गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका
सिच्यूएशन: हिरो एक सीआयडी ऑफीसर.
टास्क (मोहीम): एका गुंडाचा पत्ता काढायचा. हिरोने मग भंगारवाल्याचे रूप घेतले आहे. गाणे सुरू....
मोठी आरोळी: एsssss डबा बाटली भंगार वालाssssss वह्या पुस्तक रद्दी पेपर वालाsssssss
(चाल सुरू.....)
अहो ताई, अहो माई....
घरातले न वापरते सामान काढून टाका
काय भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका ||धृ||
घर साफसुफ केले का हो ताई
आज नसेल केले तर जरा करा घाई
दसरा दिवाळी आली जवळ
राहती जागा चकाकती राखा
काय भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका ||१||
उन्हातान्हाची आणली गाडी दुपारी ढकलून
रद्दी पेपर जुने वह्या पुस्तके आणा घेतो मोजून
मोकळे करा सांधीकोपरे
भाव लावतो मी चोख बाजारभावाचा
काय भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका ||२||
असतील जरी तुटके प्लास्टिक, फुटके पाईप नळ
कोणाकडे असतात गंजलेले पत्रे, रबरी वस्तू अन घमेलं
राहतात रिकाम्या "औषधी बाटल्या"
लगोलग आणा, नाही म्हणू नका
काय भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका ||३||
मोठी आरोळी: एsssss डबा बाटली भंगार वालाssssss वह्या पुस्तक रद्दी पेपर वालाsssssss
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२०/०६/२०१०
प्रतिक्रिया
20 Jun 2010 - 11:53 am | शानबा५१२
व ह्यानंतर हे एका फेरीवाल्याचे बोल ही situation जरा समजवुन सांगाल का?
मी कविता मस्त हसत वाचायला सुरवात केली,पण हे कडव वाचुन लगेच उदास झाल्यासारख वाटल्,का माहीती नाही!
मस्त कविता!!!!!!
20 Jun 2010 - 12:00 pm | पाषाणभेद
>>> व ह्यानंतर हे एका फेरीवाल्याचे बोल ही situation जरा समजवुन सांगाल का?
समजले नाही.
तुम्ही पुस्तकांवर प्रेम करताय हे समजते. पण भंगारवाल्यालाही त्याचा व्यवसाय करायचाय.
20 Jun 2010 - 12:13 pm | jaypal
आरे त्या सि.आय.डी. ओफिसरने गुंदांना पकडण्यासाथी भंगारवाल्याची भुमीका घेतली आहे.
पाषाणा काल सोण्याची अंगठी आज चक्क भंगार ?( तस ही कन्नड मधे सोन्याला भंगार म्हणतात अस ऐकुन आहे) एकदम स्पेक्ट्रावाईड बघ =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
20 Jun 2010 - 12:27 pm | पाषाणभेद
हं आता करंट लागला की शानबाने असला प्रश्न का विचारला ते.
वर सिच्युएशन मध्ये बदल करून आता तसा उल्लेख केलेला आहे.
तुमच्याकडे असिस्टंट डायरेक्टर ची पोष्ट रिकामी असेल तर पाठवू का त्याला तुमच्याकडे?
बाकी कविता लिहीतांना असला काही योगायोग होतोय हे काही ध्यानात आले नव्हते.
अवांतर: आमच्या गावातल्या भंगारव्यापार्याला माझे चुलते "काय सोन्याचे व्यापारी" म्हणून बोलायचे. तो डिक्टो जॅकी श्रॉफ सारखा दिसायचा. त्या काळी 'हिरो' पिक्चर गावात लागला होता. टॉकीजवाल्यांनी त्याला सजवून एका जिपमध्ये बसवला अन गावातून पिक्चरची जाहिरात केली होती.
जुने दिवस.... थोडेच परत येणारेत!
20 Jun 2010 - 12:32 pm | शानबा५१२
अस काय!!
मस्तच!!
धन्यवाद jaypal..........