Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विजुभाऊ on Tue, 01/25/2011 - 11:45
गुजराथी लोक हे खाण्यापिण्याचे शौकीन लोक. कुठेही जातील तेथे अगोदर जेवण्याखाण्याची काय सोय आहे हे पाहून जातील. ऑफिसातदेखील लंच साठी भक्कम पाच सहा कप्प्यांचा डबा नेतील. त्यात त्यांचा मधल्यावेळेतला नाष्ता देखील असेल. बस मध्ये रेल्वे मध्ये गुजराथी लोक त्यांच्या घरचे पदार्थ खाताना दिसतील त्यांचे आतिथ्य आगदी भारावून टाकणारे असते. घरातच नव्हे तर अगदी हॉटेलात सुद्धा हेच बघाना " अमे गुजराती " ( अर्थ "आम्ही गुजराथी ") ame gujarati "अतिथी देवो भव " असे केवळ पाटीवर लिहून चालत नाही अतिथीचे भरघोस स्वागत होते. sinh जेवायच्या अगोदर हात धुण्यासाठी ही सोय hath जेवायच्या अगोदर स्वागत पेय. गुलाबाच्या पाकळ्या घालुन केलेले पेरुचे गुलाबी सरबत येते. आणि पापडनो चुरो. मसाला साथे आणि त्यानन्तर येते ती सुप्रसिद्ध गुजराती थाळी. thali या थाळीतले पदार्थ फुलका ( पोळी ) त्यावर मेथीना थेपला आणि वर छोटिशी दिसणारी बाकरी ( भाकरी नव्हे.. बाकरी ही गव्हाच्या पिठाची असते आपण करतो त्या ज्वारीच्याभाकरीला इथे "जार नो रोटलो " असे म्हणतात ) फुलका रोटलीच्या खाली दिसते "सोले कचोरी" ( मुगाची कचोरी) आणि तांदळाचे ढोकळा आता त्या पासून क्लॉकवाईज. "मगना दाळनो शिरो" अस्सल तुपातला चारोली वगैरे असलेलास्पेश्यल गुजराती शिरा "बासुंदी " व्हॅनीला इसेन्स + बदाम + भरपूर सुके अंजीर "दाळ" दालचिनी + लवंग असलेली तुरीची आमटी "पनीर नु रसाळु शाक" "लीला वटाणानु शाक" ( हिरव्या वाटाण्याची भाजी) "बतेटानु रस्साळु शाक" " लीला तुवेरनु कठोळ" ( हिरव्या तुरीची उसळ ) ( कठोळ = कडधान्य) ताटाबाहेर छास सेलेड मा काकडी बीट गाजर ,आंबे हळद ,टमेटा आणि चित्रात न दिसणारी मस्त वरुन लोणकढी तुमाची धार असलेली "मग ना दाळनी खिचडी अने कढी" एवढे झाल्यावर पुन्हा हात धुण्याचा कार्यक्रम शेवटी मुखवास म्हणून वरीयाळी अने पान ( बडीशेप आणि पान ) या इथे थाळीचे तीन प्रकार आहेत. त्याना वेगवेगळी नावे आहेत. "नगरशेठ थाळी" असल चांदीच्या ताटात ३१ वेगवेगळे खाद्यपदार्थ "शेठ थाळी " २२ खाद्य पदार्थ " वेपारी थाळी " १५ खाद्यपदार्थ आम्ही वेपारी थाळी घेतली होती. जेवणाची व्यवस्था एसी झोपडीत केलेली होती jhopadei तृप्त झालेल्या जिव्हेने आणि जडावलेल्या पोटाने आम्ही यजमानांचा निरोप घेतला. परत येताना अक्षरशः ५ किलोमीटर चालत आलो तेंव्हा कुठे सुस्ती कमी झाली.
  • Log in or register to post comments
  • 21470 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on Tue, 01/25/2011 - 11:56

Permalink

केवळ अप्रतिम ... साला व्हेज

केवळ अप्रतिम ... साला व्हेज खाण्यासाठी आम्ही गुजराथ दौरा करणार आहे .. वा वा :) फोटु क्लिययर टाकल्याबद्दल विजुभौं षॉंचे अभिनंदन :) - (गुजराथी) मोटाभाय टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 01/25/2011 - 12:01

Permalink

+१

झकास
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Tue, 01/25/2011 - 12:03

Permalink

अरे वा हवेलीत ल्या ए.सी.

