traffic मधून वाट काढत.. असंच sidela नेलंस.. कसला bore रस्ता होता तो! मला एक क्षण कळलंच नाही, का उतरायला लावलास तू मला bike वरून!
मी विचारणार तुला.. तेवढ्यात..
कसं सहज म्हणून गेलास .. “I'm getting engaged..”
चेहऱ्यावर शून्य भाव! मी तर हादरलेच.. पायाखालची जमीनच सरकली माझ्या.. असं कसं म्हणू शकतोस?
तू.. मी.. आपण.. काही काही नाही विचार केलास? माझं तर सर्वस्वच नेलं तू! काही कळायच्या आत सगळं काही संपवून टाकलं !! खचायलाही जागा उरली नाही मला.. कसा घेतला कसा हा निर्णय तू?
त्या मागच्या मंदिरात कुणीतरी जोर-जोरात घंटा वाजवल्याचा भास झाला मला !! कुणीतरी सपकन कानाखाली चपराक काढली असं वाटलं...
म्हणे मला भेटायचंच होतं तुला!! अरे, जर मी आग्रह नसता धरला, तर तू मला कधी भेटलाच नसतास !! माझ्या इच्छा, अपेक्षा, भावना.. सगळ्यांनाच सरणावर घेऊन गेला असतास .. माझ्या मनाविरुद्ध!!
मला काय हवंय , माझा काय मत.. विचारच नसेल केलास तू! बस, सांगून मोकळा!! नंतर मी म्हणायला नको, तू उशिरा सांगितलस मला म्हणून!
असं होतं का रे? एवढी मी नगण्य!!
तुझ्या एवढ्या मोठ्या निर्णयात माझा खारीचाहि वाटा नाही ??
माझ्या आयुष्याबद्दल एवढा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा हक़्क़ मी तुला कधी देऊन टाकला हे माझं मलाच कळलं नाही!! त्याचा तू असं काही वापर करशील हे खरंच माझ्या ध्यानी नव्हतं!
traffic हळू-हळू पुढे सरकत होती.. मी अशीच तुझ्याकडे बघत.. अन तू.. माझ्याकडे बघूनही मला न बघू शकलेला !!
तुला वाटलं असेल, मी खूप चिडेल तुझ्यावर.. जाब विचारेल तुला.. रडा-रड होईल.. आणि मग.. तू काहीतरी करून समाजावूनच टाकशील मला! नाही ?
तुझ्या शब्दापुढे एकही पाऊल न टाकणारी मी!! हे पण मान्य करायला हवंच ना मी? मला दुसरा काही पर्याय ठेवला का रे तू!!
मी निर्विकार... खरं तर कळतंच नव्हतं, हे माझ्यासोबत होतं आहे का? आणि का?? मीच का?? मी कधी ऐकलं नाही तूझं? कधी विरोध केला तुला?
कि.. तुला कधी मी जमलेच नाही !! मी नकोच होते तुला? ते खरंच फ़क़्त आकर्षण होतं तूझं? कि वेळ घालवायची होती तुला..
मी बसले परत नजर फिरवून.. माझ्याच प्रश्नात गुरफटत होते मी .. उत्तर नव्हती सापडत.. फ़क़्त प्रश्नांचा जाळ विनलं जात होतं माझ्याभोवती !!
आणि सुसाट काढलीस मग तू bike ..
माझं तुला काहीही ना बोलणं.. निमुटपणे परत bike वर बसणं .. टोचला का तुला?
त्रास झाला तुला, मी काहीही सवाल ना केल्याचा?
कि खुश होता तू? एक ब्याद टाळली म्हणून !!
अजूनही.. ४ वर्षानंतर.. असंच शून्यात बघत असताना.. मनात एकाच.. नेमकं काय कारण असावं तू मला सोडल्याचं?.. उत्तर मिळालं नाही मला अजून.. हो, रोज एक हमखास नवीन प्रश्न न चुकता येतो मनात !!
का सोडलं असावं तू मला !!
