एका (अज्ञात) सैनिकाने लिहिलेल्या हृदयद्रावक कवितेचे भाषांतर!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
16 Sep 2010 - 8:36 pm

श्री. तरुण विजय यांचे टाइम्स ऑफ इंडियावरील ब्लॉग्ज हल्ली वाचनात आले व मला आवडले.
श्री. तरुण विजय यांचा परिचय करून दिला जातो तो असा: सिंधु नदीवरची झुळूक, कैलास पर्वतावरचा शिवमंत्र, चुशुलमधील सफर, गोठलेल्या झंस्कारवर चादर पांघरून मारलेली चक्कर. या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे श्री तरुण विजय!
ते श्यामाप्रसाद मुखर्जी रीसर्च फाऊंडेशनचे संचालक असून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. त्यांचे ब्लॉग्ज भारतमातेभोवती आणि तिच्या समस्यांभोवती फेर्‍या घालतात.
अलीकडेच त्यांनी टाइम्समध्ये एक छान लेख लिहिला आहे त्याचा दुवा आहे http://blogs.timesofindia.indiatimes.com/indus-calling/entry/whose-man-i...
हा लेख सर्व मिपाकरांनी जरूर वाचावा अशी मी शिफारस करतो. भाजपावाल्याचा आहे. पण कुणी लिहिला आहे यापेक्षा त्याने काय लिहिले आहे याला महत्व द्यावे अशीही विनंती!
या लेखाचा शेवट ते एका कवितेने करतात.
ते म्हणतात कीं दिल्लीच्या निधर्मी सुलतानशाहीतील सत्तेच्या दलालांच्या दृष्टीने एक सैनिक हा सुद्धा एक कारकून (बाबू), एक साधा-सुधा कर्मचारीच असतो, ज्याची "एक-पद-एक-सेवानिवृत्तीनंतरचा-पगार" (पेन्शन) अशी साधी मागणीही पुरी होत नाहीं. पण हेच राजकीय नेते स्वतःचे पगार एका क्षणात तिप्पट करून घेतात. वर मीडियासुद्धा या सैनिकालाच झोडत असते. एका (बहुदा अली नावाच्या) सैनिकाने लिहिलेली ही कविता तरुण विजयनी कुठल्याशा ब्लॉगवर पाहिली असे त्यांनी लिहिले आहे.
या कवितेचे मी केलेले (वाकडे-तिकडे) भाषांतर खाली देत आहे. शिवाय मूळ कविता खाली देत आहेच.
वाचा तर....
भारतमाते, मी तुझी अजूनही सेवा कां करतो?
(एका सैनिकाची खंत!)

तू आमच्याशी कशी खेळतेस ते कधी पाहिले आहेस?
सातव्या वर्षी मी ठरविले होते...
कीं मी तुझी शेवटपर्यंत सेवा करेन
तुझ्या सार्‍या सीमांचे रक्षण करेन

अन् आता मी मूर्खासारखा आहे हे दाखवितेस
सतरा वर्षांचा झालो आणि शाळेबाहेर पडलो
’मुलांना पुरूष’ बनविणार्‍या शाळेत गेलो
खडतर आयुष्य जगलो अनेक सुखांना मुकलो

तेंव्हां मी माझ्या मुलकी मित्रांना भेटायचो
कॉलेजकुमारांच्या सोनेरी दिवसात
ते छानछोकीत रहायचे, मजा करायचे आणि
मी उन्हात आणि धुक्यात घाम अन् रक्त गाळायचो,

पण मी कधीही "कां, कुठे आणि काय" विचारले नाहीं
वेळ आली कीं मरायला सिद्ध एवढेच मला माहीत होते

एकवीस झालो आणि मला कमीशन मिळाले
बँडच्या तालात आणि परेड करत
जमीनीवर, हवेत आणि समुद्रात रक्षण करायची
वेळ येताच अंतिम त्याग करायची शपथ घेतली

मी तिथे ऐटीत उभा होतो पण
त्यादिवशी धोक्याची घंटी ऐकायला नाहीं मिळाली.
कारण जेंव्हां मी प्राणर्पण करेन
तेंव्हां तूच म्हणशील, "त्यात काय मोठा तीर मारलास?"

खूप पूर्वी तू मला आरामशीर आयुष्याची खात्री दिली होतीस
मी आसपास नसताना माझ्या कुटुंबाची काळजी घेणार होतीस
तू येऊन आमच्या अडचणी पाहिल्या होत्यास
आणि मी तुला डायरीत लिहितानाही पाहिले

आशा होती कीं तुला माझी किंमत कळली असेल
आता मला कळले आहे कीं तुला कधीच दिसणार नाहींय्
कारण तुला आमचे दैदिप्यमान रूपच दिसते
तुला कधी मरण टपून बसलेले दिसले आहे?

तुला कधी हिमवृष्टीत पहारा करणारा दिसलाय्?
त्याने अद्याप न पाहिलेल्या त्याच्या अर्भकाचे नाव माहीत आहे?
विशाल समुद्रावर गस्त घालताना ज्याचे
वडील वारले त्या नौसैनिकाला तू भेटली आहेस?

तू जाणतेस कीं मी कधी आवाज चढवणार नाहीं
मी खडा राहीन आणि सगळीकडे तुझे रक्षण करेन

आणि तुझ्यासाठी मीच आहे उन्हातान्हात उभा!
आणि आता चोविसाव्या वर्षी मी नवा विचार करतोय्
माझ्या सात वर्षापूर्वीच्या जुन्या निर्णयांचा
मी दुसरे कुठले कार्यक्षेत्र निवडायला हवे होते?

माझ्या मुलाला मी सैन्यात घालेन?
त्याला सांगेन की सैन्यात सार्‍या गरजा भागतात?
या देशाची सेवा तू करशील आणि हा देश
तुला त्या (उच्च) योग्यतेनुसार सारे कांही देईल?

"भारत चमकतोय्" असे जगाला सांगितलेले मी ऐकले
मग मी जवानांना सांगितले की आपला देश महान होतोय्
य़ाच महान देशाचे आपण रक्षण करणार आहोत
पण माते हे सांग कीं कधीपर्यंत हे सोंग मी वठवू शकेन?

तू तुझ्या मनात येतील ती सारी आश्वासने देत रहा
पण तू तुझ्याच सैनिकांच्या आत्म्याशी प्रतारणा करतेस

आपले कांहीं यशस्वी नागरिक आमच्याबद्दल कसे
तुच्छतेने लिहितात आणि टर उडवतात ते ऐकलेस?
तू ये इथे आणि पहा मी काय करतोय् ते
ये इथे आणि मी काय-काय सोसतो आहे ते पहा
एक दिवस माझे आयुष्य तू जगून पहा
मग कदाचित् तुझ्या तोंडून कांहीं बरे बाहेर पडेल?

मी अजूनही माझे प्राण पणाला लावीन
कारण तुझा ध्वज दिमाखात फडकला पाहिजे
पण तरी आता मनात येतच रहाते.....
हे भारतमाते, मी तुझी सेवा अजून कां करतोय्?
======================================
The breeze from Indus, a Shiva mantra at Kailas, a trek in Chushul and a chadar walk on frozen Zanskar. All this put together describes Tarun Vijay. He is director of Dr Syama Prasad Mookerjee Research Foundation and national spokesman of the BJP. The blog revolves around everything that is Mother India and her concerns.
In the secular sultanate of Delhi’s power brokers, a soldier is just another babu, another employee to be denied a justifiable demand of "one rank-one pension" by those politicians who raise their salaries 300% in a jiffy. And in the media he is a punching bag. Just read a poem an Indian soldier wrote (saw it on a blog; Ali, perhaps, was his name).
Why do I still serve you?
How you play with us, did you ever see?
At Seven, I had decided what I wanted to be;
I would serve you to the end,
All these boundaries I would defend.
Now you make me look like a fool,
When at seventeen and just out of school;
Went to the place where they made "men out of boys"
Lived a tough life …sacrificed a few joys…
In those days, I would see my "civilian" friends,
Living a life with the fashion trends;
Enjoying their so called "college days"
While I sweated and bled in the sun and haze…
But I never thought twice about what where or why
All I knew was when the time came, I'd be ready to do or die.
At 21 and with my commission in hand,
Under the glory of the parade and the band,
I took the oath to protect you over land, air or sea,
And make the supreme sacrifice when the need came to be.
I stood there with a sense of recognition,
But on that day I never had the premonition,
that when the time came to give me my due,
You'd just say, "What is so great that you do?"
Long back you promised a well-to-do life;
And when I'm away, take care of my wife.
You came and saw the hardships I live through,
And I saw you make a note or two,
And I hoped you would realise the worth of me;
but now I know you'll never be able to see,
Because you only see the glorified life of mine,
Did you see the place where death looms all the time?
Did you meet the man standing guard in the snow?
The name of his newborn he does not know...
Did you meet the man whose father breathed his last?
While the sailor patrolled our seas so vast?
You still know I'll not be the one to raise my voice
I will stand tall and protect you in Punjab Himachal and Thois.
But that's just me you have in the sun and rain,
For now at twenty-four, you make me think again;
About the decision I made, seven years back;
Should I have chosen another life, some other track?
Will I tell my son to follow my lead?
Will I tell my son, you'll get all that you need?
This is the country you will serve
This country will give you all that you deserve?
I heard you tell the world "India is shining"
I told my men, that's a reason for us to be smiling
This is the India you and I will defend!
But tell me how long will you be able to pretend?
You go on promise all that you may,
But it's the souls of your own men you betray.
Did you read how some of our eminent citizens
Write about me and ridicule my very existence?
I ask you to please come and see what I do,
Come and have a look at what I go through
Live my life just for a day
Maybe you'll have something else to say?
I will still risk my life without a sigh
To keep your flag flying high
but today I ask myself a question or two…
Oh India…. Why do I still serve you?

