गुजराथी लोक हे खाण्यापिण्याचे शौकीन लोक.
कुठेही जातील तेथे अगोदर जेवण्याखाण्याची काय सोय आहे हे पाहून जातील.
ऑफिसातदेखील लंच साठी भक्कम पाच सहा कप्प्यांचा डबा नेतील. त्यात त्यांचा मधल्यावेळेतला नाष्ता देखील असेल.
बस मध्ये रेल्वे मध्ये गुजराथी लोक त्यांच्या घरचे पदार्थ खाताना दिसतील
त्यांचे आतिथ्य आगदी भारावून टाकणारे असते.
घरातच नव्हे तर अगदी हॉटेलात सुद्धा
हेच बघाना " अमे गुजराती " ( अर्थ "आम्ही गुजराथी ")
"अतिथी देवो भव " असे केवळ पाटीवर लिहून चालत नाही
अतिथीचे भरघोस स्वागत होते.
जेवायच्या अगोदर हात धुण्यासाठी ही सोय
जेवायच्या अगोदर स्वागत पेय. गुलाबाच्या पाकळ्या घालुन केलेले पेरुचे गुलाबी सरबत येते.
आणि पापडनो चुरो. मसाला साथे
आणि त्यानन्तर येते ती सुप्रसिद्ध गुजराती थाळी.
या थाळीतले पदार्थ
फुलका ( पोळी ) त्यावर मेथीना थेपला आणि वर छोटिशी दिसणारी बाकरी ( भाकरी नव्हे.. बाकरी ही गव्हाच्या पिठाची असते आपण करतो त्या ज्वारीच्याभाकरीला इथे "जार नो रोटलो " असे म्हणतात )
फुलका रोटलीच्या खाली दिसते "सोले कचोरी" ( मुगाची कचोरी) आणि तांदळाचे ढोकळा
आता त्या पासून क्लॉकवाईज.
"मगना दाळनो शिरो" अस्सल तुपातला चारोली वगैरे असलेलास्पेश्यल गुजराती शिरा
"बासुंदी " व्हॅनीला इसेन्स + बदाम + भरपूर सुके अंजीर
"दाळ" दालचिनी + लवंग असलेली तुरीची आमटी
"पनीर नु रसाळु शाक"
"लीला वटाणानु शाक" ( हिरव्या वाटाण्याची भाजी)
"बतेटानु रस्साळु शाक"
" लीला तुवेरनु कठोळ" ( हिरव्या तुरीची उसळ ) ( कठोळ = कडधान्य)
ताटाबाहेर
छास
सेलेड मा काकडी बीट गाजर ,आंबे हळद ,टमेटा
आणि
चित्रात न दिसणारी मस्त वरुन लोणकढी तुमाची धार असलेली "मग ना दाळनी खिचडी अने कढी"
एवढे झाल्यावर पुन्हा हात धुण्याचा कार्यक्रम
शेवटी मुखवास म्हणून वरीयाळी अने पान ( बडीशेप आणि पान )
या इथे थाळीचे तीन प्रकार आहेत. त्याना वेगवेगळी नावे आहेत.
"नगरशेठ थाळी" असल चांदीच्या ताटात ३१ वेगवेगळे खाद्यपदार्थ
"शेठ थाळी " २२ खाद्य पदार्थ
" वेपारी थाळी " १५ खाद्यपदार्थ
आम्ही वेपारी थाळी घेतली होती.
जेवणाची व्यवस्था एसी झोपडीत केलेली होती
तृप्त झालेल्या जिव्हेने आणि जडावलेल्या पोटाने आम्ही यजमानांचा निरोप घेतला.
परत येताना अक्षरशः ५ किलोमीटर चालत आलो तेंव्हा कुठे सुस्ती कमी झाली.
