हिंदुत्व आणि भारतीयत्व

शहराजाद's picture
शहराजाद in जनातलं, मनातलं
9 Sep 2010 - 11:21 am

समरमध्ये इथे, म्हणजे अमेरिकेत, फार्मर्स मार्केट नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे जागोजागी आठवड्याचा बाजार भरतो. आम्ही सबर्बमध्ये राहतो, खरेदी सुपरमार्केटमध्ये करतो. त्याऐवजी एखाद्या शनिवारी किंवा रविवारी सकाळी शहरांमध्ये जागोजागी आसपासच्या शेतांतून येणारा ताजा भाजीपाला व फळं विकण्यासाठी शेतकरी व मळेवाले येतात. खरेदीसाठी भारतीय व चिनी लोक तसेच ऑर्गॅनिक व फ्रेश खाण्याची हौस असलेले अनेक अमेरिकन तिथे येतात. या बाजारातून नुसता फेरफटका मारणे हादेखील अतिशय उल्हसित करणारा अनुभव असतो.
परवाच आमच्या इथल्या भाजीबाजारात एका अनोळखी अमेरिकन बाईशी माझे बोलणे झाले. भाजी निवडताना "तो पलिकडचा भोपळा इथे देता का?" "घेवडा फार छान आहे नाही?" "तुमच्याकडे कसा करतात" इत्यादी झाल्यावर तिने मला विचारले,
"तुम्ही हिंदू आहात, हो ना?" आता तसं म्हटलं तर मी कुठलाच धर्म रूढार्थाने पाळत नाही. म्हणून मी म्हटले,
"नाही, मी भारतीय आहे"
"पण भारतीय म्हणजेच हिंदू ना?" तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसले.
"हिंदू हा धर्म आहे. जसे ख्रिश्चन, मुस्लीम तसेच हिंदू. खूपसे भारतीय हिंदू असतात. पण इतर धर्माचेही अनेक लोक भारतात राहतात." मी म्हटले
नवीन मिळालेल्या ज्ञानाने तिचा गोंधळ उडालेला दिसत होता. खरे तर भारतीय या विषयावर एखादे लघु व्याख्यानही झोडायला मला आवडले असते. पण स्थळ काळ अनुकूल नव्हते.

आणखीन असाच एक दुसरा अनुभव.

इथल्या एका लायब्ररीत मला काही हिंदी पुस्तकं बघायची होती. लायब्ररीयनने सांगितलं की "या इथून पलिकडे परदेशी भाषांचा विभाग आहे. तिथे तुम्हाला "हिंडू" भाषेतली पुस्तकं मिळतील." तिथेही मला तिचं हिंदी भाषा व हिंदू धर्म या बाबतीत थोडंसं प्रबोधन करावं लागलं. सगळे हिंदी भाषिक हिंदू नसतात, सगळे हिंदू हिंदी बोलत नाहीत, आणि सगळे भारतीय हिंदू किंवा हिंदीभाषिक नसतात हे समजावून सांगायला थोडे कष्ट घ्यावे लागले.

तसे बघितले तर इंडियन शब्दाचे मूळ हिंदू शब्दाच्या जवळच जाते. सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे ते हिंदू आणि त्या प्रदेशाचे नाव हिंद किंवा हिंदुस्तान. सिंधूचं इंडस रिव्हर झालं तसं हिंदचं इंडिया झालं. त्यात हिंदी हे भाषेचं नाव त्याच मुळांमधून आलेलं. मात्र आजच्या काळात हिंदू शब्दाने धर्म सूचित होतो, तर भारतीय शब्दाने भारतावर निष्ठा असणारे सर्वधर्मी नागरिक सूचित होतात.

भारतीय समाजाशी इतका संपर्क येऊनही परदेशातल्या लोकांमध्ये इतक्या मूलभूत बाबतींमध्ये गोंधळ असू शकतो, याचं आश्चर्य वाटलं. वरील प्रसंगांमध्ये शब्दांमधल्या साम्यामुळे व अज्ञानामुळे हे झाले असावे, त्यामुळे मला त्यांचा राग आला नाही. मात्र आपला समाज, आपली संस्कृती, आपला देश, आपली ओळख (आयडेंटीटी) याबद्दल आपण जिथे राहतो त्या परदेशी समाजात जास्त अवेअरनेस असावा असे मनापासून वाटते. तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का?

संस्कृतीधर्मप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

आमोद शिंदे's picture

10 Sep 2010 - 5:52 pm | आमोद शिंदे

>>म्हणजे त्यांना काही हरकत नसेल तर..

इथेच तर गोची आहे ना. त्यांना हरकत का नसावी? हिंदू धर्म हा जिवनपद्धती वगैरे असला तरी ती एक अठरापगड गोष्टींची खिचडी आहे. अनेक देवता त्यांची मुर्तिपूजा इ. गोष्टी हिंदू जिवनपद्धतीच येणार ना? मग ह्या लोकांना हरकत का नसावी?

