दोन शब्द...

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
21 Apr 2010 - 10:39 pm

नमस्कार मिपाकरहो,

एवढ्या दिवसांच्या मिपाच्या प्रवासातील एक अशी माझी ओळख आज पर्यंत होती. तात्यांनी ही नवी जवाबदारी दिली आहे त्या जवाबदारीवर मी खरा उतरण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो. मिसळपाव उभं करतांना ज्या उद्येश्यांना सामोरे ठेवलेलं होतं त्याच दिशेने मिसळपावची वाटचाल व्हावी अशीच भूमिका असेन या कडेही जाणीवपुर्वक लक्ष देईल.

सर्वप्रथम मी सगळ्या मिपापासुन दुर गेलेल्या माजी सदस्यांना परत येण्याचे आवाहन करतोय. तुम्ही दिलेल्या योगदानाची जाणीव मिपाला आहे/असणार आहे.आजच्या घटकेला तुम्ही परत येणे हीच मिपा व्यवस्थापनाची आद्य प्राथमिकता असणार आहे.

मागच्या दोन वर्षात मिपाची वाटचाल अत्यंत दैदिप्यमान अशी आहे. सांख्यिकी द्यायची झाली तर भुरळ पाडणारे आकडे आहेत. हिच यशोगाथा पुढे चालु ठेवण्यासाठी आपण यापुढे प्रयत्नशील राहुयात. याच पायावर येणार्‍या वर्षात काही महत्वाकांक्षी योजना तडिस नेण्याचा बेत आहे, त्या वेळोवेळी जाहिर करण्यात येतिल.

मिपा व्यवस्थापन जास्तित जास्त लोकाभिमुख कसे राहिल याबद्दलही काही योजना आहेत.या आणी अश्या बाबतीत सर्व सदस्यांच्या सुचनांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा विचार आहे. ही समिती त्या त्या वेळच्या प्रकल्पानुसार बनविली जाईल आणी प्रकल्पाच्या यशस्वितेनंतर विसर्जित केली जाईल. संपादक मंडळ ही स्वतंत्र रचना आधीसारखीच कार्यरत राहिल, निवेदनाच्या धाग्यावर तात्यांनी म्हणाल्या प्रमाणे त्यांचे योगदान शब्दातीत आहे. सध्याचे संपादक मंडळात कोणताही बदल होणार नाही. सर्व संपादकांना मी
पुन्हा कार्यरत होण्याची मनापासुन विनंती करत आहे. आपल्या सर्व सुचनांचे स्वागत आहे.

संस्थळाच्या धोरणात आमुलाग्र बदल करण्याचा मानस आहे. त्यातली एक लहानशी गोष्ट म्हणजे आणिबाणी. यापुढे आणिबाणी नामक गोष्ट मिपावर अस्तित्वात नसेल. तसेच कोणत्याही वापरकर्त्याचे खाते बंद करण्याचा मार्ग अत्यंत निकडीच्या वेळेसच वापरण्यात येईल असे धोरण बनविण्याचा विचार आहे. याचा अर्थ असा मुळीच नाहीये की आता शिस्तभंगाची कार्यवाही होणार नाही. मात्र आधी तात्या एकहाती हे काम पुर्ण करायचे आता ते कामात असल्यामुळे शासनकर्ता [ ;) ] नाहीये. ते येई पर्यंत सर्व संपादकांना हे काम करावे लागेल. यावरून संपादकांच्या वाढत्या जवाबदारीची जाणीव होईल.

मी आधीसारखाच मिसळपावला अधीकाधीक सोई देण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळे आधीसारखीच यापुढेही संपादनाची पुर्ण जवाबदारी संपादकांच्या खांद्यावर राहील.

लवकरात लवकर या योजना घेउन मी आपल्यापुढे येईन. आपल्या विश्वासावरच त्यांचे यश अवलंबुन आहे याची मला पुर्ण जाणिव आहे.
मिपावर पारदर्शकता हे सुत्र कसोशीने वापरण्याचा मी प्रयत्न करेन.

आपलाच विश्वासु,

नीलकांत

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

टारझन's picture

21 Apr 2010 - 11:13 pm | टारझन

सर्वप्रथम मी सगळ्या मिपापासुन दुर गेलेल्या माजी सदस्यांना परत येण्याचे आवाहन करतोय. तुम्ही दिलेल्या योगदानाची जाणीव मिपाला आहे/असणार आहे.आजच्या घटकेला तुम्ही परत येणे हीच मिपा व्यवस्थापनाची आद्य प्राथमिकता असणार आहे.

आज मी पुणरागमणाची घोषणा करतो :) फक्त निलकांता तुझ्याच साठी आणि मिपासाठी :)

पण खरंच .. निलकांत आहे खरा संतुलित माणुस .. आपला फुल सपोर्ट रे तुला

- निळकंठ

मराठमोळा's picture

23 Apr 2010 - 1:16 pm | मराठमोळा

मी खरं तर कामाच्या व्यापामुळे दुर झालो होतो ..

पण आय एम बॅक टु, जरी खारीचा वाटा असला तरी ;)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

वाचक's picture

21 Apr 2010 - 11:20 pm | वाचक

'टिकून राहील' अशी आशा आणि सदिच्छा व्यक्त करतो.

विसोबा खेचर's picture

21 Apr 2010 - 11:26 pm | विसोबा खेचर

ऒल द बेस्ट रे..

सर्वांनी मिपाला मोठं करा..

तात्या.

नीलकांत's picture

22 Apr 2010 - 11:19 pm | नीलकांत

मिसळपाव पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करेन. ते आजतागायत करतच आलोय.

काळजी नसावी.

- नीलकांत

यशोधरा's picture

21 Apr 2010 - 11:38 pm | यशोधरा

नीलकांत, छान लिहिलंस की :) तुला अनेकानेक शुभेच्छा!

विसोबा खेचर's picture

21 Apr 2010 - 11:41 pm | विसोबा खेचर

यापुढे आणिबाणी नामक गोष्ट मिपावर अस्तित्वात नसेल.

