नाही नाही.."आजकालचे तरुण-तरुणी".."पाश्चात्यांचं अंधानुकरण"..असा त्रिफळाचूर्णी लेख नाही हा..तरीही हा यापूर्वी पहिल्यांदा लिहीला तेव्हा मला कोणीतरी आधुनिक बुरख्याआड लपलेले कृष्णराव हेरंबकर (अश्लीलमार्तंड) म्हणाले होते. त्या रात्री मात्र मी त्रिफळाचूर्ण नाही तरी जरा हवाबाण हरडे घेतले..असो..
तर ..
वक्षखिंड (Cleavage ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) दाखवणारे काचोळीसदृश (Bra ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) उत्तरीय घालून महाविद्यालयात येणा-या पात्रांवर ड्रेस कोड नावाचा काहीतरी निर्बंधवजा अत्याचार होतोय असं पेपरमध्ये मध्यंतरी कळलं. आणि अधूनमधून कळतच असतं.
युवावर्गाची (मी पण युवा हं..!!) मुख्य तणतण ही की हे कपडे (म्हणजे सूक्ष्म वस्त्रे) कम्फर्टेबल असतात म्हणून आम्ही घालतो. त्यावर बंदी घालणारे हे कोण प्रिन्सिपॉल.. इट्स आवर लाईफ..
मी अजिबात संस्कृतीरक्षक नाही बाबा. आधीच सांगतो. मी अजिबात कुठल्याही फॅशन विरोधात नाही. उलट नव्या नव्या कपड्यांत नटलेल्या पोरी पाहून मी कौतुक करतो. पोरांचं मला कौतुक नाही. कारणं नैसर्गिक आहेत. मी पोरींविषयीच सगळं लिहिणार.
तंग किंवा लहान कपडे घालू नका असा प्रचार इथे नाही. मी तो करणारही नाही. मला उलट असल्या फटाकड्या पोरी बघायला आवडेलच. पण "कम्फर्ट"च्या मुद्दयामुळे आंबट ताक प्यायल्यासारखी माझ्या कपाळावर आठी आली आहे.
ज्या निर्वस्त्रांवर "उपाय" म्हणून ड्रेस कोड आला असावा ती निर्वस्त्रं मी नीट पहिली आहेत. हो. पहिली आहेत.
बेंबीवर संपलेला शर्ट:- हा घालून मुलगी बाईकवर कुमारमित्रापाठी (Boyfriend ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) बसते, तेव्हा ती दर तीस सेकंदांनी हात मागे नेऊन शर्ट चिमटीने खाली कमरेवर खेचते. त्याखाली असलेला थालीपीठ भाजणी, उडदाचं डांगर, मोदकाची उकड यापैकी एका शेडचा मांसल भाग झाकावा अशी इच्छा तिला वारंवार होते. म्हणजेच माय लॉर्ड..तो शर्ट कम्फर्टेबल नाही.
दो-यायुक्त अंतर्वस्त्रं (याचं नक्की नाव सांगून सहकार्य करावं):- हा कपडा मी घालू का असं मुलीनं विचारल्यावर "पण बाकीचे कपडे कुठे आहेत?" असा भाबडा प्रश्न जातो.. ही स्ट्रिंग स्कंधखळग्यांच्या दोन्ही बाजूस आणि कमरबंदाच्या जागेतून दिसत असते (चू.भू.द्या.घ्या.). ती ही मुलगी सारखी ओढत असते आणि कापडाच्या आत झाकायला बघत असते. म्हणजे लाज वाटते. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच ना?
खूप कमी उंचीचा स्कर्ट:- (वारा आला तरी उडणार नाही कारण उडायला काही शिल्लकच नाही असा.) तो घालून एअरपोर्टवर बसलेली मुलगी पाय अत्यंत आवळून क्रॉस करून बसते. मोकळेपणानं सरळ पाय पसरून बसू शकत नाही. दोन मांड्यांत उरला सुरला स्कर्ट खुपसून घट्ट धरून बसायचं..बाथरूम सापडत नसल्यासारखा चेहरा करून. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच.
मुलीच्या टी शर्टच्या छातीच्या उभारावरच्या एरियात जर लक्षणीय मजकूर छापलेला असला (भले गायत्री मंत्र का असेना..) तर तो आम्ही वाचायचा की नाही वाचायचा? वाचायचा नाही तर मग तो तिथे कशाला ?
मैत्रिणींनो..जर उत्तम वक्ष आणि मांड्या दाखवणारा ड्रेस तुम्ही घातलात तर त्यात तुम्हाला फक्त कम्फर्ट हवा असतो का? की उकडतं म्हणून घालता? की आपले असेट इतरांनी बघावेत असं वाटतं? खरं सांगू? इतरांनाही ते बघावेसे वाटतात. तुम्ही ते दाखवलेत तर आम्ही बघू. लाजून खाली मान घालूच असं नाही.
ऑफिसात एक मुलगी पूर्ण मांड्या दाखवणारा स्कर्ट घालून आली होती. बराच वेळ तिच्यासोबत काम (मराठी अर्थानं..) करताना, बोलताना छताकडे बघ, पूर्वेकडे बघ, ईशान्येकडे बघ असं केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी कशाला लाजतोय? मी कशाला टेन्शन घेतोय? मी कपडे घातलेत. आता माझी नजर चोरायची मला काही गरज नाही. पण ते अवघड होतंच.
पावसात पांढरा टी शर्ट घातलात तर तो भिजल्यावर कोणी तुम्हाला बघू नये आणि बघितलं तर "तसल्या ओलेत्या" नजरेनं बघू नये अशी अपेक्षा जरा अनरियल नाही वाटत?
अरे माझ्या (सारख्याच) तरुण मित्र मंडळींनो. तुम्ही म्हणता की कॉलेजनं आमच्या कपड्यांत लक्ष घालू नये. तुम्ही म्हणता की "यहां का सिस्टीम ही है खराब". तुम्ही म्हणता की "आम्हाला व्यक्तिस्वातंत्र्य हवं."
तर मग घसा खरवडून विरोध करण्यापूर्वी "सारासार विचार" नावाची एक सोपी गोष्ट का करून बघत नाही?
त्यासाठी आधी नुसता "विचार" करण्याची सवय का लावून घेत नाही?
साधा शुद्ध शांत विचार. मग तो कसलाही असो. भिरभिर न करता शांत बसून "विचार".
रोज थोडी थोडी सवय केली तर हळू हळू जमेल.
काय आहे तो ड्रेस कोड? कशासाठी केला गेलाय? नागडं फिरायची परवानगी मिळाली तर तुम्ही फिराल का?
आपण तथाकथित "प्रगत" होत जाताना नुसते "कपडे" स्वीकारलेले नाहीत, त्यासोबत काही संकोचाच्या कल्पनाही तयार केल्या आहेत.. अपरिहार्यपणे.
कपडे बदलून समाज तातडीने बदलणार नाही. त्याची नजर असे कपडे घालून रातोरात मरणार नाही. त्याला वेळ लागेल. समाजाने बदलावं आणि नजर सुधारावी ही अपेक्षा चूक नसली तरी अतिआदर्शवादी आहे. ते होणे नाही. तोपर्यंत तरी स्वातंत्र्याची आजच्या दिवशी अस्तित्वात असणारी एक किंमत आहे. ती द्यायची तयारी आहे का?
निसर्गाकडे परत जाऊन वल्कलं नेसायची (किंवा तीही नाही) तर त्याच मार्गावर पुढे निसर्गाकडेच जाऊन मुक्त नर मादी संभोग चालेल का? तशी दुर्घटना घडली तर ती हलकी घेऊ शकणार आहात का? पाकीट मारलं गेल्यावर आपण दु:ख करतो पण आयुष्यातून उठत नाही..तसंच याही दुर्घटनेला घेऊ शकू का?
