सजदा..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
21 Mar 2011 - 10:25 pm

माय नेम इज खान सिनेमातलं एक वेगळंच गाणं. सुफी संगीताची पार्श्वभूमी असलेलं..

(येथे ऐका)

रोम रोम तेरा नाम पुकारे
एक हुए दिन रैन हमारे..

मिश्र खमाज म्हणता यावा अशी गाण्याची खानदानी सुरवात. (चूभूदेघे.)

'सजदा..'

ख्यालसंगीताची उत्तम बैठक असलेला राहत फतेचा आणि रिचा शर्माचा अविष्कार. आवाजाची जात, फेक ही सारी सुफी गायकीत जमा होणारी. सुरवतीची बोल आलापी संपल्यानंतर गाणं छानशी लय पकडतं..

तेरी काली अखियोसे जिंद मेरी जागे
धडकन से तेज दौडू सपनो से आगे..

शब्द आणि त्यांचा लहेजा उत्तमच..

अब जा लुट जाए
ये जहा लुट जाए..

यातली 'जहा' शब्दावरची जागा आणि गायकी खानदानी..! इथून पुढे गाणं केरव्याची छान लय पकडतं...

'संग प्यार रहे मै रहू ना रहू...'

या ओळीतली सुरावट म्हणजे या गाण्याचा प्राण, त्याचं मर्मस्थान. 'संग..' शब्दातली 'रेम'म' संगती आणि 'रहू ना रहू..' मधली 'रेग, गमधपरेसा..' ही संगती केवळ अप्रतिम..! त्यानंतरचा 'सजदा..' चा कोरसही सुरेख. त्याच्या पार्श्वभूमीवरील सजदा शब्दाची तार शड्जाशी संगती करणारी बोल आलापी आणि गायकी उत्तमच..

रिचा शर्मा या गायिकेची जोडही उत्तम. बाईनं खानदानी आवाज लावला आहे. नक्कीच सुरेल आहे. ही दुगल गाण्याला आवश्यक आणि तेवढीच शोभूनही दिसणरी..

एकंदर पाहता गाण्याला लाभलेली अभिजात गायकीची बैठक नक्कीच कौतुकास्पद आहे..शंकर एहेसान लॉयचं कौतुक वाटतं..

रांझणा नैनो के तीर चल गये
साजना सासो दिल सिल गये..

यातला शुद्ध मध्यम नेहमीप्रमाणेच अद्भूत आणि सुख देणारा..

शाहरुख हा इसम आवडतो मला. लेकाचा तसा प्रो मुस्लिम आणि पाक-धार्जिणा वाटतो पण आवडतो मला. हा प्राणी टॅलेन्टेड आहे हे माझं मत. आणि आमच्या तनुजाच्या काजोलबद्दल काय बोलू? लै आवडते ती मला. हल्लीच्या नट्यांपैकी अभिनयाच्या बाबतीत एक तब्बू मला पयला नंबरवर आवडते आणि त्यानंतर काजोल. काजोलच्या चेहेरा विलक्षण बोलका आहे. तिचे यजमानही मला आवडतात. गंगाजल मध्ये छान काम केलं होतं त्यांनी..!

असो, सिनेमाच्या गप्पा पुन्हा केव्हातरी. तूर्तास सजदा हे गाण ऐका. छानच गाणं आहे..

-- तात्या अभ्यंकर.

संगीतचित्रपटप्रतिक्रियाआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Mar 2011 - 10:48 pm | निनाद मुक्काम प...

विसोबा चांगलेच रसग्रहण केले आहे .

आमच्याकडे अनेक अफगाण आणी पाकिस्तानी निर्वासित पडेल ती कामे करतात .( ह्यांचे कुटुंबीय युद्धात शहीद झाले आहेत .हे जीव वाचवून येथे आले आहेत .त्यामुळे संगीत व आपले सिनेमे हाच त्यांच्या विरंगुळ्याचा एकमेव आधार )
त्यांच्या मोबाईल ची कॉलर ट्यून हेच गाणे असते .

तुमच्यामुळे मला अगम्य वाटणाऱ्या ह्या शास्त्रीय संगीताच्या विश्वाची उकल होत आहे .