आणि दुसरे म्हणजे ह्या लोकांना हरकत असली तर लगेच वरील व्याख्येचा व्यत्यास करुन त्यांची नाळ भारतीयत्वाशी खरोखर जुळलेली नाही असे म्हणून त्यांच्या देशप्रेमावर शंका उत्पन्न केल्या जाणार.

हिंदू हा शब्द एवढ्या व्यापक अर्थाने घेतल्यावर हरकत नसावी असे तुम्ही म्हणता. पण तो इतक्या व्यापक अर्थाने घेतला जातो का? सर्वसाधारण व्यवहारात आपण हिंदूंच्या चालिरीती आणि मुसलमानांच्या/ख्रिश्चनांच्या चालिरीती असा भेद का करतो?

चर्च मधे जाणे, कुराण वाचणे, ख्रिसमस साजरा करणे ह्या सगळ्या हे लोक व्यापक अर्थाने हिंदू असल्याने हिंदू चालिरीतीच असे म्हणायची तुमची तयारी आहे का?

विकास's picture

10 Sep 2010 - 7:55 pm | विकास

हिंदू हा शब्द एवढ्या व्यापक अर्थाने घेतल्यावर हरकत नसावी असे तुम्ही म्हणता. पण तो इतक्या व्यापक अर्थाने घेतला जातो का? सर्वसाधारण व्यवहारात आपण हिंदूंच्या चालिरीती आणि मुसलमानांच्या/ख्रिश्चनांच्या चालिरीती असा भेद का करतो?

तसा व्यापक अर्थाने शिकवला जात नाही, म्हणून घेतला जात नाही. आता इथेच साधे उदाहरण बघा, आपल्याच वरील वाक्यात आपण म्हणता: "हिंदू हा शब्द एवढ्या व्यापक अर्थाने घेतल्यावर हरकत नसावी असे तुम्ही म्हणता." आता यात अधोरेखीत केलेला भाग म्हणत माझ्यासारखी व्यक्ती पुढे असे देखील म्हणू शकते की, "मग ह्या हिंदू व्याख्येमधेच काही गैर नाही आणि तशी ती पाळली तर उत्तमच होईल, कारण त्यातून रिलीजन हा भाग निघूनच जाईल." ही चर्चा एका अर्थी सावरकरांनी केलेल्या हिंदू शब्दाच्या व्याख्येवरून चाललेली आहे. वास्तवीक सावरकर हे पूर्ण नास्तिक होते असे म्हणता येईल असे त्यांचे विचार होते. एका लेखात त्यांनी या अर्थाचे स्पष्ट पणे म्हणलेले आहे की (आठवणीतून), "मला हिंदू शब्दाचे पण काही धर्म अर्थाने पडलेले नाही... मात्र जो पर्यंत जगात इतर धर्म आहे आणि त्या धर्मांच्या नावाने राज्यकर्ते आहेत तो पर्यंत हिंदू हा शब्द मला माझ्या ओळखीसाठी महत्वाचा वाटतो." म्हणूनच त्यांनी हिंदू हा शब्द जो खर्‍या अर्थाने जगात तेंव्हा तर जास्तच वापरला जात होता त्या अर्थाने म्हणजे भौगोलीक अर्थाने वापरला आणि प्रचलीत करायचा प्रयत्न केला.

चर्च मधे जाणे, कुराण वाचणे, ख्रिसमस साजरा करणे ह्या सगळ्या हे लोक व्यापक अर्थाने हिंदू असल्याने हिंदू चालिरीतीच असे म्हणायची तुमची तयारी आहे का?

हा रिलीजनच्या डबक्यात अडकून विचार करणे झाले. अहो कुराण आणि ख्रिसमसचेच काय घेऊन बसलात. येथे आजही दक्षिणेत शैव म्हणजेच काय ते खरे मानणारे आहेत आणि त्यांचे वंशज आता अमेरिकेत देखील भेटतात...

"हिंदू" व्याख्येचा आणि रिलीजनचा संबंध नसून जी शतकानुशतके/सहस्त्र वर्षांमध्ये तयार झालेली भारतीय संस्कृती आहे तीला आपले म्हणणे ह्याच्याशी आहे. मी रिलीजनने बुद्ध नसलो तरी मी बुद्धाला आपलाच मानतो आणि जैन नसलो तरी महावीरास... धर्माने वेगळे असून अनेक मुस्लीम, ख्रिश्चन आणि ज्यू हे भारतीय संस्कृतीस आपले मानताना दिसतातच. त्यात माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आहेत आणि अगदी सध्याच्या लोकप्रिय नटांमधील अमीर/शहारूख पण तसे वाटतात. शाहरूख खानची बरखा दत्त ने घेतलेली मुलाखत तर पाहण्यासारखी आहे... त्याच बरोबर तुकारामाच्या रंगात रंगणारे फादर थॉमस डाबरे पहा.