विचार..विचार..
किंमत द्यायची तयारी असेल तर जरुर घ्या ते स्वातंत्र्य.. हरकत घेणारे देणारे समाज किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल यापैकी कोणी कोणी नाही..प्लीज गैरसमज करू नका..तुम्हीच आहात स्वातंत्र्य घेणारे, किंमत देणारे आणि हरकत घेऊ शकणारे..
ग्रो अप बेब्ज. .. !! ... (आता यात कोणी डबल मीनिंग घेतलं तर तो प्रस्तुत लेखकाच्या आधीच डागाळलेल्या चारित्र्यावरचा आणखी एक दुर्दैवी डाग ठरेल..)
प्रतिक्रिया
17 Feb 2011 - 11:09 am | गवि
हुश्श.. हेच म्हणायचंय..निदान अर्धा भाग तरी यातला.
बघणार्याची नाही तरी स्वतःच्या कंफर्ट लेव्हलची फिकीर किमान करावी.
सुटलो..आता कुणाला समजवण्यासाठी लेखाहून मोठ्या कॉमेंट टाकायला नकोत.
यू हिट बुल्जआय शिल्पातै.
थँक्स.. :)
17 Feb 2011 - 11:13 am | सुहास..
+१ च हो गगनदा !!
नुसत्या नजरासुद्धा टोचत असतील तर आणि त्यामुळे कॉन्शस होऊन ते जे काही अंगात घातलंय त्याच्या आनंदापेक्षा संकोच आणि अवघडलेपण जास्त होत असेल तर अशा मनोवृत्तीने ते का घालावेत असा फक्त विचार करायला सांगितला. >>>
माझ्या मते पुरुषाकडे (अनफॉर्च्युनेटली) एक नजर (सातवा सेन्स म्हणा हवे तर) असते , तो स्त्री ने काही ही घातल तरी ही आर-पार बघु शकतो, अर्थात ही नजर, (जगभर, सवयींची , आधुनिकेतची, प्रांताची आकडेमोड मोडुन) बाय डिफॉल्ट असली तरी कोणाकडे कशा नजरेने बघाव, हे , निव्वळ त्याच्या मानसिकतेवर अवलंबुन असते. आता जर एखाद्याने भुकेल्या समोर वाढुन ठेवले तर तो जेवणार नाही का ? प्रश्नाचे उत्तर सोप्प आहे..पण हाच मुद्दा रिव्हर्स थिन्किन्ग ने नेमका उलटा ही लागु होवुन शकतो , म्हणजे ..तो भुकेला आहे की नाही याचा प्रश्नच नाही, त्या नजरेने बघीतले तर ताट हे नेहमी साठी वाढुनच ठेवले आहे ..
आहे की नाही गम्मत ;)
17 Feb 2011 - 12:06 pm | वपाडाव
तो भुकेला आहे की नाही याचा प्रश्नच नाही, त्या नजरेने बघीतले तर ताट हे नेहमी साठी वाढुनच ठेवले आहे ..
+१
जेवायचे तर जेवा किंवा पाहुनच ढेकर द्या (जेवण झाले असेल तर).
उपवास असेल तर कोंबडी वाचली.
18 Feb 2011 - 11:57 am | llपुण्याचे पेशवेll
माझ्या मते पुरुषाकडे (अनफॉर्च्युनेटली) एक नजर (सातवा सेन्स म्हणा हवे तर) असते , तो स्त्री ने काही ही घातल तरी ही आर-पार बघु शकतो, अर्थात ही नजर, (जगभर, सवयींची , आधुनिकेतची, प्रांताची आकडेमोड मोडुन) बाय डिफॉल्ट असली तरी कोणाकडे कशा नजरेने बघाव, हे , निव्वळ त्याच्या मानसिकतेवर अवलंबुन असते. आता जर एखाद्याने भुकेल्या समोर वाढुन ठेवले तर तो जेवणार नाही का ? प्रश्नाचे उत्तर सोप्प आहे..पण हाच मुद्दा रिव्हर्स थिन्किन्ग ने नेमका उलटा ही लागु होवुन शकतो , म्हणजे ..तो भुकेला आहे की नाही याचा प्रश्नच नाही, त्या नजरेने बघीतले तर ताट हे नेहमी साठी वाढुनच ठेवले आहे ..
सहमत आहे रे.. यावर कोणी प्रतिवाद नाही केला वाटतं?
17 Feb 2011 - 12:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मुळात आपले कपडे इतरांसाठी असतात का स्वतःसाठी? ऋतूप्रमाणे, गरजेप्रमाणे कपडे बदलावेत अशी अपेक्षा असेल तर कपडे स्वतःसाठीच असतात हे ही मान्य असावं.
शाळेतल्या इतर मुलींचं तर आहेच, पण मी सुद्धा शाळेत जाताना पिनोफॉल ओढत शाळेत जायचे. सायकलने मुलीसुद्धा शाळेत येतात हे माहित असताना असले युनिफॉर्म ठेवणार्या शाळांबद्दल तुमचं काय मत?
हे असले केस एकाने वाढवले म्हणून केस वाढवणार्या, कापणार्या सगळ्याच पुरूष जातीच्या नावाने शंख करायचा का? किंवा काही पुरूष स्त्रियांनी कपडे घातले नाहीच्चेत असेच्च बघतात म्हणून मी समस्त पुरूष जातीला दोष द्यावा का?
तुम्ही गळा काढताय मोठ्या गळ्यावर! पण माझ्या बाबतीत हे ही झालं आहे की रात्री झोपताना अत्यंत आरामदायक असणार्या आणि वरपासून खालपर्यंत सर्व शरीर झाकणार्या अशा अतिशय लूझ अशा पायजमा-टॉपकडे पाहून आमच्या बिल्डींगमधल्या म्हातार्यांनी नाकं मुरडली होती. मला तो ड्रेस अतिशय कंफर्टेबल वाटायचा. आता तुमची तक्रार ती रास्त आणि त्या म्हातार्यांची रास्त नाही असं म्हणावं का?
तुम्ही साडी नेसण्याबद्दलचे विचार थोपता आहात असं नाही, पण असं वागणारे लोकं भेटतात तेव्हा तुम्ही त्यांना काही सल्ले देता का? का ही सगळी विनोदनिर्मिती फक्त मुलींच्या कपड्यांवर गोळ्या झाडूनच??
मूळ मुद्दाच तुमचा, कॉलेजात घालायच्या कपड्यांबद्दल सेन्सॉर येणं, ज्या मुली अशा कपड्यांमधे कंफर्टेबल आहेत, त्यांनी का घालू नयेत? तुम्ही एयरपोर्टवर पाहिलेल्या मुलीने छोटा स्कर्ट घातला होता म्हणून कदाचित तिचा प्रॉब्लेम झाला, त्याच लांबीची शॉर्ट्स घातली असती तरीही तक्रार करायची का?
17 Feb 2011 - 12:45 pm | गवि
मुळात आपले कपडे इतरांसाठी असतात का स्वतःसाठी? ऋतूप्रमाणे, गरजेप्रमाणे कपडे बदलावेत अशी अपेक्षा असेल तर कपडे स्वतःसाठीच असतात हे ही मान्य असावं.
मान्य..म्हणूनच मग इतरांची पर्वा न करता ते ग्रेसफुली कॅरी करावेत.
शाळेतल्या इतर मुलींचं तर आहेच, पण मी सुद्धा शाळेत जाताना पिनोफॉल ओढत शाळेत जायचे. सायकलने मुलीसुद्धा शाळेत येतात हे माहित असताना असले युनिफॉर्म ठेवणार्या शाळांबद्दल तुमचं काय मत?
