अजूनही.. ४ वर्षानंतर.. असंच शून्यात बघत असताना.. मनात एकाच.. नेमकं काय कारण असावं तू मला सोडल्याचं?.. उत्तर मिळालं नाही मला अजून.. हो, रोज एक हमखास नवीन प्रश्न न चुकता येतो मनात !!
का सोडलं असावं तू मला !!
असो. तुला आणि मला.. दोघांनाही माहित नव्हतं कि आता पुढे काय... उगीच रस्त्यांवर चक्कर टाकणं चालू होतं..मला कळतंच नव्हतं तुला घट्ट मिठी मारू कि मागे सरकून बसू.. थोडी जास्तच भावूक मी तुझ्यासाठी.. तुला माझ्या मिठीत सामावण्याचा प्रयत्न केला.. आता माझा स्पर्शही तुला परका झाला का रे?
मनात उगीच त्या कुण्या शायर च्या ओळी आठवल्या... "रस्तेका पत्थर किस्मत ने मुझे बना दिया .. जो रास्तेसे गुजरा .. ठोकर मुझे लगा गया !!"
आपण जात होतो... मी पण नाही विचारलं कुठे.! खरं तर, तुला हि उत्तर माहिती नव्हतं.. बरोबर ना?
मला नक्की आठवत नाही आत्ता.. नेमकं infinity ला गेलो होतो कि अंधेरी स्टेशन च्या बाहेर च्या Mac D ला? सगळा काही असूनही नसल्यासारखं होतं..
एक-एक गोष्ट मला आठवायला लागली.. तू तेव्हा असं का वागलास.. तसंच का केलंस.. याचा बहुतेक प्रत्यय येऊ लागला.. मग सगळ्याच प्रश्नांचं उत्तर शेवटी "I'm getting engaged .." ला येऊन पोचलं... ती लाट अशी उसळी घेऊन परत समुद्रास मिळून गेली.. आणि मी.. कोरडीच !!
आठवलं.. infinity ला च गेलो होतो आपण.. actually , cinemax ला गेलो होतो.. movie ला वेळ होतं, म्हणून मग वेळ घालवण्यासाठी food court निवडलं आपण.. नव्हे, तूच !!
sandwitch आलं.. तू घेऊन आलास.. दोघांकडेही बोलण्यासारख काही नाही.. उगीच मला भरवू लागलास.. शेवटचंच होतं ते सगळं.. माझे सुखाचे क्षण तुझ्याने बघवतच नाही का?? पण guts म्हणावे लागतील तुझे..
विचारतोस कसा, "नाम नहीं पूछोगी ??" तू भरवलेला घास तसाच अडकला.. भोवतालच सगळं काही स्तब्ध झालं.. क्षणभर वाटलं श्वास हि थांबतोय का माझा?? तो घास मला गिळायालाही होईना... तसंच ढकलला आत!!
तू नाव सांगितलस.. तुला एक खड्कन वाजवावी असं वाटून गेलं !
ती जखम अजून ओलीच होती रे.. लगेच मीठ चोळायची घाई तुला!!
ती तीच ना.. लहानपणी कधीतरी तुला तिच्यावर प्रेम आलं होतं?? पाणी भरून आलं डोळ्यात.. अन खळकन ते गालावरून वाहून गेलं.. तुझ्यासाठी कधी ते अश्रू होते.. माझ्यासाठी नेहमीच पाणी ..
असं कितीदा प्रेम झालं तुला .. सांगशील का मला??
माझा हात हातात धरलास तू.. समजाऊ लागलास.. मी समजणार होते का? तू तरी मला पूर्णपणे समजाऊ शकला असतास का?? मी बघत होते तुलाच.. तू म्हणालास, "आप ऐसे मत देखो, please .. " काय झालं? guilt वाटत होती? कि मला परत एकदा फुसलवायचा प्रयत्न होता तुझा..
काहीही असो!
माझ्याकडे तर काही नव्हतेच उत्तरायला !! मनात येऊन गेलं.. was this the reason , you never introduced me to your parents ?? " कधी मला तुझ्या group मध्ये शामिल नाही केलंस ?
