स्पेस शटल चॅलेंजर

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
29 Jan 2011 - 5:41 am

स्फुटनिक पासून अमेरिका-रशिया यांच्या मधे चालू झालेल्या अंतराळ स्पर्धेत अमेरिकेने मजल मारली होती. स्पेस शटलचे तंत्रज्ञान विकसीत करून पुन्हा पुन्हा तेच वाहन आंतराळात उपग्रह सोडण्यासाठी तसेच मानवी वावरासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी वापरणे आता नवीन राहीलेले नव्हते. १९८३ मधे मोहीमेसाठी उपलब्ध केले गेलेले दुसर्‍या पिढीतल्या स्पेस शटल चॅलेंजर ने आत्ता पर्यंत ९ मोहीमा यशस्वी पार पाडल्या होत्या.


२८ जानेवारी १९८६ : या वेळच्या मोहीमेचे तरी देखील एक वेगळीच नवलाई होती - न्यु हँपशायर राज्यातील ख्रिस्ता मॅकॉलीफ ह्या एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेच्या रुपातून प्रथमच नागरी व्यक्ती, अर्थातच योग्य प्रशिक्षणानंतर आंतराळात जाणार होती. संपूर्ण देशभर याचे स्वागत होत होते. सामान्य नागरीकाला प्रथम वाव आणि त्यातही इतर वेळेस दुर्लक्षित केल्या जाणार्‍या शिक्षकी पेशातील व्यक्तीस म्हणून स्वतः ख्रिस्ता पण आनंदात होती आणि तसेच एक स्त्री जाणार म्हणून तमाम स्त्रीया देखील. अर्थात त्याच बरोबर अजून सहा आंतराळवीर होतेच.

हे युग इंटरनेट आणि तात्काळ बातमी देणार्‍या वाहीन्यांच्या आधीचे युग होते. सीएनएन चालू होऊन देखील इनमिन पाचएक वर्षेच झाली होती. तरी देखील नासाने तत्कालीन तंत्रज्ञानाचा वापरकरून वाहीन्यांना थेट प्रक्षेपण करता येईल याची व्यवस्था केली. देशभर शाळांमधे अनेक चित्रवाणी संच ठेवून मुलांना कॅफेटेरीया, ऑडीटोरीयम आणि लायब्ररीज मधे दाखवण्याची व्यवस्था केली गेली. सगळा देश अपोलो ११ प्रमाणेच ह्या क्षणाची देखील आतुरतेने वाट पहात होता. काउंटडाऊन सुरू झाले आणि पुर्व किनार्‍यावरील वेळेनुसार साधारण ११:३६/३७ च्या दरम्यान चॅलेंजरने आकाशात झेप घेतली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. हुर्रे! टाळ्या असे करण्यास काही क्षणांचाच अवधी थेट प्रक्षेपण बघताना मिळाला असेल आणि तेव्हढ्यात केवळ ७३ सेकंदांमधे एक आकाशात लोळ उठलेला दिसला. छातीत धस्स होणे म्हणजे काय याचा अनुभव मोठ्यांना आला कारण जे काही दिसत होते त्याची भिषणता जाणवत होतीच पण ते आपल्या मुलांपुढे/विद्यार्थ्यांपुढे पण होत होते....

केवळ ७३ सेकंद आणि अक्षरशः होत्याचे नव्हते झाले. राष्ट्राध्यक्ष रेगन हे त्या संध्याकाळी त्यांच्या राष्ट्राला उद्देशून असलेल्या वार्षिक अभिभाषणाची आणि अर्थातच त्यात अभिमानाने जगासमोर नव्याने केलेला हा पराक्रम पण सांगायचे शब्द परत वाचून तयारी करत होते. आंतराळयात्रेत आजही धोके असतात. १ फेब्रुवारी २००३ ला अशाच एका दुर्घटनेत स्पेस शटल कोलंबियामधे कल्पना चावला ह्या भारतीय वंशाच्या प्रथमच स्त्री आंतराळविरांगनेस असेच आंतराळप्रवास यशस्वी पणे येत असताना अपघातात बलीदान द्यावे लागले होते. हे तर आपण २५ वर्षांपुर्वीचे बोलत आहोत.