विद्यार्थीदशेत बॉस्टनमधे एका भाड्याच्या घरात रहाताना आमचा घरमालक हा केरलाईट ख्रिश्चन होता. पण ख्रिश्चन असून त्याला इतर आजूबाजूचे ख्रिश्चन आवडत नसत.. त्याला भारतीयच जवळ वाटायचे आणि घरातील येशूच्या आरत्या (ज्या आम्ही अनेकदा ऐकल्यात) सोडल्यास मुलींना भारतीय पद्धतीने वाढवणेच करणे चालले होते. तेच एका हैदराबादी मुस्लीम कुटूंबाचे जवळून पाहीलेले आहे. असे अनेक सांगता येईल.

असो.

आमोद शिंदे's picture

11 Sep 2010 - 3:16 am | आमोद शिंदे

मी जेव्हा इतर धर्मांचा संदर्भ दिला तेव्हा तुम्ही लगेच मला रिलीजनच्या डबक्यात अडकून विचार करणे असा शेरा दिलात. पण साक्षात तात्याराव सावरकरही "जो पर्यंत जगात इतर धर्म आहे आणि त्या धर्मांच्या नावाने राज्यकर्ते आहेत तो पर्यंत हिंदू हा शब्द मला माझ्या ओळखीसाठी महत्वाचा वाटतो" असा धर्माचा संदर्भ देतात तेव्हा त्यांनाही तुम्ही रिलीजनच्या डबक्यात अडकून विचार करणे असे म्हणाल का?

धर्म आणि राष्ट्रियत्व याची सांगड घातल्याने कसा धोका निर्माण होतो ह्याचा वस्तुपाठ तुम्ही ह्या प्रतिसाद दिला आहे. तुमच्या प्रतिसादातील हे वाक्य पाहा; "त्याला भारतीयच जवळ वाटायचे आणि घरातील येशूच्या आरत्या (ज्या आम्ही अनेकदा ऐकल्यात) सोडल्यास मुलींना भारतीय पद्धतीने वाढवणेच करणे चालले होते."घरात येशूच्या आरत्या म्हणणे हे तुम्हाला भारतीय पद्धतीचेच उदाहरण का वाटत नाही?

विकास's picture

11 Sep 2010 - 7:52 am | विकास

"घरात येशूच्या आरत्या म्हणणे हे तुम्हाला भारतीय पद्धतीचेच उदाहरण का वाटत नाही?

वाटते ना! तेच तर मी सांगायचा प्रयत्न करत होतो. ख्रिश्चन असल्याने येशूभक्त पण तरी देखील भारतीय पद्धतीप्रमाणे आरत्या करत असे आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे मुलींना वाढवायचा प्रयत्न हेच तर सांगत होतो.

"जो पर्यंत जगात इतर धर्म आहे आणि त्या धर्मांच्या नावाने राज्यकर्ते आहेत तो पर्यंत हिंदू हा शब्द मला माझ्या ओळखीसाठी महत्वाचा वाटतो" असा धर्माचा संदर्भ देतात तेव्हा त्यांनाही तुम्ही रिलीजनच्या डबक्यात अडकून विचार करणे असे म्हणाल का?

नुसते त्यांचे तेव्हढेच विधान माहीत असते तर नक्कीच म्हणले असते. पण त्यांचे इतर आचार-विचारांची त्या विधानाबरोबर सांगड घातल्यावर तसे म्हणणार नाही. त्यासंदर्भात मी वरील प्रतिसादात त्यांची नास्तिकता (आणि त्या प्रतिसादात न लिहीलेली विज्ञाननिष्ठ वृत्ती) पण सांगितली आहे आणि त्यांचा समाजाला कुठली दिशा दाखवण्याचा उद्देश होता हे देखील सांगितले आहे, त्याकडे पण आपले लक्ष गेले अशी आशा करतो.

आमोद शिंदे's picture

11 Sep 2010 - 11:56 pm | आमोद शिंदे

तसे असेल तर तुमच्या मूळ वाक्यात येशूच्या आरत्या 'सोडल्यास' असे लिहिण्याचे कारण काय?

सावरकरांचे बाकिचे विचार काहीही असले तरी हिंदू शब्दाची व्याख्या करताना त्यांच्या डोक्यात धर्मच होते असे वरील वाक्यातून स्पष्ट दिसते. (इतर वेळेला ते नास्तिक होते म्हणून त्यांचे हे वाक्य दुर्लक्षीत करावे असे तुमचे मत आहे का?)

