IT WIFE आणि स्वयंपाक

सुजय कुलकर्णी's picture
सुजय कुलकर्णी in जनातलं, मनातलं
31 Jul 2010 - 4:20 pm

लग्न झाल्यानंतर साधारणपणे १०-१५ दिवसांनी "स्वयंपाक" हा मुद्दा किती महत्वाचा होता हे तरुणांना कळून चुकते. लग्न ठरवताना सुंदरता, शिक्षण, आणि नोकरी हे तीनच मुद्दे विचारात घेतल्याने हा अनर्थ तरुणांवर ओढवतो. मुलीही "लग्नानंतर स्वयंपाकाच बघू..." असाच विचार करत असाव्यात किंबहुना करतात. खरंतर लग्न झालेल्या ह्या मुलींना बाई किंवा काकू म्हणायला हरकत नाही. पण "बाई" म्हटल्यावर ह्या मुलींना प्रचंड राग येतो. विशेषत: सॉफ्टवेअर मधल्या मुलीला. स्वयंपाक आणि घरकामाची जबाबदारी एकटीच्याच अंगावर येईल का काय असं बहुधा त्यांना वाटत असावं.ह्या फील्डमधल्या मुलींशी ज्यांच लग्न झालेले आहे त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती व्यक्त करावीशी वाटते. स्वयंपाक आणि जॉब अशी दुहेरी भूमिका आपण उत्तमरीतीने पार पाडत आहोत असा ह्या बायकांचा गोड गैरसमज असतो. स्वयंपाकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वप्रथम लग्न न झालेल्या तरुण वर्गाला माझा सल्ला आहे की लग्न ठरवताना, "स्वयंपाक येतो का?" हा प्रश्न आवर्जून विचारावा. " थोडा-थोडा स्वयंपाक येतो" असे उत्तर मिळाल्यास " थोडा म्हणजे किती??" हे विचारायला विसरू नका. प्रत्येकीची definition वेगळी असते. माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले.
आठवड्याचे सातही दिवस स्वयंपाकाचा कंटाळा असणार्‍या ह्या बायका तुम्हाला सॉफ्टवेअर मध्येच सापडतील.सदानकदा आजचा स्वयंपाक करायचं कसं चुकवता येईल ह्याच खटाटोपात त्या असतात. " आज बाहेर खायला जायचे का?" हा प्रश्न नवर्‍याने विचारून होण्याआधी त्या "सही...... कित्ती छान......आलेच हं आवरून...." असे म्हणत क्षणार्धात दिसेनाश्या होतात. एकदा बाहेर जायचं ठरवल्यावर , हुशार आणि शहाण्या नवर्‍याने ते कधीही कॅन्सल करू नये. अन्यथा भांडण होण्याचे ९९% चान्सेस असतात.शेवटी बाहेरून हॉटेलमधले जेवण मागवावे लागते आणि मगच ह्या बायका शांत होतात हे सांगण्याची गरज नसावी. वीक एन्ड ला बाहेर पडण्याची वेळही ह्या बायका अचूक हेरतात.संध्याकाळीच बाहेर पडायचं म्हणजे नवरा "रात्री बाहेरच जेवू" असे म्हणतो हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. चुकून कधी स्वयंपाक करण्याचा योग आलाच तर, "आपण" आज खिचडी बनवूया का? असे प्रेमाने बोलून नवर्‍यालाही स्वयंपाक घरात ओढून काम करायला लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. काही नवरेमंडळी ह्याला बळी पडतात. काहीजण "आपण" ह्या शब्दावरून "तू" ह्या शब्दावर नेण्याचा निष्फळ प्रयत्न करतात.
एकटीने स्वयंपाक करणे हा आपल्यावर अन्याय आहे अस ह्यांना नेहमी वाटतं. "दोघे खातो ना?? मग दोघे मिळून स्वयंपाक करू" असा professionalism त्या घरातही आणतात. ह्या बायका स्वयंपाक करताना नवरा बाहेर आरामात TV बघत असेल तर हे त्यांना अजिबात बघवत नाही. स्वयंपाक करताना ह्या आळशी माणसाला कुठलं काम देता येईल ह्याचा विचारच त्या करत असाव्यात. गरज नसलीतरी थोडं का होईना आपल्या नवर्‍याने काम केलच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो.अश्या बायकांचे नवरे साधारणत: ताट-वाट्या घेणे, कोथिंबीर निवडणे,डायनिंग टेबल पुसणे अशी कामे करतात. IT मधल्या बायकांना उत्तम व चविष्ट भाजी बनवता येते ही संकल्पना निव्वळ अशक्य आहे. बनवलेल्या भाजीचा पहिला प्रयोग त्या आपल्या नवर्‍यावरच करतात. एवढ्यावरच त्या थांबत नाहीत. वर तोंड करून "कशी झालीय भाजी?" हा प्रश्न विचारायला ते अजिबात विसरत नाहीत. "suggestions " म्हणजे त्यांना अपमानकारक वाटते. त्यांना suggestion देणे म्हणजे नवर्‍याने वादाला सुरुवात केल्यासारखी असते. भांडण नको म्हणून हे नवरे " भाजी मस्त झालीय..." म्हणत हळूच फ्रीजमधून थोडा सॉस, लोणचे घेताना दिसतात. त्यातूनही हिम्मत करून कुणी suggestion दिलेच तर त्यांची प्रतिक्रिया ठरलेली असते. "झालं? ठेवलास नावं??"....."थोडं कमी जास्त होणारच की रे"......."तू करायचं होतास मग"......"एवढं केलय त्याचं काही नाही..." असा उपकाराचा टोला लगवायलाही ते मागेपुढे बघत नाहीत.
नुकतचं लग्न झालेल्या मुली कंपनीत बसून google वर रेसिपी शोधताना दिसतात. "आपल्याला काहीही बनवता येत नाही" हे नवर्‍याला इतक्या लवकर कळू नये हा त्यामागचा उद्देश असावा. रेसिपी मिळाली नाही तर आईला,आत्याला,मामीला फोन करून तासभर ह्या बायका रेसिपी विचारण्यात काढतात. "योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" हे मात्र नवर्‍याने दिसत असूनही म्हणू नये. ह्या बायकांचा "जेवण बनवण्याचा" मूड अशाने केंव्हाही जाऊ शकतो. चौरस आहार सोडून दररोज नवनवीन छोटे छोटे पदार्थ बनविण्यावर ह्यांचा भर असतो. हे भयंकर आणि अयशस्वी प्रयोग करण्यामागचा उद्देश प्रेमापोटी असतो की " उद्यापासून स्वयंपाकाला बाई लावू" हे नवर्‍याने स्वत:हून म्हणण्यासाठी? हे त्या बायकांनाच माहित...!
ह्या बायका मंडईतल्या गर्दीमध्येही सहज ओळखून येतात. ब्रँडेड जीन्स आणि टी-शर्ट , एका हातात महागडा मोबाईल व दुसर्‍या हातात पर्स हि त्यांची ओळख. मल्टीप्लेक्स , शॉपिंग मॉल मध्ये बिनधास्त पैसे वाया घालवणार्‍या ह्या बायका मंडईमध्ये १-२ रुपयासाठी घासाघीस करताना पहावयास मिळतात. "too costly ......ohh.....too much ......" असे उद्गार ऐकल्यास ती शक्यतो सॉफ्टवेअर मधलीच समजावी. इथे bargaining हा त्यांच्यादृष्टीने मूळ मुद्दा नसून " IT मधली असले म्हणून काय झाले? मलाही भाज्यांमधले कळते म्हटलं...." हे जगाला पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मजेची गोष्ट म्हणजे अश्या बायकांना मंडईतले विक्रेतेही ४-५ रुपये आधीच वाढवून सांगतात. एज्युकेटेड बायकांना हे अजूनही कळालेले नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मित्र हो, हा लेख लिहण्याचा उद्देश हाच की, तुम्ही सॉफ्टवेअरमधल्या मुलीशी लग्न करत असाल तर पुन्हा विचार करा. बोटांवर मोजण्याइतक्या बायकांना स्वयंपाक येत असेलही, पण होणारी बायको त्यांपैकीच आहे का नाही ते तुम्हालाच ठरवावे लागेल. तुम्हाला स्वत:ला चांगला स्वयंपाक येत असल्यास उत्तमच. पण ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा. लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही. चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.

पाकक्रियामतसल्लाअनुभव

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

31 Jul 2010 - 4:56 pm | अप्पा जोगळेकर

छान लेख आहे. खूपच तिखट प्रतिक्रियांच्या अपेक्षेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2010 - 1:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

श्री. सुजय कुलकर्णी, केकता कपूर-टाईप हिंदी-मराठी सिरीयल लिहायचा विचार केला आहेत का? चांगलं नाव कमवाल!!

सोम्यागोम्या's picture

3 Aug 2010 - 5:49 am | सोम्यागोम्या

खल पात्र रंगवण्यास सुजय भाऊंना प्रतिक्रियांची मदत होईल असे एक उगाच वाटून गेले !