गोगोल's picture

21 Mar 2011 - 10:51 pm | गोगोल

> लेकाचा तसा प्रो मुस्लिम आणि पाक-धार्जिणा वाटतो
एका मुस्लिम माणसानी प्रो मुस्लिम असणे यात वाईट ते काय?
पाक-धार्जिणा कशावरून?
> हा प्राणी टॅलेन्टेड आहे हे माझं मत
हा प्राणी बिल्कूल टॅलेन्टेड नाही हे माझं मत
> हल्लीच्या नट्यांपैकी अभिनयाच्या बाबतीत एक तब्बू मला पयला नंबरवर आवडते आणि त्यानंतर काजोल.
हल्लीच्या शब्दाला आक्षेप. या नट्या काकूबाई असून ९० च्या पुर्वाधातील आहेत.

पक्या's picture

21 Mar 2011 - 11:04 pm | पक्या

छान रसग्रहण. आवडले.

>>हा प्राणी टॅलेन्टेड आहे हे माझं मत
सहमत आहे.

मन१'s picture

22 Mar 2011 - 9:12 am | मन१

हे गाणं माझही आवडतं आहेच.( शास्त्रीय वगैरे कळत नाही. कानाला गोड वाटेल ते ऐकतो)
गाण्यातले (शब्द नव्हे!) स्वर खुलवुन सांगयची शैली आवडते ब्वॉ आपल्याला.

बाकी, गोगोल शी सहमत

सूफी गाण्यापैकी सर्वात जास्त आवडतं ते चक दे इंडियामधलं "मौला मेरे ले ले मेरी जान "
http://www.youtube.com/watch?v=kpp6rUOLHXg इथ बघु शक्ता.

पलाच मनोबा.

चिंतामणी's picture

22 Mar 2011 - 9:59 am | चिंतामणी

फोटो टाकलेत. मग हे सुद्धा टाकायचे ना.

असो. मी टाकतो आता.

माफ करा हो तात्या. वरच्या लिंकमधे फक्त फोटोच दिसेल काजोलचा (आणि शाहरूखचा). आणि गाणे ऐकता येइल.
येथे बघा आणि ऐकासुद्धा.

(मी आपली तुनळीच्या लिंकांची भर घातली बर का.)

आपले लिखाण/रसग्रहण उत्तम

सुफी पद्धतीची गाणी गायकीच्या बाबतीत नेहेमीच इतरांपेक्षा वरच्या दर्जाची वाटतात (हे माझे वैयक्तिक मत आहे.)

मुलूखावेगळी's picture

22 Mar 2011 - 1:26 pm | मुलूखावेगळी

+१००

परमेश्वराला गवसणी घालण्याची ताकत सुफी कलाममध्ये आहे . कारण या संगीत अन काव्याला इश्वरी वरदान आहे .
तात्या ,रसग्रहण नेहमीसारखेच सु-रे-ख !

ज्ञानेश...'s picture

22 Mar 2011 - 10:32 am | ज्ञानेश...

रसग्रहण आवडले. गाणे आवडते आहेच.

स्वरांचा बाबतीत फारसे काही कळत नाही, पण एकंदर गाणे कानाला गोड वाटते. गुणगुणत रहावेसे वाटते. पण कुठल्याही गाण्याच्या शब्दांकडे लक्ष देण्याची जुनी खोड असल्यामुळे- त्या आघाडीवर या गाण्यात हाती फारसे काही लागत नाही असे माझे मत आहे. स्वरांच्या तंबूला टेकू म्हणून शब्द वापरले गेले आहेत असे वाटते.

स्पंदना's picture

22 Mar 2011 - 10:38 am | स्पंदना

मला सुफी गायकी आवडते.

लय दिसान तात्या?

कच्ची कैरी's picture

22 Mar 2011 - 1:17 pm | कच्ची कैरी

मलाही आवडते :)

तात्या स्वतः एक सुफी सिंगर आहेत असे वाटते. पण केवळ क्लासिक गाण्यांचे रसग्रहण करण्या पेक्षा लोकगीतांचेही रसग्रहन येऊ द्यावे .
"वाट बघतोय रिक्षावाला " , " कालंच माझा झालाय पगारा " , " तुझी घागर नळाला लाव " किंवा " मला रेतीवाला नवरा पायजेल " इत्यादी गाने रसग्रहावीत अशी विणंती जाता जाता करु इच्छितो.
बाकी वरिल गाणे " माय नेम इज खान " मधले असल्यामुळे ऐकले नाही कधी

- सुफोबा सिंगर

प्रकाश घाटपांडे's picture

22 Mar 2011 - 5:26 pm | प्रकाश घाटपांडे

तुझी घागर नळाला लाव हे फटुन रसग्रहन केल्याल आठावलं.