>>हिंदू ह्या शब्दाच्या वरील व्याख्येनुसार, मूळ भारतीय वंशाचे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख हे हिंदू ठरतात.
अगदी बरोबर आहे.. हे सर्व हिंदु नाहीत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

>>ह्या व्यतिरिक्त अन्य समाज हे अहिंदू ठरतात.
सर्वसाधारण विधान करता येणार नाहीत पण, तुम्ही त्या समाजांची काही वैशिष्ठ्ये सांगितलीत तर याच व्याख्येवर तपासुन बघता येइल.

तीन मुख्य अटी आहेत.

  1. वास्तव्य / जन्म
  2. पितृभू
  3. पुण्यभू

तीनही अटी अर्थातच व्यापक अर्थाने घ्यायच्या आहेत.

माझ अनुभव - इथे अमेरीकेत एका चेनइ मधल्या एका मुस्लीम गॄहस्थांशी आणि त्यांच्या पत्नीशी ओळख झाली. नंतर त्यांच्या घरी "हाऊस वॉर्मींग" करता जाण्याचा योग आला. त्यांच्या तरुण मुलानी मुद्दाम बेडरूम ला हिरवा रंग दिला होता.हिरव्या रंगाला इस्लाम मधे मानाचं स्थान आहे हे नंतर कळलं.

इथे परदेशात अनेक बांग्लादेशी, पाकिस्तानी सहकारी भेटतात , मनात काहीही अढी न ठेवता एकमेकांबरोबर जुळवून घेतलं जातं.

मला इथे अजून एक जाणवलं ते म्हणजे हिंदू अथवा मुस्लीम धर्मापेक्षा बौद्ध धर्माचा खूsssssपच जास्त प्रसार झालेला आहे. जिकडे तिकडे अमिताभ, तारा, बुद्ध यांच्या मूर्ती, पुस्तकं यांची रेलचेल दिसते.

प्रभाकर कुळ्कर्णी's picture

9 Sep 2010 - 9:33 pm | प्रभाकर कुळ्कर्णी

शहराजाद, मी रशिया पासून १९९१ मधे विभक्त झालेल्या 'अझरबैजान' देशात काही काळ नौकरीला होतो. तीथल्या स्थानिका पैकी एकाने ओळख झाल्यावर मला विचारले की तूझा धर्म कोनता? मी हिन्दू म्हने. तो म्हने हिन्दू ठीक आहे रे पन धर्म कोनता. मी पुन्हा तेच उत्तर दिले. मला समजेना हा असे काय विचारतोय. बर्याचदा असे विचारा विचारी झाल्यावर तो काही आठवून म्हणे 'बुध्द?'. मग त्याचे दोन्ही हात नम्स्कार सारखे जोडुन " क्रष्णा" काय? म्हणुन विचारले. मी पटकन हो म्हणुन सुटका करुन घेतली माझी. मग म्हणे ईथे पन तुमचे 'क्रष्णा' लोक काही आहेत. खरेच होते, आहेत. ईस्कान वाले काही लोक.
गम्मत असी आहे. भारत हा जगात फार जुना देश असल्यामुळे जगातल्या बर्याच देशातले लोक भारताला,भारतातील लोकांना फार चांगले ओळखतात. तर अश्या बर्याच देशांत त्यांच्या ईतीहासात भारताचा उल्लेख आजही ' हिन्दीस्तान' आहे. हिन्दीस्तानात रहाणार्या लोकांना ते 'हिन्दी' वा' हिन्दू' म्हणतात आजही. एक थाईल्यांडी क्रेन आपरेटर भेटला तीथेच कामाला असलेला. तो म्हणे " ओ, गब्बर सिन्ग". ईकडचे तीकडचे बोलुन झाल्यावर मी त्याला विचारले त्याचा धर्म कोनता? तो स्वाभीमानाने म्हणे " बुध्दा! बुध्दा फ्राम ईन्डिया" .तर त्या बाईने, " तुम्ही हिन्दू आहात ना?" विचारले. म्हण्जे तिच्या द्र्ष्टी ने " तुम्ही भारतीय आहात ना?". गोरी असेल तर कदाचीत ती रशियन अमेरिकन असेल. एकादा विमानात गोर्या गोर्या एअर होस्टेस होत्या. छान बोलत होत्या. मी काहीतरी विचारावे म्हणून एकीला विचारले," विच कंट्री यु आर फ्राम?" ती म्हणे" आय याम ईन्ग्लीश ". माझ्या पटकन लक्शात आले की ईन्ग्रज आहे ती. ईन्ग्लंड च्या लोकांना ईन्ग्लीश म्हण्तात. त्यांची भाषा पन ईन्ग्लीशच.
जे मला कळलं ते लिहिलं . ईतर वाचकांनी पन पटलं तर घेने. नाही तर ईथेच सोडुन देने.

धमाल मुलगा's picture

9 Sep 2010 - 9:48 pm | धमाल मुलगा

मस्तच प्रभाकरराव. :)

आमोद शिंदे's picture

10 Sep 2010 - 6:07 pm | आमोद शिंदे

>>ईन्ग्लंड च्या लोकांना ईन्ग्लीश म्हण्तात. त्यांची भाषा पन ईन्ग्लीशच.

बरोबर. जसे महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी म्हणतात. कारण त्यांची भाषा पण मराठीच.

'आय अ‍ॅम ख्रिश्चन' असे थोडीच म्हणाली ती?

सुहास..'s picture

9 Sep 2010 - 9:42 pm | सुहास..

प्रभाकर , आपला माय-मराठी लेखनशुध्दता सोडुन, प्रतिसाद आवडला ब्वा !!

इन्द्र्राज पवार's picture

10 Sep 2010 - 12:59 am | इन्द्र्राज पवार

श्री.छोटा डॉन यानी वरील प्रतिसादात संस्कृतीच्या अनुषंगाने काही विचार मांडले आहेत त्याला प्रत्युत्तर नव्हे तर त्यांचाच मुद्दा पुढे न्यावा म्हणून....

बाकी हिंदु म्हणजे काय हो ? ह्यात मध्येच कुठे धर्म आला ?
ठीक आहे....संशोधनाअंती हे सर्वदूर मान्य झाले आहे की, 'सिंधू' नदीच्या काठी वसलेल्या, फुललेल्या संस्कृतीच्या प्रसाराला (प्रचाराचे रूप देऊन) 'हिंदू कल्चर' हा शेला मिळाला. पण तो काही 'धर्म' नव्हता हे जितके खरे तितकेच हेही खरे की 'मास लेव्हल'चे जीवनशकट निर्धोकरितीने चालविण्यासाठी काहीनी काहीना 'प्रमुख' पदाचे ग्रहण करण्यास भाग पाडले आणि तिथे वर्तनात एकवाक्यता आणण्यासाठी काही 'लॉ' स्थापित केले (अनुभवातून, गरजेतून वा दबाव कायम राखण्यासाठी....जनावरापेक्षा 'माणूस' वेगळा, म्हणून मोठा आहे हा इगो तोपर्यन्त प्रवेश करता झालाच होता). हे 'लॉ' - 'नियम' म्हणजेच एक सुखाने जगण्यासाठी प्रस्थापित केलेली एक जीवनशैली, जिला सर्वमान्यता त्या त्या काळात (बाय हूक ऑर बाय क्रूक) मिळत गेली...मिळविली गेली. टोळीपद्धतीने राहिलेल्यांचे 'नियम' म्हणजे त्यानुसार जगणे आणि जगण्याचे नियम पाळण्याची धारणा म्हणजे धर्मपालन. थोडक्यात एका संस्कृतीने ती जपण्यासाठी केलेले नियम म्हणजेच धर्म. (अर्थात त्याला मग पुढे 'देव' पण आले, भीती आली, त्यामुळे 'देव' नावाच्या अज्ञाताला भजणे आले, त्याची भीती घालून त्याच्या भोवती कुंपण घालणे आले...इ.इ. ~ वेगळा विषय !). व्यापक अर्थाने पारमार्थिक गोष्टींच्या नियमासही धर्मच म्हणण्यात येऊ लागले, मग ते नियम कुणी केले, का केले, कुणाच्या फायद्यासाठी केले, प्रत्यक्ष ते नियम करणारे पाळतात की नाही या बाबी दुय्यम मानल्या गेल्या. चपखलपणे स्वर्ग, नरक, जन्म, पुनर्जन्म, जीव, जगत यांचे परस्परसंबध या सार्‍यांचा समावेश 'धर्म' या संज्ञेतच केला गेला आणि त्याचे पालन म्हणजेच ईश्वरी आज्ञेचे पालन हे सोयीस्कररित्या त्या संस्कृतीच्या छायेत बसलेल्या सर्वांच्या मनावर बिंबविण्यात आले.

धर्म आणि राष्ट्र वगैरे व्याख्या नंतर निघाल्या, संस्कृती त्याहुन पुरातन आहे.

~~ १००% सहमत....
उत्तर भारतात "मराठे" जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना "जात" अपेक्षित असते की विशिष्ठ भागात राहणारा समुदाय ?