अरे वा हवेलीत ल्या ए.सी. झोपडीत मज्जा आहे हा तरीच तुम्ही गुजरात सोडत नाहीत ठरलं तर आता नेक्क्ष्ट ट्रिप गुजरातच चलो गुजरात -गुजराथी थाळी प्रेमी अजुन लंचला १ तास आहे आता काय करु? :(
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 01/25/2011 - 12:07

In reply to अरे वा हवेलीत ल्या ए.सी. by मुलूखावेगळी

Permalink

ओ काकु .. सही बदला !!

ओ काकु .. सही बदला !! कांद्याला ७ रुपै किलो ने कोणी विचारत नाही आता !! अवांतर : त्या सिंव्हा शेजारच्या क्लिंटन ला थोडं अजुन खाऊ पिऊ घाला राव :) डबल तुपातलं :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Tue, 01/25/2011 - 12:09

In reply to ओ काकु .. सही बदला !! by टारझन

Permalink

आजोबा बदलते ना पेट्रोल ७

आजोबा बदलते ना पेट्रोल ७ रुपये झाल्यावर ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Tue, 01/25/2011 - 12:41

In reply to ओ काकु .. सही बदला !! by टारझन

Permalink

तो क्लिंटन आहे होय...

मला आधी वाटले तो हाटेलचा मालक आहे की काय .....
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Tue, 01/25/2011 - 19:16

In reply to तो क्लिंटन आहे होय... by कुंदन

Permalink

नाही हो

मला आधी वाटले तो हाटेलचा मालक आहे की काय .
नाही हो. इतक्या सुंदर हॉटेलचा मालक असतो तर आय.आय.एम मध्ये मरायला कशाला गेलो असतो? @टारझन: तुझा सल्ला मी अगदी मनावर घेतला आहे बरं का. आता सुरवातच करतो तुपाचे पदार्थ हाणायला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Tue, 01/25/2011 - 12:08

Permalink

लेख आवडला....

इजु भाउ ची मज्जाय..... गुलाबाच्या पाकळ्या घालुन केलेले पेरुचे गुलाबी सरबत तर एकदम मस्त दिसतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 01/25/2011 - 12:19

Permalink

वा..

मस्त वर्णन्..मजा केलीत तुम्ही जाम. खूप वर्षांपूर्वी विशाला अशा काहीशा नावाच्या ठिकाणी अहमदाबादेजवळ गेलो होतो त्याची आठवण झाली. आमच्यासारख्या लठ्ठंभारतींना मांडी घालून बसताना गुडघ्यांखाली पण गुळगुळीत गोल लहानसे खांब की खोंबे म्हणतात ते दिले होते. आणि पदार्थ तिसाहून जास्तच होते. अगदी गूळ सुद्धा ठेवला होता भाकरीसोबत. इतकी गुजराती व्हरायटी त्यानंतर खाल्ली नाही. आता चोखी ढाणी झालंय बर्‍याच ठिकाणी पण ते गुजराती नव्हे. बाकी थाट असाच.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 01/25/2011 - 12:31

Permalink

मस्त हो ...