निव्वळ timepaas का मी होते?
पण तरीही, तुझ्या चेहऱ्यावरून नजर हलतच नव्हती!! तू सोबत असलास म्हणजे सगळा कसं perfect असणार.. आणि नसलं, तरी तू सगळं काही व्यवस्थित करशील..
screen अस्पष्ट दिसत होती.. कळलेच नाही मला का ते? गालावर हाथ फिरवला तेव्हा कळलं.. डोळे भरून आले होते माझे.. सगळं कसं स्पष्ट आणि लक्ख आठवतंय आजही मला..
अजूनही, तेव्हडाच भाबडा विश्वास आहे माझा तुझ्यावर!!
मनात असाच परत एकदा येऊन गेलं.. "मेरी किस्मत में तू नहीं शायद.. में तेरा इंतज़ार करती हु.. कल मेरा इंतज़ार था तुझको.. आज में इंतज़ार करती हु !!. "
--वैशाली
P.S. : इस घटना के सभी पत्र काल्पनिक है !! इस घटना का किसीभी जीवित या मृत व्याक्तिसे कोई लेना - देना नहीं !! :)
(क्रमशः )
प्रतिक्रिया
12 Mar 2011 - 7:25 pm | रेवती
काल्पनिक आहे ना? मग ठिक आहे.
नायतर त्या दोघांचं आयुष्य मला शिनेमाष्टाईल वाटायला लागलं होतं.;)
दुसर्या भागालाही क्रमश: पाहून मानलं तुम्हाला.
मला असं भावनिक काही लिहायला जमत नाही.:)
13 Mar 2011 - 4:36 pm | नगरीनिरंजन
पहिला भाग छान होता. हा जरा फिल्मी वाटला. शिवाय शेवटी तो म्हणेल की तुझ्याशीच एंगेज होतोय असं वाटू लागलंय.
14 Mar 2011 - 11:39 am | वपाडाव
मी पण हेच म्हंतोय....
पण कदाचित माझ्यावर सिनेमाचा जास्त प्रभाव असावा म्हणुन या निर्णयाप्रती येउन पोचलोय असं वाट्टं...
आपणही बॉलीवुड सिनेम्यांचे पंखे आहात का?
-(मायानगरीसे प्रभावित)इश्क का मंजन
14 Mar 2011 - 7:14 pm | वैशाली .
हो.. :)
12 Mar 2011 - 7:31 pm | sneharani
मस्त्...पहिल्या भागासारखच जमलयं!
12 Mar 2011 - 7:35 pm | वैशाली .
:) धन्यवाद.. !!
12 Mar 2011 - 7:54 pm | डावखुरा
सुरेख...गुंफण>>आयुष्याची-नात्यांची अन् शब्दांची...
पुलेशु.
याने दिलासा मिळाला...
12 Mar 2011 - 7:56 pm | वेताळ
मनात असाच परत एकदा येऊन गेलं.. "मेरी किस्मत में तू नहीं शायद.. में तेरा इंतज़ार करती हु.. कल मेरा इंतज़ार था तुझको.. आज में इंतज़ार करती हु !!. "
बहुधा नायिका शेवटच्या भागात मनोविकास केंद्रात वास्तव्याला जाणार असेच दिसते.
12 Mar 2011 - 10:42 pm | कोमल
मस्त जमलं आहे...येउदे आणखी लिखाण...वाचत आहे...
12 Mar 2011 - 10:49 pm | प्रीत-मोहर
पुलेशु
13 Mar 2011 - 1:44 pm | निनाद मुक्काम प...
त्याच्या सत्याच्या प्रयोगाला दाद दिली पाहिजे .
तिला हे खरे कारण न सांगता इतर कोणतेही कारण सांगून त्याने वेळ मारून नेली असती .
त्याने नायिकेला कधी काळी आपले आधीचे प्रेम अयशस्वी झाल्याची कबुली दिली होती .( असे कथेतून कळते .)
