मी कवयित्री कसा झालो...? अर्थात जालिंदरजींची कृपा ... भाग १

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
21 May 2010 - 6:01 pm

गेल्या फ़ेब्रुवारीतली गोष्ट... मला विविध आजार एकदम होताहेत असं वाटायला लागलं... म्हणजे एकाच वेळी आळशी आणि उत्साही वाटणं, झोप न लागणं , वाट्टेल तेवढं झोपणं, अति भूक लागणं आणि दुसर्‍या दिवशी अजिबात भूक नसणं असं काहीही सुरू होतं.. डाक्टरांनी काही प्रथमिक तपासण्या केल्या आम्ही नार्मल आहोत असं दर्शवणार्‍या.. मग पुढला महिनाभर आम्ही (काही इस्पितळांचा खर्च भागवण्यासाठी आणि अनेकांना रेफ़रल फ़ी मिळवून देणार्‍या) भारी भारी तपासण्या असतात त्याही करून घेतल्या पण त्याही नार्मल होत्या... मग आमची रवानगी एका मानसतज्ञाकडे झाली. त्यांनी आम्हाला अनेक सेशन्समध्ये बोलावून घेऊन आमच्याकडून खूप बडबड करून घेतली... साला, ऐकतोय का झोपलाय काही कळायचं नाही...सेशन संपलं की फ़ी घ्यायला बरोब्बर उठायचा...... माझ्या बालपणातली अनेक सीक्रेट्स त्याला सांगून झाली ( मी ६ वर्षांचा होईपर्यंत झोपेत लघवी करत असे, चौथीपर्यंत अंगठा चोखत असे, मी तिसरीत दोन मुलींना लग्नाचं वचन दिलं होतं म्हणून त्यांचे आई बाप एकमेकांत भांडले होते,पहिलीत असताना मी एकदा घाईघाईत स्त्रियांच्या स्वच्छतागृहात शिरलो होतो असलं सारं सारं सांगून झालं...) चौथ्या सेशनच्या शेवटी "मी माझं कसं होणार" असं त्या तज्ञाला विचारलं...त्यानं "व्हेरी कॉम्लिकेटेड केस "म्हणून खांदे उदवले. मी घाबरलो.. मग तो " ट्यूनिन्ग विथ द कास्मिक एनर्जी , ऑरा, पॅरानॉर्मल बिहेवियरल स्टडीज इन ऍपरंटली ऑटोनॉमस न्यूरोव्हॅस्क्यूलर बंडल अशी खूप बंडलबाजी केली .. मी घाबरून पळून आलो...

त्या रात्री तळमळत झोपायचे सोंग घेतले असताना आम्हाला जांभळ्या फ़िरत्या कलरचा शर्ट घातलेली हातात पिस्तुल घेऊन मल्लखांबावर चढलेली व्यक्ती दिसली.... मी "जालिंदरबाबा" मला वाचवा अशी आरोळी ठोकली... त्यांनी विचारलं "काय होतंय बाळा?" या शब्दांनी मला गहिवरून आलं. मी सारा प्रकार कथन केला...रात्री झोप लागत नाही, दिवसा कामाच्या वेळी झोप येते,डोके गरगरते, भास होतात, विचित्र व्यक्ती दिसतात,कालिदास, भवभूती, शूद्रक , शेक्सपियर दिसायला लागतात.. मग चक्कर येते आणि मग उत्साही साहसोत्सुक वाटतं..
"कधीपासून होतंय हे सारं?" जालिंदरजी.
झाले असतील एक दोन महिने...
"दोन महिन्यांत काही आगळं वेगळं केलं का?"
काही नाही.. सारं रूटीन तर चालू असतंय.."
"नीट आठवून पाहा.."
"रात्री त्रिफ़ळाचूर्ण घ्यायला लागलोय"
तसलं नका सांगू.. काही सांस्कृतिक वेगळेपण?"
म्हणजे?
समाजवादी मासिकातले लेख तर वाचायला लागला नाहीस ना?
नाही बाबा..
मग काय नवीन वाचतोस?
आठवलं.. सध्या अंतरजालावरच्या मराठी कविता वाचतो बाबा... आणि त्यावरचे प्रतिसाद.