'संघा'च्या मुशीत घडण झालेल्या आणि सध्या 'भाजपा'चे राज्यरथ हाकणार्‍या नरेंद्रभाई मोदींचा गुजराथेत खाण्यापिण्याची चंगळ होत आहे हे पाहुन खुप आनंद झाला. थाळी पाहुन आनंद झाला ! विजुभैही आता पक्के गुजराथी दिसत आहेत, पुढच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे तिकिट मिळायला हरकत नाही ;) असो, विजुभौंची सध्या मज्जा चालु आहे एवढेच म्हणतो. विजुभौंचे आभार !!! विजुभौंना असे उत्तम जेवण मिळण्यास पोषक वातावरण निर्माण करण्यात अप्रत्यक्ष सहभाग असणार्‍या संघनिष्ठ आणि भाजपाचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्रभाई मोदी ह्यांचेही आभार ;) - डॉन्या भागवत
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Tue, 01/25/2011 - 13:17

In reply to मस्त हो ... by छोटा डॉन

Permalink

+१

असेच म्हणतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 01/25/2011 - 12:59

Permalink

ह्या क्लिंटनशेठला आता बरा वेळ

ह्या क्लिंटनशेठला आता बरा वेळ मिळतो इजुभौंना भेटायला ? ते पण दोन दोनदा ! असो..
आम्ही वेपारी थाळी घेतली होती.
अपेक्षित ओळ ;) जेवण झकासच हो विजुभौ :) आमचे पुण्यातले आवडते जेवण म्हणजे 'सात्विक थाळी'.
  • Log in or register to post comments

Submitted by क्लिंटन on Tue, 01/25/2011 - 19:13

In reply to ह्या क्लिंटनशेठला आता बरा वेळ by परिकथेतील राजकुमार

Permalink

वेळ

ह्या क्लिंटनशेठला आता बरा वेळ मिळतो इजुभौंना भेटायला ? ते पण दोन दोनदा
अरे आमचे दुसरे वर्ष इतके हेक्टिक नसते त्यामुळे बराच वेळ मिळतो.माझ्या इतर प्रतिसादांची लांबी बघून ते कळलेच असेल . बाकी माझा पुणे दौरा नक्कीच-- बहुदा मार्च एप्रिलमध्ये. तेव्हा भेटूच.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 01/25/2011 - 12:59

Permalink

मज्जाय बुवा एका माणसाची सध्या

मज्जाय बुवा एका माणसाची सध्या :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 01/25/2011 - 22:18

In reply to मज्जाय बुवा एका माणसाची सध्या by गणपा

Permalink

मज्जाय बुवा एका माणसाची एका?

मज्जाय बुवा एका माणसाची एका?
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Tue, 01/25/2011 - 13:01

Permalink

इथे थाळीचे तीन

कोणती थाळी कितीला ते पण सांगा जरा.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Tue, 01/25/2011 - 13:05

Permalink

धन्यवाद, विजुभाउ

विजुभाउ, तुमच्या फोटो मुळे आणि वर्णनामुळे उद्या पंचवटीला नाहीतर मयुरला जावे लागेल. पुण्यातल्या चोखीढाणीला पण तथाकथित गुजराथि पद्धतिने मांडी घालुन जेवायला मिळते पण ते एवढे मजेचे नाही. उद्या संध्याकाळी पंचवटी / मयुर - कोणी पुण्यातले मिपाकर येणार काय ? खव किंवा व्यनि करा. हर्षद.
  • Log in or register to post comments

Submitted by सातबारा on Tue, 01/25/2011 - 13:11

Permalink

तो सिंह

तो सिंह बाहेर जाणार्‍यांचे पाय दिसणार नाहीत याचे प्रतीक वाटला. नाही तरी एवढ्या थाळीचा आस्वाद घेतल्यावर बाहेर जाणे मुष्कीलच.
  • Log in or register to post comments

Submitted by लॉरी टांगटूंगकर on Tue, 01/25/2011 - 13:12

Permalink

छान दिसते

पारदर्शक पेल्या मध्ये ते गुलाबी काय आहे??छान दिसते आहे
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 01/25/2011 - 13:18

