामी पुढाकार घेत असल्याने मी तरी माघार घेतली आहे, मला अजुन बरंच लिहायचं आहे मिपावर आणि वेळ पण थोडाच आहे.
५० फक्त
त्यांच्या तिथे फ्री क्रुपेकरुन, भडक, ललकार, माजकारण आणि पोतीवरुन नादविनाद करणा-या धाग्यांच्या बंड्लांचा किरकोळ तसेच घाउक दरात नुसता बाजारच काय तर घर, दार, शेत, फार्म हाउस इ. इ. वसवले जाईल.
16 Jul 2011 - 9:25 pm | शशिकांत ओक
रामदासजी व अन्य मित्रांनो,
ठाण्यासाठी किती हात वर झाले?
त्याप्रमाणे मला माझे इतर कार्यक्रम आखायला बरं पडेल.