[इतके काव्य पचवल्यावर मी कसा दूर राहू. मूळ कवीचे आभार ] :)
लॉगीन केल्याबरोबर,
याची तक्रार त्याची तक्रार
मी शांतपणे वाचत असायचो.
तो या आयडीने यायचा अन
ती या आयडीने यायची.
तोल सांभाळत
एकमेकांना डोळा मारत,
काहीच्या काही प्रतिसाद ती टाकायची
संपादक त्यांना समजून घ्यायचे.
काळाबरोबर बदलत
अनेक सदस्य रंगून गेले
मी मात्र दाबत आहे डिलीट बटन
या धाग्यावरुन त्या धाग्यावर. व्यर्थ...!
प्रतिक्रिया
25 Jun 2010 - 6:38 pm | प्रियाली
आणखी एका संपादकाचे स्वागत!!!!
कुठे गेला माझा बेगॉन स्प्रे? ;)
25 Jun 2010 - 6:40 pm | गणपा
या या या सर आपलीच कमी होती.
या रुळाने भल्या भल्या लोकांच्या काव्य प्रतिभेला धुमारे फोडलेत ;)
आम्ही विसा नंतर काउंट ठेवणे सोडले आहे.
25 Jun 2010 - 6:42 pm | अवलिया
तिच्यायला... दिलीपशेट तुमच्याकडुन ही अपेक्षा नाही..
लेखन, प्रतिसाद संपादकांनी करणे म्हणजे कै च्या कैच.....
जा दाबा..... डिलीट बटन दाबा... पळा..
--अवलिया
25 Jun 2010 - 6:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =)) =))
25 Jun 2010 - 6:49 pm | II विकास II
दिलिप सरांची ईडंबण आवडले.
>>लेखन, प्रतिसाद संपादकांनी करणे म्हणजे कै च्या कैच.....
असहमत.
संपादक पण माण्सेच असतात.
25 Jun 2010 - 6:49 pm | प्रभो
=)) =)) ही पण मस्त!!
25 Jun 2010 - 7:22 pm | llपुण्याचे पेशवेll
ही खरी वेदनेतून उमटलेली कविता आहे. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
25 Jun 2010 - 7:23 pm | चतुरंग
(सहवेदक)चतुरंग
26 Jun 2010 - 11:46 am | श्रावण मोडक
+१
25 Jun 2010 - 7:43 pm | सहज
संवेदना!!
आवल्डी!!
25 Jun 2010 - 8:07 pm | बिपिन कार्यकर्ते
प्रा. डॉ... प्रामाणिक ऑफ द मिलेनियम तुम्हीच... =))
बिपिन कार्यकर्ते
26 Jun 2010 - 11:18 am | प्रमोद देव
विवा...तुमचं दु:ख कुणाला कधी कळलंच नाही हो. ;)
26 Jun 2010 - 6:30 pm | विसोबा खेचर
चालू द्या सर.. :)