Permalink

पारदर्शक पेल्या मध्ये ते

पारदर्शक पेल्या मध्ये ते गुलाबी काय आहे?? गुलाबाच्या पाकळ्या टाकलेले पेरुचे सरबत
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 01/25/2011 - 14:11

Permalink

मला तो मुगाचा हलवा खुप आवडतो

मला तो मुगाचा हलवा खुप आवडतो विजुभाउ!! गुजराती थाळेत तो जसा मिलतो ना तसा आणी कुठेही नाही मिळ्त . रेसिपी माहीती आहे पण फार वेळ खाउ असल्यान ... बाकी लेखा बद्दल आणी फोटोज बद्दल काय बोलाव?
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 01/25/2011 - 14:12

Permalink

बेस हाय हो हे. च्यायल भूक

बेस हाय हो हे. च्यायल भूक लागली. बाकी पैसे मोजल्यावर पुण्यातल्या हाटिलामंदी पण आजकाल अतिथ्यांना देवच म्हणत्यात. सर्विस बी तशीच असतीय. जेवन मात्र हेच भारी एकदम.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 01/25/2011 - 22:20

In reply to बेस हाय हो हे. च्यायल भूक by मृत्युन्जय

Permalink

सहमत. पुण्यातच काय सगळीकडेच

सहमत. पुण्यातच काय सगळीकडेच असे आहे. पैसे दिल्यावर आपण देवच असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Tue, 01/25/2011 - 14:16

Permalink

वाह विजुभाउ जीभ चाळवली.. कधी

वाह विजुभाउ जीभ चाळवली.. कधी बोलावताय मेजवानी झोडायला.. - गुजराती पिंगू
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Tue, 01/25/2011 - 14:43

Permalink

क्या बात!

क्या बात! क्या बात!
  • Log in or register to post comments

Submitted by मी_ओंकार on Tue, 01/25/2011 - 15:25

Permalink

राजधानी

असेच गुजराती रेस्टॉरंट (राजधानी नावाचे) पुणे, मुंबई आणि बेंगलोरला आहे. अगदी हात धुण्याच्या सोयीपासून. उत्तम गुजराथी/राजस्थानी जेवण मिळते. पुण्यात कल्याणी नगर मध्ये, बेंगलोरला मल्या मॉल आणि मुंबईत निर्मल मध्ये आहे. - ओंकार.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 01/25/2011 - 15:47

In reply to राजधानी by मी_ओंकार

Permalink

हो..

सहमत. फक्त असा अँबियन्स नाही तिथे. म्हणजे राजधानी हे थीम रेस्टोरंट नाहीये. नॉर्मल ए.सी. डायनिंग हॉल आहे. या धाग्यात दिलेली जागा ही चोखी ढाणी टाईप वाटते आहे, गावासारखी रचना वगैरे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 01/25/2011 - 22:23

In reply to राजधानी by मी_ओंकार

Permalink

दोन वर्षापूर्वी राजधानी

दोन वर्षापूर्वी राजधानी नावाच्या हाटेलात जेवले होते तिथेही साधारण असेच जेवण होते. पण ते गुडगावातल्या एका मॉलात होते. चव मात्र फारशी आवडली नव्हती.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजक्ता पवार on Tue, 01/25/2011 - 15:51

Permalink

फोटो आणि वर्णन दोन्ही मस्तं.

फोटो आणि वर्णन दोन्ही मस्तं.
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Tue, 01/25/2011 - 18:01

Permalink

विशाला

खरी गुजराती थाली खाण्यासाठी , तीही खेडयाच्या वातावरणात, खाली बसुन व कन्दीलाच्या उजेडात पत्रावळईवर खावयाचि असेल, तर अमदावादच्या विशालाला भेट द्या. सोबत जुन्या पाकग्रुहात वापरल्या जाणार्या वस्तुन्चे सन्ग्रहालयही पहावयास मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Tue, 01/25/2011 - 18:32

Permalink

मस्त मस्त मस्त!

मस्त मस्त मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 01/25/2011 - 21:14

Permalink

उद्या येतोच.

उद्या येतोच.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 01/25/2011 - 21:14

Permalink

उद्या येतोच.

उद्या येतोच.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबक ठेंगणी on Tue, 01/25/2011 - 21:16

Permalink

चोक्कस!

अsssब्बा....zzzzz गुजरातीत "लीला" म्हणजे हिरवा/हिरवा का हो विजुभाऊ?
  • Log in or register to post comments

Submitted by रश्मि दाते on Fri, 01/28/2011 - 16:19

In reply to चोक्कस! by सुबक ठेंगणी

Permalink

लीला म्हणजे ओला

लीलो चीवडो ई......
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 01/31/2011 - 14:57

In reply to लीला म्हणजे ओला by रश्मि दाते

Permalink

रश्मी मावशी "लीलो म्हणजे ओला

रश्मी मावशी "लीलो म्हणजे ओला नाही ;हिरवा. लिलु घास म्हणजे हिरवे गवत. लीली बंगडी = हिरवी बांगडी. लीलो चेवडो = हा बटाटाच्या चिवडा असतो तसा कच्च्या पपई पासून केलेला चिवडा असतो. गुजरात मध्ये जैन लोकांच्या मुले कित्येक पदार्थात बटाटाऐवजी कच्ची केळी , कच्ची पपई यांचा वापर करतात. जैन पावभाजीत बटाट्याऐवजी कच्ची केळी वापरतात
  • Log in or register to post comments

Submitted by संतोषएकांडे on Fri, 10/18/2013 - 18:19

In reply to रश्मी मावशी "लीलो म्हणजे ओला by विजुभाऊ

Permalink

तस नाही विजुभौ

उं..हूं..विजु भाउ, लीलो चेवडो म्हणजे ओला चिवडा. हिर्व्या चिवड्याला येथे 'सोलापुरी चेवडो' असं महाराष्ट्रीअन नाव आहे.आणी हे दोन्ही चिवडे बडोद्याचे (वडोदरा)चे मशहूर आहेत. अहमदाबादचे नाही. गुजराथ मधे असूनही बडोदा सीटी पक्कं महाराष्ट्रीअन शहर आहे.सर सयाजीराव गायकवाड यांचे.वेळ मिअळाल्यास लिहीन कधी आमच्या वडोदरा शहरा बद्दल.....
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 10/18/2013 - 19:46

In reply to तस नाही विजुभौ by संतोषएकांडे

Permalink

संतोषभाई वडोदरा मा क्या रहो

संतोषभाई वडोदरा मा क्या रहो छो? अमे पेला दिनेश मिल नी पाछळ रहेत हत. ए पछी घर बदल्यु अने अलकापुरी मा रहेवा गया. तमारी प्रवृत्ती शू?
  • Log in or register to post comments

Submitted by संतोषएकांडे on Fri, 10/18/2013 - 20:49

In reply to संतोषभाई वडोदरा मा क्या रहो by विजुभाऊ

Permalink

हाय हेल्लो

वडोदरानां दांडीयाबजारमां रहुं छुं.वडोदरानां रहेवासी होवानां नाते आप जाणताज हशो के दांडीयाबजार एटले संपूर्ण महारष्ट्रीयन विस्तार छे. एक वार वडोदरा विशे पण मिसळपावमां सविस्तार लखवुं छे. जोइए हवे योग क्यारे आवे छे.... मी सरकारी प्रेस मधे नोकरी करत आहे.आणी गुजराती भाषेचा लेखक आहे. ठीक, आता सध्या कुठे वास्तव्य आहे..?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 10/19/2013 - 00:30

In reply to हाय हेल्लो by संतोषएकांडे

Permalink

मी सरकारी प्रेस मधे नोकरी करत

मी सरकारी प्रेस मधे नोकरी करत आहे.आणी गुजराती भाषेचा लेखक आहे. ठीक, आता सध्या कुठे वास्तव्य आहे..? गुजरातीमा लखो छो? सरस. तमने मळवा गमसे. हू एम तो मुम्बई मा रहु छु. पं अत्यारे तो जोहानसबर्ग मा छु.
  • Log in or register to post comments

