IT WIFE आणि स्वयंपाक

सुजय कुलकर्णी's picture
सुजय कुलकर्णी in जनातलं, मनातलं
31 Jul 2010 - 4:20 pm

लग्न झाल्यानंतर साधारणपणे १०-१५ दिवसांनी "स्वयंपाक" हा मुद्दा किती महत्वाचा होता हे तरुणांना कळून चुकते. लग्न ठरवताना सुंदरता, शिक्षण, आणि नोकरी हे तीनच मुद्दे विचारात घेतल्याने हा अनर्थ तरुणांवर ओढवतो. मुलीही "लग्नानंतर स्वयंपाकाच बघू..." असाच विचार करत असाव्यात किंबहुना करतात. खरंतर लग्न झालेल्या ह्या मुलींना बाई किंवा काकू म्हणायला हरकत नाही. पण "बाई" म्हटल्यावर ह्या मुलींना प्रचंड राग येतो. विशेषत: सॉफ्टवेअर मधल्या मुलीला. स्वयंपाक आणि घरकामाची जबाबदारी एकटीच्याच अंगावर येईल का काय असं बहुधा त्यांना वाटत असावं.ह्या फील्डमधल्या मुलींशी ज्यांच लग्न झालेले आहे त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती व्यक्त करावीशी वाटते. स्वयंपाक आणि जॉब अशी दुहेरी भूमिका आपण उत्तमरीतीने पार पाडत आहोत असा ह्या बायकांचा गोड गैरसमज असतो. स्वयंपाकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वप्रथम लग्न न झालेल्या तरुण वर्गाला माझा सल्ला आहे की लग्न ठरवताना, "स्वयंपाक येतो का?" हा प्रश्न आवर्जून विचारावा. " थोडा-थोडा स्वयंपाक येतो" असे उत्तर मिळाल्यास " थोडा म्हणजे किती??" हे विचारायला विसरू नका. प्रत्येकीची definition वेगळी असते. माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले.
आठवड्याचे सातही दिवस स्वयंपाकाचा कंटाळा असणार्‍या ह्या बायका तुम्हाला सॉफ्टवेअर मध्येच सापडतील.सदानकदा आजचा स्वयंपाक करायचं कसं चुकवता येईल ह्याच खटाटोपात त्या असतात. " आज बाहेर खायला जायचे का?" हा प्रश्न नवर्‍याने विचारून होण्याआधी त्या "सही...... कित्ती छान......आलेच हं आवरून...." असे म्हणत क्षणार्धात दिसेनाश्या होतात. एकदा बाहेर जायचं ठरवल्यावर , हुशार आणि शहाण्या नवर्‍याने ते कधीही कॅन्सल करू नये. अन्यथा भांडण होण्याचे ९९% चान्सेस असतात.शेवटी बाहेरून हॉटेलमधले जेवण मागवावे लागते आणि मगच ह्या बायका शांत होतात हे सांगण्याची गरज नसावी. वीक एन्ड ला बाहेर पडण्याची वेळही ह्या बायका अचूक हेरतात.संध्याकाळीच बाहेर पडायचं म्हणजे नवरा "रात्री बाहेरच जेवू" असे म्हणतो हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. चुकून कधी स्वयंपाक करण्याचा योग आलाच तर, "आपण" आज खिचडी बनवूया का? असे प्रेमाने बोलून नवर्‍यालाही स्वयंपाक घरात ओढून काम करायला लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. काही नवरेमंडळी ह्याला बळी पडतात. काहीजण "आपण" ह्या शब्दावरून "तू" ह्या शब्दावर नेण्याचा निष्फळ प्रयत्न करतात.
एकटीने स्वयंपाक करणे हा आपल्यावर अन्याय आहे अस ह्यांना नेहमी वाटतं. "दोघे खातो ना?? मग दोघे मिळून स्वयंपाक करू" असा professionalism त्या घरातही आणतात. ह्या बायका स्वयंपाक करताना नवरा बाहेर आरामात TV बघत असेल तर हे त्यांना अजिबात बघवत नाही. स्वयंपाक करताना ह्या आळशी माणसाला कुठलं काम देता येईल ह्याचा विचारच त्या करत असाव्यात. गरज नसलीतरी थोडं का होईना आपल्या नवर्‍याने काम केलच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो.अश्या बायकांचे नवरे साधारणत: ताट-वाट्या घेणे, कोथिंबीर निवडणे,डायनिंग टेबल पुसणे अशी कामे करतात. IT मधल्या बायकांना उत्तम व चविष्ट भाजी बनवता येते ही संकल्पना निव्वळ अशक्य आहे. बनवलेल्या भाजीचा पहिला प्रयोग त्या आपल्या नवर्‍यावरच करतात. एवढ्यावरच त्या थांबत नाहीत. वर तोंड करून "कशी झालीय भाजी?" हा प्रश्न विचारायला ते अजिबात विसरत नाहीत. "suggestions " म्हणजे त्यांना अपमानकारक वाटते. त्यांना suggestion देणे म्हणजे नवर्‍याने वादाला सुरुवात केल्यासारखी असते. भांडण नको म्हणून हे नवरे " भाजी मस्त झालीय..." म्हणत हळूच फ्रीजमधून थोडा सॉस, लोणचे घेताना दिसतात. त्यातूनही हिम्मत करून कुणी suggestion दिलेच तर त्यांची प्रतिक्रिया ठरलेली असते. "झालं? ठेवलास नावं??"....."थोडं कमी जास्त होणारच की रे"......."तू करायचं होतास मग"......"एवढं केलय त्याचं काही नाही..." असा उपकाराचा टोला लगवायलाही ते मागेपुढे बघत नाहीत.
नुकतचं लग्न झालेल्या मुली कंपनीत बसून google वर रेसिपी शोधताना दिसतात. "आपल्याला काहीही बनवता येत नाही" हे नवर्‍याला इतक्या लवकर कळू नये हा त्यामागचा उद्देश असावा. रेसिपी मिळाली नाही तर आईला,आत्याला,मामीला फोन करून तासभर ह्या बायका रेसिपी विचारण्यात काढतात. "योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" हे मात्र नवर्‍याने दिसत असूनही म्हणू नये. ह्या बायकांचा "जेवण बनवण्याचा" मूड अशाने केंव्हाही जाऊ शकतो. चौरस आहार सोडून दररोज नवनवीन छोटे छोटे पदार्थ बनविण्यावर ह्यांचा भर असतो. हे भयंकर आणि अयशस्वी प्रयोग करण्यामागचा उद्देश प्रेमापोटी असतो की " उद्यापासून स्वयंपाकाला बाई लावू" हे नवर्‍याने स्वत:हून म्हणण्यासाठी? हे त्या बायकांनाच माहित...!
ह्या बायका मंडईतल्या गर्दीमध्येही सहज ओळखून येतात. ब्रँडेड जीन्स आणि टी-शर्ट , एका हातात महागडा मोबाईल व दुसर्‍या हातात पर्स हि त्यांची ओळख. मल्टीप्लेक्स , शॉपिंग मॉल मध्ये बिनधास्त पैसे वाया घालवणार्‍या ह्या बायका मंडईमध्ये १-२ रुपयासाठी घासाघीस करताना पहावयास मिळतात. "too costly ......ohh.....too much ......" असे उद्गार ऐकल्यास ती शक्यतो सॉफ्टवेअर मधलीच समजावी. इथे bargaining हा त्यांच्यादृष्टीने मूळ मुद्दा नसून " IT मधली असले म्हणून काय झाले? मलाही भाज्यांमधले कळते म्हटलं...." हे जगाला पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मजेची गोष्ट म्हणजे अश्या बायकांना मंडईतले विक्रेतेही ४-५ रुपये आधीच वाढवून सांगतात. एज्युकेटेड बायकांना हे अजूनही कळालेले नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मित्र हो, हा लेख लिहण्याचा उद्देश हाच की, तुम्ही सॉफ्टवेअरमधल्या मुलीशी लग्न करत असाल तर पुन्हा विचार करा. बोटांवर मोजण्याइतक्या बायकांना स्वयंपाक येत असेलही, पण होणारी बायको त्यांपैकीच आहे का नाही ते तुम्हालाच ठरवावे लागेल. तुम्हाला स्वत:ला चांगला स्वयंपाक येत असल्यास उत्तमच. पण ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा. लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही. चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.