हे म्हणताच जालिंदरबाबा युरेका युरेका असं म्हणत खांबावरून खाली उतरले... आणि मला एक सल्ला दिला.... अत्यंत मोलाचा सल्ला...
ते म्हणाले," तुझ्या सार्‍या मानसिक त्रासाचं कारण आहे कविता... ही कविता तुझ्या मानगुटीवर बसलेली आहे... "
मी म्हणालो," सोप्पंय .. मी आता कविता वाचायचं बंद करतो म्हणजे मी बरा होईन..."
" ते इतकं सोपं नाही पोरा.. एकदा कवितेनं झपाटलं की संपलं"
मग याला उपाय?
"काट्यानं काटा..."
म्हणजे?
या कवितेच्या भुताला कविता करूनच मारायचं...
खिखिखि
हसू नकोस...
कोणी करायची कविता?
तूच..
खिखिखि
मी सीरियसली बोलतोय...
पण मी आत्तापर्यंत जे न देखे रवीच्या कधी वाटेलाही गेलेलो नाहीये... दोन महिने प्रायोगिक कविता वाचल्या त्याची इतकी शिक्षा?
ही शिक्षा नाही, हे औषध आहे... हे औषध बनवायचे काही प्याटर्न्स मी शिकवेन
.पण एक अट आहे...
कोणती?
माझी एक परम हुशार शिष्या शरदिनी हिचं नाव घेऊन तुला कविता करावी लागेल...
कोण शरदिनी?
तुला काय करायचंय?
चालेल बाबा...पण कशी लिहू?
कशीही लिही...सुचेल ते आणि वाट्टेल ते लिही.. चालतं..तू कविता लिहायला तर लाग, तुझे सारे आजार बरे होतील..आज एक सोपा प्याटर्न देतो.

अमुकचे अमुक होताना
का आलीस तू?
पण चालेल,
तुझे अमुक आणि
तुझे तमूक

मी अत्यानंदाने जालिंदरबाबांच्या चरणावर डोके ठेवले... आणि वर पाहतो ते अदृश्य झालेले....
या सुंदर स्वप्नाने माझी झोपमोड झाली....
एकाच वेळी मला हलके हलके, दगडाइतके जड ,खोलगर्तेत फ़ेकल्यासारखे आणि वार्‍यावर तरंगल्यासारखे वाटायला लागले... हात थरथरायला लागले...
कालिदास माझ्या अंगात संचार करू लागला, जिभेवर अवघड अवघड शब्द फ़ेर धरून नाचायला लागले... मी झरझर कागदावर लिहू लागलो...
आणि माझ्या नकळत खालील कविता तयार झाली....

उमलत जाणारे प्राक्तनाचे ओझे
तणावाच्या पसार्‍यात गरगरताना
कोणी धाडलंय तुला
कल्पनेपलिकडील जगातून
माझ्या विसविशीत देहसावलीवर
हळूवार फुंकर घालायला
पण चालेल,
काळजात रुतलेला तुझा तो स्पर्श
आणि ती क्षणभंगुर भीक पेलताना
वृथा वैफल्याचा चोरटा सूर...

मला समाधान वाटले...

जालावर २००९ सालच्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही कविता प्रदर्शित झाली...
कविता लिहून झाल्यानंतर माझ्या सर्व शारीरिक मानसिक तक्रारी दूर होत असत...पुढले १५ ते २० दिवस मला कधीही त्रास होत नसे...
त्यानंतर त्रास सुरू झाला की लगेच पुढची कविता करून जालावर चढवायची... त्रास बंद... अशा प्रकारे जालिंदरजी आणि शरदिनी यांच्या पुण्याईने कवितेने माझा आजार बरा केला...
असाच तुमचाही कवितेचा आजार बरा होवो , अशी इच्छा व्यक्त करून मी हे माझे स्फ़ुट संपवतो...
शरदिनीच्या काही पुढल्या कवितांबद्दलचे विवेचन पुन्हा केव्हातरी.....

