समरमध्ये इथे, म्हणजे अमेरिकेत, फार्मर्स मार्केट नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे जागोजागी आठवड्याचा बाजार भरतो. आम्ही सबर्बमध्ये राहतो, खरेदी सुपरमार्केटमध्ये करतो. त्याऐवजी एखाद्या शनिवारी किंवा रविवारी सकाळी शहरांमध्ये जागोजागी आसपासच्या शेतांतून येणारा ताजा भाजीपाला व फळं विकण्यासाठी शेतकरी व मळेवाले येतात. खरेदीसाठी भारतीय व चिनी लोक तसेच ऑर्गॅनिक व फ्रेश खाण्याची हौस असलेले अनेक अमेरिकन तिथे येतात. या बाजारातून नुसता फेरफटका मारणे हादेखील अतिशय उल्हसित करणारा अनुभव असतो.
परवाच आमच्या इथल्या भाजीबाजारात एका अनोळखी अमेरिकन बाईशी माझे बोलणे झाले. भाजी निवडताना "तो पलिकडचा भोपळा इथे देता का?" "घेवडा फार छान आहे नाही?" "तुमच्याकडे कसा करतात" इत्यादी झाल्यावर तिने मला विचारले,
"तुम्ही हिंदू आहात, हो ना?" आता तसं म्हटलं तर मी कुठलाच धर्म रूढार्थाने पाळत नाही. म्हणून मी म्हटले,
"नाही, मी भारतीय आहे"
"पण भारतीय म्हणजेच हिंदू ना?" तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसले.
"हिंदू हा धर्म आहे. जसे ख्रिश्चन, मुस्लीम तसेच हिंदू. खूपसे भारतीय हिंदू असतात. पण इतर धर्माचेही अनेक लोक भारतात राहतात." मी म्हटले
नवीन मिळालेल्या ज्ञानाने तिचा गोंधळ उडालेला दिसत होता. खरे तर भारतीय या विषयावर एखादे लघु व्याख्यानही झोडायला मला आवडले असते. पण स्थळ काळ अनुकूल नव्हते.
आणखीन असाच एक दुसरा अनुभव.
इथल्या एका लायब्ररीत मला काही हिंदी पुस्तकं बघायची होती. लायब्ररीयनने सांगितलं की "या इथून पलिकडे परदेशी भाषांचा विभाग आहे. तिथे तुम्हाला "हिंडू" भाषेतली पुस्तकं मिळतील." तिथेही मला तिचं हिंदी भाषा व हिंदू धर्म या बाबतीत थोडंसं प्रबोधन करावं लागलं. सगळे हिंदी भाषिक हिंदू नसतात, सगळे हिंदू हिंदी बोलत नाहीत, आणि सगळे भारतीय हिंदू किंवा हिंदीभाषिक नसतात हे समजावून सांगायला थोडे कष्ट घ्यावे लागले.
तसे बघितले तर इंडियन शब्दाचे मूळ हिंदू शब्दाच्या जवळच जाते. सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे ते हिंदू आणि त्या प्रदेशाचे नाव हिंद किंवा हिंदुस्तान. सिंधूचं इंडस रिव्हर झालं तसं हिंदचं इंडिया झालं. त्यात हिंदी हे भाषेचं नाव त्याच मुळांमधून आलेलं. मात्र आजच्या काळात हिंदू शब्दाने धर्म सूचित होतो, तर भारतीय शब्दाने भारतावर निष्ठा असणारे सर्वधर्मी नागरिक सूचित होतात.
भारतीय समाजाशी इतका संपर्क येऊनही परदेशातल्या लोकांमध्ये इतक्या मूलभूत बाबतींमध्ये गोंधळ असू शकतो, याचं आश्चर्य वाटलं. वरील प्रसंगांमध्ये शब्दांमधल्या साम्यामुळे व अज्ञानामुळे हे झाले असावे, त्यामुळे मला त्यांचा राग आला नाही. मात्र आपला समाज, आपली संस्कृती, आपला देश, आपली ओळख (आयडेंटीटी) याबद्दल आपण जिथे राहतो त्या परदेशी समाजात जास्त अवेअरनेस असावा असे मनापासून वाटते. तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का?
प्रतिक्रिया
9 Sep 2010 - 11:24 am | llपुण्याचे पेशवेll
आयला मला वाटलं होतं अजून एक ३००+ वाला धागा आहे.
(रुढार्थाने धर्म पाळणारा) पेशवे
9 Sep 2010 - 11:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मिसळपाववर स्वागत (म्हणजे पहिलाच धागा म्हणून स्वागतप्रपंच)!
इंग्लंडात मला बराच वेगळा अनुभव आला आहे. इंग्लंडात साधारण ५-७% लोकं 'इंडीयन' (म्हणजे ब्रिटीश इंडीयातले, भारत+पाकीस्तान+बांग्लादेश) आहेत. त्यामुळे बर्याच लोकांना भारताबद्दल बेसिक माहिती असते, जसं हिंदू हा धर्म आहे, हिंदी (आणि बांग्ला) या भाषा आहेत इत्यादी. माझ्या काही मित्रांना इलिफंड गॉड, मंकी गॉड माहित होते हे पाहून खरंतर मलाच लाज वाटली. कारण नवरात्राला बंगालमधे दुर्गापूजा म्हणतात यापुढे मला दुर्गापूजेबद्दल काहीच माहिती नव्हती/नाही.
माझ्या गोर्या, ब्रिटीश अॅडव्हायझरला मराठी भाषेचं नाव माहित होतं, भारतात ती कुठे बोलली जाते, साधारण किती लोकं मराठी बोलतात याचीही कल्पना होती हे पाहून मलाच चक्कर येणं बाकी होतं. त्याच्या मुलाचा बेस्ट फ्रेंड मराठी असल्यामुळे ही माहिती त्याला होती. (नशीब, आता मला मोदक करायला शिकव म्हणाला नाही तो!)
म्हणे, साधारण १९६० च्या दशकात बरेच 'भारतीय' तिकडे गेले, जेव्हा व्हीजाचीही गरज भासत नसे. त्यामुळे इंग्लंडात तुम्ही म्हणता आहात तसा अनुभव नाहीच.
9 Sep 2010 - 11:55 am | वेताळ
असे नवीन अनुभव सांगत चला. नवीन माहिती मजेशीर असते.
9 Sep 2010 - 11:55 am | अभिषेक पटवर्धन
माझा अनुभव थोडासा वेगळा आहे. म्हणजे हा अनुभव एका भारतीया बद्दलचा आहे. मी दुबईत रहातो. आता युअई हा भारताबाहेरचा सर्वाधिक हिंदु लोकसंख्येचा देश आहे. भारतिय आणि पाकिस्तनी मिळुन एकुण लोकसंख्येच्या ५०-६०% आहेत. तेव्हा अशा देशातला अनुभव.
माझ्या ओफीसजवळ एक हाय-फाय भारतिय रेस्टॉरंट आहे. जाता येता तिथे काम करणारा एक माणुस मराठी बोलतो हे मी ऐकलं. एक दिवस न राहवुन मी त्याला तु मराठी आहेस का अस विचारलं, तर हा पठ्ट्या मला म्हणला कि मी मुस्लिम आहे. मी त्याला म्हणालो की मी तुला मराठी बोलताना ऐकलय आणि मी पण मराठीच आहे. त्याने मला परत एकदा तो मुस्लीम असल्याचं सांगितलं. यावर मी त्याला त्याचा धर्म नाही, भाषा कोणती अस विचारतोय अस म्हणालो. शेवटी एकदाचं आपल्याला मराठी येत असल्याचं त्याच्या तोंडातुन निघालं. तरी पण शेवटी जाता जाता आपण कोकणी मुसल्मान असल्याची पुस्ती त्याने जोडलीच.
आता याला काय म्हणालं? माझ्या स्वतापुरतीतरी हिंदु ही भारतीय, मराठी आणि हिंदु यातली शेवटची ओळख आहे. (ती या तिन्ही मधे सर्वात कमी दर्जाची आहे असा याचा अर्थ होत नाही)
ईतर मिपाकरांना काय वाटतं या बद्दल?
9 Sep 2010 - 3:06 pm | नगरीनिरंजन
याचं कारण मराठी असणे आणि हिंदू असणे यात आपणच करीत असलेली सरसकट गल्लत. बहुतेकवेळी मराठी माणसाचं, मराठी बाण्याचं, मराठी पिंडाचं वर्णन करताना लोक (काही प्रथितयश लेखकही) हिंदू सणांचा, हिंदू चालीरीतींचाच उल्लेख करताना दिसतात. 'गणपती बाप्पा मोरया' अशी आरोळी न ठोकणारा माणूस मराठी असू शकतो की नाही?
सत्यनारायणाचा तीर्थप्रसाद न खाणारा माणूस मराठी असू शकतो की नाही? 'मराठी माणूस' असं म्हटल्यावर अशी माणसं आपल्याला अभिप्रेत असतात?
9 Sep 2010 - 11:59 am | वेताळ
आपली मराठी वेटर म्हणुन ओळख करुन द्यायला तो लाजत असेल.
9 Sep 2010 - 1:20 pm | अवलिया
अपेक्षाभंग !
बाकी त्या बाईला जे कळले ते अनेकांना कळले नाही. आश्चर्यच नाही का ?
9 Sep 2010 - 8:35 pm | विकास
बाकी त्या बाईला जे कळले ते अनेकांना कळले नाही. आश्चर्यच नाही का ?
यात "अनेकांना कळले नाही" च्या ऐवजी "अनेकांना कळत नाही" असे म्हणायला हवे होते. :-)
बाकी या लेखनाच्या संदर्भात मला माझेच "ओळख" हे लेखन आठवले...
तसेच हिंदू असणे/नसणे यावरून ही चर्चा आठवली.
त्या व्यतिरिक्त २-३ वर्षांपूर्वी एकदा एका आंतर्राष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी संयुक्त राष्ट्र संघात* जाण्याचा योग आला होता. तेथे देखील एक पूर्व युरोपिय देशातील बाई तिच्या पाण्यावरील प्रेझेंटेशनमधे भारतीयांचे नाव घेताना, "हिंदू"च म्हणत होती. नंतर समजले असे म्हणणारे इतर काही देशातील नागरीकही आहेत.
10 Sep 2010 - 7:59 am | आमोद शिंदे
दोन्ही चर्चा वाचल्या. मस्त आहेत. माझाही समज बरेच दिवस हिंदू हा धर्म नसून विचारपद्धती आहे वगैरे असाच होता. परंतू त्यावर अधिक विचार केल्यावर तो फोल आहे असे वाटू लागले आहे.