पाकक्रियामतसल्लाअनुभव

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

1 Aug 2010 - 3:11 am | प्रियाली

चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.

अगदी!!!! इथल्या बायकांचे टक्के टोणपे ऐकण्यापेक्षा आणि असले लेख लिहिण्यात आपला वेळ घालवण्यापेक्षा नवनवीन पाककृती करा आणि इथल्या पाककृती विभागात लावा.

पुढील पाककृतीकरता शुभेच्छा!!

असुर's picture

1 Aug 2010 - 3:45 am | असुर

वा वा!

अजून एक बल्ल्वाचार्य मिपावर येणार काय?

आम्ही मिपावरच्या पा़कृ वाचूनच स्वयंपाक शिकलो आहोत!

-- असुर

नोकरी, पैसा, सौंदर्य, छंद, शिक्षण, स्वभाव इ.इ. गोष्टींचा प्राधान्यक्रम लावुन/प्राधान्यता ठरवुन मगच जोडीदाराची निवड करावी म्हणजे असे लेख लिहायची गरज नाही भासणार.

बादवे: हा लेख काल्पनिक आहे हे लेखकाच्या? सद्य वैवाहीक स्थितीवरुन उमजले.

मेघवेडा's picture

1 Aug 2010 - 3:15 pm | मेघवेडा

>> सद्य वैवाहीक स्थितीवरुन उमजले.

मला तर त्यांची सद्य वैवाहिक स्थिती काय आहे हेच समजले नाहीये अजून! ;)

विंजिनेर's picture

1 Aug 2010 - 4:17 pm | विंजिनेर

मेव्या, तुला रे कशाला नसत्या चौकशा? त्या नायल्या सांभाळ जा पाहू - तो स्वप्नांनी त्रस्त आहे तिकडे.

अरेच्चा! तुम्हा लोकांच्या विंग्लड-आशियात भलतेच उपाय दिसतात!!

प्रकाश घाटपांडे's picture

1 Aug 2010 - 9:25 am | प्रकाश घाटपांडे

लेख मजेशीर वाटला. शेवटी ज्याच त्याच स्वातंत्र्य

लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही. चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.

लग्न न झालेल्या मित्रांनो अस म्हणायचय का? असो

(इकडची काडी तिकडे न करणारा आळशी नवरा) ( हे कोणरे तिकडे म्हणतय रे तिकडे वा! काय पण प्रौढीने सांगतोय)

सुजय कुलकर्णी's picture

1 Aug 2010 - 10:23 am | सुजय कुलकर्णी

प्रकाश काका,
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...! खरतर लग्न झालेल्या किंवा लग्न न झालेल्या दोघानाही स्वयंपाक यायलाच हवा....! एकटे असताना कधीही स्वयंपाक करायला लागू शकतो....!!
आणि आळशी नवरा मी म्हणत नाहीय हो..... :-) आजकालच्या काही IT मुलींच्या( पुन्हा वाद नकोत ;-) ) डोक्यातले विचार आहेत हे....!!

अप्पा जोगळेकर's picture

1 Aug 2010 - 10:22 am | अप्पा जोगळेकर

मज्जा आली. काय टीआरपी आहे. आणि हाणामारी तर सॉलिड.
च्यामारी आमचे वातुळ धागे २५ च्या वर जात नाहीत. ह्यांची आल्या आल्याच फटकेबाजी सुरु.