(क्रमश: )

काल स्वप्नात पुन्हा गुरुजी आले आणि म्हणाले..."आता तू बरा झालास ...कायमचा... आता कितीही कशाही कोणाच्याही कविता वाचल्यास तरी तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही..".त्यामुळे आज शरदिनी प्रकटदिन सोहळा करायला हरकत नाही, असे गुरुजींचे मत पडले......

_____________
आपली शरदिनी
ऊर्फ
जालिंदर शिष्य भडकमकर मास्तर

धोरणसंस्कृतीविचारसद्भावनामाध्यमवेध

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

21 May 2010 - 6:06 pm | परिकथेतील राजकुमार

त्या रात्री तळमळत झोपायचे सोंग घेतले असताना आम्हाला जांभळ्या फ़िरत्या कलरचा शर्ट घातलेली हातात पिस्तुल घेऊन मल्लखांबावर चढलेली व्यक्ती दिसली....

=)) =))

च्यायला आणी त्यादिवशी मी तुम्हालाच रिक्षात विचारत होतो तुम्हाला शरदिनी कोण आहे कल्पना आहे का ?

धन्य आहात __/\__

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

आंबोळी's picture

21 May 2010 - 6:07 pm | आंबोळी

=)) =)) =)) =))

बेष्ट...
बाकी पडदा जालिंदर बाबा नी हळूच उचलला की केसुगुर्जीनी टरारा फाडला हा एक वादाचा मुद्दा आहे.
पण असो....

आंबोळी

ज्ञानेश...'s picture

21 May 2010 - 6:07 pm | ज्ञानेश...

ते तुम्ही होय ! =))
धन्य धन्य सदगुरू.. मानले तुम्हाला !! =D>

निखिल देशपांडे's picture

21 May 2010 - 6:15 pm | निखिल देशपांडे

च्यायला धन्य आहात...
काहीही करु शकता...
सगळ्या कवितांचे रसग्रहण टाकाच आता...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

ब्रिटिश टिंग्या's picture

21 May 2010 - 6:10 pm | ब्रिटिश टिंग्या

हा हा हा!

मास्तुरे लै भारी! :)

टारझन's picture

21 May 2010 - 6:14 pm | टारझन

च्यायचा घो @!!!! हा मास्तर भण्णाट पोचलेला आहे हा डाऊट खरा ठरला तर ;)

बाकी तात्याला एकदा फोन केला तेंव्हा ते म्हणालेले .. ते शरदिनी बरोबर मस्त एका सांजसंध्येला चहाचे घोट घेत गप्पा हाणत आहेत ... =)) ते तुम्ही होतात होय ? =))

__/\__

- गडबडकर मास्तर

मदनबाण's picture

21 May 2010 - 6:18 pm | मदनबाण

नमो नमः केशवसुमाराय !!!

=)) =)) =))

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

प्रमोद देव's picture

21 May 2010 - 6:18 pm | प्रमोद देव

पूर्वी काही मासिकांमध्ये ’ताईचा सल्ला’ नावाने एक सदर चालायचे..ते कुणीतरी ’दादा’च चालवायचा....तसंच हेही. :D
छान! मास्तर....छे, छे ! माफ करा..शरदिनीतै....
पण कल्पना लै भारी आहे....
आता त्या ’सुरेखा पुणेकर’लाही प्रकट व्हायला हरकत नसावी. ;)

मिसळभोक्ता's picture

22 May 2010 - 1:12 am | मिसळभोक्ता

पूर्वी काही मासिकांमध्ये ’ताईचा सल्ला’ नावाने एक सदर चालायचे..ते कुणीतरी ’दादा’च चालवायचा.