ह्याविषयी माझी एक बेसिक शंका आहे. भारतातील संस्कृतीशी एकजीव असलेले अनेक मुसलमान/ख्रिश्चन असे जगभरात आहेत. तुमच्या व्याख्येने त्यांनाही आपण हिंदूच म्हणायची गरज पडते आणि तिथे ही व्याख्या तोकडी पडते. तुम्ही दिलेल्या चर्चेत श्री.धनंजय ह्यांनी हाच मुद्दा सुरेख मांडला आहे. त्यावर तुमचा प्रतिसाद वाचण्याची इच्छा आहे.
10 Sep 2010 - 10:41 am | शहराजाद
सहमत
10 Sep 2010 - 8:04 pm | विकास
विस्तृत उत्तर तुमच्या पुढील पानावरील प्रतिसादात दिले आहे. मला वाटते त्यात सर्व मुद्दे येतात.
माझाही समज बरेच दिवस हिंदू हा धर्म नसून विचारपद्धती आहे वगैरे असाच होता. परंतू त्यावर अधिक विचार केल्यावर तो फोल आहे असे वाटू लागले आहे.
नक्की काय आणि कसा विचार केलात?
तुमच्या व्याख्येने त्यांनाही आपण हिंदूच म्हणायची गरज पडते आणि तिथे ही व्याख्या तोकडी पडते.
गरज कशाचीच पडत नाही. "हिंदू" शब्दाची व्याख्या केली याचा अर्थ उद्या कोणी मुस्लीम/ख्रिश्चनच कशाला अगदी निधर्मी असला तर त्याला जाऊन "तू हिंदूच" असे छळण्याचा काही प्रकार नाही आहे. भारतापुरते केवळ भारतीय म्हणायची आणि असण्याची आहे. मात्र या चर्चा लेखकास जो अनुभव आला आहे, जो येथील इतर काहींना आला आहे, जे मी देखील पाहीले आहे त्यावरून हिंदू हा शब्द स्थलदर्शक आहे हे देखील समजू शकते. त्यामुळे माझ्या मते हा वाद हा हिंदू धर्माची व्यापक व्याख्या करत सगळ्यांना सामावून घेणे अथवा "हिंदू " शब्द केवळ रिलीजन या कोत्या अर्थानेच आहे असे सारखे सांगत त्याला कमी करत अजून धार्मिक वाद वाढवण्यास मदत करणे यातील आहे. माझा पक्ष हा पहीला आहे... :-)
9 Sep 2010 - 1:26 pm | यशोधरा
मला आत्तापर्यंत कोणत्याच परदेशात असे अनुभव आलेले नाहीत. खरं पाहिलं तर,सहसा कोणालाच असे अनुभव फारसे येत नाहीत, असा माझा अनुभव आणि मत आहे! :P
9 Sep 2010 - 1:28 pm | समीरसूर
कुणी अगदी अमेरिकेत देखील आपल्याला 'तुम्ही हिंदू आहात काय?' असे विचारले तर 'होय मी हिंदू आहे आणि मी भारतीय आहे' अशी ओळख करून देण्यात चूक काय? नंतर भारत हा सर्व धर्मांना एकजूटीने वागवणारा; सगळ्या धर्मांचा आदर करणारा देश आहे; तिथे हजारो भाषा बोलल्या जातात आणि तरीही सगळे सुरळीत चालते इत्यादी शिक्षण आपण देऊ शकतो. पण त्या आधी आपण हिंदू आहोत हे मान्य करण्यात कमीपणा का वाटावा?
माझ्या मते मी जर त्या बाईच्या जागी असतो तर मला विचारलेल्या प्रश्नाचं सरळ उत्तर मिळालं नाही म्हणून वाईट नक्कीच वाटलं असतं. आपल्या पहिल्या बाणेदार उत्तराने समोरच्या भारताविषयी तुलनेने कमी ज्ञान असणार्या परदेशी व्यक्तीचा जर गोंधळ उडणार असेल आणि त्या व्यक्तीच्या मनात कदाचित थोडी नाराजी देखील निर्माण होणार असेल तर मग असले 'बाणेदार' चित्रपटीय उत्तर देण्यात काय हशील?
संभाषण कुठल्याही दृष्टीकोनातून यशस्वी करायचे असेल (आणि ते ही अनोळखी व्यक्तींमधले) तर आदर्शवाद थोडा बाजूला ठेवून आपण प्रत्यक्षतेच्या पातळीवर येऊन संभाषण फुलवणे आणि मग आपले म्हणणे मांडणे उचित नाही का?
करण जोहरछाप चित्रपटांमधली इंग्रजाळलेली भारतीय पात्रे विकसित देशातील ऐषोआराम भोगतांना उसने देशप्रेम दाखविण्यासाठी असली उत्तरे देतात हे पाहिलेले आहे पण प्रत्यक्षात अशी 'बाणेदार' उत्तरे कदाचित मने दुखावू शकतात.
आणि परदेशातही आपल्याला मराठी माणूस भेटल्यावर जितका आनंद होतो तितका पंजाबी माणूस भेटल्यावर होतोच असे नाही.
9 Sep 2010 - 1:35 pm | परिकथेतील राजकुमार
समीरशेठ आपण भवतेक लेखकाचे नाव निट वाचले नसावेत :)
माझा अंदाज बरोबर असेल तर नाव वाचल्यावर आणि समजुन घेतल्यावर आपल्याला लेखनामागचा उद्देश लक्षात येईलच.
9 Sep 2010 - 2:10 pm | समीरसूर
परासाहेब,
मी नाव वाचले. ते मुस्लिम आहे की हिंदू हा विचार मी केला नाही. माझे म्हणणे एवढेच होते की हिंदू असो किंवा मुस्लिम किंवा शीख किंवा येशूभक्त (किंवा ज्यू, जैन, बौद्ध....) किंवा कुणीही असो; आपण आपला धर्म सांगतांना लाजायचे कशासाठी. इथे हिंदू मी एक उदाहरण म्हणून वापरलेले आहे. "तुम्ही हिंदू आहात का?" या प्रश्नाला तितकेच साधे आणि सरळ "नाही मी मुस्लिम आहे आणि भारतीय आहे" असे सांगणे अजिबात चूक नसावे. नंतर आपण शिकवणी घेऊ शकतोच पण आधी मूळ प्रश्नाला व्यवस्थित उत्तर देणे उचित आहे असे मला वाटते.
लेखामागचा उद्देश लक्षात आला नव्हता...
कोकणी मुसलमान हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. डॉ. झाकीर नाईक नावाचा एक इसम सध्या सगळीकडे व्याख्याने देत फिरत असतो. मी पीस टीव्हीवर याची बरीच व्याख्याने ऐकली आहेत. कटाक्षाने इतर धर्मांना कमी लेखणे आणि आपल्या धर्माचे 'स्तोम' माजविणे असले धंदे हा माणूस कायम करत असतो. तो मुस्लिम राष्ट्रांमध्ये खूप लोकप्रिय आहे असे देखील ऐकीवात आहे. विशेष म्हणजे तो कोकणी मुसलमान आहे. म्हणजे तसं पाहिलं तर मराठीच आहे पण कुठेही त्याला ही (दुसरी कुठलीच) ओळख ठेवायची नाहीये; त्याला फक्त 'मुस्लिम' हीच ओळख ठेवायची आहे. मग सोयीस्करपणे अमेरिकेसारख्या देशात ही ओळख झाकण्याचे प्रकारही सर्रास चालतात. असली रिकामटेकडी माणसे असल्यावर धार्मिक उन्माद न पसरला तरच नवल! कोकणात मुस्लिम लोकांची गावेच आहेत आणि इतर गावातल्या त्यांच्या टोलेजंग, आलिशान इमारती इतर छोट्या घरांच्या पार्श्वभूमीवर नजरेत भरतात. आणि असा फरक कसा हा प्रश्न ही पडतोच. दाऊदसारखे देशद्रोही आणि उलट्या काळजाचे गिधाड कोकणातलेच....
9 Sep 2010 - 3:01 pm | मृत्युन्जय
ते peace चॅनल होते की "piss" ? बहुधा दुसरेच असावे. अश्या चॅनलवर येउन येड्या झाकीर नाइक सारखा माणुस अजुन काय करणार?
9 Sep 2010 - 2:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
समीरसूर,
माझ्यासारखाच माणूस भेटल्यावर मला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद मला माझीच भाषा, देश, जात, धर्म (म्हणजे नक्की काय?) असणारा माणूस भेटल्यावर होईल असं नाही.
परदेशात असताना दिवाळीचा एकच लाँग विकेण्ड काही बालपणीच्या मित्र-मैत्रीणींबरोबर घालवला तेव्हा कधी एकदा परत मी माझ्या लोकांमधे (पोलीश, ब्रिटीश इ.) जाते असं झालं होतं. पण ही माझ्यासारखीच माणसं जेव्हा मराठी बोलणारी असतात तेव्हा काही कोट्या करता येतात त्याचा काकणभरच जास्त आनंद होतो, बस तेवढंच!
जंतूंच्या प्रतिसादावरूनः
मी इंग्लंडातल्या छोट्या खेड्यातच होते. तिथल्या (सधन) शेतकर्यांशी अशी गप्पा मारण्याइतपत गाठ पडली नाही; पण जे काही खेडूत भेटले त्यांच्या प्रश्नांवरूनतरी त्या लोकांना भारत आणि भारतीय सण-उत्सव यांची बर्यापैकी माहिती असावी असं वाटलं.
9 Sep 2010 - 3:01 pm | समीरसूर
आपलं म्हणणं कदाचित बरोबर असेलही पण मी फक्त त्याक्षणी मनात येणार्या भावनेविषयी बोलत होतो. आपल्याला सवय असलेली जीवनाची वाट असं कायमचं सोडून फक्त आपल्या माणसात राहणं हे माझ्या म्हणण्यात अपेक्षित नव्हतं. माहेराला आलेली सासुरवाशीण देखील ४-८ दिवसांनंतर कंटाळते आणि तिच्या घराची ओढ तिला अस्वस्थ करते.
शेवटी जी आपली वहिवाट असते ती सगळ्यांनाच प्रिय असते. मलाही आता पुण्यात १८ वर्षे राहिल्यानंतर माझ्या गावात तितकसं करमत नाही. ४-५ दिवसात मला माझ्या लोकांमध्ये येण्याची घाई होते. पण तिथे पाऊल टाकल्या-टाकल्या मन उल्हसित होतं, तिथले दिवस आठवतात आणि मन मोहरतं. हेच फीलिंग मला इतर कुठल्या गावात येणार नाही. हेच तत्व माणसाला लागू पडतं. अमेरिकेत मला एका स्टोअरमध्ये एक मराठी कुटुंब भेटलं तर मी स्वतःहून त्यांच्याशी बोललो. त्यांनाही आनंद झाला. पण हेच जी इतर हजारो भारतीय माणसे दिसतात त्यांच्याबाबतीत घडेल याची शक्यता नेहमीच कमी असणार आहे. शेवटी एक समान धागा, मग तो संस्कृतीचा असो; संस्कारांचा असो; विविक्षित जीवनपद्धतीचा असो; स्थळ-काळाचा असो; आपल्या भाषेचा असो, सापडला की मग अगदी थोडा वेळ का असेना पण मनाला बरं वाटतं हे खरं. असं बरं वाटणं मला पंजाबी माणूस भेटल्यावर वाटेलच याची शाश्वती नाही कारण माझ्या दृष्टीने तो भारतात असला काय किंवा अमेरिकेत असला काय; शेवटी तो आहे तर अनोळखीच!
