नमस्कार !
मिसळपावच्या सर्व रसिक वाचक, लेखक्, कवी, सुगरणी आणि बल्लवाचार्य मित्र्-मैत्रीणींना सांगताना मला खूप आनंद होतोय, की, माझ्या कविता 'फुलांची आर्जवे' च्या रूपाने रसिकांसमोर आल्यानंतर, त्यातल्या काही कविता आता गीत रूपाने अल्बम मधून तुमच्या समोर येत आहेत. माझ्या कवितांना, उत्तम चाली मध्ये बांधलं आहे संगीतकार अभिजीत राणे यांनी, आणि गायलं आहे वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार, संगिता चितळे, अमृता काळे आणि पौलमी पेठे यांनी.
एक स्वप्नं , जे उरी बाळगलं होतं.. ते आता प्रत्यक्षात येताना बघणे म्हणजे एक सोहळाच आहे. एक अपेक्षापूर्तीचा क्षण... एक खूप मोठा दिवस.. एक खूप मोठा प्रसंग.. आणि एक खूप मोठं पाऊल क्षितिजाच्या दिशेने! याचे साक्षीदार तुम्ही रसिक माय्-बाप.
मोठ्या मनाने, माझ्या बाळबोध कवितांना प्रगल्भ केलंत, अखंड मायेचा हात पाठीवर ठेवलात, नेहमीच उत्तमोत्तम लेखन माझ्याकडून व्हावं म्हणून प्रोत्साहन दिलंत.. तुमची नेहमीच ऋणी राहिन मी.
या माझ्या आनंदाच्या क्षणी, तुमची उपस्थिती असणं खूप गरजेचं आहे.. तुमच्या शिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शक्णार नाही. अपूर्णच राहील ही घडी !
नेहमीच माझ्या सोबत आलात.. माझ्या या क्षणांतही माझी साथ द्याल असा विश्वास आहे.
आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण.. माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी मनापासून विनंती करते..
आपल्या सर्वांची वाट पाहीन कार्यक्रमाच्या ठिकाणी..
- प्राजु
अल्बम मधील काही गाण्यांची झलक आपल्याला येथे ऐकायला मिळेल.
कार्यक्रमाच्याठिकाणी अल्बम १०% सवलतीच्या दरात उपलब्ध राहील.
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 10:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
रविवारी भेट होईलच! पण त्याआधी मनापासून अभिनंदन.
अदिती
13 Jul 2010 - 10:03 pm | मिसळभोक्ता
हे मस्त झालं !
कार्यक्रमाला येणे जमणार नाही. पण शुभेच्छा आहेतच.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
13 Jul 2010 - 10:09 am | छोटा डॉन
प्राजुतैचे मनापासुन अभिनंदन !
कार्यक्रमाचे कळाले होतेच, १००% प्रयत्न करतो येण्याचा.
बाकी आपली दोस्तमंडळी असल्याने वृत्तांताची सोय झालीच आहे :)
------
छोटा डॉन
13 Jul 2010 - 10:21 am | प्राजु
प्रयत्न??
.......... नामंजूर!!
आलंच पाहिजेस.. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
13 Jul 2010 - 10:54 am | छोटा डॉन
नक्की येणार आहे असे सांगतो.
प्लान आहेच यायचा, आता फिक्स करतो. :)
------
छोटा डॉन
13 Jul 2010 - 10:10 am | विनायक पाचलग
मनापासुन अभिनंदन..
येणे अवघड आहे ..
पण सी डी बुक करुन ठेवतो ....
काँग्रॅट्स..... =D> =D> =D> =D> =D>
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
13 Jul 2010 - 10:14 am | मनिष
मनापासून अभिनंदन. रविवारी भेट होईलच! :)
13 Jul 2010 - 10:49 am | योगी९००
प्राजू,
मनापासून अभिनंदन...!!!!
online CD कोठे मिळेल ते शोधतो आता...!!!