~~ या ठिकाणी मी 'उत्तर भारतात' याची व्याख्या माझ्यापुरती 'पंजाब, हरियाणा आणि दिल्ली' इतक्या मर्यादित भागापुरती घेतो, कारण याच तीन भागात मी फिरलोय, राहिलोय, अभ्यास केलेला आहे, अगदी देशाच्या राजधानीपासून सिरसा, रोहटक, पंचकुला या ग्रामीण बाज असलेल्या हरियाणाच्या तर गुरदासपूर, संगरूर, कपूरथळा या पंजाबी जिल्ह्यात राहिलो आहे, तेथील लोकात मिसळलो आहे. दिल्लीचा विषय थोडा बाजुला सोडू या, पण या पाचसहा ग्रामीण 'टच' असलेल्या जिल्ह्यात मी पाहिले की, एकतर हे लोक (विशेषतः ज्येष्ठ या व्याख्येत येणारे) समोर दिसणारी व्यक्ती ही आपलीच आहे असे प्रथम मानतात, म्हणजे असे की, मी एका 'अ' चा मित्र किंवा 'ब' चा बिझिनेस पार्टनर म्हणून त्यांच्या घरी गेलो की त्या क्षणापासून मी त्याच घरातील एक सदस्य बनलोच....अगदी आपल्याकडील 'अरेतुरे' या लेव्हलवर....खाण्याचा तर माराच होतो...तब्येतीवर हसतखेळत जोक्स होतात. तो पर्यंत मी एक 'इन्द्रा', त्यांच्या मुलाचा मित्र/सहकारी/भागीदार या नात्याने, आणि दिल्लीतून आलोय एवढेच त्यांच्या गावी असते. मग केव्हातरी सुशेगात तो 'अ' माझ्याविषयी घरातील पुरुष मंडळीना ओळख करून देतो. त्यावेळी ही माहिती येते की आपल्या बलबीरचा 'इन्द्रा' मित्र हा महाराष्ट्रातील आहे. या क्षणाला किमान दोन म्हातारे तरी 'ओये पहले क्यूं बोला नै रे पुत्तर तू ये ! अरे वा भाइ वा ये इन्दर तो अप्ने शिवजी (शिवाजीचा अपभ्रंश...) की मिट्टी का है बोले तो !" असे म्हणत परत पाठीवर हात. अगदी असाच नसला तरी प्रत्येक ठिकाणी प्रथमच जाईन तिथे समकक्ष अनुभव येत होता. थोडक्यात पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी आलेल्या महाराष्ट्रातील पाहुणा म्हणजे 'शिवजी के गाववाला' हाच तुरा आणि स्वागताची रित तर सर्वत्र एकाच धाटणीची असते....मन:पूर्वक म्हणजे मनःपूर्वक. मग केव्हातरी रात्री अंगणात चारपाईवर पडल्या पडल्या गप्पा रंगताना त्यातील कुणीतरी केव्हातरी महाराष्ट्रात उमेदीची वर्षे घालविलेला निघतोच निघतो. मुंबई तर कॉमन झाली पण पुण्यातील 'खडकी कॅन्टोनमेंट' च्या आठवणी निघत नाहीत अशी एकही रात्र जात नाही.

पण का कोण जाणे....या सहाही जिल्ह्यातील ज्या ज्या घरी मी गेलो (किमान अठरावीस तरी होतीलच) त्यापैकी कुणीही मला 'जात' विचारली नाही. मी हिंदू आहे हे त्यांनी गृहित धरले होतेच...पण ब्राह्मण की मराठा की अन्य बहुजन समाजी...याची विचारपूस एकदाही झाली नाही. अर्थात माझे 'पवार' या आडनावाने त्यांनी काही तर्क बांधले असतील तरी ते त्यांनी कधीही दाखविले नाही. स्वागत आणि पाहुणचार मात्र आजही पहिल्या भेटीसारखाच असतो. (मलाही माझे मित्र बलबीर अरोरा, कृपाल धुपिया, रणधीर धालीवाल, रवी बादल यांची 'जात' काय आहे हे बिलकुल माहिती नाही, मी या सर्वांना शिख असेच समजतो. यांच्यातही सेगमेन्ट असतातच. पण वरकरणी मात्र हे सातत्याने एकजुटीनेच राहात असल्याचे चित्र दिसतेच.)

(या भागातील अन्य कुणाचे असे अनुभव असल्यास वाचायला आनंद होईल.)

इन्द्रा

पुष्करिणी's picture

10 Sep 2010 - 1:22 am | पुष्करिणी

इंद्रा, तुझ्या उत्तरेतला अनुभव बरोबरच आहे. तुझ्या त्या मित्रांना 'मराठा' ही जात म्हणून माहितच नसेल. माझ्या ओळखीचे दक्षिण -उत्तरेतले लोकं मराठा हा शब्द जातीविषयक नाही तर प्रांत-भाषा विषयक म्हणूनच वापरतात. ते मला मराठा किंवा घाटी म्हणतात. अशावेळेस जर मी त्यांना 'मी जात पात मानत नाही' असं सांगत बसले तर...??

