प्यासा

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
16 Feb 2011 - 1:17 am

लोकसत्तेत वाचले... व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने टाईम साप्ताहीकाने १० "प्रेमकहाण्यां"च्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. त्यात पाचवा चित्रपट हा गुरूदत्तचा प्यासा आहे.

Where did classic Hollywood go when it died? To India, where the nation's pop cinema (Bollywood to you) still attends to antique conventions of family fealty, personal integrity and, of course, all-conquering love. (टाईम)

गुरूदत्तचे दिग्दर्शन, एस डी बर्मनचे संगीत, आणि गुरुदत्तसहीत वहीदा रेहमान, माला सिन्हा, रेहमान, जॉनी वॉकर, मेहमूद वगैरे अनेक दिग्गज कलाकारांच्या हया चित्रपटाला, भले टाईम साप्ताहीकाने चांगले म्हणले अथवा दुर्लक्ष केले म्हणून काहीच फरक पडणार नाही.

मात्र, त्यानिमित्ताने एक प्रश्न पडला: अजून असले कुठले हिंदी-मराठी चित्रपट आपल्याला आठवतात जे कलात्मक प्रेमकथेत बसू शकतील?

कलासमाजचित्रपटमाध्यमवेध

प्रतिक्रिया

सिनेमे फारसे पहात नाही पण "प्रेटी वूमन" हा व्यावसायीक सिनेमा खूप आवडला. मान्य की हा कलात्मक सिनेमा नाही.
पण अगदी स्वप्नाळू कहाणी...... नरकसम वेश्येच्या जीवनातून, व्यवसायातून एका धनाढ्य उद्योगपतीने केलेली सुटका अशी मध्यवर्ती कहाणी आहे. संगीत म्हणजे काळजाचा ठाव घेणारं असून रिचर्ड जेरे चा आणि ज्युलिया रॉबर्ट्स चा अभिनय सुरेख आहे.
सिनेमामध्ये भावपूर्ण क्षण विखुरलेले आहेत...... आणि वेश्यावस्तीच्या भगभगीत पार्श्वभूमीवर ते जास्त उठून दिसतात असं मला वाटतं.
बाकी फारसे सिनेमे पाहीलेच नाहीत त्यामुळे तुलना करता येत नाही.

नेत्रेश's picture

16 Feb 2011 - 1:59 am | नेत्रेश

माझ्या माहीती नुसार Gere चा उच्चार 'गेअर' असा होतो.
अचुक उच्चार या लिंक वर आहे:
http://inogolo.com/audio/Gere_4463.mp3

शुचि's picture

16 Feb 2011 - 2:01 am | शुचि

<ओशाळलेली स्मायली>

नेत्रेश's picture

16 Feb 2011 - 2:17 am | नेत्रेश

मी खरड पाठवायला हवी होती. पण ही माहीती बाकीच्यानाही उपयोगीपडेल म्हणुन प्रतिसाद दिला.
बाकी ओशाळे केल्यापद्दल स्वारी.

इंटरनेटस्नेही's picture

16 Feb 2011 - 2:08 am | इंटरनेटस्नेही

प्यासा म्ह्टलं की आम्हाला पुण्यातलं प्यासा म्हणुन एक अहोरात्र पाणी मिळणारा धबधबा आहे, तो आठवतो!

असो. उत्तम लेखन. झुन्या आठवनी झाग्या झाल्या!

कालपरवाच ही बातमी फेसबुकाद्वारे आम्हास कळली. या निमित्ताने गोर्‍यांनाही आमच्या सुंदरीची ओळख झाली हे त्यांचे भाग्य.

गणपा's picture

16 Feb 2011 - 2:09 am | गणपा

५० च्या दशकातला आवारा.

सुंदर गाणी, (खरा) अभिनय

८०च्या दशकातला सिलसिला (१९८१). (अधुरी एक कहाणी....)

त्याच सालचा एक दुजे के लिये (१९८१).

कमल हसनचा उत्कृष्ट अभिनय असलेला सदमा (१९८३)

थोडं अजून बोलायचं आहे "प्रेटी वूमन" बद्दल.