माझा हा मुद्दा होता. आणि आपल्या लोकांमध्ये यायची घाई ही मुख्यत्वेकरून आपल्या सुरक्षित असल्याच्या भावनेपोटी जन्म घेते. आपलं सगळं सुरळीत चालू आहे; आपल्या अनुपस्थितीमुळे काही बिघडू नये ही असुरक्षिततेची भावना आपल्याला पुन्हा आपल्या लोकांकडे; आपल्या नेहमीच्या जीवनाकडे वळवते. असं माझं मत आहे. मागे एकदा मी माझ्या गावाला काही कारणास्तव १२ दिवस सलग राहिलो होतो. ४-५ दिवसांनंतर मला माझे कार्यालय; माझे सहकारी; माझे घर; माझ्या दुचाक्या; त्यांची सर्विसिंग; कार्यालयातली कामे इत्यादी गोष्टी अस्वस्थ करायला लागल्या होत्या. यात माझी असुरक्षिततेची भावना होती. माझ्या पश्चात कंपनीमध्ये काय झाले असेल; माझे काम पडून आहे याचा माझ्या नोकरीवर परिणाम तर होणार नाही ना; माझ्या गाड्या सुरक्षित असतील ना; माझे घर व्यवस्थित असेल ना...एक ना हजार प्रश्न....
9 Sep 2010 - 2:20 pm | शहराजाद
तुम्ही म्हणता तशी ओळख करून देणे माझ्यापुरते अप्रामाणिकपणाचे झाले असते. मी कुठलाही धर्म पाळत नाही ह्याचा लेखात उल्लेख केला आहे. त्यामुळे याच्यात 'बाणेदार' उत्तर देण्यापेक्षा मी प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. निधर्मी असणे हे 'चित्रपटीय' कसे काय?
माझा 'उसने देशप्रेम' वगैरे दाखवण्याचा हेतू नव्हता. यात तिचे मन दुखावल्याचे दिसले नाही. मला कुठल्या समाजगटात टाकावे ह्याचा ती मनाशी विचार करत असावी असे मला वाटले ( बर्याचदा मला मेक्सिकनही समजण्यात आले आहे.) मुख्य मुद्दा हिंदुत्व व भारतीयत्व याबाबतीत परदेशियांच्या मनात असलेला गोंधळ दाखवणं हा आहे.
9 Sep 2010 - 3:15 pm | समीरसूर
>>>>> तुम्ही म्हणता तशी ओळख करून देणे माझ्यापुरते अप्रामाणिकपणाचे झाले असते. मी कुठलाही धर्म पाळत नाही ह्याचा लेखात उल्लेख केला आहे. त्यामुळे याच्यात 'बाणेदार' उत्तर देण्यापेक्षा मी प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. निधर्मी असणे हे 'चित्रपटीय' कसे काय?
मग ठीक आहे. निधर्मी असणे चांगलेच पण सगळ्यांनाच जमते असे नाही. ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी माझे मत लागू पडावे.
>>>>> माझा 'उसने देशप्रेम' वगैरे दाखवण्याचा हेतू नव्हता. यात तिचे मन दुखावल्याचे दिसले नाही. मला कुठल्या समाजगटात टाकावे ह्याचा ती मनाशी विचार करत असावी असे मला वाटले ( बर्याचदा मला मेक्सिकनही समजण्यात आले आहे.) मुख्य मुद्दा हिंदुत्व व भारतीयत्व याबाबतीत परदेशियांच्या मनात असलेला गोंधळ दाखवणं हा आहे.
हे ही ठीक आहे. 'धर्म' ही संकल्पना अजूनही 'देश' या संकल्पनेपेक्षा जास्त वजनदार आहे. त्यामुळे ती बिचारी बावचळली असावी. शिवाय आपल्या देशात अधिकच जास्त वजनदार आहे....
जिज्ञासेपोटी एक प्रश्न विचारतो: तुम्ही धर्म पाळत नाही म्हणजे तुम्ही नास्तिक आहात का? आणि नसलात तर मग कुठल्या देवाची पूजा करता? अगदी मनापासून क्षमा मागतो; खूप वैयक्तिक प्रश्न विचारल्याबद्दल....
9 Sep 2010 - 3:37 pm | शहराजाद
क्लिअरन्स दिल्याबद्दल आपली खूप आभारी आहे.
प्रश्न वैयक्तिक आहे खरा, परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणेच, स्वतःचा (नि)धर्म मान्य करण्यात मला कमीपणा वाटत नाही. उत्तर- कुठल्याहि देवाची मी पूजा करत नाही.
9 Sep 2010 - 4:06 pm | समीरसूर
शहराजाद,
उत्तराबद्दल धन्यवाद.
मी क्लिअरन्स देणारा कोण? माझ्या क्लिअरन्सला काय किंमत. मी फक्त माझे मत मांडले.
बाकी माझ्या 'क्लिअरन्स'साठी आपण ज्या खोचक पद्धतीने माझे आभार मानले आहेत ती पद्धत आवडली. :-)
मी पूर्वग्रहदूषित नाही. आपण आपले मत मांडले; मी माझे मांडले. आपणास आपले मत; आपली विचारसरणी पटते; मला माझी मते; माझी विचारसरणी पटते. चालायचंच... शेवटी माणसे म्हटल्यावर मतभेद व्हायचेच....
आपण मूळ पुण्याचे का?
10 Sep 2010 - 1:17 am | शहराजाद
नाही. परंतु मुळामुठेचे तीर्थ काही काळ प्राशन केलेले आहे. पण त्याचा इथे काय संबंध?
9 Sep 2010 - 6:47 pm | मनीषा
तुम्ही म्हणता तशी ओळख करून देणे माझ्यापुरते अप्रामाणिकपणाचे झाले असते. मी कुठलाही धर्म पाळत नाही ह्याचा लेखात उल्लेख केला आहे. त्यामुळे याच्यात 'बाणेदार' उत्तर देण्यापेक्षा मी प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. निधर्मी असणे हे 'चित्रपटीय' कसे काय?
तुम्ही रुढार्थाने धर्म पाळत नसाल कदाचित, पण प्रत्येक माणूस जन्मजात धर्म आणि जात घेउनच येतो. त्या अर्थाने कुणीच निधर्मी नसते. बर्याच वेळा काही सरकारी फॉर्म मधे सुद्धा धर्म आणि जात लिहावी लागते... मग तेव्हा तुम्ही जे लिहित असाल तेच उत्तर दिले असते तरी काही बिघडले नसते .
9 Sep 2010 - 6:54 pm | चिंतातुर जंतू
असहमत. जन्मजात धर्म आणि जात न पाळणारी पुष्कळ माणसे परिचयात आहेत. त्यांचे हे वर्तन स्पष्ट दिसत असताना त्यांना विशिष्ट धर्माचे वा जातीचे मानण्याची प्राज्ञा वा अधिकार माझ्याकडे तरी नाही.
उपरोल्लेखित माणसे अशा ठिकाणीही 'निधर्मी' आणि 'जात नाही' असे लिहितानाही पाहिले आहे. त्यामुळे अधिकृत, सरकारी फॉर्म्सवरही जन्मजात धर्म आणि जात लिहिणे अनिवार्य नाही, तो एक पर्याय आहे.
9 Sep 2010 - 7:26 pm | अप्पा जोगळेकर
निदान भारतात -
जात जन्माने मिळते आणि बदलता येत नाही असे कायदा सांगतो.
धर्म हा विश्वास अर्थात बिलिफ होय. तो बदलण्याची परवानगी कायदा देतो.
जन्मजात धर्म आणि जात न पाळणारी पुष्कळ माणसे परिचयात आहेत.
या विधानाला निदान भारतात तरी किंमत नाही. प्रत्येक फॉर्म, लीगल डोक्युमेंट आणि इतर सगळे कागद यावर जात-धर्म लिहावीच लागते.
9 Sep 2010 - 11:58 pm | चिंतातुर जंतू
हे निव्वळ विशिष्ट जातीचे असल्याचे दाखवून ज्यांना काही जातनिहाय सवलतींचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यापुरतेच मर्यादित आहे. तुम्हांस लाभ नको आहे? तर मग जात न लावल्याने काही फरक पडत नाही. इथे जात नाकारली जात आहे; बदलली जात नाही, हे लक्षात घ्यावे.
'धर्म - निधर्मी; जात - नाही' असे लिहिलेल्या माझ्या परिचयाच्या कुणालाही आजतागायत पॅन, पारपत्र, वाहनचालक परवाना, स्थावर-जंगम मालमत्ता खरेदीविक्रीचे दस्त, मतदार यादी, अशा कोणत्याही बाबतीत अडवले गेलेले नाही. 'जात - नाही' असे लिहिणे म्हणजे जात लिहिणे असे मानायचे असल्यास मानू शकता, पण मग लिहिलेली जात म्हणजे जन्मजात जात नाही, हे ओघाने मान्य व्हावेच.
9 Sep 2010 - 2:34 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>आणि परदेशातही आपल्याला मराठी माणूस भेटल्यावर जितका आनंद होतो तितका पंजाबी माणूस भेटल्यावर होतोच असे नाही.
परदेशात एखादा मराठी माणूस अनपेक्षित रित्या भेटल्याचा आनंद पहिल्या १-२ वेळेला होतो. मग आपण बोलणे सुरु केले की आपल्या लक्षात येते की आपल्याला शिस्तीत फाट्यावर मारले जात आहे. तिसऱ्या वेळापासून आनंद वगैरे काही होत नाही. परदेशात मराठी माणूस दुसऱ्या अनोळखी मराठी माणसाकडे ज्या नजरेने बघतो त्याला योग्य उपमा द्यायची तर खुद्ध कालिदासाला खाली आले पाहिजे. इतरेजनांचे ते काम नोहे. तरीही सांगायचेच झाले तर, शिरीष कणेकरांच्या फिल्लमबाजीतील वाक्य उधार घेतो, "अरे असाल, तुम्ही कुणीतरी असाल, तुम्ही तुमच्या घरी मोठे, आम्ही आमच्या घरी मोठे...." साधारण असे स्वगत आपल्याला ऐकू येते (म्हणजे चेहऱ्यावर वाचता येते)
बाकी पंजाबी माणूस भेटला तर निदान तोंडावर तरी गोड बोलतो. मागे शिव्या का घालत असेना. मराठी माणूस दोन्ही कडे शिव्या घालतो.