इथे खूप सूज्ञ पुरुष आणि महिला आहेत. बरेच विवाहितसुद्धा असतील. प्रत्येक लग्नाऊ व्यक्तीस स्वयंपाक येणे अनिवार्य आहे. असा रिप्लाय एकानेही टाकला नाही की याचं आश्चर्य वाटतंय. वर कोणीतरी ( मला वाटतं ३_१४ वाल्या ताईंनी. चूकभूल देणेघेणे ) जेवण बाहेरुनही आणता येतं, विचार आणता येतं नाहीत, जेवणासाठी माणूस ठेवता येतो असला काहीतरी विनोदी रिप्लाय टाकला आहे. जेवणासाठी किंवा आणखी कशाकशासाठीसुद्धा पुरुष / बाई ठेवता येते आणि विचारमंथन की काय म्हणताय त्यासाठी पुस्तकं असतात किंवा उपक्रम सारख्या वेबसाईट असतात आणि पोरं सांभाळायला बेबीशीटरपण असतात . हे सगळं एकाच जागी सहकार आणि सहभाग तत्वावर व्हावं म्हणून पब्लिक लग्न करतं असा माझा अंदाज आहे.
प्रत्येकाला जेवण बनवता आलं पाहिजे. त्या तुलनेत विचार्मंथन ही तुच्छ गोष्ट आहे.

- एक अविवाहित

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Aug 2010 - 11:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> एक अविवाहित <<
योग्य वयात लग्नं केलं असतात ना अप्पा आजोबा तर असा बोळा तुंबला नसता! असो. तुम्हाला बोळा निघण्यासाठी शुभेच्छा!

अप्पा जोगळेकर's picture

1 Aug 2010 - 1:19 pm | अप्पा जोगळेकर

अहो ताई मी पंचवीस वर्षे वयाचा अविवाहित आहे. आणखीन ५-७ वर्ष लग्न झालं नाही तर बोळा तुंबला असं म्हणू शकता. एकदम मोडीत काढलंत मला.

झाला ना गोंधळ, सौरभ ? बेवकूफ, (कृपया ह घेणे ) ऐसे अपना नाम लिखोगे तो "तुम्हें कोई लडकी दिल देने भी वाली होगी, तो दिल थांम लेगी"

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Aug 2010 - 10:30 am | llपुण्याचे पेशवेll

मस्तं लेख रे.. आवडेश. स्वैपाक बायकोला यायलाच हवा अशा मताचा मीही आहे.
(४थ्या शतकातला) पेशवे

मला स्वतःला चांगला स्वैपाक येतो पण बायको चांगला स्वैपाक करणारीच बघेन. सगळं स्वतःच्याच हातानं करायचं तर बायको पाहीजेच कशाला. ;)
(आपला हात जगन्नाथ वाला)पेशवे

बाकी लेखनशैली मस्तं खुसखुशीत आहे. काही काही निरीक्षणं तर मस्तंच.
(वाचक) पेशवे

आता १००+ कडे वाटचाल पक्की. आणि धागा प्रवर्तकही प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन तेल ओतत आहेतच.

Pain's picture

1 Aug 2010 - 11:03 am | Pain

:D :D :D अप्रतिम

पुण्याचे पेशवे , प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद....!! :-)
तुमचीही माझ्यासारखीच मते असल्याचे वाचून आनंद झाला....! :-) मुलीना "किमान" , बर्‍यापैकी स्वयंपाक यायलाच हवा...त्यात अजिबात तडजोड नाही किंवा "स्वयंपाक न येण्याची " मुलींची कुठलीही कारणे खपवून घेतली जाऊ नयेत...!! ( अपवादात्मक कारणे अगदी थोडीच...)
"सगळं स्वतःच्याच हातानं करायचं तर बायको पाहीजेच कशाला. " ह्या मताशी मात्र मी तुझ्याशी सहमत नाही मित्रा....!! :-)

अर्धवट's picture

1 Aug 2010 - 12:25 pm | अर्धवट

पुप्या.. विचार कर तु काय लिहिलयस.. आणि ते कशासाठी वापरलं जातय त्याचा..

असो.. सुजय.. तुमचं लग्न झालं आहे का?.. तुमच्या बायकोला शुभेच्छा.. नसेल झालं तर तुम्हाला शुभेच्छा..

गणपा's picture

1 Aug 2010 - 1:12 pm | गणपा

हा हा हा, पुप्या झिंदाबाद,
अत्ता पर्यंत २-२ मासे गळाला लागले रे =)) =)) =))

सुजय कुलकर्णी's picture

1 Aug 2010 - 11:54 pm | सुजय कुलकर्णी

अर्धवटराव ,
लेख वाचल्याबद्दल धन्यवाद...!
माझे लग्न झालेले नाही....थोडातरी स्वयंपाक येणारी मुलगी मिळावी हि छोटीशी अपेक्षा आहे...!!
शुभेच्छा दिल्याबद्दल आणखी एकदा धन्यवाद...! :-)

"स्वयंपाक न येणे" ह्याला शक्यतो कुठलेही valid reason नसावे... <<<
म्हणजे किमान ९०% बाप्ये invalid.....

टुकुल's picture

2 Aug 2010 - 4:27 pm | टुकुल

जबरा रे पुपे..

४ थ्या शतकातला,
टुकुल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2010 - 5:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आणि निरीक्षण आवडले.....!

आधुनिक स्त्रीयांच्या प्रतिसादांनी लेखाच्या निमित्ताने मात्र चांगली करमणूक केली, मजा आली.........!