ते माझे काका. त्यांचे वय / शिक्षण / कर्तबगारी आपल्यापेक्षा जास्त आहे, तेव्हा त्यांना आदरार्थी संबोधावे, ही नम्र विनंती.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मस्त कलंदर's picture

21 May 2010 - 6:24 pm | मस्त कलंदर

मास्तर.. आता तुमच्या सगळ्या कविता एकदा समजाऊन सांगा... आणि त्या आधी तुमचा शब्दकोश मंडळाला बहाल करा.. म्हणजे आम्ही पण असे उतारे पाडू!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

जे.पी.मॉर्गन's picture

21 May 2010 - 6:34 pm | जे.पी.मॉर्गन

......... अन गौप्यस्फोट किया भी तो किस अंदाजसे. हमारी तो खिदळ खिदळके पुरेवाट हो गई !

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

जे पी

स्वाती दिनेश's picture

21 May 2010 - 6:35 pm | स्वाती दिनेश

----/\----
नमस्कार हो तुम्हाला,
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2010 - 6:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर पाय करा इकडे....! :)

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

21 May 2010 - 6:38 pm | टारझन

मास्तर ,
तुम्ही जालिंदरबाबा अन शरदिनी हे दोन शब्द वापरले =)) (कसे वापरले ? सांगा सांगा , कस्स्स्से वापरले ? )

बुरा न माणिये , खफा ना होईये , खाना ना छोडीये , रुसवा ना होईये
आप पढे लिखे , समझदार, कर्तबगार,रंगकर्मी, वगैरे वगैरे नजर आते हो (लेकिन आप हो नही) , और चक्कु छुरीया , देसी कट्टा भी रखते हो |
आपसे ऐसे लुत्फ उठाणेकी उम्मीद नहीं थी :(

~ जालिंदा

आंबोळी's picture

21 May 2010 - 6:44 pm | आंबोळी

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

आंबोळी

दत्ता काळे's picture

21 May 2010 - 6:39 pm | दत्ता काळे

कळ्यांचे निश्वास - विभावरी शिरुरकर उर्फ मालती बेडेकर सारखं झालं.

बाकी . . हे भारी.
समाजवादी मासिकातले लेख तर वाचायला लागला नाहीस ना? - =))

टुकुल's picture

21 May 2010 - 6:44 pm | टुकुल

च्यामारी फॅटक..
डुप्लिकेट आयडीची हाईट झाली, पार स्त्रीलिंगी नाव घेवुन तश्या कविता केल्या. कोण काय करेल याचा काही नेम नाही.
आता त्या कविता असच काहीबाही खरडल्या होत्या की त्यांना काही अर्थ आहेत ते तरी सांगा.
जाता जाता प्रणाम घ्या __/\__

--टुकुल

प्रभो's picture

21 May 2010 - 6:52 pm | प्रभो

लै भारी मास्तर!!

भोचक's picture

21 May 2010 - 6:54 pm | भोचक

आयचा घो. मास्तर तुम्ही? कठीण आहात. एकीकडे हे असं सर्वांगसुंदर ललित नि तिकडे अगम्य कवितेचं लळीत. दोन्हीत लीलया संचार करणार्‍या या जालिदंरशिष्याच्या प्रतिभेस लवून सलाम.

(भोचक)
जाणे अज मी अजर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 May 2010 - 7:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

चिंचवडगावच्या गोलंदाजाला पुन्हा एकदा सलाम! क्रमशःची अर्थातच वाट पहात आहे.

