रुपये१००१

मन१'s picture
मन१ in जनातलं, मनातलं
1 Oct 2010 - 6:14 pm

बंधुंनो, हायकोर्टाचा निकालाला शांतपणे घटनात्मक पद्धतीनं सामोरं गेल्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे मनापासुन आभार.
इथुन पुढही सर्व काही वैधानिक मार्गानच अधिकाधिक सामंजस्यानं जाइल अशी मी आशा बाळगतो.
माझ्या माहितीप्रमाणं तुमच्या उपासनेमध्ये थेट मूर्ती पूजनास वाव नाही. मूर्तीपूजेस विरोध केला आहे.
तुम्हाला उपलब्ध जागेत मूर्तीविहीन पद्धतीनं तुम्ही उपासनास्थळ उभारणार आहात असं ऐकण्यात येतय.
त्याबद्दल आपणास शुभेच्छा.
तिथल्या बांधकामासाठी मी वैयक्तिक रित्या १००१रुपयांची देणगी जाहिर करतोय.
(नक्की कधी बांधकाम सुरु करणं शक्य आहे, आणि कधी करणार आहात हे मला ठावुक नाही.)
(ती रोख असावी की ऐनजिनसी हे अजुन ठरत नाहिये.)
तुमचा शुभारंभाचा कार्यक्रम ठरला की कृपया कळवा.
मी जाहिरपणे आपणास हे निमंत्रण मागतोय.
एक सद्भावना दर्शवण्यासाठी ही रक्कम आहे.देशातला बंधुभाव वॄद्धिंगत होइल,दृढ होइल ही आशा आहे.

तुम्हाला मूर्तीपूजा मान्य नाही. ह्या मताचा मी आदर करतो. पण एक कळकळीची विनंती आहे की मूर्ती भंजनाचा क्लॉज जर तुम्हाला शिकवण्यात येत असेल तर तुम्ही स्थल्-कालानुरुप त्यात व्यावहारिक बदल करावा.तुम्ही कुठल्याही मूर्तीचं मंदीराचं दर्शन घ्यावं किंवा गणपतीमध्ये बाप्पाची मूर्ती ओक्यावर घेउन नाचाव असा माझा आग्रह नाही. पण strategy अशी ठेवता आली तर बघा:-
कुठल्याच गैरधर्मीय वाटणार्‍या गोष्टीचं दर्शन घ्यायचं नाही.आणि त्याच्या भंजनाच्या आग्रहाला बळीही पडायचं नाही.
भंजनाचा विचारही सोडुन द्यायचा.
बस्स. इतकच.

--सद्भावनेसहित,
आपलाच मनोबा.
(माझं मतः- आपलं सहजीवन(co-existence) अपरिहार्य आहे. अधिकाधिक विधायक कामानं सर्वच जणं समृद्धी मिळवुयात. )

संस्कृतीधर्मप्रकटनविचारसद्भावना

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Oct 2010 - 6:16 pm | बिपिन कार्यकर्ते

छान!

हर्षद आनंदी's picture

1 Oct 2010 - 6:19 pm | हर्षद आनंदी

एवढे विनोदी लेखन आज पर्यंत वाचले नव्ह्ते,,, :D :D :D :D

धमाल मुलगा's picture

1 Oct 2010 - 6:24 pm | धमाल मुलगा

त्या १००१ रुपयांत एक बाँबसुध्दा बनणार नाही. मग काय उपयोग?

इंटरनेटस्नेही's picture

1 Oct 2010 - 7:46 pm | इंटरनेटस्नेही

कपडे धोने का साबुन एक पोटेन्षियल बँब है.. भुल गये धमु सेठ?

इंट्या टेरर

धमाल मुलगा's picture

1 Oct 2010 - 7:57 pm | धमाल मुलगा

हाय हाय लक्षात हाय टेररभाई :D

पण एव्हढ्याश्श्या धुण्याच्या साबणाचा काय अल फायदा?

परिकथेतील राजकुमार's picture

1 Oct 2010 - 6:26 pm | परिकथेतील राजकुमार

डालरां डालरां.....

पैसा's picture

1 Oct 2010 - 8:18 pm | पैसा

तुमची देणगी घेतली तर कराची दुबईतले भाई लोक आम्हाला कच्चे खातील हो!

शुचि's picture

1 Oct 2010 - 10:14 pm | शुचि

>> त्याच्या भंजनाच्या आग्रहाला बळीही पडायचं नाही >>
भंजन आणि विटंबनादेखील. विटंबना हा एक घाणेरडा प्रकार असावा असं उगाचाच (आता हा ६थ सेन्स म्हणा अतिकल्पकता म्हणा) वाटतं. आणि राग राग होतो.

मिसळभोक्ता's picture

1 Oct 2010 - 10:33 pm | मिसळभोक्ता

बंधूंनो,

आमच्या एका उपासना स्थळाला मूर्तीविहीन बनवून तुम्हाला पाठिंबा द्यायचं मनात आहे.

तुमचा प्रतिसाद खूप आवडला. स्वतःच्या प्रतिसादाची लाज वाटली. वेल .... आय मिसड द पॉइंट अ‍ॅग्री

तिमा's picture

2 Oct 2010 - 8:50 pm | तिमा

लेख छान उपरोधिक आहे. पण ज्यांच्यापर्यंत पोचावा तिथे पोचणार नाही. या निमित्ताने माझे एक (कै.) जहाल मित्र गोष्ट सांगायचे. ती अशी.
एका घरांत दोन भाऊ रहात होते. धाकट्याने वेगळं व्हायचं ठरवलं. मोठ्याने उदार मनाने त्याला घराचा काही भाग दिला व वर पैसेही दिले. पण धाकट्याचे समाधान झाले नाही. तो मोठ्याच्या बायकोवर पण हक्क सांगू लागला. शेजारी म्हणाले हाकलून लावा नालायकाला. पण मोठा अन्याय सहन करत राहिला. शेवटी एक दिवस मोठ्याच्या मुलीवर सुध्दा त्याची वाकडी नजर पडली तेंव्हा मोठा संतापला. पण करतो काय, अन्याय सहन करण्याची क्षमता इतकी वाढली होती की तो षंढ झाला होता.

डावखुरा's picture

2 Oct 2010 - 9:56 pm | डावखुरा

माले तं भाऊ काईच ऊमजनं नै...

कोणी सुज्ञ या मुढाला समजवेल काय?