संपूर्ण सिनेमाभर रिचर्ड गेयर हा अतिशय "कर्टियस" म्हणून स्मरणात रहातो. कर्टियस पण लेचापेचा (विशीवॅशी) नाही असा. आणि संपूर्ण सिनेमाभर त्याने व्हिव्हिअन (ज्युलिआ) ला एक "लेडी" म्हणून दिलेले अटेन्शन जे की तिच्या "व्यक्तीमत्वाविषयीच्या"आकर्षणातून तरी निर्माण झालेले असते ते तर अगदी अफलातूनच.
व्हिव्हिअनचे व्यक्तीचित्रण खूप सुंदर आणि बारकाव्यांसकट उभे केले आहे. असे वाटते की आपण एखादी कादंबरीचे वाचत आहोत. मग ते तिचे दात फ्लॉस करण्याविषयीचा आग्रह असो की "डील" ( ; ) ) करतानाची खंबीर भूमिका असो.

हळूहळू , ग्रॅज्युअली आणि लहान प्रसंगांतूनदोघंजण एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे पहाणं मला खूप मधुर अनुभव वाटला. या सिनेमाची धुंदी खूप वेळ रेंगाळते.
"प्रेटी वूमन वॉकींग डाऊन द स्ट्रीट, प्रेटी वूमन द काईंड आय लाइक टू मीट" हा साऊंडट्रॅक आणि अन्य गाणी अतिशय मधुर आहेत.

शुची , तुझ्या प्रत्येक वाक्यांशी सहमत
मला तर It must have been love, but it's over now य गाण्याने मोहीनीच टाकली होती

Make believing we're together
That I'm sheltered by your heart
But in and outside I turn to water
Like a teardrop in your palm

And it's a hard winter's day
I dream away...

It must have been love, but it's over now ...
It must have been good, but I lost it somehow
It must have been love, but it's over now
From the moment we touched till the time had run out

काहीही म्हणा ..I just love this Song !!

मराठीतले उत्तरायण, बयो, क्षण इ. चित्रपट

चित्रा's picture

16 Feb 2011 - 3:39 am | चित्रा

हिंदीत तर सगळ्याच प्रेमकथा असतात.. :-)
नुसते प्रेमासाठी प्रेम असे म्हटले नाही तर
सहज आठवले ते- सुजाता (नूतन, सुनील दत्त)
मराठीत -पिंजरा (संध्या - अभिनय आवडणे वेगळी बात आहे, पण कथा जालिम आहे).
आंधी (सुचित्रा सेन, संजीवकुमार)
अजून एक म्हणजे पाकिझा (मीनाकुमारी)
इ.

अरे सगळेजण नुसती यादी काय लावताय. काय आवडलं ते सांगा. यादी आम्हालाही माहीत आहे. :(

मेघवेडा's picture

16 Feb 2011 - 5:09 am | मेघवेडा

इंग्लिश चित्रपटांच्या यादीत 'लव्ह अ‍ॅक्चुअली', 'मेमेन्टो' वगैरे आहेतच!

इथं इंग्लिश चित्रपट कुठले असा प्रस्ताव मांडलेला नाही पण आवर्जून नमूद करावासा वाटतो असा एक चित्रपट म्हणजे 'अपोकॅलिप्टो'. आपल्या बापाचा गळा आपल्या समोर चिरलेला पाहून धुमसणारा 'जॅग्वार पॉ', विहीरीत लपवून ठेवलेल्या आपल्या गर्भवती पत्नीच्या आणि लेकराच्या प्रेमापोटी त्यानं नरबळी चुकवून पळून येताना केलेली धडपड, आपल्या पोराच्या हत्येचा सूड घेण्यासाठी काहीही करण्यास तयार असलेल्या 'झीरो वूल्फ'ने केलेला त्याचा पाठलाग सर्वच प्रेक्षणीय आहे! मेल गिब्सननं उत्तमरित्या सादर केली आहे कथा. एकही संवाद इंग्लिशमध्ये नसतानाही (मायन भाषेत आहेत ते ही अगदी मोजकेच आहेत म्हणा) प्रत्येक सीनमागील भावना पोहोचते इतका ताकदीचा अभिनय सार्‍यांनीच केला आहे. रूडी यंगब्लडनं तर खरंच कमाल केली आहे. आपल्या बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेल्या 'जॅग्वार'च्या चेहर्‍यावरील सूडाचे भाव यथोचित पोहोचतात आपल्यापर्यंत. पत्नीच्या काळजीने व्याकुळ झालेल्या पतीचं तिळतिळ तुटणारं मन त्याच्या चेहर्‍याद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधतं तेही संवादांविना!

