असाही असतो 'अभिमान'?

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
14 Jun 2010 - 9:57 pm

आयुष्यात अनेक वळणांवर काही मजेशीर लोक भेटतात. कित्येकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही गमतीशीर गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात, तर काही वेळा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आपली निखालस करमणूक होत राहते. आणि सर्वात मजेची गोष्ट म्हणजे अश्या व्यक्तींच्या गावीही नसते की त्यांच्या वागण्यातून उत्तम विनोदनिर्मिती होत आहे!

असाच एका कुटुंबातील हा खराखुरा किस्सा. थोडा आंबटगोड आहे आणि थोडा कडूपण!

तर हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहाणारे कुटुंब म्हणायला पाचजणांचे.... पण त्यांच्या घरात, दहा बाय बाराच्या दोन खोल्यांमध्ये साधारण आठ ते दहा माणसे नांदत. शिवाय गावाकडून येणारा पै पाहुणाही असायचा सोबत. घरातली माउली कुरकूर करत का होईना, आल्यागेल्याचे करायची. मुळात त्या गृहस्वामिनीची शरीरयष्टी अतिशय कृश... अंगात रक्त कमी, कायम जाणवणारा अशक्तपणा आणि डोकी वर काढणारे आजार! घरी सासरच्या नातेवाईकांचा भला थोरला उठारेटा. कोणाला नाही म्हणायचे नाही असा रिवाज. नवरा देईल त्या पैशांत घरखर्च चालवायचा. शिवाय सारे काम गप्प बसून करायचे. कारण घरी बायकांनी आवाज चढवून बोलायचीही पद्धत नव्हती. आणि ती कधी नवऱ्याला सांगायला गेली की तिच्या बाईपणाचा, कमी शिक्षणाचा सार्वजनिक उद्धार व्हायचा! घरीच राहायचे आणि त्यातच अभिमान बाळगायचा अशीच विचारसरणी. तिला घरकामात मदत म्हणून तिच्या परकरी पोरीचा व पुतणीचाच काय तो आधार! घरातली मुले, पुरुष कामावरून घरी परत आल्यावर निव्वळ आराम करणार, पत्ते कुटणार किंवा टी. व्ही. बघणार आणि ह्या मायलेकी दिवसभर कळश्या-घागरींतून पाणी भरणे, घरातील धुणी-भांडी करणे, दहा-बारा लोकांचा ताजा स्वयंपाक, झाडू-पोछा यातच मग्न!

एकदा सर्व कुटुंब गावी सुट्टीला गेले आणि येताना घरातल्या धाकट्याच्या हट्टापायी गावाकडून एक भले थोरले अल्सेशियन कुत्र्याचे पिल्लू घेऊन आले पाळायला. आता त्या टिचकीभर जागेत एवढ्या महाकाय कुत्र्याला पाळणे म्हणजे त्या कुत्र्यावर अन्याय होता. पण कोण समजावून सांगणार त्यांना? बिचारे पिल्लू कधी घराबाहेरच्या वीतभर जागेत अंग खुरमडून पडून राहायचे तर कधी घरातल्या चिंचोळ्या कोपऱ्यात बसलेले असायचे. त्याला मोकळेपणाने हालचालही करायची चोरी! नशीब एवढेच की घरातील पुरुष मंडळी त्या कुत्र्याच्या देखभालीचे काम जातीने करायची. त्याच्यापुरती भाकरी बनविण्यापलीकडे गृहस्वामिनीला त्या कुत्र्याचे विशेष काही करावे लागले नाही. पिल्लू दिवसेंदिवस मोठे होत होते, त्याची भूक आणि आकार दोन्ही वाढत होते. त्याला व्यायामाची सक्त गरज होती. मग रोज सकाळ- सायंकाळ घरातील मुले त्या पिल्लाला घेऊन पळायला जात आणि रात्रीसुद्धा त्याला लांबचा फेरफटका घडवून आणत.