प्रतिक्रिया
25 Jan 2011 - 11:56 am | टारझन
केवळ अप्रतिम ... साला व्हेज खाण्यासाठी आम्ही गुजराथ दौरा करणार आहे .. वा वा :)
फोटु क्लिययर टाकल्याबद्दल विजुभौं षॉंचे अभिनंदन :)
- (गुजराथी) मोटाभाय टारझन
25 Jan 2011 - 12:01 pm | स्पा
झकास
25 Jan 2011 - 12:03 pm | मुलूखावेगळी
अरे वा हवेलीत ल्या ए.सी. झोपडीत मज्जा आहे हा
तरीच तुम्ही गुजरात सोडत नाहीत
ठरलं तर
आता नेक्क्ष्ट ट्रिप गुजरातच
चलो गुजरात
-गुजराथी थाळी प्रेमी
अजुन लंचला १ तास आहे
आता काय करु? :(
25 Jan 2011 - 12:07 pm | टारझन
ओ काकु .. सही बदला !! कांद्याला ७ रुपै किलो ने कोणी विचारत नाही आता !!
अवांतर : त्या सिंव्हा शेजारच्या क्लिंटन ला थोडं अजुन खाऊ पिऊ घाला राव :) डबल तुपातलं :)
25 Jan 2011 - 12:09 pm | मुलूखावेगळी
आजोबा बदलते ना
पेट्रोल ७ रुपये झाल्यावर ;)
25 Jan 2011 - 12:41 pm | कुंदन
मला आधी वाटले तो हाटेलचा मालक आहे की काय .....
25 Jan 2011 - 7:16 pm | क्लिंटन
नाही हो. इतक्या सुंदर हॉटेलचा मालक असतो तर आय.आय.एम मध्ये मरायला कशाला गेलो असतो?
@टारझन: तुझा सल्ला मी अगदी मनावर घेतला आहे बरं का. आता सुरवातच करतो तुपाचे पदार्थ हाणायला. :)
25 Jan 2011 - 12:08 pm | कुंदन
इजु भाउ ची मज्जाय.....
गुलाबाच्या पाकळ्या घालुन केलेले पेरुचे गुलाबी सरबत तर एकदम मस्त दिसतेय.
25 Jan 2011 - 12:19 pm | गवि
मस्त वर्णन्..मजा केलीत तुम्ही जाम.
खूप वर्षांपूर्वी विशाला अशा काहीशा नावाच्या ठिकाणी अहमदाबादेजवळ गेलो होतो त्याची आठवण झाली.
आमच्यासारख्या लठ्ठंभारतींना मांडी घालून बसताना गुडघ्यांखाली पण गुळगुळीत गोल लहानसे खांब की खोंबे म्हणतात ते दिले होते.
आणि पदार्थ तिसाहून जास्तच होते. अगदी गूळ सुद्धा ठेवला होता भाकरीसोबत. इतकी गुजराती व्हरायटी त्यानंतर खाल्ली नाही.
आता चोखी ढाणी झालंय बर्याच ठिकाणी पण ते गुजराती नव्हे. बाकी थाट असाच.
25 Jan 2011 - 12:31 pm | छोटा डॉन
'संघा'च्या मुशीत घडण झालेल्या आणि सध्या 'भाजपा'चे राज्यरथ हाकणार्या नरेंद्रभाई मोदींचा गुजराथेत खाण्यापिण्याची चंगळ होत आहे हे पाहुन खुप आनंद झाला.
थाळी पाहुन आनंद झाला !
विजुभैही आता पक्के गुजराथी दिसत आहेत, पुढच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे तिकिट मिळायला हरकत नाही ;)
असो, विजुभौंची सध्या मज्जा चालु आहे एवढेच म्हणतो.
विजुभौंचे आभार !!!
विजुभौंना असे उत्तम जेवण मिळण्यास पोषक वातावरण निर्माण करण्यात अप्रत्यक्ष सहभाग असणार्या संघनिष्ठ आणि भाजपाचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्रभाई मोदी ह्यांचेही आभार ;)
- डॉन्या भागवत
25 Jan 2011 - 1:17 pm | अवलिया
असेच म्हणतो :)
25 Jan 2011 - 12:59 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या क्लिंटनशेठला आता बरा वेळ मिळतो इजुभौंना भेटायला ? ते पण दोन दोनदा !