मी बर्‍याच इराकी, इराणी, तुर्की लोकांबरोबर काम करते, ही लोकं हिंदी, हिंदू ,हिंदीस्तान, इंडीस्तान हे शब्द समानअर्थी शब्द म्हणून वापरतात. एका कुर्दीश पिझेरिया मधे मी पिझा खायला जाते ते लोकही मला हिंदू म्हणतात ( भारतीय या अर्थाने , कारण आमच्यामधे कधीही धर्माबद्दल बोलणं झालेलं नाही ). इथेही मला ते कोणत्या अर्थानं म्हणत आहेत हे माहित असतं .

मी वरील दोन्ही उदाहरणातील बाबी शब्दशः न घेता त्यातलं मर्म जाणून घेते.

इतकच म्हणावस वाटत की Look at the the Spirit, Not just the Letter

छोटा डॉन's picture

10 Sep 2010 - 1:43 am | छोटा डॉन

श्री. इन्द्रा आणि पुष्करिणी ह्यांचे दोन्ही प्रतिसाद छान आहेत.
मला मांडायचा होता तो मुद्दा ह्या प्रतिसादांतुन पुरेसा स्पष्ट झाला आहे.

भारताबाहेर 'हिंदु' ही अजुनही बर्‍याच अंशी धर्माची ओळख नसुन एका संस्कृतीची ओळख आहे असे आम्हाला वाटते, आम्हीही ४ देशांच्या लोकांबरोबर राहिलो आहे व धर्म आणि संस्कृतीवर बर्‍याच लंब्याचौड्या गप्पा मारल्या आहेत.
त्यातल्या अनुभवांचे सार म्हणुन "तु हिंदु का?" ह्या परदेशी प्रश्नाचे उत्तर देताना त्यांना आपला धर्म नको असुन आपला "प्रदेश" महत्वाचा असतो हे जाणण्याइतपत शहाणपण आले आहे.

अजुन एक गंमत सांगतो, आमचा एक मित्र आहे नॉर्थ-ईस्ट मधला, धर्माने ( आणि नावानेही ) ख्रिश्चन आहे व तसाच एक केरळी ख्रिश्चन मित्र आहे, पण त्यांची ओळख बाहेर मात्र 'हिंदु'च आहे बरं का.
इनफॅक्ट 'हिंदु' हा जसा धर्म आहे तशीच ती भारताची संस्कृती आहे हे त्यांना मान्य आहे.

----------------------------------------------------------------
आता जरासा अंमळ विनोद.
कणेकरांच्याच स्टायलीत मी शहराजाद ह्यांचे वाक्य सांगतो.
"मै तुम्हारे सामने हिंदु की हैसियत से नहीं बल्की भारतीय की हैसियत से खडा हुं. म्हणजे काय ? अरे तुच ना तो ? ह्या २-२ हैसियती आल्या म्हणुन काय आतला तु बदलतोस का ? मग कशाला हे सगळे ? "

विनोद ( कळला असल्यास ) संपला.
बाकी चालु द्यात ....

- ( बाहेर एकच हैसियस सांगणारा ) छोटा डॉन

आमोद शिंदे's picture

10 Sep 2010 - 5:54 pm | आमोद शिंदे

>>बाहेर एकच हैसियस सांगणारा ) छोटा डॉन

अगदी बरोबर. आणि ही एकच हैसियत भारतीय का असू नये? तुम्ही तुमची ओळख हिंदू म्हणून सांगता की भारतीय म्हणून?

राजेश घासकडवी's picture

10 Sep 2010 - 2:07 am | राजेश घासकडवी

धर्म, जात, देश, प्रांत, एथ्निसिटी, संस्कृती या शब्दांनी दर्शवल्या जाणाऱ्या गोष्टी या म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह असल्याप्रमाणे चर्चा चालू आहे हे पाहून गंमत वाटली. अमुक कपडा शर्ट आहे, जॅकेट आहे की बंडी आहे यावर वाद चालावा त्याप्रमाणे. तसंच या सगळ्या गोष्टी अपरिवर्तनीय आहेत हे गृहीतकही कुठच्या पायावर मांडलं जातं ते कळत नाही. म्हणजे एकेकाळी डुकरासारखा दिसणारा प्राणी हा आता उत्क्रांत होऊन हत्तीसारखा झाला तरी त्याला डुक्करच म्हणण्याचा हट्ट विनोदी वाटतो. एक छत्री तिच्या काड्या, कापडं, मुठी अनेक पिढ्या बदलत राहिली तर ती मूळ छत्री कशी राहील?