(हा मला आलेला अनुभव आहे, सर्वांना येत असेल असे नाही. आणि ज्याअर्थी मला तो आला आहे त्याअर्थी माझ्यातच काही दोष असला पाहिजे असे कुणाचे मत असल्यास त्याबद्दल मी मतभेद व्यक्त करणार नाही. बाकी चालू द्या.)
9 Sep 2010 - 3:07 pm | समीरसूर
मराठी लोकांविषयीचे वरील अनुभव मला देखील आलेले आहेत. :-)
नसती ब्याद म्हणून टाळणारे मराठी बरेच भेटतात परदेशात....
9 Sep 2010 - 9:25 pm | माजगावकर
अगदी हाच अनुभव येतो सद्ध्या मला देखिल अमेरिकेत.. त्यामुळे हेच म्हणतो..
10 Sep 2010 - 8:02 am | आमोद शिंदे
>>बाकी पंजाबी माणूस भेटला तर निदान तोंडावर तरी गोड बोलतो.
मी त्यामूळेच शक्यतो पंजाबी माणूस टाळतो.
9 Sep 2010 - 1:49 pm | चिंतातुर जंतू
आपला अनुभव वैश्विक असावा. परदेशात कशाला, उत्तर भारतात मला अनेकदा आलेला अनुभव: मी मराठी आहे एवढं कळलं की मी ब्राह्मण असणार आणि शाकाहारी असणार असं गृहीत धरलं जातं. मला आकडेवारी माहीत नाही, पण महाराष्ट्रात ज्यांच्या घरी मांस शिजवलं जातं अशा लोकांची टक्केवारी शाकाहारी लोकांपेक्षा अधिक असावी. परंतु कदाचित असं होत असेल की माझा संबंध उत्तर भारतातल्या सुशिक्षित, पांढरपेशा समाजाशीच आला; अशा लोकांच्या समोर येणारे बहुतांश मराठी लोक शाकाहारी ब्राह्मण असतील म्हणून त्यांचा असा समज होतो. (हा माझा अंदाज आहे). थोडक्यात, एखादी परदेशी व्यक्ती कोणत्या वर्तुळात वावरते त्यावरून तिच्या संपर्कात कोणते भारतीय येतात हे ठरत असावं. त्यामुळे त्या अनुषंगानं त्या व्यक्तीची भारतीयांबद्दलची मतं/पूर्वग्रह बनत असावीत.
अदिती यांचा इंग्लंडमधला अनुभव मलाही आलेला आहे. याचं कारण कदाचित असं असावं की इंग्लंडमध्ये भारतीय उपखंडातले विविध जाती-धर्मांचे लोक दैनंदिन जीवनात सामोरे येतात, तसेच सार्वजनिक नात्यानंही सामोरे येतात - उदा: लोकप्रतिनिधी, वृत्तपत्रस्तंभलेखक, साहित्यिक, वगैरे. यामुळे इंग्लंडमध्ये इतक्या मूलभूत पातळीवर आपल्याविषयी अज्ञान दिसत नाही. हे मात्र इथंही नमूद करावं लागेल की माझा संबंध तिथल्या शहरी, सुशिक्षित माणसांशीच आला. छोट्या खेड्यातल्या इंग्लिश शेतकर्याशी बोललं तर कदाचित अधिक अज्ञान दिसेल.
9 Sep 2010 - 2:09 pm | गणेशा
माझ्या माहिती प्रमाणे
भारत हे एक हिंदु राष्ट्र म्हणुनच ओळखले जाते.
आणि १०० % हिंदु असलेले एकमेव राष्ट्र फक्त नेपाळ आहे.
9 Sep 2010 - 2:09 pm | गणेशा
माझ्या माहिती प्रमाणे
भारत हे एक हिंदु राष्ट्र म्हणुनच ओळखले जाते.
आणि १०० % हिंदु असलेले एकमेव राष्ट्र फक्त नेपाळ आहे.
9 Sep 2010 - 2:18 pm | यशोधरा
आता नेपाळही नाही.
9 Sep 2010 - 8:39 pm | पैसा
कम्युनिस्ट!
9 Sep 2010 - 2:33 pm | इन्द्र्राज पवार
"आदर्शवाद थोडा बाजूला ठेवून आपण प्रत्यक्षतेच्या पातळीवर येऊन संभाषण फुलवणे आणि मग आपले म्हणणे मांडणे उचित नाही का?"
श्री.समीरसूर यांच्या प्रतिसाद वाचल्यानंतर मनात आले की, त्यांच्या या वाक्यातील 'आदर्शवाद' म्हणजे नक्की त्यांना काय अभिप्रेत आहे? का तेवढ्या भाजी खरेदी करण्यास लागलेल्या वेळेपुरताच शहराजाद यांनी ती भूमिका घ्यायला हवी होती?? धागाकर्त्या 'शहराजाद' या (नावावरून तरी...) मुस्लिमधर्मीय आहेत असे गृहित धरतो (मराठी भाषा आणि टंकन यावर खूपच 'मास्टरी' दिसते) आणि त्यामुळे त्यांनी स्वतःची ओळख परकीयाला करून देताना 'भारतीय' (संभाषणात त्या "इंडियन" असे उच्चारल्या असतील) असे म्हटल्यामुळे 'हिंदू' संकल्पनेला त्यांनी कुठे धक्का लावला असे आपण समजू नये, किंबहुना त्यांनी "मी मुस्लिम स्त्री" अशी तर त्या अमेरिकन भाजीवालीला करून दिली नाही, ही देखील एक औचित्याची बाब मानली पाहिजे.
मुस्लिम धर्मात अस्तित्वात असलेल्या सनातनवाद्यांचे आज 'सॉफ्ट टार्गेट' कुणी बनले असतील तर हिंदू धर्माशी जवळीक ठेऊन तसेच 'भारत माझा देश आहे आणि मी भारतीय आहे' असे म्हणणारा मुस्लिमातील एक मोठा वर्ग आहे. उच्च आणि वैज्ञानिक शिक्षणामुळे वैचारीक प्रगती केलेला हा वर्ग प्रतिगामी तत्वापासून दूर जाण्यातच धर्माची खरी शिकवण आहे असे मानतो. त्यामुळे 'शहराजाद' यांच्यासारखी व्यक्ती किमान इतपत भूमिका उघडपणे मांडून हिंदू धर्माशी वा देशातील मतप्रवाहाशी सलगी साधते त्यावेळी ती बाब स्वागतार्ह वाटली पाहिजे किंबहुना अशाच विचारसरणीच्या व्यक्ती त्या धर्मात/समाजात वाढाव्यात अशी कामना करणे ठीक होईल. भारतीय मुस्लिम समाजाविषयी (मी दिल्ली-मुंबई-कलकत्ता या मेट्रो सिटीजमधील मुस्लिमाविषयी लिहित नाही...तर राज्याच्या अनेक जिल्ह्यातून अनेकविध कामानिमित्त विखुरलेल्या व तेथील समाजराहणीशी नाळ जुळविलेल्या मुस्लिमांविषयी लिहित आहे) अद्यापि नीटशी कल्पना नसलेला फार मोठा वर्ग भारतात अस्तित्वात आहे; आणि हाच वर्ग मुस्लिम जनमानस नीट समजावून घेण्याचा प्रयत्न करीत नाही, ही मुस्लिमातील सुधारकांची खंत आहे.
मुस्लिम समाजातील प्रतिगामी चळवळी जणू त्या समाजाचा जैविक घटक (बायॉलॉजिकल फॅक्टर) आहे ही धारणा इतकी पक्की झाली आहे की या चळवळीत अ पासून ज्ञ पर्यन्त सर्व मुस्लिम सामील झाले आहेत, हा एक सहजगत्या काढला जाणारा 'हिंदू लॅबोरेटरी' तील रिझल्ट असतो. मग एकदा का संख्येने बहुजन ठरलेल्या समाजाचे मनोगत अशारितीने 'कॉन्क्रीट' झाले की त्या भूमिकेतून वावरताना सामाजिक बदलाच्या प्रक्रियेकडे नैसर्गिकरित्या दुर्लक्ष होत जाते..... आणि नेमके हेच शल्य सुधारणावादी मुस्लिमांचे आहे... (जरी ते संख्येने लहान असले तरी).
'इकॉनॉमिक टाईम्स' मधील एक ज्येष्ठ पत्रकार श्री.समर खडस यांनी 'मी मुसलमान?' या लेखात नेमकी हीच व्यथा मांडली होती. त्यांचे वडील समाजवादी पक्षाचे काम करत. घरात धार्मिक रूढीना अजिबात स्थान नव्हते. मुस्लिम असूनही आईवडिलांनी समरकडून अभ्यासाअगोदर 'शुभं करोति' म्हणवून घेण्याचा प्रघात ठेवला होता. समर याना शाळेच्या वयात हिंदू-मुसलमान म्हणजे काय हेच माहित नव्हते. समीर म्हणतात "एकदा क्रिकेट खेळताखेळता मला माझा धर्म कळला." मुलांत खेळताना नेहमी होतात तशीच काहीतरी भांडणं झाली, आणि एक मित्र समीरकडे पाहत सगळ्यांना म्हणाला, "ए याला घ्यायचा नाही आपण. हा मुसलमान आहे. काढून टाकू या." समीर याना तो पर्यंत 'खेळातून काढून टाकणे म्हणजे ' हा रडी खातो, मारले तर घरी नाव सांगतो, हा स्वत:ची बॅट आणत नाही' यासारखी कारणे असतात इतपतच ज्ञान. पण "मुसलमान आहे म्हणून काढून टाका' हे ज्ञान एका हिंदूनेच दिले. पुढे पुढे तर कॉलेज शिक्षण पूर्ण झाले, उमेदवारी झाली, पक्की नोकरी सुरू झाली, नोकरीनिमित्या हिंडणे सुरू झाले, पण 'लोकांच्याच काय पण सहकार्यांच्यादेखील मनातून माझी जात जाता जाईना.." आणि हे नित्याचेच झाले होते...त्यामुळे एक गोष्ट समीर याना नक्की जाणवली ती म्हणजे, स्वतः कितीही नाकारलं तरी या देशात जन्माने मिळालेली जात वा धर्म सुटत नाही. त्यांच्या शाळा/कॉलेजच्या दाखल्यावर धर्म "भारतीय" असे लिहिलेले आहे, असं असलं तरी ते म्हणतात, "का कोण जाणे, लोकांना माझा धर्म बरोबर कळतोच आणि ते मला मुस्लिम म्हणूनच ट्रीट करतात."