खादाडमाऊ
13 Jul 2010 - 10:53 am | प्राजु
१८ तारखेनंतर www.maanbindu.com वर मिळेल.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
13 Jul 2010 - 10:54 am | वेताळ
जमले तर नक्कीच हजर राहु. तु येणार आहेस का भारतात? कोल्हापुर मध्ये कधी असणार?
परत एकदा खुप खुप शुभेच्छा...अन अगदी मनापासुन अभिनंदन..
वेताळ
13 Jul 2010 - 10:58 am | विनायक पाचलग
प्राजु ताई भारतातच आहे ..
कोल्हापुरात कधी येणार ते कळाले तर बरे होईल ..
भेटता येइल..
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
13 Jul 2010 - 11:24 am | प्राजु
मी भारतातच आहे सध्या. ३० जुलै पर्यंत आहे. कार्यक्रमाला मी असणार आहे.. नक्कीच! वरच्या आमंत्रण पत्रिकेत माझा सेल फोन नंबर दिला आहे.
कोल्हापूरला हाच कार्यक्रम पुन्हा २४ जुलै ला होणार आहे.. शाहूस्मारक भवन येथे. वर्तमानपत्रातून त्याची बातमी येईलच.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
13 Jul 2010 - 11:28 am | विनायक पाचलग
२४ ला मी उपस्थित असेनच ....
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
13 Jul 2010 - 11:15 am | नितिन थत्ते
खूप आनंद झाला.
अभिनंदन
नितिन थत्ते
13 Jul 2010 - 11:28 am | ज्ञानेश...
प्राजुताईंचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील काव्य-वाटचालीस शुभेच्छा !
13 Jul 2010 - 11:36 am | सुमीत भातखंडे
मनापासून अभिनंदन!!!
13 Jul 2010 - 11:49 am | विमुक्त
मस्त... अभिनंदन!!!
पुण्यात असलो तर नक्की येतो...
13 Jul 2010 - 11:59 am | शिल्पा ब
=D> =D> =D> अभिनंदन!!!!
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
13 Jul 2010 - 12:12 pm | महेश हतोळकर
अभिनंदन!
=D> =D> =D>
13 Jul 2010 - 12:19 pm | मैत्र
ग्रेट प्राजु ताई....
खरंच मोठं पाउल.. आता यानंतर अशा कार्यक्रमांची सहज सवय व्हावी इतकं यश मिळावं अशा शुभेच्छा!!
13 Jul 2010 - 12:20 pm | अरुण मनोहर
अभिनंदन प्राजु.
आणखी असेच यश मिळु दे.
ह्या बातमीच्या उत्साहाच्या भरात तू मिपा ऐवजी मी मराठी वाचकांना आमंत्रण दिले! ते वाक्य बदलून घे.
13 Jul 2010 - 12:24 pm | नावातकायआहे
प्राजुताईंचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील काव्य-वाटचालीस शुभेच्छा !
13 Jul 2010 - 12:35 pm | निरन्जन वहालेकर
मनापासून अभिनंदन!!!
आता "डी व्ही डी" ची वाट पाहतो आहोत आम्ही.
लवकरच येऊ देत ही शुभेच्छा !!!
13 Jul 2010 - 12:56 pm | जागु
प्राजु तुला खुप खुप शुभेच्छा.
13 Jul 2010 - 1:23 pm | राजेश घासकडवी
अभिनंदन!
13 Jul 2010 - 1:32 pm | स्मिता चावरे
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
13 Jul 2010 - 2:51 pm | घाटावरचे भट
मनःपूर्वक अभिनंदन आणि अल्बमची भरपूर विक्री होवो अशा शुभेच्छा!!
13 Jul 2010 - 3:57 pm | क्रान्ति
प्राजु, हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!! <:P
क्रान्ति
अग्निसखा
13 Jul 2010 - 4:13 pm | डावखुरा
अभिनंदन.
प्राजुतै माझ्याही मनापासुन शुभेच्छा..
[पण कॉलेज मुळे जमेल असे नाही वाटत तरी बघु प्रयत्न करुन..]