शाळेवरच टीका. मुलीवर का बरे करीन? का वाटलं तुम्हाला तसं ? तिथे त्या मुलीने स्वखुषीने तो ड्रेस घातला नाहीये हे कळतंयच.. शाळा हीच या बाबतीत दोषी.
हे असले केस एकाने वाढवले म्हणून केस वाढवणार्या, कापणार्या सगळ्याच पुरूष जातीच्या नावाने शंख करायचा का? किंवा काही पुरूष स्त्रियांनी कपडे घातले नाहीच्चेत असेच्च बघतात म्हणून मी समस्त पुरूष जातीला दोष द्यावा का?
कुठे आहे सगळ्या स्त्रीजातीच्या नावाने शंख? मनातच नाही ते लिखाणात कुठून येईल? पॅरेनॉईड विचार वाटला हा मला. एखाददोन वाक्ये काढून देता का लेखातली ज्यात सगळ्या स्त्रीजातीच्या नावाने शंख किंवा काहीही आहे अशी?
तुम्ही गळा काढताय मोठ्या गळ्यावर! पण माझ्या बाबतीत हे ही झालं आहे की रात्री झोपताना अत्यंत आरामदायक असणार्या आणि वरपासून खालपर्यंत सर्व शरीर झाकणार्या अशा अतिशय लूझ अशा पायजमा-टॉपकडे पाहून आमच्या बिल्डींगमधल्या म्हातार्यांनी नाकं मुरडली होती. मला तो ड्रेस अतिशय कंफर्टेबल वाटायचा. आता तुमची तक्रार ती रास्त आणि त्या म्हातार्यांची रास्त नाही असं म्हणावं का?
गळा काढतोय ? केव्हा घडली ही सुरस घटना?
तुम्हाला कंफर्टेबल वाटायचा हे गृहीतक धरुन तुमचे राहणे अत्यंत योग्य, रास्त आहेच.. इथे उल्लेख केलेत त्यात स्पेसिफिकली ते परिधान करणार्या व्यक्तीला व्हिजिबली ऑकवर्ड्/कॉन्शस/ अनकंफर्टेबल होत आहेत अशा दिसणार्या घटनांवर भाष्य आहे.
तुम्ही साडी नेसण्याबद्दलचे विचार थोपता आहात असं नाही, पण असं वागणारे लोकं भेटतात तेव्हा तुम्ही त्यांना काही सल्ले देता का? का ही सगळी विनोदनिर्मिती फक्त मुलींच्या कपड्यांवर गोळ्या झाडूनच??
मुली मुलं असा काही स्पेसिफिक टार्गेट ग्रूप नाही माझा. मी एवढंच म्हणत होतो की कंफर्टेबल नसेल तरी केवळ चालू स्टाईल आहे म्हणून खेचत ओढत लाजत काही परिधान करण्याऐवजी सारासार विचार करुन ज्यात तुम्हाला छान वाटेल ते घाला.
त्या स्कर्ट किंवा शॉर्ट शर्टमधे (कोणाच्या नजरांनी म्हणा किंवा आणि कशानेही) सतत सावरावासा झाकावासा वाटेल असं फीलिंग असताना कसला कंफर्ट?
अशा वेळी बघणार्याला फावतेच आहे आणि ज्याला नाही बघावेसे वाटत किंवा शिष्टाचार / संकोच आड येतो त्यांनाही ऑकवर्ड होते. त्यांचे जाऊ द्या...स्वतःला तरी निदान कंफर्टेबल वाटू दे म्हणजे झालं.
मूळ मुद्दाच तुमचा, कॉलेजात घालायच्या कपड्यांबद्दल सेन्सॉर येणं, ज्या मुली अशा कपड्यांमधे कंफर्टेबल आहेत, त्यांनी का घालू नयेत? तुम्ही एयरपोर्टवर पाहिलेल्या मुलीने छोटा स्कर्ट घातला होता म्हणून कदाचित तिचा प्रॉब्लेम झाला, त्याच लांबीची शॉर्ट्स घातली असती तरीही तक्रार करायची का?
तक्रार अशीही नाही.. आणि जोपर्यंत तिला ते दोन तास अवघडलेपणाने काढायला लागत नाहीयेत तोपर्यंत सर्व वेषभूषा ठीकच आहे. पण दिसलेला डिसकंफर्ट शब्दातून मांडायचाही नाही ..तसं केलं तर विचारांची सक्ती, संस्कृतीसंवर्धनाचा बुरखा, गोळीबार, पुरुषप्रधान असं काहीतरी होत असेल आणि जणू आमच्या सांगण्याने कायदा / फतवा निघतोय असे मत बनत असेल तर एकूणच काही सूचना, प्रकटन, विचार मांडायलाच नकोत. कशाला तसे विभाग उघडले आहेत मग? :)
17 Feb 2011 - 1:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> म्हणूनच मग इतरांची पर्वा न करता ते ग्रेसफुली कॅरी करावेत.<<
शिकाऊ असू शकेल. पण इतरांनी कसं वागावं हे आपण सांगणं मला नाही जमत/पटत!
>> शाळेवरच टीका. <<
धन्यवाद.
>> गळा काढतोय ? केव्हा घडली ही सुरस घटना? <<
का हो, तुम्ही लिहीता ते विनोदी आणि आम्ही लिहीलं की शब्दशः अर्थ घेणार का?
ज्या सगळ्या वस्त्र्याप्रावरणांची वर्णनं तुम्ही केली आहेत तशी घालून, अतिशय आरामात फिरणार्या मुली मला बहुसंख्येने दिसल्या आहेत. विनोदनिर्मितीसाठी का होईना, तुम्हाला फक्त अशा कपड्यात अनकंफर्टेबल होणार्या मुली का दिसल्या हा प्रश्न पडला आहे. तुमच्याकडून विनोदासाठी विनोद न करता खरोखर चांगल्या लिखाणाची अपेक्षा आहे म्हणून लिहीलं.
17 Feb 2011 - 1:40 pm | गवि
ज्या सगळ्या वस्त्र्याप्रावरणांची वर्णनं तुम्ही केली आहेत तशी घालून, अतिशय आरामात फिरणार्या मुली मला बहुसंख्येने दिसल्या आहेत.
कुठे ? ते महत्वाचं आहे.
धन्यवाद.
17 Feb 2011 - 1:42 pm | आजानुकर्ण
हो अशा मुली कुठे असतात हे मलाही जाणून घ्यायचे आहे. :D पिंपरी चिंचवड परिसरात अशा मुली दिसत नाहीत. :(
17 Feb 2011 - 1:54 pm | टारझन
जाणुन घेणे जरुरी वाटते ... काय आहे .. तेवढंच अजुन एक पर्यटण स्थळ मिळेल हुंदडायला :)
डीवाय च्या कँपस मधे उत्तरेकडील मुली एकदम बिण्धास्त असतात तर मराठी मुली कॉपी करण्याच्या प्रयत्नात जोक होउन बसतात असं माझा मित्र मिलींद म्हणायचा :) दे वर सो अनकंफर्टेबल यु नो :)
17 Feb 2011 - 1:56 pm | आजानुकर्ण
डीवायचा कँपस म्हणजे पिंपरीचा की आकुर्डीचा?