असेच काही महिने गेले. मे महिन्याची सुट्टी लागली. सालाबादप्रमाणे सारे कुटुंब सुट्टीसाठी गावाकडे रवाना झाले. पण त्या कुत्र्याला काही एस. टी. मधून घेऊन जाणे शक्य नव्हते. मग कुत्रे आणि घरमालक गावी न जाता तिथेच राहिले. घरमालकांना रोज नोकरीसाठी घराबाहेर जावे लागे. त्या वेळेत कुत्र्याकडे बघणारे कोणीच नसे. बिचाऱ्या कुत्र्याला अश्या एकटेपणाची सवय नव्हती. तेही दिवसभर आपल्या खेळगड्यांच्या आठवणीने रडत असे. तर मग घरमालकांनी त्यावर नामी उपाय शोधला. त्यांनी एका बाईलाच घरी आणून ठेवले. हो, हो, ठेवलेच! कारण ती बाई तिथे दिवसाचे चोवीस तास मुक्कामाला असे. वयही फार नव्हते तिचे. जेमतेम तिशीतली असेल. त्या दोघांचे बंद दाराआड काय चालायचे ते त्यांचे त्यांनाच ठाऊक... पण रोज दोघे जोडीने त्या कुत्र्याला रात्रीचे फिरवायला घेऊन जायचे.... अगदी सार्वजनिक रित्या त्यांचे गुटर्रगू चालायचे. झाले! आजूबाजूच्या संसारी कुटुंबांच्यात एकच खल सुरू झाला. कुजबूज वाढली आणि पोटदुखीही वाढली. लोकांना संस्कृती व संस्कारांचे उमाळे येऊ लागले. कोणाला त्या घरच्या बाईविषयी कणव वाटू लागली. त्यातच कोणीतरी बातमी आणली... ती नवी बाई म्हणे ''त्या'' भागातली आहे... कोणाच्या कोणीतरी तिला त्या रंगीत माडीवर पाहिले आहे.... आतातर संस्कृतीरक्षकांच्या हाती आयते कोलीतच सापडले. शिवाय त्यांच्या मुलाबाळांचा, त्यांच्या कोवळ्या कोवळ्या मनांवर होणाऱ्या संस्कारांचा विचारही त्यांनाच करायचा होता ना! मग काय, मीटिंगा झाल्या, बायकांची वेगळी, पुरुषांची वेगळी! कोणी काय बोलायचे ते ठरले. शिष्टमंडळ तयार झाले. अर्थातच आघाडी पुरुषांनीच घ्यायचे ठरले.... कारण अश्या विषयावर एका पुरुषाशी ''बायामाणसांनी'' कसे बाई बोलायचे?

ठरल्याप्रमाणे त्या श्वानप्रेमी घरमालकाला लोकांनी एकदा एकटे गाठले. सुरुवातीला त्याला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न झाला. पण हा गडी तर फार गुर्मीचा निघाला. ''तुम्हाला काय करायचंय.... मी काय पण वाट्टेल ते करेन माझ्या घरात! '' अश्या भाषेत बोलू लागला. त्याला प्रेमळ धमक्या देऊनही तो बधत नाही म्हटल्यावर मग शिष्टमंडळाने आपले पुढील अस्त्र काढले. त्या गड्याला पोलिसांत त्या बाईविषयी तक्रार केली जाईल अशी धमकी दिली. कारण त्यांच्याकडे ती 'धंदेवाली' असल्याची खात्रीशीर माहिती होती. (आता ही माहिती त्यांनाच कशी, कोठे आणि कोणी दिली हे मात्र विचारू नका, राव! ) घरमालकाची झाली पंचाईत! ह्या प्रकरणाला जास्त हवा लागू देणे त्याला परवडणार नव्हते. घरचा प्रश्न नव्हता, पण त्याचा एक जवळचा नातेवाईक राजकारणातला उदयोन्मुख नेता होऊ बघत होता. (जो आता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेतृत्वापैकी गणला जातो! ) त्यामुळे अशी ''घराण्याची'' बदनामी होणे परवडणारे नव्हते. मग काय, दोनच दिवसात त्या बाईचा गाशा गुंडाळला गेला. समस्त काळजीवाहू हितचिंतकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