असो..
अपेक्षित ओळ ;)
जेवण झकासच हो विजुभौ :) आमचे पुण्यातले आवडते जेवण म्हणजे 'सात्विक थाळी'.
25 Jan 2011 - 7:13 pm | क्लिंटन
अरे आमचे दुसरे वर्ष इतके हेक्टिक नसते त्यामुळे बराच वेळ मिळतो.माझ्या इतर प्रतिसादांची लांबी बघून ते कळलेच असेल . बाकी माझा पुणे दौरा नक्कीच-- बहुदा मार्च एप्रिलमध्ये. तेव्हा भेटूच.
25 Jan 2011 - 12:59 pm | गणपा
मज्जाय बुवा एका माणसाची सध्या :)
25 Jan 2011 - 10:18 pm | रेवती
मज्जाय बुवा एका माणसाची
एका?
25 Jan 2011 - 1:01 pm | कुंदन
कोणती थाळी कितीला ते पण सांगा जरा.
25 Jan 2011 - 1:05 pm | ५० फक्त
विजुभाउ, तुमच्या फोटो मुळे आणि वर्णनामुळे उद्या पंचवटीला नाहीतर मयुरला जावे लागेल.
पुण्यातल्या चोखीढाणीला पण तथाकथित गुजराथि पद्धतिने मांडी घालुन जेवायला मिळते पण ते एवढे मजेचे नाही.
उद्या संध्याकाळी पंचवटी / मयुर - कोणी पुण्यातले मिपाकर येणार काय ? खव किंवा व्यनि करा.
हर्षद.
25 Jan 2011 - 1:11 pm | सातबारा
तो सिंह बाहेर जाणार्यांचे पाय दिसणार नाहीत याचे प्रतीक वाटला. नाही तरी एवढ्या थाळीचा आस्वाद घेतल्यावर बाहेर जाणे मुष्कीलच.
25 Jan 2011 - 1:12 pm | लॉरी टांगटूंगकर
पारदर्शक पेल्या मध्ये ते गुलाबी काय आहे??छान दिसते आहे
25 Jan 2011 - 1:18 pm | विजुभाऊ
पारदर्शक पेल्या मध्ये ते गुलाबी काय आहे??
गुलाबाच्या पाकळ्या टाकलेले पेरुचे सरबत
25 Jan 2011 - 2:11 pm | स्पंदना
मला तो मुगाचा हलवा खुप आवडतो विजुभाउ!! गुजराती थाळेत तो जसा मिलतो ना तसा आणी कुठेही नाही मिळ्त . रेसिपी माहीती आहे पण फार वेळ खाउ असल्यान ...
बाकी लेखा बद्दल आणी फोटोज बद्दल काय बोलाव?
25 Jan 2011 - 2:12 pm | मृत्युन्जय
बेस हाय हो हे. च्यायल भूक लागली. बाकी पैसे मोजल्यावर पुण्यातल्या हाटिलामंदी पण आजकाल अतिथ्यांना देवच म्हणत्यात. सर्विस बी तशीच असतीय. जेवन मात्र हेच भारी एकदम.
25 Jan 2011 - 10:20 pm | रेवती
सहमत.
पुण्यातच काय सगळीकडेच असे आहे. पैसे दिल्यावर आपण देवच असतो.
25 Jan 2011 - 2:16 pm | पिंगू
वाह विजुभाउ जीभ चाळवली.. कधी बोलावताय मेजवानी झोडायला..
- गुजराती पिंगू
25 Jan 2011 - 2:43 pm | ब्रिटिश टिंग्या
क्या बात! क्या बात!
25 Jan 2011 - 3:25 pm | मी_ओंकार
असेच गुजराती रेस्टॉरंट (राजधानी नावाचे) पुणे, मुंबई आणि बेंगलोरला आहे. अगदी हात धुण्याच्या सोयीपासून. उत्तम गुजराथी/राजस्थानी जेवण मिळते. पुण्यात कल्याणी नगर मध्ये, बेंगलोरला मल्या मॉल आणि मुंबईत निर्मल मध्ये आहे.