पद्माक्षी's picture

2 Aug 2010 - 11:38 pm | पद्माक्षी

छान लेख आणि निरीक्षण. दुर्दैवाने बहुतांशी मुद्दे बरोबर आहेत.

चतुरंग's picture

31 Jul 2010 - 5:02 pm | चतुरंग

देव तुमचं रक्षण करो! :)

(जाता जाता - सांगली मिरज भागातले काय हो तुम्ही? नाही, तुमच्या काही शब्दांवरुन तशी शंका आली बाकी काही नाही.)

अमोल खरे's picture

31 Jul 2010 - 5:18 pm | अमोल खरे

देवाला पण कठीण आहे बॉस तुम्हाला वाचवणं. :)

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 11:11 am | मिसळभोक्ता

सुजय भाऊंना मानले पाहिजे. पदार्पणातच सेंचुरी, आणि तीही इकडे (हिरव्या नोटांच्या देशात) वीकांत असताना !

जबरा..

आयटी, बायका, स्वयंपाक, युयुत्सुची विचारशैली, असे सगळे प्वाईंट आलेत. मुक्य म्हणजे, कोल्हापूरच्या निबंधलेखकांची आठवण करून देणारे लेखन.

साला,झाडावर चढून बसायची संधीच दिली नाही.

पण समजा "अमेरिकेतील आयटीतील बायका" असे आले असते, तर ऑल टाईम हाय धागा झाला असता, हे नक्की.

पुढील लेखनास शुभेच्छा.

राजेश घासकडवी's picture

2 Aug 2010 - 11:17 am | राजेश घासकडवी

त्यांनी हे गांधीहत्या, लेन प्रकरण, पुणेरी दुकानदार, शिवाजी, स्वयंसंपादन, एकंदरीतच संपादन... असे हॉट वायर विषय टाळून सेंचुरी मारली हे महत्त्वाचं. म्हणजे साहेबांनी कव्हर ड्राइव्ह न मारता सेंचुरी केल्यासारखं...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jul 2010 - 5:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचं लग्नं झालं असेल तर तुमच्या बायकोबद्दल फार वाईट वाटलं. आणि झालं नसेल तर ठरेल, होईल त्याआधी त्या दुर्दैवी मुलीला तुमचे हे २०० वर्ष पुराणे विचार जरूर वाचून दाखवा.

मला माझ्या नवर्‍याने एकदा विचारलं, "माझी आई मोदक खूप छान बनवते, तुला येतात का?"
मी त्याला उत्तरादाखल प्रश्नच विचारला, "माझे बाबा खूप छान नानकटाई बनवतात, तुला येते का?"
हा संवाद/वाद तिथेच संपला.

आता लग्नं होऊन अडीच वर्ष झालं आहे आणि स्वयंपाकाचीच आवड असलेली बायको असण्यापेक्षा जिच्याशी आवडीच्या विषयांवर चर्चा करता येते तिच्याशी लग्नं करणं हा योग्य निर्णय होता असं तो जाहीरपणे स्वतःच्या मित्रांनादेखील सांगतो.
काय आहे ना, जेवण बाहेरून मागवता येतं आणि/किंवा जेवण बनवण्यासाठी माणूस ठेवता येतो. पण विचार शेअर करण्यासाठी बायको (किंवा नवरा) पैसे देऊन ठेवून घेता येत नाही ना!! हे झाले माझे दोन पैसे, नॉन-आयटी वाईफचे!!

बाकी चालू द्यात तुमची १९ व्या शतकातली विचारगिरण!

अदिती

निस्का's picture

31 Jul 2010 - 6:19 pm | निस्का

आजही असा विचार करणारी माणसं आहेत हे बघुन वाईट वाटलं.

(नॉन्-आयटी)नेहा

सुजय कुलकर्णी's picture

31 Jul 2010 - 7:51 pm | सुजय कुलकर्णी

नुसते वाईट वाटले ? अरेरे....!! स्वयंपाक शिकायला हवा हे कधी वाटणार...?? तुम्ही (नॉन्-आयटी) लिहिलात फार उत्तम केलत.....तुम्हाला बहुतेक स्वयंपाक येत असावा.....! :-) येत नसला तर थोडातरी शिका हि विनंती ....!

निस्का's picture

31 Jul 2010 - 8:19 pm | निस्का

तुमच्या आचरट विनंती/टोमण्यांना उत्तर देऊन मला त्याची पत वाढवायची नाही. या थिल्लर धाग्यावारचा हा माझा शेवटचा प्रतिसाद. आणि हो, तुम्हाला शुभेच्छा!!!

मस्त कलंदर's picture

31 Jul 2010 - 7:41 pm | मस्त कलंदर

तुमच्या बायकोबद्दल(असलेल्या/होणार्‍या) खूपच सहानुभूती वाटते...
माझ्या मते स्वयंपाक फक्त मुलींनाच यायला पाहिजे असे नाही. जर तुम्ही स्वतः आयटी मध्ये असाल आणि ऑनसाईट जाण्याची स्वप्ने बघत असाल, तर तुमची बायको करू शकते तसा अर्धकच्चा स्वयंपाक तरी येतो का हो तुम्हांला???? आणि जे काम तुम्ही करता, तेच बायकोही तिच्या ऑफिसात करते. मग घरी आल्यावर म्हटले की मदत कर, तर त्यात तुमचा पुरूषी अहंगंड इतका का दुखावतो??

आणि तुम्हाला बायको चांगली शिकलेली हवी, चांगली नोकरी करणारी(पक्षी: चारलोकांत तुमचे स्टेटस सांभाळणारी) हवी, दिसायला चांगली हवी, तिच्याशी काव्यशास्त्रविनोद चर्चा करता येणारी हवी(अशी तुमची अपेक्षा असल्याचे तुमच्या लेखावरून जरी दिसत नसले तरी इतरांची अशी अपेक्षा असू शकते), हापिसात ९-१० तास काम करूनही घरी आल्यावर न थकता एकटीने आठवडाभर चारी ठाव स्वयंपाक करणारी हवी..... अपेक्षा जरा जास्तच होत नाहीत का हो???? जरा बायकोशी तिला टोमणे मारणॅ सोडून इतर विषयांबद्दल बोलत असाल, तर तिच्याही तिच्या नवर्‍याकडून काय अपेक्षा आहेत हे विचारून घ्या... अर्थात ती सूज्ञ असेल, आणि त्यामुळे भांडण होईल असे वाटत असेल तर ती उत्तर देणार नाही....

आणि पंचविशीतल्या मुलींनी स्वत:ला काकू म्हणवून नाही घेतले, म्हणून व्हॉट युवर अंकल गोझ... हे कोडे काही उलगडले नाही.....

अवांतर: स्वतःची जाहिरात नाही, पण मी स्वतः आईकडून (तुमच्या भाषेत शिकायच्या वयात) शिकले नाही... स्वयंपाकाला सुरूवात करून साधारण वर्षभर झाले असेल. कुणाला फोन करण्यापेक्षा गुगलून पदार्थ बनवते आणि ते नक्कीच माणसाने खावे असे चांगले(माझ्या मते ) बनवते. (पुराव्यासाठी विचारा किंवा लिहा: बिका, मोडक, निदे, डॉन, सुबक ठेंगणी)
त्यामुळे सरसकटीकरण करताना थोडा विचार करून करा..

सविता's picture

4 Aug 2010 - 11:51 am | सविता

णम्र विणंटी - हे बाडिस म्हणजे काय हे मला कुणी सांगेल का?

व्यनी, ख्ररड केले तर बरे होईल... १०० च्या वर प्रतिसाद गेलेल्या लेखात माझा प्रश्न असलेला प्रतिसाद... त्यावर आलेले उपप्रतिसाद.. शेधणे अंमळ अवघड आहे....

-सविता

मधुशाला's picture

1 Aug 2010 - 11:33 pm | मधुशाला

मला माझ्या नवर्‍याने एकदा विचारलं, "माझी आई मोदक खूप छान बनवते, तुला येतात का?"
मी त्याला उत्तरादाखल प्रश्नच विचारला, "माझे बाबा खूप छान नानकटाई बनवतात, तुला येते का?"
हा संवाद/वाद तिथेच संपला.

प्रश्नाला प्रश्न हे यावरचं उत्तर नाही. आपण दोघे मिळून हे शिकू/करू हे योग्य वाटते.
काय आहे ना, जेवण बाहेरून मागवता येतं आणि/किंवा जेवण बनवण्यासाठी माणूस ठेवता येतो
पण त्याला घरच्या जेवणाची गोडी नसते. स्वतः एखादा पदार्थ करणे आणि तो आपल्या जवळच्या माणसांना खाऊ घालणे यात काय आनंद असतो तो अनुभवूनच बघायला हवा. ती मजा बाहेरच्या माणसाने बनवलेल्या जेवणात नसते.
पण विचार शेअर करण्यासाठी बायको (किंवा नवरा) पैसे देऊन ठेवून घेता येत नाही ना!!
विचार शेअर करण्यासाठी बायको/नवराच कशाला हवा/हवी? जालावर किंवा मित्रांबरोबर सुद्धा विचार शेअर करता येतातच की. लग्न व्हायच्या अगोदर आपण काय करत असतो? आणि लग्न झाल्यावर समान विषय विचार शेअर करण्यासाठी शोधता येतातच की...
सगळ्याना स्वयंपाक यावा ही जर १९ व्या शतकातली विचारगिरण असेल तर १९ वे शतकच पुढारलेले होते असे म्हणावे लागेल. बायकांनी स्वयंपाक करूच नये हीच नवीन विचारसरणी असेल तर धन्यच आहे...