हम्म..पुन्हा एकदा ऑल बेस्ट! :)

तसेच कोणत्याही वापरकर्त्याचे खाते बंद करण्याचा मार्ग अत्यंत निकडीच्या वेळेसच वापरण्यात येईल असे धोरण बनविण्याचा विचार आहे.

यापूर्वीही असेच घोरण होते..

मात्र आधी तात्या एकहाती हे काम पुर्ण करायचे आता ते कामात असल्यामुळे शासनकर्ता [ Wink ] नाहीये. ते येई पर्यंत सर्व संपादकांना हे काम करावे लागेल.

लौकरच परत येतो.. तोपर्यंत सांभाळ रे मिपाला...

आपला,
(सक्रीय नसलेला आणिबाणीचा शसनकर्ता) तात्या. :)

आनंदयात्री's picture

21 Apr 2010 - 11:55 pm | आनंदयात्री

दुरस्थ मिपाकरांनी परत यावे हे आवाहन फार महत्वाचे.
आणी आणिबाणी हटवली ही सुद्धा उत्तम गोष्ट .. यासाठी अभिनंदन !!
प्रकटन आवडले. योजना लवकर येउ द्या.

-
(एखाद्या समितीत जागा घेण्यासाठी आतुर)

आंद्या मिपाकर

ऋषिकेश's picture

22 Apr 2010 - 11:37 pm | ऋषिकेश

नीलकांत,
आनंदयात्री सारखेच म्हणतो
प्रकटन व विचार आवडले.. आणिबाणि हटविल्याबद्दल विषेश अभिनंदन!!!

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

टारझन's picture

21 Apr 2010 - 11:45 pm | टारझन

प्रेमी ब्लॉग ला तात्या गप्प असल्या पासुन काही खाद्य मिळत नाहीये बहुतेक .. जसे तात्या निष्क्रिय झाले तसा तो ब्लॉगही ...
किमान त्या प्रेमी ब्लॉग साठी तरी तात्या लवकरात लवकर परतावेत ... अशीच देवाकडे प्रार्थणा करतो :)

- ट्विट्टर
चालक , तात्याप्रेमी.ब्लॉगस्पॉट.कॉम

II विकास II's picture

21 Apr 2010 - 11:51 pm | II विकास II

नीलकांतने लिहीले हे बरे झाले.

अजुन काही गोष्टीबद्दल स्पष्टीकरण दिले तर बर होईल. ह्या काही प्रामाणिक शंका आहेत. काही तिरकस पणा किंवा जुने हिशोब वैगरे असे काही नाही.

१. मिपावरील बनावट आयडी: मिपावर बर्‍याच प्रमाणावर बनावट आय डी आहेत असे बर्‍याच जणांकडुन ऐकले आहे. त्याबद्दल काय धोरण आहे? बनावट आय डी असतील तर ते उडवले जाणार का?
२. कधी कधी वेगवेगळ्या सदस्यावर बनावट आय डी आरोप होतात. त्याची शहानिशा करण्यासाठी काय उपाय करणार आहात?
३. मध्यंतरी मिपावर एका कंपुचे काही प्रकार चालु होते. काही सदस्यानी जाहीर धागेही टाकले होते. तशी कंपुबाजी वर काय उपाय करणार? भविष्यात होउ नये म्हणुन काय नियम ठरवणार का?
३. एकच गोष्ट कोणाला खुप आवडत असेल आणि कोणाला आवडत नसेल तर सदस्यांमध्ये वाद होउ नये म्हणुन काय करणार? उदा. खरडफळ्यावरील २-३ पाने पहा.
४. 'आहे हे असे आहे, चपला घाला आणि चालु पडा', 'फाट्यावर मारतो', 'मिपा हे खाजगी संकेतस्थळ आहे', 'मिपाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, तुम्ही काळजी करु नका' असे वाक्ये पुन्हा वाचायला मिळणार का?
५. मालक आहे म्हणुन मालकांच्या शिव्या/तत्सम विनोद चालतात, पण सभासदांचे चालत नाहीत. म्हणजे आपला तो बाब्या, त्यांचे ते कार्ट असे प्रकार पुन्हा होणार का?
उदा. चिंतातुर जंतुचा विनोदाचा धागा
६. संपादक नियुक्ती कशाच्या आधारावर होणार? मालकाची मर्जी आहे म्हणुन की खरोखरच राजकारण, निष्पक्ष, कंपुबाजीरहीत माणुस आहे म्हणुन होणार? काही सदस्य्/संपादक कंपुबाजांना आतुन सहाय्य करत होते अशा बर्‍याच लोकांना संशय होता. त्या संपादकांना हटवणार का? संपादकांच्या निवड्णुका होणार का?
७. संपादक हे कोणाला उत्तरदायी असणार का? त्यांनी केलेल्या निर्णयावर अपील असे काही प्रकार ठेवायचा विचार आहे का?
८ . बरेचदा एका संपादकाला एखादी गोष्ट चुकीचे वाटत नाही आणि दुसर्‍याला वाटते ह्यात लेखकाची वाट लागते, ह्यावर काही उपाय योजना करण्याचा विचार आहे का?
९. नुकत्याच निघालेल्या काही संकेतस्थळांनी तांत्रिक बाबतीत बरीच प्रगती केली आहे. त्यांच्याशी संपर्क साधुन मिपावर तात्रिक सुधारणा होणार का?
१०. शुध्दलेखनाचे धोरण बदलण्याचा विचार आहे का? मला वाटते, आपण आंतरजालावर १ वर्ष झालेल्या सदस्याकडुन जास्तीत जास्त शुध्द मराठीची अपेक्षा करु शकतो. माझेही मराठी इतके शुध्द नसते, मी अधिक अधिक सुधारणा करण्याचा यत्न करत आहे.
११. मिपाचा आर्थीक भार मिपा मालकावर पडु नये म्हणुन काही उपाय करण्याचा विचार आहे का? काही जाहीराती वैगरे.
१२. मिपाची ध्येय-धोरणे जाहीर होणार का?
१३. मिपावरील दुर्बल घटकाचे/अकंपु सद्स्यांचे हितरक्षण कसे होणार?

ह्या प्रतिसादावर जरुर विचार व्हावा. उडवला तरी काही हरकत नाही. प्रत्येकानेच आत्मपरीक्षण करायची गरज आहे. उगाच अरे ला कारे करण्यात काही अर्थ नाही.
असो. उत्तराची वाट पहात आहे.

विसोबा खेचर's picture

21 Apr 2010 - 11:52 pm | विसोबा खेचर

हा हा हा! सगळे प्रश्न छान..

नीककांता, उत्तरं दे रे बाबा आता.. मीही वाचायला उत्सुक आहे..

तात्या.

विसोबा खेचर's picture

21 Apr 2010 - 11:57 pm | विसोबा खेचर

स्वगत : एकंदरीत वरील सर्व प्रश्न वाचता एक तर पुन्हा एकदा मिपाचा संपूर्ण ताबा घ्यायला हवा अन्यथा येथून चपला घालून चालू पडून दुसरं एखादं संस्थळ तरी काढावं असं म्हणतो.. ;)

तात्या.

चतुरंग's picture

22 Apr 2010 - 12:08 am | चतुरंग

गरज लागली तर तयारी असावी नै तात्या? तसा मी प्रोअ‍ॅक्टिव आहे हं! ;)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

22 Apr 2010 - 12:11 am | विसोबा खेचर

येस्स..गरज पडलीच तर या चपला मला नक्कीच उपयोगाच्या आहेत!

तात्या सलामत तर संस्थळं पचास..!

मिपाला जन्म देऊन मोठं केलं तसं दुसर्‍या एखाद्या संस्थळाला मोठं करेन..

तात्या.

आनंदयात्री's picture

22 Apr 2010 - 12:15 am | आनंदयात्री

तात्या माझा आयडी 'आनंदयात्री' माझ्यासाठी राखुन ठेवा हं !

-
आपलाच

(चपला लपवणारा)

आंद्या मिपाकर

टारझन's picture

22 Apr 2010 - 12:21 am | टारझन

हो .. आणि मला "विसोबा खेचर" हा आयडी हवा :)

- बालहनुमान

मेघवेडा's picture

22 Apr 2010 - 1:48 am | मेघवेडा

तू केलेल्या हजारो विडंबणांपैकी एखादा घे की!! 'हळूच गाजरहलवी' ब्येश्ट होता! ;)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

प्रियाली's picture

22 Apr 2010 - 3:51 am | प्रियाली

तात्या सलामत तर संस्थळं पचास..!

नाहीतर ब्लॉग आहेच. ;)

असो. मिपापासून दूर गेलेल्यांना परत बोलावण्याबद्दल सहमती आहे.

निलकांतला शुभेच्छा!

विसोबा खेचर's picture

22 Apr 2010 - 7:56 am | विसोबा खेचर

नाहीतर ब्लॉग आहेच.

हो, तो तर आहेच.. आता तिथेही मी आजची बाई, आजची बाटली, आजची खादाडी ही सदरं सुरू केली आहेत.. ;)

तरीही नव-नवीन संस्थळं काढायची अद्याप हौस आहेच.. :)

तूर्तास खिशात पैसा नाही आणि वेळही नाही..

तात्या.

shweta's picture

22 Apr 2010 - 12:08 pm | shweta

नवे संस्थळ कधी चालु होणार ?

shweta's picture

22 Apr 2010 - 8:01 pm | shweta

हम्म... :)

आनंदयात्री's picture

22 Apr 2010 - 12:13 am | आनंदयात्री

हा हा हा !!
=)) =)) =))

नीलकांत's picture

22 Apr 2010 - 11:18 pm | नीलकांत

नमस्कार विकास,

तुम्ही विचारलेल्या प्रश्नांपैकी शक्य तेवढ्या प्रश्नांना उत्तरे देईल. मात्र मला थोडा वेळ लागेल. कारण सध्या मी खुप कामात आहे.

तात्यांनी मिसळपावचे सर्व अधिकार देण्यामागे सुध्दा हाच विचार होता की मिसळपाव नवीन लोकांच्या हातात देऊन त्याची प्रगती बघत स्वत:समोरील इतर प्रश्नांना वेळ द्यावा.

दिरंगाई बद्दल दिलगीर आहे.

- नीलकांत

II विकास II's picture

22 Apr 2010 - 12:01 am | II विकास II

एक राहीलाच
१४. अवांतराबद्दल काय धोरण राहील?

चतुरंग's picture

22 Apr 2010 - 12:29 am | चतुरंग

आणीबाणी उठवणे आणि गेलेल्या सदस्यांना पुन्हा आवाहन ही दोन्ही चांगली धोरणे आहेत, यशस्वी ठरतील अशी आशा आहे.
माझ्याकडून संपूर्ण सहकार्य असेल.

(मिपाप्रेमी)चतुरंग

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Apr 2010 - 12:32 am | अक्षय पुर्णपात्रे

पारदर्शकतेच्या दिशेने प्रवास होत आहे, हे पाहून आनंद वाटला. सहकार्य आहेच.

भाग्यश्री's picture

22 Apr 2010 - 12:45 am | भाग्यश्री

नीलकांत नवीन जबाबदारीसाठी भरपूर शुभेच्छा!
दोन शब्द आवडले !

धनंजय's picture

22 Apr 2010 - 1:54 am | धनंजय

प्रकटन सुयोग्य आहे. मोठे मन दाखवणारे आहे.

पुढे कधी तात्यांना नवीन स्थळचालकांचा कार्यपद्धतीचा एखादा तपशील पटला नाही, म्हणा. तर त्यांनीही मोठ्या मनाने थेट मालक-संपादकांशी संपर्क साधून मार्गदर्शन करावे, उघड हट्ट किंवा रुसवा धरू नये. मिसळपावाबद्दल जनक म्हणून असे प्रेम आणि समंजस विवेक त्यांच्यापाशी आहेच. वेळ आल्यास आणखी एखादे संकेतस्थळ ते उभारू शकतील याबाबत कोणाला संदेह नाही. त्यांनी उभारून घरट्यातून उडू दिलेली संकेतस्थळे एकमेकांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करतील अशी माझी खात्री आहे.

- - -

"आणीबाणी असणे" आणि "उठणे" हे काय प्रकार आहेत ते मला माहीत नाही, पण कालांतराने आपोआप दिसेलच.

संपादनाशिवाय काही खोडसाळ प्रकार बोकाळतील, हे जाणून संपादन चालूच ठेवले आहे, ही बाब उत्तम. संपादन मंडळाला संपादनाबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वे दिली जातील, अशी योजना मालक-संपादकांनी मिळून करावी. त्यानंतर "संपादन पटले नाही" अशी तक्रार करणार्‍याच्या निदर्शनास ती तत्त्वे आणून देता येतील.

- - -

पुनश्च, सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो.

विसोबा खेचर's picture

22 Apr 2010 - 7:53 am | विसोबा खेचर

तर त्यांनीही मोठ्या मनाने थेट मालक-संपादकांशी संपर्क साधून मार्गदर्शन करावे, उघड हट्ट किंवा रुसवा धरू नये.

मालक? अहो धन्याशेठ, माझ्या माहितीप्रमाणे मालक अजूनही मीच आहे! :) अर्थात, नीलकांतच्या धोरणांत आणि संपादकांच्या कार्यपद्धतीत माझी लुडबुड असणार नाही..मागे एकदा म्हटल्याप्रमाणे तूर्तास मिपाचं मुखपृष्ठ आणि खादाडीसदर येथेच माझा वावर राहील..

एरवी जी काही नवी धोरणं राबवायची आहेत, ज्या काही नव्या समित्या नेमायच्या आहेत, आणीबाणी उठवायची आहे, जुन्या लोकांना जाहीरपणे परत बोलावायचं आहे, इत्यादी नीलकांतला जे काही करायचं आहे ते सर्व करू द्यायचं ठरवलं आहे..नीलकांतने आजपर्यंत मिपाकरता खूप काही केलं आहे.. अगदी जीव लावून!

मिसळपावाबद्दल जनक म्हणून असे प्रेम आणि समंजस विवेक त्यांच्यापाशी आहेच.

नक्कीच.. मिपाचं भलं व्हावं, मिपाबद्दल प्रेम आहे म्हणूनच नीलकांतवर पूर्ण विश्वास ठेवून त्याला मिपा जसं चालवायचं आहे तसं चालवू द्यायचं काही दिवस ठरवलं आहे..तूर्तास तरी मी अनेक कटकटींमधून जात आहे. सध्या काही दिवस जालावर आहे, पुन्हा कधी गायब होईन ते सांगता येत नाही..

वेळ आल्यास आणखी एखादे संकेतस्थळ ते उभारू शकतील याबाबत कोणाला संदेह नाही.

अगदी निश्चित.. ओपन चायलेन्ज देऊन! :)
(नव्या संस्थळाचं नांवही मनाशी योजून ठेवलं आहे!) :)

कुठे कशाचा पत्ता नसताना वरील काही प्रतिसादांनुसार आंद्या आणि टारझन त्या संस्थळाचे आत्तापासूनच मेंबर होऊ घातले आहेत! ;)

तंत्रविभाग अर्थातच नीलकांतकडे असेल.. :)

असो,

एकंदरीत छान प्रतिसाद रे धन्याशेठ..

तात्या.

II विकास II's picture

22 Apr 2010 - 8:02 am | II विकास II

>>कुठे कशाचा पत्ता नसताना वरील काही प्रतिसादांनुसार आंद्या आणि टारझन त्या संस्थळाचे आत्तापासूनच मेंबर होऊ घातले आहेत!

माझे ही २-३ आय डी राखुन ठेवले तर बरे होइल. असो.

आनंदयात्री's picture

22 Apr 2010 - 9:58 am | आनंदयात्री

माझ्या वरच्या प्रतिसादाचा अर्थ थोडासा वेगळा घेतला गेलेला आहे.

>>कुठे कशाचा पत्ता नसताना वरील काही प्रतिसादांनुसार आंद्या आणि टारझन त्या संस्थळाचे आत्तापासूनच मेंबर होऊ घातले आहेत!

माझा प्रतिसाद हा तुमच्या येउ घातलेल्या घातलेल्या संकेतस्थळावर आयडी हवाय असा असला तरी त्याच्या मागे तुम्ही आता नविन संकेतस्थळाच्या उभारणीत तुमची उर्जा खर्च करा असे सांगणे हा अर्थ होता.
सारखे सारखे मी मालक आहे .. मी मालक आहे याचा धोषा लावणे, त्याने सुरु केलेल्या चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन न देणे; इत्यादी गोष्टी पहाता "तात्या आता तुम्ही रिटायर व्हा" असा अनाहुत सल्ला द्यावासा वाटतोय.

II विकास II's picture

22 Apr 2010 - 10:02 am | II विकास II

>>सारखे सारखे मी मालक आहे .. मी मालक आहे याचा धोषा लावणे
मी मालक आहे हा सुर, व्यक्तीगत कामाचा ताण, सदस्यांनी द्यायचा म्हणुन दिलेला त्रास, लोकशाहीचा घेतलेला गैरफायदा, काही सदस्याचे सतत अवांतर लिहीणे ह्या सगळ्यांचा परीपाक असावा असे वाटते.

हा प्रतिसाद कोणाला एकाला उद्देशुन अथवा तिरकस नाही.
--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Apr 2010 - 10:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वेल सेड!!
(अवांतरः मुख्य पानावरचा धागाही पाहून हेच वाटलं!)

अदिती

विसोबा खेचर's picture

22 Apr 2010 - 10:13 am | विसोबा खेचर

अनाहूत सल्ल्याबद्दल धन्यवाद...:)

तात्या.

प्राजु's picture

22 Apr 2010 - 3:17 am | प्राजु

प्रकटन आवडले..
जमेल तितके नक्कीच सहकार्य करू.
शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

चित्रा's picture

22 Apr 2010 - 8:42 am | चित्रा

असेच म्हणते.
सहकार्य करूच.

शेखर काळे's picture

22 Apr 2010 - 3:53 am | शेखर काळे

४. 'आहे हे असे आहे, चपला घाला आणि चालु पडा', 'फाट्यावर मारतो', 'मिपा हे खाजगी संकेतस्थळ आहे', 'मिपाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, तुम्ही काळजी करु नका' असे वाक्ये पुन्हा वाचायला मिळणार का?

अरेरे .. चांगल्या करमणुकीला मुकलो !

प्रभो's picture

22 Apr 2010 - 5:34 am | प्रभो

मस्त रे नीलकांता...
तुझ्या हाताखाली मिपा वाढेल अशीच आशा करतो....

अरुण मनोहर's picture

22 Apr 2010 - 8:09 am | अरुण मनोहर

जीयो नीलकांत. हा काटेरी मुकुट तुम्ही समर्थपणे पेलाल ह्याची खात्री आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

22 Apr 2010 - 8:17 am | प्रकाश घाटपांडे

हा काटेरी मुकुट आहे. सर्वांना सदैव खुश ठेवणे हे अशक्य गोष्ट असते. वेगवेगळ्या संस्कारातुन आलेल्या व्यक्ती, त्यातुन जालावरील लेखनाची बलस्थाने व मर्यादा, समुह मानसिकतेतुन आलेली वर्तन विसंगती,उन्माद,प्रेरणा,उत्साह देखील महत्वाच्या बाबी आहेत. सर्व काही गुडी गुडी असणे अशक्यच असते. म्हणुनच म्हणतो कि स्वयंशिस्त व विवेक बाळगला तर व्यवस्थापनास अडचण येणार नाही.
वाटचालीस शुभेच्छा
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

II विकास II's picture

22 Apr 2010 - 8:25 am | II विकास II

>>हा काटेरी मुकुट आहे.
>>सर्वांना सदैव खुश ठेवणे हे अशक्य गोष्ट असते.
हे तर आहेतच.
पण ह्यात तुझ्यावर असलेल्या लोकांच्या विश्वासाला धक्का लागु देउ नकोस म्हणजे झाले.
एक तुझा हितचिंतक म्हणुन माझा पाठींबा नेहमीच राहील. असो.

--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Apr 2010 - 9:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नीलकांत, तू आपणहून 'दोन शब्द' लिहीलेस हे उत्तम! तुला आणि मिपाला मनापासून शुभेच्छा. "आणिबाणी" (जी काय होतं) ती हटवली हे उत्तम. तुला सहकार्य नेहेमीच राहिल.

अदिती

मेघना भुस्कुटे's picture

22 Apr 2010 - 2:07 pm | मेघना भुस्कुटे

असेच म्हणते. नीलकांतला मनापासून शुभेच्छा!

झकासराव's picture

22 Apr 2010 - 10:14 am | झकासराव

नीलकांत शुभेच्छा!!! :)

नीलकांत मी तुझ्याशी सहमत आहे...!
मिपा हे छान आहेच.. पण तु त्याला अजुन छान बनवशिल यात काही शंका नाही.

त्याचबरोबर (II विकास II) ने विचारलेल्या प्रश्नांचे काय? सर्व प्रश्न रास्त वाटतात त्यांची उत्तरे मिळाली तर बर्‍याच मिपाकरांच्या शंकेचे निरसन होईल असे वाटते.

नवीन जबाबदारीसाठी भरपूर शुभेच्छा!

निखिल देशपांडे's picture

22 Apr 2010 - 10:48 am | निखिल देशपांडे

निलकांत हे "दोन शब्द" उत्तम लिहिलेस..
आणिबाणी आणि दुर गेलेल्या सदस्यांबद्दलचे निर्णय उत्तम
पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

छोटा डॉन's picture

22 Apr 2010 - 11:06 am | छोटा डॉन

वास्तविक पाहता ह्या धाग्यावर आम्हाला काहीच लिहायची तशी अजिबातच गरज नव्हती, नीलकांतला सहकार्य आणि खच्चुन पाठिंबा आहेच म्हणुन तर आम्ही परत आलो हे सत्य आहे ...

असो.
आता आलो आहेच तर ’मिपाला समॄद्ध बनवण्यासाठी व ते अजुन यशस्वीरित्या चालवण्यासाठी आमचा नीलकांतला नेहमीच पाठिंबा आणि सहकार्य राहिल’ असे इथे नमुद करतो ...

आता असेच इतर काही ....
संकेतस्थळ चालणे म्हणजे तिथे असलेल्या सदस्यांच्या योगदानातुन आणि त्यांच्या व्यवस्थापनावरील विश्वासावर असलेल्या विश्वासातुन संकेतस्थळाचा विकास होणे अशी आमची समज आहे, आमच्या अल्प बुद्धीला ती पटेल अशीही आहे. उगाच उठुन काही टेक्निकल बाबी व १ मालक ह्यांनी संतेकस्थळ बनत नसते, बनलेच तर ते चालत नसते. असे ’बसल्या बसल्या १ संकेतस्थळ बनवले’ ह्या वार्ता करणारे काही ’मालक’ आमच्या पाहण्यात आहेत. संकेतस्थळ चालवण्यासाठी विश्वासात घेतलेल्या सदस्यांची व बर्‍याच अंशी पारदर्शकतेची आवश्यकता असते ही मुलभुत बाब विसरुन १ नाही तर १० संकेतस्थळे बनवली तरी चालणार नाहीत असे आमचे वैयक्तिक मत आहे. असे बरेच हौशे-गवशे-नवशे आमच्या पाहण्यात आहेत. असो, तो मुद्दा वेगळा आहे.

तसेच सध्या इथे असलेल्या सदस्यांनी इथे प्रामाणिकपणे 'भरिव योगदान देणे' ह्या तत्वाला मनात ठेऊनच व्यवहार करावा ही अपेक्षा, हा मुळ उद्देशच हरवणार असेल तर १ काय तर १० संकेतस्थळे कामाची नाहीत. संकेतस्थळे आणि त्यांची नावे व कमेट्या बदलल्या तरी 'अ‍ॅक्युअली ते संकेतस्थळ चालवणारे व वर आणणारे लोक हे सामान्य सदस्य असतात व त्यांचे भरिव योगदान हेच संकेतस्थळाला वर आणते' हा कॉमन सेन्स आहे, अर्थात ह्यात पुन्हा ज्याची त्याची जाण समज वगैरे बाबी आहेतच.
बाकी इतर फालतु शंकांना आमचे मित्र रंगाशेठ व यात्री ह्यांनी योग्य उत्तर दिले आहेच, त्यावर काही लिहण्याची आमचे अजिबात इच्छा नाही, योग्य काय ते समजुन घ्यावे, उगाच कोणी गैरसमजात व अंधारात राहु नये ही सदिच्छा !

बाकी अजुन एक कळकळीने सांगावेसे वाटते ते असे का नीलकांत त्याच्या कामातुन वेळ काढुन मिसळपावसाठी काम करत असताना उगाच विसंवाद वाढवणारे व गोंधळ निर्माण करणारे 'सारखे सारखे मी मालक आहे .. मी मालक आहे याचा धोषा लावणे, त्याने सुरु केलेल्या चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन न देणे' ह्या बाबी थांबल्या तर आनंद होईल. प्रतेकच वेळी 'मी मालक आहे' अशी गोष्ट स्पष्ट लिहावी लागणे हे माझ्या मते कोणत्याच अनुषंगाने सुयोग्य नाही आणि कोणाच्याच कल्याणाचे नाही. अशा फालतु गोष्टीमध्ये कशाला एनर्जी घालवता ?

राहता राहिला मुद्दा तो काही शंका आणि प्रश्नांचा, नीलला वेळ मिळेल तेव्हा तो ह्याची समाधानकारक उत्तरे देईलच पण 'तोवर आपण प्रामाणिकपणे भरिव योगदान द्यायला काय घ्याल ? ' असे विचारतो. उगाच एखाद्याला त्रास देण्यासाठी ह्या गोष्टी असु नयेत असे मनापसुन वाटते.

बाकी ह्या धाग्यावरचा पहिलाच प्रतिसाद आहे म्हणुन हे शांतपणे समजुतदारपणाचे ४ शब्द, बाकी आपण सर्वजण सुज्ञ आहातच.
धन्यवाद ...

------
( चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य करणारा ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Apr 2010 - 11:16 am | बिपिन कार्यकर्ते

डान्या नेहमी माझ्याच मनातलं लिहितो.

नविन मालकांचे अभिनंदन आणि संपूर्ण सहकार्याचे आश्वासन आहेच.

बिपिन कार्यकर्ते

shweta's picture

22 Apr 2010 - 11:31 am | shweta

ह्म्म...

नीलकांत's picture

22 Apr 2010 - 11:18 pm | नीलकांत

बिपिन दा..

मिसळपाव हे तात्याच्या मालकीचे संकेतस्थळ आहे.
निवेदन किंवा दोन शब्द मध्ये मालकी हक्कांबाबत कसलाही उल्लेख नाहीये.

त्यामुळे मला असे संबोधने चुकीचे आहे असं माझं स्पष्ट मत आहे.

मिसळपावचे मालक श्री तात्या अभ्यंकर हे आहेत यात शंका नाही.

तुझे आणि सर्व मिपाकरांचे सहकार्य आहे यामुळेच मिपा एवढी प्रगती करू शकले आहे यावर माझी सुध्दा श्रध्दा आहेच.

- नीलकांत

विसोबा खेचर's picture

22 Apr 2010 - 11:29 pm | विसोबा खेचर

धन्यवाद नीलकांता,

हाती कुठलीही ऑथेन्टिक/ऑथोराईज्ड माहिती नसताना बिपिनरावांचे असे धडधडीत विधान हे पूर्वग्रहदुषित अथवा निव्वळ खोडसाळपणाचे मलाही वाटले!

असो,

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Apr 2010 - 1:07 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्या, माझा प्रतिसाद आल्या आल्या आपण मला फोन केला होता आणि तुमची बाजू मांडली. ती ग्राह्य धरून मी माझा प्रतिसाद नुसता मागेच घेणे नाही तर तुमची सपशेल आणि बिनशर्त माफी मागतो असे सांगितले. पण तुम्ही फोन केलात वगैरे लोकांना कळेल असे वाटल्याने तुम्हीच तसे करू नकोस असे सांगितले. शिवाय सध्या आता हे असेच राहू दे वगैरे पण आपले बोलणे झाले. फोनवर बोलताना मी माझीही बाजू मांडली होतीच. कोणतीही गोष्ट आधी कानावर येते आणि मग ती खरी आहे हे कळते, असेच घडले आहे नेहमी. काही गोष्टी कानावर आल्या त्या मी खर्‍या धरून त्याप्रमाणे लिहिले. नंतर तुमचा फोन आल्यावर बिनशर्त माफी मागायची पण तयारी दाखवली. 'पुर्वग्रहदुषित' आणि 'खोडसाळ' असतो तर शब्दाला शब्द वाढवला नसता? नीलकांतने स्पष्टीकरण दिले ते उत्तमच पण त्यावर, तो विषय संपवायचा सोडून तुम्ही काहीही खास गरज नसताना माझ्याबद्दल असे शब्द तेही केवळ स्वतःच्याच समजुतीवर आधारित राहून वापरले म्हणून हे लिहितो आहे. अन्यथा तुम्हाला आणि नीलकांतला दिलेला 'गप्प राहण्याचा' शब्द मोडला नसता.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

23 Apr 2010 - 1:26 pm | विसोबा खेचर

मी तुझ्याशी फोनवर बोलल्याप्रमाणे किंवा इथे लिहिण्याप्रमाणे, मुळात हाती कोणतीही ऑथेन्टिक/ऑथोराईज्ड माहिती नसताना, केवळ ऐकीव माहितीच्या आधारे असे धडधडीत विधान करणे हे मला अत्यंत चुकीचे वाटते..

असे काही लिहिण्यापूर्वी तुझ्यासारख्या एका जबाबदार संपादक-सभासदाने निदान मला किंवा नीलकांतला व्य नि अथवा विरोप करून खातरजमा करून घ्यायला हवी होती. तुला निश्चितच करेक्ट माहिती मिळाली असती.. पण तसे काहीही न करताना तू केवळ ऐकीव माहितीच्या आधारे मिपाच्या एका महत्वाच्या विषयासंबंधी जाहीरपणे बिनदिक्कत विधान करून मोकळा झालास हा मला निश्चितच खोडसाळपणा वाटतो..किंबा बेजबाबदारपणा वाटतो..

तुझ्या संदर्भात ह्याला 'चूक' किंवा 'अज्ञानमूलकता' मला तरी नक्कीच म्हणता येणार नाही..

असो,

माझ्यापुरता हा विषय संपला आहे..

तात्या.

भाग्यश्री's picture

22 Apr 2010 - 12:03 pm | भाग्यश्री

+१

देणार्याने देत जावे; घेणार्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे !
- विंदा

अनुभव हा नेहमीच सगळ्यात मोठ्ठा गुरु असतो.
देण्यार्याचा हात कायमचा सुटू देऊ नये हे महत्वाचे .

मिसळपाव हे एक सुसंकृत संकेतस्थळ आहे इथे स्वतःचे frustration काढुन अर्वाच्य शिवीगाळ करणार्या सभासदांवरही योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी ही नविन धोरणात सामील होइल ही अपेक्षा ...

उगाच विसंवाद वाढवणारे व गोंधळ निर्माण करणार्या सभासदांमुळे चांगल्या धाग्यांचा बळी जातो असे धागे, अवांतरा कडे भरकटू देऊ नये .

मिपावर पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न यशस्वी होवो :-)
~ वाहीदा

ज्ञानेश...'s picture

22 Apr 2010 - 12:16 pm | ज्ञानेश...

नीलकांतला शुभेच्छा, आणि संपूर्ण सहकार्य.
नव्या निर्णयांनाही पाठिंबा !

मितभाषी's picture

22 Apr 2010 - 12:20 pm | मितभाषी

असेच म्हणतो

भावश्या

प्रमोद देव's picture

22 Apr 2010 - 12:35 pm | प्रमोद देव

नीलकांतला त्याच्या कार्यात सुयश चिंतितो.

तात्या,मी मालक आहे,मी मालक आहे...हे सांगण्यामागचा उद्देश कळला नाही...कारण तू मालक आहेस हे इथल्या जवळपास ९५% सदस्यांना माहित आहे...मग तीच गोष्ट पुन्हा सांगण्यात काय हंशील आहे?

हे संकेतस्थळ पूर्वीसारखं पुन्हा भरभराटीला यावं असं खरोखरच वाटत असेल तर सर्वात आधी तुझा हा बालीशपणा बंद कर. नीलकांतला पूर्णपणे सूट दे...उगाच मध्येमध्ये लूडबूड करू नकोस. तुझ्या वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित कर म्हणजे तुझ्या अडचणी...ज्या काही असतील त्या जास्त चांगल्या प्रकारे सुटतील.

आणखी एक सल्ला...तू तो मानणार नाहीस...हे माहीत असूनही देतोय...तुझं वागणं...इथलं...संकेतस्थळावरचं...जितकं मर्यादशील ठेवशील तेवढं हे संकेतस्थळ जास्त सुरळित चालेल.

यथा राजा,तथा प्रजा...ह्या उक्तीप्रमाणे...तुझ्या इथल्या लिखाणात,प्रतिसादात येणार्‍या शिव्या,अपशब्द वाचल्यावर जर त्याचे कुणी अनुकरण केले तर मग त्यांना कोण गप्प बसवू शकेल. तुझ्या अशा वागण्यामुळे संपादक मात्र अडचणीत येतात. कोणाकोणावर,किती आणि कशी कारवाई करायची त्यांनी? तेव्हा तुझ्या लेखणीवर ताबा ठेव.
बाकी खाजगी आयुष्यात आपण कसे वागावे हे ज्याचे त्याने ठरवावे...पण सार्वजनिक आयुष्यात मात्र काही किमान नितीनियम पाळायलाच हवेत.

इन्द्र्राज पवार's picture

22 Apr 2010 - 12:49 pm | इन्द्र्राज पवार

नीलकांत जी .... मिसळपाव वरील हा माझा दुसरा आठवडा, आणि याच काळात श्री. तात्यासाहेबांनी विश्रांतीचा प्रस्ताव मांडणे आणि संपादकपदाची धुरा तुमच्याकडे सोपवावी हा एक योगायोग. हे अशासाठी मी म्हणत आहे की, या निमित्ताने तुम्हा दोघांवर इथले सदस्य किती प्रेम करतात याचे आनंददायी प्रत्यंतर आले. तुमच्यावरील नूतन जबाबदारीसाठी तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा.

या निमित्ताने "अनंतफंदी" चा एक उपदेशपर फटका आठवतो :

"बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको
अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको,
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेपुढती पाहू नको...."

फटक्याचा शेवटचा भाग आमच्यासारख्या नव्या सदस्यांना जास्त लागू होतो, कारण तुमच्याकडून आम्हास येथील वाटचालीसाठी "मुठभर" मार्गदर्शन नेहमीच मिळत राहील. धन्यवाद.

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते's picture

22 Apr 2010 - 1:00 pm | नितिन थत्ते

>>अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको,
हे सगळ्यांनाच लागू असते.

नितिन थत्ते

हा भाग संस्काराचा असतो

मिपावरील मुखप्रुष्टावर Plunging Neckline असलेल्या बायकांचे, मुलींचे फोटो लावू नयेत .

खुदा की कायनात (निसर्ग) में औरभी बहोत खुबसुरती है जो सादगी से बयान होती है (वर्णिली जाते) :-)

(वरील मजकूर आदिती ला समर्पीत. ' Aditi' is the one who has taken STRONG INITIATE TO DISCARD PUBLISHING ANY SUCH PHOTOS OF WOMAN WEARING PLUNGING NECKLINE and we do Support)

~ वाहीदा

जयंत कुलकर्णी's picture

22 Apr 2010 - 3:29 pm | जयंत कुलकर्णी

त्यात्यांचे निवेदन वाचले, निलकांतचेही वाचले. त्या दोन्हीखालच्या प्रतिक्रियाही वाचल्या. एकंदरीत, मिपा ही फार गुंतागुंतीची भानगड आहे हे लक्षात आले.