कालांतराने त्या गृहस्थाचे कुटुंब गावाहून सुट्टी संपवून परत आले. घरातील कुत्र्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याचा वनवास संपला होता. कारण गेले कित्येक दिवस मालकाने त्याच्याकडे धड लक्षच दिले नव्हते! एव्हाना हितचिंतक नारीमंडळ एकत्र खलबते करून त्या गृहस्वामिनीच्या ''समाचार'' भेटीला कधी जावे, नवऱ्याचे प्रताप तिच्या कानी कितपत घालावेत ह्या विचारात होते. पण कोणाला तरी फारच घाई झाली असावी. कारण आल्यापासून दोनच दिवसांच्या आत कोणीतरी तिला तिखटमीठ लावून सारी खबर पुरविली होती. आता सर्वजण श्वास रोधून स्फोटाची वाट पाहत होते. पण मजाच झाली! स्फोट झालाच नाही. सर्व काही गपगुमान... बायकांना आश्चर्यच वाटले! त्यांची आता पुढे काय करावे याविषयी खलबते चालू होती तेव्हा तिथे ती गृहस्वामिनी प्रकटली... ‌ सुरुवातीला बायका जरा गडबडल्या, पण मग त्यातल्या एकीने धिटाईने तिला काय काय घडले त्याचा पाढाच वाचून दाखवला.... आता अपेक्षा होती ती तिच्या प्रतिक्रियेची. किमानपक्षी थोडीफार शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप, भांडाभांडी तरी! पण त्यातले काहीच न करता ती महान स्त्री उठली आणि जायला निघाली.

निघताना मागे वळून सर्व बायकांना ऐकू जाईल अश्या आवाजात (कधी नव्हे ते! ) ती जोरात म्हणाली, ''आमची मानसं पुरुष हायेत म्हटलं! ''

बाई मोठ्या तोऱ्यात आपल्या घराकडे परतली. उरलेल्या बायका गपगार, एकमेकींच्या तोंडाकडे टकामका बघत राहिल्या.

इतक्या किरकोळ, अशक्त, कायम आवाज खाली गेलेल्या स्त्रीकडून आपल्या नवऱ्याच्या ''कृष्णकृत्या''ची अश्या प्रकारे ठणठणीतपणे बाजू घेतली जाईल हे त्यांच्या गावीच नसावे!

तिचा स्वतःच्या नवऱ्याच्या ''पुरुष''पणातील अभिमान(! ) त्या निमित्ताने सर्वांना आपल्याच आजूबाजूला असलेल्या एका समांतर दुनियेची सफर घडवून गेला.

-- अरुंधती.

वावरसमाजजीवनमानप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

14 Jun 2010 - 10:05 pm | शुचि

=D> मस्त!!!! क्लास!! किती सुंदर रंगवलायस अरु हा किस्सा >:D<
ह ह पु वा.

चोंबडे शेजारी मेले [( .... अस्सच पाहीजे त्यांना.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jun 2010 - 10:12 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!! लै भारी किस्सा... हतबुद्ध मात्र झालोच... तथाकथित सांस्कृतिक रेजिमेंटेशन, शोषितांचे ब्रेनवॉश कसे करते याचे उत्तम उदाहरण.

बिपिन कार्यकर्ते

राजेश घासकडवी's picture

14 Jun 2010 - 11:58 pm | राजेश घासकडवी

तथाकथित सांस्कृतिक रेजिमेंटेशन, शोषितांचे ब्रेनवॉश कसे करते याचे उत्तम उदाहरण.

हे काहीसं बूर्ज्वा, middle class morality तून येतंय असं वाटत नाही का? तसं असल्यास ब्रेनवॉशिंग नक्की कोणाचं झालं आहे? लग्नसंस्था हे एक प्रकारचं रेजिमेंटेशन नाही का?