काही हजार वर्षांपूर्वी एका विशिष्ट ठिकाणी राहाणारे लोकांची एक विशिष्ट संस्कृती होती, म्हणे. हेसुद्धा गृहीतकच आहे - कारण इतक्या प्रचंड प्रदेशावर पसरलेल्या छोट्या छोट्या टोळ्यांमध्ये संस्कृतीची एकसंधता होती यावर विश्वास बसत नाही - देव एक नाही, पूजापद्धती एक नाही, जीवनपद्धती एक नाही, वर्णव्यवस्था सगळीकडे असेल नसेल, रोटीबेटी व्यवहार फक्त पंचक्रोशीत... म्हणजे फरसाणवाल्याकडच्या शेव, गाठ्या, चणे, दाणे, कुरमुरे असल्या डब्याकडे बघून ते एकच फरसाण आहे असं म्हणायचं. मग हेच फरसाण भारतभर पसरलं. ठिकठिकाणी उत्क्रांत झालं, व त्यातली व्हेरिएबिलिटी वाढली. हजारो वर्षांच्या उलथापालथीनंतर आता प्रत्येकाच्या हातात मूठभर काही तरी खिचडी आहे. ही प्रत्येकाची सारखीच व ती म्हणजे ते हजारो वर्षांपूर्वीचं फरसाण आहे हे म्हणणं अतीव धार्ष्ट्याचं आहे.

सगळे हिंदी भाषिक हिंदू नसतात, सगळे हिंदू हिंदी बोलत नाहीत, आणि सगळे भारतीय हिंदू किंवा हिंदीभाषिक नसतात

या विधानात लेखिकेने सगळा अर्क मांडलेला आहे. हिंदू हा शब्द जर इतका ढिसाळ असेल तर की त्याची व्याख्या म्हणजे अं..भारतात जे राहतात ते.. अशी होत असेल तर तो कितपत उपयुक्त आहे? मुळात जर भारतीय व हिंदू हे एकमेकांना प्रतिशब्द असतील तर ही हिंदूची खिचडी टाळून शुद्ध स्पष्ट भारतीय हा शब्द का वापरू नये? गर्व से कहो हम भारतीय है, हे कमीपणाचं आहे का?

आमोद शिंदे's picture

10 Sep 2010 - 8:52 am | आमोद शिंदे

फार छान प्रतिसाद. ह्या प्रतिसादाचा तुम्ही स्वतंत्र लेख बनवावा अशी विनंती.

अर्धवट's picture

10 Sep 2010 - 10:03 am | अर्धवट

>>त्याची व्याख्या म्हणजे अं..भारतात जे राहतात ते.. अशी होत असेल तर तो कितपत उपयुक्त आहे?
व्याख्येबद्दल उहापोह वरती एका प्रतिसादात केलेला आहेच.
केवळ येथे राहणारे अशी व्याख्या अपुर्ण आहे

>>मुळात जर भारतीय व हिंदू हे एकमेकांना प्रतिशब्द असतील तर ही हिंदूची खिचडी टाळून शुद्ध स्पष्ट भारतीय हा शब्द का वापरू नये?
अगदी असेच म्हणतो..
पण हा वाद जर फक्त शब्दवापरण्या बद्दलच चालू असेल तर मग सगळ्या भारतीय खिचडीऐवजी हिंदू हा शब्दच का वापरू नये..
वरच्या बर्‍याच अनुभवांवरून हे स्पष्ट होते की हिंदू हा शब्द जगात सर्वत्र माहीतही आहे आणि जगाला भारतीय या अर्थी मान्यही आहे.

* हा प्रतिसाद फक्त गुर्जींच्या मुद्द्यांना उत्तर म्हणुन दिलेला आहे..

आमोद शिंदे's picture

10 Sep 2010 - 5:56 pm | आमोद शिंदे

>>सगळ्या भारतीय खिचडीऐवजी हिंदू हा शब्दच का वापरू नये..

कारण आपल्या देशाचे नाव भारत आहे 'हिंदू' नव्हे.

आमोद शिंदे's picture

10 Sep 2010 - 6:13 pm | आमोद शिंदे

हिंदू आणि भारतीय ह्यां दोन कप्प्यांमधे बराच ओवरलॅप असला (बर्‍याचदा भारतीय हेच हिंदू असल्याने) तरी त्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. हिंदू धर्माच्या एक्स्लुजीव अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या भारतीयतेच्या व्याख्येत येत नाहीत.

मूळात हिंदू धर्म हा अतिशय सैलसर विचारांचा असल्याचा फायदा घेऊन अश्या गोष्टी हिंदू समजण्यासाठी आवश्यक नाहीत म्हणून काही लोक त्या सिलेक्टीवली गाळून टाकून सगळे एकाच भारतीय ह्या कप्प्यात कोंबण्याचे प्रयत्न करतात. त्याची खरंच गरज आहे का?आपण सारे भारतीय आहोत हा एकच कॉम डिनॉमीनेटर पुरेसा नाही का?