मिसळपाव...

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
22 Apr 2010 - 11:19 pm

नमस्कार,

आपण सर्व मिपाकर हे जाणतो की मिसळपाव हे संकेतस्थळ श्री तात्या अभ्यंकर यांनी स्थापन केले आहे. ते या संकेतस्थळाचे मालक सुध्दा आहेत.

गेल्या काही महिण्यांपासून मिपाच्या व्यवस्थापनाकडे तात्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याने मी व संपादक मंडळानेच मिपा सुरू ठेवलंय. आता सुध्दा येत्या काही काळ तात्यांना मिपाकडे लक्ष देणे होणार असे दिसत नाही. त्यामुळे तात्यांनी आधी अघोषीत असलेली व्यवस्था घोषीत केलीये की मिपाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार नीलकांत कडे असतील. यात मालकी हक्काबाबत कुठलाही उल्लेख आलेला नाहीये. त्यामुळे त्याबाबत वर केलेल्या विधानाशिवाय काहीही उल्लेख करने गैरलागू आहे.
माझ्या किंवा तात्याच्या कुठल्याही लेखनामुळे असा कुणाचा गैरसमज झाला असेल तर मी तशी माफी मागतो.

तात्यांचे मिसळपाववर चे स्थान महत्वाचे आहे यात शंका नाही. सध्या फरक एवढाच की रोजच्या कारभारात तसेच इतर विषयांत तात्या लक्ष घालणार नाहीत.

या संदर्भात कुणाला व्यक्तिगत स्पष्टीकरण हवे असल्यास मला मेल टाकावा किंवा व्य. नि. करावा.

- नीलकांत

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

ज्ञानेश...'s picture

22 Apr 2010 - 11:39 pm | ज्ञानेश...

तात्या= मालक
नीलकांत= व्यवस्थापक
संपादक= संपादक

इतर सर्व= लेखक, वाचक, प्रतिसादक, विडंबक, कंपूबाजक वैग्रे.... ;)

विसोबा खेचर's picture

22 Apr 2010 - 11:40 pm | विसोबा खेचर

धन्यवाद रे नीलकांता...

मला म्हटलं तर मालकी हक्काचा अगदी भरपूर सोस आहे, आणि म्हटलं तर मुळीच नाही..

दोन पेग मारले तर अगदी एका सेकंदाच्या आत सर्व मिपा जाहीरपणे तुला देऊन मोकळा होईन आणि पुन्हा नव्या संस्थळाच्या स्थापनेकरता नव्याने तुलाच सांगेन..:)

तिसरा पेग मारला तर नवीन संस्थळ जोमाने चालवून दाखवेन अशी भाषा करेन आणि ती खरीही करून दाखवेन..:)

पण काही भूतं बोकाळतात आणि फुकटची नाचू लागतात म्हणून हा सगळा अट्टाहास.. :)

सांभाळ माझं मिपा, अगदी तुला हवं तसं!

अर्थात, मुखपृष्ठ आणि खादाडी सदर सोडून.. ;)

(फकीर) तात्या.

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Apr 2010 - 11:53 pm | अक्षय पुर्णपात्रे

मालकांच्या मोठया मनाचे (फकिरपणाचे) कौतुक वाटते.

Do I contradict myself?
Very well then I contradict myself,
(I am large, I contain multitudes.)

या वॉल्ट विटमनच्या ओळी आठवल्या.

पांथस्थ's picture

23 Apr 2010 - 8:58 am | पांथस्थ

Do I contradict myself?
Very well then I contradict myself,
(I am large, I contain multitudes.)

क्या बात है! ह्या माझ्या एकदम आवडत्या ओळी आहेत आणी मी त्या अनेकदा वापरतो....आमच्या स्वभावाला जरा चपखल बसतात :)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

यशोधरा's picture

22 Apr 2010 - 11:55 pm | यशोधरा

>>Do I contradict myself?
Very well then I contradict myself,
(I am large, I contain multitudes.) >> +१

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Apr 2010 - 11:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी योग्य वाक्य टाकलंत अक्षय!

अदिती