तुमच्या प्रतिसादात मी अदलाबदल केली आहे. कशी वाटते सांगा...

>प्रश्नाला प्रश्न हे यावरचं उत्तर नाही. आपण दोघे मिळून हे शिकू/करू हे योग्य वाटते.
काय आहे ना, विचार बाहेरून मिळवता येतात आणि/किंवा विचार शेअर करण्यासाठी माणूस शोधता येतो
पण त्याला घरच्या विचारांची गोडी नसते. स्वतः एखादा विचार करणे आणि तो आपल्या जवळच्या माणसांना सांगणे यात काय आनंद असतो तो अनुभवूनच बघायला हवा. ती मजा बाहेरच्या माणसाने सांगितलेल्या विचारांत नसते.
>पण जेवण करण्यासाठी बायको वर जबरदस्ती करता येत नाही ना!!
जेवण करण्यासाठी बायकोच कशाला हवी? हॉटेलात किंवा स्वयंपाक्याकडून सुद्धा जेवण करून घेता येतंच की. लग्न व्हायच्या अगोदर आपण काय करत असतो? आणि लग्न झाल्यावर जेवण करण्यासाठी शोधता येतातच की...
सगळ्याना विचार करता यायला यावा ही जर २१ व्या शतकातली विचारगिरण असेल तर १९ वे शतक मागासलेले होते असे म्हणावे लागेल. बायकांनी विचार करूच नये हीच जुनी विचारसरणी असेल तर धन्यच आहे...

वा: छान जुळतंय की. अदितीचे विचार तयार झाले.
मी काय म्हणतो, तुम्ही जेवण तयार करा, अदितीला विचार शेअर करू देत. काय? एव्हरीबडी विन्स.
हेच एक पाऊल पुढे नेऊन मी म्हणेन, की मिपावर तरी विचार का शेअर करता, त्यापेक्षा आमच्या सगळ्यांसाठी जेवण बनवा की. आम्ही आनंदाने येऊ. :)

चावटमेला's picture

2 Aug 2010 - 12:02 pm | चावटमेला

काय आहे ना, जेवण बाहेरून मागवता येतं आणि/किंवा जेवण बनवण्यासाठी माणूस ठेवता येतो

असे उर्मटपणाचे विचार पाहता, १९ वे शतकच खूप बरे असावे असे दिसते..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2010 - 12:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आम्ही (मी आणि माझा नवरा) आमच्या (दोघांच्या) उर्मटपणात खूष आहोत, तुम्ही तुमचा सोज्ज्वळ, १९ व्या शतकातला जोडीडार (शोधला नसल्यास) शोधा. १९ आणि २१ व्या शतकांनी एकत्र राहिलं पाहिजे असं थोडीच आहे?

पण मुद्दामच दुसर्‍याला डिवचायला जायचा १९ व्या शतकातला सोज्ज्वळ आगाऊपणा कशासाठी?

बाकी मधुशालाभौ (किंवा तै) बाहेरच्या माणसाने बनवलेल्या जेवणाला घरची गोडी कुठून येणार हा प्रश्न मला पडला नाही. आमच्या यादवकाकूंनी अगदी आईच्या मायेने गेली आठ वर्ष घरी जेवण बनवलं आहे आणि त्यांना होतंय तिथपर्यंत त्या नक्कीच करतील. शोधली चांगली माणसं आणि त्यांनाही माया लावली तर असे प्रश्न कधीही पडत नाहीत.

ह्म्म्म......!!
अदिती काकू ,
तुम्ही फारच मनाला लावून घेतलात अदिती काकू.....! पण तुम्ही इतके प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...!

नवर्‍याने प्रेमळपणाने विचारलेल्या प्रश्नाला उर्मट व खोचकपणे उलटप्रश्न केलात त्यावरून तुम्हालाच वाद घालायचा होता हे स्पष्ट होते....! तुमचा बिचारा नवरा....!! :-(

८ वर्षे तुमच्यासाठी जेवण बनवून सुद्धा तुम्ही यादवकाकूना "बाहेरची माणसे" समजता ह्याचे सर्वप्रथम आश्चर्य वाटले....! ह्यावरूनच तुम्ही कोणती माया लावली हे आमच्यापर्यंत पोहचले...!
आणि हो , स्वयंपाकाची आवड असणे आणि स्वयंपाक येणे ह्या २ वेगवेगळ्या गोष्टी आहेत........स्वयंपाक येतो पण आवड नाही असे असू शकते.....! पण स्वयंपाक येत नाही आणि स्वयंपाकाची आवड ही नाही अश्या मुली,काकू non -IT मध्येही आहेत हे तुमच्या प्रतिसादावरून कळाले....!
बाकी तुमच्या विचारांवर ( जे अवैचारिक आहेत असे लोक समजत आहेत ) 2-3 लोकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत....त्या वाचाव्यात....!

" त्यांना होतंय तिथपर्यंत त्या नक्कीच करतील".... हे तुमचे घटकाभर मान्य....पण चुकून त्या कधी आजारी पडल्या ( देव करो असं कधी न होवो.. ) तर तुम्हाला स्वयंपाक करून त्यांना खायला घातला येईल किमान तेवढा तरी स्वयंपाक करायला शिका.....!!

तात्पर्य... :- एवढा वेळ उर्मट उत्तरे देऊन घालवण्यापेक्षा एखाद दुसरा पदार्थ शिकून झाला असता तुमचा....!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2010 - 2:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जाऊ द्या हो, तुम्ही माझ्या खाण्याची आणि कौशल्याची काळजी करू नका. यादव काकू आजारी पडल्या तर आजूबाजूला खाण्याची आणि खिलवण्याची आवड असणार्‍या चार मित्र-मैत्रिणी, काका-काकू जमा करून ठेवले आहेत.

जाताजाता: मी वयाच्या आठ-दहाव्या वर्षापासून "मला खायला आवडतं ते बनवता आलं पाहिजे" या विचारांमुळे मोठ्या भावाच्या हाताखाली स्वयंपाकघरात खुडबूड करायला लागले. तेव्हा तुमची गाडी चुकली आहे "स्वयंपाक शिका" असा सल्ला देण्यात.

तात्पर्यः बाळ सुजय, मिपावर, एका मोठ्या व्यासपीठावर, आता आलाच आहात तर, व्यक्तीगत विरोध करण्यापेक्षा विचारांना विरोध करण्याएवढे 'मोठे व्हा'*.

*कॉपीराईटः श्रावण मोडक

चावटमेला's picture

2 Aug 2010 - 2:57 pm | चावटमेला

आदिती ताई, विचारांना विचारांनीच विरोध करायचा हे तुम्हाला पटले तर, मग इतका आक्रस्ताळेपणा कशासाठी, प्रस्तुत लेखातील विचारांशी तुम्ही सहमत नसालही, माग त्याला विचारांनीच उत्तर द्यावे, असे भांडून आणि, एखाद्या व्यक्तिच्या प्रांतावरुन/गावावरोन खोचक विधाने करणे हे केविलाणे आणि निंदनीय आहे..

संपादक महाशय,

असे प्रांतवादाचे विष पसरविणारे प्रतिसाद आक्षेपार्ह नाहीत का?

असो, सुरुवातीला हा लेख मला हलका फुलका आणि थोडेफारच तथ्य असलेला वाटला होता, पण ताईंचे असले आततायी प्रतिसाद पाहून लेख हा पूर्णपणे वास्तववादी असावा असे वाटत आहे :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2010 - 3:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्रर्र, तुम्ही सांख्यिकी विषयाचा अभ्यास कमी पडताना दिसतो आहे. केला असतात तर एका उदाहरणावरून अर्ध्या जगाची परीक्षा केली नसतीत!

बादवे, माझं नाव आदिती नसून अदिती आहे. होते चूक अशी माणसाची, पण १९ व्या शतकातल्या सोज्ज्वळ वातावरणात अशा अपेक्षा नव्हत्या, म्हणून एकदा सांगितलं!

हा लेख मला हलका फुलका आणि थोडेफारच तथ्य असलेला वाटला होता

मला मात्र केकता कपूरच्या मालिकांएवढा विषारी वाटला!