- ओंकार.
25 Jan 2011 - 3:47 pm | गवि
सहमत.
फक्त असा अँबियन्स नाही तिथे. म्हणजे राजधानी हे थीम रेस्टोरंट नाहीये. नॉर्मल ए.सी. डायनिंग हॉल आहे.
या धाग्यात दिलेली जागा ही चोखी ढाणी टाईप वाटते आहे, गावासारखी रचना वगैरे.
25 Jan 2011 - 10:23 pm | रेवती
दोन वर्षापूर्वी राजधानी नावाच्या हाटेलात जेवले होते तिथेही साधारण असेच जेवण होते.
पण ते गुडगावातल्या एका मॉलात होते. चव मात्र फारशी आवडली नव्हती.
25 Jan 2011 - 3:51 pm | प्राजक्ता पवार
फोटो आणि वर्णन दोन्ही मस्तं.
25 Jan 2011 - 6:01 pm | रमेश आठवले
खरी गुजराती थाली खाण्यासाठी , तीही खेडयाच्या वातावरणात, खाली बसुन व कन्दीलाच्या उजेडात पत्रावळईवर खावयाचि असेल, तर अमदावादच्या विशालाला भेट द्या. सोबत जुन्या पाकग्रुहात वापरल्या जाणार्या वस्तुन्चे सन्ग्रहालयही पहावयास मिळेल.
25 Jan 2011 - 6:32 pm | मराठे
मस्त मस्त मस्त!
25 Jan 2011 - 9:14 pm | नितिन थत्ते
उद्या येतोच.
25 Jan 2011 - 9:14 pm | नितिन थत्ते
उद्या येतोच.
25 Jan 2011 - 9:16 pm | सुबक ठेंगणी
अsssब्बा....zzzzz
गुजरातीत "लीला" म्हणजे हिरवा/हिरवा का हो विजुभाऊ?
28 Jan 2011 - 4:19 pm | रश्मि दाते
लीलो चीवडो ई......
31 Jan 2011 - 2:57 pm | विजुभाऊ
रश्मी मावशी "लीलो म्हणजे ओला नाही ;हिरवा.
लिलु घास म्हणजे हिरवे गवत.
लीली बंगडी = हिरवी बांगडी.
लीलो चेवडो = हा बटाटाच्या चिवडा असतो तसा कच्च्या पपई पासून केलेला चिवडा असतो.
गुजरात मध्ये जैन लोकांच्या मुले कित्येक पदार्थात बटाटाऐवजी कच्ची केळी , कच्ची पपई यांचा वापर करतात.
जैन पावभाजीत बटाट्याऐवजी कच्ची केळी वापरतात
18 Oct 2013 - 6:19 pm | संतोषएकांडे
उं..हूं..विजु भाउ, लीलो चेवडो म्हणजे ओला चिवडा.
हिर्व्या चिवड्याला येथे 'सोलापुरी चेवडो' असं महाराष्ट्रीअन नाव आहे.आणी हे दोन्ही चिवडे बडोद्याचे (वडोदरा)चे मशहूर आहेत. अहमदाबादचे नाही.
गुजराथ मधे असूनही बडोदा सीटी पक्कं महाराष्ट्रीअन शहर आहे.सर सयाजीराव गायकवाड यांचे.वेळ मिअळाल्यास लिहीन कधी आमच्या वडोदरा शहरा बद्दल.....
18 Oct 2013 - 7:46 pm | विजुभाऊ
संतोषभाई वडोदरा मा क्या रहो छो? अमे पेला दिनेश मिल नी पाछळ रहेत हत. ए पछी घर बदल्यु अने अलकापुरी मा रहेवा गया.
तमारी प्रवृत्ती शू?