आज ते प्रेम आपण परत मिळवले आहे .हे सांगताना त्याचा पुरुषी इगो सुखावला असणार .
13 Mar 2011 - 2:40 pm | पियुशा
छान लिहिलय
आव्ड्ल!
13 Mar 2011 - 6:22 pm | VINODBANKHELE
इस घटना के सभी पत्र काल्पनिक है !! इस घटना का किसीभी जीवित या मृत व्याक्तिसे कोई लेना - देना नहीं !!
खोटे बोलतेय वैशाली ,,,,
ती तिच आहे............
14 Mar 2011 - 7:12 pm | वैशाली .
बरर्र..
तुम्ही लेखन एन्जोय करा म्हणजे झालं :)
13 Mar 2011 - 11:36 pm | माझीही शॅम्पेन
पत्र काल्पनिक आहे मग ठीक आहे मला वाटला सगळी पात्र काल्पनिक आहेत की काय ?
बाकी हा भाग अजिबात आवडला नाही , सचिननि सोन्यासारखी डावाची सुरवात करून द्यावी आणि मधल्या फलंदाजानी हारकिरी करावी तस वाटल.. बघुया टेल-एंडार काय करतात ते....:)
14 Mar 2011 - 7:17 pm | वैशाली .
चालायचंच.. :)
आम्ही नवीन आहो या क्षेत्रात..
नेहरा किंवा चावला नाही होऊ देणार यासाठी नक्कीच प्रयत्नशील असू.. :)
14 Mar 2011 - 10:19 am | ५० फक्त
मा. पुलंचे राबसाहेब म्हणतात तसं, बायकांच्या आडियन्सला रडवण्यासाठी, लिहिल्यासारखं वाटलं. त्यातपण ते मधले मधले हिंदी डायलॉग व शेवटचे हिंदि डिसक्लेमर, खटकलेच.
+ १ माझीही शॅम्पेन, अगदि बरोबर वर्णन केलंस. असो, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत, तो भाग आशिष नेहरा निघु नये म्हणजे मिळवली.
14 Mar 2011 - 5:26 pm | वाहीदा
खरे तर या कथानकाती नायिकेचा मला प्रचंड राग आला आहे
अन जर हि लेखिका वैशाली असेल तर तिला Personally भेटायला नक्कीच आवडेल
का बसलीस तू परत त्याच्या बाईक ?? अन का परत गेलीस तू त्याच्यासोबत ??
अश्रू पूस अन डोळे उघडून निट बघ ... आहे का त्याला तुझ्या भावनांची किंमत ??
माणसांची पारख नाही आहे का तुला ??
हे रागावणे एका मैत्रीणीचे दुसर्या मैत्रिणीसाठी होते
बाकी ,
तुमची मर्जी ...
14 Mar 2011 - 6:09 pm | गणेशा
वाहिदा बरोबर बोललात ..
मला पण त्या नायिकेचा खुप राग आला अहे. असल्या मॅड मुलींमुळेच मुले त्यांच्या भावनांची कदर करत नाहीत ..
पण असे नायिकेबद्दल राग येने म्हणजेच ही कथा आवडली .. आपल्या अवतीभोवतीच घडते आहे हे कथा असे वाटते आहे..
शब्द शब्दात खरे पणा जाणवतो आहे ..
लिहित रहा .. वाचत आहे...
14 Mar 2011 - 7:22 pm | वैशाली .
अगदी बरोब्बर !! :)
14 Mar 2011 - 7:25 pm | स्वछंदी-पाखरु
वै तै,
छान लिहिल आहे
एकदा जमलच तर आजच 'Letters to Juliet ' नावचा चित्रपट बघा. माझा आवडता चित्रपट आहे. तुमच्या कहाणीच्या शेवट मधे काह इमदत होईलच.
स्व. पा.
14 Mar 2011 - 7:32 pm | वैशाली .
नक्की वाचेन..
या कहाणीचा शेवट already लिहून टाकलाय मी.. post करणं तेव्हड राहिलंय..
धन्यवाद.. :)