त्या बाईचा अभिमान सार्थ असेल कदाचित. हीच कथा लैंगिक संबंधाऐवजी 'गप्पा मारणे' हा संदर्भ घालून वाचून बघा. कोणी जर म्हणाली, 'मग, आहेच माझा नवरा गप्पिष्ट!' तर...?

शिल्पा ब's picture

15 Jun 2010 - 12:03 am | शिल्पा ब

गप्पा मारणे आणि बाया फिरवणे फरक असतो का नाही? अर्थात एखाद्या बाईने असं काही केलं तर लग्न मोडलंच समजा...म्हणजे जर कळलं तिच्या नवर्याला तर...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

राजेश घासकडवी's picture

15 Jun 2010 - 12:10 am | राजेश घासकडवी

गप्पा मारणे आणि बाया फिरवणे फरक असतो का नाही?

नक्की काय फरक असतो हे middle class morality किंवा लग्नसंस्थेचं रेजिमेंटेशन न वापरता सांगता येईल का?

तूर्तास स्त्री व पुरुषांना समाज देत असलेली वेगळी वागणुक बाजूला ठेवू...

शिल्पा ब's picture

15 Jun 2010 - 12:18 am | शिल्पा ब

लग्न असो वा नसो आपल्या जोडीदाराशी प्रतारणा करणे हे योग्य नाही...पण जर दोन्हीकडून तशी मान्यता असेल (इथे अमेरिकेत तरी अशी उदा. आहेत) तर काही हरकत नाही....ती प्रतारणा होऊ शकत नाही.गप्पा मारण्याने काय कोणाचे नुकसान होणार आहे? (मी इथे गप्पा म्हंटले आहे gossiping नाही.)

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

राजेश घासकडवी's picture

15 Jun 2010 - 12:47 am | राजेश घासकडवी

(एकच) जोडीदार, प्रतारणा वगैरे संकल्पना मध्यमवर्गीय नैतिकतेतून कृत्रिमपणे लादल्या गेल्या असतील तर?

जर दोन्हीकडून तशी मान्यता असेल

बरोबर. मुळात सगळीकडूनच मान्यता असेल तर हे प्रश्न उद्भवणारच नाहीत. मग त्या बाईचं व तिच्या नवर्‍याचं वागणं कथा लिहिण्याच्या लायकीचं होणार नाही. प्रश्न ब्रेनवॉशिंग कोणाचं झालंय, हा आहे.

शिल्पा ब's picture

15 Jun 2010 - 12:58 am | शिल्पा ब

ब्रेन्वाशिंग म्हणाल तर सगळ्यांचच झालाय...पुरुष काय वाटेल के करायला मोकळा आणि बाईच विश्व घर,चूल, मुल आणि आता नोकरी...यालाच दोन्हीकडून मान्यता...आणि जे मानत नाहीत ते बंडखोर.

आणि जोडीदारांच्या संखेविषयी म्हणाल तर रोगमुक्त राहण्यासाठी...prevention is better than cure असं मला आपलं वाटत..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

सोम्यागोम्या's picture

15 Jun 2010 - 8:53 am | सोम्यागोम्या

तरीच म्हटलं अजून स्त्री पुरुष या विषयाकडे गाडी कशी काय आली नाही!

शिल्पा ब's picture

15 Jun 2010 - 10:14 am | शिल्पा ब

गाडी त्याच रस्त्यावर होती एक बारका टर्न घेतला एवढंच...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शैलेन्द्र's picture

15 Jun 2010 - 10:18 am | शैलेन्द्र

मान्यतेपेक्षाही सदर प्रकरण अगतीकतेच आहे असं वाटत. आपण बोलुन फार काही होणार नाही किंवा आपल्याला बोलायचा आधिकार नाही अशी स्वत:ची समजुत करुन घेवुन मग जाग्रुत झालेल्या स्वसंरक्षण यंत्रणेने दिलेला हा प्रतिसाद आहे असं वाटत....