17 Feb 2011 - 2:00 pm | टारझन
आमचा एक पाय पिंपरीच्या कँपस मधे तर एक पाय अकुर्डीच्या कँपस मधे असायचा .. :) एकंदरीत आपला एरियाही एक आहे , आणि क्राऊड सुद्धा एकाच प्रकारचे आहे :) शिवाय लोकं सुद्धा एकाच प्रकारच्या माणसिकतेतली असल्याने डिवाय पिंपरी काय किंवा आकुर्डी काय , पोरी त्याच आणि त्यांचे ते ही तेच :)
17 Feb 2011 - 2:06 pm | सुहास..
एक पाय अकुर्डीच्या कँपस मधे असायचा . >>>
अच्छा !! अच्छा ...म्हणुन ते टिकल्या, वेण्या आणि जीन्स चे नॉलेज वाढले का ? ..खव त सांग रे !
असो ..धागा हा प्रतिसाद लिहुन ऊघडायचे बंद करीत आहे ..डोकं दुखायला लागल च्यायला ;)
17 Feb 2011 - 2:13 pm | वपाडाव
पण टार्झणराव....
ब्रिटीश लायब्ररीसमोर पार्क केलेल्या गाडीवर पायघडी घालुन डोळे सैरभैर फिरविण्यात जी मजा आहे ती काही औरच..
17 Feb 2011 - 1:40 pm | आजानुकर्ण
माझ्या मर्यादित अनुभवानुसार जेव्हा शाळा एखादा नियम करत असे तेव्हा तो बहुसंख्य विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना सोयीचा असावा असा करत असे. मुलामुलींमध्ये भेदभाव वाढीस लागू नये, शिस्तपालनाची सवय लागावी यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांपैकी सुटसुटीत, कंफर्टेबल, एकसारखा दिसणारा गणवेश हा एक उपाय असावा असे वाटते. (मुलांना पोषक आहार मिळावा व वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील मुलामुलींच्या खाण्यापिण्याच्या सवयींतून भेदभाव अधोरेखित होऊ नये यासाठी याच धर्तीचा दुसरा त्वरित आठवणारा उपाय म्हणजे मुलामुलींनी डब्यात पोळीभाजी आणावी असा अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारा निर्णयही काही प्रतिगामी शाळा घेतात.) सायकलने शाळेत येणाऱ्या मुलींची संख्या मला वाटते त्यानुसार 20-25 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. त्यामुळे केवळ सायकलने शाळेत येणाऱ्या मुलींच्या सोयीचा विचार करण्यापेक्षा चालतही येणाऱ्या मुलींचा विचार करून शाळेने कदाचित गणवेशनिश्चिती केली असावी. पिनोफॉल हा काय प्रकार आहे हे मला माहीत नसल्याने तो नेमका कसा अडचणीचा ठरतो याची पुरेशी कल्पना नाही. मात्र काही शाळांमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही मुलामुलींना वेगळ्या स्वरुपाचे गणवेश (रंग मूळ गणवेशाशी मिळताजुळता असला तर) वापरण्याची परवानगी दिली जाते. (आमच्या शाळेत काही मुलींना साड्या घालण्याची तर काही मुलांना फुल प्यांट घालण्याची परवानगी मिळाली होती असे आठवते. आम्ही हाफ चड्डीतच होतो त्यामुळे सर्व प्रकारच्या हाफ चड्ड्यांविषयी तीव्र तिरस्कार निर्माण झाला आहे.) त्यामुळे शाळेला सरसकट दोष देण्यापेक्षा अशा उपाययोजनांचा लाभ घेतल्यास उत्तम असे सुचवावेसे वाटते.
मुळात अनेक मुलेमुली (माझ्या अनुभवानुसार) स्वखुषीने शाळेत जाण्यासच तयार नसतात. याबाबतीतही सरसकटपणे शाळांना दोषी ठरवून काही साध्य होणार नाही असे वाटते.
17 Feb 2011 - 10:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
टाय वगळून हा साधारण असा आमच्या शाळेचा गणवेश होता
आमच्या वर्गातल्या बर्याच मुली (प्रमाण आठवत नाही) अगदी पाचवीपासून सायकलने यायच्या. रस्त्याने जाताना इतर शाळांमधल्याही अनेक मुली सायकलने शाळेत जाताना दिसायच्या. पाचवीतल्या मुलींनी साडी नेसून सायकल चालवत शाळेत जावं अशी काही तुमची सूचना आहे का? (बहुदा नसावी.)
>>... मुलामुलींनी डब्यात पोळीभाजी आणावी ... <<
याबाबतीत आमची शाळा बरीच चांगली होती असं आठवतं. सक्ती अशी नव्हती, आपापल्या मित्र-मैत्रिणींबरोबर डबा शेअर करून खाण्याची चांगली सवय लागली होती. त्यामुळे बरेच वेगवेगळे प्रकार चाखले जायचे आणि त्याची घरी जाहिरातही व्हायची. शिवाय रोज वेगवेगळ्या भाज्याही पोटात जायच्या.
मुलींना टिकली, बांगड्याची सक्ती होती हे आठवलं, नशीब लाल रिबीनी नाही लावायला सांगायचे, इतर बर्याच शाळांसारखे!!
@पक्या: तुमच्या बहिणीकडे असेल. माझ्याकडे एके काळी, एका वेळेस असे दोन-दोन ड्रेस असायचे. आमच्या मराठी शाळेत त्याला पिनोफॉलच म्हणायचे. मी इंग्लिशमधे त्याला pinofor म्हणेन पण मराठीत तो पिनोफॉलच.
बाकी कर्णा, तुझा पहिला प्रश्नः अशा मुली मला इथेच होस्टेल, हापिसाच्या आसपास रोज दिसतात.
17 Feb 2011 - 10:47 pm | पक्या
>>:आमच्या मराठी शाळेत त्याला पिनोफॉलच म्हणायचे. मी इंग्लिशमधे त्याला pinofor म्हणेन पण मराठीत तो पिनोफॉलच.
बहुतेक शब्द नीट माहित नसल्याने झालेला अपभ्रंश असावा तो. मराठीत पिनोफॉल असा शब्द नाहिये.
18 Feb 2011 - 1:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्या मराठीत तो शब्द पिनोफॉल असाच आहे. तुम्ही हवं तर तुमच्या मराठीत पिनोफोर म्हणा नाहीतर पिनोफॉर.
इंग्लिशमधे हा शब्द पिनोफॉरही नाही, pinafore (उच्चारी पिन्हफॉर) असा आहे.
17 Feb 2011 - 9:54 pm | पक्या
पिनोफॉल नाही , पिनोफोर म्हणतात त्याला. माझ्या बहीणीकडे होता तसा ड्रेस म्हणून नाव व्यवस्थित माहित आहे.
17 Feb 2011 - 10:52 pm | मस्त कलंदर
आणि तो असा मुलीने घातलेल्या ड्रेससारखा दिसतो...
17 Feb 2011 - 9:10 am | सुहास..
ते संस्कृतीरक्षकांच्या आणि टवाळांच्या नजरेला हीन वाटतं त्याचा परिणाम ते कपडे घालणाऱ्या मुलींच्या मानसिक कंफर्टवरही होतो. >>>
एन्ड व्हाट डझ दिस मिन्स ..संस्कृती -रक्ष़क आणि टवाळ , याच एक अर्थ संस्कृती -रक्ष़क = टवाळ असा ही निघु शकतो..तसे असेल तर मी म्हणेन ' संस्कृती -रक्ष़क ' असण्याला नेमका कशाबाबत विरोध आहे . जर आपण आपली जपली तर हरकत काय आहे ? उगाच पाश्चात अंधानुकरण करण्यात काय हशील ..आधी ट्रेन्ड , फॅशन आणि यंगस्टर्स ची मानसिकता याचा एक ठराविक साचा नाही हे लक्षात घ्यायला हवे.
आणि नसेल तर ..जन्मदिन मुबारक हो !!