राजकारणविचारसमीक्षाभाषांतर

प्रतिक्रिया

जिप्सी's picture

16 Sep 2010 - 8:41 pm | जिप्सी

अगदी सुन्न करून टाकलं तुम्ही !

विसोबा खेचर's picture

18 Sep 2010 - 9:52 pm | विसोबा खेचर

कविता लै भारी..

धन्यवाद काळेसाहेब..

तात्या.

गणेशा's picture

16 Sep 2010 - 9:00 pm | गणेशा

परिस्थीती मुळे असे मनात भाव आले तर कसे वाटत असेल हे वाचुन .. वाईट वाटले
.

मुळ कवितेचा आनखिन एक स्वैर अनुवाद करावा असे मनापासुन वाटत आहे.
तुम्हाला आवडेल का ?

-

कविता माझी नाहींय्. त्यामुळे माझी हरकत असायचा प्रश्नच येत नाहीं. पण वेगळा लेख लिहिलात तर ते जास्त आवडेल.

लिहितो आहे.
माफ करा वेगळा लेक करणे योगय वाटले नाही, तुमच्या मुळे हे लिखान मिळाले .. स्पर्धा नाही मनातली एक अस्पष्ट तळमळता लिहावी वाटली .. म्हनुन दोन शब्द .. पुढे लिहितो आहे आनखिन ..

माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ?
लहानपणी स्वप्नाळलेले मन माझे वेडे
असे रक्षणात सिमांच्या अखंड सताड उभे

आता करुनी मुर्खात गणना माझी
त्यागलेली ती कोमलता, पाहितेस का कधी ?
पुरुषात रुपांतर करुनी झाले
सुखवस्तु कातडीस पिळवटुन झाले

सग्या - सोयर्‍यांपासुन दूर वंचीत राहिलो
हरवले ते रोमांचीत जीवन, पाहतेस का कधी ?
धुक्यात विरघळूनी ..उन्हात होरपळूनी
रक्त सांडलेले तुझ्या पदरी ... पाहतेस का कधी ?

माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहतेस का कधी ?
कोठे कसाही असो, ना विचार तेंव्हा वेगळा
सज्ज कायम रक्षणास, वेळ येताच प्राणांची आहुती

-- अपुर्ण

तुम्ही केलेले कवितेचे रूपांतर आवडले. करा पूर्ण. मी कविता करू शकत नाहीं म्हणून चक्क बाळबोध भाषांतर केले होते. पण तुम्ही छान करताय्. जरूर पूर्ण करा!
आणि स्पर्धेचा मुद्दा डोक्यातही नव्हता. धागा भरकटू नये म्हणून मी असे लिहिले होते.

माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ?
लहानपणी स्वप्नाळलेले मन माझे वेडे
असे रक्षणात सीमांच्या अखंड सताड उभे

आता करुनी मुर्खात गणना माझी
त्यागलेली ती कोमलता, पाहितेस का कधी ?
पुरुषात रुपांतर करुनी झाले
सुखवस्तु कातडीस पिळवटुन झाले

सग्या - सोयर्‍यांपासुन दूर वंचीत कायम
हरवलेले रोमांचीत जीवन, पाहतेस का कधी ?
धुक्यात विरघळूनी ..उन्हात होरपळूनी
रक्त सांडलेले तुझ्या पदरी ... पाहतेस का कधी ?

माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहतेस का कधी ?
कोठे कसाही असो, ना विचार तेंव्हा वेगळा
सज्ज कायम रक्षणास, वेळ येताच प्राणांची आहुती

काळ येता जेंव्हा, अमरत्वाची ग्वाही
सामोरा उभा सज्ज मृत्युच्या दारी
बोलशील तेंव्हा तू, काय अशी मोठी बात भारी
त्यागलेला हा शुल्लक जीव .. पाहतेस का कधी ?

खडतर आयुष्य.. आयुष्याची नाती
नोंद तुझ्या मनावरी.. आठवतेस का कधी
मी गेल्यावर पत्नीच्या कपाळावरील
गोंदलेले ओसाड रान .. पाहशील का कधी
सांग वाहिलेल्या शुद्र शवाची
येव्हडी इच्छा जाणशील का कधी?

आशा कोरडी जाणीवतेची
ना तू जाणलेली ती ही कधी
बेभानलेले माझे तेजरुप पाहताना
मरणाची सदैव काळझेप.. पाहतेस का कधी ?

नाव हि नसते ठावूक, आपुल्या तान्ह्या बाळाचे
बर्फावर विरघळणारे पितृत्व असे .. पाहतेस का कधी ?
ना सापडे तडफड पित्याच्या अतिंम श्वासांची
नाविक गस्त असे जरी विशाल समुद्रावरी

बुलंद आवाज ना माझा एकट्याच्या
मीच तो उंच उभा सदैव रक्षणात तुझ्या
उन्हा पावसात तू मुक्त बागडताना
हा खेळ चाले जीवनी, पाहतेस का कधी ?

मायेच्या रक्षणात सदैव आपण
हसण्याचे हेच कारण पुरे आयुष्यभर
अन तू बोलतेस जगाशी .. चमकतो भारत आहे
देवूनी धोका धारातीर्थ जवानांच्या आत्म्यास
सांग चकाकणारे सोंग हे .. तू कधी पर्यंत वठवणार आहे ?

तुच्छतेने लिहिले कोणी, अस्तित्व येथले
उपहासित हे माझे जगणे .. पाहतेस का कधी ?
उभारुन माझ्या जागी, बोलशील का कधी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ?

ध्वज उंच दिमाखात फडकवण्यास तुझा
अजुनही जोखीम प्राणांची घेत आहे
प्रश्न परि अनुउत्तरीत माझे ..
माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ?

---- शब्दमेघ

सुधीर काळे's picture

18 Sep 2010 - 8:07 am | सुधीर काळे

झकास!

रन्गराव's picture

26 Nov 2010 - 3:10 pm | रन्गराव

लेख झकास आहे आणि भावनांना गणेशानं दिलेलं शब्दरूपही सुंदर आहे.

पारुबाई's picture

16 Sep 2010 - 9:02 pm | पारुबाई

कविता मनाला जावून भिडते.

सैनिकाची व्यथा समजली. पण याला उत्तर काय ?

मती कुंठीत झाली आहे.

http://blogs.timesofindia.indiatimes.com/indus-calling/entry/whose-man-i... हा लेख कृपया वाचा. त्यात खूप चांगल्या सूचना आहेत. दोन-तीन दिवसांनी मी या दुव्यावर आधारित एक वेगळा धागा सुरू करायच्या विचारात आहे. बघू कितपत जमतंय् ते!

वाटाड्या...'s picture

16 Sep 2010 - 9:36 pm | वाटाड्या...

सुन्न बिन्न होण्याचे दिवस आता गेले.

हा माझा भारत देशच नाही
१. ज्या मधे वृद्धांना कोणी विचारत नाही..
२. ज्या मधे चिरीमिरी दिल्याशिवाय अंत्यसंस्कार सुद्धा होत नाहीत...
३. ज्या मधे प्राणार्पण केलेल्या सैनीकांच्या शवपेट्यांचा सुद्धा बाजार होतो,
४. जिथे मरण यातना भोगताना अँब्युलन्सलासुद्धा धावताना जागा मिळु शकत नाही..
५. जिथे डॉक्टरसुद्धा गोळ्या देताना त्याला मिळणार्‍या कमिशनचा विचार जास्त करतो....
६. जिथे आजुबाजुच्या परीसरातील ऋग्णांपेक्षा गणपतीच्या समोर स्पिकर भिंतीच्या उंचीची जास्त काळजी केली जाते..
७. जिथे संसद भवनावर हल्ला करणार्‍यांना मोकळं फिरता येतं...
८. जिथे ८०% जनता भ्रष्टाचारी (अर्थात देशद्रोही) आहे...
९. जिथे देव / वंदनीय थोर प्रभुतींच्या नावाचा उपयोग मतं मिळवण्यासाठी होतो...
१०. जिथे ग्रंथालयांवर हल्ले होतात..
११. जिथे बोबडं बोलायला लागलेल्या चिमुकल्या जीवांवर अत्याचार होतात...
१२. जिथे खुनसुद्धा सर्रास पचवले जातात..
१३. जिथे आदिवासांना २ घासालासुद्धा मोताज केलं जातं...
१४. जिथे गायकांना sms वर विजयी व्हावं लागतं...
१५. जिथे अपघातात मदत करताना सुद्धा आधी पोलिसांचा विचार करावा लागतो..
१६. जिथे जाती पातींवर / आरक्षणाच्या नावावर सर्रास लुटलं जातं...

अजुन काय काय लिहु..

ह्याला माझा देश म्हणु मी...?? खरयं, माझा देश असाच तर दिसतो....

- (कोडगा झालेला) वाटाड्या...

वाटाड्या-जी,
तुमची यादी वाचून मीही सुन्न झालो. बरंचसं खरं आहे!
एक-दोन वर्षांपूर्वी मी श्री. पवनकुमार वर्मा यांनी लिहिलेले "Being Indian" हे पुस्तक वाचले आणि मी वेडा झालो. या पुस्तकात आपण भारतीय 'असे' कां आहोत याचा उहापोह केलेला आहे. आपण गद्दारी कां करतो, आपण भ्रष्टाचारी कां आहोत आणि या सर्व 'सद्गुणां'चे समर्थन आपण किती मखलाशीने करतो हेही त्यात दिले आहे.
हे पुस्तक प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचायला हवे.
श्री. पवनकुमार वर्मा हे भारताचे राजदूत होते व त्यांची सेवानिवृत्तीच्या आधीची पोस्ट सायप्रस येथे होती. तिथे त्यांना खूप मोकळा वेळ मिळाला व त्या वेळेचा सदुपयोग करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांचे एक 'चेले' सध्या जकार्ताच्या भारतीय दूतावासात आहेत व त्यांच्या ओळखीने मी परवानगी मागितली आहे. (कारण त्यांचे थेट Contact details मला मिळाले नाहींत)
त्यांची परवानगी मिळाल्यास या पुस्तकाचेही मराठीत भाषांतर करायचा विचार आहे. दु:ख इतकेच आहे कीं माझे हिंदी तितके चांगले नाहीं. नाहीं तर हिंदी भाषांतर जास्त लोकांपर्यंत पोचेल.
असो. जरा भरकटलोच!
हा प्रकल्प हाती घेतला तर 'नैवेद्या'चा मान 'मिपा'लाच मिळेल!