त्यामुळे मुळात एक अ‍ॅक्शनपट असूनही इथं कलात्मक प्रेमकथांच्या यादीत समाविष्ट करावासा वाटला.

आणखी एक असाच 'मस्ट मेन्शन' म्हणजे फॉरेस्ट गम्प! पण असो. मूळ विषय हिंदी-मराठी चित्रपटांचा असल्याने पूर्णविराम. :)

आनंदयात्री's picture

16 Feb 2011 - 6:08 am | आनंदयात्री

अ‍ॅपॉकॅलोप्टोतला थरार आणि जग्वॉर पॉ अविस्मरणीय !!

आय अ‍ॅम जग्वॉर पॉ ! धिस इज माय फॉरेस्ट ! माय फादर हंटेड धिस फॉरेस्ट बिफोर मी .. माय सन्स अँड देअर सन्स विल हंट हिअर आफ्टर आय अ‍ॅम गोन !!

वाटाड्या...'s picture

17 Feb 2011 - 12:37 am | वाटाड्या...

मेवेशेठ...

अपोकॅलिप्टोचा असा केलेला उपयोग अतिशय आवडला....नुकताच परत बघितला...डियर जॉन कुणी बघितला आहे का रे?

- (फिल्मी) वाटाड्या...

स्वाती२'s picture

16 Feb 2011 - 5:15 am | स्वाती२

मला आवडलेले प्यासा,सुजाता, बंदिनी, गाईड. स्ध्या तरी हेच आठवतायत.

आंधीची बांधणी मला खूप कच्ची वाटली होती.

विकास's picture

16 Feb 2011 - 8:52 am | विकास

प्यासा,सुजाता, बंदिनी, गाईड

सर्वच मस्त आहेत.

आंधीला प्रेमकथा म्हणणे अवघड जाईल असे वाटते.

खडूस's picture

16 Feb 2011 - 10:00 am | खडूस

माझा अत्यंत आवडता चित्रपट.
नितांतसुंदर गाणी.
प्रुथ्वीराज कपूरच्या मर्दानी सौंदर्यापुढे आजकालचे खान मंडळी, रोशन वगॅरे कचकडे वाटतात.

(कोण आहे रे तिकडे जो मुगल्-ए-आझम चा हिरो दिलीप कुमार आहे असे म्हणतोय ? पण आम्हाला शहजादे सलीमपेक्षा जिल्लेइलाहीच आवडले. पसंद अपनी अपनी.)

मैत्र's picture

16 Feb 2011 - 11:26 am | मैत्र

आजवरचा सर्वात देखणा हिरो ग्रेगरी पेक आणि अतिशय सुंदर ऑड्री हेपबर्न... खुप सहज, हलकेच जुळत जाणारे बंध आणि तितकंच अचानक वेगळं होणं... शेवटचा सीन तर कमाल आहे.
हा चित्रपट टाईम च्या यादीत असायला हवा होता.

माझा आवडता अजून एक - रिचर्ड गेरे, सुसान सारंडन (नक्की उच्चार कसा आहे :S) आणि जेनिफर लोपेझ
"शॅल वी डान्स "

मि. क्लार्क, डान्स टिचर आणि नंतर त्याच्या बायकोमधलं थोडंसं निसटत चाललेलं प्रेम. खूप सुंदर चित्रपट आहे.
रिचर्ड आणि जे एल ओ च्या अभिनयापुढे, त्यांचा ऑरा आणि मोठा रोल यात मध्ये डिटेक्टिव्ह बरोबर बोलताना सुझान ने जो काही अभिनय केला आहे तो लाजवाब आहे. बरंच श्रेय दिग्दर्शक आणि संवादांना आहे.

फक्त हा एका याच नावाच्या जपानी चित्रपटाचा रिमेक आहे ही एक डावी बाजू वगळता फार भावून जातो ...