म्हणूनच रेगन यांना त्यांचा "स्टेट ऑफ दी युनियन" भाषण रद्द करत, जनतेसमोर ह्या अपयशाचे नेते म्हणून सामोरे जावे लागले आणि बोलावे लागले:


"Nineteen years ago, almost to the day, we lost three astronauts in a terrible accident on the ground. But we've never lost an astronaut in flight; we've never had a tragedy like this. And perhaps we've forgotten the courage it took for the crew of the shuttle."

मात्र याहुनही महत्वाचे होते ते लहान मुलांना सांगणे, "And I want to say something to the schoolchildren of America who were watching the live coverage of the shuttle's takeoff. I know it is hard to understand, but sometimes painful things like this happen. It's all part of the process of exploration and discovery. It's all part of taking a chance and expanding man's horizons. "

त्यानंतर रेगन यांनी नासाच्या कर्मचार्‍यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, जाहीर सांत्वन केले आणि हा प्रकल्प पुढे असाच चालू राहील याची स्पष्ट शब्दात ग्वाही दिली... हा अपघात का घडला? ह्याची अनेक कारणे देण्यात आली पण त्यावर नेमलेल्या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमनने दाखवून दिले की केवळ उजव्या बाजूच्या सॉलीड रॉकेट बुस्टरच्या खराब ओ-रींग फेल्युअर मुळे ते झाले.

रेगन हे त्यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या शोकसंदेशात पुढे असे म्हणाले होते, "The future doesn't belong to the fainthearted; it belongs to the brave. The Challenger crew was pulling us into the future, and we'll continue to follow them."

आज या घटनेस २५ वर्षे पूर्ण होत असताना अशा धोक्यांना न घाबरता, "अनंत आमुची ध्येयासक्ती" म्हणत आंतराळक्षेत्र पुढेच जात आहे. केवळ अमेरिकेचाच नाही तर मध्यंतरीच्या काळात भारत-चीन या तत्कालीन विकसीत देशांचे आंतराळप्रकल्प देखील वृद्धींगत होत गेले. अमेरिका-रशिया यांच्यातील स्टारवॉर्स किमान वरकरणी तरी दूर गेले आणि जमिनीपासून ते आकाशापर्यंत परस्परावलंबनाचे नाते तयार झाले आणि आंतराळक्षेत्र हे वृद्धींगतच होत चालले आहे. त्या आंतराळक्षेत्राला आणि ते भविष्यातील मानवजातीस पुढे नेण्यासाठी झटणार्‍यांना या निमित्ताने सलाम!

छायाचित्रे संदर्भः विकीपिडीया पब्लीक डोमेन मधली छायाचित्रे. रेगन यांचे छायाचित्र आणि दुवा युट्यूब वरील आहे.

इतिहासविज्ञानविचारप्रतिसादमाहिती

प्रतिक्रिया

शुचि's picture

29 Jan 2011 - 5:53 am | शुचि

सुंदर लेख.
आपला अपयशाचे व्यवस्थापन लेख माझ्या फेव्हरेटस मध्ये आहे.
तशाच पठडीतला पण थोड्या वेगळ्या वळणाचा हा लेख देखील खूप आवडला.

रेवती's picture

29 Jan 2011 - 6:02 am | रेवती

लेखन आवडले.

असुर's picture

29 Jan 2011 - 6:08 am | असुर

समयोचित लेख!
अपघात असला तरी २५ वर्षांनंतरही 'चॅलेंजर' या नावाचे वलय टिकून आहे. भविष्यात असे अपघात पुन्हा न होवोत.

हा युट्यूबवरचा व्हिडिओ:

हा व्हिडिओ काय आणि कसे घडले त्याचा:

मदनबाण's picture

29 Jan 2011 - 7:06 am | मदनबाण

छान माहिती...

जरा अवांतर :---

मानवाने पाणी, जमिन,हवा प्रदुषित केलीच पण आता त्याची पुढची पातळी देखील त्यानी गाठली आहे ती म्हणजे अवकाशात कचरा (स्पेस जंक) ...

नरेशकुमार's picture

29 Jan 2011 - 7:23 am | नरेशकुमार

लेखन छान !

घाईत अत्यंत चुकिचा निर्णय घेतला गेला, आणि सर्वांचे प्राण गेले.
दुखःद घटना.

५० फक्त's picture

29 Jan 2011 - 10:42 am | ५० फक्त

श्री. विकास, एका वेगळ्या विषयावरचा वेगळा लेख, या बद्दल फारसे वाचले नव्हते पण मध्ये मध्ये डिसक्व्हरीवर दाखवतात ना ते पाहिले होते, आणि या गोष्टी आपल्या मायमराठितुन पाहता / वाचताना जास्त आनंद होतो.