वाटाड्या...'s picture

22 Sep 2010 - 12:59 am | वाटाड्या...

मी तुम्हाला मदत करु शकतो का त्या पुस्तकाच्या भाषांतरासाठी? काही पाने तर जरुर करुन तुम्हालाच देईन.

मला नक्की कळवा. मी उत्सुक आहेच. इतकी चांगली संधी मिळत असेल तर का सोडावी? मलाही इथे अमेरीकेत आल्यापासुन प्रत्येक (मिळालेल्या) भारतीयाचं अवलोकन केल्यावर हाच प्रश्न पडत आलेला आहे...

क. लो. अ.

- (भाषीक) वाट्या

जरूर!
आजच ठाण्यात आलोय् व ४ ऑक्टो.ला जकार्ताला परतेन. त्यानंतर "Being Indian" हा प्रकल्प हातात घेईन. बघू हिंदी कितपत जमते ते!पण मराठीत तरी नक्की आणण्याचा विचार आहे.
पण मुख्य प्रश्न हा आहे कीं किती लोकांना त्यांची परखड टीका भावेल! नाहीं तर पुन्हा "Attack the messenger, not the message"चा प्रयोग सुरू होईल आणि 'समंजस'साहेबांना पुन्हा हस्तक्षेप करावा लागेल.
पण ते जाऊ दे. मी त्या पुस्तकाला मराठीत आणणारच.

विश्नापा's picture

16 Sep 2010 - 9:41 pm | विश्नापा

होतो..निराश कधीतरी सैनिकही !!!

पण मग गीतेतील पार्थाला दिलेले दिव्यज्ञान ही आठवते..

"हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं,जित्वा भोक्ष्यसे महिम "

आणि नाहीतरी भारत हा क्रुतघ्न लोकांचा देश आहे...

सुधीर काळे's picture

16 Sep 2010 - 10:03 pm | सुधीर काळे

अहो, त्या बिचार्‍या सैनिकांना कुठे मिळते भोगायला 'मही'? 'मही' भोगताहेत राजकीय नेते!
सैनिकांना सांगायला कांहीं तरी उदात्त वगैरे लागतं फक्त तेवढं शोधायचं गीतेत. कांहीं ना कांहीं नक्कीच मिळतं!

नितिन थत्ते's picture

16 Sep 2010 - 10:04 pm | नितिन थत्ते

सैनिकांच्या दृष्टीकोनातून कविता चांगली लिहिली आहे. पण....

सैनिकांची ढाल करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम तरुण विजय यांनी केले आहे. त्याला फार महत्त्व द्यावे असे मला वाटत नाही. तरुण विजय यांच्या पक्षाचे सरकार होते तेव्हा "दिल्लीच्या निधर्मी सुलतानशाहीपेक्षा" वेगळ्या स्थितीत सैनिक होते असे मला वाटत नाही. तसेच पुचाट नसलेले, सत्तेची दलाली न करणारे, इंचाइंचाने माघार न घेणारे आणि कर्तव्यदक्ष सरकार असलेल्या इस्रायलच्याही सैनिकाची स्थिती याहून वेगळी नसते.

मग "पण तरी आता मनात येतच रहाते.....
हे भारतमाते, मी तुझी सेवा अजून कां करतोय्?" असे रूदन कशाला?

ही विरोधी पक्षाच्या प्रवक्त्याकडून बेजवाबदारपणे सैनिकांना दिलेली चिथावणी समजायची का?

देशाची भविष्यातली पिढी घडवायची आहे म्हणून शिक्षक होणारे १-२ टक्केही नसतील तसेच "देशासाठी बलिदान करण्याच्या" इच्छेने सैन्यात दाखल होणारे सैनिक १-२ टक्केही नसतील. तसे असूही नये. सैनिक होण्यात मृत्यू येण्याचा धोका किती आहे (हा १००% नसतो आणि खूप कमी असतो) याचा हिशेब करून त्या धोक्याच्या बदल्यात किती पगार, इतर व्यवसाय करण्याची शक्यता वगैरे विचार करून बहुतेक लोक सैन्यात जात असावेत. (ज्यांचे वडील वगैरे सैन्यात असतील त्यांच्याबाबतीत 'सवयीने/वहिवाटेने' सैन्यात जाण्याची शक्यता अधिक असेल. पण तिथे देशभक्तीपेक्षा रिझनेबल आयुष्य जगता येत असल्याचा प्रत्यक्षानुभव कामी येत असावा).

असाच धोका पोलादाच्या कारखान्यात काम करणारे कामगार, उंच इमारतीच्या बाहेरून पाळण्यावर बसून रंग लावणे वगैरे कामे करणारे, यांनाही असतो. धोक्याचे प्रमाण काढले तर ते साधारण सारखेच असेल.

सैनिकाचा व्यवसाय ही एक सामाजिक देवघेव असते. त्याहून जास्त ग्लोरिफिकेशन करू नये.

नितिन,
तुझे मत वाचले, पण प्रतिक्रिया देण्याइतका Data माझ्याकडे नाहींय्. (म्हणजे प्रत्येक क्षेत्रातले मृत्यूचे प्रमाण वगैरे). त्यामुळे विषयांतर होऊ नये म्हणून जास्त लिहिण्याचे टाळत आहे!

नितिन थत्ते's picture

16 Sep 2010 - 10:47 pm | नितिन थत्ते

लेखातली भावना 'सिव्हिल सोसायटीला-त्यात विशेषकरून आपल्या देशाच्या सत्ताधार्‍यांना- सैनिकांच्या त्यागाची कदर नसणे' हा आहे. म्हणून काही गोष्टी यथार्थतेने दाखवायची गरज वाटली.

या प्रतिसादाला श्री जयंत कुलकर्णी यांनी मुद्देसूद उत्तर दिले आहे.

सुनील's picture

16 Sep 2010 - 11:15 pm | सुनील

विषयांतर होऊ नये म्हणून जास्त लिहिण्याचे टाळत आहे

विषय तरी काय आहे?

तुम्हाला तरुण विजय ह्यांच्या भिकार लेखावर चर्चा करायची असेल तर, आपला आत्ताच पास!

जरूर. या लेखावर एक वेगळा धागा काढायचा विचार आहे.

सुनील's picture

17 Sep 2010 - 7:41 am | सुनील

जरूर. या लेखावर एक वेगळा धागा काढायचा विचार आहे.
शुभेच्छा!

असे विचार करणारे सैनिक जर भारतिय सैन्यात असतील तर त्याना ताबडतोब रिटायर्ड करुन घरी बसवले पाहिजे.सैन्यात नोकरी करायला भारत सरकार सक्ती करत नाही किंवा वंशपरंपरेने कोणाला सैन्यात घेतले जात नाही. असल्या फालतु कवितेने टाळ्या मिळतील हे मात्र नक्की.मी बर्‍याच राज्यात सैन्यभरती होताना होणार्‍या गर्दीचे व चेंगराचेगरीचे फोटो पाहतो त्यावेळी तरुणाच्या मनात एकच विचार असतो सैन्यात नोकरी करुन उत्तम पैसा कमावणे व रिटारमेंन्ट नंतर चांगली नोकरी मिळवणे. युध्द काय दररोज होत नसते त्यामुळे मरणाची भिती दररोज असण्याची गरजच काय? तसेच युध्दात मरण पावल्यावर सरकार अश्या सैनिकाच्या कुंटुबाला वार्‍यावर सोडत नाही.
कविता वाचल्या असे वाटते सैन्यात भरती होणारा प्रत्येक सैनिक युध्दात मरतो. किंवा जो पर्यत तो सैन्यात आहे तोपर्यत त्याला युध्दभुमीत तैनात केले जाते. त्याला खायलाप्यायला महिन्यातुन एकदाच दिले जाते किंवा त्याला वारंवार टॉर्चर केले जाते.माझ्या नात्यातील जे लोक सैन्यात आहेत किंवा होते त्याच्या अश्या भावना कधीच नव्हत्या.
वरील कविता करणारा सैनिक नक्कीच पळपुटा असणार हे नक्की.

जयंत कुलकर्णी's picture

17 Sep 2010 - 7:52 pm | जयंत कुलकर्णी

श्री. वेताळसाहेब,

मी फक्त जेथे जेथे सैनिकांचा उल्लेख होत आहे तेथेच प्रतिसाद देत आहे , हे कदाचित आपल्या लक्षात आले असेल. असो.

पहिल्यांदा हे लक्षात घेतले पाहिजे की सैनिक हाही एक तुमच्या आमच्या सारखा माणुसच आहे. तोही विचार करतो. तो जो विचार करतो त्यातला सगळ्यात महत्वाचा विचार म्हणजे आपण का लढतो आहे आणि कोणासाठी लढतो आहोत हा आहे. सरकार सक्ती करत नाही हे अर्धवट सत्य आहे. गरज पडली तर आपल्यालाही सैन्यात भरती करून घेतले जाईल याची खात्री बाळगावी. भरतीच्या वेळी चेंगराचेंगरी व गर्दी होते याचे मुख्य कारण स्पष्ट आहे. पुरवठा व गरज यातील तफावत. त्यातून काही वेगळा अर्थ काढणे चुकिचे ठरेल. सैन्यात जाऊन उत्तम पैसा कमवणे हा उद्देश असू शकेल पण आपण तो सैनिक झाल्यावरच्या बाबींवर विचार करतोय.