बाकी तुम्हाला आंजावरची कोल्हापूरची महती माहित नसेल तर तुमचा अभ्यास कमी पडतो आहे. आमच्या पर्‍याला विचारा हे प्रश्न, लगेच उत्तरं मिळतील.
प्रांतवादाचे विष का काय तुम्ही म्हणत आहात तो तुमचा चष्मा असेल. असल्या लेखांवरून स्त्रियांना दुय्यम मानव समजण्याबद्दल खंत व्यक्त करणारा एखाद्या प्रांतात रहाणारा आंजा स्नेही आठवला तर ते विष वाटत असेल तर खरंच चष्मा बदलाच ... (हा, जमलं एकदम मुसुटाईपचं वाक्य!)

मधुशाला's picture

2 Aug 2010 - 9:32 pm | मधुशाला

तुमचा सांख्यिकी विषयाचा अभ्यास दांडगा दिसतो... "पर्‍या " या एकाच आंजा मित्राच्या बोलण्यावरून कोल्हापूरविषयी काहिही बरळत सुटला आहात. हाच का तुमचा सांख्यिकी विषयाचा अभ्यास? कोल्हापूरची महती आम्हाला तुमच्याकडून ऐकायची गरज नाही आणि त्याचा अभ्यास करायचीही गरज नाही. कुठलाही आंडूपांडू उठून कोल्हापूरबद्दल काहीही भकला म्हणून कोल्हापूरची महती कमी होत नाही तर बोलणार्‍याची बुद्धीची भोकं दिसतात. "प्रांतवादाचे विष" असं 'चावटमेला' जे म्हणत आहेत त्यासाठी तुमचाच खालचा प्रतिसाद वाचा. तुमच्या सोयीसाठी इथेही तो चिकटवतो.

कोल्हापूर का, मग तुमचा काहीएक दोष नाही, चालू द्या!

या निमित्ताने "पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली शिकल्या सवरल्या तरीही नवरा त्यांना पायपुसण्यासारखे वागवतो" अशा टाईपची एका पश्चिम महाराष्ट्रातल्या आंतरजालीय स्नेह्याशी झालेली चर्चा आठवली. तसंही मिपावर कोल्हापूर म्हणा ... प्रसिद्धच!

फक्त एका आंजा स्नेह्याच्या म्हणण्यावरून तुम्ही हे ठरवून टाकलं कि "पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली शिकल्या सवरल्या तरीही नवरा त्यांना पायपुसण्यासारखे वागवतो". आणि तरीही हा प्रांतवाद नाही आणि सांख्यिकी तुम्हाला जास्त कळते.

(जळजळ होत असेल तर सोडा घ्या. अर्थात कोल्हापूरचा गोटी सोडा काय तुम्हाला झेपणार नाय. इनो नाय तर पुदीन हरा बेष्ट)

चावटमेला's picture

2 Aug 2010 - 9:52 pm | चावटमेला

दितीताई, हा आमचा चष्मा नाही, तुमचाच जहरी प्रतिसाद बोलत आहे.

अरे वा, आणि आपला सांख्यिकिचा अभ्यास भलताच दांडगा दिसतो आहे, म्हणूनच कुठ्ल्याशा लेखाचा आधार घेवून आपल्याच मनातील पश्चिम महाष्ट्राबद्दलची जळजळ निघते आहे.

तुम्हाला विचारांना विचाराने उत्तर देता येत नसेल तर उगाच त्रागा करु नका आणि तुमचा वैयक्तिक द्वेष असा चव्हाट्यावर आणू नका..

स्वगत :-> भगवन्ता, काय हेय घोर कलियुग दाखवितोस २१ व्या शतकात :)

सुजय कुलकर्णीच्या बायकोचं जाउ ध्या , पण

मला माझ्या नवर्‍याने एकदा विचारलं, "माझी आई मोदक खूप छान बनवते, तुला येतात का?"
मी त्याला उत्तरादाखल प्रश्नच विचारला, "माझे बाबा खूप छान नानकटाई बनवतात, तुला येते का?"
हा संवाद/वाद तिथेच संपला.

हे वाचल्यावर तुमच्या नवर्याचं फार वाईट वाटलं....

बाकी चालू द्या...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Aug 2010 - 12:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे वाचल्यावरच का हो, मला पदोपदी त्याच्याबद्दल वाईट वाटतं. असो तुमच्या सद्भावना पोहोचवते मी त्याला! तो काही मिपा वाचणं शक्य नाही!

चिरोटा's picture

31 Jul 2010 - 5:17 pm | चिरोटा

मजेशीर लेख.आय टी मधला 'ट्फ' जॉब करुन घरी जावून जेवण बनवणार्‍या काही स्त्रियाही असतात. वीकांताला त्यांच्या पतिराजांना काय काय भोगावे लागत असेल याची कल्पना केलेली बरी.!!
------------

कल्पना करू नये असा अगाऊ सल्ला देतो आहे.(ज्याचा त्याचा विकांत)

दिपाली पाटिल's picture

3 Aug 2010 - 3:16 am | दिपाली पाटिल

ठ्यॉ..... :))

वाहीदा's picture

4 Aug 2010 - 1:23 pm | वाहीदा

खास रामदासकाका स्टाईल प्रतिसाद !
अवांतर : अरेच्या एवढया हुच्च(?) धाग्यावर, हे कसे काय वाचायचे राहून गेले ? :-?

इंटरनेटस्नेही's picture

31 Jul 2010 - 5:21 pm | इंटरनेटस्नेही

आदिती यांच्याशी सहमत. मात्र स्त्रियांना किमान पाककला यायलाच हवी!

चित्रा's picture

31 Jul 2010 - 5:45 pm | चित्रा

स्त्रियांना किमान पाककला यायलाच हवी!

अगदी सहमत. पण यात फक्त पुरूषांनाही असे आता लिहायला लागू या, कसे?!

विंजिनेर's picture

31 Jul 2010 - 6:43 pm | विंजिनेर

अगदी. मुलांनासुद्धा जरूरी पुरता स्वयंपाक यायलाच पाहिजे. पण खरी कसोटी स्वयंपाक येण्या-न येण्यात नसतेच मुळी. खरी कसोटी आठवड्याचे ६-७ दिवस चारी-ठाव स्वयंपाक न थकता/कंटाळता करण्यात असते.
(वीकेंड स्वयंपाकी)विंजिनेर

बाकी प्रक्षोभक लेख लि हून कोणीत्सूला कांपिटिशन आली म्हणायची ;-)
(वाचक राजा)विंजिनेर

कानडाऊ योगेशु's picture

1 Aug 2010 - 3:41 pm | कानडाऊ योगेशु

बाकी प्रक्षोभक लेख लि हून कोणीत्सूला कांपिटिशन आली म्हणायची

कोणीत्सु आवडले.
(हूहूत्सु (whowhotsu)) योगेशु

मधुशाला's picture

1 Aug 2010 - 11:35 pm | मधुशाला

स्त्रियांना आणि पुरूषांनाही किमान पाककला यायलाच हवी!

प्रचेतस's picture

31 Jul 2010 - 5:24 pm | प्रचेतस

हाच लेख मला अगदी ७/८ दिवसांपुर्विच इमेल ने आला होता. त्याचे मूळ लेखक तुम्हीच काय?
का साहित्यचौर्याचा हा एक नमुनाच.

लेख मूळ तुमचाच असेल तर सुरेखच........मग माझे शब्द मागे घेतोच.

असुर's picture

1 Aug 2010 - 3:03 am | असुर

+१
असेच म्हणतो. मलाही हा लेख काही दिवसांपूर्वी इ-मेल मधून वाचायला मिळाला होता. जर हा लेख तुमचाच असेल तर तुम्हाला 'ऑल द बेस्ट' कारण आपण मिपा वर प्रसिद्ध करायच्या आधीच त्याची चोरी झालीये.
आणि तुमचा नसेल तर...

बाकी माझ्या सर्व आय.टी. मित्रांकडे अशीच 'विन विन सिच्युएशन' आहे की "बायको आय.टी. मध्ये आहे, आणि तरी ती टकाटक स्वयंपाक बनवते आणि तिला कंटाळा येतो तेव्हा नवरा जब्बर जेवण बनवतो. दोघानाही कंटाळा येतो तेव्हा दोघांपैकी कुणाची एकाची सासू A1 J1 बनवते!"
आता इतके सगळे फक्त 'नशीबवान' च आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे मला वाटतंय की विदा कुठेतरी कमी पडतोय की काय? म्हणजे सुवर्णमध्याच्या पलीकडचा विदा मिळवायचा राहून गेलाय की काय अशी एक शंका आली!

--असुर

छोटा डॉन's picture

31 Jul 2010 - 5:25 pm | छोटा डॉन

लेख मजेशीर आहे, आता मिपावरच्या त्याहुन मजेशीर प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे.
बरेच मुद्दे अंमळ 'रोचक' वाटले.

अवांतर : सोमवारी हाच लेख मी आमच्या नॉन-मराठी मैत्रिणींना ट्रान्सलेट करुन वाचुन दाखवेन व त्यांच्या प्रतिक्रिया पुन्हा ट्रान्सलेट करुन मिपावर लिहेन.
त्यांची आठवड्यातुन २-३ दिवस तरी हीच तक्रार असते ( नाही, आयटीवाला नवरा जेवण चांगले बनवत नाही ;) अशी नाही, नवरा मदत करत नाही ही तक्रार ).
तोवर बाकी प्रतिक्रिया वाचतो आहे. :)

अतिअवांतर : अहो आयटीवाल्या बायकोचे काय पण आयटीवाल्या मैत्रिणीही तसल्याच असे आम्हाला वैयक्तिकरित्या वाटते ;)
(सदर घटना संपुर्ण काल्पनिक आहे, त्याचा वास्तवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करु नये )

(मी हे टायपायच्या आत अदितीची प्रतिक्रिया आलीच, अशा अनेक येणार हे गॅरंटीड!!)

सुजयः तुमचं हे (निदान इथे तरी) पहिलंच लिखाण असावं असं तुमच्या 'वाटचाली'वरून दिसतं, सुरूवात तरी 'पदार्पणातच शतक' अशी होऊ शकेल!

लिखाणाची स्टाईल विनोदाची असावी असं धरून चाललं तर ठीक आहे, पण 'पाककृती' 'सल्ला' या सदरात लिहितांना "दोघे खातो ना?? मग दोघे मिळून स्वयंपाक करू" असा विचार 'professionalism' घरात आणणं आहे हे तुम्हाला लिहितांना जाणवलं ना, मग तुम्ही स्वतः लग्नाआधी (किंवा झालं असेल तर आता नंतरही) कितीसा स्वयंपाक करता हो? सल्ला देताय तर आधिकार असेलच असं म्हणूयात, तर मग शिकवा की आय टी तल्या पत्नीला, एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ!

(बाय द वे, इथे मिसळपावावर गणपा आणि प्रभाकर पेठकरांसारखे बल्लवाचार्य आहेत, त्यांनी तुमच्या सारखा विचार केला असता तर आम्ही किती उत्तमोत्तम पाककृतींना मुकलो असतो अशी भीती वाटून गेली!)

मधुशाला's picture

1 Aug 2010 - 11:38 pm | मधुशाला

अहो ते मुलींनापण म्हणत आहेत... असो.. जगातले उत्तमोत्तम शेफ हे पुरुषच आहेत. आयर्न शेफ मधे तर एकच बाई आहे. :)

मनाला आवर घातलाय.;)
नाहीतर वाद सुरु!
माझ्यामते प्रत्येकाला/किला आपली तब्येत ठणठणीत राहील इतपत स्वयंपाक यायलाच हवा.

स्वप्निल..'s picture

31 Jul 2010 - 11:56 pm | स्वप्निल..

>>माझ्यामते प्रत्येकाला/किला आपली तब्येत ठणठणीत राहील इतपत स्वयंपाक यायलाच हवा.

असच म्हणतो

सुजय कुलकर्णी's picture

1 Aug 2010 - 10:09 am | सुजय कुलकर्णी

अगदी बरोबर....!! :-) लेख वाचून एका ओळीत तात्पर्य सांगितल्याबद्दल आभारी....!! तुमचा प्रतिसाद मुले आणि मुली ( शक्यतो IT )मनापासून वाचतील आणि आचरणात आणतील अशी अपेक्षा करतो....! :-)

अर्धवट's picture

1 Aug 2010 - 12:18 pm | अर्धवट

IT IT काय लावलय सारखं... काय जगावेगळे समजता का काय स्वतःला...
आणि आयटी म्हणजे नक्की काय हो.. डेवलप्मेंट हमाली.. छिद्रान्वेषीन् टेस्टर का ऊंटावरचे म्यानेजर.. बाहेर या आयटी मधुन..

च्यायला प्रतिक्रिया देणार नव्हतो.. मलाही हेच ढकलपत्र काही दिवसांपुर्वी आलेल आहे.. तेव्हाच रागराग झाला होता.. उत्तरही देणार होतो पण कशाला उगाच शेणात दगड मारा म्हणुन गप्प बसलो.. तर मिपा वर पुन्हा तेच..

केवळ आयटी मधे असल्यामुळे सारख्या टिर्र्या बडवणार्‍यांचा मोठा प्रॉब्लेम आहे बाबा हा.. आपल्या समस्या जगावेगळ्या आहेत आणि जगानं त्या सोडवायला हव्यात हाच अट्टाहास सारखा.. सोमवार ते शुक्रवार कामाचा आभास करायचा, कुचाळक्या करायच्या, आपण मनमोहनचे बाप असल्यासारखे कळत नसलेल्या विशयावर अकलेचे तारे तोडायचे.. आणि शनिवार रविवार ढुंगण वर करुन बायकोला आदेष सोडायचे... असो.. जास्त बोललो.. जाउद्या

स्वयपाकाबद्दल सांगायच तर मला फक्त मॅगी आणि चहा करता येतो आणि त्याची मला लाज वाटते...
खुप वेळा खुप त्रास सहन करावा लागतो अनोळखी ठिकाणी..

प्रत्येकाला स्वयपाक आला पाहिजे की नाही हे मला माहित नाही... केवळ तुमची बायको स्त्री आहे म्हणुन तिला स्वयपाक आला पाहिजे हे म्हणणं म्हणजे मुर्खपणाचं आहे...

बाकी आदितीशी बाडीस.. तिच्या प्रतिक्रियेवर उत्तर नाही दिले तुम्ही....

सुजय कुलकर्णी's picture

1 Aug 2010 - 11:38 pm | सुजय कुलकर्णी

अर्धवटराव,
आम्ही IT लोक अभिमानाने स्वत:हून कुठेही IT IT म्हणून मिरवत नाही......त्याची गरजही नाही....पण तुम्हाला IT वाल्यांबद्दल एवढा का संताप आहे ते मला कळले नाही...!
बाकी ...सोमवार ते शुक्रवार कामाचा आभास करायचा हे माझ्या बाबतीत तरी अगदी खरे आहे...! :-)
केवळ तुमची बायको स्त्री आहे म्हणुन तिला स्वयपाक आलाच पाहिजे हे म्हणणं तुमचच आहे त्यामुळेच ते मुर्खपणाचं असाव...!! मी लेखात असे कुठेही म्हटलेलं नाही....!
तुम्हाला स्वयंपाक काहीही येत नाही हे तुम्ही निर्लज्जपणे सांगितलेले आहेच.....आता थोडातरी स्वयंपाक शिका ....!

कानडाऊ योगेशु's picture

1 Aug 2010 - 3:48 pm | कानडाऊ योगेशु

माझ्यामते प्रत्येकाला/किला आपली तब्येत ठणठणीत राहील इतपत स्वयंपाक यायलाच हवा.

सहमत.

माझ्या काकाला कुणी विचारले कि तुला पोहता येते का तर तो उत्तर द्यायचा मला तरंगता येते.त्याच्या उत्तराची आठवण झाली.

रामदास's picture

31 Jul 2010 - 5:46 pm | रामदास

पण ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा

एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी असतं काय ?
नसेल येत रांधप .चलता है . हळूहळू सगळं येतं .
योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती"
असंही म्हणू नये.त्या योग्य वयात ती बिचारी तुझ्यासारखीच आय.टी. किंवा इतर काहीतरी शिकत असणार. मग सैपाक वगैरे शिकेलच.
संसार करंजीसारखा असतो असे वपुंचे म्हणणे होते ते मात्र या लेखामुळे आठवले.
असो. लेखाचा आशय कदाचीत वादग्रस्त ठरेल तरी लेखाची मांडणी चांगली आहे.आणखी अनुभव लिहायला काही हरकत नाही वाचायला आवडेल.

रामदास भाऊ ,
योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" असं कधीही म्हणू नये हे मी लिहिलेलंच आहे.... :-) स्वयंपाक वगैरे नंतर शिकेलच ह्याची रिस्क कुणी किती घ्यायची ते ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे....!! माझा मुद्दा एकच.....लग्न करताना मुलींना थोडातरी स्वयंपाक येणे आवश्यक आहे....!!
पण "ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा".....हे विधान थोडे वादग्रस्त.....मान्य... :-)
लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...!!

पांथस्थ's picture

3 Aug 2010 - 11:48 pm | पांथस्थ

संसार करंजीसारखा असतो असे वपुंचे म्हणणे होते ते मात्र या लेखामुळे आठवले.

देवा आता करंजी कुणी करायची असा वाद व्हायचा :)

झिंदगी है खेल
कोई पास कोई फेल
खिलाडी है कोई अनाडी है कोई
ओ बाबू समझे क्या...

संपादक मंडळ's picture

31 Jul 2010 - 6:02 pm | संपादक मंडळ

हे लेखन ढकलपत्रातून आले असल्याची नोंद घेतली गेली आहे. मिसळपावावरील लेखन लेखकाचे स्वतःचे असले पाहिजे अशी अट आहे. यासंबंधीचे धोरण येथे पहावे :
http://www.misalpav.com/node/13199

वरील लेखन लेखकाचे स्वतःचे आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर येत्या १२ तासांमध्ये येथे द्यावे अशी अपेक्षा आहे. ह्या मुदतीपर्यंत लेखकाचे समाधानकारक उत्तर न आल्यास हा लेख संपादक मंडळ अप्रकाशित करेल याची नोंद घ्यावी.

