सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना
भिऊ नको मराठी जना, काय तूझा गुन्हा
राहीला सीमाभागी
वेळ काढ जराशी जरा, येशील महाराष्ट्री पुन्हा
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||धृ||
दिलेत भरपूर लढे, रक्ताचे पडले सडे
विचार नको करू, नको मनामधे झुरू
समजू नको अभागी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||१||
आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू
अन्यायाला वाचा फोडू, सीमाभाग महाराष्ट्रा जोडू
जरी लाठ्या डोक्यास लागी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||२||
जय महाराष्ट्र बोलू बोल, मराठीचे उपकार अनमोल
झालो मोठे त्याच धरतीवर, पांग फेडू झेलू गोळ्या छातीवर
चाल पुढे मागे नको फिरू
पाऊल टाक वेगी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०७/२०१०
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 11:09 pm | पंगा
भिऊ नको मराठी मना
तुज भय्या करतो 'भॉक्!'
अन् इकडूनतिकडून कानडी
तुजला देतो ठ्वॉक...
बाकी चालू द्या.
अधोरेखित वाक्य सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर आणि एकंदरीत आक्षेपार्ह वाटले.
- पंडित गागाभट्ट.
14 Jul 2010 - 3:51 am | पाषाणभेद
भिऊ नको मराठी मना
मराठी माती खाती
मराठीशीच करती प्रतारणा
असलाच केला जर गुन्हा
घे काठी अन
हाण माथी त्यांच्या पुन्हा पुन्हा
संपादक महोदय हे चालेल काय? यात काही वैयक्तिक नाही. (अन तुमच्याशी पंगा नाही घेत हो.) चालत असेल तर ठेवा अन्यथा उडवून लावा आम्हास काय कळतो मराठीद्वेशींचा कावा? आम्ही मुढ सगळ्यांना म्हणतो अरे भावा, यावा यावा, घर तुमचेच असे हे मैदा तुम्हीच लुटावा.
>>>>भिऊ नको मराठी मना
तुज भय्या करतो 'भॉक्!'
अन् इकडूनतिकडून कानडी
तुजला देतो ठ्वॉक...
अधोरेखित वाक्य सरसकट, शेळपट, पडखावू, लाचार, भय्या अन कानड्यांचे हाजी हाजी करणारे, शेपूटघालू वाटले.
>> आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू
>>>अधोरेखित वाक्य सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर, हास्यास्पद आणि एकंदरीत येथे आक्षेपार्ह वाटले.
पंगा, ते अधोरेखीत वाक्य सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर आणि एकंदरीत आक्षेपार्ह वाटण्यासाठीच लिहीले आहे. ते कन्नडीगांना आक्षेपार्ह वाटेल कारण चुक त्यांची आहे, ते वाक्य तुला का आक्षेपार्ह वाटावे?
मनात तर अजूनही चिथावणीखोर लिहायचे म्हणतो आहे.
हे वाक्य कन्नडीगांविरूद्ध आहे म्हणून तुला सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर आणि एकंदरीत आक्षेपार्ह वाटते परंतु काल कन्नड पोलिसांनी जी मराठी डोकी तोडली, पायाच्या नळ्या फोडल्या, म्हातार्यांना मारले, खुनाचे आरोप केले ते सर्व अन या आधी मराठी माणसाची गळचेपी केली ती तुला सरसकट, अस्थानी, अन्याय्य, चिथावणीखोर आणि एकंदरीत आक्षेपार्ह वाटली नाही काय?
बर्याच कर्नाटकद्वेष्ट्या व स्वता:ला मराठी समजणार्या लोकांमुळेच सीमाभागातले लोक आज लाठ्या खात आहेत, केवळ मोर्चा नेला तर खुनाचे आरोप सहन करत आहेत.
अजून एक, लाठीमार करतांना केवळ पायावर लाठी मारायची असते. टिव्हीवर कित्येक लोकांची डोकी फुटलेली ओठ फाटलेले दाखवत होते.
व्यक्तिगत रोखाचा मजकूर संपादित.
पाषाणभेद, तुमचा राग हा व्यक्तिगत पातळीवर उतरु देऊ नये. - संपादक
अवांतर: पंगा म्हणजे तुच ना रे तो की जो आधी हिंदीत प्रतिक्रिया द्यायचा तो?
(संपादक महोदय, संदर्भासाठी वरील अवांतर महत्वाचे आहे हो.)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
14 Jul 2010 - 3:56 am | पंगा
या विधानावर आक्षेप नोंदवू इच्छितो.
लहानपणी (कॅल्शियम डेफिशन्सीमुळे वगैरे) खाल्ली असल्यास कल्पना नाही, पण समजायला लागल्यापासून तरी मातीबिती खाल्ल्याचे आठवत नाही.
बाकी चालू द्या.
- पंडित गागाभट्ट.
14 Jul 2010 - 4:40 am | पाषाणभेद
हा हा हा !
कसलीतरी कमतरता होती तर! काही का असेना माती खाणे हे महत्वाचे! बाकी दातासाठी माती खाणे चुकीचे असते. त्यामुळे दात न सुधारता इतर संसर्ग होवू शकतो. आजकाल कॅल्शीयम असलेल्या टुथपेस्ट बाजारात आहेत. अर्थात त्यामुळे फायदा होतो की नाही ते डॉक्टरच सांगू शकतील. केवळ जाहीरातबाजी असला प्रकार तर नाही ना तो? असो.
14 Jul 2010 - 4:48 am | पंगा
मी टूथपेस्ट खात नाही.
धन्यवाद.
- पंडित गागाभट्ट.