मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आग्रहाचे निमंत्रण..

प्राजु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार ! मिसळपावच्या सर्व रसिक वाचक, लेखक्, कवी, सुगरणी आणि बल्लवाचार्य मित्र्-मैत्रीणींना सांगताना मला खूप आनंद होतोय, की, माझ्या कविता 'फुलांची आर्जवे' च्या रूपाने रसिकांसमोर आल्यानंतर, त्यातल्या काही कविता आता गीत रूपाने अल्बम मधून तुमच्या समोर येत आहेत. माझ्या कवितांना, उत्तम चाली मध्ये बांधलं आहे संगीतकार अभिजीत राणे यांनी, आणि गायलं आहे वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार, संगिता चितळे, अमृता काळे आणि पौलमी पेठे यांनी. एक स्वप्नं , जे उरी बाळगलं होतं.. ते आता प्रत्यक्षात येताना बघणे म्हणजे एक सोहळाच आहे. एक अपेक्षापूर्तीचा क्षण... एक खूप मोठा दिवस.. एक खूप मोठा प्रसंग.. आणि एक खूप मोठं पाऊल क्षितिजाच्या दिशेने! याचे साक्षीदार तुम्ही रसिक माय्-बाप. मोठ्या मनाने, माझ्या बाळबोध कवितांना प्रगल्भ केलंत, अखंड मायेचा हात पाठीवर ठेवलात, नेहमीच उत्तमोत्तम लेखन माझ्याकडून व्हावं म्हणून प्रोत्साहन दिलंत.. तुमची नेहमीच ऋणी राहिन मी. या माझ्या आनंदाच्या क्षणी, तुमची उपस्थिती असणं खूप गरजेचं आहे.. तुमच्या शिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शक्णार नाही. अपूर्णच राहील ही घडी ! नेहमीच माझ्या सोबत आलात.. माझ्या या क्षणांतही माझी साथ द्याल असा विश्वास आहे. आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण.. माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी मनापासून विनंती करते.. nimantraN आपल्या सर्वांची वाट पाहीन कार्यक्रमाच्या ठिकाणी.. - प्राजु अल्बम मधील काही गाण्यांची झलक आपल्याला येथे ऐकायला मिळेल. कार्यक्रमाच्याठिकाणी अल्बम १०% सवलतीच्या दरात उपलब्ध राहील.

वाचने 246005 वाचनखूण प्रतिक्रिया 51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता Tue, 07/13/2010 - 22:03
हे मस्त झालं ! कार्यक्रमाला येणे जमणार नाही. पण शुभेच्छा आहेतच. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

छोटा डॉन Tue, 07/13/2010 - 10:09
प्राजुतैचे मनापासुन अभिनंदन ! कार्यक्रमाचे कळाले होतेच, १००% प्रयत्न करतो येण्याचा. बाकी आपली दोस्तमंडळी असल्याने वृत्तांताची सोय झालीच आहे :) ------ छोटा डॉन

वेताळ Tue, 07/13/2010 - 10:54
जमले तर नक्कीच हजर राहु. तु येणार आहेस का भारतात? कोल्हापुर मध्ये कधी असणार? परत एकदा खुप खुप शुभेच्छा...अन अगदी मनापासुन अभिनंदन.. वेताळ

In reply to by वेताळ

प्राजु Tue, 07/13/2010 - 11:24
मी भारतातच आहे सध्या. ३० जुलै पर्यंत आहे. कार्यक्रमाला मी असणार आहे.. नक्कीच! वरच्या आमंत्रण पत्रिकेत माझा सेल फोन नंबर दिला आहे. कोल्हापूरला हाच कार्यक्रम पुन्हा २४ जुलै ला होणार आहे.. शाहूस्मारक भवन येथे. वर्तमानपत्रातून त्याची बातमी येईलच. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

ज्ञानेश... Tue, 07/13/2010 - 11:28
प्राजुताईंचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील काव्य-वाटचालीस शुभेच्छा !

मैत्र Tue, 07/13/2010 - 12:19
ग्रेट प्राजु ताई.... खरंच मोठं पाउल.. आता यानंतर अशा कार्यक्रमांची सहज सवय व्हावी इतकं यश मिळावं अशा शुभेच्छा!!

अरुण मनोहर Tue, 07/13/2010 - 12:20
अभिनंदन प्राजु. आणखी असेच यश मिळु दे. ह्या बातमीच्या उत्साहाच्या भरात तू मिपा ऐवजी मी मराठी वाचकांना आमंत्रण दिले! ते वाक्य बदलून घे.

डावखुरा Tue, 07/13/2010 - 16:13
अभिनंदन. Flowers प्राजुतै माझ्याही मनापासुन शुभेच्छा.. [पण कॉलेज मुळे जमेल असे नाही वाटत तरी बघु प्रयत्न करुन..] ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

रेवती Tue, 07/13/2010 - 20:08
अभिनंदन प्राजु!! गाण्यांची झलकच इतकी सुरेल आहे कि सीडीवर संपूर्ण गाणी ऐकण्याची उत्सुकता वाढलिये! माझे आईबाबा येणार आहेत कार्यक्रमाला! आत्ताच फोनवर तसे बोलणे झाले. रेवती

चित्रा Tue, 07/13/2010 - 20:30
छान बातमी, गायनही झकास. प्राजुचे मनापासून अभिनंदन! आणि शुभेच्छा!

चतुरंग Tue, 07/13/2010 - 20:35
कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला आलो होतो. त्यापुढचा टप्पा इतक्या लगेच गाठला गेला ह्याचा खूप आनंद आहे! :) प्राजू तुझे आणि जगदीशचे कौतुक वाटते. तुम्हा दोघांचे अभिनंदन! :) सीडीच्या प्रकाशन समारंभाला आणि रसिकांच्या पसंतीला ही सीडी येवो अशा शुभेच्छा! चतुरंग

विसोबा खेचर Tue, 07/13/2010 - 22:22
अभिनंदन आणि शुभेच्छा.. मराठी भावसंगीतात यापुढेही आपल्या सर्वांकडून काही मोलाची कामगिरी व्हावी हीच प्रार्थना..

विकास Wed, 07/14/2010 - 07:49
अरे वा! मनःपूर्वक अभिनंदन! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

स्पंदना Wed, 07/14/2010 - 08:06
वा! हार्दिक अभिनंदन!! =D> =D> =D> शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

दिपक Wed, 07/14/2010 - 09:25
मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा !! :-) बेलाचा आवाज आवडतो. सीडी घेऊन गाणी ऎकण्याच्या प्रतिक्षेत आहे.