कलियुग

मुक्त's picture
मुक्त in जनातलं, मनातलं
18 Jan 2011 - 8:19 pm

"कधी आल्या आत्याबाई ममईवरुन?"
"रातीच आले"
"बर्‍या खुशाल का?"
"हां... तुम्ही खुशाल तं आम्हीबी खुशाल"
"सकाळपसुन बसल्यात इथं वट्ट्यावर... उन्हाला.."
"हां..मोकार कळांगान सुटलय रातपसुन. पार रक्त गोठलय"
"हां ना. पावसाळ्यात ऊन आन हिवाळ्यात पाऊस. कलियुग.. दुसरं काय?"
"ह्म्म्म... "
"ममैला कोनकोने मंग?"
"डाक्तर नवरा बायकु. आन एक पोरगी"
" पोरगी येकुलती येके का?"
"नाही. एक पोरगा हायेना. पुण्यालाय कालेजात"
"पोरगी लहाने का?"
"नाही. मोठीये. लग्न झाल् त तीच"
"मंग?"
"आली परत माहेरी"
"कम्हुन"
"तीचा नवरा गेला. पळुन...."
"अरे पांडुरंगा....दुसरी केली का?"
"नाही. दुसरा केला"
"म्हंजी?"
"आगं, त्यानं एका माणसाबरोबर लगीन केलं"
"खि.. खि.. खि. काssय. म्हंत्या क्काय आत्याबाई....?"
"हां ना. खरच."
"हा हा हा तुम्ही लई नकलीय आत्याबाई"
"आगं गप नाही सांगत"
"ही ही ही. नाही हो आत्याबाई. तुमची आइकण्यात काहीतरी गफ्लत झाली आस् न"
"नाई गं बाय. खरच "
"आन् याच्यासंग लगीन केलं तो?"
"त्याचंबी लगीन झाल् तं. त्याचीबी बायकु बसली घरी आन् हिबी"
"पण आत्याबाई गडीमाणुस गडीमाणसाशी कसं काय लगीन करीन?"
"केलं बाई त्यान्नी. कस काय केल देवालाच माहीत?"
"पण आत्याबाई त्यांचा व्यवहार कस्काय व्हईन"
"................."

संस्कृतीवावरप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

रेवती's picture

18 Jan 2011 - 8:22 pm | रेवती

हा हा हा!
ज्यांना नवीनच माहिती कळते त्यांचा चेहेरा आणि प्रतिक्रिया बघण्यासारख्या असतात.
लेखन मजेदार. आवडले.

प्राजु's picture

18 Jan 2011 - 8:50 pm | प्राजु

होतं असं आता!! काय करणार? चालयचंच!

शुचि's picture

18 Jan 2011 - 9:05 pm | शुचि

लेखकाला "कलीयुग" या शीर्षकातून काय अधोरेखीत काय करायचं आहे हे कळलं नाही - (१) बायकोला फसवले हा गंभीर प्रश्न आहे की (२) पुरषाने पुरषाबरोबर संबंध ठेवले हा गंभीर प्रश्न वाटतो?

पहीला मुद्दा असेल तर तो लेखात तितकासा स्पष्ट झालेला नाही.
दुसरा मुद्दा तितकासा नवीन राहीलेला नाही किंवा कलीयुग म्हणावे असे काही त्यात नाही.

अवांतर - शंकरांचे एक नाव "विष्णूवल्लभ" आहे. त्याचा उगम मोहीनी रूपात विष्णूवर भाळलेल्या शंकरांशी असावा. Many different legends tell of her various exploits and marriages, including unions with both Shiva and Krishna.

स्वानन्द's picture

18 Jan 2011 - 9:33 pm | स्वानन्द

>>दुसरा मुद्दा तितकासा नवीन राहीलेला नाही किंवा कलीयुग म्हणावे असे काही त्यात नाही.
तो तुम्हाला हो.. त्या आजीबाईना नवीनच की!

>>अवांतर - शंकरांचे एक नाव "विष्णूवल्लभ" आहे. त्याचा उगम मोहीनी रूपात विष्णूवर भाळलेल्या शंकरांशी असावा.
असेल असेल... वरच्या कथेतल्या त्या दोघांपैकी कुणीतरी 'मोहीनी' रूप घेतले असेल. ;)

>>Many different legends tell of her various exploits and marriages, including unions with both Shiva and Krishna.
म्हणजे विष्णुचं विष्णुशी लग्न? मुक्त साहेब ह्याला कुठलं युग म्हणेल हो, ती आजीबाई? :)

अजूनही (काही) खेड्यापाड्यात वरील प्रकार अस्तित्वात असल्याची जाणीव नसते काहीजणांना.
विनोदाशिवाय लेखनाचा बायकोला फसवणे किंवा इतर काही स्पष्ट करण्याचा हेतू नसेल असे वाटते.
'कलियुग आहे' असे पूर्वीचे वयस्कर लोक नेहमी म्हणत.
माझी आजी भाजीवाल्याने फसवले तरी 'कलियुग आले' असे म्हणायची किंवा कुठे राजकारणातले घोटाळे, मारामार्‍या वाचूनही 'कलियुग आले' असे म्हणायची. ती खरेतर 'कल्युग आले' म्हणायची.;)

कानडाऊ योगेशु's picture

18 Jan 2011 - 10:59 pm | कानडाऊ योगेशु

कथेला दिलेले शीर्षक कथेतील दोन खेडुत(?) स्त्रीयांच्या दृष्टीकोनातुन पाहील्यास अगदीच समर्पक वाटते.