--वैशाली
प्रतिक्रिया
11 Mar 2011 - 2:05 pm | Dhananjay Borgaonkar
अजूनही.. ४ वर्षानंतर.. असंच शून्यात बघत असताना.. मनात एकाच.. नेमकं काय कारण असावं तू मला सोडल्याचं?.. उत्तर मिळालं नाही मला अजून.. हो, रोज एक हमखास नवीन प्रश्न न चुकता येतो मनात !!
का सोडलं असावं तू मला !!
:)
नका जास्त विचार करु. जेवढा जास्त विचार तेवढा जास्त त्रास.
लिखाण मस्त आहे. भुतकाळात नेलत. :)
11 Mar 2011 - 2:06 pm | प्रचेतस
.
11 Mar 2011 - 2:08 pm | नगरीनिरंजन
हे काल्पनिक असावे अशी आशा आहे. अशाप्रकारे ब्रेक अप करू शकतात माणसं?
11 Mar 2011 - 2:35 pm | सूड
>>हे काल्पनिक असावे अशी आशा आहे.
असेच म्हणतो.
12 Mar 2011 - 1:03 pm | वैशाली .
P.S. : इस घटना के सभी पत्र काल्पनिक है !! इस घटना का किसीभी जीवित या मृत व्याक्तिसे कोई लेना - देना नहीं !! :)
पुढचा भाग लवकरच.. :)
12 Mar 2011 - 1:08 pm | छोटा डॉन
>>P.S. : इस घटना के सभी पत्र काल्पनिक है !! इस घटना का किसीभी जीवित या मृत व्याक्तिसे कोई लेना - देना नहीं !!
:)
आता येऊदेत पुढचा भाग निवांत, आम्ही वाचत आहोत.
- छोटा डॉन
11 Mar 2011 - 2:14 pm | ढब्बू पैसा
मिपावर स्वागत तुझं :)
उत्कटपणे लिहिलं आहेस. पुढचा भाग येउदे लवकर!
12 Mar 2011 - 1:04 pm | वैशाली .
धन्यवाद !! :)
पहिल्याच post ला आलेला प्रतिसाद बघून भारावलेय मी.. :)
पुढचा भाग लवकरच.. :)
12 Mar 2011 - 7:17 pm | बिपिन कार्यकर्ते
वैशाली, लेखन आवडले. तुझ्याकडून अजून खूप काही वाचायला मिळेल अशी खात्री आहे.
पुढचे लेखन प्रतिसादामुळे आलेले भारावलेपण गेल्यावर कर. :)
11 Mar 2011 - 2:18 pm | माझीही शॅम्पेन
अवांतर : प्रियकर , टांगा आणि गाढव एक गेला तर दुसरा मिळतो ... :)
बाकी लेख छान ई-मेल वर किवा SMS वर ब्रेकअप करण्यापेक्षा बर आहे की
12 Mar 2011 - 1:06 pm | वैशाली .
hmmm ...
13 Mar 2011 - 11:27 pm | माझीही शॅम्पेन
हमम्म ला पास देतोय (कारण अर्थ लागला नाही)
अवांतर : PS
इस घटना के सभी प्रियकर , टांगा आणि गाढव काल्पनिक है !!
इस घटना का किसीभी जीवित या मृत व्याक्तिसे कोई लेना - देना नहीं !!
11 Mar 2011 - 2:20 pm | स्पा
.......
.....
....
...
..
.
:(
11 Mar 2011 - 2:20 pm | स्पंदना
किती ही आतल्या आत फुटली असलीस तरी बाह्य जगा साठी तु दृढ उभी आहेस.
तस पण रडुन भेकुन त्याला समाधानच मिळाल असत. एक अहंकार कुरवाळला गेला असता.
मी असते तर परत बाइक वर नसते बसले, पण तुझ कम्प्लिट भांबावुन जाण समजत मला.
विसरु म्हंटल तरी विसरण शक्य नाही हे समजतय, चल पुढे चालत रहा, हा अनुभव गाठीशी बांधुन, पण चालत रहा.
