बरसणार्या मेघधारांना वार्यावर पेटतांना
पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना
सरीवर सर कोसळून हे कृष्ण मेघ गडगडतांना
पहायचेय तप्त धरेसह माझ्या मनास निवतांना
रुसलेल्या गुलाबाच्या कळीला हलकेच उमलतांना
पहायचेय क्षितिजावरील इंद्रधनुष्यातील सप्तरंगांना
ग्रीष्माचा दिवस सारून श्रावणसांज अवतरतांना
पहायचेय जाईवेलास फिरुनी तरुण होतांना
ओलेत्याने तिला माझी कविता गुणगुणतांना
पहायचेय मोहरून तो कोकीळकंठ पालवतांना
पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना
पहायचेय तिने मला एकदा, मी तिला चिंबून पाहतांना
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२०/०४/२०११)
प्रतिक्रिया
20 Apr 2011 - 11:15 am | निनाद
कसली ओलेती कविता आहे.
पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना
पहायचेय तिने मला एकदा, मी तिला चिंबून पाहतांना चिंबून? कशा खाली चिंबून तिने पाहायला हवे आहे म्हणे?
चिंबलेले म्हणजे दाबले गेलेले. तुम्ही तिला दाबून पाहत असतांना तिने तुम्हाला पाहावे असा अर्थ असेल तर मग योग्य आहे.
चुंबुन असे म्हणायचे आहे का मिका?
20 Apr 2011 - 11:28 am | मिसळलेला काव्यप्रेमी
कशा खाली चिंबून ??
अहो पावसात चिंब होऊन असे म्हणायचे आहे!!
तुम्ही तिंबून वाचले का? ;)
20 Apr 2011 - 8:02 pm | गणेशा
रीतसर प्रतिसाद खाली दिलेला आहे
अवांतर :
पहायचेय तिने मला एकदा, मी तिला
यातुन असा काहीच निट अर्थ कळेना ..
पहायचेय तिने मला एकदा आणि परत मी तिला कळाले नाही..
अति अवांतर :
चिंबुन हा शब्द गावाकडे चिंबलेला ह्या स्वरुपातच बोलतात ..
म्हणजे आपारप्पी खेळताना कचकद्याचा बॉल चिबुन जायचा.. अश्या अर्थाने..
चिंबुन हा शब्द भिजुन सारखा नाहि उपयोगात येत .. पण ठिक आहे..
नाहितर
मी तीला ओलीचिंब पहाताना कसे वाटते आहे ?
21 Apr 2011 - 1:28 am | आत्मशून्य
चावट वाटत आहे ;).
@मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त कवीता, नेमकी ऊन्हाळ्यात टाकलीत ? आता हे दोन महीने काय फक्त ही कवीता आठवत काढायचे का ?
20 Apr 2011 - 11:21 am | किसन शिंदे
मस्तच.... :)
20 Apr 2011 - 11:22 am | रामदास
काहीतरी कॉम्प्लेक्स आहे बॉस.कुठल्यातरी म्हातारीच्या प्रेमात पडलास का क्काय ?
20 Apr 2011 - 11:25 am | निनाद
पहायचेय जाईवेलास फिरुनी तरुण होतांना बरोबर रामदासशेट इथे लोच्याय राव!
20 Apr 2011 - 11:29 am | मिसळलेला काव्यप्रेमी
अवघड आहे!!
20 Apr 2011 - 11:26 am | मिसळलेला काव्यप्रेमी
काय हो काय काका? कसला कॉम्पलेक्स म्हणताय?
आणि
हे म्हातारीसाठीचे वाटतेय? तुम्ही पण ना काका..
20 Apr 2011 - 11:36 am | निनाद
सरीवर सर कोसळून हे कृष्ण मेघ गडगडतांना
पहायचेय तप्त धरेसह माझ्या मनास निवतांना
रुसलेल्या गुलाबाच्या कळीला हलकेच उमलतांना
पहायचेय क्षितिजावरील इंद्रधनुष्यातील सप्तरंगांना
हे मात्र खरेच आवडले. चांगली जमली आहे रचना.
20 Apr 2011 - 7:54 pm | गणेशा
असेच म्हणतो
सरीवर सर कोसळून हे कृष्ण मेघ गडगडतांना
पहायचेय तप्त धरेसह माझ्या मनास निवतांना
रुसलेल्या गुलाबाच्या कळीला हलकेच उमलतांना
पहायचेय क्षितिजावरील इंद्रधनुष्यातील सप्तरंगांना
----
20 Apr 2011 - 12:00 pm | गवि
वा.. एप्रिलमधेच उकाडा मे म्हणायला लागलाय आणि पावसाची कविता आली.
छान रे मिका.
20 Apr 2011 - 1:45 pm | निनाव
मिका:
खल्लास केले तुम्ही. झक्कासच!!!! :)
20 Apr 2011 - 4:06 pm | पियुशा
वा वा वा !