काही दिवसांपूर्वींची घटना आहे.
मी सकाळी कामावर येण्यासाठी "बेस्ट"च्या स्टॉपवर आलो. सकाळी ७-७.३० ची वेळ असेल. बसचे सुटायचे ठिकाण असूनही बस बर्यापैकी भरलेली. मला मागील जागा बसायला मिळाली. "बेस्ट"मध्ये डाव्या बाजूला तीन सीट महिला, ज्येष्ठ नागरिक व अपंग यांच्यासाठी राखीव असतात. त्यापैकी अपंगांसाठीच्या सीट रिकाम्या होत्या. एक आजी, आजोबा बसमध्ये चढतात. ते त्या अपंगांसाठीच्या रिकाम्या जागेकडे जाऊ लागतात. आजोबा त्या जागी बसणार तोच
आजी: "आहो, त्या जागा अपंगांसाठी आहेत. आपण उभे राहू."
आजोबा: "अग कोणी आले तर आपण उठूयात. सकाळीच कोणी येईल असे वाटत नाही."
आजी: "बरं"
ते दोघे त्या जागी बसले.
...
बस चालू झाली. पुढच्या स्टॉपवर एक लेकुरवाळी बाई चढली. कडेवर बाळ, एका हातात एक पिशवी कशीबशी संभाळत आत आली. महिलांसाठी राखीव जागेवर बसलेली एक तरुणी ताबडतोब उठली व तिला बसायला जागा दिली.
...
अजून काही स्टॉप नंतर एक अपंग पुढील दाराने आत चढला. त्या आजी लगेच आजोबांना म्हणाल्या: "बघा, तुम्हाला सांगत होते, बसू नका .....". पण स्वतः उठल्या त्या अपंगाला जागा द्यायला. तो "असूदे आजी मला लगेच उतरायचे आहे" म्हणत होता. पण आजींनी त्याला जागा दिली.
ताबडतोब पलिकडल्या सीटवर बसलेला एके तरूण उठला व त्या आजींना जागा दिली.
एकाच प्रवासातील या तीन अनुभवांनंतर मी मनातल्या मनात म्हणालो "सलाम मुंबईकर!!"
प्रतिक्रिया
1 Apr 2010 - 9:36 am | चिरोटा
बाकी ईतर अनेक मोठी शहरे बघितली.पण भारतात असे प्रसंग फक्त मुंबईतच घडू शकतात.सलाम.
भेंडी
P = NP
1 Apr 2010 - 9:39 am | प्रमोद देव
अनुभव खूपच छान आहे...पण हे नेहमीच होत नाही.
स्त्रियांच्या जागेवर आपल्या बायकोबरोबर बसलेल्या एखाद्या वृद्धाला एखादी तरूण स्त्री..केवळ आपला अधिकार गाजवण्यासाठीही उठवते....तर स्त्रियांच्या राखीव आसनावर बसलेला एखादा मस्तवाल तरूण...त्या जागेवरून स्त्रियांशी निष्कारण हुज्जत घालत असतो.
तरीही आपण वर नमूद केलेला अनुभव खरंच सुखावह आहे.
1 Apr 2010 - 9:44 am | विशाल कुलकर्णी
देवकाकांशी सहमत !
पण तरीही अशा घटना, असे प्रसंग आणि अशी माणुसकी ही मुंबईतच जास्त पाहायला मिळते. सलाम मुंबई.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
1 Apr 2010 - 9:41 am | निस्का
एका इंग्रजी वृत्तपत्राने काही वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीत, मुंबई हे सर्वांत non -chivalrous शहर आहे असे म्हटले होते. (उदाहरणार्थ, आपल्या पाठीमागून येणार्यासाठी दरवाजा उघडून न थांबणे). त्याच्या तुलनेत तुमचे निरीक्षण बऱ्यापैकी वेगळे (आणि सुखावणारे) वाटते!
नि...
1 Apr 2010 - 10:07 am | इन्द्र्राज पवार
मी मुम्बईकर नाही, पण कित्येकवेळा कित्येकानी या शहराला "सापाच्या काळजाचे गाव" असे म्हट्ल्याचे आठवते. पण बसचा हा अनुभव वाचल्यावर आनन्दाची झुळूक आली. असे मोत्याचे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येवोत !!
-----------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
1 Apr 2010 - 12:43 pm | डावखुरा
सलाम मुंबईकर!!!!
सहमत....
राजे!"
1 Apr 2010 - 1:33 pm | अरुंधती
सुखावणारा अनुभव! :)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
1 Apr 2010 - 3:27 pm | टुकुल
सहमत आहे..
पक्का मुंबईकर,
टुकुल
1 Apr 2010 - 3:39 pm | गणपा
२ वर्षे काशीमिरा(मीरारोड) ते अंधेरी अप डाउन करायचो बसने. साधारण २ तास आरामात लागायचे नुसते जायलाच.
पण त्या दोन वर्षात अधी वाईट अनुभव आला नाही. बर्याच चांगल्याच आठवणी आहेत सह प्रवाश्यांच्या.
हा फकत सुट्ट्या पैशांवरुन वाद व्हायचे मास्तर बरोबर.. :)
सलाम मुंबै.
1 Apr 2010 - 4:48 pm | शानबा५१२
....................................................................
..........ताबडतोब पलिकडल्या सीटवर बसलेला एके तरूण उठला व त्या आजींना जागा दिली.
आजुन लिह भाई हा आला आणि तो ऊठला.....तो बसला आणि हा उठला वगैरे....... :D
Chain reaction in organic chemistry :D
*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****