(चौकट)

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
30 Sep 2010 - 12:19 pm

विडंबकांच्या भाऊगर्दीतून मी जातो
कुणालाही न दिसणार्‍या कवितेकडे
काथ्याकुटाखाली, कौलाखाली लपलेल्या
शाब्दिक चित्राकडे
तिथे असतो नवख्या कवीच्या
शब्दकुंचल्यातले रंग सांडलेला भाष्यतुकडा.

मला ते चित्र सुखदायी वाटतं
वाटतं करावंसं थट्टाबध्द
मी विडंबन टाकतो त्या चित्राभोवती.

आता माझी शाब्दिक चौकट, त्यात रगडलेले भाव, कल्पना
अन् त्याखालची प्रतिसादांची जागा - इतकेच
... तरीही अधेमधे राहतातच उरलेले
न बदललेले काही शब्द अन् लांबलचक टुकार ओळ.

मग मी चौकट मोठी करतो
आणखी काही कल्पनांची काशी करण्यासाठी
उरलेसुरले शब्द, ओळी आणि
कवीलाही काढूनच टाकतो चित्रातून.

आता राहते फक्त माझ्याच शब्दांची जमीन,
'पुर्वदृश्य' आणि 'प्रकाशित करा'.

मग मी बाहेर पडतो आखाड्यात,
अन् जाऊन लपतो पाहुणा वाचक म्हणून. .
रम्य सोहळा बघायला
शेकडोंनी प्रतिसादांचा . . .

प्रेरणा: दत्ता काळ्यांनी आखलेली चौकट

हास्यहे ठिकाणकविताविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

30 Sep 2010 - 12:30 pm | दत्ता काळे

मग मी बाहेर पडतो आखाड्यात,
अन् जाऊन लपतो पाहुणा वाचक म्हणून. .
रम्य सोहळा बघायला
शेकडोंनी प्रतिसादांचा . . .

हा.. हा.. हे तर फारंच छान.

राजेश घासकडवी's picture

30 Sep 2010 - 12:46 pm | राजेश घासकडवी

आणखी काही कल्पनांची काशी करण्यासाठी

मस्तच.

सहज's picture

30 Sep 2010 - 12:54 pm | सहज

पण तेवढं शेकडो प्रतिसाद कवितेला म्हणजे जरा जास्त नाही का वाटत? त्याकरता विडंबनाचाच घट्ट आधार हवा ;-)

विडंबनाला कवितेच्या तुलनेत शेकडो प्रतिसाद खेचणे सुलभ असावे. मात्र एखादी सर्वानुमते वादग्रस्त किंवा पूर्ण अगम्य कविता (म्हणजे शरदिनींच्या असायच्या तशा नव्हेत :) ) असल्यास तिलाही शेकड्यानी प्रतिसाद मिळणे शक्य आहे :)
(कवी)बेसनलाडू

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2010 - 3:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पूर्वी आमच्याघरी 'साष्टी हापूस' विकायला एक मावशी यायच्या. त्यांचा आंब्यांचा शेकडा १४४ चा असायचा. बेला, आपण तुझ्यासाठी डेसिमल सिस्टम बदलून बायनरी किंवा चाराची सिस्टम घेऊ हवंतर की झाला शेकडा! शेकड्याचंही विडंबन करून होईल.

असो. विडंबन आवडलं.

आणखी काही कल्पनांची काशी करण्यासाठी

पितृपंधरवड्यात आणखी कसली कसली काशी होणार?

बेसनलाडू's picture

30 Sep 2010 - 11:07 pm | बेसनलाडू

हे साष्टी हापूस काय आहे? हापूसचे विडंबन आहे काय? ;) १४४ = शेकडा मानल्यास ते डेसिमल सिस्टमचे विडंबन म्हणायलाही हरकत नाही ;)
(विडंबक)बेसनलाडू

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2010 - 11:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाय नाय, ठाण्याला घोडबंदर रोडला पूर्वी हापूसच्या बागा होत्या, आता तिथे सिमेंटचं जंगल वाढतं आहे. तिथला आंबा देवगड, रत्नागिरी (मला यातला फरक समजत नाही) यांच्याशी तुलना करता येण्याएवढा चांगला असायचा. आकाराने बर्‍यापैकी मोठा आणि (बहुदा) एवढा प्रसिद्ध नसल्यामुळे किंचीत स्वस्त मिळायचा. आम्ही घरी आढी लावून घ्यायचो त्याची. म्हातारीशी मावशी आली तर तिच्यालेखी १४४ चा शेकडा असायचा.