धन्यवाद.

संपादक मंडळ

सुजय कुलकर्णी's picture

31 Jul 2010 - 6:41 pm | सुजय कुलकर्णी

नमस्कार ,

वरील लेखन हे माझेच आहे.
हे लेखन मी सर्वाना email च्या माध्यमातून आधीच पाठवले आहे....!!
"मिसळपाव" वर माझे खाते आजच कार्यान्वित झाल्याने इथे article post करायला उशीर झाला.....

मिसळपाव वर हे माझे पहिलेच लेखन

धन्यवाद,
सुजय कुलकर्णी , कोल्हापूर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Aug 2010 - 11:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोल्हापूर का, मग तुमचा काहीएक दोष नाही, चालू द्या!

या निमित्ताने "पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली शिकल्या सवरल्या तरीही नवरा त्यांना पायपुसण्यासारखे वागवतो" अशा टाईपची एका पश्चिम महाराष्ट्रातल्या आंतरजालीय स्नेह्याशी झालेली चर्चा आठवली. तसंही मिपावर कोल्हापूर म्हणा ... प्रसिद्धच!

अर्धवट's picture

1 Aug 2010 - 12:22 pm | अर्धवट

आदितीतै... पश्चीम महराष्ट्रावर जायचं काम नाय...

तो लेख लिवनारा काय पश्चीम महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे काय... त्याचे वैयक्तीक विचार आहेत.. त्याची जबाबदारी त्याच्यावर..

असो.. आदितीतै मुद्दा काय.. तुम्ही प्रांतवादात कशाला घुसताय..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Aug 2010 - 5:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

छे छे, माझा कुठल्याच भागावर जास्त राग अथवा लोभ नाही. पण सदर आंजा स्नेही पश्चिम महाराष्ट्रातले असल्याने तिथल्या तरूणांना, पुरूषांना नावं ठेवत होते.

पण तरीही जालावर कोल्हापूर भलत्याच कारणांनी प्रसिद्ध आहे; विश्वास नसेल तर पर्‍याला विचारा.

सुहास..'s picture

1 Aug 2010 - 11:58 am | सुहास..

कसला पेटलायस रे स्वयंपाकाच्या मुद्द्यावर ???

का ??

अरे जरा किचनमध्ये बायकोबरोबर स्वयंपाक करुन बघ ..तिने फोडणी द्यावी ..आपण टमाटे चिरावेत...तिने चपाती लाटुन तव्यावर टाकावी..आपण भाजुन घ्यावी ....तिने दाल-वडे हातात चेपुन कढईत सोडावेत....आपण हातात झारा घेऊन तळुन घ्यावेत ...पळीतुन गरम रस्सा हातात घ्यावा...आणी तिला चव बघायला द्यावा....

छे !! ह्या आय.टी. वाल्यांना रोमान्समध्ये प्रोफेशिनलिझम पाहिजे...

आयटीतल्या पाचव्या एमएनसीत काम करणारा..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Aug 2010 - 12:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचा प्रतिसाद आवडला.

छे !! ह्या आय.टी. वाल्यांना रोमान्समध्ये प्रोफेशिनलिझम पाहिजे...

सगळेच नाही, पण लेखाचे प्रवर्तक एकदम हेडमास्तर आयटीवाले दिसताहेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Aug 2010 - 3:25 pm | llपुण्याचे पेशवेll

सुहाशा तू म्हणतोस ते खरे आहे. पण त्यासाठी दोघांनाही चांगला स्वैपाक यायला हवा किंवा दोघांचाही स्वैपाकाच्या बाबतीत आनंदी आनंद असावा.
:)

अवलिया's picture

31 Jul 2010 - 6:23 pm | अवलिया

मजेशीर धागा. :)
काही काही प्रतिसाद वाचुन भलतीच करमणुक होणार यात शंका नाही.

सुजय कुलकर्णी's picture

31 Jul 2010 - 6:24 pm | सुजय कुलकर्णी

नमस्कार ,

वरील लेखन हे माझेच आहे.
हे लेखन मी सर्वाना email च्या माध्यमातून आधीच पाठवले आहे....!!
"मिसळपाव" वर माझे खाते आजच कार्यान्वित झाल्याने इथे article post करायला उशीर झाला.....

मिसळपाव वर हे माझे पहिलेच लेखन :-)

धन्यवाद,
सुजय कुलकर्णी.

नितिन थत्ते's picture

31 Jul 2010 - 6:39 pm | नितिन थत्ते

१. का हो कुलकर्णी साहेब, तुम्ही पण स्वयंपाकात मदत करावी अशी अपेक्षा केली तर तुम्हाला त्यात आक्षेपार्ह काय वाटले? स्वयंपाक हे बायकोचेच काम आहे अशी (सध्याच्या काळात अ‍ॅबनॉर्मल असलेली) कल्पना तुम्ही लग्नापूर्वी बायकोला स्पष्टपणे दिली होती का?

२. तुम्हाला येणारी बहुतेक कामे तिला येत असणारच. पण तिला येणारी सगळी कामे तुम्हाला करता येतात का? उदाहरणार्थ अर्धाकच्चा का होईना (हे तुमच्या लेखावरून म्हणत आहे) तिला स्वयंपाक येतो तुम्हाला बहुधा तेवढाही येत नाही. तुम्ही का नाही लग्नापूर्वी स्वैपाक शिकून घेतला? (जुन्या काळच्या वाईट भाषेत- तुम्हाला तुमच्या वडिलांनी स्वयंपाक करण्याचे वळण का नाही लावले?)

३. आयटी मधल्या बायका जशा मॉल मध्ये ओळखू येतात तसे आयटी पुरुषही ओळखू येतात. सांगू लक्षणे?

तुमची बायको तुम्हाला वठणीवर आणण्यात यशस्वी व्हावी यासाठी तिला सदिच्छा आणि तुम्हाला 'सुधारा' असा सल्ला.

सुजय कुलकर्णी's picture

31 Jul 2010 - 7:36 pm | सुजय कुलकर्णी

नितीन साहेब ,
सर्वप्रथम सांगू इच्छितो , माझे लग्न झालेले नाही ....आजच्या IT काळात लग्न झालेली मुले ही स्वयंपाकात मदत करतातच....! पण IT मुलीना देखील "स्वत:ला किमान स्वयंपाक यायला हवा हा उद्देश ह्या मागचा आहे तसेच मुलींकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका असे मला सांगायचे आहे...!!

माझ्या बाबतीत म्हणाल तर मला उत्तम स्वयंपाक येत नसला तरी बर्‍यापैकी येतो ( अर्धाकच्चा नाही). आणि हा स्वयंपाक मी लग्नापूर्वीच शिकलो आहे. मुलानाही किमान स्वयंपाक यायला हवा ह्या विचारसरणीचा मी आहे. माझ्या मोठ्या भावाला उत्तम स्वयंपाक येतो. ( वहिनीलाही येतो :-) ) आणि वडिलांचं म्हणाल तर माझ्या वडिलांना अतिउत्तम स्वयंपाक येतो. "तुम्ही कधीतरी घरी या" म्हणजे शंका दूर होईल...!! इथे मला वडिलांनी सांगितलेलं नमूद कराव वाटत...."ज्याचे हात राड , त्याचे तोंड राड....." म्हणजेच ज्याला स्वत:ला बनवता येत तो उपाशी कधी मरत नाही...! तुम्हाला फक्त बोलताच येत का स्वयंपाकही येतो हे मला माहित नाही....! btw , तुमच्या वडिलांनी तुम्हाला माझ्या वडिलांसारखेच वळण लावले असावे हि अपेक्षा करतो. तुम्ही चांगले वळण शिकला नसाल असेच वाटते....! आयटी पुरुषही कसे ओळखू येतात हे मला जास्त माहित नाही.तुमच्या एवढ्या बारीक नजरेने मी पुरुषांकडे बघत नाही.....:-)

विनोदी लिखाण म्हणून लेख टाकला होता का? - 'हो' असं उत्तर असेल तर वाचलात!! (इथे 'झुंजी' पहायला मिळणार नाहीत म्हणून काही जण खंतावतील ती बात अलाहिदा:-))

की स्वानुभवावरून इतरांना 'शहाणं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न' होता? - तसं असेल तर (धागा सुरूच केला आहेत तेंव्हा) काही प्रतिक्रियांची तरी उत्तरं तुमच्याकडून मिळायला हरकत नाही. ती उत्तरंही लेखाइतक्याच खुसखुशीत भाषेत येउ द्या. वाचायला आवडतील. निदान, आज एकविसाव्या शतकातही असा विचार करणारी तरूण मंडळी का असू शकतात, याचं कुतुहल आहे ते सुटेल.