टिलू's picture

22 Mar 2011 - 5:00 pm | टिलू

'अन्वर' चित्रपटातील सुफी पद्धतीची सगळी गाणी छान आहेत. 'जावेदा झीन्दगी' तर जबरदस्तच !! तसेच नुसरत फतेह आली खान ची गाणी !! अहाहा!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Mar 2011 - 7:15 pm | निनाद मुक्काम प...

अन्वर ह्या सिनेमाच्या निमित्ताने आठवले .

लंडनला आमच्या बरोबर बरेच मित्र सवंगडी हे केवळ आर आर ह्यांच्या निर्णयामुळे नाईलाजाने दोन वेळचे कोक /बर्गर / पिझ्झा खायला परदेशात शिक्षणासाठी आले होते
.(त्यांच्या नर्तन मधुशाला थंड पडल्या होत्या .)
भारतात आल्यावर आता तेथे फक्त संगीताचे कार्यक्रम होतात .पण गाणाऱ्यांना नोटांची माळ व , इतर प्रकार सर्रास व्हायचे .
माझ्या मित्रांच्या मालकीच्या अश्याच एका मधु शाळेत जाणे झाले .( येथे कॉफी ही बियर पेक्षा महाग असते म्हणून ती मागवली )

काही नवजात गायिका भसाड्या आवाजात गाणी गायल्यावर लगेच फुले उधळण्यात आली .
मग तो आला .
हिरोसारखा दिसणारा एक तरुण
तो आल्यावर एकदम सन्नाटा ( तो मैफिलीची सुरवात ह्या गाण्याने करतो हे सर्वाना ठाऊक )

आणी त्याने'' मौला मेरे मौला ....
तेरी''................. .
त्यांचे गाणे ,ती सादर करण्याची पद्धत व त्याचा जीव ओतून गाणे सादर करणे ..
( ह्या गाण्याला २० हजार तरी सहज .....) आमच्या मित्राने धंद्यांचे गणित सांगितले .
दिवसा हा इसम अनेक ठिकाणी बॉलीवूड मध्ये वर्णी लागावी म्हणून पायपीट करतो
.
व रात्री येथे पहाटे पर्यत गातो .( आणी हा नियमित रियाझ सुद्धा करतो असे कळले )
मी त्याची स्वाक्षरी घेतली .
'' एक दिन तुम जरूर बडे स्टार बनोगे ,फिर तुम्हे फुरसत कहा होगी ''
माझ्याकडे पाहून तो हसला .
अजूनही त्यांचे स्वर कानात गुंजतात .

टारझन's picture

22 Mar 2011 - 9:02 pm | टारझन

ह्या प्रतिक्रीयेचे रसग्रहन करुन देणारास म्हणेल ते इनाम दिल्या जाईल .

-( हतबल ) संविधान मुक्काम पोष्ट संसद

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Mar 2011 - 9:12 pm | निनाद मुक्काम प...

एक बाईक देणार असला तर मीच करतो

ह्या प्रतिसादाच्या दुप्पट
आफ्रिकन मुक्काम पोस्ट.....

संजय अभ्यंकर's picture

27 Mar 2011 - 11:09 am | संजय अभ्यंकर

बरेच दिवस मिपावर यायला फुरसत नव्हती.
आज येऊन आपला व चिंतामणीजींचा उषा खन्ना वरचे लेख वाचले.

फार आनंद झाला.

हल्ली नविन चित्रपटात उत्तम गाणी अभावानेच येतात.

अप्पा जोगळेकर's picture

27 Mar 2011 - 3:00 pm | अप्पा जोगळेकर

भारीच. 'बहारा बहारा' या गाण्याचे रसग्रहण्सुद्धा वाचायला आवडेल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Mar 2011 - 3:26 pm | निनाद मुक्काम प...

हेच म्हणतो
एरवी गाणी नुसती कानावर पडतात .
त्याचा अर्थ समजला तर त्या गाण्यातील भावार्थ थेट काळजात उतरतात .