शेकडा मानल्यास ते डेसिमल सिस्टमचे विडंबन म्हणायलाही हरकत नाही

खल्लास!

चित्रा's picture

1 Oct 2010 - 1:38 am | चित्रा

म्हणजे शेकड्याला १४४ रू. असे का शेकडा म्हणजे १४४ आंबे?

असो.

कविता झकास आहे. मूळ कविताही जाऊन वाचली.

विजुभाऊ's picture

1 Oct 2010 - 10:40 am | विजुभाऊ

तिच्यालेखी १४४ चा शेकडा असायचा.

त्याला ग्रोस असे म्हणायचे. बारा डझनाचा एक ग्रोस.
दस्ता ,रीम ही देखील काही एकके आहेत.
बाय द वे कॅरट,रत्तल ,औंस याबद्दल एककांबद्दल कोणी ल्ह्याल का?

गणपा's picture

30 Sep 2010 - 12:57 pm | गणपा

वा वा बेला छान छान !!
शेवटच्या कडव्याशी बाडीस. :)

यशोधरा's picture

30 Sep 2010 - 1:01 pm | यशोधरा

विडंबकांच्या भाऊगर्दीतून मी जातो
कुणालाही न दिसणार्‍या कवितेकडे

अगदी! जातो सुस्सट पळून! असं लिहिलं तरी चालेल! पळेल! धावेल सद्ध्या!

श्रावण मोडक's picture

30 Sep 2010 - 1:16 pm | श्रावण मोडक

दंडवत!

प्रभो's picture

30 Sep 2010 - 11:11 pm | प्रभो

आवडलं.!!

पैसा's picture

30 Sep 2010 - 11:13 pm | पैसा

बेसनलाडू चौकटीत मस्त फिट्ट बसला!

केशवसुमार's picture

30 Sep 2010 - 11:19 pm | केशवसुमार

बेलाशेठ,
मस्त विडंबन.. कल्पनांची काशी आवडली..
(वाचक)केशवसुमार..
मग मी बाहेर पडतो आखाड्यात,
अन् जाऊन लपतो पाहुणा वाचक म्हणून. .
बाकी ह्या ओळी सुचक आणि रोचक आहेत..

बेसनलाडू's picture

30 Sep 2010 - 11:23 pm | बेसनलाडू

अन् जाऊन लपतो पाहुणा वाचक म्हणून. .
बाकी ह्या ओळी सुचक आणि रोचक आहेत..

व्यक्ती नाही; प्रवृत्ती हो प्रवृत्ती ;)
(प्रवृत्त)बेसनलाडू

श्रावण मोडक's picture

30 Sep 2010 - 11:40 pm | श्रावण मोडक

हे म्हणजे ठकाला महाठक म्हणतात तसे झाले. ;)

नंदन's picture

1 Oct 2010 - 1:42 am | नंदन

विडंबन :)

मग मी बाहेर पडतो आखाड्यात,
अन् जाऊन लपतो पाहुणा वाचक म्हणून. .
रम्य सोहळा बघायला
शेकडोंनी प्रतिसादांचा .

काही जुने 'खोडसाळ' आयडी आठवले त्या तिथले, पलीकडले ;)

चतुरंग's picture

1 Oct 2010 - 1:57 am | चतुरंग

बेला शेठ, 'राउंड लाडू इन स्क्वेअर चौकट' फर्मास जमलंय! ;)

मग मी बाहेर पडतो आखाड्यात,
अन् जाऊन लपतो पाहुणा वाचक म्हणून. .
रम्य सोहळा बघायला
शेकडोंनी प्रतिसादांचा . . .

हा आउट ऑफ चौकट विचार आवडला! ;)

चौकटरंग

ऋषिकेश's picture

1 Oct 2010 - 11:00 am | ऋषिकेश

मस्त .. नेहमीसारखं बेला फेम नसलं तरी आवडलं

डावखुरा's picture

2 Oct 2010 - 12:05 am | डावखुरा

आवड्लं तुमचं बाड...