युध्द रोज होत नाही हे खरे आहे पण चकमकी रोजच होत असतात. मरायला सर्वकष युध्द्च व्हायला पाहिजे असे नाही. युध्दात मरण पावल्यावर सरकार वार्‍यावर सोडत नाही तरीही मला असे म्हणावेसे वाटते की त्या कुटुंबाची वाट लागते ती लागतेच. सगळे काही पैशात मोजता येते नाही.

सैनिकांनी बंदूका उलट्या फिरवल्याची उदाहरणे आहेत का ? इतिहासात आहेत. जपानने जेव्हा चीनवर आक्रमण केले तेव्हा असे घडलेले आहे हे विसरू नका. माओने आव्हान केल्यावर सैनिक मागे फिरले आणि त्यांनी त्या बजबजपुरीतील पुढार्‍यांना पहिले खतम केले. पुढचा इतिहास आहे. माओने त्यांना हेच सांगितले होते की अगोदर आपण आपले घर साफ करूया मग जपान्यांकडे बघुयात. त्याप्रमाणेच झाले. सैनिक हा एक शिक्षीत युध्द करणारे यंत्र असते केव्हापर्यंत ? जो पर्यंत त्याला समाजात मान आहे, तो एका विशिष्ठ ध्येयाने प्रेरित आहे तोपर्यंत. ते नसेल तर काहिही होऊ शकते. म्हणुन सगळ्यांचे हित याच्यातच आहे की आपण आपल्या सैनिकांना मान दिला पाहिजे, त्यांच्या मागे सदैव उभे राहिले पाहिजे.

सध्या सैन्यातल्या अधिकार्‍यांच्या भरतीत काय होते आहे हे आपण पहातच आहात. जर आपली अर्थव्यवस्था भयंकर वेगाने धाऊ लागली तर भरतीच्या वेळी होणारी गर्दी गायब व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा काय करणार ? जर स्क्ती नको असेल तर तरूणांनी स्वतःहून भरती होण्यासाठी लागणार वातावरण तयार केले पाहिजे. हे शक्य आहे का ? आहे. स्व. शास्त्रींसारखे पंतप्रधानांना हे शक्य होते. पण सध्याच्या मंत्रीमंडळात जेथे गुन्हेगारांची व ४/५ हजार कोटींचा भ्रष्टाचार सहज करणार्‍यांची संख्या मजबूत आहे, ते कुठल्या तोंडाने सैनिकांना सागणार की आमचे संरक्षण करा ? यात भर आहे तत्वहीन राजकारणाची... पण तो माझा विषय नाही.... जाऊदेत....

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Sep 2010 - 1:24 pm | बिपिन कार्यकर्ते

सैनिकाचा व्यवसाय ही एक सामाजिक देवघेव असते. त्याहून जास्त ग्लोरिफिकेशन करू नये.

मला हे विधान खटकले आहे. ...

ग्लोरिफिकेशन करू नये हे काही अंशी / काही दृष्टीकोनातून ठीक आहे. म्हणजे एखाद्याचा आपण देव केला की मग चुका काढताच येत नाहीत, किंवा देव केल्यानंतर त्यांच्या समस्यांकडेही डोळेझाक करता येते. म्हणून अति ग्लोरिफिकेशन / दैवतीकरण नको. इथपर्यंत ठीक आहे. पण 'ते करतात ते काय फार ग्रेट नाही / त्यात काय मोठेसे' अशा भावनेतून असेल तर नक्कीच उथळ विधान आहे असे म्हणावे लागेल.

सैनिकाचा व्यवसाय ही एक सामाजिक देवघेव असते.

या वाक्यातून खरं तर ध्वनित अस होतं आहे की 'सैनिकाचा व्यवसाय ही फक्त एक सामाजिक देवघेव असते.' तसे असल्यास ते ही चूक आहे. केवळ 'जस्ट अनदर प्रोफेशन' या हेतूने हा पेशा स्वीकारणारे खूपच कमी असतात. माझ्या माहितीत काही सैनिक / अधिकारी इत्यादी होते / आहेत. ते जेवढं काम करतात, तडजोडी करतात त्या मानाने त्यांना पैसा मिळत नाही, मान मिळतो पण तो सामान्य जनतेकडून. निवृत्त झाल्यावर 'कोण तुम्ही?'च. तरीही एक काही तरी भावना असते डोक्यात / मस्ती, माज असतो / निष्ठा असते म्हणून लोक हा पेशा पत्करतात आणि निभावतात.

गांधीवादी's picture

17 Sep 2010 - 1:43 pm | गांधीवादी

सहमत
>>सैनिकाचा व्यवसाय ही एक सामाजिक देवघेव असते. त्याहून जास्त ग्लोरिफिकेशन करू नये.
हे असले व्यवसाय करणारे कुठेतरी असतात म्हणूनच आपण रात्री शांत निवांत झोपू शकतो.
सैनिके जे घेतात त्याची किमत कदाचित पैश्यात होईलहि, पण ते जे देतात त्याची किंमंत पैश्यात कशी करणार बुवा, आपल्याला जमेल काय ?
रिस्क प्रत्येक व्यवसायात आहे पण ती रिस्क ज्याने त्याने केवळ स्वताच्या फायद्यासाठी घेतलेली असते.
सैनिके अशी रिस्क स्वताच्या फायद्यासाठी घेतात हे प्रथमच ऐकत आहे. ते रिस्क घेतात लाखो लोकांच्या जीवांसाठी. तुमच्या आमच्यासाठी. हे असले प्रतिसाद मान वर करून लिहिण्यासाठी.

>>असाच धोका पोलादाच्या कारखान्यात काम करणारे कामगार, उंच इमारतीच्या बाहेरून पाळण्यावर बसून रंग लावणे वगैरे कामे करणारे, यांनाही असतो. धोक्याचे प्रमाण काढले तर ते साधारण सारखेच असेल.
शब्दच खुंटले,

नितिन थत्ते's picture

17 Sep 2010 - 3:02 pm | नितिन थत्ते

>>पण 'ते करतात ते काय फार ग्रेट नाही / त्यात काय मोठेसे' अशा भावनेतून असेल तर नक्कीच उथळ विधान आहे असे म्हणावे लागेल

अशी भावना नाही. उंच इमारतीवर रंग लावणार्‍याला न मिळणार्‍या सोयी सवलती सैनिकांना दिल्या जातात. त्यामुळे जी कृतज्ञता असायला हवी तेवढी समाजात आहेच.

पण सैनिकांना कित्ती कित्ती त्रास आणि आपण (म्हणजे आपले सरकार) कित्ती कित्ती करंटे असे भासवून छाती पिटून घ्यायची आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायची गरज नाही इतकेच मला म्हणायचे आहे.

सैन्य सैन्य- व्हेरी गुड व्हेरी गुड
सरकार सरकार - व्हेरी बॅड व्हेरी बॅड

हे सारखे सारखे ऐकण्याचा कंटाळा आला आहे.

बाकी लेखाचा खरा उद्देश सैनिकांची ढाल करून आपल्या नावडत्या राज्यकर्त्यांना नावे ठेवणे हाच आहे आणि त्याविषयी आधीच लिहिले आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Sep 2010 - 3:17 pm | बिपिन कार्यकर्ते

मग ठीक.

बाकी

सैन्य सैन्य- व्हेरी गुड व्हेरी गुड
सरकार सरकार - व्हेरी बॅड व्हेरी बॅड

हे दुर्दैवाने बव्हंशी खरे आहे. बव्हंशी म्हणायचे कारण असे की, "देअर इज नथिंग ब्लॅक ऑर व्हाईट, एव्हरीथिंग इज ग्रे, जस्ट द शेड डिफर्स". बास.

सरकार, ते कोणाचेही असो, तुमाच्या काँग्रेसचे की अजून कोणाचे, पाहिजे तेवढा मान देत नाहीच. आणि याचे खरे कारण भाप्रसे मधील अधिकारी आणि सैन्याधिकारी यांच्यातील चढाओढ हेच आहे. त्यामुळे सत्तेवर कोणता पक्ष याचा काहीच परिणाम नाही.

बाकी वरील लेख / कविता वाचली नाही त्यामुळे त्याबद्दल काहीच भाष्य करत नाही.

सुनील's picture

17 Sep 2010 - 3:26 pm | सुनील

बाकी लेखाचा खरा उद्देश सैनिकांची ढाल करून आपल्या नावडत्या राज्यकर्त्यांना नावे ठेवणे हाच आहे आणि त्याविषयी आधीच लिहिले आहे.

अगदी हेच!

म्हणूनच फक्त कविता दिली असती तर चर्चा वेगळ्या दिशेने गेली असती पण मूळ उद्देश तसा नसावा असे वाटते म्हणून काही तिखट प्रतिसाद आले.

जयंत कुलकर्णी's picture

17 Sep 2010 - 3:35 pm | जयंत कुलकर्णी

//अशी भावना नाही. उंच इमारतीवर रंग लावणार्‍याला न मिळणार्‍या सोयी सवलती सैनिकांना दिल्या जातात. त्यामुळे जी कृतज्ञता असायला हवी तेवढी समाजात आहेच.//

१ उंच इमारतीवर रंग लावणार्‍या माणसावर खालून, वरून, बाजूने, खालून गोळ्यांचा वर्षाव होत नसतो. ( अर्थात युध्दाच्या वेळी. शांततेच्या काळातही त्यांना exersize करावे लागतात त्यातही खूपच धोका असतो). तुलनेने तर जास्तच. रंग देणार्‍या माणसाने योग्य काळजी घेतली तर तो बरीच वर्षे जगू शकतो. इथे काश्मिरमधे बायकांच्या आडून अतिरेक्याने गोळी घातली की खेळ खतम.