अनिल हटेला's picture

31 Jul 2010 - 7:14 pm | अनिल हटेला

अगदी खुसखुशीत लेखण !!
फक्त विनोदी लेख म्हणुन वाचल्यास चार घटका छान करमणुक होइल !!

बाकी वाद होणार असतील तर आधीच आपली कलटी !! ;)

--हटेला....

पहिल्या परीच्छेदात : "माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले."

शेवटच्या परीच्छेदात: "लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही."

काय हो सुजय साहेब ... काय कांदा बिंदा चिरायला लावला काय बायकोने ... इतकी जळजळ झाली कशाने म्हणायची तुमची ...

असो, तुमची केवळ बायकोच नव्हे तर तुमची आई - काकू - मावशी - आत्या - आजी - मुलगी - होणारी सून आणि तुमच्याशी संबंध येणाऱ्या प्रत्येक स्त्री ची दया येतेय ... देव त्यांना तुम्हाला सहान करण्याची शक्ती देवो ...

जाता जाता ... मिसळपाव वर नवीन आहात म्हणताय ? पाककृती सदर बघा जरा एकदा जाऊन ... "इथले" पुरुष कसे आहेत ते कळेलच तुम्हाला :)

ऋषिकेश's picture

31 Jul 2010 - 7:45 pm | ऋषिकेश

काय अडाणीपणा लावलाय..
मिपावर स्वागत.. मात्र क्षमस्व.. हे उत्तर देण्याच्या / टिप्पणी करण्याच्या लायकीचेही विचार नाहित.. हा प्रतिसाद केवळ पोच

मनुराणी's picture

31 Jul 2010 - 7:55 pm | मनुराणी

लेखक महाशयांनी लग्न उगाच केले. स्वयंपाकाला बाई ठेवली असती तर त्यांची गरज भागली असती आणि त्यांचा खूप मनस्ताप वाचला असता.

-एक IT wife

लेखाच्या पहिल्या परिच्छेदात सुजयभाउ म्हंतात....
माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले.

नंतर नितिनभाउंना पाठवलेल्या प्रेमपत्रांत म्हन्ले.
नितीन साहेब ,
सर्वप्रथम सांगू इच्छितो , माझे लग्न झालेले नाही ....

कांय कळ्नांहा नाय या भुरग्याचा...

जन्माचार्य
मोदकांला इंद्रायणी वापरलाय की कोळपी यांवर काथ्याकूट करण्यापेक्षा २ मोदक जास्त खाईन म्हणतो..

पुष्करिणी's picture

31 Jul 2010 - 11:47 pm | पुष्करिणी

अगदी हेच लिहिणार होते...
एकंदरीत हा लेख बराच काल्पनिक आहे.

लेखकाला मुलींना स्वयंपाक न येणं, मुलींनी सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी करणं, ब्रँडेड कपडे घालणं, भाजीवाल्याशी घासाघीस करणं , नवर्‍याकडून घरकामात मदतीची अपेक्षा करणं, गुगलवरून पाकृ. वाचून स्वयंपाक करणं, कुणीही काकू म्हटलेलं न आवडणं इ.इ. असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत...वाचून गंमत वाटली.

सुजय काकांना शुभेच्छा!

सुजय कुलकर्णी's picture

1 Aug 2010 - 10:45 am | सुजय कुलकर्णी

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...!
तुम्ही वरती लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीला माझा प्रोब्लेम नाही....( except "स्वयंपाक न येणं" ) .
मी software engineer असून ( software engineer व्हायला कष्ट पडले नाहीत हि गोष्ट वेगळी ;-) ) मला स्वयंपाक येतो....त्यामुळे software मध्ये काम करते , कष्ट घेऊन engineer झाले त्यामुळे स्वयंपाक शिकायला वेळ मिळाला नाही हे स्वयंपाक न येण्याचे कारण होऊ शकत नाही....!!

अडगळ's picture

31 Jul 2010 - 8:50 pm | अडगळ

आयला , आमच्या गावची माण्सं सुधरायची न्हाईत.
लै कष्ट असतात मालक स्वयपाक म्हणजे . चेष्टा नव्हे.
आता बायको दिवसभर काम करुन आली आणि तुमी तांबडा पांढरा मागाय लागला तर काय रडायचं तिनं ?
कोंबडी आणा , दही , कांदा , हळद , तंबाटं , कोथ्मीर, आलं, लसून ,तीळ , खोबरं , खस्खस्, जमवा.
बोंबलत मंगळ्वारात जाऊन ओला मसाला आणा. कोंबडी शिजवून , सुक्कं बाजूला काढून , तांबड्याची तयारी , पांढर्‍याचं वाटण वाटायला घ्या..

नायगावकर काका हुशार आहेत.
आयला आमी बहिणाबाईंचा सत्कार पण निर्लेप चा तवा देऊनच करणार.

(म्हादेव प्रसाद , दौलत मध्ये पडिक आणि रस्सामंडळाच्या ष्टो चा मेस्त्री , राजारामपुरीतला ) अडगळ.

बाकी जाता जाता " तु तर फक्कड मासिक हुंडा" ही नायगावकर काकांची कवितापण आठवली.

ए अगं सीरीयल घेउन ये गं, इथे मस्त मॅच सुरु आहे.

छोटा डॉन's picture

31 Jul 2010 - 9:03 pm | छोटा डॉन

आता बायको दिवसभर काम करुन आली आणि तुमी तांबडा पांढरा मागाय लागला तर काय रडायचं तिनं ?
कोंबडी आणा , दही , कांदा , हळद , तंबाटं , कोथ्मीर, आलं, लसून ,तीळ , खोबरं , खस्खस्, जमवा.
बोंबलत मंगळ्वारात जाऊन ओला मसाला आणा. कोंबडी शिजवून , सुक्कं बाजूला काढून , तांबड्याची तयारी , पांढर्‍याचं वाटण वाटायला घ्या..

=)) =)) =))
हे मात्र १००% पटले बरं का !

ह्म्म्म लेखकाने आपले विचार खुप वादग्रस्त रीतीने मांडलेत.
पहिल्याच लिखाणात १०० ओलांडणार बहुतेक. आगावु अभिनंदन.

२+ वर्ष झाली पण आम्ही अजुन ६० नाही ओलांडली. :(
असो.

मी पण आयटीतलाच, फार चांगला नाही पण उपाशी मरणार नाही इतपत स्वयंपाक जमतो.
घरुन मुलगा / मुलगी हा भेद न करता आईबाबांनी मला आणि बहिणीला सगळी काम शिकवली.
अगदी कपडे धुणे / वाळत घालणे ते स्वयंपाक.
मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला.

जेव्हा बायको(लग्नाआधी) मला पहायला आली (हो बरोबर लिहिलय. भेटण्याचा कार्यक्रम मुद्दाम मीच घरी ठरवला होता.)
तेव्हा गप्पा मरताना जेव्हा एक-मेकांच्या छंदा विषयी विषय निघाल्यावर मी कुकिंग म्हटल्यावर ती फक्त गोड हसली.
लग्न झाल्या वर त्या हसण्या मागचं गुपीत कळलं.
बाईसाहेबांना फक्त चहा येत होता.
पण ती १-२ महिन्यात सगळं शिकली.

आणि हो माझी बायको नॉन आयटी वाली आहे :)

चतुरंग's picture

31 Jul 2010 - 9:53 pm | चतुरंग

>>>>फार चांगला नाही पण उपाशी मरणार नाही इतपत स्वयंपाक जमतो.

गण्या, गण्या अरे विनय तरी किती असावा! ;)

'असा मी असामी' मधे एके ठिकाणी पुलनी लिहिलंय - " तिचं वय अनेक वर्षे सोळावर येउन थांबलं आहे. या हिशोबाने धाकट्या भावंडांच्या वयाचा विचार केला तर काही भावंडाना वयच रहात नाही. कींवा बीजगणितातल्यासारखं मायनस एक, मायनह दोन असं रहातं!!".

तसं, गणपा जर 'उपाशी मरणार नाही इतपत स्वयंपाक जमतो.' म्हणणार असेल तर माझी अवस्था म्हणजे .... !!!!

सोम्यागोम्या's picture

2 Aug 2010 - 1:11 am | सोम्यागोम्या

पु.ल. म्हणजे ग्रेटच हो ! धाकट्याभावंडांच गणित वाचून खूप हसलो ! मनमुराद !
तुम्हि दाखला पण छान दिला आहे. जबरी !

सुहास..'s picture

31 Jul 2010 - 11:30 pm | सुहास..

हाण्ण तिच्या !!!

गणपाभौ , एक नंबर रे !!

कधीच ऊपाशी न मरण्याईतपत स्वयंपाक येणारा !!

पांथस्थ's picture

4 Aug 2010 - 12:16 am | पांथस्थ

मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला.

हमारा भी ऐसाईच हुव्या!