आत्मशून्य's picture

16 Feb 2011 - 1:35 pm | आत्मशून्य

Jennifer Love Hewitt चा "इफ ओन्ली" बघाच. आधूनीक जगातसूध्दा प्रेम म्हणजे काय असते हे मला या चीत्रपटाने दाखवले. पावसाची सर जरा जास्तच जोरात होती म्हणून अलकाला आडोसा घेतला होता आन हा चीत्रपट दीसला. आता टाइमपास करायचाच होता व आलोच आहोत तर पाहूया म्हणून कोणतीही माहीती नसताना तीकीट काढले आणी.... रेस्ट इज हीस्टोरी ;) (माझा सर्वात आवडता रोमँटीक चीत्रपट बनून गेला).

रणजित चितळे's picture

16 Feb 2011 - 1:44 pm | रणजित चितळे

हल्लीचा परिणीता

विद्या बालन, तिचा अभिनय व अप्रतिम गाणी. सरतचंद्रानी क्लासिक काय असते ते शिकवले.

मी कोलकत्याला ३ वर्ष होतो त्यामुळे अजूनच हा चित्रपट भावला.

अरे प्रेमकथेबद्द्ल ल्ह्या ना
"गॉन विथ द विन्ड" बद्दल काही बोला

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Feb 2011 - 1:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे घ्या, पराशेटने लिहीलं होतं.
आणि स्कार्लेटबद्दल दुसर्‍या अदितीने लिहीलं होतं ते ही वाचण्यासारखं आहे.

प्रदीप's picture

16 Feb 2011 - 6:40 pm | प्रदीप

अत्यंत, महामहा बोअर चित्रपट वाटला. लांबलचक आहे, मेलोमेलोड्रमॅटिक आहे (कदाचित हॉलीवूडमधील तो तसा पहिला मेलोड्रामा असावा). मला तो पहायचा नव्हता, एकदा बायकोमुळे बघण्यास भाग पडले. मी तिला सूड म्हणून कधीतरी 'झनक झनक....' पहायला नेणार आहे,

वपाडाव's picture

16 Feb 2011 - 3:00 pm | वपाडाव

प्रेम कथा असाव्यात तर कोरियन चित्रपटासारख्या...
नाजूक, सालस, गोंडस, गोमट्या, हसर्या, ------- पोरी
कथांचे चित्रण, पार्श्वभूमी, भावना सर्व पातळ्यांवर अप्रतिम कामगिरी..
सुरुवातीला वाटले एखाद्या भाषेत एखाद-दोन चित्रपट येतात चांगले...
पण यांची (कोरियन चित्रपटांची) लडच आहे ना.....
My Sassy Girl
My Girl and I
My Boyfriend is Type B
A Moment to Remember
Oldboy - ज्याचा हिन्दी रिमेक Zinda(sanjay dutt)
Who Slept with Her
When I Turned Nine
Daisy...

यादी बरीच मोठी आहे, तुर्तास इतकेच.

आणि विन्ग्रजीतील,
before sunrise & before sunset (simultaneously)
हे दोन चित्रपट...
हलके फुलके पण अप्रतिम...
भावनिक गुंतागुंत आणि संवाद..

स्पंदना's picture

16 Feb 2011 - 3:42 pm | स्पंदना

चितचोर नाही आठवला कोणाला? हलक फुलक पण मनाला भावणार एक गैरसमजाच छोटस वादळ म्हणता येइल असा हा पिक्चर!! अमोल पालेकरचा साधा भोळा मनस्वी नायक अन झरिना वहाबच अल्लड गाव की गोरी हे रुप , छान वाटत बघायला. पण अगदी आवडलेली प्रेमकथा म्हणजे ह्रषीदांचाच ' खुशबु' कितीही वेला बघीतला तरी प्रत्येक वेळी हळवा करणारा हा पिक्चर माझा जाम आवडीचा आहे.

चिगो's picture

16 Feb 2011 - 3:47 pm | चिगो

50 first dates बद्दल काय म्हणता? हिंदीत सिलसिला, अभिमान (प्रेमकथा?)... मला व्यक्तिशः "दिल चाहता है" मधल्या तिन्ही प्रेमकथा आवडल्यात. (कलात्मक नाहीत कदाचित)..

मितभाषी's picture

16 Feb 2011 - 4:11 pm | मितभाषी

DDLJ

आजानुकर्ण's picture

16 Feb 2011 - 4:20 pm | आजानुकर्ण

Before Sunrise, Before Sunset हे अप्रतिम चित्रपट आवडले होते. Notting Hill आणि The Reader ही चांगले होते.