17 Feb 2011 - 11:04 am | मृत्युन्जय
बलात्कार हा शब्द न वापरता तुम्ही संभाव्य 'दुर्घटनां'ची जबाबदारी तसले कपडे घालणाऱ्या मुलींवर टाकत आहात.
मला नाही वाटत गविंना तसं काही म्हणायचं आहे. हे घरात चोरी होण्यासारखं आहे. घराला कुलुप लावुन तुम्ही बाहेर पडलात तर घरात चोरी होण्याची शक्यता कमी असते. दार सताड उघडे ठेवुन बाहेर गेलात तर चोरीची शक्यता वाढते. मी दार बंद केले काय किंवा उघडे ठेवले काय, त्यामुळे चोराला माझ्या घरात चोरी करण्याचा काहीच हक्क नाही. पण दार सताड उघडे ठेवुन मी बाहेर पडलो तर मुळात गुन्हेगारी वृत्ती असणार्या लोकांसाठी मी मार्ग अजुन सुकर करुन ठेवतो किंवा त्यांना चोरी करण्यासाठी उद्युक्त करतो असे मला तरी वाटते. चोरी करणारा मुळातच गुन्हेगारी वृत्तीचा असतो. माझ्या घरात चोरी होउ नये असे जर मला वाटत असेल तर काळजी मलाच घ्यायला हवी ना?
17 Feb 2011 - 11:07 am | शिल्पा ब
हे ठीकच...पण स्त्रीकडे शारीरिक शक्ती कमी असल्याने प्रतिकार करणे अवघड अथवा अशक्य होते आणि केवळ याच कारणाने आपल्या आवडीनिवडीला मुरड घालावी का?
17 Feb 2011 - 11:20 am | मृत्युन्जय
असहाय्य माणसाला नेहेमीच तडजोडी कराव्या लागतात. तडजोड करावी की नको त्या प्रकाराला तोड द्यावे हे ज्याचे त्याने ठरवावे. तुम्ही दुर्बळ आहात म्हणुन कोणालाही तुमच्यावर अन्याय करायचा अधिकार नाही. अन्याय झालाच तर न्याय मिळणे हा तुमचा अधिकारच आहे. त्यासाठी समाजाने, न्यायव्यस्थेने योग्य ती मदत करणे हा देखील तुमचा अधिकार आहे. दुर्बळावर अन्याय करणारा निंदेस पात्र तर आहेच आहे.
मुद्दा हा आहे की अन्याय करणारा तर गुन्हेगारी वृत्तीचाच असतो. तुम्ही जर त्याच्यापासुन स्वतःचे संरक्षण करु शकत नसाल तर किमान त्याच्यातील गुन्हेगारी वृत्ती उफाळुन येइल असे काही न करणे तुमच्या हातात आहे. चुक कोणाची हा मुद्दा अलाहिदा. समजा चुक गुन्हेगाराचीच आहे. पण नंतर काही झाले तर नुकसान कोणाचे आहे?
23 Feb 2011 - 10:11 am | विलासराव
>>मुद्दा हा आहे की अन्याय करणारा तर गुन्हेगारी वृत्तीचाच असतो. तुम्ही जर त्याच्यापासुन स्वतःचे संरक्षण करु शकत नसाल तर किमान त्याच्यातील गुन्हेगारी वृत्ती उफाळुन येइल असे काही न करणे तुमच्या हातात आहे. चुक कोणाची हा मुद्दा अलाहिदा. समजा चुक गुन्हेगाराचीच आहे. पण नंतर काही झाले तर नुकसान कोणाचे आहे?
सहमत.
17 Feb 2011 - 8:37 am | सहज
आंतरजालाच्या सुरवातीच्या काळात टाईम्स, रेडिफ तुलनेत सोज्वळ होते आता पहील्या पानापासुन भरपूर आकर्षक चित्र व दुवे येउ लागले आहेत. सुरवातीला मआंजावर माफक सूचक लेख येत होते आता बरेच अनावृत्त लेखन येउ लागले आहे. शेवटी ती म्हण ऐकली असेलच काहीतरी ऑलवेज सेल्स! ह्या लेखाचा मुद्दा काय आहे हे ज्याची त्याची जाण यावर ठरणार. नेहमीप्रमाणे संस्कृती, व्यक्तिस्वातंत्र, स्त्री पुरुष भेद होणार व प्रतिसादात शेवटी जो जे वांछील तो ते लाहो असा सूर नेहमीप्रमाणे येणार.
बाकी आदिवासी लोक काय वस्त्र घालतात म्हणे.. असो ते जाउ द्या.
आयपीएल मधे कुठल्या चीयरलिडर असाव्या त्यांच्या निवडीची स्पर्धा घेउया, त्याचे ड्रेस कुठले असावे याचेही रिअॅलिटी शो करुया. तुमचे चालू द्या. तुम्ही कंझ्युम करा. आळशांचे राजे अहो तुमच्या प्रांतांना सांगा आपण कुण्या सुन्द्रीला घेउन रिअॅलिटी शो काढुया, कुण्या परिस्थितीने नाडलेल्या रौशनी, शबनम ला घेउन शो बनवुया, लोकांना व्होट करायला लावूया, शेकडो चॅनेलवर शेकडो सुन्द्री, शबनम येतील, बाकीच्या वॉनाबी रिअॅलिटी स्टार अनुकरण करतील. कोण नक्षलवाद जॉईन करेल? इथे मस्त पैसा आहे. लोक कशाला बाहेर जाउन दंगा करतील, आपल्या आवडत्या पावनखिंडीत विहार करतील. घ्या घ्या ऑम्लेट.
(भांडवलशहा हिंदूराव) सहज
17 Feb 2011 - 9:56 am | गुंडोपंत
आळशांचे राजे अहो तुमच्या प्रांतांना सांगा आपण कुण्या सुन्द्रीला घेउन रिअॅलिटी शो काढुया, कुण्या परिस्थितीने नाडलेल्या रौशनी, शबनम ला घेउन शो बनवुया, लोकांना व्होट करायला लावूया, शेकडो चॅनेलवर शेकडो सुन्द्री, शबनम येतील, बाकीच्या वॉनाबी रिअॅलिटी स्टार अनुकरण करतील. कोण नक्षलवाद जॉईन करेल? इथे मस्त पैसा आहे. लोक कशाला बाहेर जाउन दंगा करतील, आपल्या आवडत्या पावनखिंडीत विहार करतील. घ्या घ्या ऑम्लेट.
अनेकांना लेख लिहावे लागले तेथे सहजरावांनी फक्त ५ ओळींत जबरी लेखन केले आहे!
खरे सांगायचे तर वास्तवाच्या या फरकानेच नवीन फ्याशनी मला कशातरी ओंगळवाण्या वाटू लागतात! :(
17 Feb 2011 - 8:47 am | अवलिया
बेंबीवर संपलेला शर्ट:- हा घालून मुलगी बाईकवर कुमारमित्रापाठी (Boyfriend ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) बसते, तेव्हा ती दर तीस सेकंदांनी हात मागे नेऊन शर्ट चिमटीने खाली कमरेवर खेचते. त्याखाली असलेला थालीपीठ भाजणी, उडदाचं डांगर, मोदकाची उकड यापैकी एका शेडचा मांसल भाग झाकावा अशी इच्छा तिला वारंवार होते. म्हणजेच माय लॉर्ड..तो शर्ट कम्फर्टेबल नाही.