-दिलीप बिरुटे

पल्लवीपियुष's picture

1 Aug 2010 - 7:29 pm | पल्लवीपियुष

तुमची हि खरड स्वानुभव आहे की तुमच्या सारख्या च तुमच्या मित्र मंडळीन चा अनुभव आहे.....? इतरांच्या अनुभवा नी लिहिलेली जर हि मुक्ताफळे असतील तर ती अत्यंत चुकी ची आहे.आणि स्वानुभवा वरून असतील तर तो तुमच्या अनुभवाचा भाग आहे .... या अनुभवा वरून तमाम IT क्षेत्रातल्या बायकांबद्दल घाणेरडे मत प्रदर्शित करणे योग्य नाही ..... हा अनुभव तुम्हाला किंवा तुमच्या मित्र मंडळीना इतर क्षेत्रातल्या मुलींकडून हि येऊ शकतो....!
...... तुमची हि मते निव्वळ न पटण्याजोगी आहेत,,,
तुमच्या पत्नीला शुभेच्छा ......आणि सहानुभूती सुद्धा..

प्रभो's picture

1 Aug 2010 - 7:49 pm | प्रभो

आपलं तर काय टेंशन नाय्....लग्न करून बायकोला म्हणणार तू नोकरी कर्..मी घर संभाळतो...

हाय काय अन नाय काय??? ;)

आम्ही आयटीवाले बरंका.. :D

मेघवेडा's picture

2 Aug 2010 - 1:00 am | मेघवेडा

द्येवा द्येवा, एक लंबर! आजकाल प्रभ्याशी धाग्याधाग्यावर सहमत होणे होत आहे! ;)
इथंही आहेच. फक्त ते शेवटचं वाक्य वगळून. :)

अप्पा जोगळेकर's picture

2 Aug 2010 - 9:25 am | अप्पा जोगळेकर

आपलं तर काय टेंशन नाय्....लग्न करून बायकोला म्हणणार तू नोकरी कर्..मी घर संभाळतो...
+१००. हे माझंसुद्धा स्वप्न आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2010 - 9:27 pm | बिपिन कार्यकर्ते

तुमचा हा लेख तुम्ही गंमत म्हणून लिहिला असेल आणि ही तुमची खरोखरची मतं नसतील असं गृहित धरतो आहे.

तसे असल्यास, ठीक आहे लेख.

तसे नसल्यास, एक आयटीतली मुलगी वाचली बिचारी.

मधुशाला's picture

1 Aug 2010 - 11:11 pm | मधुशाला

सुंदर लेख...
वरच्या प्रतिसादातील बायकांचे प्रतिसाद वाचून खूपच करमणूक झाली. म्हणजे लेखातील मुद्दे नक्कीच खरे दिसतात. नाहीतर इतक्या मिरच्या झोंबल्या नसत्या :) यांच्या नवर्‍यांची कीव येते. हे म्हणजे "सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही" असे अवघड जागेचे दुखणे आहे. बिचार्‍या या नवर्‍यांना माझी सहानुभूती आहे.
याउप्पर या लेखावरून कोल्हापूरकरांवर उगीचच चिखलफेक करणे हे तर वैचारीक दिवाळखोरीचे लक्षण आहे.
लेखाचा मुद्दा हा आहे कि सर्वांना किमान स्वयंपाक करता यावा. ते सोडून काही सभासद उगीच त्रागा करताना दिसतात. मजा आहे.. चालू द्या.. सुजयराव आणखी येउ द्या...

मराठमोळा's picture

2 Aug 2010 - 12:33 am | मराठमोळा

अगायाया....
=)) =))

खुर्चीतुन पडलो मी हा प्रतिसाद वाचुन. पॉपकॉर्न संपलेच होते की शो पुन्हा सुरु झालाच. ह्या धाग्याचा वेगळा टॅबच उघडुन ठेवलाय. =)) =))

चावटमेला's picture

2 Aug 2010 - 11:38 am | चावटमेला

वरच्या प्रतिसादातील बायकांचे प्रतिसाद वाचून खूपच करमणूक झाली. म्हणजे लेखातील मुद्दे नक्कीच खरे दिसतात. नाहीतर इतक्या मिरच्या झोंबल्या नसत्या यांच्या नवर्‍यांची कीव येते. हे म्हणजे "सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही" असे अवघड जागेचे दुखणे आहे. बिचार्‍या या नवर्‍यांना माझी सहानुभूती आहे.

सहमत, सहमत, सहमत!!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2010 - 12:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्र, या काही सभासदांचीच संख्या बरीच जास्त दिसते ... WPTA च्या न्यायाने काही खडे मात्र बाजूलाच राहिले!

मधुशाला's picture

2 Aug 2010 - 9:34 pm | मधुशाला

इथेही तेच
उपायः इनो नाय तर पुदीन हरा

आजानुकर्ण's picture

2 Aug 2010 - 8:57 am | आजानुकर्ण

खुसखुशीत शैलीतला लेख आवडला.

(मला उत्तम स्वयंपाक करता येतो.)

योगी९००'s picture

2 Aug 2010 - 3:23 pm | योगी९००

लेखकाच्या विचाराशी सहमत..

आत्तापर्यंत जितक्या IT क्षेत्रातील मुली पाहिल्या त्या लेखकाने वर्णन केल्याप्रमाणेच निघाल्या..काही येत नसते पण बडबड मात्र फार..दुसर्‍यांना सल्ले देण्यास आणि खाणे चांगले झाले तर फुकट credit घेण्यास मात्र पुढे पुढे..

याउप्पर या लेखावरून कोल्हापूरकरांवर उगीचच चिखलफेक करणे हे तर वैचारीक दिवाळखोरीचे लक्षण आहे..

सहमत..

अवलिया's picture

2 Aug 2010 - 3:24 pm | अवलिया

सविता's picture

2 Aug 2010 - 7:06 pm | सविता

लोकप्रियता मिळवण्याचा सवंग प्रकार.......