नेमकी हीच खंत आहे "भारतीय मुस्लिमां"ची.
इन्द्रा
(याच विषयाशी थोडेसे अवांतर ~~ कोल्हापुरातील एका "भारतीय" मुस्लिम नेत्याच्या बंगल्याचे नाव "श्री" आहे. या बद्दल स्थानिक मुस्लिमांनी कधीही रोष व्यक्त केलेला नाही. तर जिल्ह्यातील एका मतदार संघात ८०% पेक्षा जास्त हिंदू मतदार आहेत तरी तेथील "आमदार" पदी एक मुसलमान व्यक्ती निवडून आली आहे.)
9 Sep 2010 - 2:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>जिल्ह्यातील एका मतदार संघात ८०% पेक्षा जास्त हिंदू मतदार आहेत तरी तेथील "आमदार" पदी एक मुसलमान व्यक्ती निवडून आली आहे.
८०% पेक्षा जास्त मुसलमान मतदार आणि हिंदू व्यक्ती निवडून आलेली असा मतदार संघ कुठे असेल का याचा विचार करतो आहे. (असेलही कदाचित म्हणा, आपले ज्ञान तोकडे आहे)
बाकी बरेचसे मुद्दे पटले. या विषयावर सलीम खान यांनी काही लेख लिहिले होते मटा मध्ये साधारण २ वर्षांपूर्वी. कुठून मिळवता आले तर वाचा.
9 Sep 2010 - 2:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सलीम खान यांच्या लेखाची लिंक शोधाच. त्यांच्या (बहुदा त्याच) लेखातला एक प्रसंग:
गाडीला ड्रायव्हर करकचून ब्रेक मारतो आणि आपण एखाद्या अपघातातून बचावलो हे समजल्यावर मी (सलीम खान) म्हणतो "या अल्ला!", बायको म्हणते "अरे देवा" आणि आमची सगळी मुलं एका सुरात "ओ माय गॉड" म्हणतात.
इंद्रा, शहरजान मुस्लिम आहेत का नाहीत हे कोणी ठरवायचं?
9 Sep 2010 - 2:54 pm | नगरीनिरंजन
मला वाटतं शहरजाद यांनी पुरेशा स्पष्टपणे लिहीलं आहे की ते निधर्मी आहेत. कोणताही धर्म नसल्यावर पुन्हा धर्म ठरवण्याचा प्रश्नच का यावा?
9 Sep 2010 - 3:17 pm | इन्द्र्राज पवार
"कोणताही धर्म नसल्यावर पुन्हा धर्म ठरवण्याचा प्रश्नच का यावा?"
~~ होय हा मुद्दा बिनतोड असाच आहे. त्यामुळे माझ्या प्रतिसादात 'त्या मुस्लिम आहेत' आहेत असे कुठेतरी ध्वनीत होत असेल तर तो भाग (आता) संपादित करता येत असेल तर जरूर करतो. त्यांचे मूळ वाक्य "रुढार्थाने कुठलाच धर्म पाळीत नाही..." असे असले तरी मी केवळ 'नामसदृश्या'मुळे त्या मुस्लिम आहेत असे गृहित धरून तो प्रतिसाद व्यापक स्वरूपात नेला.
शहराजाद यांच्या त्यामुळे भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करीत आहे.
इन्द्रा
9 Sep 2010 - 5:05 pm | चिंतातुर जंतू
आपण दिलगिरी व्यक्त केलीत ते ठीकच आहे, पण एक कुतुहल म्हणून अवांतर प्रश्नः
म्हणजे लेखक मुसलमान असल्यास मराठीवर (भाषा आणि टंकन) पुरेसे प्रभुत्व नसणार आणि तसे असल्यास ते उल्लेखनीय ठरावे, असा काहीसा सूर यात जाणवतो. तसेच आपल्याला सुचवायचे होते का?
9 Sep 2010 - 7:25 pm | इन्द्र्राज पवार
".....मुसलमान असल्यास मराठीवर (भाषा आणि टंकन) पुरेसे प्रभुत्व नसणार"
~ अगदी उज्ज्वल निकम फंडा माझ्या गळ्यात मारला आहे, श्री.चिंजं यानी.... अँण्ड आय अप्रेसिएट इट्स रेलेव्हन्स, माय फ्रेंड !!
माझी या वाक्यापाठीमागील भूमिका >>
१. सन्माननीय सदस्या 'शहराजाद' यांचे नाव व लेखन मी प्रथमच (आजच या धाग्याच्या निमित्ताने) इथे पाहिले. धागा तर राहू दे, पण या नावाने कुठे प्रतिसादही वाचनात आलेला नव्हता. त्यामुळे त्या नव्या सदस्या असून या एकदोन दिवसात त्यांनी इथे भाग घेण्यास सुरुवात केली आहे असा हिशोब मी मनोमनी मांडला. या महिन्यात (खरेतर ऑगस्टपासून) खूप नव्या आयडी (फेमस प्रविन भ्प्कर पासून) मिपावर आल्या आहेत आणि त्यांचा येथील सहभाग अनुभवताना सारखे जाणवत होते की बर्याच जणांचे टंकन कौशल्य उच्च दर्जाचे नाही, पण असे असले तरी विषयातील नावीन्य भावले तर प्रतिसाद त्यांना जात होता. इथे शहराजाद यांची टंकनातील अचूकता (जी कौतुकास्पद आहेच...) मला नोंदवावी वाटली ती याच कारणासाठी की त्यांचा येथील पहिला सहभाग (अदिती यांनी नोट केली आहे ही बाब, हे मी वाचले होते) आणि तोही योग्य त्या सादरीकरणासह....बस्स.
२. 'मुसलमान असल्यास मराठी' वर प्रभुत्व नसणार > हा मुद्दा वादासाठी निसरडा ठरणार हे मी जाणतो. कुठेतरी हा विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला हे मी निर्विवादपणे कबूल करतो, त्याला कारण म्हणजे नावातील 'अरेबियन इसेन्स' + मिपावरील पहिले लेखन + यापूर्वी कुठेच प्रतिसाद नाहीत + रुढार्थाने निधर्मी असल्या तरी नावावरून मी बांधलेला धर्माचा अंदाज + आणि अमेरिकन वातावरणातील राहणी = उत्तर (मी काढलेला) मराठी भाषेवरील प्रभुत्वाचा मुद्दा !
असो....आशा आहे की, दस्तूरखुद्द शहराजाद याबाबत माझ्यावर कोणतीही केस दाखल करणार नाहीत. प्लीज क्लोज द फाईल !
इन्द्रा
9 Sep 2010 - 7:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इंद्रा, मी मिपावर आले तो माझा पहिला प्रतिसाद पाहिलास तिथपासूनच माझ्याही टंकनात खूप कमी चुका आहेत. मिपाबाहेर लोकं मराठी टंकन करतच नाहीत असा काही प्रकार नाही.
दुसरा मुद्दा, इथे जाशील तर शहराजाद यांनी इतर काही ठिकाणी प्रतिसाद दिलेले आहेत ते दिसेल. मी स्वागत करताना आधी लेखिकेची वाटचाल पाहिली होतीच.
तिसरा (कदाचित निरर्थक मुद्दा) मिपावरचा शाहरूख हा मुसलमान नाही असं त्यानेच कुठेतरी प्रतिसादात लिहीलं होतं. त्यामुळे व्हर्च्युअल जगातल्या नावांवरून कोणाच्या धर्म-पंथ-जात-वयाचा अंदाज करण्यात अर्थ नसतो. (आप्पा जोगळेकरास त्याचं वय लिहावं लागतं सहीत!)
असो. हे फार्फार अवांतर सुरू आहे, त्यामुळे इथेच थांबलेलं बरं!
9 Sep 2010 - 8:56 pm | इन्द्र्राज पवार
अदिती....
होय... तू म्हणतेस त्यात तथ्य आहेच (आय मीन... मिपाबाहेर लोकं मराठी टंकन करतच नाहीत असा काही प्रकार नाही.) ~ पण वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मला त्यांचा येथील पहिलाच दिवस आहे असे वाटले आणि तोही असा प्रभावी वाटावा असा (दोन्ही अर्थाने ~ विषयाची मांडणी प्लस मराठी टायपिंग) मग त्यांचे आपण यापूर्वी प्रतिसाद वाचले की नाहीत हा प्रश्नच आला नाही.
आता तू 'इथे' जा म्हणालील, मग मी तिथे गेलो आणि तिथून परत आलो कारण "तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही." हा फटका बसला. पण, असो....तू म्हणतेस तसे हे फार अवांतर सुरू आहे.
"व्हर्च्युअल जगातल्या नावांवरून कोणाच्या धर्म-पंथ-जात-वयाचा अंदाज करण्यात अर्थ नसतो."
~~ राईट यू आर. याच न्यायाने 'चिंतातर जंतू' हा नेहमी चिंतेतच असेल असे काही नाही...तोही पिझ्झा बर्गर खात खात आपल्या मित्रांसमवेत डेक्कन जिमखान्यावर धमाल उडवत असेल..... तर 'अर्धवट' आणि 'अर्धवटराव' ही नावे खरे तर 'इंटुक' आहेत हे ते वारंवार सिद्ध करीत असतात....तर इथे 'विक्षिप्त' नावाने वावरणारी एक भद्र महिला इतरांचा विक्षिप्तपणा नेमकेपणे हेरत असते.
इंटरेस्टींग व्हर्च्युअल वर्ल्ड !
इन्द्रा
9 Sep 2010 - 9:14 pm | अर्धवट
>>तर 'अर्धवट' आणि 'अर्धवटराव' ही नावे खरे तर 'इंटुक' आहेत हे ते वारंवार सिद्ध करीत असतात....
इंद्रदेव.. तुमच्यासारखी जाणती माणसं पण धाग्याच्या प्रतिसादसंख्येच्या सुपार्या घ्यायला लागली हे पाहुन अंमळ खेद वाटला. ;)
अधिकाधिक सदस्यांची नावं घेउन काउंट वाढवायचा प्रयत्न आवडला. :)
अवांतर - इंटुक म्हणजे काय ब्वॉ?
9 Sep 2010 - 9:27 pm | सुहास..
इंद्रदेव.. तुमच्यासारखी जाणती माणसं पण धाग्याच्या प्रतिसादसंख्येच्या सुपार्या घ्यायला लागली हे पाहुन अंमळ खेद वाटला. >>>
अर्ध्या लेका , तु का रिअॅक्ट करतोयस ? घरातली पुस्तक सोडुन खवंच्या अभ्यास कर आधी :)
अवांतर : चमनचिंधी लोंकाच्या नादी नाय लागायच जास्त ..