किंवा इथे काहीतरी पहाण्यालायक आहे हे मागुन येणार्या लोकांना सुचित करण्यासाठी ते हातवारे असतील का असा विचार करत आहे. :)
17 Feb 2011 - 9:02 am | सुहास..
इथे काहीतरी पहाण्यालायक आहे हे मागुन येणार्या लोकांना सुचित करण्यासाठी ते हातवारे असतील का असा विचार करत आहे. >>>
+१ रे नाना ,
मी बर्याच मुली अश्या पण पाहिल्यात ज्या तिने घातल आहे म्हणुन मी ही घालते. (काय करणार मी पाहिलेल्या त्या दोघींची आवड एकच होती. असेही कॉलेजात हल्ली मुलं कमी आनि मुली जास्त आहेत, दरवेळी दहावी-बारावी चा निकाल बघुन घ्यावा ..असो..)..हा किस्सा तर माझ्या समोरचाच आहे..अर्थात माझ्या एकाच्या अनुभवावर असे लिहीणे म्हणजे काही अंतिम सत्य नाही...पण शोभा डे वगैरै ची पुस्तके वाचुन ' आय वेयर ईट अॅज आय एम कन्फर्टेबल ' म्हटल्यावर ..' बुल**' असेच म्हणावेसे वाटते...
जाता जाता : प्रल्हाद शिंदेच्या एका गाणे आठवले..बोल ..कस तरी दिसं , अग निट तरी नेस, हे नवं-नवं लुगड .
17 Feb 2011 - 9:04 am | कवितानागेश
साडी नेसल्यावर सुद्धा पाठीचा कमरेचा बराचसा भाग दिसतो,
फक्त पायजम्यांमूळे (=जीन्स, ३/४, इतर प्यांटी)नाही.
साडीदेखिल बेंबीखाली नेसता येते.
नौवारी साडीत पाय दिसतात.
अनेक पंजाबी ड्रेस वक्षखिंड दाखवू शकतात, गळ्याशी ओढ्णी घेतली की.
...त्यामूळे ड्रेस कोड हा प्रकार निरर्थक ठरतो.
नक्की कुठेल कपडे चांगले हे असे कुणालाच ठरवता येणार नाही.
कपडे घालणार्या आणि त्यांच्याकडे बघणार्या माणसांच्या वृत्तीवर त्यांची-त्यांची वागणूक अवलंबून आहे.
कुठूनतरी काहितरी मुद्दाम उघडे टाकणे म्हणजेच सुंदर, असा गैरसमज जर हल्लीच्या पोरा-पोरींचा झाला असेल, आणि त्या सुंदर दिसण्याचा आटापिटा करत कैतरीच कपडे घालत असतील,
तर प्रॉब्लेम आहे, तो त्यांची तशी समजूत करुन देणार्या भोवतालच्या समाजात आहे.
17 Feb 2011 - 10:00 am | गुंडोपंत
कपडे घालणार्या आणि त्यांच्याकडे बघणार्या माणसांच्या वृत्तीवर त्यांची-त्यांची वागणूक अवलंबून आहे.
याच्याशी सहमत आहे!
कुठूनतरी काहितरी मुद्दाम उघडे टाकणे म्हणजेच सुंदर, असा गैरसमज जर हल्लीच्या पोरा-पोरींचा झाला असेल, आणि त्या सुंदर दिसण्याचा आटापिटा करत कैतरीच कपडे घालत असतील, तर प्रॉब्लेम आहे, तो त्यांची तशी समजूत करुन देणार्या भोवतालच्या समाजात आहे.
याच्याशी सहमत नाही!
उघडे टाकणे म्हणजेच सुंदर हा समज फार जुना म्हणजे मानवाला कपडे सापडल्या पासूनचा आहे. आणि तसे नेमकेपणाने आब राखत करता, येणे ही मोठी गोष्ट आहे.
17 Feb 2011 - 9:55 pm | पैसा
एका कॉलेजमधे जाणार्या मुलीने "नऊवारीइतका रिव्हीलिंग ड्रेस कोणताच नाही" असं त्यांच्या 'ट्रॅडिशनल डे' ला सांगून मला विचार करायला प्रवृत्त केलं होतं! ;) खरंच नाही का?
17 Feb 2011 - 9:13 am | सुहास..
कुठूनतरी काहितरी मुद्दाम उघडे टाकणे म्हणजेच सुंदर, असा गैरसमज जर हल्लीच्या पोरा-पोरींचा झाला असेल, आणि त्या सुंदर दिसण्याचा आटापिटा करत कैतरीच कपडे घालत असतील,
तर प्रॉब्लेम आहे, तो त्यांची तशी समजूत करुन देणार्या भोवतालच्या समाजात आहे. >>>
काही अंशी सहमत !!
एकुण काही कल, सुंदर दिसण्यापेक्षा 'हॉट' दिसणे, हे नवशहरीकरणातील यंगस्टर्स च ब्रीद-वाक्य असे माझे मत ..
17 Feb 2011 - 9:48 am | छोटा डॉन
उत्तम चर्चा चालु आहे.
बरीच मते गंमतशीर आहेत, काही खरोखर पटतील अशी आहेत ...
बाकी (कपड्याच्या बाबतीत ) ज्याला जे आवडतं ते करण्याचा हक्क त्याला द्यावा असे वाटते.
मात्र नंतर तक्रार वगैरे झाल्यास सर्व जबाबदारी ते कपडे परिधान करणार्या व्यक्तीची असावी.
ह्यावरुन पराशेठ यांनी फेमस केलेली "एक तर खिडकीत उभा राहु नये, उभे राहणार असालच तर कुणी शुक शुक केले तर बोंबा मारु नये" ही म्हण आठवली ;)
बाकी 'थ्री फोर्थ आणि स्लीव्हलेस टी-शर्ट' हा भारताचा राष्ट्रीय पोषाख म्हणुन घोषीत करावा अशी मागणी करतो ;)
- ('थ्री फोर्थ आणि स्लीव्हलेस टी-शर्ट' प्रेमी ) छोटा डॉन
17 Feb 2011 - 10:01 am | गुंडोपंत
अरे म्हणजे कोपरी नि माझी चड्डीच की!
वा वा! पूर्ण पाठिंबा आहे माझा.
;)
17 Feb 2011 - 10:20 am | नितिन थत्ते
>>बाकी 'थ्री फोर्थ आणि स्लीव्हलेस टी-शर्ट' हा भारताचा राष्ट्रीय पोषाख म्हणुन घोषीत करावा अशी मागणी करतो
हा हा हा.... हे मात्र मान्य नाही. उद्या कपाळावर येणार्या बटा ही पुरुषांची राष्ट्रीय वेशभूषा घोषित कराल. मग आम्ही काय देशद्रोही का?
.
.
.
.
(भावी टकलू)
17 Feb 2011 - 11:13 am | विजुभाऊ
उद्या कपाळावर येणार्या बटा ही पुरुषांची राष्ट्रीय वेशभूषा घोषित कराल. मग आम्ही काय देशद्रोही का?
मी तर आत्ताच बगावतीचे झेन्डे खान्द्यावर घेतलेत
17 Feb 2011 - 10:23 am | आजानुकर्ण
मस्त चालू आहे चर्चा.
चालू द्या
17 Feb 2011 - 10:41 am | मुलूखावेगळी
गवि, तुमचे बरेच मुद्दे मान्य
पण जर ह्या मुलि कम्फरटेबल असतील ह्या कपड्यात तर तुमचा काही मह्ण्नं नाहीये .
बाकि का हो ड्युड्स ना का माफ केलेय ह्या लेखातुन जे लो वेस्ट घालुन रस्त्यावर तर जाउ द्या जीम ला पण प्रदर्शन करत्तात. म्हन्जे आजकाल मुले पण झिपरे वाढवने *** दाखवणे असले प्रकार करतात.तुम्हाला ड्युड्स ग्रो व्हावे असे वाटत नाही का? का अॅज युज्वल पुरुषां ना सगळे माफ ;)
जसं कि रुल्स बनवणार्यांसाठी रुल्स नसतात च ;)
तुमचा त्रिवार
निषेध!!!