लेखात लिहीलेय लग्न झालेय.... प्रतिक्रियेत लिहिलंय.... व्हायचंय....

हा प्रश्न उपस्थित करणा-या प्रतिक्रियेवर काही प्रतिसाद नाही....

वादग्रस्त विषय सुरू करून द्यायचे आणि मग बाजूला झाडावर बसून गंमत बसायची...

मला अंमळ गंमत वाटते.... की लोक (विशेषतः स्त्रिया) त्वेषाने प्रतिक्रिया का देत आहेत?

समजा असेलच हा प्राणी त्याच्या लेखावरून वाटतो तसा ढुढ्ढाचार्य... तर असल्या लोकांकडे दुर्लक्ष करा..... हे तळमळणारे आत्मे आहेत..या जन्मी बदलणार नाहीत....... आणि फक्त प्रसिद्धी साठी असले प्रकार करत असेल....तरी पण दुर्लक्ष करा ...... त्यापेक्षा जास्त काही नाही

-सविता.

शिल्पा ब's picture

2 Aug 2010 - 10:29 pm | शिल्पा ब

दुर्लक्षच केले असते पण हे महाशय कुठपर्यंत ताणू शकतात हे पहायचं...
बाकी लेख फक्त प्रसिद्धीसाठीच लिहिला आहे याच्याशी सहमत.

पद्माक्षी's picture

3 Aug 2010 - 12:18 am | पद्माक्षी

मी इथे केवळ वाचनमात्र असते. परंतु हा लेख आणि त्यावरचे काहींचे बिनबुडाचे प्रतिसाद वाचून राहवले नाही.
तुम्हाला नक्की त्रास कशाचा झालाय. लेखात लिहिलेली दुर्दैवाने का होईना पण वस्तुस्थिती आहे म्हणून का या लेखाला प्रसिद्धी मिळती आहे म्हणून.
लेखकाने कुठेही लिहिलेले नाही कि हे त्याचे आत्मचरित्र आहे. तरीही त्याचे लग्न झाले आहे का नाही याच्यात तुम्हाला फार मोठा point दिसतो आहे.

प्रतिसाद वाचून लोकांची करमणूक होत आहेच आणि आपण पण सिद्ध करत आहोत कि बायकांना विनोदबुद्धी खरच कमी असते.

लेखकाने लेख विनोदी आहे असा डिस्कलेमर टाकलेला नव्ह्ता...
आणी ही साईट फक्त विनोदी लेखांना वाहिलेली आहे हे ही वाचकांना माहिती न्व्हतं म्हणून असावं हो बहुतेक.... :D

<<तुम्हाला नक्की त्रास कशाचा झालाय. लेखात लिहिलेली दुर्दैवाने का होईना पण वस्तुस्थिती आहे म्हणून का या लेखाला प्रसिद्धी मिळती आहे म्हणून.

प्रसिद्ध होण्यासाठी ते सत्यच असले पाहिजे हि अट नवीनच ऐकली...आणि मला त्रास होतोय हि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...डॉक्टरकडे जाऊ का तुम्हीच औषधं देता?
आणि लेखकाने स्वताच लग्न झालेय आणि एकदा नाही झालेय असं लिहिलंय? यात आम्हाला काही पॉइंट वाटत नाही...कारण लग्न होऊनही न झालेली व्यक्ती आम्च्यातरी ऐकिवात नाही...आणि हो बायकांना विनोदबुद्धी नसते (नेमके कशावरुन ?) हे दर्शविल्याबद्दल आभार...

नावातकायआहे's picture

2 Aug 2010 - 7:38 pm | नावातकायआहे

आयला गायछाप संपलि... पन हि धुळवड काय संपाल आस दिसत नाय...

सुजय कुलकर्णी's picture

3 Aug 2010 - 12:30 am | सुजय कुलकर्णी

संपादित

Dhananjay Borgaonkar's picture

3 Aug 2010 - 12:19 am | Dhananjay Borgaonkar

तुम्ही पण युयुत्सुंच्या पावलावर पाउल टाकलन.
लेख कसा का असेना १००+ प्रतिक्रिया यणार.
बाय द वे अगदीच पुचाट लेख आणि फालतु विचार.

लेख विनोदी आहे असे समजून वाचले तरी मुळातच निरिक्षणे चुकीची आहेत.
असं सरसकट नसतं हो .
शिवाय विचार ही चुकीचे आहेत.
त्यामुळे लेख वाचून हसू तर आलेच नाही , लेख भावला पण नाही.
लेखनशैली बरी आहे. सुधारणा केल्यास अजून चांगले लिहू शकाल.

सुधारणा लेखनशैलीत का विचारात? दोन्हीतही गरजेची आहे...

चन्द्रशेखर सातव's picture

3 Aug 2010 - 2:44 am | चन्द्रशेखर सातव

स्वयपाक करताना भाज्या धुणे,चिरणे,कणिक मळणे तसेच रोजच्या कपडे धुणे,पिळणे या क्रिया करत असताना मनातील ताण-तणावांचा निचरा होतो असे वाचले आहे.त्यामुळेच मागच्या पिढीतील स्त्रियांमध्ये Heart attack,B.P या सारखे आजार कमी असतात (अपवाद असू शकतात ).आजच्या IT मधील लोकांनी स्वयपाक या क्रियेकडे या दृष्टीने बघणे गरजेचे आहे,झालेच तर बायको पण खुश आणि आपण पण निरोगी राहू शकतो.

पांथस्थ's picture

4 Aug 2010 - 12:24 am | पांथस्थ

स्वयपाक करताना भाज्या धुणे,चिरणे,कणिक मळणे तसेच रोजच्या कपडे धुणे,पिळणे या क्रिया करत असताना मनातील ताण-तणावांचा निचरा होतो असे वाचले आहे

मला हा अनुभव आहे. स्वयंपाक करतांना कशी मस्त तंद्री लागते!

