"तोसे नैना लागे पिया साँवरे... नहीं बस में अब ये जिया साँवरे.. "... कसलं सुंदर song आहे ना..
तसही तुझ्या चेहऱ्यावरून नजर हलतच नव्हती!! अजूनही तेव्हडीच ओढ.. अजूनही तुला बघून बाकी सगळं विसरणं..
मला वाटलं.. नक्कीच काहीतरी ठोस कारण असावं..
तुला काळजी आहे माझी म्हणून कदाचित नसेल सांगत मला.. आणि तसं नसेलही तरी तुझी काही चूक नाहीच ह्या सगळ्या गोंधळात..
आठवलं मला.. तू मला कधी commit केलं नव्हतंच !!
मीच सगळं काही गृहीत धरून चालले होते.. पहिल्यांदाच होतं ना हे सगळं..
तरीही तू मला हे सगळं समजवायची माणुसकी दाखवलीस.. नाहीतर मी काय केलं असतं? जर कुणा दुसऱ्याकडून मला हे कळलं असतं तर? मी माझ्याच नजरेत पडली असती.. परत कधीही न उठण्यासाठी !!
तू माझ्या त्या कुंकवाशिवाय च्या दिवसांत आनंदाचे गोफ गुंफायला आलास.. सगळ्यांनी दूर सारलं, तेव्हा तू मला आपलंस करून घेतलंस.. मला प्रेम करणं शिकवलंस.. आणि मला भरभरून प्रेम दिलंस..
मी तर स्वतःलाच पारखी झाले होते.. तू मला स्वतःबद्दल प्रेम करायला शिकवलं..
तुझं नेहमीच बरोबर होतं.. तू नसतास, तर मला कळलंच नसतं,
ते कोवळं उन्ह.. ती श्रावणसर.. ते वाट बघणं.. ते हातात हात घेणं.. त्या अक्ख्या ४ वर्षाच्या college life मध्ये, मी कधीच ccd ला गेले नव्हते.. माझं first time ccd मध्ये, तुझ्यासोबत जाणं.. ते cappuccino share करणं.. कसलं सुख असतं, हे जाणून असणं, कि तू आहेस.. कधीही, केव्हाही, कुठेही...
ती पहिल्या पावसातली ओली रात्र, प्रीतिचीच जास्त.. ! चिंब भिजवणारा पाउस.. तो मिठीतला बहर.. ते ओठांवर ओठ..
आजही जेव्हा पाउस माझ्या पायरीशी उतरतो.. त्या रात्री एवढंच सुख देऊन जातो..
आजही त्या प्रत्येक थेम्बासोबत, मन तेव्हडंच भरून येतं, तेव्हडंच आसुसतं तुझ्या एका झलकेला .. परत तुझ्या मिठीत सामायला..
तू चुकलास हे मानायला आजही मन तयार नाही माझं.. त्या वेळेस तू जे काही करू शकलास ते तू केलंस.. infact जास्तच केलंस.. कारण तुलाही थोड्या का होईना, feeelings होत्या माझ्याबद्दल.. आजही असतील..
मी आयुष्यात सावरावे म्हणून खूप काही केलंस तू.. आजही करतोय, मला न कळवता.. माहित आहे मला, तुझी रोजच्या prayers मधून, एक prayer नक्कीच माझ्यासाठी राखून ठेवलेली असते .. आणि ती नेहमीच राहणार! फ़क़्त माझी, माझ्याचसाठी, तू केलेली..
मी स्वतःलाच कवटाळते, स्वतःच्याच मिठीत सामावते मग.. माझा मलाच खुलासा करत..
तुला समजून घ्यायचा प्रयत्न करत. sandwich संपतं.. starting miss नको व्हायला म्हणून दोघंही निघतो..
डोळ्यांनी अन हातानी एकमेकांशी बोलत..
सगळं कसं, एका तनहाईत, नको असलेल्या लांब रात्रीसारख चाललं होतं.. 'बड़ी लम्बी चली ये रैना.. धुवा धुवां नैना...'
आता खरं तर दोघांना फ़क़्त साथ हवाय, निशब्ध.. मनाशीच बोलायला.. एकमेकांना परत एकदा नव्याने समजून घ्यायला..
--वैशाली
P.S. : ह्या मालिकेतील सगळी पात्र काल्पनिक आहेत !! :)
(क्रमशः)
प्रतिक्रिया
14 Mar 2011 - 7:46 pm | रेवती
वाचतिये.
14 Mar 2011 - 8:07 pm | गणेशा
याचा संधर्भ थोडा अधीक देता का ?
--------
14 Mar 2011 - 10:13 pm | नगरीनिरंजन
>> मी माझ्याच नजरेत पडली असती.. परत कधीही न उठण्यासाठी !!
आवरा! मी माझ्याच खुर्चीतून पडलो हो हे वाचताना पण सुदैवाने लगेच उठलो, म्हणजे तुम्ही समजता तसा नाही, उठून उभा राहिलो.
14 Mar 2011 - 10:26 pm | प्रास
सॉरी...... वाटत तरी नाही......
16 Mar 2011 - 2:46 am | किशोरअहिरे
मुली अश्या नसतातच..
म्हणजे कमीत कमी माझ्या तरी बघण्यात नाही..
मुल मात्र वरती नमुद केल्याप्रमाने जास्ती चे भाऊक असतात असे बघण्यात आहे :)
बाकी लिखान चालु द्या वाचतो आहे..
15 Mar 2011 - 6:07 pm | ५० फक्त
पहिल्या का दुस-या भागाला कुणितरी प्रतिसाद दिला होता ना, नायिका शेवटी मनोरुग्णालयात जाणार. त्याच्या बोटावर काळा ती़ळ आहे असं वाटायला लागलंय.
चांगलं लिहिताय, पण वर गणेशा म्हणतो तसं संदर्भ लागले नाहीत तर, नुसतेच डायलॉग वाटत जातील. अशा एका वाक्यांचा गणेशाचा पण एक धागा आहे तो आठवला.
असो, चालु द्या, तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.
15 Mar 2011 - 6:07 pm | वपाडाव
डेंजरच फीलिंग्स आहेत हो तुमच्या नायिकेबद्दल नायकाला.....
बाकी रटाळ होत आहे आता हे.....
क्रमश: नकोय आता....
KOFFEE WITH KARAN संपवा....
NO HARD FeeeeLINGS....