अरुणाचल प्रदेशात माझा प्रथम प्रवेश झाला तो २००९ मध्ये. नहरलगुन येथे वर्ध्याचे श्री प्रदिप जोशी यांच्या निमंत्रणानुसार मी गुवाहाटी येथुन रात्री च्या बस ने निघालो व दुसरे दिवशी नहरलगुन येथे पोचलो. मला घ्यावयास ते स्वतः आले होते. अरुणाचल वर श्री शशीधर भावे यांचे पुस्तक मी वाचले होते. त्यात श्री अशोक वर्णेकर यांच्या शाळेच्या प्रकल्पाबद्दल त्रोटक माहिती होती. एक मराठी माणुस इतक्या लांब येउन काही तरी भव्य काम उभारतॉ त्यामुळे त्यांना भेटण्याची व त्यांच्या बद्दल जाणुन घेण्याची मला कमालीची उत्सुकता होती.
शशीधर भावे यांची भेट ही माझी नुकतीच पुण्यात झाली होती व त्यांचेसोबत मुंबई ला मी इशान्य भारतातील विध्यार्थ्यांच्या वस्तिगृहाच्या व्यवस्थापकांच्या बैठकी साठी गेलो होतो व परत बसने येतांना त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. पंचाहत्तरीला पोचलेला हा उत्साही तरुण मला पाहताक्षणीच भावला. अरुणाचलला त्यांचा इतका प्रवास झाला होता की ते म्हणजे अरुणाचलचे चालते बोलते माहितीचे आगार.
नहरलगुन ला पोचल्या नंतर मी प्रदिपजींना वर्णेकरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी स्वत; तिकडे आपण जाउ म्हणुन मान्यता दिली. माझे तेथील काम आटोपल्यानंतर मी त्यांना वर्णेकरांना भेटण्याबद्दल मी मोकळा असल्याबद्दल सांगितले. त्यांनी लगेचच तेथील एक कार्यकर्ते, चंद्रपुरचे उत्तम इंगळे यांना मला घेउन येण्यास सांगीतले.व ते स्वतः पुढे गेले.
नहरलगुन येथुन पार्वतीपुर ला जातांना लागणारी ब्रम्हपुत्रेचे उपनदी 'डिक्राम'
नहरलगुन हुन १० कि.मी.वर आसाम सीमेचे ठाणे आहे तेथुन १ कि.मी वर पार्वतीपुर गाव आहे तेथे श्री अशोक वर्णेकर यांची भेट झाली. त्यांच्याशी गप्पा मारतांना आपण खुप जुने मित्र असल्याची माझी भावना झाली. आश्चर्य म्हणजे ते मुळचे नागपुरचे व त्यात ही मी जेथे १० वर्षे काढली त्या अभ्यंकर नगर मधील. मग काय बरीच मंडळि हि त्यांची व माझी कॉमन ओळखीची निघाली व गप्पा खुप रंगल्या. त्यात कळलेली माहिति रोचक तर होतीच पण ध्येयाने पछाडलेला माणुस काय करु शकतो ह्याचे मुर्तिमंत उदाहरण माझ्या समोर होते.
सुमारे वीस वर्षापुर्वी वर्णेकर दांपत्य मुंबईला एका॑ चांगल्या पगाराच्या प्राध्यापकाच्या पदावर कार्यरत होते. नुकतेच लग्न झालेले त्यामुळे संसार ही छान चालला होता. पण ध्येय वादी माणुस हा चाकोरीतील नोकरीत कायम अस्वस्थ असतो. तसेच हेही होते. त्यावेळी विवेकानंद केंन्द्राची अरुणाचल मध्ये काम करण्याची इच्छा असलेल्यांना नोकरी साठी अर्ज करण्याबद्दल जाहिरात पेपर मध्ये त्यांनी वाचली आणि दोघांनीही चांगल्या पगाराचि नोकरी सोडुन देण्याची तयारी दाखवित अर्ज केला. त्यांना लगेच नियुक्तीबाबत पत्र आले व दोघेही नहरलगुन ला रुजु झाले. २-३ वर्षातच त्यांना मनासारखे करता येत नसल्याची जाणीव झाली व स्वत; शाळा सुरु करण्याचे त्यांच्या मनाने घेतले. लगेच त्या अनुषंगाने जागेचा शोध सुरु झाला व सुदैवाने त्यांना हवी असलेली जागा त्यांना भाड्याने मिळाली. विवेकानंद केन्द्राची नोकरी सोडुन त्यांनी शाळा सुरु केली. शाळा मनासारखी सुरु झाली होती लोकांचा प्रतिसाद ही उत्तम होता पण २-३ वर्षानी जागा मालकांनी ती जागा चांगली ऑफर आल्याने विकायचा निर्णय घेतला. या दांपत्याने धीर सोडला नाही. त्यावेळी म्हणजे १३-१४ वर्षापुर्वी त्यांनी थोडे बहुत पैसे जमा केले होते. त्यांनी स्वत्;ची जागा घेण्याचा निर्णय घेतला. शाळेच्या जागेचा शोध पुनः सुरु झाला. अरुणाचल सीमेपार आसाममध्ये पार्वतीपुर या छोट्या खेड्यात त्यांना मनासारखी १ एकर जागा नजरेत आली ती त्यांनि विकत घेतलि दहा हजार रुपयात. व तेथे राहण्यासाठी व शाळेसाठी अशी एक लांब लचक झोपडी शाकारली. विध्यार्थ्यांचा प्रश्न होता कारण ते एक लहानशे खेडे होते. त्यांच्या शाळेतील आज असलेल्या विध्यार्थ्याबाबत हि एक ईतिहास आहे.
ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांना आसाम मध्ये चहाचे मळे लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता लागली. त्यांनी भारताच्या निरनिराळ्या आदिवासि भागातुन मजुर गोळा करुन त्यांना मळ्याच्या कामासाठी लावले. हे मजुर, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार उत्तरप्रदेश आदि राज्यातुन आणले गेले. त्यांना तेथेच वसवले गेले. कालांतराने अनेक वर्षे एकत्र राहिल्याने त्यांचे संक्रमण झाले. या संक्रमणातुन निर्माण झालेली आजची ही जमात 'समदी' म्हणुन ओळखली जाते. आजही हे चहाच्या मळ्यात काम करतात तसेच इतरही तत्सम काम करुन आपली उपजिवीका करतात.
वर्णेकरा दांपत्यानी या मुलांना शिक्षण देण्याचे ठरविले. आज या शाळेत १५०-२०० इतके विद्यार्थि असुन येथील शिक्षक देखील याच शाळेतुन शिकुन शिक्षक झाले आहेत. आज येथे त्यानी मुलासाठी निरनिराळे वर्गासाठी वेगळे कक्ष बांधले आहेत. शिक्षकांसाठी कक्ष, त्यांच्या श्रध्दास्थानाचे मंदीर वगैरे सुविधा केलेल्या आहेत.
त्यांची मुले देखील याच शाळेत शिकली. पुढील शिक्षण देखील इटानगर येथे पण इथुन जाउन येउन पुर्ण केले राहुनच त्यानी घेतले. त्यांची एक मुलगी पायलट असुन मुलगा हा बेंगलोरल इंजिनीअर त्यांची वृध्द आई नागपुर ला असते तीची सेवा व्हावी या उद्देशाने दोघांपैकी एक आलटुन पालटुन नागपुरला तिच्या जवळ राहतात. त्यावेळि शाळेचि व्यवस्था दोघांपैकी एक सांभाळतात. मी गेलो तेंव्हा सौ. वर्णेकर या पाहुण्यांसोबत गुवाहाटी ला गेल्या होत्या त्यामुळे त्यांची भेट होउ शकलि नाही.
श्री अशोक वर्णेकर आपल्या स्वप्नपुर्ती चे स्वरुप पहातांना
अशोक वर्णेकर व मागे त्यांचे कार्यालय व घर
सनदी मुले मधल्या सुट्टीत
शिक्षकांसाठी खोली
येथील लोक शिवाला मानतात त्यामुळे शाळेतील शिवमंदिर. विध्यार्थी या मदिराकडे तोंड करुन प्रार्थना म्हणतात.
या शाळेत शिकुनच तयार झालेला शिक्षक वर्ग.
प्रतिक्रिया
25 Apr 2011 - 2:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हे इथे काय करतय?
25 Apr 2011 - 3:38 pm | गवि
सुंदर.. स्वप्न खरं केलं त्यांनी. याचा आनंद त्यांना स्वत:ला किती होत असेल. दॅट इज लाईफ..
25 Apr 2011 - 3:41 pm | यशोधरा
वर्णेकर व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक व अनेक शुभेच्छा. त्यांचे काम आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपलेही अनेक आभार.
26 Apr 2011 - 9:19 pm | धमाल मुलगा
अगदी हेच म्हणायला आलो होतो.
विश्वासराव,
ह्याशिवाय आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो. ह्या किंवा तुम्ही पहात असलेल्या निस्सिम सेवाभाव आणि मनापासून काम करत असलेल्या अशा प्रकल्पांना आमची काय आणि कशी मदत होऊ शकते ते सांगाल काय? फार बरं होईल ही माहिती दिलीत तर.
27 Apr 2011 - 4:39 pm | विश्वास कल्याणकर
इशान्य भारतात सेवा भारती पुर्वांचल ही संस्था आरोग्य , शिक्षण व स्वयंरोजगार या संदर्भात कार्य करते. पुण्यात सौ.पुनमताइ मेहता या व्यवसायाने उद्योगपती असलेल्या महिला तेथील भागाच्या प्रभारी म्हणुन काम पहातात. त्यांचा फोन नं ९४२२०८८६८४ आपण केव्हाही त्यांना फोन करुन आपण काय करु शकता याबद्दल चर्चा करु शकता.
27 Apr 2011 - 4:46 pm | यशोधरा
ही माहिती दिल्यबदल आभार. व्य नि टाकून किंवा खरड टाकून विचारणारच होते. मी करेन फोन पूनमताईंना.
26 Apr 2011 - 3:17 pm | वारकरि रशियात
श्री. अशोक वर्णेकर यांचे कार्य प्रशंसनीय.श्री. वर्णेकर व त्यांच्या सहकार्यांना अनेक शुभेच्छा. त्यांचे काम आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपलेही अनेक आभार.
अवांतर: हे श्री.वर्णेकर म्हणजे नागपूरचे थोर विद्वान, प्रकांडपंडित व संस्कृततज्ञ श्री. श्री.भा.वर्णेकर यांचे सुपुत्र का?
26 Apr 2011 - 3:21 pm | विश्वास कल्याणकर
अशोक वर्णेकर हे संस्कृत पंडित श्री श्री.भा.वर्णेकर यांचेच सुपुत्र आहेत.