(मानसशास्त्राची विद्यार्थिनी) अदिती

अरुंधती's picture

21 May 2010 - 7:33 pm | अरुंधती

=)) =)) =))

ललित अन् कविता कै च्या कैच! मास्तर __/\__

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

21 May 2010 - 7:44 pm | श्रावण मोडक

_/\_

धनंजय's picture

22 May 2010 - 10:14 am | धनंजय

_/\_

मात्र ही "प्राक्तन" कविता शरदिनी यांच्या नेहमीच्या शैलीची नाही.

(क्षुद्रभद्रका मत्तपित्तका
कृतकैवल्या स्थितसाफल्या
खटपट फटफट
गतवैफल्या)

म्हणून निषेध.

फटू's picture

21 May 2010 - 7:47 pm | फटू

स्वप्नातही कुणालाही वाटलं नसतं की शरदिनी तै म्हणजे मास्तर आहेत...

बाकि समाजवादी मासिकातले लेख तर वाचायला लागला नाहीस ना? हे मात्र खासच... अगदी बेक्कार हाणला बिचार्‍याला...

- फटू

ब्रिटिश's picture

21 May 2010 - 8:06 pm | ब्रिटिश

तेज्यायला मास्तर तुजी सुपारी झेत बग आता. तु भेट्च मना नाय तुला पोकल बांबुचे फटके दिल्ल त येक बावाचा नाय. डोक्याचा पार भुगा झाल्ता बोल.

पन लै भारी हां . यकदम शॉलेट !
=)) =)) =)) =))

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

धमाल मुलगा's picture

21 May 2010 - 8:17 pm | धमाल मुलगा

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

मास्तरांचे प्रामाणिक कथन त्यांच्या सिध्दहस्त शैलीला साजेसे, तर दादुसचा प्रामाणीक प्रतिसाद प्रचंड आवडला...

ए दादूस...तुजं काम मीच करु का रं? मास्तर तुज्याआदी मलाच भेटेल ना रं.. २० कि.मी.वर र्‍हातं बोल. ;)

नरेश_'s picture

21 May 2010 - 8:07 pm | नरेश_

तुम्हाला कधीकाळी ताई म्हटल्याबद्दल सॉरी ;)
अगदी अगम्य अशक्य, अतर्क्य आहात हो मास्तर!
शरदिनी शैलीत चार ओळी खरडण्याचा मोह होतोय, परंतू नंतर कधीतरी!

पैशांनी दोन गोष्टी विकत घेता येत नाहीत..
१) समाधान
२) पैसा
;)

चित्रा's picture

21 May 2010 - 8:18 pm | चित्रा

धन्यवाद. डोक्याला भुंगा लागला होता.

jaypal's picture

21 May 2010 - 8:31 pm | jaypal

जय जालिंदर बाबा !!!!!

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टिउ's picture

21 May 2010 - 9:09 pm | टिउ

हे आठवलं...

धन्य आहात मास्तर! __/\__

(मास्तरांचा आणि शरदिनीतैंचा फ्यॅन) टिउ

llपुण्याचे पेशवेll's picture

21 May 2010 - 9:31 pm | llपुण्याचे पेशवेll

गेल्यावर्षी महीनाभर असा त्रास झाल्यावर आम्ही बुधवार कविता हे सदर चालू केले होते. ते पटकन स्मरून गेले.
मास्तर, _/\_
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

स्पंदना's picture

21 May 2010 - 11:55 pm | स्पंदना

/:) [( 8| @) :^o :T

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

राघव's picture

22 May 2010 - 1:32 am | राघव

मास्तर, थ्ये डोस्क्याचं आन पोटाचं पार धिरडं करनारं तुमी व्हतंसा??? :O वो, ह्ये काय व्हय वं? ~X(
परतेक्ष मिसळपाव खाऊनशान कदी पोटात गोळा नाय आल्ता, थो ये कवितंपाय येऊ लागला थेचं काय? :SS
बद्दहकोस्ट का काय म्हनतात थ्ये व्हाची येळ आल्याली.. आन मंग पता लागतुया की जेवाले वाडनारानंच ईसबगोल घातलंया... :T

(शरदिनीतैच्या कवितांमुळे पोट बेंबीच्या देठापासून ढवळून निघणारा :) ) राघव

पक्या's picture

22 May 2010 - 1:57 am | पक्या

बाब्बो , धन्य आहात.
शरदिनीच्या कवितेवरचा हा प्रतिसाद एकदम खल्लास होता. आता तर आठवून अजूनच हसू येतंय

कविता
प्रेषक विसोबा खेचर ( बुध, 08/05/2009 - 15:10) .
कविता जराही म्हणजे जराही समजली नाही हो!