२ दुर्दैवाने, कृतज्ञता सोडा, साधा आदरही आपण त्यांना दाखवत नाही. कारण ते विषेश काही करतात हेच आपल्याला मान्य नाही. आहो आपण आपली मुले आपल्यापासून दूर अमेरिकेत राहिली तर त्यांचे काय अमाप कौतुक करतो. यांचे काय? ते काहितरी आपल्यासाठी करताएत, या बद्दल काही वाटण्याचे जाऊदेत, आपण त्यांचे पैसे फेकलेत ना, IT भरून? मग झाले तर असा विचार करणारी असंख्य माणसे भेटली आहेत
मला.

//पण सैनिकांना कित्ती कित्ती त्रास आणि आपण (म्हणजे आपले सरकार) कित्ती कित्ती करंटे असे भासवून छाती पिटून घ्यायची आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायची गरज नाही इतकेच मला म्हणायचे आहे.

सैन्य सैन्य- व्हेरी गुड व्हेरी गुड
सरकार सरकार - व्हेरी बॅड व्हेरी ब////

जे खरं आहे ते ऐकून सच्चा माणसाला त्रास होणारच. पण कंटाळा येऊन चालणार नाही कारण ही आपलीच पापे आहेत.

शेवट्चे चालूदेत. त्यात मी नाही. त्या राजकारणाच्या घाणीत आमच्या शूर आणि प्रामाणिक सैनिकांना ओढू नका आणि ढकलूही नका.

सुनील's picture

17 Sep 2010 - 3:59 pm | सुनील

त्या राजकारणाच्या घाणीत आमच्या शूर आणि प्रामाणिक सैनिकांना ओढू नका आणि ढकलूही नका.
बरोबर! राजकारण कोण करीत आहे? तरुण विजय यांचा लेख आणि त्यावर आधारीत हा काथ्याकूट हे याचे उत्तम उदाहरण आहे.

इन्द्र्राज पवार's picture

19 Sep 2010 - 12:17 pm | इन्द्र्राज पवार

सैनिकी सेवा आणि नागरी सेवा..~~ स्थिती...यावर या संदर्भात चर्चा अपेक्षित आहे....या धाग्याच्या निमित्ताने वा स्वतंत्र धाग्यावर.

इन्द्रा

तुम्चया पहिल्याच वाक्यात तुम्हि सैनिकाला धाल केल्याच म्हन्त्लेल आहे. अहो धाल कशालाहि कर्ता येत नस्त. असो......

मुलात तुमचे मत हे पुर्वग्रह्दुशित आहे.पुर्वग्रह हा कि मि देशावर प्रेम कर्नार्या एकहिन सैनिकला पहिले नहिन म्हनुन ते १ ते २ % च लोक असेन अस्तिल कि ते बलिदान कर्न्यासथिन सैनिक झलेन अस्तिल.

य्हवर तुम्हिन कहिन सन्शोधन केले आहेन का ??????? का फक्त तुमचन कोमन सेन्स :).

कुत्राहिन अनाच्या शोधात रस्ते फिरतो ; अन उन्च उद्दान करनारा ससाना आकाश गवस्तो.
आता तुम्हाला ससान्याच्या उदानामध्ये कुत्र्याचे रस्ते फिर्ने दिसत असेल तर मग .. विचार करा बुवा.

तुम्चिन सैनिक मान्साकद्दुन अपेक्शा काय आहे कि त्यान्नि बिन्पैशचि चौकिदारि करावि का?

आइने मुलाला जन्म घालुन मोथे करन्यातहि तुम्ही देवघेव बघनार का?
कि म्हने तिने स्वताहाच्या म्हातारपनाचा इन्तजाम केला असेल कि.... :(

घरात बसुन दुसर्याच्या बलिदानाच तोलमाप करन्यापेक्शा एक दिवस ते अयुश्य जगुन बघा/करुन बघा
तेच तर हि कविता सग्तेन आहेन पन तुम्हाला ते न दिस्ता जर 'राजकीय पोळी ' वगैरे दिसत असेल तर..............

असो... :)

सुधीर काळे's picture

17 Sep 2010 - 4:59 pm | सुधीर काळे

जय हो!

अविनाशकुलकर्णी's picture

16 Sep 2010 - 10:15 pm | अविनाशकुलकर्णी

कविता वाचून अस्वस्थ झालो..
सुधिर रावांच्या धाग्यात काय जादू आहे? ते नेहमी विचार करायला भाग पाडतात

ता,क...गणेश कविता छान

अविनाश-जी,
ज्या बातमीने, लेखाने, कवितेने मी खूप प्रभावित होतो, खूष होतो, भारावून जातो किंवा कमालीचा अस्वस्थ होतो त्याबद्दलच मी साधारणपणे इथे लिहितो!
आपणही अस्वस्थ झालात त्याअर्थी आपल्या आणि माझ्या स्वभावात कांहींसे साधर्म्य असावे हे नक्की!
आपल्या हृदयाच्या गाभ्यातून आलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

सुनील's picture

16 Sep 2010 - 11:01 pm | सुनील

"बाजारास जावे. रास विकत आणावे."

ही वाक्ये आहेत शिवाजीने आपल्या सैन्यास लिहिलेल्या पत्रातील.

शिवाजी दृष्टा होता. सैन्य रयतेशी कसे वागते, याची त्याला पूर्ण कल्पना होती. पण आपल्या सैन्याने तसे वागू नये, ह्याबाबतीत तो दक्ष होता.

थोडक्यात, सैन्य कुठल्याही देशाचे असो, ते जनतेवर जुलुम करते, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ह्याला अपवाद नाही. हे त्याला ठाऊक होते.

*

नोव्हेंबर २००४. ठिकाण श्रीनगर.

सेनेतील एका अधिकार्‍याने एका दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची बातमी आली. दुकाने धडाधड बंद झाली. शहरात कर्फ्यू लागला. रस्तोरस्ती सैनीक दिसू लागले. लष्कराबद्दलचा राग लोकांच्या नजरेत स्पष्ट दिसून येत होता.

ही ऐकीव/वाचीव गोष्ट नाही. मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे.

*

जवळपास पाच लाख सैन्य (लष्करी + निमलष्करी तुकड्या) गेल्या वीस वर्षांपासून काश्मिरमध्ये आहेत. तरीही लोकांना हे "आपले सैन्य" आहे असे वाटत नसेल, त्यांच्यावर दगडफेक होत असेल तर, केवळ चार-दोन नेते किंवा पाकिस्तानकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही. मूळ दुखणे वेगळेच आहे, हे समजायला हवे.

राजकीय प्रश्नाला राजकीय उत्तरच हवे, सैनिकी नव्हे.

जयंत कुलकर्णी's picture

17 Sep 2010 - 12:15 am | जयंत कुलकर्णी

राजकीय प्रश्नाला राजकीय उत्तरच हवे, सैनिकी नव्हे.
पण राजकारणी घाण करतात, उत्तर काढू शकत नाहीत किंवा काढत नाहीत मग सैनिकांना तेथे मरायला पाठवतात. हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. हल्ली तर कशालाही सैन्य पाठवतात. सैनिक तर काही राजकीय उत्तर काढू शकत नाहीत आणि त्यांनी काढूही नाही. नाहीतर पाकिस्तान होणार. आपण राजकारणी निवडणार आणि सैनिकांच्या व्यवसायातील माणसे मारणार. ( In broader sense). कारण दुर्दैवाने ते त्या व्यवसायात आहेत.

//"बाजारास जावे. रास विकत आणावे."

ही वाक्ये आहेत शिवाजीने आपल्या सैन्यास लिहिलेल्या पत्रातील.

शिवाजी दृष्टा होता. सैन्य रयतेशी कसे वागते, याची त्याला पूर्ण कल्पना होती. पण आपल्या सैन्याने तसे वागू नये, ह्याबाबतीत तो दक्ष होत////

सैन्यात अजूनही हेच शिकवले जाते. त्यात काही विषेश नाही.
खरे तर शिवाजीचाही प्रश्न पूर्णपणे राजकीयच होता. त्याने हे सैन्य इ.इ. उभारायच्या उठाठेवी करायची काही गरजच नव्हती. राजकीय उत्तर सापडले असते की त्याला. जर मनसबदारी स्विकारली असती तर हे पत्र लिहायची त्याच्यावर वेळसुध्दा आली नसती. त्याचा प्रश्न राजकीयच होता हे तुम्हाला श्री नितीन थत्ते यांनी ठरवले तर ते सहज सिध्द करून दाखवू शकतील याची मला खात्री आहे.

//सेनेतील एका अधिकार्‍याने एका दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची बातमी आली. दुकाने धडाधड बंद झाली. शहरात कर्फ्यू लागला. रस्तोरस्ती सैनीक दिसू लागले. लष्कराबद्दलचा राग लोकांच्या नजरेत स्पष्ट दिसून येत होत////

एखादे उदारहण देऊन त्याचे generalization करणे हे चूक आहे.

सुनील's picture

17 Sep 2010 - 7:39 am | सुनील

पण राजकारणी घाण करतात, उत्तर काढू शकत नाहीत किंवा काढत नाहीत मग सैनिकांना तेथे मरायला पाठवतात. हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. हल्ली तर कशालाही सैन्य पाठवतात. सैनिक तर काही राजकीय उत्तर काढू शकत नाहीत आणि त्यांनी काढूही नाही. नाहीतर पाकिस्तान होणार. आपण राजकारणी निवडणार आणि सैनिकांच्या व्यवसायातील माणसे मारणार. ( In broader sense). कारण दुर्दैवाने ते त्या व्यवसायात आहेत.
नक्की काय म्हणायचे आहे ते काहीही कळले नाही.

सैन्यात अजूनही हेच शिकवले जाते. त्यात काही विषेश नाही
किमान साडेतिनशे वर्षांनंतरही अजूनही हेच शिकवले जाते. यातच सर्व काही आले. (तरीही सगळी सैन्ये अजूनही "तेच" करतात)

एखादे उदारहण देऊन त्याचे generalization करणे हे चूक आहे.
गुगलून पहा. असंख्य उदाहरणे सापडतील!