आजचा गृहपाठ : चमनचिंधी या शब्दाचा ऊगम व अर्थ शोधा
9 Sep 2010 - 11:16 pm | इन्द्र्राज पवार
नाही ओ भाऊ ~~ त्या सुपार्यांच्या बागेत मी कधी जात नाही. अदितीताईनी मी 'वाईच' त्या प्रतिसादात गडबडलो म्हणून माझे कान पिळले, त्यासाठी आभारस्वरूपात त्यांना उत्तर देणे क्रमप्राप्त होते म्हणून एका पाठोपाठ दोनतीन प्रतिसादाची पिसे इथे घरंगळली. असो.
"अवांतर - इंटुक म्हणजे काय ब्वॉ?"
'इंटुक' प्रकरण तुम्हास खरंच माहित नाही असे गृहित धरून खुलासा करतो ~~
महेश एलकुंचवार यांच्या सुप्रसिद्ध 'गार्बो' नाटकातील नायकाचे हे नाव. तो इंटेलेक्चुअल (प्रोफेसर आहे यासाठी) आहे, म्हणून त्याच्या मित्रांनी त्याचे 'इंटुक' या टोपणनावाने बारसे केलेले असते.
इन्द्रा
10 Sep 2010 - 2:37 am | अर्धवटराव
अर्रर्रर्रर्रर्रर्रर्र......
आज आम्हाला चक्क इंटलेक्चुअल म्हणुन संबोधण्यात आलं... कसं होणार या जगाचं
(लखोबा लोखंडे) अर्धवटराव
10 Sep 2010 - 9:41 am | अर्धवट
आम्ही... आणि कसलं ते 'ईठ्ठलाकुचल' का काय ते... काय अधोगती ही समाजाची..
चार दिवस प्रतिसादमौन.. आणि प्रार्थना पण करणार आहोत..
इंद्रदेवांना सुरा, अप्सरा वगैरे बंद करावी म्हणून उपोषणालाही बसावं म्हणतो.. ;)
10 Sep 2010 - 10:23 am | इन्द्र्राज पवार
"इंद्रदेवांना सुरा, अप्सरा वगैरे बंद करावी म्हणून उपोषणालाही बसावं म्हणतो.."
~ खर्या इंद्रदेवांसाठी बसणार असाल तर जरूर बसा (तेही तक्रार करणार नाहीतच...); पण माझ्यासाठी बसणार असाल तर काही उपयोग ईल्ला ! 'सुरे' ची संगत लागलेली नाही, अप्सरांची साथ लाभलेली नाही. त्यामुळे अजूनही गोबीच्या वाळवंटातून 'चल अकेला, चल अकेला...' चालूच आहे.
अल्ला भला करे !
इन्द्रा
9 Sep 2010 - 3:16 pm | यशोधरा
ह्या घाग्याची एवढी महती नाही! :D
9 Sep 2010 - 6:16 pm | दिपोटी
धागाकर्तीने अतिशय संयतपणे व प्रामाणिक शब्दांत आपला मुद्दा मांडला आहे ... मुद्दा सुध्दा विचार करण्याजोगा निश्चितच आहे. तर आता या धाग्यात 'एवढी' महती नसल्यासारखे आपल्याला काय आढळले ? का आपण पाळता तो हिंदू धर्म न पाळणार्या व्यक्तीचा धागा अनुल्लेखाने मारण्यातच आपल्याला धन्यता मानायची आहे ?
आपणास इतके असुरक्षित वाटावे असे काही मला तरी या धाग्यात काहीच आढळले नाही ... खरे तर शहराजाद यांचा धागा व त्याला अभिषेक, नगरीनिरंजन, समीरसूर, चिंतातुरजंतू, इन्द्रराज यांचे प्रतिसाद वाचनीय व मननीय आहेत.
- दिपोटी
9 Sep 2010 - 6:41 pm | यशोधरा
मी हिंदू धर्म पाळते हे कशावरुन?
दुसरे असे, की धागाकर्ती मला जेव्हा हा प्रश्न विचारेल तेह्वा मी उत्तर द्यायचे की नाही हे बघेन. आपल्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही. सबब अनुल्लेख. धन्यवाद. :) तिसरे असे की जिथे तिथे प्रत्येक धाग्यावर उपदेशामृत पाजायची व आपण किती ग्रेट आहोत हे दाखवायची गरज मला भासत नसते. माझा प्रतिसाद अवलियांना उत्तर होते. त्यांना समजले, तुम्हांला समजले नाही तरी चालण्याजोगे आहे.
चिंजं ह्यांचे प्रतिसाद उत्तम आहेत ह्याबद्दल सहमत.
10 Sep 2010 - 5:50 am | दिपोटी
यशोधरातै,
१) अर्थातच 'आपण हिंदू आहात' हे माझ्या वरील दुसर्या प्रश्नासाठी निव्वळ एक उदाहरण म्हणून गृहित धरले आहे. मात्र माझा हा प्रश्न लागू होण्यासाठी हे गृहितक खरे असायला पाहिजेच असे नाही. आपण हिंदू नसून ज्यू, पारशी, ख्रिश्चन वा अन्यधर्मीय असला तरी माझा प्रश्न लागू होतोच.
२)
बांधील नाही ??! कमाल आहे. आपण सर्व या संस्थळावर येतो व प्रतिसाद देतो ते चर्चेत सहभागी होण्यासाठी येतो. अशा चर्चेत जेव्हा धागाकर्ती/कर्त्याकडून व त्या अनुषंगाने धाग्यातील प्रतिसादकर्ती/कर्त्याकडून सुध्दा प्रश्न विचारला जातो, तेव्हा उत्तराची अपेक्षा ठेवली जाते यात काहीही गैर नाही. चर्चा पुढे नेण्यास याने हातभारच लागतो. हा केवळ बांधिलकीचा प्रश्न नसून औचित्याचा व संस्थळावरील सभ्यतेचा सुध्दा मुद्दा आहे. अर्थात 'फक्त धागाकर्ती/कर्त्यालाच प्रतिसाद देणार, प्रतिसादकर्ती/कर्त्याला नाही' असा आपला संकुचित विचार असता तर हे (पटण्यासारखे नसले तरी) निदान समजण्यासारखे होते. पण अन्य धाग्यांवर आपण दिलेले बरेच प्रतिसाद पाहिले तर असाही आपला विचार नाही हे कळते. (आशा आहे की 'फक्त आपल्या कंपूतील प्रतिसादकर्त्यांनाच उत्तर/प्रतिसाद देणार' असा पर्यायी संकुचित विचार सुध्दा आपण ठेवत नसाल).
३)
माझ्या प्रामाणिक प्रश्नांना असे आक्रमक (अवलियांचा 'उर्मट' शब्द वापरणे मी टाळत आहे) 'उत्तर' आले याचे कारण माझ्या आकलनाबाहेर आहे. वर नमूद केल्याप्रमाणे आपण अवलियांना व्यनि न पाठवता जेव्हा या जाहीर चर्चेतच उत्तर दिले तेव्हाच आपला प्रतिसाद या चर्चेचा एक घटक झाला. ही (व अन्य कोणतीही) जाहीर चर्चा सर्वांसाठी आहे, तेव्हा अशा जाहीर चर्चेत 'तुम्हाला समजले नाही तरी चालेल' हे विधान निश्चितच थोडे पळखाऊ वाटते.
तेव्हा उत्तरांची अजूनही अपेक्षा ठेवत आहे. आपल्या सोयीसाठी प्रश्न परत एकदा विचारीत आहे :
या धाग्यात 'एवढी' महती नसल्यासारखे आपल्याला काय आढळले ?
का आपण पाळता तो हिंदू (वा अन्य कोणताही) धर्म न पाळणार्या व्यक्तीचा धागा अनुल्लेखाने मारण्यातच आपल्याला धन्यता मानायची आहे ?
धन्यवाद.
- दिपोटी
10 Sep 2010 - 8:06 am | आमोद शिंदे
दिपोटी ह्यांच्याशी पूर्ण सहमत आहे. अकारण द्वेष केला जात आहे.
9 Sep 2010 - 6:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
परदेशातील अनुभव वाचण्यासारखे आहेत, वाचतोय....!
-दिलीप बिरुटे
9 Sep 2010 - 7:16 pm | प्रशान्त पुरकर
असाच पण काहिसा उलटा अनुभव मला द. कोरिया मध्ये नेहमी येतो....बरयाच कोरियन लोकाना द. अशियाइ लोक म्हणजे फक्त पाकिस्तानी / मुस्लिम असतात असा समज आहे... बरयाचदा स्वतःहुन येऊन 'सलम अलेकुम' म्हणतात.... :(
9 Sep 2010 - 7:43 pm | पुष्करिणी
इंग्लंड मधे लोकांना हिंदू धर्म बर्यापैकी माहिती आहे, कदाचित त्यांची भारत वसाहत होता म्हणूनही असेल.
पण टीव्हीवर मात्र कुठलीही धर्मावर आधारित चर्चा फक्त इस्लाम आणि ख्रिश्चन ( क्वचित ज्यूंवर ) असते. हिंदू, बौद्ध, जैन, शीख इ. धर्मांबद्द्ल अगदी रेअरली काहीतरी ऐकायला मिळतं.
जर्मनीत माझ्या कंपनीच्या डेटाबेस मध्ये माझा धर्म 'OTHERS' असा लिहिलाय ( कारण हिंदू असा ऑप्शन नाही ) आणि लोकं मला तू 'बुडिस्ट' आहेस ना असं विचारायची ; पण आता त्यांना मी 'हिंडू' आहे असं कळलेलं आहे ...मीही हिंडू धर्मातल्या सगळ्या मज्जा त्यांना चवीनं सांगत असते..:)
9 Sep 2010 - 7:51 pm | पैसा
क्या बात है! "बुडिस्ट" वर आणखी एक "रामायण" चालू आहे, तेही इकडे आणावे काय?
9 Sep 2010 - 7:58 pm | पुष्करिणी
आणाहो पैसा ताइ, आपल्यालाही थोडा नवा/जुना इतिहास -भूगोल कळेल :)
10 Sep 2010 - 12:45 am | विकास
मला वाटते "हिंडू" हा मुळचा मराठी शब्द आहे. विशेष करून आयटी क्षेत्रातले पण इतरही भारतीय व्यावसायीक कामानिमित्त/प्रोजेक्टनिमित्त इकडून तिकडे हिंडत असतात त्यांना "हिंडू" असे म्हणतात. ;)
9 Sep 2010 - 8:02 pm | टिउ
स्वतःला निधर्मी म्हणवता आणी आयडी मात्र नेमका 'धर्मदर्शक' निवडलात...ईंट्रेस्टींग!
