मित्र हो,
आज जरा मूड ही आहे व वेळ ही.
एकदा मंजुळ आवाजाच्या एक बाई म्हणाल्या, "काहो तुमच्या सोईची रात्री ९ नंतरची वेळ तुम्ही ठेवलित भेटायची पण आम्ही नंतर परत जायचे कसे?"
पुर्वी एकदा एकांनी प्रश्न कांडममधील माझ्या लेखांवर छद्मीपणे लिहून पृच्छा केली होती की जेव्हा तुम्ही अगदी specific प्रश्न विचारलात जसे की, 'माझी पुढची बदली कोठे होइल'?
त्यावेळी मात्र नाडी वाचकांने किंवा महर्षींच्या नावाखाली सोईस्कररित्या हे उत्तर देण्याचे टाळले. 'याचे उत्तर तुला कळायची वेळ आली की कळेल' असे तुम्ही लिहिता!
काहो,ते महाशय पुढे म्हणाले, आज पर्यंत तुम्ही नाडीवाल्यांना असा एखादा प्रश्न विचारला आहे का? ज्याचे उत्तर केवळ तुम्हाला आणि केवळ तुम्हालाच माहीती आहे?
मला खात्री आहे की त्याचे उत्तर नाडीत येईल की "अजून ती वेळ आलेली नाही. ती वेळ येताच तुम्हाला उत्तर मिळेल". कारण ते उत्तर जर नाडी वाचकालाच माहित नसेल तर तो सांगणार तरी कुठुन?
याबाबत मला नेहमी हिणवले जाई.
नंतर काही काळानी एका नाडी केंद्रात (दिल्लीला) ज्यांना माझ्या नोकरीची कामाची कल्पना नाही अशा ठिकाणी विचारणा केली. त्यावेळी महर्षी देखील वेगळे होते.(आधीचे वसिष्ठ तर नंतरचे अगस्त्य महर्षी) प्रश्न कांडम मधून मी विचारले होते की माझी या पुढची पोस्टींग कुठे असेल त्यावर तेंव्हा त्या प्रश्नाचे उत्तर आले, 'तुझा जन्म जेथे झाला त्या गावाच्या सीमेवर होईल'.(नाडी पट्टीत व्यक्तिचा जन्म कुठे झाला ते कधीच विचारले जात नाही.)
आता त्यावेळची परिस्थिती अशी होती की मला श्रीनगरहून "ड्यू टू एक्सिजन्सीज ऑफ सर्व्हीस" - हव्या त्याठिकाणी पोस्टींग मिळणार नाही", असे माझ्या वरिष्ठ खात्याकडून लेखी लिहून आले होते. माझ्या एयर ऑफिसर कमांडिंगनी - ते कोण ते नंतर पुन्हा केंव्हा तरी लेखातून धक्कादायकरित्या प्रगट होईल - स्वतः त्या खात्याला नवीदिल्लीत भेट देऊन माझ्यासाठी केलेले प्रयत्न व्यर्थ झालेले होते. अशा परिस्थितीत मी तो प्रश्न विचारला होता. महर्षींनी दिलेल्या उत्तराप्रमाणे घडायचे असेल तर हा निव्वळ चमत्कार ठरणार होता. काही महिने गेले. मी काहीही न करता, एक दिवस मला बातमी मिळाली. तुझी पोस्टिंग पुण्याला झाली आहे. तेच माझे जन्म गाव होते. मी जेंव्हा पुण्याच्या सीमेवरील नगररस्त्यावरील नाईन बी आर डी ला जॉईन झालो तेंव्हा तो चमत्कार सत्यात उतरला होता. त्यानंतर एका लेखातून या घटनेचा उल्लेख आवर्जून केला. मात्र त्याची दखल नाडी विरोधक घेत नाहीत किंवा सोईस्करपणे टाळतात.
अनेकदा मला प्रत्यक्ष घरी भेटायला येण्यासाठीचे फोन येतात. मी प्रथमपासून म्हणत आलो आहे की मला जे म्हणायचे आहे ते मी पुस्तकातून म्हटले आहे. "आपण नाडी ग्रंथ पहावेत व काही शंका असेल तर फोनवरून संपर्क करावा, तो ही रात्री नऊ नंतर." एकदा मंजुळ आवाजाच्या एक बाई म्हणाल्या, 'काहो तुमच्या सोईची रात्री ९ नंतरची वेळ तुम्ही ठेवलित पण आम्ही नंतर परत जायचे कसे'?
'माताजी, आपण मला फोनवरुन संपर्क करावा असे सुचवले होते, प्रत्यक्षात नाही'. माझ्या खुलाशाने त्यांना रंगतदार भेटीची मजा गेली असावी. असो.
