व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना
मामा अहो मामा,
तुमच्या पोरीला काय समजवाना
फोन केला तर म्हनती,
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||धृ||
कालच आणला मोबाईल नवा
मार्केटमधी लई त्याची हवा
वाटतंय तिनं एकदा तो पहावा
पण तिची भेटच होत नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||१||
आता सगळं कसं सांगू तुमाला
मोबाईलचा हायटेक जमाना आला
तिला सारं काही समजते
रोजरोज एसऐमएस पाठवते
पर व्हायब्रेटर ही काही रिंगटोन नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||२||
मी म्हनलं आपण एकदा भेटूका?
मोबाईलचं टेकनीक समजून देवूका?
तुझ्या हातात माझा मोबाईल देतो
एकएक मेनूचा डेमो देतो
पन असली चेष्टा बरी नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०४/२०११
प्रतिक्रिया
6 Apr 2011 - 2:05 am | निशदे
जबरदस्त..........यापुढे शब्दच नाहीत प्रतिक्रियेसाठी......
6 Apr 2011 - 7:38 am | नरेशकुमार
वॉव
6 Apr 2011 - 11:04 am | स्पंदना
हाअ!! हा! पाभे!! एकदम हायटेक प्रकरण दिसतय!!
6 Apr 2011 - 4:07 pm | गणेशा
मस्त एकदम .. दादा कोंडकेच आठवले लास्टच्या कडव्यामुळे ..
झक्कास लिहिले आहे ..
6 Apr 2011 - 4:21 pm | परिकथेतील राजकुमार
हा हा हा भारी !
साला ह्या पाभेंच्या सगळ्या कवितांची एक पिडिएफ बनवुन शिंदे बंधुंना नेऊन देणार आहे मी :)
6 Apr 2011 - 6:10 pm | शिल्पा कांबळे
लय भारी......
6 Apr 2011 - 6:14 pm | धमाल मुलगा
हाण्ण तिच्यायला!
पाडव्याच्या म्हुर्ताला तिकडं नारायनगावात फडांची म्हुर्ताची सुपारी निगाली आन हिकडं आमचं शाहीर दन्नादन्ना दनकंबाज लावणी लिव्हायला लागलं नव्हं का?
7 Apr 2011 - 5:09 am | आनंदयात्री
हाण हाण !!! पराशेटशी सहमत आहे .. विठ्ठल शिंदेंना खंप्लीट कलेक्शन देउयात !!
चामायला देवकाका चाल लाउन द्या हो जरा !!
7 Apr 2011 - 8:50 am | मदनबाण
ख्या ख्या ख्या...खी खी खी...
दफोरावांनी मोबील चार्ज केलेला दिसतोय यकदम !!! ;)
बाकी या वरुन मला हे खालचं गाणं आठवलं... ;)
http://www.youtube.com/watch?v=2kRanuGMZr0&feature=related
7 Apr 2011 - 10:31 am | ईश आपटे
विनोद किती जणाना कळलाय............शंका आहे............ :)
7 Apr 2011 - 2:19 pm | असुर
तुम्हाला समजला का विनोद?
समजला नसेल तर विशेष आश्चर्य नाही.
समजला असं वाटत असेल तर राहूद्या ना तुमच्याकडेच! तुम्ही रसग्रहण करणार का या कवितेचं??
रसग्रहण करणार असाल तर प्रश्नच नाही. येलकम! बिचारे असमंजस मिपाकर ज्ञावृद्धीसाठी तुमचे ऋणीच राहतील.
आणि करणार नसाल तर बाकीच्यांची उगाच काळजी कशाला ?
पाभे, भारी कविता!! :-)
--असुर
7 Apr 2011 - 3:37 pm | सुहास..
सच्या, मस्त रे !!
8 Apr 2011 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे
लईच भारी हाय ब्वॉ व्हायब्रेटर! कुठ कुठ यीन काय कळानी ब्वॉ!