10 Sep 2010 - 1:13 am | शहराजाद
माझा आयडी तुम्हाला धर्मदर्शक वाटला, हेच 'ईंट्रेस्टींग' वाटते. आता यशोधरा हे बुद्धाच्या पत्नीचे नाव, म्हणून ते बौद्धधर्मदर्शक म्हणाल का? एखाद्याला निव्वळ ते नाव आवडले म्हणूनही घेता येते. शाहरुख हे नाव अर्थ आवडला म्हणून किंवा आवडत्या नटाचे म्हणून देखील कोणी घेऊ शकतोच. जालावरचे आयडी ठरवताना सर्वच बाबतीत तुम्ही जसे आहात तीच व्यक्तीमत्व निवडायची का? निधर्मी म्हणवणाऱ्यांनी चार्वाक वगैरेसारखीच नावं घ्यावीत आणि धर्मश्रद्धांनी आपापल्या धर्माशी संबंधितच नावे घ्यावीत असे थोडेच आहे? एखादे नाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी आवडू शकते. माझा आयडी म्हणजे 'परीकथेतल्या वजीरकन्ये'चे नाव आहे. मला माहीत असलेली फोड - शहर + आजाद अशी आहे. तो अर्थ आणि वाङमयीन संदर्भ मला आवडला. खलास.
10 Sep 2010 - 1:53 am | टिउ
बरोबर आहे. पण यशोधरा आयडी घेउन 'बुद्धधर्मात काही अर्थ नाही' किंवा शाहरुख आयडी घेउन 'ईंडस्ट्रीतले सगळे खान टुकार आहेत' असं म्हटलं की भुवया उंचावणारच! (यशोधरा किंवा शाहरुख या आयडींचे विचार असे आहेत असं म्हणायचं नाहीये). आयडी निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहेच की. तुम्ही परदेशी लोकांचं धर्माविषयी प्रबोधन करता पण आयडी मात्र असा निवडला म्हणुन मला आश्चर्य वाटलं. बर्याच लोकांचे विचार प्रत्यक्षात 'अनोळखी' लोकांचं प्रबोधन करण्याइतके कट्टर नसतात त्यामुळे त्यांचे आयडी वाचुन आश्चर्य वाटत नाही. जालावर काय, सगळेच प्रबोधनकार असतात!
10 Sep 2010 - 4:50 am | शहराजाद
'असा ' म्हणजे धार्मीक असे तुम्हाला अभिप्रेत आहे असे वाटते. ( तसे नसल्यास असा म्हणजे कसा ते कळवावे) मुळात, हे नाव निधर्मी लोकांना न शोभणारे, धार्मीकांनाच शोभणारे आहे असे मला वाटत नाही. त्याबद्दल मी वरच्या प्रतिसादात लिहिले आहेच. माझी धर्मविषयक वैयक्तिक निवड आणि शहराजाद आयडी यांचा संबंध नाही. तसेच एखादा आयडी निवडण्यामागे वेगवेगळी कारणेही असू शकतात.
ह्याचा इथे संबंध काय? मी वरील लेखात कुठल्याच धर्माला, व्यक्तींना 'टुकार' , 'अर्थ नाही' असे म्हटलेले नाही.
लेखामध्ये, 'मी स्वतः रूढार्थाने कुठलाही धर्म पाळत नाही' एवढेच म्हटलेले आहे, आणि ते पुढील उत्तराच्या संदर्भात आले आहे. शहराजाद आयडीने हे लिहिण्यात मला काही गैर वाटत नाही.
असो.
9 Sep 2010 - 8:07 pm | वेताळ
अजुन काय काय शोधता येते का पहा.
9 Sep 2010 - 8:09 pm | धमाल मुलगा
च्छ्या:!
काय बॉ झोल आहे?
सिंधूनदीकाठचा देश तो हिंदूस्थान, त्या हिंदूस्तानात राहणारे ते हिंदू... हा मुलभुत मुद्दाच आपल्याकडच्या मानसिकतेमधून पुरता पुसला गेलाय हेच खरं. मग उडतात तिच्यायला फटाके कुठल्याशा बेकर्यांत आणि मॉलमध्ये!
पण इतर देशांमध्ये कुठेतरी हे मूळ अजुन ठाऊक दिसते आहे हाच काय तो दिलासा.
अवांतरः ३००+ च्या वाटचालीकरिता शुभेच्छा.
9 Sep 2010 - 9:00 pm | सुहास..
सिंधूनदीकाठचा देश तो हिंदूस्थान, त्या हिंदूस्तानात राहणारे ते हिंदू... हा मुलभुत मुद्दाच आपल्याकडच्या मानसिकतेमधून पुरता पुसला गेलाय हेच खरं. >>>.
धम्या !! एक मिनीट ???
सर्वात पहिले आपल्याला 'हिंदु' म्हणुन कोणी,कधी, का आणी कोठे संबोधले गेले याचा अभ्यास कर आधी ..
बाकी..आम्ही कुठे-कुठे चपात्या लाटल्याची जाहिरातबाजी करायची म्हणुन नाही ...पण अगदी' डाऊन-टाऊन'ला, मला लुटताना,मार खाणार्यांनापासुनही माझ भारतीय-हिंदु-मराठीपण ' लपुन राहिले नाही.
असो .नेहमीप्रमाणे 'अर्धवट' माहीती असणारा/घेणारा चुकार धागा...(या वाक्याचा आमचे मित्र'अर्धवट' अथवा समस्त विषयातं पारंगत असलेले 'अर्धवटराव' यांच्याशीही संबध नाही)...त्यामुळे चालु द्या ..वाटल तर लिहील अन्यथा सध्या फाटा मोकळाच आहे..
9 Sep 2010 - 9:11 pm | धमाल मुलगा
>>सर्वात पहिले आपल्याला 'हिंदु' म्हणुन कोणी,कधी, का आणी कोठे संबोधले गेले याचा अभ्यास कर आधी ..
नक्कीच सायबा! त्यात तुझी मदत झाली तर आवडेलच. फक्त त्या दस्तऐवजांची विश्वासार्हता पुरेपुर असावी इतकंच. :)
10 Sep 2010 - 2:51 am | अर्धवटराव
-समस्त विषयातं पारंगत असलेले 'अर्धवटराव'...
आम्हि त्या सर्व विषयांच्या शिकवण्या देखील घेतो. सद्ध्या बॅच फुल्ल आहे मात्र !!
(मास्तर) अर्धवटराव
9 Sep 2010 - 9:02 pm | छोटा डॉन
बेश्ट, आम्ही अशाच प्रतिसादाची वाट पहात होतो.
च्यायला आजकाल काही लेख वाचुन भयंकर वैताग आणि कीव यायला आहे स्वतःचीच, तत्वज्ञान आणि तार्किक क्रिडेलाही एक लिमिट असावे ...
असो, जाऊ द्यात ...
+१, हेच आमचे मत आहे.
शहराजाद ह्यांचे अंडरस्टँगिंग नेमके उलटे आहे व त्याणी हटकुन चुकीचा असा मेसेज तिथपर्यंत पोहचवला.
"हिंदु" म्हणजे नक्की काय ह्याची परकियांना ( पक्षी : परदेशात राहणार्या नॉन्-भारतियांना ) पुरेपुर ओळख करुन देण्याचा चान्स त्यांनी उगाच तात्विक उच्चभ्रुतेच्या नादात फुकट घालवला असे आमचे वैयक्तिक मत आहे.
बाकी हिंदु म्हणजे काय हो ?
ती आहे एक संस्कृती, कसली ह्याचे उत्तर फार गहन आहे, आम्हाला कळालेले नाही हे स्पष्ट मान्य करतो. पण जे काही लोक सिंधुनदीच्या आसपास रहात होते, ज्यांनी स्वतःची एक संस्कृती विकसिक केली आणि आपल्याबरोबर ते ती ठिकठिकाणी घेऊन गेले आणि त्यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी ती संस्कृती, विचारधारा, जीवनपद्धती वगैरे आत्मसात केले ते सर्व हिंदु ...
ह्यात मध्येच कुठे धर्म आला ?
आजकाल काही हाय प्रोफाईल सेलेब्रिटी "हिंदु" होतात ते काय त्यांनी 'ख्रिश्चन' हे ओळख मिटवायला का ?
अहो त्यांना ह्या 'हिंदु संस्कृती'चे तत्वज्ञान भावले असते, त्यांना त्यातुन काहीतरी चांगले हवे असते.
"मी हिंदु नाही , भारतीय आहे " हा उगाच तात्विकपणा शुद्ध बिनडोकपणा झाला ( हे शहराजाद ह्यांना उद्देशुन नाही ), भारत हा आजचा ( ऑफिशियली म्हटले त ६० वर्षे, अंदाजे ३०० वर्षे च्या पुढे नाही ), हिंदु संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे.
धर्म आणि राष्ट्र वगैरे व्याख्या नंतर निघाल्या, संस्कृती त्याहुन पुरातन आहे.
आपल्या भारतात राहणार्यांची हिंदु ही ओळख धर्मामुळे नसुन इथल्या सिंधु नदीच्या प्रदेशात विकसीत झालेल्या आणि नंतर आख्ख्या भारतात फोफावलेल्या 'हिंदु संस्कृती' मुळे आहे, त्यात मग सगळेच धर्म आणि जाती येतात ...
जाऊ द्या, बाकी तात्विक चर्चा झान चालु आहेत.
वाचताना डोके दुखते आहे तरीही वाचतो आहे, छान छान मजेशीर अतर्क्य तर्क आणि उच्चभ्रु मते वाचायला मज्जा येते आहे.
अवांतर :
आता महाराष्ट्र सोडुन भारताच्या इतर भागात प्रचलित असलेल्या "मराठे, मरगठ्ठे, मरहट्टे" बद्दल इथल्या थोर तात्विक अभ्यासकांचे आणि चिंतकांचे मत वाचायला आवडेल.
उत्तर भारतात "मराठे" जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना "जात" अपेक्षित असते की विशिष्ठ भागात राहणारा समुदाय ?
अतिअवांतर :
चर्चा चालु द्यात, अनेक मतेही येऊद्यात पण ही चर्चा नक्की कशासाठी आहे ते आधी ठरवा.
म्हणजे कसे "बेटिंग"च्या प्रतिसादांपक्षी आम्हाला इतर 'थोर तात्विक आणि चिंतनीय मते' वाचण्याचा अनुभव मिळेल ( टीप : हे मत 'छोटा डॉन' ह्या सदस्याचे वैयक्तिक असे प्रामाणिक मत समजावे.
बाकी सर्व काही उत्तम !!!
- छोटा डॉन
9 Sep 2010 - 9:09 pm | धमाल मुलगा
>>उत्तर भारतात "मराठे" जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना "जात" अपेक्षित असते की विशिष्ठ भागात राहणारा समुदाय ?
क्या बात है!
9 Sep 2010 - 9:17 pm | सुहास..
उत्तर भारतात "मराठे" जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना "जात" अपेक्षित असते की विशिष्ठ भागात राहणारा समुदाय ? >>
आम्हाला एकदा 'मर्द-मराठा' संबोधल्याचे आठवले ...असो ...