वपाडाव's picture

16 Feb 2011 - 5:02 pm | वपाडाव

काय दिसतात ज्युलिया वैनी !!!
hugh grant चा अभिनय सुरेख..
America's Sweethearts, Serendipity हे सिनेमे सुद्धा भारी...

आजानुकर्ण's picture

16 Feb 2011 - 5:20 pm | आजानुकर्ण

Hugh Grant मला आवडत होता. पण तो बराच लफडेबाज असल्याचे लक्षात आल्यावर मनातून उतरला. नंतर त्याचा अभिनयही आवडेनासा झाला. Love Actually मध्ये तर तो डोक्यातच गेला होता.

विजुभाऊ's picture

16 Feb 2011 - 5:03 pm | विजुभाऊ

प्रेमकथा ही असफल प्रेमाचीच होते काय?
अमोलपालेकरचे चित्रपट छोटीसी बात / चिताचोर/ बातो बातो मे हे उत्तम कथा असलेले चित्रपट आहेत.
हिंदी चित्रपटात प्रेम कथा ही असावीच लागते अन्यथा तो चित्रपट व्यथा होतो. ( काही अपवाद वगळता)
शोले सारखा चित्रपट सुद्धा सुटला नाहिय्ये त्यातून

प्रदीप's picture

16 Feb 2011 - 6:47 pm | प्रदीप

'कलात्मक प्रेमकथा' ह्या पिजनहोलमधे बसणारे मला आवडलेले काही चित्रपट ('प्यासा' व्यतिरीक्त)

* मेरा नाम जोकर (पहिले तीन भाग, फक्त)
* तीसरी कसम
* प्रेम रोग
* कागज़ के फूल
* छोटी सी बात
* बंदिनी

* ला स्ट्राडा

रेवती's picture

16 Feb 2011 - 8:10 pm | रेवती

हां, छोटीसी बातबद्दलच ल्ह्यायला आले होते.

मुलूखावेगळी's picture

16 Feb 2011 - 9:36 pm | मुलूखावेगळी

माझा पण फेवरेट छोटीसी बात आलटाइम

पैसा's picture

16 Feb 2011 - 8:16 pm | पैसा

चोरी चोरी, आणि जब वी मेट ह्याना कोणी कलात्मक म्हणेल का नाही माहित नाही पण एकदम ताजे चित्रपट आहेत.
"चोरी चोरी" कितीही वेळा बघितला, त्याचे कितीही वेगवेगळ्या प्रतीचे रिमेक्स झाले तरी तो "एक आणि एकच"!
तसंच "जब वी मेट" मध्ये करिना कपूर पण खूप सुसह्य होती. अप्रतिम गाणी तसंच हिरो हिरॉईनचा प्रवास हा हा दोन्हीतला समान धागा.

चोरी-चोरी ज्या चित्रपटावरून ९०% फ्रेम बाय फ्रेम उचलला आहे तो it happened one night बघायला पाहिजे. क्लार्क गेबल अप्रतीम!
(क्लार्क गेबल आणि राजकपूर ची तुलना करावी लागते ही एक दुर्दशा!)

विकास's picture

16 Feb 2011 - 8:21 pm | विकास

सर्व वाचक प्रतिसादकांचा आभारी!

वर सांगितलेल्या अनेक चित्रपटांच्या संदर्भात सहमत. सुरवातीस म्हणल्याप्रमाणे "कलात्मक प्रेमकथा" म्हणायचे कारण इतकेच की हिंदी-मराठी चित्रपटात नेहमी नाही पण अनेकदा प्रेमकथाच असतात. त्यातील काहीच चित्रपट असे असतात की जे काळाचे बंधन तोडून पुढच्या पिढ्यांना देखील आवडत रहातात. प्यासा हा तसा चित्रपट आहे.

वर छोटीसी बात आला आहेच त्याच प्रमाणे अमोल पालेकरचे "रजनीगंधा," "बातो बातो मे", सारख्या तरल प्रेमकथा

"एक दुजे के लीये" मधल्या उत्कट प्रेमकथेसारखेच राज कपूरचे चित्रपट वाटतात - "आवारा वर" आला आहेच (जरी तो नुसताच प्रेमकथा म्हणता येणार नाही), पण त्याही पेक्षा त्या संदर्भात आवडलेला चित्रपट म्हणजे "आह" . सद्मा खूप आवडला पण चित्रपट असला तरी, परत बघवणार नाही असे वाटते.

बंदीनी प्रमाणेच नुतन-बलराज सहानीचा "सोने की चिडीयॉ" आणि बलराज सहानी-लीला नायडूचा "अनुराधा"...

"परीणीता"सारखाच दुसरा सध्याच्या काळातला "रेनकोट".

"पाकिझा" सारखाच मीना कुमारी-अशोक कुमारचा (कदाचीत आता बटबटीत वाटेल) "चित्रलेखा".

मराठी चित्रपट पटकन आठवत नाहीत. उत्तरायण बघितलेला नाही. :(
अनेक कंगोरे असलेल्या "पिंजरा" मधली प्रेमकथा पण कायम डोक्यात राहते. कदाचीत अमोल पालेकर स्टाईल चित्रपटांमधे, बर्‍याच आधीचा "लाखाची गोष्ट" हा चित्रपट बसेल असे वाटते. "पोस्टातली मुलगी" हा उषा किरणचा चित्रपट पुर्वीच्या अधुर्‍या (आणि रडक्या) प्रेमकथेतील आहे असे वाटते...

असो,

इन्द्र्राज पवार's picture

16 Feb 2011 - 9:16 pm | इन्द्र्राज पवार

"...."परीणीता"सारखाच दुसरा सध्याच्या काळातला "रेनकोट".....!

~ 'रेनकोट' चा उल्लेख करण्यासाठीच आलो होतो, पण यू डिड इट...विकास जी.
ओ'हेन्री ची ही कथा मी चित्रपटापूर्वीच वाचली होती [The Gift of the Magi ~~ या कथेतील नायिकेचे नाव "डेलिया" खूप सुंदर वाटते, नव्हे आहेच...त्या मानाने ऐश्वर्याचे "नीरू" काहीसे गद्य वाटते...असो] पण त्याचे 'रेनकोट' मधील रूपांतर अगदी असे काही जातिवंत उतरले आहे की त्याबद्दल ऋतुपर्ण घोषला दहापैकी दहा गुण द्यावेत असे वाटते. फार तरल प्रेमकथा आहे....मुळात संपूर्ण चित्रपटच त्या धाग्याशी प्रामाणिक राहून निर्मिला असल्याने एकही फ्रेम इकडे तिकडे होत नाही. त्या घरमालकाने नीरूच्या श्रीमंतीचे 'भांडे" फोडण्याचा रोखठोक व्यवहारी दीर्घ प्रसंगही मूळ प्रेमकथेचा हळुवारपणा कमी करीत नाही, हे आणखीन् एक वैशिष्ट्य.

२. वरचा 'सोने की चिडीया' चा उल्लेख वाचला. माझ्याकडे या चित्रपटातील एक गाणे (व्हिडीओ रूपातील) पण त्यामध्ये बलराज साहनी न दिसता तलत मेहमूद दिसतात ~ 'प्यार पर बस तो नही मेरा लेकीन फीर भी तू बता तुझे प्यार करू या ना करू...' हे ते गाणे. त्यामुळे नायक तलत होते की बलराज?

इन्द्रा

विकास's picture

16 Feb 2011 - 9:32 pm | विकास

त्यामुळे नायक तलत होते की बलराज?

नायक बलराज होते. आणि हो हा जरी चित्रपट मी म्हणले असले तरी माझ्या डोक्यात तेंव्हा "सीमा" होता...

हिंदी चित्रपटात प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने बसलेले दाखवले जाते: त्यात प्रेम आहे हे न समजलेला (फिल्मी) चित्रपट म्हणजे "रंगीला"आणि अर्थातच "जाने तू या जाने ना"... मात्र वेगळ्या प्रकारात कलात्मक म्हणता येतील असे अजून दोन आठवलेले: "पिंजर" आणि "वोह सात दिन".

'उत्तरायण' मध्ये आयुष्याच्या उत्तरायणात जुळलेल्या भावबंधांचं चित्रण आहे आणि ते शिवाजी साटम, नीना कुळकर्णी यांच्या सक्षम अभिनयानं सजलं आहे. पोरगा लग्नाच्या वयाचा, बायको जाऊन दहा-बारा वर्षे झाली अशा परिस्थितीत रघुला आपली बालमैत्रीण भेटते आणि मग त्यांची प्रेमकथा!! विषय थोडासा 'ऑफ द ट्रॅक' असल्यानं लिहिलं नाव वर नि तसा छान आहे चित्रपट. गाणीही उत्तम आहेत. धुंद होते शब्द सारे, रान हे उठले उठले इ. इ.

बाकी अमोल पालेकरचे रजनीगंधा, छोटीसी बात प्रमाणेच नरम गरम सुद्धा आवडला होता आणि घरोंदा देखील. घरोंदातली 'दो दीवाने शहर में' आणि 'तुम्हें हो ना हो मुझको इतना यकीं है' ही गाणीही मस्त!

नितिन थत्ते's picture

16 Feb 2011 - 10:11 pm | नितिन थत्ते

प्यासा ही प्रेमकथा असल्याचे आत्ताच कळले. :(

विकास's picture

16 Feb 2011 - 10:20 pm | विकास

प्यासा ही प्रेमकथा असल्याचे आत्ताच कळले.

नसेलही प्रेमकथा! हू नोज गुरूदत्तच्या डोक्यात नक्की काय होते ते!

मला वाटते एकटा माणूस ऐन समारंभात असहकार पुकारून तो समारंभच कसा उधळून लावू शकतो हे दाखवणारी कथा पण असू शकेल! ;)

चित्रा's picture

17 Feb 2011 - 4:25 am | चित्रा

रजनीगंधा. - विद्या सिन्हा.
(मला लहानपणी त्यातील दिनेश ठाकूर फारच आवडला होता ;)

आता अलिकडेच पाहिला तर अमोल पालेकरची कॅरॅक्टर फार आवडली.
वयाचा परिणाम.

नितीन बोरगे's picture

17 Feb 2011 - 12:15 pm | नितीन बोरगे

देवदास कसे विसरले सगळे?
माझ्या आवडीच्या काही प्रेमकथा
महल (अशोक कुमार, मधुबाला)
बरसात कि रात (भारत भूषण, मधुबाला)
वंदे शिवम (कमल हसन, तामिळ चित्रपट)
गाईड
मेरा नाम जोकर
सदमा
सोचा ना था (होय तोच अभय देओल वाला)
नदिया के पार (हा मला हम आपके ही कौन पेक्षाही फार जास्त आवडतो)
बाकी आठवतील तसे लिहीनच

ramjya's picture

18 Feb 2011 - 3:27 pm | ramjya

मी रेडियो वर आगोदर दर शुक्रवारी' पिटारा' (दुपारी ४ वाजता) येणारा कार्यक्रम ऐकायचो...निवेदक कमल शर्मा यानी सान्गितलेली 'बायोस्कोप की बाते' (पिक्चर वर असाय चा) आवडत होता...

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Sep 2024 - 1:29 am | अमरेंद्र बाहुबली

त्या काळी प्रेक्षकांना न आवडलेले पण नंतर क्लासिक ठरलेले किंवा काळाच्या पुढचे म्हणून काही सिनेमे चेपूवर दिसले त्यात प्यासा(१९५७) हाही होता. आताच यूट्यूबवर पाहून संपवला. छान आहे. क्लासिक सिनेमा.
इतर काही सिनेमे
नो स्मोकिंग (२००७)
पान्च
देव डी
गो गोवा गोन
रॉकेटसिंग
सगळे पाहून संपवणार.

राघव's picture

13 Sep 2024 - 10:16 pm | राघव

You've Got Mail: साधीसुधी कथा.. पण हाताळणी आणि अभिनय वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. टॉम हँक्स आहेच जोरदार पण मेग रायन मला जास्त भावली!
याच जोडीचा Sleepless in Seattle सुद्धा चांगला आहे. पण मला सादरीकरणात You've Got Mail जास्त आवडतो.

My Cousin Vinny: तसा तर कोर्टरूम ड्रामा आहे, पण यातला जो पेस्सी आणि मारिसा तोमेईचा ट्रॅक हा एक अफलातून आणि हटके असलेली प्रेमकथा म्हणता येईल. एकमेकांना पूरक अशी त्यांची केमेस्ट्री लाजवाब आहे!