जयंत कुलकर्णी's picture

17 Sep 2010 - 9:46 am | जयंत कुलकर्णी

न समजण्यासारखे त्यात काही आहे असे मला वाटत नाही. किंवा मी ते सांगण्यात कमी पडलो असेन. :-)

शिवाजीचे सोडा. अलेक्झांडरपासून तरी हेच शिकवले जात आहे. तरीही सैन्य हेच करत आहे. पण प्रमाण प्रत्येक सैन्यात कमी जास्त आहे. मला सांगण्यास अभिमान वाटतो की भारतीय सैन्यात हे प्रमाण अत्यंत कमी आहे. आणि साडेतिनशे वर्षे तेच सैनिक लढत नसल्यामुळे हे वारंवार शिकवत आहेत. थोडक्यात हा त्यांच्या शिक्षणाचाच भाग असतो.

एकीकडे त्यांना समाजाचाच भाग समजायचे आणि ते जर इतर समाजातील घटकांसारखे थोडे जरी वागले की त्यांच्याकडून glorious अपेक्षा करायच्या हा दुटप्पीपणा झाला.

आपण जर गुगलवर राजकारणी आणि बलात्कार असे गुगलले तर उरलेले आयुष्य आपल्याला ती पाने वाचण्यात घालवावे लागेल ( अतिशोयक्ती केलेली आहे ). एखाद्या लेखात किंवा प्रतिक्रियेत असे isolated वाक्य टाकल्यामुळे त्याचा परिणाम general होतो हे वेगळे सांगायला नको.

सुधीर काळे's picture

17 Sep 2010 - 7:44 am | सुधीर काळे

ही ऐकीव/वाचीव गोष्ट नाही. मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे.
???

चिगो's picture

16 Sep 2010 - 11:18 pm | चिगो

छान कविता...

सुधीर काळे's picture

17 Sep 2010 - 7:41 am | सुधीर काळे

पाकिस्तानच्या लष्करशहांनी अमेरिकेकडून War against terror या कारणासाठी ११००कोटी (१.१ अब्ज?) डॉलर्स पाकिस्तानला दिले होते त्यातले ३० टक्के हडप केले असा Nuclear Deception मध्ये उल्लेख आहे. त्यावरून मला नेहमी वाटायचे कीं पाकिस्तानी सैनिकांना वाटत असेल कीं हे वरचे लोक पैसे खातात आणि मरायला मात्र सैनिक. पण ही कविता वाचल्यावर भारतीय सैनिकही असा विचार करतो हे समजून मात्र जरा धक्काच बसला.
जयंत कुलकर्णीसाहेब म्हणतात ते पटते कीं हल्ली सैन्य वाटेल तिथे वापरले जात आहे. याबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे.

चार-दोन नेते किंवा पाकिस्तानकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही.
पाकिस्तानचे जाऊ द्या कारण तो तर आपला कट्टर शत्रू बनला आहे. पण हे आपल्या देशाचे नागरिक असलेले चार-दोन नेते देशद्रोही कृती करतात त्यांच्यावर ते "चार-दोन आहेत" तेंव्हांच योग्य ती कृती करून परिस्थिती आटोक्यात आणायला हवी.
बोटचेप्या धोरणाने त्यांना मोकाट सोडल्यास धीटपणा वाढतो आणि मग समस्या मोठी होते!
काश्मीरला स्वातंत्र्य द्यायचा पर्याय यूनोच्या कुठल्याही ठरावात नाही मग तो पर्याय विचारात कां घ्यायचा? आणि असे स्वातंत्र्य द्यायचे असेल तर "अखंड भारता"तील सगळ्या राज्यांना हे मतस्वातंत्र्य द्यावे काय? त्यात पश्चिमेकडील बलुचिस्तानपासून पूर्वेकडील नागालँड-आसामपर्यंत आणि उत्तरेतील काश्मीर-लेह-लडाखपासून दक्षिणेतील तामिळनाडूपर्यंत सारी राज्ये आणावीत. केवळ एकट्या काश्मीरची स्वातंत्र्याची मागणी घटनाबाह्यच आहे. मला तरी हा पंजाबमध्ये जे जमले नाहीं ते काश्मीरमध्ये यशस्वीपणे करायचा पाकिस्तानचा डाव वाटतो!

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Sep 2010 - 9:46 am | llपुण्याचे पेशवेll

काळेसाहेबांशी सहमत आहे. त्या न्यायाने स्वतंत्र महाराष्ट्र झालाच पाहीजे ही घोषणा सुधा घटनाबाह्य अथवा देशद्रोहाची ठरू नये. नाही का? त्या प्रकारचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नागालँड वगैरे किती पूर्वीपासून प्रयत्नशील आहे!

सहज's picture

17 Sep 2010 - 2:15 pm | सहज

भावनांना साद घातली की मग जशी व्हायला पाहीजे तशी चर्चा होत नाही. ही फक्त एक कविता म्हणूनच लिहायला पाहीजे होती. "राजकारण विचार समीक्षा" नको. असो.

कवितेवरुन आठवले की अविनाश धर्माधीकारी यांच्या कारगीलवरील भाषणात उल्लेख आहे, दोन उदाहरणे की जेव्हा ताबडतोब कामावर रुजू व्हा (कारगील युद्धात सहभागी व्हायला)अ सा दोन सैनिकांना आदेश आला व त्याकरता तिकिटाची व्यवस्था करायला एका स्टेशन मास्टरने पैसे मागीतले व दुसर्‍याला पोलीसांनी काही कारणावरुन अडकवले व जायचे असल्यास पैसे मागीतले. वाईट वाटले. निदान सैन्याने आता तरी अशी विशिष्ट व्यवस्था करायला हवी की असे प्रसंग उद्भवणार नाहीत.

२ मिनिट १७ सें पासुन बघणे

सुनील's picture

17 Sep 2010 - 2:37 pm | सुनील

भावनांना साद घातली की मग जशी व्हायला पाहीजे तशी चर्चा होत नाही. ही फक्त एक कविता म्हणूनच लिहायला पाहीजे होती. "राजकारण विचार समीक्षा" नको

हेच म्हणतो.

नुसती कविता दिली असती तर गोष्ट वेगळी पण ते तरुण विजय यांचा लेख इ.इ. ची गरज नव्हती. (आणि त्या लेखावर जर काथ्याकूट टाकलाच तर त्यात ह्या कवितेची गरज नाही).

सुनील-जी,
बाकी लेखाचा खरा उद्देश सैनिकांची ढाल करून आपल्या नावडत्या राज्यकर्त्यांना नावे ठेवणे हाच आहे आणि त्याविषयी आधीच लिहिले आहे.
असे मुळीच नाहीं. हे गृहीत धरून तुम्ही चूक करत आहात. मी तरुण विजय यांचा परिचय त्यांच्याच वेबसाईटवरून करून दिला. यापेक्षा कांहींही जास्त नाहीं. सोबत दिलेला दुवा फक्त त्या कवितेचा carrier होता व त्या लेखावर वेगळा धागा काढायचा मी विचार करत आहे असे आधीच लिहिले आहे.
मला 'भाजपा'चा पुळका अजीबात नाहीं कारण मी कुठल्याही पक्षाचे अंधानुकरण करत नाहीं तर case-by-case evaluation करतो. पण मन मोहन सिंग यांच्यापेक्षा कुणीही बरे असे मला वाटते. त्यांनी सनदी नोकर म्हणून चांगले काम केले, नरसिंह रावांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्र्याचे कामही सुरेख केले, पण ते नेते नसून अनुयायी आहेत असेच माझे मत आहे. याबाबत दुमत होऊ शकेल.
भाजपाचे सरकारही चांगले नव्हते असेच मी म्हणेन. त्यावेळी मी भारतात होतो व वाजपेयींच्या (अ)कर्तृत्वाने चिडून मी त्यांनी राजीनामा द्यावा असे लिहिलेले पत्र टाइम्समध्ये छापले गेले होते. ते मी आपल्याला on request पाठवू शकतो.
लाल बहादुर शास्त्रींची कारकीर्द फारच अल्पकालीन होती त्यामुळे तिचे मूल्यमापन करणे अवघड आहे. पण त्यांनी कणखर निर्णय घेतला होता यात शंका नाहीं. पण इंदिराजींच्या नंतर आपल्या देशाला नेताच मिळालेला नाहीं ही सत्य परिस्थिती आहे. त्या चांगल्या-वाईट कशा का असोत पण निर्णय घेण्याच्या बाबतीत वाघ होत्या.
सध्या सरकार मन मोहन सिंग यांचे आहे. त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून सगळ्यांचे मत घेतले हे योग्यच केले. इथवर सारे ठीक. पण खर्‍या-खुर्‍या नेत्याने सगळ्यांचे ऐकून शेवटी स्वत: निर्णय घ्यायला हवा. "The buck stops here" असे म्हणतात ते यासाठीच! पण मन मोहन सिंग यांनी घेतलेला "सर्वदलीय प्रतिनिधीमंडळ" पाठवायचा निर्णय हा अस्सल 'सनदी नोकारा'चा किंवा passing the buck प्रतीचा निर्णय आहे. या बैठकीनंतर निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांची आणि फक्त त्यांचीच होती आणि आहे. पण ती जबाबदारी ते टाळत आहेत असेच मला वाटते.
माझी आपल्या सरकारबद्दलची मते कांहींही असोत. पण सैनिकाच्या कवितेत मी राजकारण आणले नव्हते!
जनतेला संपूर्ण माहिती नसते हे तर खरेच. पण सरकारचे मूल्यमापन तर जनताच करते व निवडणुकीत मते देते. काँग्रेस सरकार गठ्ठा-मतदानाकडे लक्ष देते आहे असेही मला वाटते. सुनील-जी, तुम्हाला हे माझे मत मान्य नाहीं हे मला माहीत आहे. पण तरीही माझे हेच मत आहे. लगेच मुस्लिम मतपेटीकडे पाहू नका. इथे अनेक गठ्ठा-मतदानाला आकर्षित करणार्‍या पेट्या कसल्या, पेटारेच आहेत. त्यावरून डावपेच चाललेच आहेत. पण त्याबद्दल लिहायची ही जागा नव्हे. इच्छा असेल तर ही मतें मी तुम्हाला 'व्यनी'द्वारा on request पाठवू शकतो.