सध्याच्या परिस्थितीचे उदाहरण द्यायचे तर मुंबईच्या २६ -११च्या हल्लाप्रकरणात, भारताने पाकिस्तानच्या चरणी पुराव्यांचा ढीग अर्पण करायचा अन् आशाळभूताप्रमाणे पाकच्या तोंडाकडे पहात रहायचे! आता पाकिस्तान नक्की मानेल अशी आस करून शेपटी हालवत रहायचे! पाकने त्याकडे तोंड फिरवून म्हणायचे की 'आणखी पुरावा हवा. कितीही दिला तरी म्हणायचे की हे तर रद्दीचे कागद आहेत. आणखी खूप खूप आणा. मग नक्की कारवाई करतो. आणखी आणा'!
आपल्या सरकारने पुन्हा धावाधाव करून ढीगाने पुरावे वाजत गाजत दिले की म्हणायचे, 'छे छे यात काहीच दम नाही. आणखी हवेत'!
कार्टून जगतातील बावळट प्लूटो कुत्रा जसा मालका करता धावाधाव करतो तसा, भारताला पाक दमवतोय. मात्र निरोधकांनो, विरोधक म्हणणे ही प्रशस्त नाही कारण ते फक्त निरोध करू शकतात. नाडी महर्षींशी गाठ आहे. घडते उलटे. रडीला येतील विरोधक. हे नाडी निरोधकांच्या लक्षात येत नाही वा ते मुद्दाम तसे भासवतात.
असेच एकादा हवाईदलातील एक मित्र म्हणाले, "ऐसी की तैसी इन नाड़ीवालोंकी । विंको ओकने पागल बना के रखा है हम सब को। सब की ऐसी खबर लुंगा के पुछो मत"।
काही काळानंतर या महाशयांना नाडीत सांगितल्या प्रमाणे अपघात झाला. फ्रॅक्चर झालेला हात गळ्यात आडकवलेल्या अवस्थेत सर्वांना दाखवत भेटेल त्याला तो सांगत सुटायचा की 'नाड़ी भविष्य देखा के नही? पोस्टींग होने से पहले जरूर देख लो। बाद में यहा आना हो या ना हो।"
उलट एक मित्र विंग कमांडर राकेश नंदा ३ मोबाईल बाळगून आहे की कोणी त्याला नाडीग्रंथांविषयी विचारणा केली की तो त्यांना तात्काळ सर्व माहिती पुरवतोच शिवाय (सध्या बंगलोरला) लोकांना नाडी केंद्रात ही नेऊन आणण्याची व्यवस्था करतो. त्याला तर लोकांनी मुर्खात काढले, "तू तर म्हणत होतास की तो अमक्या तमक्या एयर मार्शलच्या प्रमोशनवर जाणार म्हणून? पण तो तर आता रिटायर होऊन घरी बसलाय! बोल आता काय म्हणणे आहे तुझे?"
अशांच्या मजा मजा सांगताना गंमत वाटते की लोक वेळ आली की कशी टोपी फिरवतात त्याची!
राकेश नंदाच्या संदर्भातील त्या उच्च पदस्थ हवाईदलातील अधिकाऱ्याने रिटायर झाल्यावर सुप्रिम कोर्टात हवाईदलाच्या विरुद्ध केस केली. नंतर कोर्टाच्या निर्णयानुसार त्याला एयर मार्शल ही पुढची रँक मिळाली. जे नंदाला व अनुषंगाने नाडीग्रंथांना अपशब्द करत होते तेच आता नंदाला नाडीवाल्यांच्याकडे नेण्यासाठी वारंवार गळ घालू लागले.
आपला जीवनाचा प्रवाह कसा बदलला, तटलेल्या मुलींची लग्ने कशी लीलया पार पडली, पारपत्र न मिळालेल्यांनी परदेशवारीची आशा सोडली होती त्यांना कसा अचानक नवा ब्रेक मिळाला.
नाडी ग्रंथांची पोल खोलायला आलेल्या एका वार्ताहर बाईंना त्यांचे दोन विवाह, नंतर झालेल्या शारीरिक व मानसिक अत्याचाराचे वर्णन, नंतर अशक्यप्राय वाटणारे तिसऱ्या विवाहाचे व बाळाचे कथन ऐकून ती डोळे पुसत रवाना झाली. कालांतराने तिला परदेशात तिसरा पती मिळाला. मूल झाले.
"असंभव म्हणावे लागेल अशा घटना कधी तुमच्या बाबत घडल्या आहेत का? तर बोला."
"सांगेन पुन्हा कधीतरी वेळ आली की..."
प्रतिक्रिया
16 Mar 2010 - 3:37 pm | टारझन
तु ऐक सत्य ना$$$रायणा$$ची कथा ..
तु ऐक सत्य ना$$$रायणा$$ची कथा ...
- (मुडी) टारझन
16 Mar 2010 - 5:33 pm | महेश हतोळकर
आहो प्रसाद तरी भेटतो.
16 Mar 2010 - 3:51 pm | Nile
बोंबला, कोण वाचणार पुन्हा तेच?पुन्हा पुन्हा तेच तेच टंकायचा कंटाळा कसा येत नाही? का नाडीच टंकुन देते?
