दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग- ६)

चिंतामणी's picture
चिंतामणी in जनातलं, मनातलं
10 Mar 2011 - 6:53 pm

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी
(भाग-१)
(भाग-२)
(भाग-३)
(भाग-४)
(भाग- ५)

या भागातसुध्दा ज्यांची कारकिर्द २-५ चित्रपटांच्या पुढे गेली नाही अश्या काही संगीत दिग्दर्शकांचा आढावा घेणार आहे.

संगीत दिग्दर्शक- सतीश भाटीया

सतीश भाटीया आकाशवाणीवर प्रमुख निर्माते म्हणून काम करीत असत. व्हि. शांताराम यांनी त्याना दिल्लीवरून मुंबईत आणून या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक म्हणून संधी दिली.
यांना राजकमल सारखा बॅनर आणि व्हि. शांतारामसारख्या दिग्गजांनी संधी देउन सुद्धा यांची कारकिर्द एकाच सिनेमा पुरती मर्यादीत राहिली.

चित्रपट- बूंद जो बन गये मोती.

हाँ, मैं ने भी प्यार किया
प्यार से कब इंकार किया

(मुकेश आणि सुमन कल्याणपुर यांनी गायलेले युगलगीत)

ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार

हरी भरी वसुंधरा पर नीला नीला ये गगन
के जिसपे बादलों की पालकी उड़ा रहा पवन
दिशाएं देखो रंग भरी
दिशाएं देखो रंग भरी चमक रहीं उमंग भरी
ये किसने फूल फूल से किया श्रृंगार है
ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार
(मुकेश)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संगीत दिग्दर्शक- इक्बाल कुरेशी

यांच्या वाटालासुद्धा "ब" अथवा "क" दर्जाचे निर्माते/ दिग्दर्शक आले. परन्तु त्याती काही गाणी खूप लोकप्रीय झाली होती.

चित्रपट- चा चा चा (१९६४)

सुबह ना आई, शाम ना आई
जिस दिन तेरी याद ना आई, याद ना आई
सुबह ना आई, शाम ना आई

(म.रफी)

दो बदन प्यार की आग में जल गए
इक चमेली के मँडवे तले

(म. रफी व आशा भोसले यांनी गायलेले युगलगीत)

गोरी ज़ुल्म करे ज़ुल्फ़ का बिखर जाना
ओ बिखर जाना हाय बिखर जाना
बिखर जाना हाय बिखर जाना
ओ गोरी ओ गोरी ज़ुल्म करे ज़ुल्फ़ का बिखर जाना

(म. रफी)

चित्रपट- कव्वाली की रात (१९६४)

जाते-जाते इक नज़र भर देख लो देख लो

(म. रफी व शमशाद बेगम)

चित्रपट- बिंदीया (१९६०)

मैं अपने आप से घबरा गया हूँ
मुझे ऐ ज़िंदगी दीवाना कर दे

(म. रफी यांनी गायललेले हृदय पिळवटुन टाकणारे आर्त गाणे)

चित्रपट- उमर कैद (१९६१)

मुझे रात दिन ये ख़्याल है वो नज़र से मुझको गिरा न दे
मेरी ज़िन्दगी का दिया कहीं ये ग़मों की आँधी बुझा न दे

(मुकेश यांचे एक लोकप्रीय गाणे)

चित्रपट- ये दिल किसको दू (१९६३)

फिर आने लगा याद वोही प्यार का आलम
इनकार का आलम कभी इक़रार का आलम

(म. रफी आणि उषा खन्ना यांनी गायलेले युगल गीत)

इक्बाल कुरेशी यांची गाणि येथे ऐकता/ डाउनलोड करता येतील

संगीतचित्रपटमाहितीआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

10 Mar 2011 - 7:13 pm | श्रावण मोडक

चांगलं संकलन चाललं आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Mar 2011 - 7:40 pm | निनाद मुक्काम प...

आपल्या कडे नायक/ नायिका सोडल्यास सामान्य जनता ही संगीतकार ह्या शब्दाची महती जाणत नाही .( मी ही त्यातला एक )
ए र रेहेमान ह्यामुळे खऱ्या अर्थाने आमची पिढी संगीतकार हा शब्द जाणू लागली .

संगीत हा विषय काकांचा जिव्हाळ्याचा.
तोच जिव्हाळा व त्यांचा व्यासंग हा त्यांच्या लेखमालेतून दिसून येत आहे .

ही लेखमाला दिवाळी अंक किंवा वृत्तपत्र ह्यात आलीच पाहिजे .जेणेकरून व्यापक प्रमाणात वाचक तिचा लुफ्त उठा सकते है.

पैसा's picture

10 Mar 2011 - 8:29 pm | पैसा

यापैकी "सुबह ना आई"आणि मै अपने आपसे घबरा गया हूं" ही गाणी नौशाद किंवा खय्यामच्या नावावर सहज खपतील इतकी सुंदर आहेत. इतकं छान संगीत देणारे संगीतकार असे गुमनाम का झाले असतील?

गणेशा's picture

10 Mar 2011 - 10:33 pm | गणेशा

अप्रतिम भाग ..

ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार या सारखे सुपरहिट गाणे.. शिवाय सोबत ही उत्तंग व्यक्तीमत्वांची तरी १ च चित्रपट ?
बहुतेक त्यांनाच दुसरी महत्वाची आवड असु शकते असे वाटते.
पण संगीत अशी गोष्ट आहे , की एकदा या वाटेवर चालणारा माणुस दुसरीकडे कधीच जात नाही.

काय माहित मग हे असे कसे झाले आहे ...

सहज's picture

11 Mar 2011 - 7:35 am | सहज

जुनी गाणी हा विषय उत्तम आहे. जुन्या गाण्यांचा एक मोठा तयार चाहता वर्ग देखील आहे. जुन्या गाण्यांबरोबर त्या त्या संगीत दिग्दर्शकाची एखादी आठवण, माहीती देत, यु ट्युब वरील गाण्यांचा दुवा देत ही लेखमाला अजुन आकर्षक बनवू शकता.

लेखमाला वाचत आहे. अजुन येउ दे.

५० फक्त's picture

11 Mar 2011 - 10:07 am | ५० फक्त

या सेटमधील ' य कॉन चित्रकार है' आणि ' एक चमेली के मंडवे तले ' एवढीच गाणि ओळखिची आहेत.

बाकी हुडकुन ऐकावी लागतील. सुरु करतो शोधकाम आता.

इन्द्र्राज पवार's picture

11 Mar 2011 - 10:52 am | इन्द्र्राज पवार

इक्बाल कुरेशी आणि 'चा चा चा' हा संबंध इतका घनिष्ट आहे की, केवळ या एकाच चित्रपटातील संगीताने इक्बालसाब सिनेसंगीत रसिकांच्या 'कानी' कायमचे राहतील. आजही यू ट्यूबवर या चित्रपटातील गीतांना भेट देणारे लाखाच्या घरात आहेत. कधीतरी निव्वळ यासाठी हा चित्रपट पाहिला पाहिजे.

मी तर कित्येकवेळा नामसाधर्म्यामुळे 'इक्बाल कुरेशी' आणि 'ए.आर.कुरेशी' ही एकाच व्यक्तीची दोन नावे आहेत असे समजत होतो. दोघेही संगीतकार, पण पुढे या क्षेत्रातील जाणकारांनी एका व्याख्यानात खुलासा केला की 'ए.आर.कुरेशी' म्हणजेच 'तबलावादन' मधील थोर आणि 'दादा माणूस' श्री.उस्ताद अल्लारखाँ. खुद्द उस्ताददेखील 'सिनेसंगीतकार' म्हणून दुसर्‍या फळीतच बसले....पंडित रविशंकर यांच्याप्रमाणेच....असो, ही नावेदेखील पुढील लेखात येतीलच.

'ये दिल किसको दू...' मधील श्री.चिंतामणी यानी उल्लेख केलेले युगलगीत फार श्रवणीय आहे. विशेषतः पडद्यावर हसतमुखाने गाणारा (पण अगदी किरकोळ शरीरयष्टीचा) शशी कपूर पाहताना फार मजा येते.

"बिंदिया" च्या गाण्याचा 'हृदय पिळवटून' असा उल्लेख केला गेला असल्याने यू ट्यूबवर आत्ताच हे गाणे पाहिले. रफीसाहेबांबद्दल काय बोलावे? पण डोळ्यात पाणी आणणारे हे गीत बॅकग्राऊंडला असताना तिथे 'बलराज साहनी' याना पाहवत नाही [जसे भारत भूषणला मधुबालेसमोर गाणे गाताना पाहवत नाही, तसे], हेही नमूद करणे गरजेचे आहे. दिलीपकुमार किंवा गुरुदत्त यांच्या तोंडीच ते दर्दभरे गाणे हवे होते....अर्थात हे वैयक्तिक मत.

["कहाँसे ये फरेबे आरझू मुझको कहाँ लाया...जिसे मै पूजता था आजतक निकला एक वो साया...!" ~ गाण्यातील या ओळीवर जीव ओवाळून टाकावा आणि ते म्हणणार्‍या रफीसाहेबांवरून !!]

लेखमाला दिवसेदिवस सुंदर होत चालली आहे.

इन्द्रा