नितिन थत्ते's picture

17 Sep 2010 - 9:41 pm | नितिन थत्ते

आता मी पंतप्रधानांना एक पत्र पाठवणार आहे.

संरक्षण वगैरे विषयांवर काही निर्णय घेण्यापूर्वी जकार्ताला* कॉन-कॉल लावत जावा व काय करावे हे विचारून घ्यावे.

*आधी काळेकाकांना सुरक्षा परिषदेवर घ्यावे असे म्हणणार होतो पण काळेकाका जकार्ता सोडून भारतात येणार नाहीत :( म्हणून कॉन-कॉल. शेवटी नव्या तंत्रज्ञानाचाही उपयोग व्हायला हवा. :)

कॉन-कॉल म्हणजे काय ते कळले नाहीं! पण त्याची कांहीं गरज नाहीं, कारण मी मनमोहनजींना (अनाहूत) सल्ला देतच असतो! आणि त्यांना अशा सल्ल्याची गरजही आहे.
खरं तर मी सोनियाताईंचा ई-मेल आयडी शोधतोय्. कारण त्यांना सल्ला देणे जास्त आवश्यक आहे. कारण सोनियाताईंना पटले कीं मनमोहनजींनाही लगेच पटेल व मग तो सल्ला (लगेच) कार्यरतही होईल.

नितिन थत्ते's picture

18 Sep 2010 - 8:28 am | नितिन थत्ते

>>कॉन-कॉल म्हणजे काय ते कळले नाहीं!

Conference Call (ConCall)

सुधीर काळे's picture

18 Sep 2010 - 8:32 am | सुधीर काळे

धन्यवाद!

गांधीवादी's picture

18 Sep 2010 - 9:04 am | गांधीवादी

>>त्यांना सल्ला देणे जास्त आवश्यक आहे. कारण सोनियाताईंना पटले कीं मनमोहनजींनाही लगेच पटेल व मग तो सल्ला (लगेच) कार्यरतही होईल.
मनमोहनजींना एका वाक्यात समजणारी भाषा केवळ त्यांना(च) येते असे ऐकून आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Sep 2010 - 9:43 am | llपुण्याचे पेशवेll

काळेसाहेब छान कविता. इस्रायली सैनिकाचे मनोगत वाचायला मिळेल कुठे ऑनलाईन?
बाकी, सैनिक पोटार्थी असतात असली बाष्कळ विधाने मस्तं पुण्या मुंबईत बसून तंगडी हाणणार्‍यांनी खुषाल करावीत त्याची दखल घेण्याची गरज देखील मला वाटत नाही. कुलकर्णी साहेबांनी बरेच चांगले उत्तर दिलेही आहे.

नरेश धाल's picture

17 Sep 2010 - 4:28 pm | नरेश धाल

असली बाष्कळ विधाने मस्तं पुण्या मुंबईत बसून तंगडी हाणणार्‍यांनी खुषाल करावीत
तिकदे थिक असेल, पन आम्च्य नाश्कात जर असे कोनि बदबदले तर त्यचिच तंगडी तोद्लि अस्ति.

सुधीर काळे's picture

17 Sep 2010 - 10:51 am | सुधीर काळे

यासाठी नितिनला विचारावे लागेल! माझ्या वाचनात हे आलेले नाहीं.
तसेच पुचाट नसलेले, सत्तेची दलाली न करणारे, इंचाइंचाने माघार न घेणारे आणि कर्तव्यदक्ष सरकार असलेल्या इस्रायलच्याही सैनिकाची स्थिती याहून वेगळी नसते.

नरेश धाल's picture

17 Sep 2010 - 4:22 pm | नरेश धाल

थत्तेनि एक दिवस सैनिकत भरति हुन दाखवावे, मि एक दिवस पेन्टिन्ग कर्तो.
ते भरति झले कि मग सामाजिक देवघेव करु, आनि मग ग्लोरिफिकेशन सुद्धा कर्नार नहि.

नितिन थत्ते's picture

17 Sep 2010 - 4:36 pm | नितिन थत्ते

माझे सगळे प्रतिसाद वाचून मग विधाने करावीत.

नरेश धाल's picture

17 Sep 2010 - 4:55 pm | नरेश धाल

तुमि पण एक्दा सैनिकि आयुश्य जगुन बघावे मग अशि विधाने करावित.

मितभाषी's picture

18 Sep 2010 - 12:01 pm | मितभाषी

आजकाल जीडी भरतीसाठी ३०-४० हजार रुपये घेवुन भरती केले जाते. माझ्या परिचयातील अनेक जण कर्जावु पैसे घेवुन सैन्यात भर्ती झाले आहेत. असे सैनिक युध्द झाल्यास साथीदारांचे प्राण वाचवण्याऐवजी एखाद्या घळीत, कपारीत नाहीतर कड्याच्या आडोश्याला लपुन बसतील. कारण त्यांचा भरती होण्याच्या सुरुवातीपासुनच गैर मार्गांचा अवलंब केलेला आहे, त्यात भारतमातेची सेवा वगैरे काहीही नव्स्ते. सहा-बारा महिन्यान्नी घरी येताना मी जास्तीत जास्त किती पैसे घेवुन येइन आणि कर्जाचे हप्ते भरीन याचीच त्याला काळजी असते.

अर्थात देशासाठी घरावर तुळशीपत्र ठेवनारेही भरपुर आहेत त्याबद्दल दुमत नाही.

सुधीर काळे's picture

18 Sep 2010 - 7:56 pm | सुधीर काळे

भावश्या-जी आणि वेताळ-जी,
तुमचा प्रतिसाद वाचून व आपल्या शूर जवानांबद्दलचे विचार वाचून वाईट वाटले. एखादे उदारहण देऊन त्याचे generalization करणे हे चूक आहे. हे जयंतराव कुलकर्णींचे वाक्यही काळजाला भिडले!
साध्या सैनिकाला काय 'पैसा करता' येतो कुणास ठाऊक? पैसा करतात ते वरिष्ठ अधिकारी ज्यांच्या हातात काय विकत घ्यायचे हे निवडण्याचा व त्या वस्तूच्या खरेदीची ऑर्डर काढण्याचा अधिकार आहे किंवा तयार माल 'डिस्पॅच'ला तयार झाल्यावर तपासणी करून तो स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आहे. बाकीच्यांना कुठे मिळते चरायला?
ही व्यथा एका तरुण सैनिकाची आहे ज्याला असले 'creamy' अधिकार अजून मिळालेले नाहींत.
एका ले.ज.बरोबर झालेले माझे बोलणे (एकादे वेळी पुनरुक्ती असेल) मी पुन्हा सांगतो. ते आमच्या कंपनीत मेंटेनन्सचे ट्रेनिंग द्यायला आले होते. 'टहलका'नंतरचे दिवस होते. त्यांना मी विचारले कीं अशी भ्रष्टता वरच्या अधिकार्‍यांमध्ये असताना तुम्ही जवानाला जीव पणाला लावायला कसे उद्युक्त (motivate) करता?
ते म्हणाले कीं जेंव्हां युद्धाला तोंड लागते व गोळीबार व बाँब पडू लागतात तेंव्हां जवानांच्या डोक्यात आपला व आपल्या डावीकडील-उजवीकडील जवानाला कसे सुरक्षित ठेवायचे हाच विचार प्रमुख असतो व त्यात तो मग्न असतो. म्हणजे मरण समोर दिसत असतानासुद्धा तो आपल्याबरोबरच आपल्या सहकार्‍यांच्या सुरक्षिततेचाही विचार करत असतो.
असो. आपले प्रतिसाद वाचल्यावर ही कविता करणार्‍या जवानाचे वैफल्य आणखीच प्रकर्षाने जाणवले.
We get a government we deserve हे वाक्य ऐकले होते. आपल्या जवानांबद्दल असेच विचार जनतेने बाळगायला सुरुवात केल्यास कांहीं वर्षांनी We get armed force we deserve ही म्हणसुद्धा प्रचलित होईल.

नितिन थत्ते's picture

18 Sep 2010 - 7:59 pm | नितिन थत्ते

हा हृदयद्रावक धागा केव्हा द्रवित (liquidate) होणार?

जयंत कुलकर्णी's picture

18 Sep 2010 - 9:46 pm | जयंत कुलकर्णी

माझ्या समोर असलेल्या ग्लासातल्या द्रवात आत्ताच द्रवित केला !
:-)

सुधीर काळे's picture

19 Sep 2010 - 9:53 am | सुधीर काळे

जयंतराव,
आपल्या ग्लासात 'काय' आहे त्यावरून हा धागा किती वेळात dissolve/liquidate होईल हे ठरेल!

नितिन थत्ते's picture

19 Sep 2010 - 10:01 am | नितिन थत्ते

धागा इंचा इंचाने खाली गेला की काळेकाकाच प्रतिसाद देऊन तो वर आणतात.

प्रतिसाद बंद झाले कीं आपोआपच होईल!