अवांतर : आजकाल म्हणजे ..'राज ठाकरे-मनसे' आल्यानंतर, तामीळानंतर 'मराठी' हा शब्द बाकी भारतीयांसाठी 'दखल-पात्र' झालाय हे मात्र खरे......
9 Sep 2010 - 10:37 pm | पक्या
>>बाकी हिंदु म्हणजे काय हो ?
>>ती आहे एक संस्कृती, कसली ह्याचे उत्तर फार गहन आहे, आम्हाला कळालेले नाही हे स्पष्ट मान्य करतो. पण जे काही लोक सिंधुनदीच्या आसपास रहात होते, ज्यांनी स्वतःची एक संस्कृती विकसिक केली आणि आपल्याबरोबर ते ती ठिकठिकाणी घेऊन गेले आणि त्यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी ती संस्कृती, विचारधारा, जीवनपद्धती वगैरे आत्मसात केले ते सर्व हिंदु ...
ह्यात मध्येच कुठे धर्म आला ?
हे असे आहे तर मग माझ्या तुमच्या धर्माचे नाव काय? आपल्याला (मला वा तुम्हाला) कोणी विचारले तुमचा धर्म कुठला? तर हिंदू असे उत्तर देणे चूक की बरोबर?
9 Sep 2010 - 10:41 pm | धमाल मुलगा
धर्म = वैदिक.
कागदोपत्री धर्म = हिंदू
द्वेषासाठी धर्म = हिंदू
आणि जगात पसरलेल्या इतर बर्याच देशांच्या दृष्टीनं देश = हिंदू!
काय पक्याभौ, वाचा की राव बाकीचेपण प्रतिसाद :)
10 Sep 2010 - 12:45 am | पक्या
कागदोपत्री धर्म हिंदू ना - मग आपण हिंदूच. (आपण म्हणजे ज्यांच्या कागदोपत्री तशी नोंद आहे किंवा तशी नोंद नसली तरी ज्यांना भविष्यात कधी करावी लागली तर)
जर एखाद्याला विचारले तुझा धर्म कुठला आणि त्याच्या कागदोपत्री हिंदू अशी नोंद नसेल तर त्याने म्हटलेले 'मी हिंदू नाही' हे योग्यच आहे.
10 Sep 2010 - 4:16 pm | धमाल मुलगा
:)
10 Sep 2010 - 2:47 am | अर्धवटराव
संस्कृती आणि रिलीजन (धर्म मुद्दाम म्हणत नाहि... हा एक आणखी अवांतर विषय होईल ;) ) यांची उत्तम उकल करुन दाखवलीत डॉनोबा !!
(धर्मी) अर्धवटराव
10 Sep 2010 - 2:12 pm | Pain
सहमत
9 Sep 2010 - 8:38 pm | अर्धवट
आसिंधू सिंधु पर्यंता यस्य भारतभूमीका.
पितृभू पुण्यभुश्चैव स वैर्हिंदुरितीस्मृतः
(मिपावरचे संस्कृतपंडीत आमच्या चुका दाखवून सुधारणा करतीलच... नाना, मेव्या.. जरा बघा की रे..)
9 Sep 2010 - 8:55 pm | विकास
खालील भाग हा स्वा. सावरकरांच्या "हिंदूत्वाच्या व्याख्येतून" घेतलेला आहे. त्यावर त्यांचा अजून खूप उहापोह आहे. पण सगळा येथे देत नाही...
----------------------------------------
9 Sep 2010 - 9:05 pm | अर्धवट
अर्थात हा श्लोक तात्यारावांचाच आहे.. फक्त हिंदुत्वाच्या व्याख्येविषयी काही उद्बोधक चर्चा चाललेली दिसलेली म्हणुन इथे दिला.. मुद्दा असा की.. एका विशीष्ठ भूभागावर राहणारे लोक अशी काही व्याख्या नाहिये. इतर दोन पॅरामीटर पण आहेतच..
एका पंडीतांनी लगेच आमचा व्याकरणात बाटलेला श्लोक ठाकठोक करून दिला... हा घ्या शुद्धीकृत श्लोक
आसिंधुसिंधूपर्यंता यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः॥
9 Sep 2010 - 9:18 pm | विकास
अर्थात हा श्लोक तात्यारावांचाच आहे.. फक्त हिंदुत्वाच्या व्याख्येविषयी काही उद्बोधक चर्चा चाललेली दिसलेली म्हणुन इथे दिला.
तुम्ही तुमच्या नावावर दिला वगैरे मी म्हणले नव्हते अथवा तसा उद्देश नव्हता. गैरसमज नसावा... माझ्या प्रतिसादात जे काही श्लोकाखाली दिले आहे, ते सावरकरांचेच शब्द आहेत माझे नाहीत असे म्हणायचा उद्देश होता.
एका विशीष्ठ भूभागावर राहणारे लोक अशी काही व्याख्या नाहिये.
या संदर्भात थोडे अधिक सावरकर उवाच:
या साठीच हिंदु शब्दाची व्याख्या कोणत्याही धर्मग्रंथाशी वा धर्ममताशीच तेवढी बांधून टाकण्याचे प्रयत्न दिशाभूल करणारे ठरतात. हिंदू शब्दाच्या व्याख्येचा मूल ऐतिहासिक पाया आसिंधुसिंधु भारतभुमिका हाच असला पाहिजे. तो देश नि त्यात निपजलेल्या धर्माच्या नि संस्कृतीच्या बंधनांनी अनुप्राणित झालेले राष्ट्र हेच हिंदुत्वाचे दोन प्रमुख घटक होत. म्हणूनच हिंदुत्वाची इतिहासाला शक्यतो धरून असलेली व्याख्या अशीच केली पाहीजे की,
आसिंधुसिंधु भारतभुमिका ही ज्याची पितृभू नि पुण्यभू आहे तो हिंदू
यातील पितृभू नि पुण्यभू हा शब्दांचा कोणत्याही व्याख्येत योजलेल्या शब्दांना असतो तसा, थोडासा पारिभाषिक अर्थ आहे.
"पितृभू" म्हणजे जिथे आपले आईबाप तेव्हढेच निपजले ती, असा अर्थ नव्हे, तर प्राचीन कालापासून ज्या भूमीत परंपरेने आपले जातीय नि राष्ट्रीय पूर्वज निवसत आले ती, असा अर्थ होतो. काही जण पटकन शंका घेतात की, आम्ही दोन पिढ्या आफ्रिकेत आहोत. मग आम्ही हिंदू नाही की काय? ती शंका यामुळेच अगदी उथळ ठरते. आमच्या हिंदूंनी सार्या पृथ्वीवर जरी वसाहती स्थापिल्या तरी त्यांची प्राचीन, परंपरागत, जातीय नि राष्ट्रीय पूर्वजांची पितृभू अशी ही भारतभूमीच असणार.
"पूण्यभू"चा अर्थ इंग्लिश "होलीलँड" ह्या शब्दातील अर्थ होय. ज्या भूमीत एखाद्या धर्माचा संस्थापक ऋषि, अवतार वा प्रेषित (पैंगंबर) प्रकटला, त्या धर्मास उपदेशिता झाला, त्याच्या निवासाने त्या भूमीस धर्मक्षेत्राचे पुण्यत्व आले, ती त्या धर्माची पुण्यभू. जशी ज्यूंची वा ख्रिश्चनांची पॅलेस्टाइन, मुसलमानांची अरेबिया. अशा अर्थे पुण्यभू शब्द वापरलेला आहे. नुसत्या पवित्रभूमी या अर्थी नव्हे.
पितृभू नि पुण्यभू शब्दांच्या ह्या पारिभाषिक अर्थी हि आसिंधुसिंधु भारतभुमिका ज्याची ज्याची पितृभूम्नि आणि पुण्यभूमि आहे तो हिंदू!
हिंदूत्वाची ही व्याख्या जितकी ऐतिहासिक तितकीच, आजच्या वस्तुस्थितीला अगदी धरून आहे. ती जितकी सत्य तितकीच इष्ट आहे, जितकी व्यापक तितकीच व्यावर्तकही आहे.
संदर्भः सावरकर एक अभिनव दर्शन - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध विषयावरील निवडक लेख.
मूळ संदर्भस्त्रोतः सह्याद्री : मे १९३६
9 Sep 2010 - 9:34 pm | मेघवेडा
सुरेख विश्लेषण! :)
9 Sep 2010 - 9:54 pm | पैसा
१००%
9 Sep 2010 - 11:59 pm | सुनील
हिंदू ह्या शब्दाच्या वरील व्याख्येनुसार, मूळ भारतीय वंशाचे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख हे हिंदू ठरतात. ह्या व्यतिरिक्त अन्य समाज हे अहिंदू ठरतात.
अशा अहिंदूंत, जसे बालीतील हिंदू येतात तसेच भारतातील मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू आणि पारशीदेखिल येतात.
ही माझी समजूत खरी आहे काय?
10 Sep 2010 - 12:43 am | विकास
ज्यांची भारताशी जन्माने अथवा वंशाने (अर्थात अनिभांच्या पुढील पिढ्या) अथवा स्वेच्छेने आणि म्हणून पर्यायाने भारतीय संस्कृतीशी नाळ जोडली गेली आहे त्यांना हिंदू म्हणावे असा याचा अर्थ आहे. त्या संदर्भात मी सावरकरांचे इतरत्रही वाचलेले आठवते पण आत्ता माझ्याकडे संदर्भ नाही.
वर "हिंडू" (Hindoo) हा शब्द देखील आला आहे. जो आधी वापरला जायचा. त्याचा पहीला अर्थ देखील विकीमधे भारतातून आलेले असाच दिला आहे.
10 Sep 2010 - 8:12 am | आमोद शिंदे
ज्यांची भारताशी जन्माने अथवा वंशाने (अर्थात अनिभांच्या पुढील पिढ्या) अथवा स्वेच्छेने आणि म्हणून पर्यायाने भारतीय संस्कृतीशी नाळ जोडली गेली आहे अशा मुसलमानांचे काय? तेही हिंदूच का?
10 Sep 2010 - 11:46 am | अर्धवट
>>म्हणून पर्यायाने भारतीय संस्कृतीशी नाळ जोडली गेली आहे अशा मुसलमानांचे काय? तेही हिंदूच का?
अशी नाळ खरोखर जुळली असेल तर नक्कीच.. केवळ मुसलमानच नव्हे तर ख्रिश्चन वगैरेही..
म्हणजे त्यांना काही हरकत नसेल तर.. अर्थात एकदा हिंदू हा शब्द एवढ्या व्यापक अर्थाने घेतल्यावर त्यांची हरकत नसावी असा प्राथमीक अंदाज.