आमोद शिंदे's picture

3 Aug 2010 - 5:09 am | आमोद शिंदे

छान चर्चा!

मृत्युन्जय's picture

3 Aug 2010 - 11:52 am | मृत्युन्जय

लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल अभिनंदन. खुपच छान लिहिला आहे. भरुन आले एकदम. आता मी एखादी सुगरण शोधुन तिच्याशीच लग्न करेन. बाकी रुप, वय, शिक्षण, वागणुक आणि विचारसरणी गौण आहे याचा मला साक्षात्कार झाला आहे. काळ बदलला आहे असे सगळे तोंड फोडुन बोंबलत असतात ते पुर्णपणे चुकिचे आहे आणि रांधा, वाढा, उष्टी काढा यातच बाईचे आयुष्य गेले पाहिजे, यातच त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे हे आता मला पुर्णपणे उमजुन चुकले आहे.

ओफिसमध्ये ८-१० तास काम करुन आल्यावर (बाय द वे बायकांनी ओफिसमध्ये जाउन काम करावे का यावर तुम्ही एक लेख का लिहीत नाही. त्याबद्दलचे तुमचे विचार ऐकुन पण कान त्रुप्त होतील) बायकोने लगेच पळ्या, उलथने आनी झारेच हातात घेतले पाहिजेत आणि नवरा तंगड्या पसरुन फॅशन टीवी, निओ स्पॉर्ट किंवा तत्सम कुठलेतरी चॅनल बघणार हे द्रुश्य खुपच मनोहारी आहे. हे असेच व्हायला हवे यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. मुलींना शालेय शिक्षण देण्याऐवजी जागोजागी स्वयंपाक वर्ग सुरु केले पाहिजेत, DBMS (धुणी, भांडी, मुले, स्वयंपाक) अभ्यासक्रम मुलींसाठी सक्तीचा केला पाहिजे. मुलींना नौकरी करण्याची मनाई केली पाहिजे आणि एव्हढे सगळे करुन सुद्धा जर मुलींनी स्वयंपाक करण्यात "काकु" केली तर त्यांना जाहीर फटके मारले पाहिजेत.

शिल्पा ब's picture

3 Aug 2010 - 12:01 pm | शिल्पा ब

अगदी अगदी... पुरुषमुक्ती मंचावरून आपण याचा प्रस्ताव मांडूया का? एखादा मोर्चाच काढू काय? आणि आपले नेतृत्व परमपूज्य श्री सुजयजी कुलकर्णीसाहेब ...काय म्हणताय ?

मृत्युन्जय's picture

3 Aug 2010 - 12:32 pm | मृत्युन्जय

४९८अ सारखे ४९८आ पण टाकुन देण्याची शिफारस करु शकतो आपण. स्वयंपाक करायला नकार देणारी बायको या कलमाखाली गजाआड टाकता आली पाहिजे.

सुजय कुलकर्णी's picture

3 Aug 2010 - 6:22 pm | सुजय कुलकर्णी

तुमच्यासारख्या अजिबात स्वयंपाक घरात पाऊल न ठेवणाऱ्या मुली आजच्या काळात असतील तर नक्कीच मोर्चा काढावा लागणार....!

मस्त कलंदर's picture

3 Aug 2010 - 12:23 pm | मस्त कलंदर

मृत्यूंजय... लेख नीट वाचला नाहीत असे दिसतेय. निदान शीर्षक तरी वाचायचेत...

बाकी रुप, वय, शिक्षण, वागणुक आणि विचारसरणी गौण आहे

बाकीचे राहूदे, पण इथे शिक्षण महत्वाचे आहे.. ती मुलगी आयटी तली असली पाहिजे. म्हणजे किमान बी.ई. झालेली पाहिजे. त्यानंतर तिने नॉन आयटी क्षेत्रात नाही, तर आयटीतच नोकरी करायला हवी. म्हणजे गलेलठ्ठ पगार आलाच. तो पगार तिने ब्रंडेड कपड्यावर आणि महागाच्या मोबाईलवर वाया घालवायचा नाही. आणि त्यानंतर मग ओफिसमध्ये ८-१० तास काम करुन आल्यावर तिने लगेच पळ्या, उलथने आनी झारेच हातात घेतले पाहिजेत आणि उत्तमच स्वयंपाक केला पाहिजे. तो न येण्याबद्दल तिने कारणे द्यायची नाहीत. आणि अगदी पहिल्या दिवसापासून आणि प्रत्येक वेळी तिचा् स्वयंपाक चांगला झालाच पाहिजे. कारण जर तिने योग्य वेळेत स्वयंपाक शिकला असता, तर तिच्यावर स्वयंपाक बिघडण्याची वेळ आली नसती...
कळले का आता???

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Aug 2010 - 12:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))
मेला बिचारा मृत्युंजय! ;-)

मृत्युन्जय's picture

3 Aug 2010 - 12:41 pm | मृत्युन्जय

नक्की कोण मारणार ते सांगा अदितीतै (तै जरा जास्त होतय नाही?) . म्हणजे तसा बचाव करायचा प्रयत्न करतो.

