नमस्कार मंडळी...
नाशिकला विध्यार्थी स्नेह-संमेलनात भाईकाकांनी केलेल्या भाषणाचा काही भाग नुकताच मी इथे वाचला. त्यांनी केलेल्या अनेक उत्तमोत्तम भाषणांपैकी एक!!!
कधीकाळी नाशिकला पुलंनी केलेलं हे भाषण अजूनही खूप नाविन्यपूर्ण वाटते, त्यापेक्षा मी असं म्हणेन की, पुलंची कुठलीही भाषण असू द्यात ती कधीच जुनी होऊ शकत नाहीत. तसं बघायला गेलं तर आम्ही पामर (दूरवर पसरलेल्या अथांग सागराच्या क्षितिजाकडे एकटक पाहत बसलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची वाट पाहताना सहज म्हणून त्यात भिरकवलेला एक लहानसा दगड) त्या उत्तुंग हिमालयाची उंची काय सांगणार??. त्यांच्याबद्दल लिहायची आमची दिड-दमडीचीही लायकी नाही. पण भाई काकाचं भाषण म्हणजे आनंदाची पर्वणी आणि तो आनंद आम्हाला आमच्या माय-बाप मिपाकरांबरोबर वाटून घ्यायचा असल्यामुळे ते आम्ही इथे टाकतोय.
आशा करतो मंडळी माझा हा छोटासाच प्रयत्न तुमच्या चेहऱ्यावर खूप सारा आनंद घेऊन येईल. :)
प्रतिक्रिया
21 Apr 2011 - 6:01 pm | मृत्युन्जय
धन्यवाद. चांगली लिंक दिलीत.
22 Apr 2011 - 7:12 am | नरेशकुमार
पुलं बद्दल बोलन्याची माझ्या लायकीची सुद्दा लायकी नाही.
बाकी भाषन वाचेनच
.
.
.
पण
हे जग मी सुंदर करून जाईन.....
हे जाईन कशाला ?
जग सुंदर करायचं आनी आपनच (सगळे) त्यात रहायचं की !
22 Apr 2011 - 9:04 am | पंगा
भाषण मीही अजून वाचलेले नाही, वाचेनच, पण...
'मी हे जग सोडेपर्यंत माझ्या कृतींतून, मी जगात येताना ज्या स्थितीतल्या जगात आलो, त्या स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणेन' असे ध्येय ठेवावे, असे पु.लं.ना सुचवायचे असावे काय?
विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात हे सयुक्तिक वाटते. (अर्थात नेमके काय ते भाषण वाचूनच कळेल. तोपर्यंत हा पो - आपले, अंदाज.)
21 Apr 2011 - 6:03 pm | मृत्युन्जय
प्रकाटाआ
21 Apr 2011 - 6:38 pm | किसन शिंदे
एका चुकीच्या शब्दाची दुरुस्ती केल्या गेली आहे.
21 Apr 2011 - 7:06 pm | वपाडाव
भाषण वाचुन प्रतिसाद टंकतो..
22 Apr 2011 - 8:11 am | चिंतामणी
महाराष्ट्राच्या या कुल दैवताबद्दल काय नव्याने म्हणणार.
किसन शिंदे यांचे आभार.