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
13 Jul 2010 - 7:13 pm | प्रभो
झकास!!! अभिनंदन.
13 Jul 2010 - 7:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन...............!
-दिलीप बिरुटे
13 Jul 2010 - 9:48 pm | बहुगुणी
आणि कार्यक्रमासाठी आणि पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा!
आता DVDची खरंच तयारी करा...
13 Jul 2010 - 8:08 pm | रेवती
अभिनंदन प्राजु!!
गाण्यांची झलकच इतकी सुरेल आहे कि सीडीवर संपूर्ण गाणी ऐकण्याची उत्सुकता वाढलिये!
माझे आईबाबा येणार आहेत कार्यक्रमाला! आत्ताच फोनवर तसे बोलणे झाले.
रेवती
13 Jul 2010 - 8:30 pm | चित्रा
छान बातमी, गायनही झकास.
प्राजुचे मनापासून अभिनंदन! आणि शुभेच्छा!
13 Jul 2010 - 8:35 pm | चतुरंग
कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला आलो होतो. त्यापुढचा टप्पा इतक्या लगेच गाठला गेला ह्याचा खूप आनंद आहे! :)
प्राजू तुझे आणि जगदीशचे कौतुक वाटते. तुम्हा दोघांचे अभिनंदन! :)
सीडीच्या प्रकाशन समारंभाला आणि रसिकांच्या पसंतीला ही सीडी येवो अशा शुभेच्छा!
चतुरंग
13 Jul 2010 - 8:49 pm | संदीप चित्रे
मला तुझा पुण्यातला फोन नंबर माझ्या जीमेलवर पाठव किंवा इथे व्यनि कर. फोनवर बोलूच
13 Jul 2010 - 9:11 pm | रेवती
अरे तो फोन नं दिलाय ना आमंत्रण पत्रिकेवर, तोच तो!
रेवती
13 Jul 2010 - 8:56 pm | सर्वसाक्षी
आणि हार्दिक शुभेच्छा!
13 Jul 2010 - 9:07 pm | शाहरुख
मनापासून अभिनंदन...!!!!
13 Jul 2010 - 9:10 pm | sur_nair
अभिनंदन. पुण्याला असतो तर नक्की आलो असतो.
13 Jul 2010 - 10:10 pm | सुनील
अभिनंदन आणि शुभेच्छा!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Jul 2010 - 10:10 pm | बिपिन कार्यकर्ते
अभिनंदन... येण्याचा प्रयत्न असेलच. :)
बिपिन कार्यकर्ते
13 Jul 2010 - 10:22 pm | विसोबा खेचर
अभिनंदन आणि शुभेच्छा..
मराठी भावसंगीतात यापुढेही आपल्या सर्वांकडून काही मोलाची कामगिरी व्हावी हीच प्रार्थना..
13 Jul 2010 - 11:41 pm | डॉ.प्रसाद दाढे
हार्दिक अभिनंदन!
14 Jul 2010 - 2:39 am | अर्धवटराव
हार्दिक अभिनंदन प्राजूतै !!
(कविताप्रेमि) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
14 Jul 2010 - 7:49 am | विकास
अरे वा! मनःपूर्वक अभिनंदन!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
14 Jul 2010 - 8:06 am | स्पंदना
वा! हार्दिक अभिनंदन!!
=D> =D> =D>
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
14 Jul 2010 - 8:59 am | पाषाणभेद
अभिनंदन तुमचे!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
14 Jul 2010 - 9:25 am | दिपक
मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा !! :-)
बेलाचा आवाज आवडतो. सीडी घेऊन गाणी ऎकण्याच्या प्रतिक्षेत आहे.
14 Jul 2010 - 9:32 am | हापुस आम्बा
मनःपुर्वक अभिनन्दन प्राजुताई.
14 Jul 2010 - 6:06 pm | शैलेन्द्र
=D> =D> =D> =D> =D> मनापासुन अभिनंदन =D> =D> =D> =D> =D>