अन ही जखम फारशी उघडुन नको दाखवु कोणाला, इथे ठीक आहे, पण जिथे तुला 'तु' म्हनुन ओळखतात तिथे.
त्याला तर जखमी म्हणुन नकोच सामोरी जाउ पण तुझ्या भावना काय होत्या हे स्पष्ट कर.
12 Mar 2011 - 1:16 pm | वैशाली .
धन्यवाद !! :)
P.S. : इस घटना के सभी पत्र काल्पनिक है !! इस घटना का किसीभी जीवित या मृत व्याक्तिसे कोई लेना - देना नहीं !! :)
मला वाटतं, माणसाने आयुष्यात थोडासा optimistic असावं.. काय माहित.. ती त्याला मनवून घेईल पुढच्या भागात.. !!
त्याने नाही सांगितलं कि, "Let 's break -up ".. तो फ़क़्त म्हटलाय कि "I 'm getting engaged .."
पुढचा भाग लवकरच.. :)
11 Mar 2011 - 2:22 pm | जातीवंत भटका
मिपावर स्वागत आहे !!
मस्तच लिहिले आहेस...
वाट बघतो आहे पुढच्या भागाची...
12 Mar 2011 - 1:17 pm | वैशाली .
धन्यवाद !! :)
पुढचा भाग लवकरच.. :)
11 Mar 2011 - 2:33 pm | मुलूखावेगळी
छान लिहितेस.
पुढचा भाग काय असेल वाचायला उत्सुक.
11 Mar 2011 - 3:54 pm | नन्दादीप
+१.
असेच म्हणतो.
11 Mar 2011 - 6:35 pm | निवेदिता-ताई
+१००
11 Mar 2011 - 2:47 pm | ५० फक्त
वैशाली, हे जर खरं नसेलच आणि असेल तर इथला टवाळांचा क्ल्ब जॉईन कर,
असो, एक विचार कर तुझ्यापुढं / तुझ्या नायिकेपुढं बाकी पर्याय अजुन पण आहेत, खंबिरपणे उभी राहिली तर , उर्मिलेनं काय केलं असेल ?
आणि जर खरंच खरं असेल तर हे असं जगापुढं मांडु नकोस, श्राद्धाच्या पिंडाला आणि पडलेल्या चिमणिच्या पिल्लाला एकाच मजेनं टोचे मारणारं जग आहे हे.
11 Mar 2011 - 4:33 pm | डावखुरा
सहमत..
जर खरी असेल तर देव तुला धैर्य देवो..
आणि जर स्वयंरचित असेल तर अजुन पुढचे भाग वाचायला आवडतील तेव्हा मनसोप्त लिहीत रहा...
मिपावर स्वागत....पुलेशु
12 Mar 2011 - 1:22 pm | वैशाली .
धन्यवाद !! :)
P.S. : इस घटना के सभी पत्र काल्पनिक है !! इस घटना का किसीभी जीवित या मृत व्याक्तिसे कोई लेना - देना नहीं !! :)
आणि जरी कुणासाठी हे खरं असेल, तरीही.. I feel , ज्या व्यक्तीने हे सोसलं, त्याला जगाची बोलणी matter नाही करत ..
पुढचा भाग लवकरच.. :)
11 Mar 2011 - 3:12 pm | सुहास..
आवडली ब्रेक-अप स्टोरी
11 Mar 2011 - 3:20 pm | इरसाल
भावनाशिल.................................
11 Mar 2011 - 3:50 pm | वपाडाव
खरंच हे असं उघडेपणाने दु:ख मांडलं की त्या जखमेला खुरडणारे लोकंच जगात जास्त आहेत.
असो. पण नायिका पुढं काय स्टँड घेणार यावर विचार करत आहे.
11 Mar 2011 - 4:15 pm | sneharani
मस्त लिहलय!!
11 Mar 2011 - 4:31 pm | इन्द्र्राज पवार
".....का सोडलं असावं तू मला... !!