मृत्युन्जय's picture

3 Aug 2010 - 12:36 pm | मृत्युन्जय

वाचला हो नीट. म्हणुनच म्हणतो आयटीची दारे मुलींसाठी बंदच करुन टाका ना. कटकटच नाही. लेख आणी शिर्षक नीट वाचुनच मत मांडले. लेखकापेक्षा थोडेसेच वेगळे आहे बघा

सुजय कुलकर्णी's picture

3 Aug 2010 - 6:20 pm | सुजय कुलकर्णी

तुम्हाला जे अथक प्रयत्नांनी पुर्णपणे उमजून ते चुकले आहे हे तुम्हीच मान्य केल्याबद्दल धन्यवाद..! मी लेखात आणि कुठल्याही प्रतिक्रियेत असे म्हटलेले नाही कि बायकांनीच फक्त स्वयंपाक केला पाहिजे.....दोघांनाही स्वयंपाक यायला हवा हे मी आता इथे ४-५ व्यांदा लिहित आहे...जरा आदल्या मधल्या प्रतिक्रिया पण वाचत चला...!
"काळ बदलला आहे.मुलांनो स्वयंपाक शिका" हे मी लेखाच्या शेवटी लिहिलेले आहे..तुम्हाला नेमका कशाचा प्रोब्लेम आहे हे मला कळले नाही...! तुम्हाला स्वयंपाक शिकायचा नाहीय...का अजून काही....हे काही स्पष्ट झाले नाही...बायकांनी ऑफिसमध्ये जाऊन काम करावे का नाही हा त्यांचा प्रश्न आहे....पण थोडा का होईना स्वयंपाक हा यायलाच हवा हे माझे मत आहे...!
बाकी तुम्ही शेवटी शेवटी विनोदी विचार मांडून सगळ्यांची खूप करमणूक केलीत...मजा आली... :-) बाकी , आगीत तेल ओतण्याची कामे सुरु ठेवा....! तुम्हाला शुभेच्छा...!

प्रियाली's picture

3 Aug 2010 - 7:18 pm | प्रियाली

दोघांनाही स्वयंपाक यायला हवा हे मी आता इथे ४-५ व्यांदा लिहित आहे...जरा आदल्या मधल्या प्रतिक्रिया पण वाचत चला...!

बूंदसे गयी वो हौदसे नहीं आती म्हणतात. तुम्ही तर उलट केलेत. हौदाने अंगण शिंपलेत आता प्रतिसादातून बुंद्या टाकून काय उपेग?

सोडून द्या! होतं असं कधीतरी. आता रंगपंचमी एंजॉय करा किंवा पुढच्या लेखाची तयारी.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Aug 2010 - 9:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =))
'खतरनाक' प्रियालीदेवींचा विजय असो. प्रतिसादाच्या बुंदी हा शब्दप्रयोग तर फारच जास्त आवडला.

एकूणच मिपावरच्या मुली, बायकांना स्वयंपाक येत नाही या चुकीच्या गृहितकावरच हे माना कापलेले कोंबडे फारच थैमान घालत आहेत.
-- अदित्सु

वाहीदा's picture

4 Aug 2010 - 1:52 pm | वाहीदा

"काळ बदलला आहे.मुलांनो स्वयंपाक शिका" हे मी लेखाच्या शेवटी लिहिलेले आहे..तुम्हाला नेमका कशाचा प्रोब्लेम आहे हे मला कळले नाही...! तुम्हाला स्वयंपाक शिकायचा नाहीय...का अजून काही....हे काही स्पष्ट झाले नाही...बायकांनी ऑफिसमध्ये जाऊन काम करावे का नाही हा त्यांचा प्रश्न आहे....पण थोडा का होईना स्वयंपाक हा यायलाच हवा हे माझे मत आहे...!

आयटी मधील बायको हवी / ती कमवणारी ही हवी पण आता हा नविन प्रतिसाद सारवा सारव करायला.
अरे व्वा ! सुमडी में लोमडी

बेभान's picture

3 Aug 2010 - 4:11 pm | बेभान

मॅच निकालात न लावण्याचा पकका निर्धार केला आहे वाटतं सगळ्यांनी, आत्तापर्यंत या धाग्यांनी प्रियदर्शन, डेविड धवन, राजकुमार संतोषी (अंदाज अपना अपना वाले) यांना सगळ्यांना मागे टाकले आहे.
हसुन हसुन जबडा दुखायला लागलाय गालावर कायमच्या सुरकुत्या पडणार नाहीत म्हणजे झालं.

मला असं वाटतं

हा दोघेही काम करणा-या जोडप्यामधील महत्वाचा मुद्दा आहे- नि:संशय. १९व्या शतकातील बायको IT किंवा तत्सम कामांला जात नव्हती त्यामुळे तिला घरात वेळ जावा म्हणुन पाककृती, शिवणकला इ. शिकणे गरजेचे होतं. हो आता सगळं बदलयं. पण यावर उगाच घराचा कोळसा करत बसण्यात काहीच अर्थ नाही. दोघे ही काम करत असतील तर काम वाटून घेणे गरजेचे आहे. . नवरा घराबाहेरील कामे बघणार (किराणा आणणे, कार/मोटरसायकल सर्व्हीसिंग (दोघांच्याही), बिल पेमेंटस, प्लंबींग, फर्निचर, गॅस, फिटींग, पेपर रद्दी, आणि मोठ्या अवजड कामांसाठी जबाबदार जिथे अनोळखी माणसांबरोबर जास्त संबंध येतो अशी) आणि बायको घरातील कामांसाठी. याचा अर्थ असा नाही की सीमारेषा आखणे एकदाका हे काम झाले (कामे वाटून घेण्याचे) की झालं, आणि हो दोघे कधीही एकमेकांना त्यांच्या- त्यांच्या कामात मदत करू शकतात. उदा. बायको ऑफिसातील कामानिमित्त घरी उशीरा येणार असेल आणि स्वयंपाकाची जबाबदारी तिच्यावर असेल आणि नवरा घरी लवकर आला असेल तर नव-याने तिला सोपे होईल असे काही काम करण्यात(भाजी चिरुन ठेवणे, कणीक तिम्बणे इ.[असं होण्याचे चान्सेस खुप कमी कारण माझ्या मित्रांपैकी दोघेही कामाला जातात तिथे एकतर बाई कामाला आहे किंवा दोनवेळा स्वयंपाक कोण बनवत नाही] तसं नसेल तर महिन्यातून दोन तीनदा बाहेरून जेवण मागविल्याने तुम्ही ’रस्त्यावर येणार नाही”. टेलिफोन ऑफिस बायकोच्या कंपनीच्या रस्त्यावर पडत असेल तर तिने ते काम कधीतरी पार पाडावे. तर माझं असं म्हणणं आहे की उगाच खाजवून आवदान आणू नका.
इथे ब-याच प्रतिसादांवरून असे लक्षात येईल बरेचसे पुरूष समंजस भूमिका घेताना दिसत आहेत की बाबा हो तिला स्वयंपाक करण्यात मदत करणे गरजेचे आहे किंवा स्वयंपाक ही फक्त तिची जबाबदारी नसुन दोघांची आहे. पण ब-यापैकी सगळ्या स्त्रिया जरा कमी प्रमाणात समंजस भुमिका घेताना दिसतात (आर या पार) पुरुष नुसता TV बघत बसत बसतो इ. हां जर तो काहीच घराबाहेरील/घरातील काम करत नसेल तर त्यांचा राग मान्य. पण जर पुरुष बाहेरच्या कामांसाठी जबाबदार आहे आणि तो त्या जबाबदा-यांपासुन का-कू करत नसेल तर स्वयंपाकाची जबाबदारी पार पाडत असताना बायकांनी का-कू करू नये. दोघे प्रेम करतानां एकमेकांवर? मग कशाला पाण्यात बघायचे एकमेकांना?