निषेध!!!
निषेध!!!
17 Feb 2011 - 10:45 am | टारझन
आहो काकु ... लेख काय ... तुमचा प्रतिसाद काय ? तुम्ही हल्ली "णिणाद सद्ध्या मुक्काम पोष्ट पर्भणी" चं लेखण जास्त वाचता काय ? :)
कुठे हे स्त्री विषयक चर्चा चालु असताना त्यात जबरदस्ती पुरुष का घुसवताय ? णवा धागा काढा
17 Feb 2011 - 10:44 am | मुलूखावेगळी
२दा आलाय
17 Feb 2011 - 10:45 am | गवि
त्यावर तुम्ही लिहा..मी लिहिले तर खमंग होणार नाही.. :)
शिवाय राजेश आणि आदितींना दिलेला प्रतिसाद वाचा.. :)
धन्यु..
17 Feb 2011 - 11:59 am | मुलूखावेगळी
ह्या गोष्टी खमंग वाटत असल्या असत्या तर लिहिले असते.पण नाही वाटत त्यामुळे नाही लिहिनार. इथेच बोलु ;)
17 Feb 2011 - 12:03 pm | टारझन
तुम्हाला ते खमंग वाटत नाही ? मग काय खमंग वाटते ? स्त्रीविषयक चर्चा ? :( :( :( केवढा मोठा लॉस आहे हा !!
17 Feb 2011 - 12:11 pm | मुलूखावेगळी
चर्चा खमंग वाटत नाही. बाकि काय खमंग वाटते ते मी तुला का सांगु?
मी स्त्रीविषयक बोल्लेच नाहीये.वाच वरचे प्रतिसाद.
कोनाचा? कसा? कळले नाही. तुझा का? तु इन्टरेस्टेड आहेस का पुरुषांविषयी खमंग वाचण्यात. मग शोभा डे वाच.अजुन तुला काय काय माहित असेल ते वाच.;)
17 Feb 2011 - 12:16 pm | llपुण्याचे पेशवेll
>> मग शोभा डे वाच <<
शोभा डे कोणी लिहीलं आहे? ;)
17 Feb 2011 - 12:18 pm | सुहास..
शोभा डे कोणी लिहीलं आहे? >>>
तुला लई चौकश्या ?
17 Feb 2011 - 12:24 pm | मुलूखावेगळी
शोभा डे लेखिका कम मॉडेल आहे ती.
माहिती असुनही विचारण्याचे कष्ट घेतल्यबद्दल धन्स :)
17 Feb 2011 - 12:34 pm | टारझन
=)) =)) =)) आगायाया =)) =)) =)) बाजार उठला =))
असो .. आम्ही फक्त "मन्ना डे " वाचतो बुवा. .. :)
बाकी काकुंनी चिडु नये .. हलकेच घ्यावे :)
17 Feb 2011 - 10:55 am | मुलूखावेगळी
नीट वाच हा मुद्दे दोघांनाही लागु पडतात. पण मुलांचा उल्लेख नाहीये म्हनुन
17 Feb 2011 - 10:58 am | टारझन
कुठे हे स्त्री विषयक चर्चा चालु असताना त्यात जबरदस्ती पुरुष का घुसवताय ? णवा धागा काढा
17 Feb 2011 - 11:07 am | मुलूखावेगळी
आता हाच धागा सुरु आहे तर ह्याच धाग्यावर का नको पण?
17 Feb 2011 - 10:57 am | llपुण्याचे पेशवेll
गविंच्या मताशी सहमत आहे.
17 Feb 2011 - 11:45 am | अभिज्ञ
बाकी चर्चा उत्तम.
http://www.youtube.com/watch?v=cO1I2GwlgDM
अभिज्ञ.
17 Feb 2011 - 11:47 am | स्पा
ये ....
शंभर !!!!!!!
हभिनंदन गवि
17 Feb 2011 - 2:02 pm | गणेशा
अवांतर :
गवि , तुमचे लिखान आवडले .. आवडते.
हा लेख ही उत्तम झाला आहे.. जे बदलायचे आहे त्याचे वर्णन हे असेच मनावर ठसले पाहिजे .. जरे येथे मुद्धा कंफर्टपनाचा असला तरी हा लेख बर्याच अन्कंफर्ट मनाचा चलबिचलपणा पण दाखवतो आहे..
तरीही आपल्याच लेखामध्ये मुद्दे मांडण्यासाठी मसाला मारावा लागतो हे म्हणने चुक आहे, अआणि तितकेच आपल्या प्रतिभेला कमी लेखने आहे.
प्रत्येक कलाकृती हि तीच्या निर्मात्याला आनंद देवुन जाते.. आणि त्या कलाकृतीचा खुद्द त्या कलाकाराणेच आदर केला पाहिजे .. म्हणजे इतर ही ते करतीलच ...
अतिअवांतर :
अश्लिल कपडे घालताना ज्याचा त्याचा प्रश्न असे उद्दात धोरण अवलंबवताना.. एखाद्याने जर त्या पद्धतीने लेखन केले की तुम्ही प्रसिद्धीसाठी हे केले आहे असे वाटते असे म्हणताना काहीच कसे वाटत नाही ..
एकिकडे ज्याचा त्याचा प्रश्न आणि दुसरीकडे माल मसाला का म्हणुन ते कळाले ..
मत हे ठाम हवे ... भले ते चुकीचे का असेना
- गणेशा
17 Feb 2011 - 10:12 pm | पक्या
ज्यांना जे जे जशा फॅशन चे कपडे घालायचेत ते त्यांनी घालावेत.
फक्त घालताना एक काळजी घ्यावी की ते व्यवस्थित दिसावेत..ओंगळवाणे दिसू नयेत...मग भले बिकीनी ही घालोत.
फॅशन करताना त्या फॅशन ची व्यवस्थित माहिती करून ती करावी .
लो वेस्ट जीन्स घालून बसायचे असेल तर कमरेला बेल्ट लावणे मस्ट आहे. म्हणजे बसलेल्या स्थितीत ती जिन्स मागून व्यवस्थित दिसते.( गवींच्या भाषेत -)वक्षखिंड दाखवणारा टॉप घालायचा असेल तर तो पुरेसा घट्ट हवा (बॉडी फिटींग).
बाकी गविंना ज्या मुली त्यांच्या वेषभूषेत अनकंफर्टेबल वाटल्या त्या तशा नसतील ही. पायावर पाय घालून दोन अडीच तास बसणे हे पुरषांना जमत नसेल पण युवतींना तशी सवय असेल. नाहीतर ती मुलगी उठून उभी पण राहिली नसती का. अशा स्थितीत बसणेच मस्ट होते असे नक्कीच नसेल,
मुले नाही का सारखे आपल्या केसांवरून हात फिरवत असतात तशाच मुली देखील कपडे वर खाली ओढत असतील.
17 Feb 2011 - 10:22 pm | रेवती
खूप प्रतिसाद मिळालेला धागा पाहिला की 'हा विषय' मला का नाही सुचला असं दरवेळी वाटत राहतं.
17 Feb 2011 - 10:45 pm | मराठे
सवय नसल्यामुळे आज जे कपडे अन्कम्फर्टेबल वाटताहेत; काही दिवसांनी सवय झाली की त्यांना कंफर्टेबल वाटू लागतील. मग जशी जशी असे कपडे घालणार्या मुलींची संख्या वाढत जाईल तसे तसे लोकांनाही त्याचे वावडे उरणार नाही. तोवर नविन फ्याशन येईल. आणि हे चक्र चालू राहिल. तसं पाहिलं तर आज अन्कंफर्टेबल वाटत असूनही असे कपडे घालणार्या मुली म्हणजे एक प्रकारे 'ट्रेंड सेटर' च म्हणायला हव्या.