धन्यवाद.

हर्षद.

पिवळा डांबिस's picture

29 Jan 2011 - 10:50 am | पिवळा डांबिस

छान लेख!
रेगन वॉज अ ग्रेट व्हिजनरी!!
लॉन्ग लिव्ह प्रे.रीगन!!!!
च्यामारी आता काय दिवस आलेंत!!!
-रिपब्लिकन पिडां

(चला आता राडा सुरू करूयां!!!!!)
:)

वेगळ्या विषयावरचा लेख वाचून फ्रेश वाटले.
बरोब्बर २५ वर्षांनी या क्षेत्राकडे बघितलं की "Its small step for a man but giant leap for mankind" ची यथार्थता पटते.. (जरी हे वाक्य विशिष्ट प्रसंगी वापरलं गेलं असलं तरी हे सर्वत्र लागु होते असे मला वाटते).

भारताच्या चांद्रयान-२ बद्दल उत्सूक आणि आशावादी आहेच

मस्त हो विकासराव.
समयोचीत माहितीप्रधान लेख आवडला.

रमताराम's picture

29 Jan 2011 - 1:43 pm | रमताराम

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख. आभारी आहोत.

यशोधरा's picture

29 Jan 2011 - 5:17 pm | यशोधरा

मस्त लेख. आवडला.

प्राजु's picture

29 Jan 2011 - 11:20 pm | प्राजु

अतिशय सुरेख लेख!!
अगदी समायोचित!!

खूप आवडला.

इन्द्र्राज पवार's picture

30 Jan 2011 - 10:58 am | इन्द्र्राज पवार

अत्यंत प्रभावशाली असा हा लेख आहे. दुर्घटना होतात म्हणून शोधाची तहान शमत नाही आणि तसे होऊही नये. चॅलेंजरसम अन्य क्षेत्रातही दुर्दैवी घटना घडत गेल्या असणारच पण म्हणून त्या त्या क्षेत्राने आपल्या संशोधन केन्द्राला टाळे लावले असे होत नसते. नदीत पोहायला शिकणार्‍या मुलास आणि त्याच्या पालकास हे नक्कीच माहिती असते की, या अगोदर याच नदीत काही नवखी मुले शिकताशिकता बुडून मेली आहेत, पण म्हणून कुणी पोहणे शिकण्याचे थांबत नाही....ती एक जन्मजात वृत्ती असते जिला विद्येच्या क्षेत्रात पुढे व्यापक स्वरूप मिळते. चॅलेंजर मोहिमेतील तो अपघात ही एक अशी घटना की जिच्या चुकातून आपण काय शिकले पाहिजे हे नासाने पुढे जावून कागदोपत्री मांडलेच असेल. प्रे.रेगन यांच्या भाषणातील मुद्दाही असाच "......चलते रहो !" आहे.

राष्ट्र घडत असते ते अशा घटनांच्या स्मरणातून..... २५ वर्षे !....समयोचित लेखाबद्दल श्री.विकास याना धन्यवाद.

इन्द्रा

सहज's picture

30 Jan 2011 - 3:30 pm | सहज

रेगन यांनी आवर्जून मुलांना उद्देशुन संदेश दिला होता ते देखील उल्लेखनीय.

या सुमारास मुलांना थेरपीला न्यायचे प्रस्थ कितपत होते? आजच्या काळात ते वाढले आहे का?

साधारण ह्याच काळात व नंतरही काही वर्षे महाराष्ट्रात रेल्वे रुळ ओलांडताना निष्काळजीपणामुळे मुलांच्या शाळेच्या बसला, वर्‍हाड घेउन जाणार्‍या ट्रक, ट्रॅक्टर, बसना अनेक अपघात झाले तेव्हा मुलांशी असा संवाद, शाळेतर्फे 'कौंन्सेलिंग' झाले होते का?

स्वाती दिनेश's picture

30 Jan 2011 - 9:00 pm | स्वाती दिनेश

विकास, लेख आवडला,
स्वाती

गुंडोपंत's picture

31 Jan 2011 - 6:19 am | गुंडोपंत

वेगळा लेख वाचून बरे वाटले.
यानाच्या इतर भागांची चित्रांसहीत माहिती दिली असती तर अजून चांगले झाले असते असे वाटले.