नितिन,
हा फारच हलक्या प्रतीचा आरोप आहे. आता खरं तर तूच Liquidate करण्याचा schedule विनाकारण विचारलास त्याला मी फक्त उत्तर दिले. आता लिहितोय् तेही तुझ्या अनावश्यक (व चुकीच्या) अभिप्रायाला उत्तर आहे. साधारणपणे मी फक्त प्रतिसादाला उत्तर देतो. (फक्त 'फसवणूक' मालिका अपवाद. ते भाषांतर असल्याने मूळ लेखकाच्या विचारांबाहेर मला भर घालावीशी वाटे तेंव्हांच मी स्वतःहून प्रतिसाद लिहिले.) आपणहून उगीच लेख 'वर' आणण्यासाठी नाहीं. (पुन्हा "प्रतिसाद seriously घेतल्या"चा आरोपही नको करूस!)
खरं तर मी माझ्या लेखावरच्या प्रतिक्रिया "माझे लेखन"वरच पहातो व तिथे तर 'धागा कुठे आहे?' हे कळतही नाहीं.
तन्गो-जी आणि नरेश धाल-जींच्या प्रतिसादानंतर तुझे 'माहितीपूर्ण' प्रतिसाद बंदच झाले आहेत. अवांतर प्रतिसादच दिसले!

जयंत कुलकर्णी's picture

19 Sep 2010 - 4:18 pm | जयंत कुलकर्णी

जर लेखनावरून माणसाची ओळख थोडी जरी पटत असेल तर मला नाही वाटत श्री. काळे असले काही उद्योग करतील.

मला वाटते श्री. नितीन यांचा काहितरी गैरसमज झाला असावा. अर्थात श्री काळेसाहेब मला वाटते तुमच्या प्रतिक्रियेतील
//तन्गो-जी आणि नरेश धाल-जींच्या प्रतिसादानंतर तुझे 'माहितीपूर्ण' प्रतिसाद बंदच झाले आहेत. अवांतर प्रतिसादच दिसले!// हे वाक्यही मला अनावश्यक वाटले.

आता तुम्ही दोघेही असे म्हणू शकता की यांना काय करायचे आहे ? पण मला रहावले नाही म्हणून लिहिले.

या आगाऊपणाबद्दल क्षमस्व.

साधामाणूस's picture

21 Sep 2010 - 10:24 pm | साधामाणूस

दैनिक हिन्दुतील "ही"("http://www.thehindu.com/news/national/article738454.ece")बातमी वाचून उगीचच वाटले की श्रीमती पुष्पा यान्चे काहीतरी चुकले असावे. त्याना कळायला हवे होते की, पतीला पाच पदके मिळाली यात विशेष ते काय? ती सारी देवघेव तर होती. उगीचच गौरवीकरण करत बसल्या बिचार्या. सरकार देत असलेली ऐन्शी रुपयान्ची 'गलेलठ्ठ' पेन्शन घेवून गप्प बसायचे सोडून कोर्टात जात बसल्या.

सुधीर काळे's picture

2 Oct 2010 - 10:54 pm | सुधीर काळे

पुष्पा वांती यांची केस आणखी अभ्यास करण्यासारखी आहे. त्यांच्याबद्दल अधीक माहिती शोधताना http://veteranpjschatwalspeaks.blogspot.com/ ही आणखी एक लिंक गूगलवर दिसली.

गांधीवादी's picture

1 Nov 2010 - 9:29 am | गांधीवादी

>>ते म्हणतात कीं दिल्लीच्या निधर्मी सुलतानशाहीतील सत्तेच्या दलालांच्या दृष्टीने एक सैनिक हा सुद्धा एक कारकून (बाबू), एक साधा-सुधा कर्मचारीच असतो, ज्याची "एक-पद-एक-सेवानिवृत्तीनंतरचा-पगार" (पेन्शन) अशी साधी मागणीही पुरी होत नाहीं. पण हेच राजकीय नेते स्वतःचे पगार एका क्षणात तिप्पट करून घेतात. वर मीडियासुद्धा या सैनिकालाच झोडत असते.

आदर्श सोसायटीत सदनिका असलेल्यांच्या यादीत अशोक चव्हाण यांच्या सासूबाई आणि इतर दोन नातेवाइकांची नावे असल्याचे उघड झाले आहे.

सैनिकांना जर समजले कि आपल्या पश्चात आपली घरे सुद्धा लाटली जातात, तर त्यांच्या मनोधीर्याचा कसा चुथडा होत असतील, ह्याचा विचार करून डोळे पाणावले*.

--------------------------------------------------------------------------------------------------------
हल्ली 'डोळे पाणावले' हा वाक्यप्रचार खूप स्वस्त करून टाकण्यात आला आहे.

गांधीवादीसाहेब, धन्यवाद! पण अशोकराव चव्हाण हे हिमनगाचे (चुकून) दिसलेले वरचे टोक आहे (Tip of the iceberg)! मुख्य गाभा पाण्याखाली असून तो कदाचित् कधीच बाहेर येणार नाहीं.
आता अशोकरावांना गादी सोडायला लागली/लावली तर ते इतरांची (याच केसमधली) कुलंगडी बाहेर काढायला टपलेलेच आहेत. त्यात विलासराव आणि सुशीलकुमार शिंदेंचेही नांव आज वाचले. आता सगळी काँग्रेसी नेत्यांची प्रभावळच यात सामील असेल तर 'ताईसाहेब'.....
पर्याय १: अशोकरावांना गादीवर कायमचे स्थान देतील यात शंका नाहीं. झाकली मूठच झाकलेलीच बरी!
पर्याय २: त्यांनाही दिल्लीला नेतील!

पण राजकारणी नेतृत्वाला आज-काल "मी चुकलो" एवढेच सांगून भागत नाहीं, तर मी चुकलो असेन(!), पण तुम्ही (सारे)ही कसे माझ्यासारखेच 'धुतल्या' तांदळासारखे स्वच्छ आहात" हे सांगितले तरच संपूर्ण पापक्षालन होते.
.....................................................
चीन आपला शत्रू नं. १ असला तरी तिथल्या राज्यकर्त्यांची एक गोष्ट मला मनापासून आवडते. ती म्हणजे दर ३-४ महिन्यांनी सुमारे १०० भ्रष्टाचारी नेत्यांना व इतर नागरिकांना firing squad तर्फे गोळ्या घालून ठार मारण्यात येते. आपल्याकडेही ही प्रथा सुरू व्हायला हवी. एकादे सुके जळेल त्यात, पण ही सार्वजनिक जीवनाला पोखरणारी कीड तरी नष्ट होईल.

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 10:13 am | नितिन थत्ते

जे कोणी यात गुंतलेले असतील त्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे. घटनेबाबतचा संताप नुसता चव्हाणांचा राजीनामा मिळवण्यापुरता सीमित असू नये. यात तर आपल्या 'व्हेरी बॅड व्हेरी बॅड' राजकारण्यांबरोबरच 'व्हेरी गुड व्हेरी गुड' लष्करी अधिकारीही गुंतले आहेत अशी माहिती पुढे आली आहे. (अमुक सिव्हिलिअन्सना फ्लॅट देण्यासाठी लष्करी सेवेत असण्याच्या अटीतून सूट द्यावी अशी शिफारस माजी लष्करप्रमुखांनी केल्याचे काल एका वृत्त वाहिनीवर दाखवीत होते).

अवांतर:
>>चीन आपला शत्रू नं. १ असला तरी तिथल्या राज्यकर्त्यांची एक गोष्ट मला मनापासून आवडते. ती म्हणजे दर ३-४ महिन्यांनी सुमारे १०० भ्रष्टाचारी नेत्यांना व इतर नागरिकांना firing squad तर्फे गोळ्या घालून ठार मारण्यात येते. आपल्याकडेही ही प्रथा सुरू व्हायला हवी. एकादे सुके जळेल त्यात, पण ही सार्वजनिक जीवनाला पोखरणारी कीड तरी नष्ट होईल.

हे वाचून अतीव दु:ख झाले. काय आवडते ते कळले नाही.
१. दर ३-४ महिन्यांनी असे करतात म्हणता? दर ३-४ महिन्यांनी करायला लागते म्हणजे कीड नष्ट होतच नाही असे दिसते.
२. दर ३-४ महिन्यांनी सुमारे १०० च भ्रष्टाचारी सापडतात का?
३. १०० मध्ये 'एखादे' सुके जळत असेल की ९९ सुकी जळत असतील हे कसे समजणार?
४. जळणारा एखादा सुका म्हणजे सुधीर काळे नाही तोपर्यंत ही प्रथा आवडणे शक्य आहे. मला तो तसा असू शकतो याची फार भीती वाटते.

(भयभीत)

गांधीवादी's picture

1 Nov 2010 - 10:42 am | गांधीवादी

>>३. १०० मध्ये 'एखादे' सुके जळत असेल की ९९ सुकी जळत असतील हे कसे समजणार?

भ्रष्टाचार्याला 'भ्रष्टाचारी', गुन्हेगाराला 'गुन्हेगार', निष्पाप्याला 'निष्पाप' असे काटेकोरपणे सिद्ध करता येऊ शकता येणारा असा कोणताच कायदा, योजना अस्तित्वात नाही ?

जर ह्याचे उत्तर 'नाही' असेल तर
एका सामान्य माणसाने ह्या लोकशाहीच्या दिखावी डोलार्यावर का विश्वास ठेवावा ?

आणि ह्याचे उत्तर 'होय' असेल तर,
तर त्याची अंमलबजावणी करून गुन्हेगारांना सजा देण्यात कसली भीती ?

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 11:00 am | नितिन थत्ते

काटेकोरपणे (conclusively prove) सिद्ध करणे जगात अस्तित्वात नाही. देहांताच्या शिक्षेसंबंधी कायद्यात Beyond Reasonable Doubt अशी सिद्धतेची कल्पना आहे. तितपत सिद्ध करणे शक्य असते. पण दर तीन महिन्याला १०० लोकांना Beyond Reasonable Doubt दोषी ठरवले जात असेल तर ती सिस्टिम कशी असेल याची कल्पना मी करू शकतो.

एकादा सुधीर काळे गेला तरी मला चालेल! शप्पत!!