हीच कथा लैंगिक संबंधाऐवजी 'गप्पा मारणे' हा संदर्भ घालून वाचून बघा. कोणी जर म्हणाली, 'मग, आहेच माझा नवरा गप्पिष्ट!' तर...?

चांगला प्रश्न आहे.

- 'या एकदा निवांत गप्पा मारायला! आणि येताना वहिनींना/भावजींना घेऊनच या बरोबर.'
- 'आज बर्‍याच दिवसांनी गप्पा मारून खूप मजा आली! भावजी/वहिनी असते/असत्या, तर आणखी मजा आली असती. भावजींना/वहिनींना सांगा, आठवण काढली होती म्हणून.'

ही वाक्ये आपण किती सहजगत्या बोलून जातो!

खरेच, हा वाक्यसंच वाढवायला काय हरकत आहे? विचार करतोय.

- पंडित गागाभट्ट.

टारझन's picture

15 Jun 2010 - 12:19 am | टारझन

बाया फिरवणे फरक असतो का नाही?

च्यायला ... :) आत्तापतुर "पोरगी(पोरी) फिरवणे " हा वाक्प्रचार ऐकला होता .. बाया म्हणजे .. भलताच व्यासंग =))

- टारेश पोरीफिरवी

अक्षय पुर्णपात्रे's picture

15 Jun 2010 - 9:11 am | अक्षय पुर्णपात्रे

सांस्कृतिक रेजिमेंटेशन

बिपिनभौ तुमचा प्रतिसाद याच रेजिमेंटेशनचे उत्पादन वाटत आहे. शोषित नेमके कोण आहेत हे वर सांगितलेल्या किश्श्यात स्पष्ट नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jun 2010 - 4:10 pm | बिपिन कार्यकर्ते

अक्षयभौ, मी केवळ आपल्याकडे स्त्रीने काहीही झाले तरी सावरून घ्यायचे, अन्याय सहन करायचा, मार खायचा पण नेहमी नवर्‍याचेच ऐकायचे इतकेच नव्हे तर त्याचे उदात्तीकरण करायचे असे संस्कार परंपरेने चालत आलेले आहेत आणि त्याचा पाश जीवघेणा असतो. माझ्या अंदाजाने, त्या बाईने केवळ याच भावनेपोटी नवर्‍याच्या या असल्या संतापजनक कृत्याचे समर्थन / उदात्तीकरण केले असावे असे वाटले. त्या परंपरेच्या पाशाला / जोखडाला मी रेजिमेंटेशन असे म्हणले. शिवाय इथे शोषित म्हणजे ती स्त्री आहे.

बिपिन कार्यकर्ते

अक्षय पुर्णपात्रे's picture

15 Jun 2010 - 4:23 pm | अक्षय पुर्णपात्रे

इतरवेळी दोन खोल्यांमध्ये काहीच मोकळीक न मिळणारा पुरूष हाही एक शोषितच आहे. तेव्हा शोषणाच्या अंगाने या किश्श्याकडे पाहणे योग्य वाटत नाही.
त्या पुरुषाचे व त्याच्या पत्नीच्या लैंगिक संबंधांविषयी काहीच माहिती नसल्याने त्याविषयी काहीच सांगता येत नाही. या स्त्रीच्या बाहेरील पवित्र्यावरून काहीच सांगता येत नाही. जगासमोर नाचक्की न होऊ देण्याचा प्रयत्न म्हणूनही याकडे पाहता येईल.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jun 2010 - 5:06 pm | बिपिन कार्यकर्ते

नक्कीच, तुम्ही म्हणता तो ही एक दृष्टीकोण होऊ शकतो, आहेच. मला हे वाचल्यावर पटकन जे वाटलं ते लिहिलं. :)

बिपिन कार्यकर्ते

शिल्पा ब's picture

14 Jun 2010 - 10:21 pm | शिल्पा ब

''आमची मानसं पुरुष हायेत म्हटलं! ''
यावर आता काय डोंबल प्रतिक्रिया लिहिणार..."पुरुषांनी" असे काही केले कि मगच बहुतेक त्यांच्या पुरुषपनाचा प्रत्यय येत असावा... बाकी बहुतेक अशीच प्रवृत्ती शायनी अहुजा किंवा त्या रुचिका प्रकरणातल्या बायकांची असावी का? clinton प्रकरणात हिलरीला राजकारणातील महत्वाकांक्षा होती आणि त्यासाठी कुटुंबशील अशी प्रतिमा हवी असल्याने सार्वजनिकरित्या नवर्याची बाजू घेतली असे वाटले..असो, लेख उत्तम.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मस्तच रंगवलाय किस्सा! :)

(अवांतर - इथे 'आंटी'क्लायमॅक्स अशीही एक आचरट कोटी सुचून गेली ;))

चतुरंग

डॉ.श्रीराम दिवटे's picture

15 Jun 2010 - 4:52 am | डॉ.श्रीराम दिवटे

अशा प्रसंगी बायको नवऱ्‍याची बाजू घेणार हे उघडच.

*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...

डॉ.श्रीराम दिवटे's picture

15 Jun 2010 - 4:53 am | डॉ.श्रीराम दिवटे

*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...

चिरोटा's picture

15 Jun 2010 - 10:54 am | चिरोटा

किस्सा आवडला.भारतात नवर्‍यावर कसाही प्रसंग येवो,स्त्रिया सहसा
बोलत नाहीत.हाच प्रसंग नवर्‍यावर आला तर त्याचा प्रतिसादही बघण्यासारखा असेल.

मान्यतेपेक्षाही सदर प्रकरण अगतीकतेच आहे असं वाटत.

सहमत.वरील किस्सा असो वा शायनी अहुजाचे बलात्कार प्रकरण. ही अगतिकतेचीच उदाहरणे आहेत.
P = NP

तिमा's picture

15 Jun 2010 - 1:59 pm | तिमा

त्या घरातल्या बाईला राग आलाच नसेल असे नाही पण परक्यांसमोर तिने, आम्ही १०५, हे धोरण ठेवले ते योग्यच केले.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Jun 2010 - 2:36 pm | llपुण्याचे पेशवेll

+१
त्याहून अधिक काही अर्थ काढावेत असे वाटले नाही.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

अवलिया's picture

15 Jun 2010 - 2:39 pm | अवलिया

+२
अधिक काही अर्थ काढावेत असे वाटले नाही.

--अवलिया

टुकुल's picture

15 Jun 2010 - 3:03 pm | टुकुल

असा साधा सोप्पा अर्थ आहे.

--टुकुल

II विकास II's picture

15 Jun 2010 - 4:19 pm | II विकास II

नवरा बायकोची भांडणे कधी सोडवायला जाउ नयेत.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

बद्दु's picture

15 Jun 2010 - 5:02 pm | बद्दु

म्या भी हेच्च म्हन्तो...

प्रियाली's picture

15 Jun 2010 - 5:15 pm | प्रियाली

मस्त किस्सा आणि प्रतिसाद. शोषितांपासून स्त्रीमुक्तीकडे गेलेले प्रतिसाद बघून गंमत वाटली...

अशाच प्रकारचा एका सुशिक्षित-उच्चविद्याविभूषित घरात घडलेला किस्सा आठवला. फक्त कुत्र्याऐवजी तेथे पोटची पोरे होती आणि आपल्या करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून बाईला घरी आणणारी खुद्द बायकोच होती.

असो. कुत्रा सांभाळण्यासाठी आख्खी बाई घरी आणणार्‍या पुरुषाचे कौतुकही वाटले. ;-) तसेच हा किस्सा आमच्या घरात वाचला जाणार नाही म्हणून मनोमन बरेही वाटले. नाही! उगाच नसत्या आयड्या डोक्यात नको यायला. :D

----------------------------------
नाही! उगाच नसत्या आयड्या डोक्यात नको यायला.

=)) =)) =)) =)) =))
हाण्ण!!!!!!