राहिला प्रश्न त्या फ्याशन च्या समर्थनार्थ केलेला युक्तीवाद (कंफर्ट)... जो चूक असू शकतो (एखाद्या मुलीला/मुलाला वाटतही असेल कंफर्टेबल म्हणजे सगळ्यांनाच कंफर्टेबल असेल असं नाही).. त्याऐवजी 'वैयक्तिक आवड निवड' (ज्याचा त्याचा प्रश्न!) हा युक्तीवाद जास्त बरोबर वाटतो.
17 Feb 2011 - 11:22 pm | पिंगू
कुणाला वाटेल त्याने तसे कपडे घालावेत आणि त्यामुळे दुसरयांच्या पोटात जळजळ व्हायचं कारण नको.
बाकी लेखातील मूळ मुद्द्यांशी सहमत..
- पिंगू
19 Feb 2011 - 1:09 am | विनायक बेलापुरे
गविंचे मुद्दे नीट समजून न घेता संस्कृती रक्षक, फैशन सेन्स , बलात्कार , नउवारी साडी वगैरे मुद्दे हवेत उडवले जात आहेत.
जर एखादे वस्त्रप्रावरण कंफर्टेबल वाटते म्हणून अंगावर चढवायचे तर त्यात वावरतानाचा सहजपणा दिसला पाहिजे ,उगाच अवघडले पणा येणार असेल तर त्यात कसला आलाय डोंबलाचा कंफर्ट ? इतके साधे आणि सोपे मत त्यांनी मांडले आहे.
लेख छानच लिहीला आहे जरा बोचरा आहे पण विषयच तसा असल्यामुळे त्यांना तो अधिक पातळ करता आला नसावा.
19 Feb 2011 - 3:15 pm | गवि
धन्यवाद हो, नेमका मुद्दा समजून घेतल्याबद्दल..
23 Feb 2011 - 9:05 pm | निनाद मुक्काम प...
लेखनशैली अप्रतिम आहे .वाचतांना मजा आली .
प्रतिक्रीया सुद्धा रोचक आहेत .अश्यावेळी माझ्यासारख्या प्रतिक्रिया सम्राटांनी किती काळ मौन धरायचे तेही अश्या रंजक लेखावर ?
तेव्हा उचलली जीभ आणी लावली टाळ्याला..
ड्रेस कोड हि संकल्पना मला तत्वता मान्य नाही .कुणी काय घालावे ह्यावर उपदेश करणारे सीमेपलीकडे भरपूर आहेत .हि तालिबानी प्रवृत्ती आपल्या समाजात अजिबात असता कामा नये
.
मुळात एखादा पुरुष उत्तेजित होईल अशी वेशभूषा घालू नको हे एका कन्येस सांगण्यापेक्षा पुरुषप्रधान मानसिकता हि बालकास त्याच्या बाल्यावस्थेत म्हणजे पुरुषत्वाची जाणीव होण्याआधी सुधारली पाहिजे .
स्मिता ताई ह्यांनी खुपतेच्या भागात जो प्रसंग सांगितला (ह्याचा उल्लेख एका प्रतिक्रियेत होता ) त्या अनुषंगाने माझे मत मांडतो . त्यात मुलीने जीन्स कशी घालावी हे तिने ठरवावे हे मान्य
.मात्र आपला भारत एकच वेळी अनेक शतक व दशकात राहत आहे . समाजातील वाढत्या उच्च मध्यमवर्गीयांची आधुनिकीकरणाची झेप एवढी जलद आहे .कि इतर वर्गांची माती कुंठीत होते.( दे धक्का मधील मक्याचे शेवटचा डायालोग)ह्यात आर्थिक आणी सांस्कृतिक व सामाजिक विकास व प्रगल्भता अश्या अनुषंगाने मला म्हणायचे आहे .
अश्यावेळी ती तरुणी लो जीन्स घालून बाईक वर बसली असतांना पाठून आलेले तरुणाने तिच्या जीन्स मध्ये सिगरेट टाकली .
तेव्हा अर्थात त्या प्रसंगाला तोंड त्या तरुणीला द्यावे लागले .
महान परंपरांचे गोडवे गाणार्या आपल्या समाजात पुरुष प्रधान संस्कृती व स्त्रीला फक्त मादी समजणे .व पौगुंडावस्थेत आपल्या नैसर्गिक भावनांचे दमन कि शमन ह्या द्विधा मनस्थितीत असलेल्या बहुतांशी युवकांची मानसिकता. त्यास हातभार म्हणून
प्रसारमाध्यमात जाहिरात ते रियालती शो मधून व अर्थात सिनेमातून महिला हे उपभोग्य वस्तू म्हणून सादर केली जाते ..
अश्यावेळी अशिक्षित व शिक्षित तरुण जेव्हा आधुनिक पेहेराव केलेल्या तरुणी पाहतात तेव्हा त्यांच्यातील विकृती बाहेर येते .पूर्ण साडी घातलेल्य बायकांना बस मध्ये किंवा लोकल मध्ये धक्का मारणे .किवा चिमटा काढणे असे प्रकार होतात.
( बहुतेक गोर्या बायका भारतातील शहरतील व खेड्यातील तरुण हे निळ्या सिनेमातून प्रथम पाहतात .तेव्हा सगळ्या गोर्या बायका म्हणजे कधीही कुठेही तयार . अशी कल्पना बहुतांशी भारतीय तरुण करतात .म्हणून मग अमीर खान ला जाहिरातीतून आव्हान करावे लागते )
.तेव्हा अश्या परीस्थित आपण कुठे वावरत आहोत हे पाहून पेहराव करणे.( डोंबिवलीतून आमच्यावेळी मुली पंजाबी ड्रेस घालून मुंबईत कॉलेजात शिरल्या कि लगेच वेशभूषा बदलून आधुनिक होतात .दिल्ली ६ मध्ये सोनम कपूर चा गाण्यातील प्रसंग आठवा )
किंवा जर कुणी वाकड्यात गेल. तर पायताण समोरच्याच्या गालावर मारण्याची धमक नि तयारी असेल तर असे पेहेराव घालण्यात काहीच हरकत नाही .
चक्षु मोदन करणे किंवा सौंदर्याला दाद देणे हे रसिकतेचे उदाहरण असते .मात्र त्यात अतिरिक्त वासनेचा डोस आल्यास वखवख निर्माण होते व तिच्यातून विकृती .
व असे विकृत महाभाग शाब्दिक किंवा प्रत्यक्ष अंगचटीला येऊन नसता अगोचरपणा करतात.
तेव्हा काळ वेळ पाहून वेशभूषा करायला काहीच हरकत नाही .
25 Feb 2011 - 3:03 am | शेखर काळे
आम्ही ही जाऊन टेहेळणी करून येऊ ..
13 Jan 2014 - 10:56 am | विजुभाऊ
वा वा गवि भाय मजा आगया हे पुन्हा वाचुन
13 Jan 2014 - 5:55 pm | दिव्यश्री
आणि आवडलाही ...बाकी एक लिंक देते ती बघावी हि विनंती.अमिताभ बच्चन आणि झीनत चा 'दोस्ताना' या चित्रपटातील संवाद जरूर पाहावा आणि ऐकावा....
http://www.youtube.com/watch?v=sBL6wZUFgW4
16 Jan 2014 - 11:57 pm | मस्तानी
विजुभाऊ लेख वर आणल्या बद्दल थॅंक्यू व्हेरी मच !