एखादे सोपे आणि साधे, सरळ स्थळ नाही आहे का हो मराठीत लिहायला ?

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

मनिष's picture

22 Apr 2010 - 3:32 pm | मनिष

नीलकांत - अभिनंदन आणि शुभेच्छा! :)
तुझ्या संयमित आणी संतुलित वागण्यावर नक्कीच विश्वास आहे!

लोकशाही पद्धती कितीही आदर्श दिसत असली तरी अशा मोकळ्या संस्थळांवळर तो एक उपद्रवच ठरतो. कितीही मोकळे वातावरण उपलब्ध करायचे मनात असले तरी मग आभासी जगात हा प्रवास अपरिहार्यपणे "प्रशासकिय अनुमती"कडून "प्रशासकीय कात्री"कडे जातो, आणि त्यात कटूता येऊ शकते.

त्यापेक्षा काही धोरणे आणि नियम जर ठरवून कायमस्वरुपात प्रसिध्द केलेत, तर ते काटेकोरपणे सगळ्यांसाठीच अमलात आणता येतील. नव्या/जुन्या सदस्यांना ह्या नियमांना "मान्य आहे" असे दाखवुनच प्रवेश देण्यात यावा. जर कधी काही प्रतिसाद/धागे उडवण्यात आले तर नेमक्या कुठल्या धोरणामुळे/नियमामुळे ते उडले हे सांगता येईल. अश्लिलतेविषयीही काही ठोस/निसंदिग्ध भुमिका घ्यावी - माझ्या मते लज्जागौरीचे चित्र तितके आक्षेपार्ह नव्ह्ते (शिवाय त्याला सांस्कृतिक संदर्भही आहे) जितकी काही मुखपॄष्ठावरील चित्र किंवा सुरुवातीच्या काळातले काही विनोदाचे धागे होते.त्यासाठी सदस्य रेटींग सुद्धा अमलात आणता येईल. त्यासाठी काही तांत्रिक मदत हवी असल्यास मी (आणि कित्येक इतर मिपामित्र) तयार आहे.

मिपा च्या अतिशय मोकळ्या आणि उमद्या वातावरणामुळे इतर कुठेही आढळणार नाहीत असे काही लेख इथे प्रसिद्ध झालेत (उदा. घाटपांडे काकांचा "होळकर आणि दांडेकर", धनंजयचा "कोणार्कची शिल्पे") आणि ते तसेच रहावे अशी इच्छा आहे. त्याच बरोबर धोरणे/आणि नियम एकत्रितपणे प्रसिद्ध करून अमलात आणल्यास खूप फायदा होईल असे वाटते. काही काळ असे नियमीतपणे केल्यास आपोआपच जी स्वयंशिस्त आणि विवेक अपेक्षित आहे तो दिसायला लागेल असे वाटते. काही प्रकारचा थिल्लरपणा इथे खपवून घेतलाच जात नाही म्हटल्यावर तसे प्रकार कमी होतात. पण धोरणातल्या आणि त्याच्यातल्या अंमलबजावणीतल्या सातत्याची आणि पारदर्शीपणाची मात्र नितांत गरज आहे.

मिपाची भरभराट होवो आणि तात्यांची त्यांच्या अडचणींमधून लवकर सुटका हिच सदिच्छा!

- (जुना-जाणता, पण क्वचितच तोंड उघडणारा खर्राखुर्रा हितचिंतक) मनिष

भोचक's picture

22 Apr 2010 - 6:26 pm | भोचक

मनिष, डॉन्या, देवकाका, घाटपांडेकाका, बिका, अदिती या आणि इतर मिपाकरांनी मांडलेल्या मतांशी सहमती आहे. जुन्या सदस्यांना परत येण्याचे आवाहन हा मिपाच्या भरभराटीचा नवा प्रारंभबिंदू ठरू शकेल. आणीबाणी उठवली ते चांगलेच केलेत. काही वाहावत जाणार्‍या चर्चांना आणि अवांतर प्रतिसादांना आळा घालण्यासाठी मानवी संपादनापेक्षा तांत्रिक संपादनाची सोय केलीत तर त्यामुळे कटूताही टळू शकेल. शिवाय 'बहूमताचा जोरही' अशा गोष्टी धिक्कारून लावू शकेल. त्याशिवाय काही 'मानलेले' त्याज्य विषय (उदा. महात्मा गांधी, गांधीवाद वगैरे) यांच्यावर बंदी नसली तरी त्याविषयीची वक्र नजर बदलेल अशी आशा व्यक्त करतो. बाकी नीलकांता, तुला संपूर्ण सहकार्य असेलच रे.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

रेवती's picture

22 Apr 2010 - 9:28 pm | रेवती

बरं झालं रे बाबा तू हे दोन शब्द लिहिलेस!
मिपापासून लांब गेलेल्या सदस्यांनी खरच परत यावं अशी इच्छा आहे. ते कधी/का लांब गेले याच्या कहाण्या असतील, मला माहित नाही इतकेच! पण त्यांनी परत यावे असे वाटते आहे.
(अवांतरः माझा संगणक बंद आहे त्यामुळे मिपावर फारच कमी वेळ असते. महिनाभराने पुन्हा नियमीतपणे येइन. मी मिपापासून लांब गेले असा अर्थ कृपया घेउ नये.)
रेवती

सुरेखा पुणेकर's picture

22 Apr 2010 - 10:21 pm | सुरेखा पुणेकर

फौजदार दादांचं जंक्शन अभिनंदन बर्का!!
श्या द्यायचं नविन धोरन काय?

-- सुरेखा
कारभारी दमानं.....

shweta's picture

23 Apr 2010 - 12:29 am | shweta

हमम्म्म....
फौजदार ... हा हा हा ;)

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Apr 2010 - 7:58 am | डॉ.प्रसाद दाढे

नीलकांतला (आणि तात्यांनाही) शुभेच्छा! नीलकांत हा बॅलन्स्ड आहेच त्यामुळे तात्यांची निवड अचूकच आहे.
तात्या लवकर रिकव्हर व्हा आणि पुन्हा लिहिते व्हा!

तात्यांच्या लिखाणाचा फॅन