बाय द वे, स्वयंपाक हि गोष्ट कर्तव्य म्हणुन हद्दपार होउन एक छंद्/आवड/Passion च्या रुपात वर येत आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. असो.

१. नवरा बायको दोघेही IT/Non-IT पण नोकरी करणारे असतील तर स्वयंपाक हि दोघांची जबाबदारी हवी
२. तसे नसल्यास ज्याने घर सांभाळायची जबाबदारी घेतली असेल (स्त्री/पुरुष) त्याने स्वयंपाक करावा

पण महत्वाचे म्हणजे संसारात असे कोणतेही नियम लागु होत नाहित. परस्पर-सामंजस्य आणी आपापल्या कर्तव्याची जाणीव ह्यावर गाडा चालत असतो. तेव्हा स्वयंपाक कोणी करायचा हा मुद्दा जरा गौण ठरतो.

मी IT मधे आहे (काय करता!) आणी बायको घर सांभाळते. पण अनेकदा ऑफीसमधुन आल्यावर मी स्वंयपाक करतो. कारण हात फार वळवळ करतात. घरात सगळ्यांनाच स्वयंपाक येतो. स्वयंपाक करण्यात गम्मत आहे हे कळले तर तो शिकवायची अथवा शिक म्हणुन मागे लागायची गरज पडत नाहि. माझ्या मुली मी कु़कींग (हा शब्द मला स्वयंपाक करण्या पेक्षा बरा वाटतो) करत असतांना कधी कधी observe करत असतात. त्यातुन त्या शिकतीलहि. आणी त्यांनी शिकलेच पाहिजे कारण ते स्वावलंबी बनण्यासाठि गरजेचे आहे (just for the sake of it मला मुलं असती तरीही मी त्यांना cooking शिकवले असते!). तेव्हा अधिक सांगणे नको!

असो, फारच अवांतर झाला वाटतं प्रतिसाद.

बेसनलाडू's picture

4 Aug 2010 - 3:00 am | बेसनलाडू

मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला.
हमारा भी ऐसाईच हुव्या!

आमचेही अगदी असेच झाले.
(स्वयंपाकी)बेसनलाडू

बाय द वे, स्वयंपाक हि गोष्ट कर्तव्य म्हणुन हद्दपार होउन एक छंद्/आवड/Passion च्या रुपात वर येत आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. आणी शिकलेच पाहिजे कारण ते स्वावलंबी बनण्यासाठि गरजेचे आहे.
१००% सहमत आहे.
(सहमत)बेसनलाडू

उपास's picture

31 Jul 2010 - 10:02 pm | उपास

साहेब, लोकांना यडे बनवायचे आ़णि उचकवायचे धंदे सोडा.. लेखात म्हणताय लग्न झालंय, बायको अमुक अमुक म्हणाली आणि प्रतिसादात म्हणताय लग्न झालेलं नाही. . स्वयंपाक जाउंदे पण लग्न होणं म्हणजे काय हे तरी कळतय का?
तुमचा राग नक्की कशावर आहे, आयटीवाल्या बायकांवर, त्यांच्या जिन्सवर (फीट ठेवलेली तब्येत), त्यांच्या महागड्या मोबाईलवर (म्हणजे श्रीमंतीवर?) कि स्वयंपाक ऑऊटसोर्स करण्याच्या (तुमच्या भाषेत आळशी) वृत्तीवर.. जरा इनो घ्या..
ती मुलगी आयटी मधे आहे म्हणजे तिने चार भिंतीतून आणि स्वयंपाकघरातून बाहेर येऊन (अथवा तिथे न घुसमटता) मान मोडेस्तोवर अभ्यास केलाय, इंजिनिअरींग वगैरे केलय आणि स्पर्धात्मक जगात पाऊल ठेवून ती पैसे कमवतेय.. त्याच्यावर तुमचा राग का? उलट तिचं, तिच्या वडिलांच (ज्यांनी तिला असं चाकोरीबाहेर यायला प्रोत्साहन दिलय) त्यांच कौतुक करायला हवं..
तुम्हाला पोळ्या लाटून हव्या असतील तर आयटीची मुलगी लागतेच कशाला.. तुमच्या सारख्यांना पैसा हवा आयटीतल्या मुलीचा आणि तिने गाढवासारख्म घरात राबायलाही हवं.. तुम्ही स्वयंपाक करण, धुणी भांडी आउटसोर्स करु शकता पण पैसे कमवणारी बायको कशी आउटसोर्स करणार? तेव्हा ती तुम्हाला चार घास घालतेय खायला त्याचे आभार माना.. (बायको असेल तर) सुखाने मिळून मिसळून संसार करा.. आणि कांदा चिरणे, कोथिंबीर निवडणे ह्यापलिकडे तुमचा रिझुमे जातो का ह्यावर विचार आणि प्रयत्न करा.. लागली तर गणपाशेठ, पेठकर काकांची मदत घ्या.. आणि अशा स्वतच्या वैचारिक मर्यादांची बुंदी पाडणार्या लेखांना पसरवणे शक्य झालं तर थांबवा..
- (हितचिंतक) उपास

नेत्रेश's picture

31 Jul 2010 - 10:08 pm | नेत्रेश

लेख वाचुन हैराण्/परेशान झालो होतो...

नावातकायआहे's picture

31 Jul 2010 - 10:08 pm | नावातकायआहे

गाय छाप, चुना पुडि घ्यावि आन पाराव जाउन निवांत धुळवड बघत बसावि....

अडगळ's picture

31 Jul 2010 - 10:35 pm | अडगळ

गाय छापच्या आठवणीनं काळजात किक बसली राव.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Aug 2010 - 3:58 pm | llपुण्याचे पेशवेll

छान.

(गोसेवेतला) पेशवे.

चावटमेला's picture

31 Jul 2010 - 10:51 pm | चावटमेला

सर्वप्रथम, सुजयचे अभिनन्दन, खरोखर, पहिल्याच लेखात सेन्च्यरी मारणार तुम्ही राव. बाकि , योग्य वयात हा लेख वाचायला मिळाला, वेळीच सावध केल्याबद्दल धन्यवाद :)

इतक्या तिखट प्रतिक्रिया पाहून खरेतर हसूच आले, हा लेख एक fiction + real experinces चा ब्लेन्ड असू शकतो, म्हणूनच माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले. या प्रकारचे लेखन आलेले असावे, केवळ अश्या क्षुल्लक गोष्टीला पकडून वैयक्तिक चिखलफेक करणे योग्य नाही.

काही मंडळींनी हा लेख फारच वैयक्तिक घेतलेला दिसतो :) तर लोकहो, just chill, लेखाच मूळ उद्देश हा केवळ स्रियांनीच स्वयंपाक करावा आणि उत्तमच करावा असा मूळीच वाटत नाही, उलट पुरुषांनीही स्व्यंपाक शिकावा आणि आजच्या IT युगात बायकोकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नयेत असाच दिसतो.

शेवटी, सुजय भाऊ, लेख कम्प्लीट नादखुळा, अगदी, कोल्हापूरी, रश्श्यसारखा झणझणीत :)

लेख म्हणूनही भिकार. विषय तर त्याहून बाद!!
विनोदी म्हणावं या लेखाला तर क्षणोक्षणी तिडीक जाणारी गृहितकं...

अर्धवट's picture

1 Aug 2010 - 12:32 pm | अर्धवट

+१०००००००

Dhananjay Borgaonkar's picture

3 Aug 2010 - 12:12 am | Dhananjay Borgaonkar

+५००

हाहाहाहाहा..
शिर्षक वाचुनच आत काय असेल याची कल्पना आली होती... अपेक्षेला खरा उतरला लेख आणी प्रतिसाद्स. :)
आयटी असो वा नॉन आयटी, घरातील सर्व कामे पहाणार्‍या स्त्रियांची संख्या जास्तच आहे.. पुरुष मोजकेच.
नोकरी करणार्‍या, पण तरी स्वयंपाक घरात नवर्‍याला पाऊल न ठेवु देणार्‍या बायका सुद्धा मी पाहिल्यात. पण स्वयंपाकासारख्या क्षुल्लक गोष्टीवरुन जर तुम्ही चांगल्या जीवनसंगिनीला मुकणार असाल तर त्याहुन वाईट काहीही नाही..

एक प्रामाणिक सल्ला: जर तुम्हाला परफेक्ट गृहिणी बायको म्हणुन हवी असेल तर मग शिक्षण्/नोकरी अशी अपेक्षा ठेवु नका. लग्नाच्या बाजारात हवे तसे पॅकेजेस उपलब्ध आहेत.. ;) नशिब थोर असेल तर तुम्हाला हवे असलेले सर्व गुण एकाच मुलीत सुद्धा मिळतील कदाचित, बी ऑप्टीमिस्टीक. :)

शेवटी लग्न हा एक जुगारच असावा/ लव असो वा अरेंज. ज्याचे त्याचे नशिब आणी ज्याचा त्याचा अनुभव. :)

(लग्नासाठी फक्त विचार जुळण्याला महत्व देणारा )