16 Mar 2010 - 4:10 pm | नितिन थत्ते
६००० कोटी लोकाम्च्या नाड्या लिहिल्यात त्याम्नी. कंटाळा कसा येईल त्यांना?
नितिन थत्ते
16 Mar 2010 - 4:21 pm | योगी९००
काही काळानंतर या महाशयांना नाडीत सांगितल्या प्रमाणे अपघात झाला. फ्रॅक्चर झालेला हात गळ्यात आडकवलेल्या अवस्थेत सर्वांना दाखवत भेटेल त्याला तो सांगत सुटायचा की 'नाड़ी भविष्य देखा के नही? पोस्टींग होने से पहले जरूर देख लो। बाद में यहा आना हो या ना हो।"
म्हणजे युद्धाला जाण्याअगोदर प्रत्येकाने आपपली नाडी बघून जावे का? परवा हैदराबाद्च्या विमान अपघातात दगावलेल्या पायलटने नाडीपरीक्षा करून घ्यायला हवी होती असे उगीच वाटले.
आपल्या सरकारने पुन्हा धावाधाव करून ढीगाने पुरावे वाजत गाजत दिले की म्हणायचे, 'छे छे यात काहीच दम नाही. आणखी हवेत'!
पुराव्याच्या ढिगाला नाडी बांधा..लगेच सगळे प्रश्न सुटतील.
(ओकसाहेब..इथे मला नाडीवाल्यांची चेष्टा करायचा उद्देश नाही (कारण अनुभव नाही)..पण जे जे आत्तापर्यंत वाचले ते काही पचनी पडले नाही).
खादाडमाऊ
16 Mar 2010 - 4:26 pm | धिन्गाना
मी प्रथमच नाडिग्रन्थ ह शब्द एइकला.अधिक माहितिसाठि क्रुपया दुवे द्याल का?
16 Mar 2010 - 6:48 pm | श्रावण मोडक
लहानपणी आम्ही कापूसकोंड्याची गोष्ट खेळायचो, त्याची आठवण करून दिल्याबद्दल आभार.
16 Mar 2010 - 7:34 pm | सनविवि
ही फुकटची करमणूक थांबवा आता साहेब!!
16 Mar 2010 - 7:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'नाडी' विषय आला रे आला की हहपुवा होते.[काहीच विश्वास नाही म्हणून] पण आपल्या आवडत्या विषयाशी एकरुप होऊन त्याचे महत्त्व वाचकावर बिंबवत राहण्याबाबत [ न आवडले तरी] आपल्याला तोड नाही.
पुढील अनुभवांच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
17 Mar 2010 - 6:53 am | हर्षद आनंदी
असेच म्हणतो.
आपल्याला समजले नाही, अथवा विश्वास नाही म्हणुन चेष्टा करणारे खुप भेटतील, तो मानवी स्वभावच आहे. पण म्हणुन तुम्ही लिहिणे थांबवु नका. तुमचे अनुभव, इतरांचे अनुभव लिहित रहा!!
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
17 Mar 2010 - 1:06 am | राजेश घासकडवी
नाडीकथनं अशा रंगतदार भेटींसाठी फोन येतात, हा फायदा तुम्ही आधीच सांगितला असता तर इतक्या लोकांनी विरोध केला नसता असं वाटतं.
राजेश
17 Mar 2010 - 3:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =))
पूजाची(पूजेची) नाडी असेल का? ;-)
(पळा आता, ओक आणि/किंवा घासकडवींचा बडगा यायच्या आत!)
अदिती
17 Mar 2010 - 8:56 am | पाषाणभेद
नाडी रिमोटली पाहता येते का? (हे एकदम सिरीअसली आहे हं.)
आम्ही व्हॉलेंटीअर्स तयार आहोत.
तसे असेल तर तुम्ही ते पहाणे सुरू करा अन लोकांच्या तोंडाला नाडीने बांधा.
नाहितर पोपटकडे भविष्य पहाणे अन नाडी पहाणे सारखेच समजावे लागेल.
बाकी नाडी अनूभव येवू द्या. चार घटका करमणूक तरी होईल. (त्याच त्या बातम्या, (लेख), जाहीराती बघून मेंदू शिणलाय.)
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
17 Mar 2010 - 11:06 am | महेश हतोळकर
विसरा. आता पर्यंत मी २-३ वेळा हाच प्रश्न विचारला आहे. हो - नाही लांबची गोष्ट, उत्तरच येत नाही. परत विचारतो.
"मी ठसे फॅक्स किंवा कुरीयरने पाठवून देईन. नाडी मिळेल का?"
17 Mar 2010 - 9:19 am | आनंद
भारतीय हवाइ दलातली नाडी बघुन , देवावरचा विश्वास वाढला.
17 Mar 2010 - 3:01 pm | राघव
ओकसाहेब,
तुम्हाला काही समजावून घ्यायचेच नाही तर आम्हीच सांगणारे मूर्ख ठरतो.
राह्यलं. यापुढे काही सांगणार नाही ब्वॉ. चालू देत तुमचे.
राघव