18 Oct 2013 - 8:49 pm | संतोषएकांडे
वडोदरानां दांडीयाबजारमां रहुं छुं.वडोदरानां रहेवासी होवानां नाते आप जाणताज हशो के दांडीयाबजार एटले संपूर्ण महारष्ट्रीयन विस्तार छे. एक वार वडोदरा विशे पण मिसळपावमां सविस्तार लखवुं छे. जोइए हवे योग क्यारे आवे छे....
मी सरकारी प्रेस मधे नोकरी करत आहे.आणी गुजराती भाषेचा लेखक आहे.
ठीक, आता सध्या कुठे वास्तव्य आहे..?
19 Oct 2013 - 12:30 am | विजुभाऊ
मी सरकारी प्रेस मधे नोकरी करत आहे.आणी गुजराती भाषेचा लेखक आहे.
ठीक, आता सध्या कुठे वास्तव्य आहे..?
गुजरातीमा लखो छो? सरस. तमने मळवा गमसे.
हू एम तो मुम्बई मा रहु छु. पं अत्यारे तो जोहानसबर्ग मा छु.
21 Oct 2013 - 7:15 pm | संतोषएकांडे
ચોક્કસ, ભારતમાં અને ખાસતો વડોદરા આવો ત્યારે અવશ્ય મળવાનું રાખીશું.અને વ્યનિ મોકલશોતો મારું લખાણ પણ મોકલવાની તજવીજ કરીશું.
22 Oct 2013 - 7:13 am | रुस्तम
મુંબઈ આવો ત્યારે ખમણી અને લીલવા ની કચોરી લેતા આવજો.
22 Oct 2013 - 5:43 pm | संतोषएकांडे
ચોક્કસ. પણ મુંબઇ આવો એટલે જાણ જરૂર કરજો.
સ્પેશ્યલ 'જગદીશ' ની લઇ આવીશ.
મે મહિનામાં
25 Jan 2011 - 10:14 pm | रेवती
मस्त! छान फोटू.
पेरूचे सरबत सोडून सगळे पदार्थ बघून बरे वाटले.
यांच्या चवी फारश्या माहित नसल्याने त्याबद्दल आत्ताच बोलणे चुकिचे ठरेल.;)
पदार्थांची नावे भारी आहेत शिवाय मराठीच्या जवळची वाटताहेत.
नुकतेच माझ्या गुजराती मैत्रिणीने एक मिरचीचे लोणचे आणून दिले आहे.
त्यात मोहरीची डाळ मिसळली आहे. चव फरच छान.
त्यावर जे लिहिले होते ते फारसे वाचता आले नाही तरी 'वाढवाणी मरचा' कि कायसे आहे.
26 Jan 2011 - 2:53 am | प्राजु
वा वा वा!! विजुभाऊ... महाराष्ट्रात परताल त्यावेळी घराचे दरवाजे मोठ्ठे करावे लागणार तुमच्या घरच्यांना.
थाळी जबरदस्त!!
27 Jan 2011 - 10:44 am | विजुभाऊ
प्राजु ......ते इकडे येण्याअगोदरच सांगुन ठेवलय घरी....
26 Jan 2011 - 10:04 am | राजेश घासकडवी
तुकडोजी महाराज आज असते तर त्यांनी
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या (एसी) झोपडीत माझ्या
असं म्हटलं असतं.
26 Jan 2011 - 10:26 am | sneharani
मस्त दिसते आहे थाळी!!
मज्जा आहे विजुभाऊ तुमची!!
:)
26 Jan 2011 - 11:45 am | तिमा
गुजरात मधल्या शहरांमधे अशी असंख्य हॉटेल्स आहेत. अमदाबादच्या 'गोवर्धन थाळ' मधे जेवा विजुभाऊ. माझी आठवण काढाल!
3 Jun 2022 - 9:49 am | विजुभाऊ
या वेळेस जेवलो तेथे. गोवर्धन थाळ इस्कॉन चार रस्त्यावरचे
27 Jan 2011 - 11:05 am | शिल्पा ब
काय हो, नुसतेच फोटो टाकुन तोंडाला पाणी आणवलंत!!! एकडे पाठवा ती थाळी...