Submitted by संतोषएकांडे on Mon, 10/21/2013 - 19:15

In reply to मी सरकारी प्रेस मधे नोकरी करत by विजुभाऊ

Permalink

हाय हॅल्लो

ચોક્કસ, ભારતમાં અને ખાસતો વડોદરા આવો ત્યારે અવશ્ય મળવાનું રાખીશું.અને વ્યનિ મોકલશોતો મારું લખાણ પણ મોકલવાની તજવીજ કરીશું.
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on Tue, 10/22/2013 - 07:13

In reply to हाय हॅल्लो by संतोषएकांडे

Permalink

મુંબઈ આવો ત્યારે ખમણી અને લીલવા ની કચોરી લેતા આવજો.

મુંબઈ આવો ત્યારે ખમણી અને લીલવા ની કચોરી લેતા આવજો.
  • Log in or register to post comments

Submitted by संतोषएकांडे on Tue, 10/22/2013 - 17:43

In reply to મુંબઈ આવો ત્યારે ખમણી અને લીલવા ની કચોરી લેતા આવજો. by रुस्तम

Permalink

હા...હા...હા...

ચોક્કસ. પણ મુંબઇ આવો એટલે જાણ જરૂર કરજો. સ્પેશ્યલ 'જગદીશ' ની લઇ આવીશ. મે મહિનામાં
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 01/25/2011 - 22:14

Permalink

मस्त! छान फोटू. पेरूचे सरबत

मस्त! छान फोटू. पेरूचे सरबत सोडून सगळे पदार्थ बघून बरे वाटले. यांच्या चवी फारश्या माहित नसल्याने त्याबद्दल आत्ताच बोलणे चुकिचे ठरेल.;) पदार्थांची नावे भारी आहेत शिवाय मराठीच्या जवळची वाटताहेत. नुकतेच माझ्या गुजराती मैत्रिणीने एक मिरचीचे लोणचे आणून दिले आहे. त्यात मोहरीची डाळ मिसळली आहे. चव फरच छान. त्यावर जे लिहिले होते ते फारसे वाचता आले नाही तरी 'वाढवाणी मरचा' कि कायसे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 01/26/2011 - 02:53

Permalink

वा वा वा!! विजुभाऊ...

वा वा वा!! विजुभाऊ... महाराष्ट्रात परताल त्यावेळी घराचे दरवाजे मोठ्ठे करावे लागणार तुमच्या घरच्यांना. थाळी जबरदस्त!!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 01/27/2011 - 10:44

In reply to वा वा वा!! विजुभाऊ... by प्राजु

Permalink

प्राजु ......ते इकडे

प्राजु ......ते इकडे येण्याअगोदरच सांगुन ठेवलय घरी....
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 01/26/2011 - 10:04

Permalink

मस्त

तुकडोजी महाराज आज असते तर त्यांनी राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या (एसी) झोपडीत माझ्या असं म्हटलं असतं.
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Wed, 01/26/2011 - 10:26

Permalink

मस्त

मस्त दिसते आहे थाळी!! मज्जा आहे विजुभाऊ तुमची!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Wed, 01/26/2011 - 11:45

Permalink

छान

गुजरात मधल्या शहरांमधे अशी असंख्य हॉटेल्स आहेत. अमदाबादच्या 'गोवर्धन थाळ' मधे जेवा विजुभाऊ. माझी आठवण काढाल!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 06/03/2022 - 09:49

In reply to छान by तिमा

Permalink

या वेळेस जेवलो तेथे. गोवर्धन

या वेळेस जेवलो तेथे. गोवर्धन थाळ इस्कॉन चार रस्त्यावरचे
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com