४ वर्षानंतरही तिला नेमकं काय कारण होते हे समजलं नसेल तर आता इथून पुढील काळात ते समजेल अशा भाबड्या आशेत का राहावे? आणि समजा जरी समजले तर त्याचे निराकरण करण्यासाठी ती त्याच्याकडे जाईल?.....जाऊही नये.
आज चार वर्षानंतरही कथनातील 'ती' शून्यवत बसली आहे, त्याच्या आठवणीच्या दुनियेत तर ही बाब नक्कीच स्पष्ट करते की तिच्या दृष्टीने तो सर्वस्व तर होताच पण आजही तिच्या प्रेमाची धार यत्किंचितही कमी झालेली नाही. याचाच अर्थ असा की, अगदी या क्षणाला तो तीच बाईक घेऊन तिच्यासमोर आला तर ही चटकन मागचापुढचा विचार न करता पिलिअनची जागा घेईल आणि पुनश्च एकदा त्याच जुन्या विश्वासाने त्याच्या खांद्यावर हात ठेऊन तो जिथे नेईल तिथे जाईल.
~ हे धोकादायक होऊ शकेल....नायिकेने इतक्या वर्षानंतर तो रस्ता विसरणे तिच्या भविष्यासाठी फार गरजेचे आहे.
[आशा आहे की, 'ती, तो, आणि तो संवाद....' काल्पनिक असावे.]
इन्द्रा
12 Mar 2011 - 1:26 pm | वैशाली .
aah !!
आशेवरच जग चालते..
P.S. : इस घटना के सभी पत्र काल्पनिक है !! इस घटना का किसीभी जीवित या मृत व्याक्तिसे कोई लेना - देना नहीं !! :)
पुढचा भाग लवकरच.. :)
11 Mar 2011 - 5:44 pm | पर्नल नेने मराठे
तुमचीच स्टोरी असेल तर आम्हाला अॅड करा फेस्बुकात ;) विसरुन जाल हे दुख्ख !!!
आणी मग स्व:तलाच विचाराल काय फाजिल दुख्ख करत होते मी असे.
12 Mar 2011 - 1:20 pm | प्रीत-मोहर
हो आणि मग आमच्या शेतीतही सामिल व्हा ...;)
अवांतर: लेख मस्त ...
चुचुशी बाडिस
11 Mar 2011 - 6:02 pm | कोमल
:(
11 Mar 2011 - 6:07 pm | कवितानागेश
तात्पर्यः शून्यात बघू नये!
-आचरट माउ
11 Mar 2011 - 6:18 pm | वेताळ
मला जरा तुमच्या लेखातल्या एक दोन वाक्याच्या फक्त जागा बदलायच्या आहेत.
अजूनही.. ४ वर्षानंतर.. असंच शून्यात बघत असताना.. मनात एकाच.. नेमकं काय कारण असावं तू मला सोडल्याचं?.. उत्तर मिळालं नाही मला अजून.. हो, रोज एक हमखास नवीन प्रश्न न चुकता येतो मनात !!
का सोडलं असावं तू मला !!
कुणीतरी सपकन कानाखाली चपराक काढवी असं मला वाटत...
12 Mar 2011 - 1:29 pm | वैशाली .
सहीच.. नक्कीच !!
माझा मराठी जरा पुस्तकी आहे.. :)
11 Mar 2011 - 6:32 pm | गणेशा
लिखान टची .. मिपावर स्वागत ...
ती वाट .. वाट लावणार्याचीच का वाट पाहत आहे .. ?
स्त्री ही सर्वात शक्तीशाली कणखर आहे .. ४ वर्षा नंतर त्याने शोधले पाहिजे की का आपण अशी चुक केली होती ..
जी माझ्यासाठी.. फक्त माझ्यासाठी होती .. काही क्षणिक सुखासाठी मी का त्याग केला ..
12 Mar 2011 - 1:29 am | वेदनयन
कुठेतरी वाचल्याचे स्मरते...
"दुसर्या व्यक्तिवर प्रेम करण्यापेक्षा तुमच्यावर प्रेम करेल अशी व्यक्ति शोधा"
12 Mar 2011 - 9:20 am | श्री गावसेना प्रमुख
(ब्लँक मॅसेज)
संस्कॄती कडुन सम्रुध्धी कडे
12 Mar 2011 - 9:24 am | श्री गावसेना प्रमुख
आमच्या प्राजु मॅडम पण असच लिहीतात,
(पण त्यान्ना राग आलाय)म्हणुन सध्या लिहीतच नाही
12 Mar 2011 - 9:32 am | पिवळा डांबिस
कसं सहज म्हणून गेलास .. “I'm getting engaged..”
चेहऱ्यावर शून्य भाव
वरील एपिसोडमध्ये त्याने तिच्यावर आपले प्रेम असल्याचे कुठेही ध्वनित केलेले नाही....
तसे असेल तर हा एकतर्फी प्रेमाचा प्रकार दिसतोय! :)
अर्थात हा एपिसोड नंबर ० आहे तेव्हा पुढे येणार्या एपिसोडसमध्ये लेखिका त्याला (आता) नवीन वळण लावेल यात संशय नाही...
;)
12 Mar 2011 - 11:41 am | विनायक बेलापुरे
अजूनही.. ४ वर्षानंतर.. असंच शून्यात बघत असताना.. मनात एकाच.. नेमकं काय कारण असावं तू मला सोडल्याचं?
काय समजलं नाही बॉ !
४ वर्षापूर्वी विचारावं नाही वाटलं आणि आता अजून ४ वर्षानंतर पण शून्यात ....?
शी इज अ लूजर ..... विचार बदला नशीब बदलेल.....
पुल युअर सॉक्स ऑर स्टॉकिंग्ज (व्हॉटेवर ) ऐंड गेट आउट मोअर ऑफन ......
12 Mar 2011 - 12:17 pm | निनाद मुक्काम प...
शनिवारची सकाळ सुन्न करून गेली .कारण हा लेख
माझ्या मते जगात सर्वत्र प्रेयसी/ बायको ह्या दोन नाण्याच्या बाजू असतात .
जगात कोणत्याही नर आणी मादी ह्यांची आपापले जीवन साथी कसे असावेत ह्याबाबत ठाम मते असतात .
प्रेयसी किंवा प्रियकराचे दोष आपण अनुक्रमे नवरा किंवा बायको झाल्यावर बदलू .( किंवा तो स्वतः आपल्यासाठी बदलेल ) अशी आशा ठेवून प्रेमविवाह झाले की कुरबुरी सुरु होतात .त्यापेक्षा गुण दोषासकट स्वीकारलेला जीवनसाथी हा आपल्या आयुष्याचे सोने करू शकतो .किंवा जर अरेंज विवाह केला तर मग सुरवातीपासुन एकमेकांना सांभाळून घेणे अपेक्षित असते ( आर्थिक /सामाजिक व इतर अनेक बाबींचा विचार केला असतो .)
ह्या लेखात बहुदा प्रियकराला बायको म्हणून वेगळ्या अपेक्षा असतील .
आणी जगाचा एक नियम आहे .''आयुष्यात अजुन काहीही व्हा पण स्वताला गृहीत धरले जाऊ देऊ नका'' .
''तुम्हाला हवी ती गोष्ट मिळाली तर ती तुमची इच्छा असते .पण जर एखादी गोष्ट नाही मिळाली तर ती ईश्वरी इच्छा असते'' .
शान चे गाणे आठवले .
13 Mar 2011 - 1:17 pm | पर्नल नेने मराठे
त्यापेक्षा गुण दोषासकट स्वीकारलेला जीवनसाथी हा आपल्या आयुष्याचे सोने करू शकतो .किंवा जर अरेंज विवाह केला तर मग सुरवातीपासुन एकमेकांना सांभाळून घेणे अपेक्षित असते ( आर्थिक /सामाजिक व इतर अनेक बाबींचा विचार केला असतो .)
सुरेख !!!