प्लीज, आमच्याकरता केव्हातरी साधी सोप्पी कविताही लिहा ना!

आपला,
(रडकुंडीला आलेला) तात्या.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

पाषाणभेद's picture

22 May 2010 - 8:37 am | पाषाणभेद

मास्तूरे! लय लवकर उलगडा केला राव. पन बेस झालं. नाय तर त्या शरदिनीच्या कविता वाचून एखांदा परत ठाण्याला भर्ती व्हायचा बाकी राहीला व्हता. सवताच्या बी डोक्याचा बी लय भुगा पडाया लागला व्हता. त्यामुळं या गोलांदाज नंतर एखांदी कविता आली तर तिच्या वाटंला न जान्याची आपली तयारी व्हती. आन मी पुन्यांदा म्हंतो की त्या समद्या कवितांचा उलगडा क्येला तर लय बरं व्हयील.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

प्रकाश घाटपांडे's picture

22 May 2010 - 8:55 am | प्रकाश घाटपांडे

ब्रिटिश नंदी चा असा प्रकट सोहळा सकाळने केला होता असे आठवते. बाकी मास्तरांचे करीअर गायडन्स वर्ग जोरात का चालतात याचे रहस्य समजले तरी आत्मसात करणे अवघड.
लोकहो आजुबाजुच्या करीअर गायडन्स वर्गाशी संबंधीत असाल तर जरा दबुन मास्तर केव्हा प्रकट होतील सांगता येणार नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

ऋषिकेश's picture

22 May 2010 - 9:28 am | ऋषिकेश

हा हा हा हा!
साष्टांग _/\_ मास्तर / तै !

( =)) ) ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 May 2010 - 9:44 am | ज्ञानोबाचे पैजार

कविता वाचुन, आणि त्यांचा अर्थ शोधुन डोक्याची पार वाट लागली होती, मागचे चार दीवस ते डुडळगाव डोक्यातन जात नव्हत. डोक्याचा चि़ख्खल झाला होता.
कधीतरी शंका पण आली होती की हे असलेच काहीतरी असेल पण.....

जाउदे......... वाईट गुगली होता.

हा मास्तर माझ्या समोर आला की मी त्याला पहीला बेदम चोपणार आहे. किती तरी दीवस हराम केले XXXX.

पैजारबुवा
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

आंबोळी's picture

22 May 2010 - 9:57 am | आंबोळी

आकाशातल्या देवाजवळ आणि जालिंदर बाबांजवळ एक प्रार्थना...
"मास्तरना हा रोग कायमचा जडावा.... जेणे करून त्यांच्यातली शरदिनी कधीही उतरू नये व अम्हाला अधुन मधून त्यांच्या कविता वाचायचे भाग्य मिळो दे"

( ™ )आंबोळी

llपुण्याचे पेशवेll's picture

22 May 2010 - 10:09 am | llपुण्याचे पेशवेll

आमचे एक जुने आंतरजालीय मित्र आणि त्या शरदिनीताईंचं काहीतरी झंग्याट होत बॉ. ते कस्काय बॉ? ते पण स्पष्ट करा. :)
बाकी डिनर बिनर कसे काय झाले? ;)

(सुस्पष्ट)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

ऋषिकेश's picture

22 May 2010 - 10:21 am | ऋषिकेश

एका कट्ट्याला त्यांनी त्याची कबुलीही दिली होती हे आम्हालाही आठवतंय ;)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

