टकल्या बापटाचा संताप, मी आणि अण्णा...! :) -- १

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
19 Apr 2011 - 6:49 pm

अण्णांना जाऊन आता तीन महिने पुरे होतील. मागे उरल्या आहेत त्यांच्या मैफली आणि त्यांच्या आठवणी. आठवयला गेलो की साधारणपणे ८४-८५ सालापासूनचा काळ आठवतो. दोन तानपुर्‍यांमध्ये बसलेला तो स्वरभास्कर आणि त्याचा उत्तुंग स्वराविष्कार. आभाळाला गवसणी घालणारा तो बुलंद आवाज. त्याची गाज..!

वर्ष कुठलं ते आता आठवत नाही. परंतु असाच एकेदिशी डायरेक्ट त्यांना फोन लावला. कारण काहीच नाही. फोनवर त्यांचा आवाज ऐकला की बरं वाटायचं, भरून पावायचं एवढंच एकमेव कारण. आणि दुसरं म्हणजे माझ्यासारख्या सामान्याशी ते अगदी नावानिशी ओळख ठेऊन आपुलकीने दोन शब्द बोलयचे त्यामुळे भीडही चेपलेली. माझ्यातला त्यांचा चाहता, त्यांचा भक्त याच चेपलेल्या भिडेचा थोडा फायदा/गैरफायदा घेऊन त्यांच्याशी दोन शब्द बोलायचं धाडस करायचा इतकंच. पण बरं वाटायचं जिवाला. आणि गैरफायदा तरी कशाचा? तर एक दिग्गज गवई आपल्याशी अगदी साधेपणाने बोलतो याचंच खूप अप्रूप वाटायचं, धन्य वाटायचं..!

अण्णांच्या फोनची रिंग वाजत होती. पलिकडून फोन उचलला गेला.

"हॅलो..". खर्जातला घनगंभीर आवाज.! झालं, आम्ही अवसान आणून, धीर गोळा करून म्हटलं,

"नमस्कार अण्णा. ठाण्याहून अभ्यंकर बोलतोय. ओळखलंत का? सहजच फोन केला होता."

"ओळखलं तर! काय म्हणता? कसं काय?" फलाण्या दिवशी येतोय मुंबैला. तुमच्या मुंबै विद्यापिठात राजाभाई टॉवरला माझं गाणं आहे. तिथे या वेळ असला तर.."

"अहो पण अण्णा, त्या कार्यक्रमाचं तिकिट खूप महाग आहे.." मी घाबरत घाबरत उत्तरलो.

"धत तेरीकी! तुम्हाला काय करायचंय तिकिटाशी? तुम्ही या तर खरं. महाग की स्वस्त ते आपण नंतर पाहू..!" :)

अण्णा अगदी साधेपणाने म्हणाले.

झालं. आपण एकदम खुश. त्या कार्यक्रमाविषयी मला माहीत होतं परंतु किमान तिकिटच मुळी दोन हजार रुपये इतकं होतं. मुंबै विद्यापिठाचा तो कुठलासा एकदम प्रेस्टिजियस कार्यक्रम होता. परंतु तिकिट लै म्हाग असल्यामुळे माझं त्या कार्यक्रमाला हजेरी लावणं कठीणच होतं. परंतु आता साक्षात अण्णांनीच बोलावल्यामुळे आपण एकदम बिनधास्त! :)

ठरल्या दिवशी वेळेवर कार्यक्रम स्थळी पोहोचलो. लै झ्याकपाक मंडप होता. आसपास सगळी बडी बडी मंडळीच दिसत होती. वातावरण एकदम हायफाय. गुलबपाण्याच्या फवार्‍याचे, लोकांच्या सेंट-अत्तराचे कसले कसले सुगंध सुटले होते त्या वातावरणात. वास्तविक अश्या ठिकाणी माझं मन रमत नाही. परंतु तिथे माझा देव यायचा होता आणि मुख्य म्हणजे तोही तितकाच साधा होता, सादगीभरा होता. जागतिक कीर्तीच्या पं भीमसेन जोशींकरता ही झकपक काही नवीन नव्हती. देश-विदेशात अश्या अनेकानेक धुंद, श्रीमंत, हायफाय वातावरणातल्या मैफली त्यांनी जिंकल्या होत्या. पक्क कळीदार पान आणि काळ्या बारीक तंबाखू-चुन्याचा भक्कम बार भरून जमवलेला पुरिया वातावरणातली ही झकपक केव्हाच पुसटशी करायचा अन् तिथे उरायचा तो फक्त पंढरीनिवासी सख्या पांडुरंगाचा प्रासादिक अविष्कार..! असो.

आणि त्यामुळेच खिशात सेकंडक्लासचं तिकिट असलेला साध्या मळखाऊ शर्टप्यँटीतला मी तिथे बिनधास्तपणे कुठल्याश्या मर्सिडीजला टेकून पान चघळत उभा होतो! :)

कार्यक्रमाची वेळ झाली तशी तिकिट-पासेस असलेली, झकपक कापडं घातलेली बडी बडी श्रीमंत स्त्रीपुरुष मंडळी फुलांनी सजवलेल्या छानश्या पॅसेजमधून आत जाऊ लागली. माझ्याकडे ना तिकिट, ना पास. म्हणजे अण्णांच्याच भाषेत सांगायचं तर खरं तर मी फ्री पास होल्डरच होतो! :)

त्यामुळे बॅकष्टेजने कुठे आत घुसता येईल हे पाहायला मी मंडपाच्या मागल्या बाजूस गेलो. तिथे जरा एक साधासुधा दिसणारा भला इसम उभा होता.

"साहेब, हाच रस्ता रंगमंचाच्या मागल्या बाजूस जातो ना? मला अण्णांना भेटायचंय"

"हो. तिथे दारापाशी ते बापट उभे आहेत ना, त्यांना विचारा.."

मी बापटसाहेबांपाशी पोहोचलो. अक्षरश: सुवर्णकांती शोभावी असा लखलखीत गोरा असलेला, उच्च-हुच्च पेहेराव केलेला, सोनेरी काड्यांचा ऐनक लावलेला, तापट चेहेर्‍याचा आणि मुख्य म्हणजे साफ गरगरीत गुळगुळीत टक्कल असलेला बापट तिथे उभा होता. अण्णांचं गाणं राहिलं बाजूला, माझ्यातल्या व्यक्तिचित्रकाराला खरं तर या टकल्या बापटानेच पाहता क्षणी भुरळ घातली होती..! :)

त्या साध्यासुध्या माणसाकडनं मला हेही कळलं होतं की तो बापट मुंबै विद्यापिठातला कुणी बडा अधिकारी आहे. त्याच्याशी संवाद साधायला काहितरी जुजबी बोलायला पहिजे म्हणून मी सजहच विचारलं,

"नमस्कार. अण्णा आले आहेत ना?" ग्रीनरूममध्ये असतील ना?"

"अहो अण्णा आले आहेत ना म्हणून काय विचारता? आता ५-१० मिनिटात आम्ही कार्यक्रम सुरू करणार आहोत!"

हे बोलताना खेकसणे, भडकणे, ओरडणे, टाकून बोलणे, अपमान करणे, पाणउतारा करणे या सार्‍या क्रिया बापटाने एकदम केल्यान! टकल्या बापट अगदी सह्ही सह्ही माझ्या अपेक्षेप्रमाणेच निपजला. "भाईकाकाकी जय..!' असा माझे व्यक्तिचित्रकार गुरू पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना मी मनातल्या मनात दंडवत केला..! :)

आता पुढची पायरी होती ती रंगमंचावर ब्यॅकष्टेज प्रवेश मिळवण्याची. आणि गाठ टकल्या बापटाशी होती..! :)

क्रमश:...

-- तात्या अभ्यंकर.

संगीतवाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

पक्का इडियट's picture

19 Apr 2011 - 6:54 pm | पक्का इडियट

"बापट" लोकं म्हणजे लै डेंजर...
कुठलाही दरवाजा कसा अडवायचा हे त्यांना नीट माहित असतं

तुम्ही कसा त्याला टकलावर खारका मारायला भाग पाडले हे वाचायला उत्सुक..

तिमा's picture

19 Apr 2011 - 7:24 pm | तिमा

पुढचा भाग वाचायला मीही उत्सुक आहे पण एका बापटावरुन हे जनरलायझेशन कशासाठी ?

पक्का इडियट's picture

20 Apr 2011 - 8:42 am | पक्का इडियट

मला एकच "बापट" माहित आहे हा निष्कर्ष कसा काढलात यावर एक प्रबोधनात्मक लेख लिहावा ही विनंती.

अगदी अपेक्षित आयडिकडून उपप्रतिसाद आलेला पाहून मौज वाटली.

वाचतोय...
तात्या पुढला भाग जरा लवकर टाका.

छोटा डॉन's picture

19 Apr 2011 - 7:00 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो.
पुढच्या भागाची वाट बघतोय.

- छोटा डॉन

मालकांनी दमड्या मोजुन +/- ची सोय दिली आहे वापरा की जरा. ;)

चिंतामणी's picture

20 Apr 2011 - 8:21 am | चिंतामणी

(अपुर्ण) लेख चांगलाच आहे.

पण ही प्रतिक्रीयासुध्दा भन्नाट आहे.

(गणपा भौ, कधी दिले आणि कशी वापरायची हे मालकांनी"घोषणा" करून सांगीतले नाही हो. ;) )

यशोधरा's picture

19 Apr 2011 - 6:58 pm | यशोधरा

सुरुवात मस्त जमली आहे..

परिकथेतील राजकुमार's picture

19 Apr 2011 - 7:03 pm | परिकथेतील राजकुमार

फर्मास !
तात्या लवकर लवकर फुडला भाग.

छ्या! नको त्या ठिकाणी क्रमशः आलं! पुढचा भाग टाका लवकर.

सखी's picture

19 Apr 2011 - 7:50 pm | सखी

छ्या! नको त्या ठिकाणी क्रमशः आलं! पुढचा भाग टाका लवकर.

टारझन's picture

19 Apr 2011 - 7:31 pm | टारझन

ते दादा बापट होते काय ? !!
पुढिल भागाची वाट पहातोय .

-

असुर's picture

19 Apr 2011 - 10:05 pm | असुर

ते दादा बापट होते काय ? !!
परफेक्ट!!! हीच शंका आली की!!! अगदीच गेला बाजार 'दादा बापट' क्याटेगरी!!! :-)

तात्या, जास्त वेळ लौ नका बरका!!

--असुर

उत्सुकता निर्माण झालीय पुढिल भागानिमित्त.

भवानी तीर्थंकर's picture

19 Apr 2011 - 8:27 pm | भवानी तीर्थंकर

पोकळ वाशांचा आवाज मोठा, इतकीच प्रतिक्रिया तूर्त उमटली आहे. पाहू पुढे काय येतं ते. :)
ही प्रतिक्रिया फक्त हे लेखन याविषयी आहे! त्यातील व्यक्तिरेखांविषयी नाही.

प्यारे१'s picture

20 Apr 2011 - 10:28 am | प्यारे१

संपादक मंडळ यात लक्ष घालेल का?????????

वरील प्रतिसाद अत्यंत कुत्सितपणे लिहिलेला दिसत असून लेखाच्या लेखकाचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा प्रयत्न उघड उघड दिसत आहे. काहीही कारण नसताना अशी प्रतिक्रिया उडवावी ही नम्र विनंती.

प्रास's picture

19 Apr 2011 - 8:18 pm | प्रास

येऊ द्या तात्या लवकर...... नको त्या जागी क्रमशः आलाय हे मात्र नक्कीच....

आनंदयात्री's picture

19 Apr 2011 - 8:22 pm | आनंदयात्री

हेच म्हणतो. बर्‍याच दिवसांनी तात्या श्टाईल लेखन वाचायला मिळाले. त्यात्या लिहते व्हा, तुमच्या लिखाणाचे फॅन वाट पहातायेत.

धमाल मुलगा's picture

20 Apr 2011 - 6:31 pm | धमाल मुलगा

अर्थातच हा आणि असे विषय म्हणजे तात्या पेश्श्यालिटी!
मजा येते वाचायला.

प्रियाली's picture

19 Apr 2011 - 8:22 pm | प्रियाली

पुढचा भाग लवकर टाका आणि सोबत टकल्या बापटांचा फोटोही टाका. दरवेळेस काय ते रोशनीबिशनीचे फोटो बघायचे. ;)

रोशनीबिशनीचे फोटु पहायला माणुस लोकांना "वेगळा"च इंटरेश्ट असतो . टकल्या बापटाच्या बाबतीत तुमचे तसे काही आहे काय ? ;)

- खयाली ( पुलाव)

प्रियाली's picture

19 Apr 2011 - 8:53 pm | प्रियाली

काही टकले आम्हाला आवडतात. अर्थातच टकल्यांच्या पुढे "बापट" आल्याने नेमके काय असेल ते माहित नाही तेव्हा फोटूवरून शहानिशा करून घेऊ. कल्जी नसावी.

- विरजण

गणपा's picture

19 Apr 2011 - 9:06 pm | गणपा

हीच्या बद्दल काय मत आहे. :)

श्रीखंड.

प्रियाली's picture

19 Apr 2011 - 9:11 pm | प्रियाली

टारूला विचारा. ;) मला विचारून काय उपेग? :(

- मनपा

एकंच नंबर आहे ही रे :) ब्लाँड , स्लिम .. नाक डोळे सुरेख ;) केसं काय आज आहेत उद्या नाहीत .. परत परवा आहेतंच :) फक्त ह्या बै पठारे आहेत की डोंगरे ते काही कळेना :)

बाकी प्रियाली चा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्युट आवडला ... त्यांना बै ब्रुस विलीस ( किंवा त्यावर) ची च अपेक्षा :)
तात्यांकडुन अपेक्षाभंग होणार नाही अशी श्रीरामचरणी हनुमानजयंतीच्या दुसर्‍या दिवशी प्रार्थना करतो.

- ब्लोंडपा

मी-सौरभ's picture

19 Apr 2011 - 11:44 pm | मी-सौरभ

ती बया ब्लाँड आहे हे पुरेसे नाही का??

डेमी मूर ब्लाँड केव्हा झाली ब्वॉ? काळे कुळकुळीत वाटतात तिचे केस आम्हाला.

आम्ही ब्लाँड विग बसवुन घेऊ :) टकलंचे ... बसेल पण व्यवस्थित. .. शेवटी ब्लाँड चा फिलिंग आल्याशी मतलब आहे ..

- (पर्याय सुचक ) ऑइल

चिंतामणी's picture

20 Apr 2011 - 8:41 pm | चिंतामणी

महीलांच्यात ही आद्य आहे.

स्पंदना's picture

20 Apr 2011 - 8:55 am | स्पंदना

हाय ! हाय ! ब्रुस !

वपाडाव's picture

20 Apr 2011 - 5:57 pm | वपाडाव

ह्यो आणिक एक टकल्या घ्या...
आता अजुन उसासे सोडा...

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत!

रमताराम's picture

19 Apr 2011 - 8:39 pm | रमताराम

सलामी तर जोरदार झडली आहे. फुडला भाग लौकर द्या.

प्रीत-मोहर's picture

19 Apr 2011 - 10:00 pm | प्रीत-मोहर

असेच म्हण्ते

फुडला भाग लौकर द्या, तात्या.

मन१'s picture

19 Apr 2011 - 8:56 pm | मन१

पुढला भाग टाका आता लवकर.

स्वगतः-
तात्या खूप आलंकारिकही लिहित नाही. त्यानं लिहिलेल्या शास्त्रीय संगीतातलं फार काही कळतं, असही नाही.
किंवा त्याच्या लिखणात फार मोठा थरार, रहस्य, गूढ किंवा ब्रह्मज्ञान असतं असही नाही.
मग त्याचा कुठलाही लेख अर्धवट का सोडवत नाही बुवा?
एकदा हातात घेतला की पूर्ण वाचुनच का ठेवला जातो बुवा?

--मनोबा.

मितभाषी's picture

19 Jul 2011 - 4:03 pm | मितभाषी

+१ हेच बोल्तो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Apr 2011 - 9:50 pm | निनाद मुक्काम प...

येऊ द्या
एकंदरीत प्रकरण जड जाणार आहे तात्यांना
त्यावेळी भ्रमण ध्वनी असते तर?
एक फोन लावला असता व तात्यांचा विद्यापीठात प्रवेश सुकर झाला असता .

रेवती's picture

19 Apr 2011 - 10:16 pm | रेवती

आता लौकर लिहा हो तात्या!
पहिला भाग तरी नाट्यपूर्ण वाट्टोय.

सुधीर१३७'s picture

19 Apr 2011 - 10:17 pm | सुधीर१३७

लवकर लवकर लिहा तात्या........................ फार्फार क्रमशः नको ब्वॉ, नायतर चावायची (वाचायची) मज्जाच जाते ना........................

......येऊ द्या लवकर........ :)

सुधीर१३७'s picture

19 Apr 2011 - 10:30 pm | सुधीर१३७

तात्या,

हे टकले बापट जिवंत आहेत का????

..........
विचारले कारण वर कोणीतरी हे प्रकरण जड जाणार आहे तात्यांना असे म्हटले म्हणून .............. :wink:

कुसुमिता१२३'s picture

19 Apr 2011 - 10:51 pm | कुसुमिता१२३

ओ लवकर लिहा पुढचा भाग! खुप उत्सुकता आहे वाचायची!

स्वाती दिनेश's picture

19 Apr 2011 - 11:04 pm | स्वाती दिनेश

पुढचे भाग लवकर लिहून क्रमश: पूर्ण कर रे तात्या..
(मागचे अनेक क्रमश: अजून रांगेत आहेत..)
स्वाती

शिल्पा ब's picture

19 Apr 2011 - 11:08 pm | शिल्पा ब

छान. पुढच्या भागाची वाट पाहतेय.

बन्या बापु's picture

20 Apr 2011 - 4:38 am | बन्या बापु

मला कळवा बरं.. तुमचा फोन नंबर काय हो ?

तुमचे देणे लागतो मी.... दुनिया सोडुन जाण्याआधी देईन म्हणतो..

email : ardevale@gmail.com or amit.devale@sap.com

मी वाट बघतो आहे...

स्पंदना's picture

20 Apr 2011 - 8:54 am | स्पंदना

सुरवात छान आहे तात्या!!

या वेळी जरा खुन्नस भर दिसतय, शाब्दिक चढा ओढ ?

किसन शिंदे's picture

20 Apr 2011 - 9:00 am | किसन शिंदे

ओ तात्या,
काका हलवायाकडची जिलबी नंतर अण्णांची आठवण सांगायला पुरे ३ महिने लावलेत कि ओ तुम्ही...
हा अन्याव आहे आमच्यावर....
पुढचा भाग टाका पटकन..

दीप्स's picture

20 Apr 2011 - 11:34 am | दीप्स

आता पुधिल भाग येउद्याकि लवकर. प्रतिकशेत आहोत.

सुरुवात उत्तम पण डेली सोप किंवा साप्ताहिक करू नका ........ मजा येत नाही ....... गोष्ट एकदम टाका ........

सही रे सई's picture

3 Aug 2011 - 12:15 pm | सही रे सई

तात्या,

अहो "आता पुढची पायरी होती ती रंगमंचावर ब्यॅकष्टेज प्रवेश मिळवण्याची. आणि गाठ टकल्या बापटाशी होती..!

क्रमश:..."

इथेच गाडी थांबली की हो. पुढे काय झालं याची उत्सुकता मला तरी लागून राहिली आहे. बाकी सारे मिपाकर विसरलेले दिसतात.