नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
30 Sep 2010 - 10:09 pm

नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता

सोडा हातातल्या हाता नाथा आता
हातातल्या हाता

अहो सोडा हातातल्या हाता नाथा
हातातल्या हाता ||धृ||

मनाचीये गुंत्यामधे
होssओssहोssओ
मनाचीये गुंत्यामधे
नका अडकू आता नाथा
सोडा हातातल्या हाता ||१||

आले जरी दुरवरूनी
आssआssआssआss
आले जरी मोहीम करूनी
का बळेची ओढता
नाथा आता
सोडा हातातल्या हाता ||२||

सासू सासरे दिर जावा
हंssअंssअंssअंss
सासू सासरे दिर जावा
बोल बोलतील असे एकांती पाहता
नाथा आता
नका....नका
सोडा हातातल्या हाता ||३||

काळ वेळ नाही बरी
लाssलाssलाssलाss
काळ वेळ नाही बरी
वेळ झाली, पुरे करा बाई आता
सांगते जाता जाता
सोडा हातातल्या हाता ||४||

विनवणी माझी तुम्ही ऐका
हंssअंssअंssअंss
विनवणी माझी तुम्ही ऐका
नका मज भेटू एकांती असता
सोडा आता नाथा
सोडा हातातल्या हाता ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०९/२०१०

शृंगारसंगीतनाट्यप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

मस्त.
नाट्यगीत नेहमी फेमिनाइन (मार्दवपूर्ण) च डोळ्यासमोर येतं. लहानपणी शनिवारी मराठी नाटक क्वचित पाहीलय दूरदर्शनवर त्यात नऊवारी पैठणी नेसून वगैरे नायिका नाट्यगीत म्हणताना आठवते.
खूप आवडतात नाट्यगीतं , आळवून आळवून ओळ गायची, ताना घ्यायच्या अशी काहीशी असतात.

गुंडोपंत's picture

1 Oct 2010 - 10:13 am | गुंडोपंत

वर शुचिताईंशीही सहमत आहेच.

मनाचीये गुंत्यामधे
होssओssहोssओ
मनाचीये गुंत्यामधे
नका अडकू आता नाथा
सोडा हातातल्या हाता

हे आवडले!
आलाप न टाकता दिले असते तर अजून छान वाटले असते.
असो, आता पुढील नाट्यवाचनाची वाट पाहतो आहे.

sagarparadkar's picture

1 Oct 2010 - 6:46 pm | sagarparadkar

एव्हढे सगळे त पाहून मला उगाचच वाटून गेलं कि कुठेतरी - यमक जुळवण्यासाठी का होईना - पण 'तात्या' पण दाखल झाले असावेत ...... :)

निल्या१'s picture

4 Oct 2010 - 3:40 am | निल्या१

गाण्याची चाल लावून झाली आहे.
कशी वाटते पहा. कुठे सूर ढळला असेल तर तेवढं पदरात घ्या.

पाषाणभेद's picture

4 Oct 2010 - 9:25 am | पाषाणभेद

श्री. निल्या यांचे आभार.

मुळ तूनळीवरची साखळी ही आहे:
http://www.youtube.com/watch?v=Av-whAOa2wA&feature

चाल एकदम झकास जमली आहे. अगदी व्यावसायीक तर्‍हेचे संगीत, चाल अन गायकी आहे.
योग्य तिथे आलाप घेतलेले आहे. काही ठिकाणी बदल केले असते तरी माझी काही हरकत नव्हती.
(मुल अन गाणे जन्माला आले की सार्वजनीक होते, अशा अर्थाची माझी मागे सही होती!)

अवांतर: श्री. निल्या यांना एक विनंती आहे की युट्युब वरील हा व्हिडीओ ईडीट करून काही टॅग (जसे Soda) इ. काढून टाका अन Natya sangeet रिलेटेड टॅग टाका. बाकी एकदम मस्त!

निल्या१'s picture

4 Oct 2010 - 8:06 pm | निल्या१

पाभे,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मिपावर संगीतातील जाणकार लोक आहेत. त्यातल्या कुणी अभिप्राय दिला तर बरं होईल, नाही तर "अहो रूपम अहो ध्वनिम" सारखा प्रकार व्हायचा.

~
निल्या