जेंव्हा जेंव्हा माझी बायको स्वयंपाक करते तेंव्हा तेंव्हा मी भांडी घासतो.
टी-शर्टच्या भाया सारून बसलो आहे.. या.

मी या लेखकाची पंखा झालेय...:) (कितीहि सहमती/विरोध असला तरी)

स्वगतः नक्की नविनच सदस्य आहेत का हे?

(परखड) माया.

---------------------------------------------------------------------------------------
© "बादवे"

अमोल मेंढे's picture

3 Aug 2010 - 6:01 pm | अमोल मेंढे

खरंच मला तरी सगळा स्वयंपाक येतो बुवा... पुरणपोळी सोडुन... आणी हो आमच्याकडे आठवड्यातुन ३ दिवस खिचडी असते.. पण इथे एक जागतीक सत्य अनुभवास आले... ( कुठले ते विचारु नका, आमचा पण सुजय कुलकर्णी होईल)

मृत्युन्जय's picture

3 Aug 2010 - 7:06 pm | मृत्युन्जय

आणी हो आमच्याकडे आठवड्यातुन ३ दिवस खिचडी

खिचडी तुम्ही करता की तुमची बायको करते?

बायको करत असेल तर ती आय टी मध्ये आहे का?

आय टी मध्ये नसेल तर तिने खिचडी करणे योग्य आहे का?

ज्या दिवशी खिचडी नसते त्या दिवशी स्वयंपाक तुम्ही करता की बायको करते?

स्वयंपाक बायको करते तेंव्हा तुम्ही घरी जेवता का की स्वतः वेगळा स्वयंपाक करुन खाता?

बायको आय टी मध्ये नसेल तर आय टी मधली असली असती तर बरे झाले असते, खिचडी खाण्यापेक्षा होटेलातील बिर्याणी खाता आली असती असे मनात येते क?

इरसाल's picture

3 Aug 2010 - 8:47 pm | इरसाल

एकंदरीत सुजयच्या कोल्हापुरी मिरच्या बऱ्याच जणांना झोम्बलेल्या दिसतायेत

पद्माक्षी's picture

4 Aug 2010 - 12:09 pm | पद्माक्षी

+१०००
पण स्वतःला स्वयंपाक येतोय असे म्हणणाऱ्या (का वाटणाऱ्या?) लोकांना मिरच्या का झोंबल्या ते कळत नाही :)

सारंग कुलकर्णी's picture

3 Aug 2010 - 11:05 pm | सारंग कुलकर्णी

प्रतिक्रिया थोडी मोठी असल्या कारणाने एक नवीन धागा तयार केला आहे.

http://misalpav.com/node/13567

निशिगंध's picture

4 Aug 2010 - 3:48 am | निशिगंध

बायकोबी पायजे
सुंदरबी पायजे
भल्ली गोडबी पायजे
आयटीबी पायजे
कमवणारीबी पायजे
अन
सैपाक करणारीबी पायजे

जरा जास्तच ना भौ...

हर्षद आनंदी's picture

5 Aug 2010 - 2:35 am | हर्षद आनंदी

लेखकाशी अंशतः सहमत! पुरुषांनी कितीही झक मारली तरी आईचा, बहिणीचा, पत्नीचा प्रेमामृत वर्षाव झालेले अन्न .. अहाहा!! त्याची चवच वेगळी.. आपल्याकडे शिजवण्यापेक्षा त्याच्या मागच्या भावनांना जास्त महत्व आहे.

केवळ IT मध्ये काम करतात म्हणुन, सकाळ संध्याकाळ पिझ्झा, पावाचे तुकडे, सिरियल, नुडल आणि काय काय पाश्चात्य पदार्थ न रांधता, साजुक तुपातला शिरा केला तर बिघडत नाही.

पण म्हणुन स्त्रियांनीच राबायचे हे मात्र चुकच,, IT मध्ये कामाच्या नावाखाली शिमगा असतो हे मान्य आहे (IT वालाच मी) पण बाकीचे ताप कमी नसतात.. त्यामुळे मानसिक थकवा जस्त येतो. हे पन लक्षात घ्या!

स्वयंपाक = स्वतः शिजविलेले, इथे लिंग भेद कुठे आला?

कधी तुम्ही करा, कधी तिला करुदेत, कधी दोघे मिळुन करा.. पण हे सगळं पण चार भिंतींच्या आत, बाहेर सावळा गोंधळ कशाला?