प्राजु's picture

22 May 2010 - 10:08 am | प्राजु

अशक्य आहात मास्तर!!!
बापरे!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

झकासराव's picture

22 May 2010 - 11:38 am | झकासराव

=)) =)) =)) =)) =))

मास्तर -^-

कधीही कविता वाचण्याच्या भानग्डीत न पडणारा मी देखील आज कोणते शब्द विमानात बसुन डोक्यावरुन जाणार ते बघण्यासाठी शरदीनीच्या कविता वाचायचो.
आता जरा सगळ रसग्रहण आणि प्रत्येक कवितेची थिन्क प्रोसेस येवु देत. :)

समंजस's picture

22 May 2010 - 11:44 am | समंजस

जबरा मास्तर!!! =D>

(बाकी शरदिनींच्या कविता वाचून बरेचदा असं वाटायचं की, ह्या कविता जर लादेन च्या हातात पडल्या तर त्याला बर्‍याच उपयोग होईल गुप्त बातम्या ह्या कवितां द्वारे कुठेही पाठवण्याची. आणि ते अमेरीकन गुप्तहेर खाते सुद्धा पुर्णपणे अपयशी ठरेल अर्थ समजवून घ्यायला :) एवढंच काय त्या खात्यात कोणीही ह्या कवितांना हात लावणार नाही मानसिक संतुलन बिघडण्याच्या भितीने :D
आणि लादेन आपल्या कारवाया बिनदीक्कत सुरू ठेवेल)

दिपक's picture

22 May 2010 - 11:48 am | दिपक

=)) =)) =)) =)) =))

धन्य ते मास्तर आणि त्या कविता... फुर्रफुर्र डुर्रडुर्र..

माझ्या बालपणातली अनेक सीक्रेट्स त्याला सांगून झाली ( मी ६ वर्षांचा होईपर्यंत झोपेत लघवी करत असे, चौथीपर्यंत अंगठा चोखत असे, मी तिसरीत दोन मुलींना लग्नाचं वचन दिलं होतं म्हणून त्यांचे आई बाप एकमेकांत भांडले होते,पहिलीत असताना मी एकदा घाईघाईत स्त्रियांच्या स्वच्छतागृहात शिरलो होतो असलं सारं सारं सांगून झालं...)

=)) =))

वाहीदा's picture

22 May 2010 - 2:34 pm | वाहीदा

महान आहात !!
___/\__

=)) =)) =))
~ वाहीदा

तिमा's picture

22 May 2010 - 5:23 pm | तिमा

साष्टांग दंडवताचा स्वीकार व्हावा गुरुजी!!!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

सहज's picture

23 May 2010 - 6:12 am | सहज

अगदी आत्मचरित्रात काही सगळेच सत्य बाहेर येत नाही तसेच ह्या लेखाचे.

नेमके कोण(त्या) कवी व कोणत्या रचना पार डोक्यात गेल्या होत्या व तुम्ही त्यांचा सत्कार आपलं उद्धार कोणत्या शब्दात केला होतात त्याचा उल्लेख आला नाहीच की. ;-)

बाकी मानसतज्ञाकडची सेशन्स अफलातून. बर्‍याच जणांचा बोळा असा नमनालाच आपलं बालपणालाच अडकतो म्हणतात :-) म्हणूनच बहुदा आमचे श्रामो म्हणत असतील "मोठे व्हा"

यशोधरा's picture

23 May 2010 - 9:23 am | यशोधरा

मला वाटलेलंच की मास्तरांचच काम असणार! हॅ, हॅ, हॅ! :D

llपुण्याचे पेशवेll's picture

23 May 2010 - 9:39 am | llपुण्याचे पेशवेll

हो नाहीतरी सग्गळं तुम्हाला अ‍ॅडव्हान्समधेच कळतं.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix