१. तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच कुठंही जाऊ शकत नाही.
२. तुम्हाला वाटते की तुम्ही हुशार आहात, नो!!!! सर्व माणसे मानसिकदृष्ट्या महामूर्ख असतात, येस!!! पण प्रत्येकाचे शरीर हुशार असते. ती एक वेगळी संस्था आहे (इथे वैद्यकिय दृष्टीकोणातून पाहू नये) पुढच्या वेळी नखे वाढतील तेव्हा नजर ठेवा. तुम्ही कधीच सरळ उठून नखे काढायला सुरूवात करीत नाही. आधी हात तुमच्या डोळ्यांसमोर येतो, तुम्हाला नखे वाढल्याचे दिसून येते (हा अक्षरश: शरीराच्या विशिष्ट भागाने दिलेला सिग्नल असतो) आणि मग नखे काढण्याचा विचार करता.
३. मोठ्ठा आवाज होतो तेव्हा, शरीर एकदम दचकते. हा शरीराने तुमच्या यंत्रणेला दूर होण्यासाठी दिलेला सिग्नल असतो.
४. मानसिक शांती, ध्यानातून येणारी शांती ही आजकालची लोकप्रिय टूम आहे. शरीराला असले काहीही नको असते कारण ते मुळातच अतिशांत असते. तुम्ही मानसिकदृष्ट्या अशांत असाल, आणि ती अशांतता शरीरातून वाहू देत असाल. पण त्याच वेळी तुमचे शरीर नेहमी एवढेच शांत, स्थिर असते.
५. शरीराला फक्त दोनच गोष्टीत स्वारस्य असते: टिकून राहाणे आणि प्रजोत्पादन.
६. विचार करण्याची प्रक्रिया ही जात्यासारखी असते - कुठलाच विचार सर्वकाळ टिकत नाही, विचारांचे पीठ सतत मात्र पडत राहाते.
७. आजपर्यंत कुणीही मूलत: ओरिजीनल म्हणता येईल असा विचार केलेला नाही, नकला मात्र सर्व करीत असतात. विचार हा नेहमी विचाराबद्दलचा असतो.
८. विचारातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही. मग कुणी काहीही म्हटलेले असो.
९. बाल्यावस्थेचा काळ वगळता तुम्ही कधीच काहीही पाहात नाही; तुमच्याकडे असलेली कल्पनाच तुम्ही पाहात असता.
१०. लहान मुले ही अत्यंत जीवंत ऊर्जा असते. ती पृथ्वीवर जन्माला आलेला सर्वात नवीनतम माणसे असतात. ती जुन्या माणसांच्या संगतीत राहून त्यांचे वेगळे विशेष असे काहीही न करता जुन्या माणसांसारखीच होतात. कोणताही शिक्षक, गुरू शिकवू शकणार नाही एवढे त्यांच्याकडून शिकता येते. फक्त तुमचे कचराछाप (मग ते तुम्हाला कितीही महत्वाचे, अगत्याचे वाटोत ) विचार त्यांच्यात ओतण्याची घाई करू नये. त्यांना आजूबाजूची व्हॅल्यू सिस्टीम आणि स्पर्धा यात राहायचे असल्याने, त्यातच जगायचे असल्याने समाज, आई-वडील, शिक्षक या सर्वांनी टाकलेला कचरा वाहात राहावे लागते. लहान मुले जळता निखाराही सहज हातात घेतात - ते शिकत आहेत. लहान मुलांना साप कधीही चावत नाही, त्यांच्यात अजून वैरभावनाच तयार झालेली नसते. सापासारखे प्राणी तुमच्या मनातील वैरभावना झटक्यात ओळखतात आणि तुमच्यापासून दूर जाण्याचा उपाय नसेल तर आणि तरच चावा घेऊन दूर पळतात.
११. तुम्ही कधीही, कोणत्याही मार्गाने स्वत:चे शरीर परिपूर्णपणे अनुभवू शकत नाही - त्यासाठी दुसरे शरीर हवे असते.
पाश्वभूमी: यु.जी. कृष्णमूर्ती यांच्याशी लोकांनी केलेली चर्चा.
हा कुणालाही, कसल्याही प्रकारे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न नाही; त्यामुळे आक्रस्ताळे आक्षेप वाया जाऊ द्यायचे नसतील तर वेळीच आवरावेत. वाचा आणि शोधा.
प्रतिक्रिया
6 Sep 2010 - 1:31 am | इंटरनेटस्नेही
क्रमांक ९ तर खासच! एकदम पटले!
6 Sep 2010 - 5:07 am | यशवंतकुलकर्णी
युवर इन्टेलिजन्स इज क्वेश्चनेबल इंप्रे.
6 Sep 2010 - 5:28 am | सहज
मस्त रे गजनी!
पण जसे प्राथमिक शिक्षण हा बालकांचा अधिकार आहे तसे (हे) उच्च शिक्षण अजुनही वैकल्पिक आहे.
6 Sep 2010 - 9:48 am | अर्धवट
थोडं थांबा.. समजावुन घेतोय..
6 Sep 2010 - 10:00 am | llपुण्याचे पेशवेll
क्र १० चा विचार पटला नाही मग भले तो जे कृष्णमूर्तींचा का असेना.
क्र ११ शी तात्विकदॄष्ट्या सहमत आहे. स्वत: आपण आपल्या शरीरावर अतिरिक्त भार टाकून कधीच बघत नाही.
बाकी ठीक वाटले.
6 Sep 2010 - 4:46 pm | यशवंतकुलकर्णी
॥ पुण्याचे पेशवे ॥
हे युजी कृष्णमूर्तींचे विचार आहेत; जे. कृष्णमूर्ती वेगळे.
विचार पटायलाच हवेत असा आग्रह मला करावा वाटत नाही; करीत नाही.
फक्त कुणीतरी असंही म्हणालाय, ते तुम्ही वाचलंत का, नसेल तर वाचा आणि ते तसं आहे काय ते शोधा एवढंच.
6 Sep 2010 - 5:36 pm | मदनबाण
मानसिक शांती, ध्यानातून येणारी शांती ही आजकालची लोकप्रिय टूम आहे. शरीराला असले काहीही नको असते कारण ते मुळातच अतिशांत असते. तुम्ही मानसिकदृष्ट्या अशांत असाल, आणि ती अशांतता शरीरातून वाहू देत असाल. पण त्याच वेळी तुमचे शरीर नेहमी एवढेच शांत, स्थिर असते.
हे काही पटले नाही,मनावर होणारा परिणाम शरीरावर होत असतो.
6 Sep 2010 - 5:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बाबागिरीची सुरूवात अशीच होत असावी बहुदा!
6 Sep 2010 - 5:54 pm | यशवंतकुलकर्णी
येस्स!!! आय अॅम गोईंग टू बी मिसळपाव बाबा
6 Sep 2010 - 5:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हवेत काहीही, अधांतरी विधानं करून खळबळ माजवण्याचा क्षीण आणि निरर्थक प्रयत्न!
6 Sep 2010 - 6:28 pm | यशवंतकुलकर्णी
त्या क्षीण आणि निरर्थक प्रयत्नाला तुमचा वरचा प्रतिसाद कारणीभूत आहे...आमचे ते शिक्रेट फोडायला लावलेत तुम्ही..
6 Sep 2010 - 5:53 pm | यशवंतकुलकर्णी
तो परिणाम कृत्रिमपणे, अनैसर्गिकपणे तयार केलेला असतो, एवढंच नाही तर ध्यान ही शरीरासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे असंही ते म्हणतात..
ध्यान करणारे लोक व्हॅक्क्यूम मध्ये जगत असतात.. मग वेगवेगळ्या व्हिजन्स दिसणे (साक्षात्कार झाला!! साक्षात्कार झाला!!), त्या व्हिजन्सचा प्रॅक्टीकली काही उपयोग नसतो पण हा सगळा घोळ वाढत जातो...
ही अनुभवाची गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यांचे अनुभव तंतोतत सारखेच असायला हवेत असा काही आग्रह नाही.
मुळात ते म्हणतात की कुणीही कुणालाही "असे कर" असे सांगणे घातक आहे (कितीही चांगला विचार असो त्यामागे) - आईवडीलांनी मुलांवर त्यांचे तथाकथित संस्कार लादणे सुध्दा घातक आहे, पण सगळे तेच करतात, मग त्यात काय वाईट आहे असं म्हणून सगळं चालू असतं - पण मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याने घेऊन आलेल्या संभाव्यता आपल्याला कधीच कळू शकणार नाही, कारण आपण ऑलरेडी त्याला आपल्या अवतीभवतीच्या वातावरणात फिट करतो...थोडक्यात आपण आपल्या मुलांना मारून मुसलमान करतो..
6 Sep 2010 - 6:11 pm | निवांत पोपट
तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच कुठंही जाऊ शकत नाही.
'तुम्ही' आणि 'तुमचं शरीर' ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी ?
? ? ?
6 Sep 2010 - 6:23 pm | यशवंतकुलकर्णी
होय!!!! त्या पूर्णत: वेगळ्य़ा दोन गोष्टी आहेत...! कशा त्या विचारू नका...!!!!
6 Sep 2010 - 6:49 pm | मदनबाण
होय!!!! त्या पूर्णत: वेगळ्य़ा दोन गोष्टी आहेत...! कशा त्या विचारू नका...!!!!
http://en.wikipedia.org/wiki/Astral_projection
http://en.wikipedia.org/wiki/Linga_sarira
मला वाटते परमहंस योगानंदांनी क्रियायोगाच्या सहाय्याने असे अनुभव घेतले आहेत आणि ते सांगितले देखील आहे. (नक्की आठवत नाही,पण असेच काहीसे आहे.)
6 Sep 2010 - 6:12 pm | परिकथेतील राजकुमार
हे यु.जी. कृष्णमूर्ती कोण ?
जिवनाचे खरे सार साला फक्त आमच्या मिपावर सापडते. 'बा*** भां** मद्यसत्य जगनमिथ्या' हे ते तत्वज्ञान.
असो.. शेवटी..
6 Sep 2010 - 7:45 pm | पैसा
समजून घ्यायचा प्रयत्न करतेय. बरंचसं नवीन आहे.
6 Sep 2010 - 8:40 pm | चतुरंग
लवकर लवकर सारे या,
बाबा बाबा खेळूया! ;)
रंगाबाबा