बाकी तुमच्या अवांतराबद्दल

इकडे दक्षिणेत भगवान शंकराला तीन मुले असल्याचे मानतात.त्यातले दोन आपल्याला माहीती असलेलेच आहेत.

गणपती आणि कार्तिकेय.(दक्षिणेत त्यांना गणपतीस्वामी आणि सुब्रमण्यमस्वामी म्हणतात.)

शंकराचे तिसरे अपत्य म्हणजे अय्यपास्वामी.जो शंकराला मोहीनीरुपातील विष्णुपासुन झाला.(म्हणजे मोहीनीवर भाळणार्यांपैकी भस्मासुरासोबत भगवान शंकरही होते.)

नुकतीच दुर्घटना झालेल्या शबरीमलाई येथे अय्यपास्वामीचे मंदीर आहे.

प्रियाली's picture

18 Jan 2011 - 11:09 pm | प्रियाली

शंकराचे तिसरे अपत्य म्हणजे अय्यपास्वामी.जो शंकराला मोहीनीरुपातील विष्णुपासुन झाला.(म्हणजे मोहीनीवर भाळणार्यांपैकी भस्मासुरासोबत भगवान शंकरही होते.)

शंकराला मोहिनीपासून मुलगा झाला की मोहिनीला शंकरापासून मुलगा झाला? वरील वाक्यात मोहिनीपासून शंकर गर्भवान राहिला आणि अपत्य झाले असे प्रतीत होते आहे.

देवाशप्पथ! खरंच कलियुग आहे. ;)

कुळाचा_दीप's picture

19 Jan 2011 - 6:38 am | कुळाचा_दीप

मस्त !
अवांतर : मोहिनी म्हणजे नेमकी कोण ? समुद्र मंथानात अमृत ढापणारी ...का भस्मासुर वाली ??

नरेशकुमार's picture

19 Jan 2011 - 8:55 am | नरेशकुमार

समुद्र मंथानात अमृत ढापणारी मोहिनी म्हणजे वर्षा उसगांवकर. : विष्णु पुराण. A TV serial.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jan 2011 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार

शंकराचे तिसरे अपत्य म्हणजे अय्यपास्वामी.जो शंकराला मोहीनीरुपातील विष्णुपासुन झाला.(म्हणजे मोहीनीवर भाळणार्यांपैकी भस्मासुरासोबत भगवान शंकरही होते.)

नविनच माहिती.

आमच्या ज्ञानाप्रमाणे शंकराने मोहिनी रुपातील विष्णुचा भोग घेतल्यावर जे बीज जन्माला आले ते पवनकुमाराने अंजनीच्या गर्भात सोडले :)

कानडाऊ योगेशु's picture

19 Jan 2011 - 7:20 pm | कानडाऊ योगेशु

तुमचा प्रतिसाद वाचल्यानंतर "जय हनुमान" सिरियल मध्ये असे काहीसे दाखविले होते तर खरे हे आठवले.
अय्यप्पा आणि हनुमान संबंधी गुगलुन पाहीले आणि बरीच माहीती मिळाली.
अय्यप्पा आणि हनुमान जन्मासंबंधात बरीच व्हर्जन्स (मराठी?) आहेत.तुम्ही स्वतःच गुगलुन पाहा.

सुनिलपाटील's picture

18 Jan 2011 - 9:44 pm | सुनिलपाटील

कलियुग कशाला, पुराणात उल्लेखलेला किन्नर हा मनुष्य प्रकार वरिल प्रकारात मोडत असावा ... तज्ञानी प्रकाश टाकावा

किन्नर चा जालावरील उल्लेख छक्का आहे. ते लोक वेगळे.
___________________________________
होमोसेक्शुअल किंवा बायसेक्शुअल लोक वेगळे. हे लोक आपल्यासारखेच असतात फक्त त्यांचे वेगळेपण म्हणजे सेक्शुअल ओरीअंटेशन. हे मी वेगळं सांगायची गरज नाही. पण असो.

टारझन's picture

18 Jan 2011 - 11:54 pm | टारझन

खंग्री :)

-(व्यवहार चतुर ) टारझन

गावातील लोकांची प्रतिक्रिया आवडली..
बाकी यातही गंभीर चर्चा सुरु झाली की ;)

पैसा's picture

19 Jan 2011 - 12:05 am | पैसा

कल्युग गो!

असेच मजेशीर लीहीत रहा.

हम्म. कलीयुगात वागणे सुधारावे हेच उत्तम नाहीतर असे होते.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2011 - 7:29 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त!

"पण आत्याबाई त्यांचा व्यवहार कस्काय व्हईन" =))

संकेत मस्तरे.

म्हतारी गडबडली असेन हे ऐकुन.

अवांतर : परश्या आणि बकराचा किस्सा टाक रे. :)

मेघवेडा's picture

19 Jan 2011 - 10:11 pm | मेघवेडा

हा हा.. मस्त!!

छत्रपती's picture

21 Jan 2011 - 9:31 am | छत्रपती

चान चान